जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by वसिम सय्यद
04-01-2016
wasimsayyed2007@gmail.com
सर 19, December 2014 ला एक प्रश्न विचारलं होता. त्या प्रश्नाचे उत्तर मला श्री. बी.पी. काकडे तहसीलदार, रावेर साहेब यांच्या कडून मिळाले. धन्यवाद सर ! सरांनी संगीत्याला प्रमाणे आपण प्रश्नात पूर्ण माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे मी काढलेल्या दाखल्याच्या आधारे पूर्ण माहिती नमूद करत आहो. मिळालेल्या उत्तर प्रमाणे मी सर्व दाखले काढलेले आहे. माझा प्रश्न असा होता कि, आजोबानो शेत सर्वे नं. ५२ १९५२ ला २००० रु. ला खरेदी केला होता. एकूण क्षेत्रफळ २५७१७ एवढ होता. काही काळ स्वतः वहीती केल्या नंतर आजोबाने शेत एका व्यक्तीला मक्त्याने दिला सन १९६०-६१. "पेरे पत्रक" नुसार त्याने सन १९६० ते १९७० पर्यंत मक्त्याने शेत वहीती करत होता. सन १९७३ ला शेत त्याने स्वतःच्या नावाने केला. असा उल्लेख फेरफार नोंदी मध्ये आहे. सन १९७३ ला एकाच दिवशी २०/०८/१९७३ त्याच्या नावाने तीन फेरफार झाले आहे. ते पुढील प्रमाणे –
१) सर्वे नं. ५२/१ एकूण क्षेत्रफळ २४७१६,
२) सर्वे नं. ५२/२ एकूण क्षेत्रफळ १७१
३) सर्वे नं. ५२ एकूण क्षेत्रफळ २५७१७.
असे एकूण एकाच दिवशी तीन फेरफार झाले आहे. फेरफार नं. १ व २ च्या समोर “भूस्वामी खरेदी हक्काने श.मा.क्र. ४७९/५९(१३)/६३-६४ प्रमाणे शेत सर्वे नं. ५२ सरकार पासून खरेदीस घेतला” असा शेरा आहे. व फेरफार नं. ३ च्या समोर “पोट हिस्सा एकत्र झाल्यामुळे फेरफार” असा शेरा आहे. हक्क नोंदी पत्रकात सुद्धा अश्याच प्रकारे उल्लेख आहे. खरेदी खताच्या नक्कल मध्ये “Purchase under section 43 of the Bombay Tenancy and Agriculture Lands (Vidarbha Region and Kutch Area) Act, 1958.” प्रमाणे दिनांक २२/०५/१९७३ ला शेत ९२२ रु. खरेदीस घेतला असा उल्लेख आहे. अश्या प्रकारे आजोबा च्या मालकीचा शेत मक्त्याने करणाऱ्या वैक्तीच्या ताब्यात गेला. या सर्व प्रकरणाच्या कालावधीत आजोबा जिवंत होते. आजोबा अशिक्षित असल्यामुळे संबधित व्यक्तीने याचा फायदा घेऊन शेतावर आपला ताबा केला.
सर माझा प्रश्न असा आहे कि आजोबाला भूमिहीन करून सरकारने शेत संबधित व्यक्तीला कसा काय विकला असेल? या प्रकरणी आमचा दावा चालू शकतो का? किंवा कसे? किती एकर पर्यंत कुळ कायद्यांतर्गत शेत कुळाच्या ताब्यात जातो? शेत मालकाला पूर्णतः भूमिहीन करता येवू शकते का? कुळ मयत झाल्यामुळे आता आम्ही आमचा मालकी दावा करू शकतो का? किंवा कसे? सर कृपया सविस्तर माहिती द्यावी.
Question by सुजित चव्हाण
04-01-2016
sujitchavan456@gmail.com
सर माझ्या शेती मध्ये शेजारील शेतकरयानी खाणलेल्या विहिरीचा ४०% भाग माझ्या शेती मध्ये येत आहे मोजणी केली आहे अतिक्रमण आहे असे सांगितले आहे तरी मी काय करावे वअतिक्रमण कसे काढावे मार्गदर्शन मिळावे
अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज करा किवा विहिरीच्या ४०% पाण्यावर हक्क मिळावा म्हणून अर्ज करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
04-01-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखादी इमारतीचे कायदेशीरपणे बांधकाम करताना उत्खनन केलेल्या गौनखनिजाचा वापर पुन्हा त्याच मिळकतीत केल्यास शासनास रॉयलटी / दंड भरावा लागेल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by राजेंद्र शांताराम वरतक
04-01-2016
rajendra.vartak@gmail.com
नमस्कार सर कृपया मला 11 डिसेंबरच्या प्रश्नांचे उत्तर दयावे ही विनंती. कृपया मला मदत करा.
Question by Manesh Kamble
04-01-2016
maneshkamble9931@gmail.com
महोदय,
आमच्या आजोबांची स्वकामयी व वडिलोपरजीत शेतीजमीन चे दोन गट नंबर(४२९० व १६९७) केंदूर तालुका शरूर जिल्हा पुणे येथे होते . आजोबा वारल्यानंतर त्यांचे वारस पत्नी मुल आणि मुली आसे एकूण सात जनाची नवे सात बारा वर लागली पैकी सहा जनांनी २००२ -२००३ मध्ये त्या पैकी गट नंबर ४२९० हि शेती जमीन सर्वात लहान भाऊ यास उदरनिर्वाहा साठी त्यांचा नवे करण्याचे ठरवली त्या साठी ज्याच्न्चा नावे जमीन करण्याची होती त्यांनी स्पेसल पावर ऑफ अटर्नी नोटरी समोर करून देण्याचे सांगितले व तसा मजकूर हि दाखवून नोटरी समोर सह्या घेतल्या नंतर पुन्हा तस्याच सह्या उप निबंधक यांच्या समोर करावयाचा सांगून एक वाटणी पत्र तयार करून घेऊन त्यामध्ये परस्पर त्या मध्ये दोनीही गट नंबर चा ऊलेख करून उप निबंधक समोर सह्या घेऊन फक्त वाटणी पत्राद्वारे(हक्क सोड पत्र केलेलं नाही ) दोनीही शेती जमिनी स्वत च्या नवे करून फसवणूक केली आहे. पैकी गट नंबर ४२९० हि शेतजमीन विक्री केलेली आहे व गट नंबर १६९७ आजही त्याचं नवे आहे. तरी या संदर्भात काय करता येईल मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by yogesh ahire
03-01-2016
yogesh.ahire9290@gmail.com
नमस्कार सर, माझ्या आजोबांच्या नावाने सिटी सर्वे ला गावठाण वर्ग ब 2 ची जागा आहे.पण family member अशिक्षित असल्याने ती ग्रामपंचायत मध्ये एकाने परस्पर त्याच्या नावाने करून घेतली आहे.तरी ती जागा ग्रामपंचायत ला आमच्या नावाने करायची आहे.तरी आपण उपाय सुचवा हि विनंती.
ग्राम पंचायत आकारणी नोंद वहीत झालेलेया नोंदीबाबत , गट विकास अधिकार यांचे कडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
ग्राम पंचायत आकारणी नोंद वहीत झालेलेया नोंदीबाबत , गात विकास अधिकार यांचे कडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोपान गारगोटे
02-01-2016
gargotesopan@gmail.com
मामाची जमीन बक्षीस पत्राने नावावर करायची आहे .त्यासाठी किती खर्च येयील.व त्यासाठी काय करावा लागेल .
शीघ्र सिद्ध गणकात नमूद जमिनीचे किमतीचे २ % मुन्द्रंक शुल्क आहे . मात्र मामा भाचे हे एका मेकाचे lineal , ascendant or decedent नाहीत . त्या मुले , बाजार मूल्याच्या ३ %
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
नोंदणीकृत बक्षिसपत्रकरण्याकरिता निबंधक कार्यालयात संपर्क करा
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by महाडीवाले के व्ही.
01-01-2016
mahadiwalek.v2009@gmail.com
सर
पटटे वाटप करुन दिलेल्या गायराण जमीनीची मा.न्यायालयाने भावाभावात वाटणी केली आहे, पटटे वाटप गायरान जमीनीचे फक्त वारसा फेरफार घेता येते परंतु एक भावाच्या नावाने वाटप झालेल्या जमीनीची वाटणी मा.न्यायालयाने भावाभावात वाटणी केली आहे.
तरी खालील प्रमाणे मार्गदर्शन करावे.
1) सदर न्यायालयीन आदेशान्वये फेरफार घेता येतो का
2) त्यासाठी सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे का
3) सदर आदेशाचे पालन न करता सक्षम अधिकारी यांची परवानगी घेण्यास कळविल्यास न्यायालयाचे आदेशाचा अवमान केल्यासारखे होईल का
म ज म ८५ प्रमाणे तहसीलदार यांचे आदेशानंतर फेरफार घेत yeyil
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by महाडीवाले के व्ही.
01-01-2016
mahadiwalek.v2009@gmail.com
नमस्कार सर
तहसिल कार्यालयात 7/12 वरील इतर अधिकारातील कुळ, साधा कुळ, स.कुळ, सं कुळ अशा नोंदी असलेल्या उडवण्यासाठी अर्ज येत आहेत. अशा असलेल्या नोंदी उडवण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का
महाराष्ट्र कुल्वहिवत व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ , १५ व ३१ अन्वये कुलाची वहिवाट संपुष्ट करण्याचे अधिकार मामालेतदार यांना आहेत .
तथापि , कलम १४ खाली मालकाने तीन महिन्याची आगाऊ सूचना कुलास देणे आवश्यक आहे . या कालावधीत जर , ज्या तृती साठी सूचना देण्यात आली आहे , त्याची दुरुस्ती कुळाने केली नाही तर , कुल्वहिवत संपुष्टात अंत येते .
कलम १५ अन्वये , कलम ३१ चे अधीन , मालक कुलाची वहिवाट
१. स्वतः स कसण्यासाठी
२. बिनशेती उपयोगासाठी
संपुष्टात अनु शकतो . तथापि मालकाने अशी सूचना , ३१ डिसेंबर १९५७ पूर्वी दिलेली असली पाहिजे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री. राजेंद्रप्रसाद राउत
01-01-2016
rajendraprasadraut@gmail.com
साहेब, आमचे सामाईक घर तसेच घराच्या भोवती काही जमीन आहे.. त्या घराच्या जागेमध्ये अनेक हीस्सेदारांची नावे आहेत. त्या मोकळ्या जागेमध्ये आम्हांला शौचालय बांधावयाचा आहे. मी ग्रामपंचायतीकडून अधिकृत परवानागी घेतली.त्यांनी मला परवनगी दिली. परंतु इतर नातेवाईक वारंवार हरकत घेत आहेत.तसेच त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. तर मला शौचालय बांधवयाचे आहे...तर मी काय करू..शौैचालय बांधणे योग्य की गटविकास अधिकारी यांच्या उत्तराची वाट पाहणे योग्य आहे. मला ग्रामपंचायत सहकार्य करत आहे. परंतु सह हिस्सेदार अटकाव आणत आहे. तर मी काय करू...
गटविकास अधिकारी यांच्या उत्तराची वाट पाहणे योग्य. स्मरण पत्र द्या
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित चव्हाण
01-01-2016
sujitchavan456@gmail.com
सर माझे मोठे भाऊ इंन्डियन आर्मी मध्ये आहे आमचे गाव पुर्नरवसीत आहे गावामध्ये घराचे प्लॉट शिल्लक आहेत माझा मोठ्या भाऊला गावामध्ये प्लॉट मिळवन्यासाठी काय करावे लागेल कारण शिल्लक रिटायर आर्मीसाठी राखीव आहेत असे ग्रामपंचायत मध्ये सांगण्यात आले आहे योग्य ऊत्तर मिळावे न्रम विनंती
Question by प्रफुल मोरे
31-12-2015
prafuldm@rediffmail.com
माननिय महोदय,
मला माझ्या पणजोबांच्या पासून वंशावळ काढायची आहे.
माझ्या सख्या आजोबांपासून पुढे कोणाच्याआमच्यापर्यंत कोणाच्याही नावे शेत जमीन नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी नाही. आम्ही आमच्या जमिनीचा हक्कसोड, किंव्हा जमीन विकलेली नाही.
आता मला शेतजमीन घ्यायची आहे. तर वंशावळ काढून मला शेतकरी दाखला मिळू शकतो का?
वंशावळ काढायची काय प्रोसिजर आहे?
कोणाकडून मिळते व किती दिवसात मिळते?
Question by गणेश शिंदे
31-12-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,रक्तनातेसंबंधात खरेदीखत/बक्षिसपत्र करताना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.अशी घोषणा मा.महसूलमंत्री यांनी केली होती.त्यासंदर्भात शासन निर्णय असल्यास मार्गदर्शन होणेस विनंती.
In pursuance of clause (3) of article 348 of the Constitution of India, the following translation
in English of the Maharashtra Stamp (Amendment) Act, 2015 (Mah. Act No. XX of 2015), is hereby
published under the authority of the Governor.
(18) in Article 34, in column 2, after the existing proviso, the following proviso
shall be added, namely:-
“Provided further that, if the residential and agricultural property is gifted to
husband, wife, son, daughter, grandson, grand-daughter, wife of decesed son, the
amount of duty chargeable shall be rupees two hundred.”;
(19) in Article 35, in column 2, for the words “Two hundred rupees” the words
“Five hundred rupees” shall be substituted;
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत सुरे
31-12-2015
prashantsure1707@gmail.com
एखाद्या वाकातीस फसवून मुर्तुपत्र करून घेतले असल्यास ते रद्द होवू शकते का त्याबाबत कायद्यातील तरतुदी कोणत्या याची कृपया माहिती मिळावी ही विनंती
व्यक्ती मृत्युपत्र केल्यानंतर मयत झाली दिवाणी न्यायालयात ते सिद्ध karave लागेल त्यानंतर न्यायालय ते रद्द करेल .
मृत्युपत्र करणारी व्यक्ती जिवंत असल्यास व स्वत दुसरे मृत्युपत्र केल्यास apoaap पहिले रद्द होईल
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by rajaram
31-12-2015
rajaram4021@gmail.com
सर, माझे आजोबा १९७० साली मयत झालेले आहेत,मयत झालेनंतर ६ क फेरफारला आमची सर्वांची म्हणजे माझ्या वडिलाची,आत्याची , चुलत्यांची नावें लागलेली होती .परंतु ७/१२ वरती माझे आजोबा मयत झालेवार फक्त माझ्या चुलत्याचे ए.कु .म. म्हणून नाव लागलेले होते.इतर हकाम्ध्ये कुणाची नावें लागलेली नव्हती .१९८५ सालापासून चुलत्याने ए.कु म.नाव कमी करून आमच्या आजोबांची जमीन विकलेली आहे त्यावरती माझ्या वडिलाची,आत्याची सही , सोढपत्र ,वाटणीपत्र ,वाटप झालेले नसताना चुलत्याने जमीन विकलेलीआहे . आता ५.३० मधील ३.०० एकर विकलेली आहे व जी २.०० एकर आहे ती मुदत खरेदी दिलेली आहे. आणि ३० गुंठे जमीन आपल्या पत्नीच्या नावें केलीली आहे.तरी सर आम्हला आमची सगळी जमीन परत मिळेल का ,त्यासाठी काय करावे लागेल.कृपया उपाय सांगा.
Question by प्रफुल मोरे
29-12-2015
prafuldm@rediffmail.com
माननिय महोदय,
मी तांत्रिक दृष्ट्या शेतकरी नसून प्रत्यक्ष भात शेती करतो मी महाराष्ट्र शासनाचे
ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजि,
शेळीपालन,
टर्कीपालन,
दुग्धव्यसाय प्रशिक्षण,
याचे प्रशिक्षण घेतले असून त्याचे सरकारी सर्टिफिकेट्स आहेत.
श्री सुभाषजी पाळेकर सरांचे नैसर्गिक शेतीचे शिबीर केले आहे
मी दरवर्षी 4 ते 5 कृषी प्रदर्शन निरनिराळ्या दूरवरच्या जिल्ह्यात जाऊन पाहतो.
माझ्या कडे गेली 8 वर्षापासून 5 ते 7 शेतीविषयक मासिकं येतात ज्या मध्ये महाराष्ट्र शासनाचे "शेतकरी" या मासिकाचा सुद्धा समावेश आहे.
तरी सुद्धा मला शेतकरी नसताना शेतीसाठी जमीन मिळू शकत नाही का?
मी महाड, माणगाव तालुल्यात जिल्हा रायगड येथे जमीन पहिली आहे खरेदी करण्या साठी. मला तेथे शेती व शेती संबधित व्यवसाय करायचा आहे.
तर मला शेतकरी दाखला मिळू शकतो का?
शेतकरी दाखल्या साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
चुलत चुलते शेतकरी आहेत.
महाराष्ट्र कुलवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ प्रमाणे बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खरेदी करता येत नाही.मात्र याच कलमाचे पोटकलम २ अन्वये बिगर शेतकरी व्यक्ती शेती प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन शेती जमीन खरेदी करू शकते . मात्र अश्या व्यक्तीचे अन्य सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न दहा हजारापेक्षा कमी असणे आवश्यक . दहा हजारापेक्षा कमी उत्पन्न , आजचे काळात अश्यक गोष्ट आहे . त्यामुळे आपणास शेत जमीन खरेदी करता येणार नाही . मात्र आपणास बिन शेती प्रयोजांसाठी शेत जमीन खरेदी करता येयील . त्यासाठी उत्पन्नाची अट नाही
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by रोहिदास सखाराम पाबळे
29-12-2015
rohidaspable@yahoo.in
बक्षीस पत्राने घेतलेली जमीन विकता येते का
Question by भारत borude
29-12-2015
bharatborude69@gmail.com
आदरणीय सर,
मला माझ्या जिरायत (माळरान) जमिनीचे सपाटीकरण करून (जमीन खूप उंच सखोल,दगड धोंडे ,व मुरुमाची आहे) व गाळ भरायचा आहे,तरी मला कोणत्या विभागाची परवानगी घ्यावी लागेल,व त्याची माहिती कोठे मिळेल ,मला मार्गदर्शन करावे,अशी नम्र विनंती..
सपाटी कारण करण्यासाठी कोणाची परवानगी गरज नाही
मात्र गौण खनिज स्वामित्व धन वसुली बाबत , आपण साठनिक तहसीलदार यांना अवगत करा .
जमीन सपाटी कारणासाठी स्वामित्व धन भरण्याची आवश्यकता नाही . या बाबत Bombay Minor Mineral Rules मध्ये हि दुरुस्ती करण्यात आलेली आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भारत borude
29-12-2015
bharatborude69@gmail.com
आदरणीय सर,
मी माझ्या जमिनीत विहीर खोदली असून तिची नोंदणी ७/१२ होणे कामी मा तलाठी यांच्याकडे तसा अर्ज,७/१२ उतारा,विहिरीचे स्थान नकाशा,१०० रु च्या स्टंप पेपर वर प्रतिज्ञापत्र दिलेले आहे
,व पोहोच घेतलेली आहे परंतु अजून तलाठी साहेबांनी नोंद केलेली नाही,दीड महिना झलेला आहे ,तरी मला कोणाकडे अपील करावे लागेल,कृपया मार्गदर्शन करावे.
Question by विनय राऊत
29-12-2015
Vinayrt05@gmail. com
नमस्कार
अ ब क हे एकञित कुटुंबा आहेत व त्याचे एकञित घर आहे ब ह्यास एकच मुलगी आहे तर तिला घरच्या मालमत्तेत अधिकार आहे का?
अ ब क चे निधन जुलै २००५ पुवीॅ झालेत
Question by खेडकर डी एस
29-12-2015
oiitcomputerarun@gmail.com
महानगर पालिका क्षेत्रात पिक पाहणी नोंद करता येते का
Question by हेमंत करटुले
28-12-2015
hem.kartule007@gmail.com
फेर्फाराने केवळ पहिल्या पतीनीच्या वारसांची नोंद केली आहे व दुस-या पत्नीची वारस नोंद केली नाही त्या फेर्फार्विरुद्ध तक्रार करायची आहे.
कोणाकडे तक्रार किंवा अपील करावी लागेल मार्गदर्शन करावे.
Question by हेमंत करटुले
27-12-2015
hem.kartule007@gmail.com
नमस्कार सर,
मी मुंबई ला सरकारी नाेकरीत आहे. मला गावी आदीवासी जमिन घ्यायची आहे आमच्या नावे काेठेही जमीन नाही मी आदीवासी जमीन घेउ शकताे का? ती जमीन माझ्या नावावर हाेऊ शकते का?
कृपया मागदर्शन करावे.
Question by मोहन शांडिल्य
25-12-2015
mohan_shandilya@rediffmail.com
मी शेत जमीन खरेदी करत आहे. विक्रीसाठी जागा आली आहे त्याचा ७/१२ वर (भोगवटादार वर्ग -२ विविध कायद्या खालील नवीन शर्तीने, वतन खालसा कायद्या नुसार शर्तीस पात्र ) असे लिहलेले आहे. व पाटील इनाम आहे असे सांगण्यात आले. मी ही जमीन खरेदी करुशकतो का? त्यासाठी माला काय करावे लागेल.
Question by गणेश शिंदे
25-12-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,चालू सालातील संगणकीकृत ७/१२ उतारा घेतला असता कब्जेदार सदरी असलेल्या नावांच्या समोर असलेला फेरफार त्या व्यक्तींची मालकी दर्शवित नाही.सर्वांच्या नावासमोर सारखाच फेरफाराचा उल्लेख आढळतो.त्यामुळे हस्तलिखित ७/१२ चा आधार घ्यावा लागतो.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
