जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by samadhan
23-12-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
माझ्या वडिलांच्या मृतुनंतर आपापसात वाटप होऊन हिस्से /गट पडले व सावत्र बहिणीच्या (सौ अ.) हिश्याची जमीन त्या आम्हा दोन भावांना देऊ इच्छितात. त्या गटामध्ये आमचे नाव नाही.इतर हक्कामध्ये शासनाकडील परिपत्रक अन्वये सौ अ. यांनी साऱ्याच्या ४० पट नजराणा रक्कम दि १८/२/२०१४ रोजी भरणा केली असे श्री ब. व सौ ब. यांना विक्रीसाठी. असा फेरफार शेरा आहे. परंतु सौ अ. आणि श्री व सौ ब. यामध्ये व्यवहार झाला नाही. सौ अ. या माझ्या सावत्र बहिण असून त्या त्यांचा हिस्सा मी व माझा भाऊ यांना देऊ इच्छितात. त्या श्री व सौ ब. यांच्याशी व्यवहार करू इच्छित नाहीत.
१) हक्कसोड पत्र करावे कि खरेदी करून घ्यावे अथवा बक्षीस पत्र करून घ्यावे?
२) इतर हक्कात असलेल्या फेरफार शेरयाची काही अडचण असू शकते का?
३) त्यांचे मिस्टरांची(श्री अ.) परवानगी आवश्यक आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे.
आपला कृपाभिलाषी.
scan ७/१२ upload करा . इतर हक्कात शेर काय आहे हे नक्की कळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकाच घरातील ४ व्यक्तींचे मृत्यू अनुक्रमे १९७६, १९७८, १९८६, १९९४ साली झालेले आहेत. परंतु, त्यांच्या मृत्युची नोंद अद्याप स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलेली नाही. तरी, सदरची नोंद आता करता येईल का ? तसेच सदर बाबतीत विलंब झाल्याबाबतची कार्यवाही कोणती याबाबत मार्गदर्शन मिळावे.
दिवाणी न्यायालयातून आदेश ghyavet

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर नमस्कार मी पहिल्यांदाच प्लॉट खरेदीचा व्यवहार करत आहे तरी प्लॉट खरेदी करताना एजंट कडून किंवा ज्या व्यक्ती कडून प्लॉट घेत आहे त्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्यामुळे त्यांचाकडून कुठलीही फसवणूक होऊ नये म्हणून कोण कोणती कागद पत्रे पहावी
१. प्लॉट आपण बिनशेती कारणासाठी खरेदी करत असाल तर , बिनशेती परवानगी घेतली आहे का ?
२. title search
3. paper notice dene

आपण वकील यांचा सल्ला घेऊन , त्यांना खरेदी प्रक्रिया करण्यासाठी मदत घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तलाठी या पदाकरिता कालबध्द पदोन्नति बाबतीत आवश्यक अटी व नियम या बाबत पूर्णमाहिती द्यावी. सलग १२ वषॆ सेवा दिल्या नंतर कालबध्द. देतात. की ज्या दिनांकास महसूल अहताः परीक्षा उत्तीर्ण होतो त्या ता. पासून कालबध्द ची वेतन. निश्चित. करतात सविस्तर. माहिती द्यावी.
३५-४० वर्षापासून आमच्या स्वतःच्या जमिनीवर वहिवाट कब्जा व ताबा होता व आहे पण त्याच्या शेजारील भू धारकाने ३०-३५ वर्षांनी आत्ता २०१५ ला त्याच्या जमिनिची मोजणी आणली आहे व त्यामध्ये त्याची जमीन आमच्या प्लॉट मध्ये १० फुट सरकते.. म्हणजे आमचे व शेजारील पूर्ण राहते घरे जातात असे या मोजणीत निष्पन्न झाले आणि त्या जागेवर तर आमचे घर बांधून ३५-४० वर्षे झालेत. आणि आता तो भू धारक.... आम्हाला टोर्चर करत आहे...पण आमची घरे पक्की आहेत व ती बांधून ३०-४० वर्षे झाली शिवाय ग्रामपंचायतीचा कर सुद्धा आम्ही भरतो व असीसमेंट ला सुद्धा नोंद आहेत आणि जर का त्या व्यक्तीची जागा आमच्या प्लॉट मध्ये १० फुट सरकते मग आमची जागा आमच्या शेजारील प्लॉट धारका मध्ये तेवढीच सरकते असे ४ प्लॉट धारक एक-मेका मध्ये सरकतात, मग चारही घरे आम्हाला पडून द्यावी लागतील आणि आता बांधलेली घरे पडून जागा मोकळी करून देणे म्हणजे आमच्या सारख्या वर खूपच मोठा अन्याया होईल... कारण आता बांधलेली ४-५ घरे पडणे म्हणजे शक्य नाही तरी कृपया यावर काही उपाय सुचवावा। जेणे करून कोणाचे काही नुकसान होणार नाही.
आईच्या नावे सहा घुन्ठा प्लॉट आहे सदर प्लॉट एने असून आईकडून बकक्षिस पत्राने घ्यावा कि खरेदी करून घ्यावा कोणत्या व्यवहाराने सोयीस्कर होईल.
बक्षीस पत्र करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर!
आमच्या वडिलांनी स्वतः च्या शेत-जागेवर ३०-३५ वर्ष पूर्वी घर बांधले आहे... त्यावेळी फक्त त्या परिसरात ५-६ घरे होती... त्या नंतर आता ३०-३५ वर्षांनी आमच्या शेजारील भू- धारकाने शासकीय मोजणी आणली व त्यामध्ये असे निष्पन्न झाले कि त्यांचा प्लॉट आमच्या प्लॉट मध्ये १० फुट सरकतो …. आता या परिसरात एवढी घरे झाली आहेत कि कोणाची जागा किती व कुठे सरकली हे कळणे अशक्य आहे. आमचे घर बांधून तर ३०-३५ वर्ष झाली पण आता तो म्हणतो तुमचे अतिक्रमण काढून घ्या... कृपया यावर उपाय सुचवा.
भूमी अभिलेख खाते यांची मोजणी अंतिम असते . त्या मोजणी प्रमाणे कारवाही करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... 1930 ते 1970 या काळातील इनाम वर्ग 6ब(पाटील) या जमीनींना कुळ कायदा 1948 लागू होता का? कारण कब्जेदार सदरी सरकार असे नाव होते तदनंतर 1970 साली ईनाम खालसा झाले त्यामुळे ईतर जमीनीवर ज्या प्रमाणे महसुल विभागाने कार्यवाही केली त्याप्रमाणे या जमीनीवर का करण्यात आली नाही
आदरणीय सर,५ भावांपैकी १ भाऊ २ वर्षापासून परागंदा आहे.तो अविवाहित असून.परागंदा असलेबाबत FIR दाखल आहे.तरी त्याचा जमिनीतील हिस्सा सोडून ४ भावांना आपापसात रजि.वाटणीपत्र करता येईल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
FIR दाखल होऊन ७ वर्षे झाले असतील तर , वाटप करता yeyil

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, मुखात्यार्पत्राची नोंदणी करणे कायद्याने सक्तीचे आहे काय? कुलमुखत्यारपत्र व जनरल मुखत्यारपत्र यात काय फरक आहे.
नोंदणी महानिरक्षक यांचे नवीन सूचनानुसार , मुखत्यारपत्र नोंदणी करणे आवश्यक

भारतीय नोंदणी कायदा कलम ३३ प्रमाणे हि मुखत्यार पत्राची नोंदणी आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार

बागायतीसाठी जमीन खरेदी करावयाची असल्यास काय काळजी घ्यावी जेणेकरून भविष्यात वादविवाद टाळता येतील तसेच मुद्रांक फी आणि नोंदणी फी काय असेल.
या बाबत उपयुक्त लेख आपणास मेल करण्यात आलेला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदारणीय सर,

सातबारा मधील कुटुंबाबाहेरील व्यक्तीच्या नावावर हक्क सोड पत्र करावयाचे आहे आणि आम्ही कुटुंबीय मुंबईत आहोत. आम्हा सर्वजणांना सब रजिस्ट्रार कडे जावे लागेल का ? एखादी व्यक्ती जावून हक्क सोड पत्र करू शकते का ? त्या साठी काय करावे लागेल ? त्या साठी कोणती कागदपत्रे लागतील ?
कुटुंब बाहेरील व्यक्तीचे नावे हक्क सोड पत्र करता येईल . मात्र खरेदी खत एवढे मुन्द्रंक शुल्क आवश्यक
आपणास सर्वाना दुय्यम निभंडक यांचे कडे जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझ्या मित्राची जमीन त्याच्या आजोबांनी विक्री केली होती ती जमीन खरेदी घेणार शेतकरी नसल्याने सदरची जमीन ८४ क शेरा ठेऊन अव्वल कारकून तहसीलदार यांनी सरकार जमा केली. त्या जमिनीच्या मालक सादरी सरकार शेरा दाखल आहे ती जमीन माझ्या मित्राला परत कशी मिळेल
कुल कायदा कलम ३२ प खाली , तहसीलदार यांनी या जमिनीचा विक्री लिलाव जाहीर केल्यास , मित्रास त्यास सामील होण्यास / अर्ज करण्यास सांगा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय किरण सर,
मला विहीर मालकी हक्क संबधी आजून माहिती हवी,
सर आपण दिलेल्या माहिती वरून मी काही प्रमाणात संतुस्त
आहे.परंतु तरीही मला आजून माहिती हवी आहे,तुम्ही दिलेल्या माहिती नुसार तूर्तास मालकी हक्क हा जमीन मालकाचा आहे.पण तरीही तो खर्च देवू नाही शेकत मग त्या नुसार आम्ही त्या विहिरीवर आमचा मालकी हक्क आहेना.
धन्यवाद,

Question by Ganesh Shinde
13-12-2015
shindeganesh046@gmail.com

Vikat ghetaleli jaga navavar karnyasathi lagnari mahiti.sarv process
अर्ज व खरेदी खत प्रत तलाठी यांचे कडे द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by wasim sayyed
13-12-2015
wasimsayyed2007@gmail.com

सर 19, December 2014 ला एक प्रश्न विचारलं होता. त्या प्रश्नाचे उत्तर मला श्री. बी.पी. काकडे तहसीलदार, रावेर साहेब यांच्या कडून मिळाले. धन्यवाद सर ! सरांनी संगीत्याला प्रमाणे आपण प्रश्नात पूर्ण माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे मी काढलेल्या दाखल्याच्या आधारे पूर्ण माहिती नमूद करत आहो. मिळालेल्या उत्तर प्रमाणे मी सर्व दाखले काढलेले आहे. माझा प्रश्न असा होता कि, आजोबानो शेत सर्वे नं. ५२ १९५२ ला २००० रु. ला खरेदी केला होता. एकूण क्षेत्रफळ २५७१७ एवढ होता. काही काळ स्वतः वहीती केल्या नंतर आजोबाने शेत एका व्यक्तीला मक्त्याने दिला सन १९६०-६१. "पेरे पत्रक" नुसार त्याने सन १९६० ते १९७० पर्यंत मक्त्याने शेत वहीती करत होता. सन १९७३ ला शेत त्याने स्वतःच्या नावाने केला. असा उल्लेख फेरफार नोंदी मध्ये आहे. सन १९७३ ला एकाच दिवशी २०/०८/१९७३ त्याच्या नावाने तीन फेरफार झाले आहे. ते पुढील प्रमाणे –
१) सर्वे नं. ५२/१ एकूण क्षेत्रफळ २४७१६,
२) सर्वे नं. ५२/२ एकूण क्षेत्रफळ १७१
३) सर्वे नं. ५२ एकूण क्षेत्रफळ २५७१७.
असे एकूण एकाच दिवशी तीन फेरफार झाले आहे. फेरफार नं. १ व २ च्या समोर “भूस्वामी खरेदी हक्काने श.मा.क्र. ४७९/५९(१३)/६३-६४ प्रमाणे शेत सर्वे नं. ५२ सरकार पासून खरेदीस घेतला” असा शेरा आहे. व फेरफार नं. ३ च्या समोर “पोट हिस्सा एकत्र झाल्यामुळे फेरफार” असा शेरा आहे. हक्क नोंदी पत्रकात सुद्धा अश्याच प्रकारे उल्लेख आहे. खरेदी खताच्या नक्कल मध्ये “Purchase under section 43 of the Bombay Tenancy and Agriculture Lands (Vidarbha Region and Kutch Area) Act, 1958.” प्रमाणे दिनांक २२/०५/१९७३ ला शेत ९२२ रु. खरेदीस घेतला असा उल्लेख आहे. अश्या प्रकारे आजोबा च्या मालकीचा शेत मक्त्याने करणाऱ्या वैक्तीच्या ताब्यात गेला. या सर्व प्रकरणाच्या कालावधीत आजोबा जिवंत होते. आजोबा अशिक्षित असल्यामुळे संबधित व्यक्तीने याचा फायदा घेऊन शेतावर आपला ताबा केला.
सर माझा प्रश्न असा आहे कि आजोबाला भूमिहीन करून सरकारने शेत संबधित व्यक्तीला कसा काय विकला असेल? या प्रकरणी आमचा दावा चालू शकतो का? किंवा कसे? किती एकर पर्यंत कुळ कायद्यांतर्गत शेत कुळाच्या ताब्यात जातो? शेत मालकाला पूर्णतः भूमिहीन करता येवू शकते का? कुळ मयत झाल्यामुळे आता आम्ही आमचा मालकी दावा करू शकतो का? किंवा कसे? सर कृपया सविस्तर माहिती द्यावी.
आदरणीय सर,१९३० ते १९५० च्या कालावधीत अपाक.नाव मुलगा/मुलगी किती वर्षाची झाल्यावर कमी होत होते.
मुलगा / मुलगी १८ वर्षाचे झालेवर सज्ञान होतात . त्या ननतर अ प क कमी होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Dear sir I'm talathi joined at dt. 25 /5/1999 my qu. is which dt. for my timeboud promotion & tell me about criteria &M.N.S.Rules.
सर
१) वयस्कर व्यक्तींना मृत्युपत्र बनवण्याकरता वयाची काही मर्यादा आहे का?
२) मृत्युपत्र बनवण्यासाठी (वृद्ध पण व्यक्ती नॉर्मल असेल तर) डॉक्टरांचा काही दाखला मिळवण्याची काही गरज असते का? असेल तर सरकारी किवा खाजगी या पैकी कोणत्या डॉक्टरांचा दाखला हवा असतो?

Please help

Question by Arjun
12-12-2015
mohanms9775@gmail.com

साहेब
A व्यक्ती १९७० मध्ये मयत झाले नंतर A ला B व K असे २ मुले आणि XYZ असे ३ मुलींचे नांव बिगर कब्जेदार सदरी इतर हक्कात नोंद आहे B या व्यक्ती कुटुंब प्रमुख
होते K या व्यक्तीने १९९० मध्ये ७/१२ चे वाटणी करून घेताना त्यांचे ७/१२ मध्ये XYZ या बहिणींचे लावानेत आलेले नाही सदर त्या बहिणींचे नांव B या व्यक्तीचे ७/१२ वर नांव आहे X 1995 मध्ये मयत झाले Y 2001 मध्ये मयत झाले आणि Z vyakti 2005 मध्ये मयत झाले . कुटुंब प्रमुख B या व्यक्तिंचे २००१ मध्ये मयत झाले सदर B या व्यक्तीला ३ मुले वारसदार झाले सदर ७/१२ क्षेत्र भूसंपादन १९९७ मध्ये झाले आहे आज तागायत काही पैसे घेतले नसुन सदर या तिनी XYZ महिलांचे वडील १९७० मध्ये २००५ पूर्वी मृत्यू झाले असलेने संबंदित महिलांचे वारसांचे नांव लावणे आवश्यक आहे काय ? सदर महिलांना समान हक्क मिळणार काय ? व K या व्यक्तीने वाटणी करून घेतले योग्य आहे काय ? माहिती मिळावे विनंति.

Question by ohan
12-12-2015
mohanmsutar@gmail.com

आदरणीय साहेब एका कुटुंबाचे भूसंपादन झाल्यानंतर सदर त्या कुतुंबंचे राज्यात व इतर राज्यात कोतेही शेत नसल्यास सदर त्या कुटुंबातील व्यक्तीला उशिराने नोकरी मिळणे संबंदित कुटुंब भूसंपादन करते वेळी त्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळाले नसल्यास योग्य दर मिल्नेसाठी कोर्टात गेलेनंतर १०-१५ वर्षांनी निकालास वेळ लागणे ह्याजामुळे त्या कुटुंबात प्रतीक्षा असणारे सर्व व्यक्तिंचे काहीही साधन nasalene शिक्षण पूर्ण न होत वय उलटून गेलेने त्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यासा त्याक कुटुंबातील दुसर्या व्यक्तींना प्राधान्य देणे आवश्यक आहे हि माझे अभिप्रायास माहिती मिळावे vinanti
प्रकल्प ग्रस्त दाखला कुटुंबात हस्तांतरित करता येतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी या आधी ९ डीसेंबरला प्रश्न विचाला होता. सर माझा प्रश्न असा आहे की माझी सरकारी मोजणी २००७ साली झाली होती .तेव्हा तालुका भूमी अभिलेखा कडून नकाशा वेगळा व जागेवरील खुणा वेगळया . नकाशा व प्रत्येक्ष जागा या मधे खुप तफावत होती. भूमी अभिलेख मधे चौकशी केली असता पुन्हा पैसे भरून मोजणी करावी लागेल असे सांगीतले. त्याप्रमाणे पुन्हा मोजणी फी भरून चुकीची दुरूस्ती करण्यात आली.व सर्व लगतदाराना ती मोजणी मान्य होती. परंतु 18जून २०१५ रोजी उत्तरेकडील कबजेदारान मोजणी केली असता ती माझ्या हद्दीत आडीच फुट आली त्यामुळे माझा उत्तरेकडील मार्ग बंद झाला. एकदा हद्द कायम केलया नंतर ती पुन्हा कशी बदलू शकते या मुद्द्यावर मी जीलहाधीकारी व जीलहा अधीक्षक भूमी अभिलेख येथे तक्रार केली .त्याप्रमाणे पुन्हा २७ ऑगस्ट २०१५ ला फेर मोजणी झाली व ती २००७ प्रमाणे आली. व 18 जून ची मोजणी रद्द करण्यात आलेली आहे असे लेखी पत्र माला देण्यात आले आहे.
२७ ऑगस्टची मोजणी ही शिरस्तेदाराने केलेली होती. अता पुन्हा जीलहा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कडून असे पत्र आले आहे की ही मोजणी शिरस्तेदाराने केलेली असून सवतः उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुखांनी समक्ष मोजणी कामाची पाहणी करणे अपेक्षित होते. हे काम कोणी करावे हा निर्णय त्या कार्यालयाचा होता. यात माझा दोष काय? मोजणी ऑफिसचा सततच्या होणाऱा त्रासाचे काय करावे? आणि किती वेळा मोजणी करावी? आता पुढे मी काय करावे. मला कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. अता तक्रार कुठे करावी?










आदरणीय सर,एखाद्या जमिनीबाबत नोंदणीकृत समजुतीचा करारनामा करता येईल का?करता न आल्यास नोटरी कडील करारनाम्यास किती महत्व राहील?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
सर मी औरंगाबाद ला राहतो.....माझी सासुरवाड़ी वाशिम आहे... मला 2 सासु आहेत... पहिल्या सासुला 4 मुले अणि दुसऱ्या सासुला 1 मुलगी अणि 1 मुलगा आहे .... म्हणजे एकूण 5 मेहुने आहेत... अत्ता माझे जे सासरे आहेत ते माझे सख्हे मामा पण आहेत...म्हणजे मी मामाची मुलगी माझी पत्नी आहे...वाशिम ला 160 गुंठे ज़मीन आहे...त्यांच्या घरगुती अंतर्गत भांडने सुरु होते...सासरे वाटनि करुण द्यायला तैयार नव्हते....नंतर आम्ही म्हणजे मेहुने अणि मी कोर्टात याचिका दाखल केलि...नंतर लगेच ससऱ्याने वाटनि करुण दिली सर्वांना 20.55 एवढा हिस्सा मिळाला.... नंतर मेहुने अणि मामाने 80 गुंठे मधे प्लॉटटिंग केलि...अणि वीकली पण माझा हिस्सा अणि 80 गुंठे जमीन बाजूला राहिली.... परंतु सासर्यांनी वाटनि पत्र कॅन्सल करीता न्यायालयात याचिका दाखल केलि...अणि फ़क्त मझीच जमीन त्यांना परत हवी आहे....
तर हे शक्य आहे का ? धन्यवाद
आमचे आजोबा वरल्या नंतर त्यांच्या इतर मालमत्ता यांना संपूर्ण वारसांची नावे लागली ,परन्तु १मालमत्ता संपूर्ण वारसांची नावे न लगता फक्त मोठ्या चुलते याचे नाव लागले त्या मुळे मोठ्या चुलत्याने या बिन्शेती मालमत्तेतिल काही जमीन विक्री केली व बाकी त्याच्या मुलाचे नावे केली आम्ही १५५ वारस चौकशी अंतर्गत तहसीलदार यांनी संपूर्ण नोंदी रद्द करणे बाबत मत व्यक्त केले असून संपूर्ण नोंदी रद्द करणे बाबत उपाधिकारी यांचे कडे आपील करा .मी त्यानुसार आपील दाखल केले आहे परन्तु सामनेवाले राजकीय व वाम मार्गाचा वापर करून निकाल त्यांच्या बाजूने लावन्याचा प्रयत्न करून निकाल बदलू शकतात का..?

This page was generated in 0.25 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3