जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by ambhore
04-04-2014
vv_rt@rediffmail.com

CRZव ESZ या मध्‍ये काय फरक आहे व असे क्षेत्र घोषीत केल्‍यामुळे कोणकोणत्‍या गोष्‍टीस अटकाव होतो
उदा.दगड वा रेती उत्‍खनन करता येईल किंवा नाही व तसेच इतर विकास कामे
सीआरझेड म्हणजे "किनार नियमन क्षेत्र" होय; तर ईएसझेड म्हणजे " पर्यावरणीय संवेदनाशील क्षेत्र" होय. सीआरझेड चे एकुण जैवविविधता व किनार्‍यापासुनच्या अंतराच्या आधारावर एकुण ५ प्रकार पडतात. वरील दोन्हीमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टींना परवानगी नाही, त्याबाबत सीआरझेड नोटीफिकेशन २०११ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ५ चे निर्बंध वाचावेत.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर एका व्यक्तीने त्याची वडिलोपार्जित जमीन १९७२ साली विकली . ते दोन सर्वेय नंबर होते . इस्सार पत्रावर व्यवहार झाला . जमीन विकणाऱ्या व्यक्तीने राजीस्त्री करून दिली नाही करिता खरेदीदाराने दिवाणी कोर्टात दावा दाखल केला . कोर्टाने विक्री करून दिली . परंतु एकाच शेताचा फेरफार झाला . परंतु ताबा दोन्ही शेताचा खारेदिदाराकडेच आहे . आता शेत विक्नार्याचे वारस आक्षेप घेत आहे कि सदर मालमत्ता हि वडिलोपार्जित असल्याने त्यांच्या वडिलांना विकण्याचा अधिकार नाही करिता फेरफार घेऊ नये . काय केले पाहिजे?
सर बाबुराव यांनी १९५७ वर्षी २ हेक्टर जमीन खरेदीने विकत घेतली होती सन १९७३ पासून ७/१२ ला त्यांचे भाऊ पंडित यांचे नाव आलेले आहे येकत्रिकरणाच्या वेळेस कबुली जबाबाने भाऊ हिस्स्याने सदर जमीन पंडित यांच्या नावाने झाली आहे परंतु भुमिअभुलेख कार्यालयात jababachya प्रती उपलब्ध नाही पंडित यांचा नावाने झालेला फेरफार उपलब्ध नाही सन१९७३ पासून जमीन पंडित यांच्या ताब्यात आहे त्या पैकी ०.३३ आर जमीन मुलीचे नावाने केली आहे मुलीने जमीन लेंभे यांना विकली आहे लेंभे यांनी फेरफार साठी दस्त दिले बाबुराव चे वारसांनी फेरफार न करणे बाबत हरकत अर्ज दिला आहे फेरफार करावा कि नाही
आपण तलाठी असाल तर नोंद घेणे आपली प्रथमिक जबाबदारी आहे. त्या बाबत आक्षेप आला तर त्याची नोंद घ्यावी. (नोंदणी कुतविक्री दस्त नाकारणे महसुल न्यालयाच्या कार्यकक्षेत नाही)

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सर, कालब्‍ध्‍द पदोन्‍नतीचा लाभ मिळण्‍याकरीता विभागीय दुय्यम सेवा परीक्षा उत्‍तीर्ण असणे आवश्‍यक आहे काय या बाबत माहिती दयावी ही विनंती.
नियमीत पदोन्‍नतीसाठीचे सर्व अटी/शर्ती कालबध्‍द पदोन्‍नतीसाठी लागू आहेत.

Reply by रामदास के कोळगने | नायब तहसीलदार

शासकीय कर्मचार्यासाठी २०१३-२०१४ इतर मागासवर्गीय वर्ग उन्नत गट (क्रिमी लेयर) उत्पन्न मर्यादाबाबत शासकीय निर्णय मार्गदर्शन हवे आहे? एकून उत्पन्न ग्राह्य धरताना वेतन आणि शेती पासूनचे उत्पन्न धरावे कि वेतनशिवा य इतर उत्पन्न धरावे.
आदिवासीचीनची जमीन प्रकल्पग्रस्त व्यक्ती खरेदी करू शकतो का? करता येत असेल तर त्या साठी कोणता जी. आर. आहे.
जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय आदिवासीचीनची जमीन कुणलाही घेता येत नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

माझे वडील आणि त्यांचे सक्खे भाऊ यांनी १९८७ ला २८ एकर जागा विकत घेतली. खरेदीखतात दोघांचे प्रत्येकी आठ आणे नमूद केलेले आहेत. जागेच्या कोणत्याही प्रकारे वाटण्या झालेल्या नाहीत. काकांनी परस्पर आम्हाला कळू न देत त्यापैकी १० एकर जागा विकली. हि विक्री कायदेशीर आहे का? हि जागा खरेदी करण्याचा आम्हाला हक्क आहे का? असल्यास आम्ही तो कसा बजावावा.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम पाहिजेत

Question by gunjal jyoti
28-03-2014
gunjaljyoti25@gmail.com

probationary naib tahsildar cha probationary period madhe caual leave count hotat ka ? probationary cha period कसा count kela jato? plz i want documenatary how many document require for complete probationary period?
नियमाप्रमाणे किरकोळ रजा घेतल्यास परि. कालावधी पुढे वाढतो तसेच अर्जित रजा घेतल्यास तेवढा कालावधी परि. काळ पुढे जातो. परि. काळ संपल्याचे जाहीर करण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे:- १) परि. काळातील सर्व दैनंदिन्या आणि मुल्यांकन अहवाल, २) विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेबाबतचे पत्र, ३) मराठी, हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेबाबतचे पत्र, ४) पायाभुत प्रशिक्षण पुर्ण झालेबाबतचे पत्र इ.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by sonal tarte
28-03-2014
tartesonal@gmail.com

सर ,बिगरशेतीसाठी (na ) करण्यासाठी १एकर जागा असावी लागते का?त्यापेक्षा कमी जमीन na होऊ शकता नाही का?
असा काही नियम नाही..... पण एक एकर वर बिनशेती करावयाचे असेल तर रेखांकन करावे लागते.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by raviं
27-03-2014
 virravi3@gmail.com

मृत्युपत्र, बक्षीसपत्र,किंवाकोणताही दस्त परवाना धारक बाँड रायटरनेच लिहणे आवश्यक आहे काय किंवा कोणीही लिहू शकतो ? याबाबत माहिती कोणत्या नियमात मिळेल
सदर बॉंड कोणीही लिहु शकतो.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी ओळखपत्राचा विहित नमुना आहे का ? ( रंग, आकार, मजकूर ई.) असल्यास कृपया तो मला मेल करावा, ही विनंती.
तसा अधिकृत नमुना नाही.

Reply by MCS Maharashtra | इतर

Question by mnm
26-03-2014
madhavnmule@gmail.com

सर विदर्भातील काही जील्‍हामधील 7/12 अभीलेखातील ईतर अधीकारात "नैमीतीक सत्‍ता प्रकाराने शर्तीवर धारण केलेले शेत" या नावाचा बोजा आहे वरील बोजाचा अर्थ काय याबाबत कुठला gr आहे का
सेवा पुस्तिकेतील मंजूर नोंद रद्द करता येईल काय? असल्यास, कोणत्या सेवा नियमांनी करता येईल.
पोलिंग personals ट्रेनिंग साठी PPT , video असल्यास plz share करावे
audio visual फिल्म youtube वर हि आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भारत निवडणूक आयोग यांचे संकेत स्थळावर निवडणूक प्रक्रिया व EVM यांचे बाबत dhvani चित्रफित आहे . सर्व बाबी समाविष्ट केलेल्या आहेत.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कृपया निवडणूक २०१४ विभागास भेट द्या , उपलब्ध करण्यात आले आहे.

Reply by MCS Maharashtra | इतर

मंडळ अधिकारी याचे कडून अहवाल आला असता, महारष्ट्र सरकार गुरचरण जमिनीच्या ७/१२ इतर हक्क सदरी तलाठी सजा ०-०५-० व पोलिस स्टेशन ०-०३-१ राखीव शेरा देनेस विनंती केली आहे. तर तहसीलदार यांना तसा आदेश तलाठी यांना देत येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.
नायब तहसीलदार विभाग बदली बाबत शासन निर्णय पलोड करावा.

Question by mohan
22-03-2014
mohanmsutar@gmail.com

साहेब
आपण संगेतले प्रमाणे शासनाकडून ३हे .१५आर साठी १७०००० रुपये मंजूर झालेले आहे . त्या पैसे मदे ४०आर शेत जमीन सुद्धा मिळत नाही .आमचे पर्स्तीती गरीब आहे .दरोरोज कामाला गेल्या शिवाय पोट भारत नाही सद्याचे भोगावत किमत भाराने अवगड आहे .१९९७ मदे शेत जमीन गेले आहे. कोर्टात गेल्याने १९९७ पासून २००० पर्यंत आमचे व्याज देनेत आलेले आहे . सदर आमचे शेत जमीन असेल तर १७ वर्षाचे उत्पन्न विचारे करून भोगावत किमत न भरत शेत जमीन
मिळण्याचे माहिती द्यावे करण आमचे वर शासना ने कृपा करून जमीन देण्याचे मार्ग सांगावे.कारण शेत जमीन गेले नंतर मला खूप पास्च्यातर झालेले आहे. पैसे नसलेने मी फार अडचणीत आलेले आहे.मोबदला एवजी भोगावत किमत न भरता जमीन मिळण्याचे माहिती द्यावे.
सर आमची गावी सामाईक जमीन आहे त्या जमिनीचे ६ मुख्य वारसदार व त्यांचे सह्हीसेदार यांची सातबारावर नावे आहेत तर या जमनीतील ३ गुंठे जमीन आम्ही सार्वजनिक मंदिर बांधण्यासाठी गिफ्ट डीड तयार करणार आहोत तर या गिफ्ट डिडवर सही ६ मुख्य वारसदार यांच्याच चालतील कि सातबारावरील सर्वांची सही लागेल काय गिफ्ट डिड रजी .करणार आहोत तर याची माहिती द्यावी .
मुख्य ६ वारसदार व त्यांचे सह हिस्सेदार ?
ज्या सर्वांचा मिळकतीमध्ये हक्क आहे , ते सर्व जन जर एकत्रितरीत्या ३ गुंठे जागा दान करत असतील , त्या सर्वांची दान पत्रावर सही आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mahadeo dane
21-03-2014
mahadeodane444@gmail.com

सर
कुळाला कुळ कायद्यांतर्गत जमीन मिळाली कुळाची नोंद कब्जेदार सदरी झाली परंतु काही वर्षानंतर तहसिलदार यांनी मुळ जमीन मालकाचे नावे जमीन करण्याचे आदेश दिले परंतु आजही जमीन कुळाच्या ताब्यात आहे तर जमीनीला कुळाचे नाव लावण्यासाठी काय करावे लागेल ?
एकदा कुळाचे नावे जमीन झालेवर , पुन्हा जमीन मालकाचे नाव अगदी काही प्रसंगी लागते. जर कुल कायदा तरतुदींचा भंग झाला असेल तर कलम ८४ क अन्वये जमीन शाषण जमा होते. कलम ३२ प खाली वाटप करताना , पुन्हा मालकास जमीन मिळू शकते .
अश्या अपवादात्मक परीस्थिशिवाय मालकाचे नाव परत लागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. वास्थुस्थिती तपासून पहा व त्या प्रमाणे आपण प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करू शकता.
अन्यथा पुन्हा ७० ब कलमाप्रमाणे कुल म्हणून नाव लागण्यासाठी , मालकाने जमीन आपणास कसण्यासाठी दिली पाहिजे व आपण व जमीन मालक यांचेत कुल वहिवाट संभंध प्रस्थापित होणे आवश्यक. मालक सध्या स्थिथित आपणास जमीनकसण्यास देणे दुरापास्त आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर पोलिस स्टेशन कडून १०७, ११६ (3) मध्ये तहसीलदार कडे इस्तेगाषा प्राप्त होते त्यानुसार जाब देणार यास समन्स काढतो परंतु पो स्टे कडून समन्स बजावणी करून परत येत नाही किंवा जाब देणार हजर होत नाही तेव्हा काय कारवाई करावी
पोलिस समन्स बजावणी करत नसतील तर सदर बाब पोलिस अधीक्षकांना कळवावी .
आपण warrant हि काढू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

समन्स बजावणी करण्याची कार्यवाही आपल्या स्तरवरून करावी. जाब देणार याचे समाजातील प्रतिमा पाहून कलम १११ खाली आदेश काढण्याची कार्यवाही करावी. नाही तर ११६ (६) नुसार प्रकरण नास्तीब्ध करावे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

एका माणसाचे नावाने स न ५/१ शेत्र ०.९८ व ५/२ शेत्र १.२१ हेक्टर जमीन आहे परंतु ७/१२ वेग वेगळा आहे दोनि जमिनीचा एकत्रीकरण होवून ७/१२ एक होतो काय व तसे आदेश करण्याच अधिकार कोणास आहे
मुंबईचा जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे आंणी त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ व नियम १९५९ नुसार जमाबंधी आयुक्त असे आदेश पारित करू शकतात.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सर १०७, ११६(3) मध्ये समन्स कडून सुधा जाब देणार हजर होत नाही तेव्हा सदर केस किती महिने ठेवावी व कोणती आदेश पास करावा अशा परिस्तितित केसेस चालविणे बंधनकारक आहे काय
सी. आर. पी .सी . १९७३ कलम ११६ (६) नुसार अपवाद वगळता ६ महिन्यात दंडाधिकारी यांनी प्रकरण निकाली काढणे अपेक्षित आहे

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by mn
19-03-2014
madhavnmule@gmail.com

कुळाने मुळ मालकाकडुन महसुल वीभागाव्‍दारे purchase certificate व्‍दारे जमीन खरेदी केल्‍यानंतर भोगवटदार 1 जमीन भोगवटदार वर्ग 2 होते का
कुल कायद्या अंतर्गत जमीन खरेदी करून १० वर्ष झाले असतील तर नवीन सुधारणेनुसार भोग्वातदार वर्ग १ होते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मनं
18-03-2014
madhavnmule@mail.com

पुनरवसन अंतर्गत प्राप्‍त झालेली जमीन भो वर्ग 2 आहे सदर जमीनीचे आपसात वाटणी करण्‍यासाठी सहहिसेदारांनी तलाठी यांचेकडे 100 रु चे स्‍टॅपवर अर्ज सादर कंला आहे सदर जमीन भो वर्ग 2 असल्‍यामुळे सहहिसेदाराची वाटणी करता येईल का याबाबत कुठला gr आहे का
सह हिस्से दार यांनी नोंदणी krut दस्त द्वारे वाटप करणे आवश्यक .अथवा tahsildar यांचे कडे अर्ज करून कलम म.ज.म. आ. १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप करून घ्यावे.
अन्य परवानगीची गरज नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.31 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3