जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अमोल चव्हाण
14-02-2014
amolchavhan234@gmail.com
मी दिनांक १३.५.२००८ रोजी कनिष्ट लिपिक या पदावर रुजू झलो व जुलै २०१३ मध्ये सातव्या संधीत दुय्यम सेवा उत्तीर्ण झलो आणि महसूल आर्हता अक्टोबर २०१३ मध्ये उत्तीर्ण झलो माझी सेवा जेष्ठत कोणती राहील कृपया कळवावे आपला नम्र
Question by Deepakkale472@gmail.com
13-02-2014
Deepakkale472@gmail.com
आपला प्रश्न/सूचना ...सर मी 15 वर्षापुर्वी सिलिंगची जमिन घेतलेली आहे त्याचा 30 वर्षाचा भाडेपट्टा करुन सातबारावर वहिवटदार म्हणुन नाव आहे ती जमिन खरेदी करण्यासाठी मला परवानगीची गरज लागेल का? व लागत असेल तर मला त्याविषयी माहिती द्या
Question by vijay
12-02-2014
vv_rt@rediffmail.com
गौणखनिजाचे परवाना देताना TDS चलन भरुन घेतो तर सध्या गौणखनिजाकरीता TDS चा काय रेट आहे व तसेच सेस किती घ्यावा उदाहारण १,00,०००/- करिता किती TDS घतला पाहीजे
Question by रमेश कांबळे
12-02-2014
rameshkamble152@yahoo.in
शासन निर्णय दि.०५/०३/२००४ अन्वये अंपगाच्या पदोन्नतीसाठी बिंदु क्र.१,३४.६७ आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत.क्र.०१व ६७ हे अनु.जातीसाठी राखीव आहेत. अव्वल कारकून पदी अनू.जाती प्रवर्गातून एका कर्मचा-याची पदोन्नती सन २००८ मध्ये झालेली आहे.त्यानंतर सदरचा कर्मचारी सन २००९ अपंग झाल्यानंतर त्याला अव्वल कारकून पदावर अनु जाती अपंग बिंदु पदोन्नतीने भरलेला आहे. असे दर्शविलेले आहे.तरी एकाच कर्मचा-यास वेगवेगळया संवर्गातून एकाच पदावर पदोन्नती दिलेली आहे.असे दाखविता येईल का कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by संतोष जवरे
12-02-2014
jaware_sb@rediffmail.com
एका ७/१२ मध्ये दोन व्यक्ती ची नावे आहेत त्यांची दोन महसुली गावामध्ये मिळकत आहे. त्यांच्या दाव्याचा कोर्ट तून निर्णय दिला कि एका व्यक्तीला एका गावाची व दुसर्या व्यक्तीला दुसर्या गावाची मिळकत दिली. तर त्यानुसार फेरफार टाकणे योग्य राहील का?
कोर्टाच्या निर्णयानुसार फेरफार घेण्यास काहीच हरकत वाटत नाही. फक्त अपील कालावधीची मर्यादा पहा आणि निर्णयानुसारच तपशील फेरफारात ठेवा.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
12-02-2014
jaware_sb@rediffmail.com
घरवाडा ची व्याख्या व कलम कोणती
Question by कुणाल अंकुश जाधव
12-02-2014
mr.k1387@gmail.com
जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा दुसऱ्या कार्यालयात वर्ग झालेली असेल तर त्यांना अतिकालिक भत्ता, गणवेश भत्ता व इतर भत्ते कोणत्या कार्यालयाकडून देण्यात यावे ? मूळ आस्थापना की सेवा वर्ग आस्थापना ?
वास्तविक सेवा वर्ग करणे हि चुकीची प्रथा आज प्रत्येक कार्यालयात दिसून येते.
सेवा वर्ग आदेशामध्ये अतिकालीम भत्ते, व इतर भत्ते मुल विभागाने द्याव्यावेत असा उल्लेख केला जातो. जरी उल्लेख केलेला नसला तरी , मुल विभागानेच भत्ते देणे आवश्यक आहे.
सेवा ज्या कार्यालयात वर्ग केलेली आहे तिथे तरतूद नसते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
जेथे प्रतींनियुक्ती आहे तेथेच मिळायला पाहिजे. वाटल्यास मूळ विभाग व प्रतींनियुक्ती विभाग हे अति व शर्ती नुसार त्याबाबत नंतर ताळमेळ /जमाखर्च घेऊ शकतात.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
जेथे प्रतींनियुक्ती आहे तेथेच मिळायला पाहिजे. वाटल्यास मूळ विभाग व प्रतींनियुक्ती विभाग हे अति व शर्ती नुसार त्याबाबत नंतर ताळमेळ /जमाखर्च घेऊ शकतात.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by dayanand thakurdas
11-02-2014
day12877@gmail.com
मला सिलिंग मधील जमीन अर्ज केलेनंतर १९७८ साली ४ एकर मंजुरीने मिळाली मला नगरपालिकेत नोकरी असल्याने खोटा अर्ज करून शासनाची दिशाभूल करून जमीन मिळाली असल्याने सदर जमीन शासनाने जमा करून घ्यावी असा अर्ज एकाने माझेविरुध्य केल्याने मला सर्कल ची नोटीस आली आहे मी जमीन १९७८ पासून कसत आहे म्हणजे ३६ वर्ष कसत आहे मी काय करावे कळत नाही
मंडळ अधिकारी यांना नोटीस देण्याचा अधिकार नाही.
आपण अर्ज करताना नगर पालिकेत नोकरीस होता का ?
नोकरीत आहे म्हणून , जमीन मिळण्यापासून आपण वंचित होऊ शकत नाही
जर आपले नावे २.५ एकर जिरायत, १.२५ एकर हंगामी बागायत / भात शेती जमीन मंजुरी वेळी असेल तरच आपणास जमीन मंजूर होऊ शकत नाही.
नोकरी हे जमीन काढून घेनेसाठी कारण असू शकत नाही
३६ वर्ष एवढ्या प्रदीर्घ कालावधी नंतर कारवाई/ कार्यवाही करता येणार नाही.
आपणास नोटीस केवळ जमीन मंजूर करणारे कार्यालय देऊ शकते. जिल्हाधिकारी/ आयुक्त. मंडळ अधिकारी नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ravi
11-02-2014
virravi3gmail.com
सर आपण दि 17.9.13 रोजीच्याक्र 23 1 च्या दिलेल्या प्रतिसादामध्येउल्लेख केलेल्या शासन निर्णय चा क्रमांक देण्याची कृपा करावी
Question by m n mule
11-02-2014
madhavnmule@gmail.com
हिंदु एकत्र कुटुंबात वडीलोपार्जीत जमीनीचे आपसात वाटणीपत्र करण्यासाठी हिंदु एकत्रा कुटुंबातील कोणती कोणती कोणती नाते ग्राहय धरली जातील
Question by माधव न mule
11-02-2014
madhavnmule@mail.com
सन 2001 वर्षी एका जील्हयातील तीन गावाचे अभयारान्यामुळे
दुस-या जील्हयामध्ये पुनरवसन झाले सदर पुनरवसीत लोकांना दीलेली जमीन आज रोजी 7/१२ अभीलेखावरती भो वर्ग 2 म्हणुन रेकॉर्डला आहे. पुनरवसीत लोकांचे पुनरवसन होउन आज 10 वर्ष पुर्ण झाले असुन सदर प्रकल्पग्रस्तांची जमीन भो वर्ग 1 होईल का ? भे वर्ग 1 होत असल्यास त्याचा GR आहे ?
Question by मदनसिंग परदेशी
10-02-2014
madanpardeshi261987@gmail.com
महोदय,
उदा.एखादा लिपीक (अबक) आंतरविभागीय बदली होऊण पुणे विभागातुन औरंगाबाद विभागात बदली झाली तर त्याला दुय्यम सेवा परीक्षा व महसुल अर्हता परिक्षा पुन्हा दयायची गरज नाही का? असल्यास कोणत्या नियमाद्रवारे किंवा कसे?
१.दिनांक २०.९.१९९० च्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार तलाठी यांना आंतरविभागीय बदली नंतर नवीन विभागात दुय्यम सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे आवशक आहे. परतू लिपिक यांना या तरतुदी लागू होतात काय ? किव्वा वेगळ्या सूचना आहे ते तपासून घायाव्या.
२.महा.शा.कर्म.ब.वि.आणि शा.क.प.पा.हो.वि.प्रति.अधिनियन २००५ हा दिनांक १ जुलॆ २००६ लागू झालेला आहे त्यामुळे दिनांक १ जुलॆ २००६ पुर्वी बदल्या बाबत काढण्यात आलेले सर्व शासन निर्णय रद्द झालेले आहे.
३. दिनांक ३.६.२०११ चे शासन निर्णयाचे अवलोकन करावे.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by atul
10-02-2014
ambhorea@yahoo.com
नवीन गौण खनिज अधिनियम 2013 नुसार तहसिलदार 500 ब्रास पर्यंत गौणखनिजाची परवानगी देवू शकतात
तर एखादी स न xyzजमिनी 4 ते 5 व्यक्तीची नावे असलेल्या जमिनीत एका व्यक्तीस 500 ब्रासची परवानगी दिली आहे परंतू आता त्याच जागेत त्यांचेचपैकी दुसरा व्यैक्ती 500 ब्रास माती उत्खननाची परवानगी मागत आहे तर त्याच जागेत तशी परवानगी देता येईल काय
?
जागा एकच असुन 4 ते 5 व्यक्तीची नावे सह हिस्सा म्हणुन आहे
जागा जरी ४-५ लोंकाचे मालकीची असली तरी , त्यांचे हिस्से निशित असतात. अन्य सह धारकांची संमती असल्यास परवानगी देण्यास हरकत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by लक्ष्मन गोसावी
10-02-2014
laxmangosavi1@gmail.com
मी मौजे दोडी खु ,ता सिन्नर,जि नाशिक येथील रहिवाशी आहे .येथील शेतजमीन गट नं ४६३ हा भिका गणू सुतार यांच्या नावावर असून ते मयत आहेत सदर जमिनीवर माझे पणजोबा पासून आमचा कब्जा आहे .सन १९३४ पासून सदर जमीन आमच्या काब्ज्यात असून जमीन कसणाऱ्या ठिकाणी माझे पणजोबा आजोबा व आता माझे वडील याचे नाव आहे .सदर मूळ मालक भिका गणू सुतार हा पूर्वी पणजोबा असताना मयत झालेला असून त्याची मयत नोंद पण भेटत नाही तरी पिक पाहणी सादरी पणजोबा ,आजोबा ,अ आता वडिलांचे नाव आहे सदर जमीन आम्हाला आता मालकी हक्क मिळण्यासाठी काय करावे लागेन. आम्ही कुळकायदयाने अर्ज दिला होता पण कुळकायदा बंद झाला आहे असे सांगितले . तरी सदर जमीन आम्हाला मालकी हक्काने मिळण्यासाठी काय करावे लागेन किवा कुठल्या कायद्या ने मिळेल .
िवाणी न्यायालयात दावा दाखल करा. adverse possession ने आपण मालक जाहीर होऊ शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by madhav n mule
09-02-2014
madhavnmule@gmail.com
नैमीतीक सत्ता प्र कार महनजे काय
Question by महादेव प्रकाश दाने
09-02-2014
mahadeodane444@gmail.com
कुळ कायद्याच्या जमीनीला आता परवानगीची आवश्यकता नाही काय सविस्तर माहीती मिळावी
१० वर्षे किव्वा त्यापेक्षा जादा वर्षापूर्वी कुल मालक झाला असल्यास परवानगीची गरज नाही. नुकतेच सुधारणा कायद्यास म. राष्ट्रपती यांनी समती दिली आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ravi
09-02-2014
virravi3@gmail.com
सरकारी शेतजमीनीवरील पट्टेदारास कुळ म्हटले जाते काय आणि त्याला नियमानुसार किती वर्षांनी ती जमीन नियमीत करण्यात येते
सरकारी जमिनीवरील पत्तेदारास कुल म्हटले जात नाही. कलम २(४०) म.जा.म. अ. १९६६
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mo
08-02-2014
mohanmsutar@gmail.com
सर
मी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील आहे. १९९७ मदे आमचे १हे.१३आर व ३हे.१५आर जमिन संपादित झालेले आहे.त्यावेळी आम्हाला योग्य नुकसान भरपाई मिळाले नसलेने पैसे घेनेत आलेले नाही.त्याबाबत सर्व शेतकरी सोबत कोर्टात याव्हिक दाखल केले होते..त्यमदे पैसे घेतलेले शेतकरी जास्त असलेने मुंबई हयकोरत डेक २०११ पैसे घेणेबाबत १२ नंबरचे नोटीस देण्यात आले . आम्ही कोर्टाकडून मुक्त करून घेण्यासाठी नोटीस घेतले असून .क्षेत्र जमीन मदे २०१२ शासन नाव नोंद झालेले आहे. ४हे २८ आर साठी ५०००००/ कोर्टाकडून मंजूर झालेले आहे सदर त्यपैसे मदे शेत तेवढे शेत जमीन मिळत नाही.त्या कारणाने पैसे ऐवजी शेत जमीन घेणार आहे .त्यावेळी अर्ज करण्यासाठी आमचे आजोबा काका va आमचे वडील निरक्षर अल्पभशिक आणि ोळ्यांनी अपंग असलेने त्याबाबत पाठ पुरव केले नाही.आता आमचे दुसरे शेत जमीन देशात कुठेहि नाही. सदर आम्हाला शेत जमीन घेनेसाथि कराव कारण कोर्टाकडून योग्य न्याय मिळाले नसलेने त्याबाबत अपील करण्यासाठी आमचे पैसे नसलेने १७ वर्ष पासून अत्यंत कठीण जीवन जगात आहे.जमीन संपादन होऊन १७ वर्ष जाले. आम्हाला पैसे एवजी शेत जमीन मिळेल त्याबाबत आम्हाला त्यावेळी स्र्वे३ करणारे अधिकारी किंवा कोणाही मार्फत माहिती मिळाले नसलेने अडचणीत सापडलेले आहे . शासनाने या गरीब कुटुंबाना उचलून धारणेचे मार्ग सांगावे. विनंती.
जल संपदा प्रकल्पासाठी जमीन संपादन झाली असल्यास , लाभ क्षेत्रात जमीन चे बदल्यात पर्यायी जमीनदेण्याची तरतूद आहे.
अन्य संपादनासाठी अशी तरतूद नाही.
आपण नुकसान भरपाई स्वीकारणे सयुक्तिक आहे.
म.ज.म. आ १९६६ अन्वये जमीन मागणी करा. मात्र आपणास जमिंची भोगवटा किंमत भरावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजू सीताराम नंदकर
07-02-2014
rsnandkar@gmail.com
१.मदत माश व खिदमत माश यात काय फरक आहे.
2मश्रुतल माश काय आहे
३.मदतमाशइनाम abolation कायद्या खाली खालसा होते का ?
४ .मुतवलि च्या ताब्यात जमीन नसेल तर विरासत मंजूर करता येईल का?
Question by संदीप chavare
07-02-2014
chavare.sandeep@gmail.com
sir
My friend Kishor Jadhav is establishing his two stage individual lift irrigation scheme project for his agricultural land.He has just completed his stage 1of the scheme with the help of finance given by ratnakar bank ltd.MSEB has approved the electricity connection for his first stagefor lifting water form river.Now for 2nd stage finance again he needs the electricty connection and he applied for the same to elctricity board but the board has withhold his application based on new GR dated 29Jan2014.for single user lift irrigation scheme.its been ayear he is working on project bbearing financial loss due to delay in work because of the permissions needed from mseb.her we request your guidance in this matter as he want to complete the project at the earliest
thank you
संदीपजी , महसूल विषयाशी संभांदातीत प्रश्नांना उत्तरे दिली जातात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by MADHAV N MULE
07-02-2014
MADHAVNMULE@gmail.com
आदीवासी लोकांच्या एकत्र कुटुबातील शेतीचे आपसात हीसेवाटणी करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल काय
Question by माधव न mule
07-02-2014
madhavnmule@gmail.com
शासकीय कर्मचा-यासाठी एका वीभागातुन दुस-या वीभागात mutual बदली पाहीजे असल्यास mutual बदलीने येना-या व जाना-या कर्मचा-याचे बदलीसाठी प्रवर्ग एकच पाहीजेत का
गरज नाही, दोन्ही विभागात असलेली रिक्त पदावरून अॅडजस्ट केले जाऊ शकते
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by विजय इंगोले
07-02-2014
vv_rt@rediffmail.com
धन्यवाद पानबुडे सर
परंतु अ नावाची व्यक्तीस बांधकाम दुर करणेसाठी व तसेच अकृषिक वापराबाबतची दंड भरणेसाठी नोटीस दिली असता ते सागंतात की, सदरचा वापर मी करत नसुन ब नावाची व्यैक्ती करत असल्याने सदरचा दंड त्यांचेकडुन घेणम यावा व तसेच बंाधकाम दुर करणे बाबत ब नावाची व्यक्ती म्हणते की, अ व ब माझयात करार झाले आहे तरी याबाबत मार्गदर्शन मिळावे
कायदेशीर प्रक्रिया सुरु करा. अ लाच notice देणे आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kshirsagar Mahesh Haribhau
07-02-2014
kshirsagar.mh13@gmail.com
प्रति, किरण पाणबुडे सर
कृपया मार्गदर्शन व्हावे.
महसूल विभागात लिपीक संतर्गातून अ.का. संवर्गात पदोन्नती मिळाल्यानंतर वेतननिश्चीती बाबत मार्गदर्शन व्हावे.
लिपीक पदावर वेतन रुजु 6820 (ग्रेड पे 1900)
अ.का. पदावर रुजु 24/01/2014
अ.का. ग्रेड पे 3500
सरळसेवा अ.का. पदावर नियुक्ती झाल्यास मुळ वेतन 8920 (ग्रेड पे 3500) तर उपरोक्त प्रमाणे पदोन्नती झाल्यावर मुळ वेतन किती ?
Question by अतुल
07-02-2014
ambhorea@yahoo.com
नवीन गौण खनिज अधिनियम 2013 नुसार तहसिलदार 500 ब्रास पर्यंत गौणखनिजाची परवानगी देवू शकतात
तर एखादी स न xyzजमिनी 4 ते 5 व्यक्तीची नावे असलेल्या जमिनीत एका व्यक्तीस 500 ब्रासची परवानगी दिली आहे परंतू आता त्याच जागेत त्यांचेचपैकी दुसरा व्यैक्ती 500 ब्रास माती उत्खननाची परवानगी मागत आहे तर त्याच जागेत तशी परवानगी देता येईल काय
?
जागा एकच असुन 4 ते 5 व्यक्तीची नावे सह हिस्सा म्हणुन आहे
परवानगी देण्यास हरकत नाही . अन्य सह धारकांची समती घेणे उचित.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
