जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सोनल तरटे
06-03-2014
tartesonal@gmail.com
किरण पाणबुडे सर ,आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबादाल धन्यवाद .पण मला असा विचाराय्च होता की ,हे सगळ्या प्रकारच्या शेतीसाठी जे सिलीग लिमिट(१८,२७,५४ एकर वैगरे ) आहे तो कायदा अजूनही applicable आहे का?
लागू आहे. नागरी जमीन धारणा कायदा रद्द झाला आहे. महाराष्ट्र शेत जमिन कमाल मर्यादा धारण कायदा अस्तित्वात आहे. तो रद्द झालेला नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोनल तरटे
06-03-2014
tartesonal@gmail.com
सर,
दिवेआगार येथे CRZ (coastal zone) आहे का?
तिथे समुद्राकीनाय्रापासून किती अंतरावर घर अथवा फार्म हाउस बांधता येते ?
जिथे समुद्र , खाडी तिथे crz च्या तरतुदी लागू होतात .
उच्चतम भारती रेषेपासून ५०० मी. च्या आत बांधकाम करता येत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sonal tarte
05-03-2014
tartesonal@gmail.com
सर,
नदीपात्रालगत शेती प्लोट असेल अथवा जर नदीला लागून असेल तर त्या प्लोट्वर बांधकाम करता येते का?
नदीपात्रा पासून ३० मी. अंतराचा आत बांधकाम करता येत नाही.
जलसंपदा विभागाचे अभिप्राय घेतले जातात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश
05-03-2014
jyogesh84@yahoo.com
सर,मी महाराष्ट्र शासनात कार्यरत असून मला पितृत्व रजा कीती दिवस मिळते ह्या समधी gr आहे का ? तर तो कृपया ह्या एमैल वर पटवा . jyogesh84 @yahoo.com
पितृत्व राजा ८ दिवस मिळते.
आपण आपले कार्यलयात अर्ज करा.
आपले कार्यालय प्रमुख निर्णय घेतील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sonal tarte
04-03-2014
tartesonal@gmail.com
सर ,
सिलिंग लिमिट काय आहे?जिरायत -१८ एकर ५४ बारामाही साठी ५४ एकर हे अजूनही अप्लिकेबल आहे का?
बारमाही पाणीपुरवठा असलेलीज्यामधून वर्षातून दोन पिके घेत येतात -१८ एकर
खात्रीशीर हंगामी पाणी पुरवठा असलेली ज्यामधून वर्षातूनएक पिक घेत येते - २७ एकर
खात्री नसलेली परंतु ज्यामधून वर्षातून एक पिक घेतां येते - ३६ एकर
भातशेती - ३६ एकर
जिरायत -५४ एकर
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेश joshi
03-03-2014
jaymahesh61@gmail.com
शासकीय पडीक जमीन कसण्यासाठी मिळू शकते काय मिळत असल्यस पत्रव्यवहार कोणाच्या नावे करावा कृपया माहिती द्यावी.
मिळू शकते
[* शर्थी व अटींवर ]
अर्ज जिल्हाधिकारी यांचेकडे करू शकता. मात्र मंजूर करण्याचे अधिकार शाशानाचे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वंदना dabhade
01-03-2014
vandanadabhade@gmail.com
बदली पत्र कार्माचार्यान्साधी किती वर्ष १क टेबलाला काम करणे बंधनकारक आहे?
एकाच कार्यालयात किती वर्ष असावा या बाबत तरतूद आहे .परंतु एकाच टेबल वर किती काळ काम करावे या बाबत तरतूद नाही.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
एकाच कार्यालयात किती वर्ष असावा या बाबत तरतूद आहे .परंतु एकाच टेबल वर किती काळ काम करावे या बाबत तरतूद नाही.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by सोनल तरटे
27-02-2014
tartesonal@gmail.com
सर ,
एखाद्या गता नं. असलेल्या जमिनीला सामायिक सातबारा असेल तर त्यावरील एका जमीनमालकाला त्याच्या हिश्याची जमीन विकावयाची असेल तर दुसर्याची परवानगी घेणे आवश्यक आहे का?किवा जरा त्याच्या नावापुढे सात बार्यावर क्षेत्र लिहलेले असेल तरीही कन्सेंट घेणे गरजेचे आहे का?
सह्धारांकांकडे मिळकत वारसाने आली असेल तर , हिंदू वारसा कायदा १९५६ कलम २२ अन्वये अस्य सह्धार्कास जमीन खरेदी करण्याचा प्रथम हक्क असतो. जर सह्धार्कानी जमीन खरेदी केलेली असेल तर , असे बंधन नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
25-02-2014
jaware_sb@rediffmail.com
कोर्टाचा निर्णय नुसार फेरफार टाकणे योग्य आहे . परंतु मुद्रांक शुल्क भरने आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे
न्यायालयाचा निर्णय काय आहे त्यावर अवलंबून आहे. न्यायालय कायदेशीर प्रक्रिया पार पडूनच पुढील कार्यवाही करणे बाबत निर्देश देते.
कृपया न्यायालय निर्णय वाचा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महाडीवाले के.व्ही
25-02-2014
mahadiwalek.v2009@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५(२) अन्वये उपअधिक्षक भूमी अभिलेख यांना जमीन मोजणी आदेश देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत काय असल्यास त्याचा शासन निर्णय कोणता आहे / नसल्यास त्याचा शासन निर्णय दिनांक दयावा हि विनंती.
Question by yogesh
24-02-2014
jyogesh84@yahoo.com
i want know about paternity leave for maharashtra gov servent .any Gr for this type leave plz sent on my email id
Question by mohan
23-02-2014
mohanmsutar@gmail.com
महोदय सर ,
ग्रंथपाल रिक्त पदांचे बारती साठी जाहिरात देनेत आले असून त्यामदे एक पद ंशकालीन कर्मचारी साठी एक पद रिक्त पदांचे उपलब्द आहे . ती पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ंशकालीन आरक्षन पदासाठी कोठे काम केल्याचे अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.आणि शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय मदेकाम करणारे कर्मचार्यासाठी अंशकालीन कर्मचारी आरक्षन अंतर्गत कोणते कोणते इवबागत अर्जकट yeil
Question by Satish Bhutekar
23-02-2014
sbhutekar@rediffmail.com
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार दि ०१ फेब २०१४ पासून आपसातील वाटणी पत्रकानुसार फेर घेण्यासाठी वाटणी पत्र नोद्निक्रुत करण्याची अट रद्ध करण्यात आल्या बद्दल परतेक तहसीलदार यांना कळवण्यात आलेले आहे. व यापुढे वाटणीचा फेर रु १०० च्या बॉन्ड वर करून घेण्याचे निर्देश दिलेले असताना हि परभणी जिल्ह्यातील तलाठी व मंडळ निरीक्षक वत्निपत्रक नोंदणीकृत करण्याची सक्ती करत आहेत.तरी त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
तलाठी व मंडळ निरीक्षक वाटणी पत्रक नोंदणीकृत करण्याची सक्ती करत आहेत म्हणजे काय? वाटणी पत्रक नोंदणीकृत करण्याबाबत फेरफार नोंदीवर निर्णय दिला असेल तर अपील करावी .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
असि बाब असेल तर , आपण संबंदित तहसीलदार/ प्रांत साहेब / निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कडे निदर्शनास आणून द्यावी .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahadeo dane
23-02-2014
mahadeodane444@gmail.com
सर वाटणी अथवा विभागणी करायची असल्यास तहसिलदार यांची परवानगीची आवश्यकता आहे काय ? तलाठी यांना वाटणी विभागणी करायचे अधिकार आहेत का?
वाटप करण्याचे अधिकार तहसीलदार यांनाच आहेत. म.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ अन्वये आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करावा. मात्र सह काब्जेदारांमध्ये हिस्से अथवा मालकी बाबत वाद असू नये.
तसेच आपण नोंदणीकृत दस्ता द्वारे हि परस्पर वाटप करू शकता.
हिस्सेबाबत अथवा मालकी हक्क बाबत वास असल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अरूण गुंडगळ
22-02-2014
a.gundgal@pcmcindia.gov.in
आजोबाची जमिनी, वहिवाट सदरी 1947-48, १९४८/४९ मध्ये दुस-याचे नाव लागले आहे.त्यामुळे त्याचे नाव संरक्षित कुळ म्हणून ७/१२वर इतर अधिकारात लागलेले आहे.तदुनंतर १९५१-५२ पासून खुद्द म्हणून वहिवाट लागलेली आहे. गटवारीमध्ये ५ गट एकत्रित झालेले आहेत. सर्वांचा एकच गट ७/१२ झालेला आहे. १९७०ते ८७ पर्यंत शेती पट्टी भरलेली पावत्या आहेत तसेच सोसायटी काढलेली आहे. तदनंतर १९८७मध्ये वाटप होवून ६ हिस्से पडले आहे. वाटप पत्राने माझ्या नाववर ३एकर जमीन आलेली आहे. त्यानंतर मी त्या जमीनीवर पाईपलाईनसाठी भुविकास बँकैचे १९९७मध्ये कर्ज काढले असून ते पूर्णपणे२०१३मध्ये फेडले आहे. तसेच सोसयटीकडून त्या गटनंबरवर ट्रँक्टर खरेदी केला होता. आता सुध्दा ताबा जमिनमालकाचा आहे. सं.कु. म्हणून सदर इसमाचे नाव आहे. तर ते नाव काढण्यासाठी काय करावे ?
मुंबई कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम १४ अन्वये कुल वहिवाट समाप्त करणेसाठी अर्ज करा. कुल जमीन कसत नाही या मुद्द्यावर.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by shashikant
22-02-2014
shashipakhare@rediffmail.com
mi OBC ya pravargatil ahe ani 33 varsh purna jhali ahet. mi OPEN chya post la apply karu shakato ka? OPEN chya jage sathi mala age relaxation milu shakate ka? majhe kade caste, non creamylayer ani validity ahe.
Dhanyavad
आपण खुल्या जागेसाठी अर्ज करू शकता. गुणवत्ते आधारे आपली निवड होऊ शकते. मात्र वय शिथिलता मिळणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोनल tarte
22-02-2014
tartesonal@gmail.com
पाणबुडे सर,
आपण माझ्या प्रश्नाला तत्परतेने प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद .
आपल्यामुळे आम्हाला खुपच मदत होत आहे .
धन्यवाद .
Question by शरद जावळे
20-02-2014
sharadjawle@gmail.com
माझी उपजिल्हाधिकारी पदासाठी
निवड झाली आहे.मी सद्दा परी.नायब तहशिलदार पदावर आहे .मला उपजिल्हाधिकारी पदाचा परीविक्षअधीन कलाविधी त काही सुठ मिळते का ? ते मिळवणाकरिता काय करावे लागेल .
Question by sonal tarte
20-02-2014
tartesonal@gmail.com
sir,can we do construction in coastal regulation zone? can land near or adjacent to river will be come under auqisition by govt?
आपण तटीय क्षेत्रात बांधकाम करू शकत नाही. समुद्राच्या उच्चतम भरती रेषे पासून ५०० मीटर अंतरच्यात बांधकाम करता येत नाही. खाडी पासून १०० मीटर अथवा खाडी रुंदी एवढ्या अंतराचा आत बांधकाम करता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vandana dabhade
18-02-2014
vandanadabhade@gmail.com
आदिवासी जमीन कायदा
आदिवासी व्यक्तीच्या मालकीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस हस्तांतरित करता येत नाही. त्यासाठी शाशनाची पूर्व परवानगी आवश्यक.
म.ज.म.अ . कलम ३६ अ वाचा.
तसेच विना परवाना हस्तांतरित जमीन आदिवासींना पुनर्स्थापित करणे कायदा हि वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महाडीवाले के.व्ही.
18-02-2014
mahadiwalek.v2009@gmail.com
शा.क.प.पा.हो.वि.प्रति.अधिनियन २००५ हा अधिनियम कुठे मिळेल आपणाकडे असल्यास अपलोड करा किंवा ईमेल करावा. ही विनंती
Question by मदनसिंग परदेशी
17-02-2014
madanpardeshi261987@gmail.com
माननीय सर,
७/१२ ला शासकीय फी तलाठी किती आकारु शकतात व कोणत्या शासकीय नियमाप्रमाणे
प्रती ७/१२ पान ५/- शुल्क सध्या वसूल केले जाते.
महाराष्ट्र जमीन महसूल ( भूमी अभिलेख निरीक्षण , शोध आणि पुरवठा) नियम १९७०
खंड १२ सह अनुसूची अ अनुक्रमांक १.
पूर्वी २ /- शुल्क होते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
17-02-2014
mohanmsutar@gmail.com
साहेब
७/१२ उतार मदे कुळाचे नावामदे बिगर कब्जेदार वारसदर मयत झाल्यास त्यांचे नावे कमी करता येईल काय? माहिती मिळावे विनंती .
जन्मनाव व व्यावहारिक नाव ? ........
आपले शाळा अभिलेखात कोणते नाव आहे ? जन्मनाव कि व्यावहारिक नाव?
तहसीलदार यांचेकडे अर्ज करा. ......
आपला प्रश्न विस्ताराने हि मांडा
१. ७/१२ वर नाव काय आहे?
२. आपले व्यावहारिकनाव काय आहे ?
३. जन्मनाव ७/१२ सादरी लावण्याचे प्रयोजन काय होते ?
४. शाळा अभिलेखात जन्म नाव आहे का?
५. नाव बदल बाबत राजपत्रात जाहीर करण्यात आले आहे काय ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by माधव न mule
16-02-2014
madhavnmule@gmail.com
एखादया व्यक्तीचे दोन दोन नावे असतात एक जन्मनाव व दुसरे व्यवहारीक नाव
७/१२ वर आलेले जन्मनाव कमी करुन व्यवहारीक नाव कोणत्या फेरफार पध्दतीने घेता?
जन्मनाव व व्यावहारिक नाव ? ........
आपले शाळा अभिलेखात कोणते नाव आहे ? जन्मनाव कि व्यावहारिक नाव?
तहसीलदार यांचेकडे अर्ज करा. ......
आपला प्रश्न विस्ताराने हि मांडा
१. ७/१२ वर नाव काय आहे?
२. आपले व्यावहारिकनाव काय आहे ?
३. जन्मनाव ७/१२ सादरी लावण्याचे प्रयोजन काय होते ?
४. शाळा अभिलेखात जन्म नाव आहे का?
५. नाव बदल बाबत राजपत्रात जाहीर करण्यात आले आहे काय ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोनल तरटे
14-02-2014
tartesonal@gmail.com
सर,
NA ORDER ही ठराविक मुदती पर्यतच असते का ?सदर मुदती नंतर ती ओर्डेर revise
करावी लागते का?प्रत्येक NA ORDER ला हा नियम लागू आहे काय
साधारणत: एन ए परवानगी दिल्यानंतर एका वर्शात त्याचा वापर सुरु होणे आवश्यक आहे, नाहीतर एन ए आदेश रिन्यु करुन घ्यावे लागते.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
