जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by बडवणे
17-03-2014
ppbadwane333@gmail.com
एखादया कर्मचा-यावर फौजदारी झाली असल्यास त्यास पदोन्न्तीसाठी काही कायदेशिर अडचण येते का
येऊ शकते . मात्र काही वेळी (very rare ) फौजदारी कारवाई अधीन पदोन्नती दिली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सांगळे राजाराम Bajirao
15-03-2014
r.sangle@ymail.com
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ च्या कलम ४४अ (२) यानुसार अदोगिक वापरासाठी बांधकाम मंजुरी आधीच विनापरवाना बंध्काम्केले असल्यास दंड भरावा लागतो का.तसा अर्ज आम्ही पूर्वी बांधकाम चालू करण्या आधी मा जीलाह्धिकारी यांच्कडे केला होता त्याची पोच पावती आहे आता आम्ही नगर रचना संचालक यांचेकडून बांधकाम मंजुरी परवानगी घेतली आहे. कृपया आम्हास दंड भरावा लागेल का.
प्रश्नावरून दंड भरण्याची गरज नाही.
औद्योगिक वापर सुरु झाले बाबत तहसीलदार यांना कळवणे आवश्यक असते. आपण पूर्वीच जिल्हाधिकारी यांना कळवले आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by V.M.Tamboli
15-03-2014
vsmaner@gmail.com
आदरणीय महोदय,
महसूलली कोर्टामध्ाील अपिलांचे निर्णयामध्ये मुस्लिम कायदयाचा विचार करणे आवश्यक आहे काय ?
होय. मुस्लिम व्यक्तिगत ( personal ) कायद्याचा विचार करणे आवश्यक आहे.
उ.दा. वारस.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजीराजे
15-03-2014
shivajirajetarale@gmail.com
श्री, किरण पाणबुडे साहेब, नमस्कार माझा प्रश्न असा आहे कि, ग्रामपंच्यायतिने आमची मोकळी जागा होती त्यावर ग्राम पान्च्यायतीचे नाव लावले आहे त्यावेळी ग्राम पंचायत आमच्या विरोधात होती व आमची भांडणे होती त्यावेळी आम्ही तसा अर्ज दिला कि ती जागा आमची आहे परंतु त्यांनी भांडणामुळे आमच्या अर्जावर कोणतीच करवाई केली नाही व आमच्या गावचा पहिला १९७० ला सिटी सर्वे झाला त्या वेळी सुद्धा आम्ही सिटी सर्वेला आमचा अर्ज दिला कि ग्रामपंचायतीचे लागलेले नाव चुकीचे आहे ती जागा आमची आहे त्यावेळी त्यांनी तसा उल्लेख केला त्या जागेवर आम्ही objection घेतले व त्या जागेवर आम्ही claim केला आहे म्हणून दुसरा १९९५ ला सिटी सर्वे झाला त्या वेळी सिटी सर्वे ने आम्हाला त्या बाबत नोटीस दिली नाही व ग्रामपंचायतीचे नाव लावले परंतु आता ग्राम पंचायत आमची आहे व आम्ही आता अर्ज करून आमचे नाव त्या जागेला लावले व आता आम्हाला सिटी सर्वे ला आमचे नाव लावावयाचे आहे तर आम्ही काय केले पाहिजे
राजे ,
१९९५ ला सर्वे झाले नंतर हि आपले नाव मिळकत पत्रिकेला लागले नाही . आपण tyach वेळी अपील करणे आवश्यक होते.
आता आपण अपील दाखल करा.
नाही तर दिवाणी न्यायालयात आपले title जाहीर करून मिळणे साठी दावा दाखल करावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by swami S.G.
14-03-2014
swati.swami@yahoo.com
जर कर्मचारी / अधिकारी pratiniuktivar इतर कार्यालयात कार्यरत असतील तर त्यांचे मुळ सेवापुस्तक कोणत्या कार्यालयात असावे ? या बाबत शासन निर्णय आहे का ?
त्या कर्मचार्याचे सेवापुस्तक मुळ कार्यालयातच असले पाहीजे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by Swami S.G.
14-03-2014
swati.swami@yahoo.com
जर एखादा कर्मचारी यांचा निलंबन कालावधीचा निर्णय झाला नसेल अथवा मुळ सेवापुस्तकात त्रुटी असतील तर त्या कर्मचारी यांना तात्पुरते पेन्शन मंजूर करता येते का तसेच रजा रोखीकरण प्रस्ताव सादर करता येतो का ?
Question by रवि बाविस्कर
14-03-2014
ravi223kar@gmail.com
कृपया लोकसभा निवडणूक २०१४ साठी निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण बाबत काही साहित्य (PPT व video ) तयार केले असतील तर कृपया Upload करावेत हि विनंती ....
बहुतेक अधिकारी तयार करतातच,त्यामुळे मागणी करण्यात येत आहे ,प्राप्त होताच उपलब्ध करून देण्यात येयील.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by स्वामी एस.जी .
13-03-2014
swati.swami@yahoo.com
तहसीलदार संवर्गातील अधिकारी यांचे मुळ सेवापुस्तक कोणत्या कार्यालयात असते.
जिल्हाधिकारी कार्यालय.
जर प्रतिनियुक्तीवर असेल तर , प्रतिनियुक्ती कार्यालयात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रविंद्र पाटील
13-03-2014
ypatil.2058@gmail.com
सर,
मी माझ्या धाकट्या भावाला त्याच्या ईच्छेनूसार शेतकीय पूरक व्यवसायाकरीता (शेळीपालन व ईमूपाळन) आर्थिक सहाय्य करावयाचे ठरविले असून त्याकरीता ५ एकर जागादेखील पाहून झाली आहे. पण ती जागा एका आदीवासी व्यक्तीची ३२ग वर्गातील आहे. ही जमिन खरेदी केली तरीही ती बिगर आदीवासी असलेल्या व्यक्तीच्या नावावर होत नाही व लीज वर जरी घेतली तरीही ५ वर्षांपेक्षा जास्त काळ स्वतःकडे ठेवता येत नाही अशी माहीती मला माझ्या मित्राने सांगितली. सदरहू जागा आम्हांस खरेदी करता येईल का? नसेल तर किती वर्षंाकरीता लीजवर घेता येईल. अश्या जागेत व्यवसाय सुरू करताना सरकारी कागदपत्रांची काही पुर्तता करावी लागेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
आपले प्रश्नातच आपण उत्तर दिले आहे.
आपण शाश्नाचे परवानगीशिवाय जमीन खरेदी करू शकत नाही. ५ वर्षापेक्षा जादा काळ भाडेपट्ट्याने घेऊ शकत नाही.
शाश्नाची परवानगी घ्यावी.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कैलाशचंद्र वाघमारे
13-03-2014
kchandra2006@gmail.com
निवडणुकीत लागणारे विविध नमूने,आदेश पाठवा...उदा.वाहन परवाना आदेश,रूट प्लान..वारंट इ.
Question by tarte sonal
12-03-2014
tartesonal@gmail.com
सर ,जमिनीचा भाग नकाशा म्हणजे काय ?त्याचा उपयोग कशासाठी होतो?
आपणास गट बुक नकाशा म्हणावयाचे आहे का?
गट बुक नकाशामुळे चातुर्सिमालक्षात येतात.
आराखडा ( lay out ) तयार करणेस आवश्यक.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Tamboli Vahida Musa
12-03-2014
vsmaner@gmail.com
आदरणीय महोदय,
आचारसंहिता कालावधीमध्ये सरपंच निवड घेता येईल काय ?
Question by दिपक पाटील
11-03-2014
ER.DIPAK.PATIL@GMAIL.COM
माननीय महोदय ,
माझी भडगाव(जि: जळगाव) तालुक्यात सात एकर शेती आहे, सदर शेती माझ्या आजोबांनी (विठ्ठल शिवराम पाटील ) २८ वर्षापूर्वी शेतकरी खंडा वना माळी यांच्याकडून विकत घेतली. सदर जमीन शेतकरी खंडा वना माळी यांनी शेतकरी सुपडू मालजी पाटील यांच्याकडून विकत घेतली होती. त्या पूर्वी शेतकरी सुपडू मालजी पाटील यांनी खालील तीन सावकारान कडून अनुक्रमे ३० रुपये ४० रुपये आणि ६० रुपये कर्ज घेतले होते आणि त्याची परत फेडहि केलेली होती.
१)शंकर दयाराम मोराणकर
२)मांगो शामराव पाटील
३)इंदरचंद बछाराम
परंतु वरील तिघेही सावकारांचे नाव आणि कर्जाच्या नोंदी ७/१२ उताऱ्यात इतर हक्कात तसेच राहिले आहे. वरील तिघेही सावकार मयत झाले आहेत आणि त्यांच्या वारस बद्दल पूर्ण माहिती नाही तसेच काही वारसदार मयत झालेत आणि मयत वारसदाराचे वारस कामानिमित्त परगावी विखुरलेले आहेत(त्यांच्या बाबत पूर्ण माहितीउपल्ब्ध नाही) आणि तिघेही सावकारांच्या सर्व(२० - २५) वारसांना हक्कसोड पत्र बनवण्यासाठी बोलावणे शक्य नाही. तथापि सदर प्रकार च्या प्रकरणा साठी सोयीस्कर अशी प्रक्रिया सुचवावी.
धन्यवाद ,
दिपक पाटील
अश्या प्रकारचे बोजे हि मोठी समस्या आहे. आपण प्रश्न मध्ये नमूद केलेला मार्ग कायदेशीर आहे परंतु सध्या स्थितीत तो व्यहर्य नाही. सर्व वारस असले तरी , कर्जाची खरच फेड करण्याची तयारी दर्शवली तरी ते स्वीकार्तीलच हे सांगता येणार नाही.
तगाई कर्जाचे बाबतीत असे जुने बोजे काढून टाकणे बाबत शाषण निर्णय आहे. तसाच अशे काळबाह्य बोजे काढून टाकणे बाबत निर्णय आहे का हे पहा.
अन्यथा redemption suit दाखल करावा. अथवा कर्जदार हे कालबाह्य कर्ज वसूल करू शकत नाहीत , तसेच बोजा काल बाह्य झाला हे ठरवून मिळणे साठी दिवाणी दावा दाखल करावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद wankhede
11-03-2014
vinodwankhede643071@yahoo.com
सर,
माझ्या नातेवाईकाची शेती हि महारी म्हणून मिळाली आहे परंतु त्यावर तलाठ्याने बोझा चाडविला आहे तसे चालते काय ७/१२ ओज वर फेरफार करता येते काय
व सदर शेती विकता येते काय
गहाण खता शिवाय बोजा चढवता येत नाही.
७/१२ वर बोजा आहे म्हणून विक्रीवर निर्बंध नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vinod
10-03-2014
thorvevinod80@gmail.com
ई. डी. सी. व पोस्टल बालेट पेपर चा नमुना असल्यास कुर्पया अपलोड करावा
Question by mnm
10-03-2014
madhavnmule@gmail.com
हींदु एकत्र कुटुंबातील वाटणीपत्रामध्ये मुलाच्या नावावर असलेली जमीन वडीलांचे नाववार घेता येर्इ्रल काय
प्रश्न विस्ताराने मांडा.
वाटप पत्र केव्हा झाले ? मिळकत कोणाचे नावावर होती.
जर मिळकत मुलाचे नावावर असेल , व तो सज्ञान असेल तर वडिलाचे नावावर दान पत्र करू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mnm
10-03-2014
madhavnmule@gmail.com
तुकडेबंदी कायदयानुसार कीती क्षेत्रफळाला तुकडा असे म्हणता येईल
२० गुंठे - जिरायत शेती
१५ गुंठे- एक पिकी , भात शेती
०५ गुंठे- बागायत शेती
प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे प्रमाण शेत्र आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विकास पवार
09-03-2014
vikas_21121973@yahoo.com
धन्यवाद सर
Question by amol chavhan
09-03-2014
amolchavhan234@gmail.com
thank you sir
Question by प्रशांत
09-03-2014
shetepb18@rediffmail.com
धरणग्रस्थ बाधित व्यक्तीस मिळालेल्या जमिनीत तेथील खाजगी व्यक्तीने अतिक्रमण केले असल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कोणत्या कलमान्वये तहसीलदारांना काढण्याचा अधिकार आहे.किंवा ते कसे काढून मिळेल याचे कृपया सविस्तर मार्गदर्शन मिळावे.धरणग्रस्थाबाबत कोणते कायदे व शासन आदेश आहेत.
जमीन प्रदान करताना जर त्या जागे वर अतिक्रमण असेल तर , तहसीलदार म.ज.म.अ १९६६ चे कलम ५३ व २४२ अन्वये अतिक्रमण काढू शकतात.
मात्र जमिनीचाताबा धारण ग्रस्त व्यक्तीस दिल्यानंतर अतिक्रमण झाले असेल तर, तहसीलदार असे अतिक्रमण काढू शकत नाही. धरन ग्रस्त व्यक्तीने दिवाणी न्यायालयात जाने आवश्यक.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
08-03-2014
jaware_sb@rediffmail.com
७/१२ च्या इतर हक्क सदरी मा. दिवाणी न्यायालयात दावा दाखल असल्याने लीज पेंदासी शेरा नमूद आहे . परंतु सदर जमिनि चे नोदनिकृत खरेदी खत फेरफार टाकणे करिता आलेले आहे. तर लीज पेंदासी शेरा आसताना फेरफार टाकता येईल अगर कसे? कृपया मार्गदशन करावे.
lis pendens म्हणजे मिळकती संदर्भात दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. जमीन खरेदी करणार्यासाठी हि notice आहे. असा शेरा आहे म्हणून फेरफार टाकण्यास मनाई नाही.
मात्र दिवाणी न्यायालयाचा निर्णय विकनाराचे विरुद्ध गेल्यास , खरेदीदारास अश्या परिणामांना बांधील असतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sonal tarte
08-03-2014
tartesonal@gmail.com
सर, जर एखाद्या बिगरशेती जमिनीचे ९९ वर्षाचे लीज असेल तर नंतर त्याचे मालक व बादेकारुला त्याचे खरेदीखता करता येते का?व खरेदीखता वर पुन्हा स्टंप ड्युटी भरावी लागते का?
भाडेपट्टा रद्द करून , खरेदी खत करू शकता.
मुन्द्रंक शुल्क , नोंदणी फी भरावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय पांडुरंग पाटील
07-03-2014
patilsanjya@gmail.com
महाशय,
माझे गाव कोल्हापूर जिल्हात राधानगरी तालुक्यात नवे करंजे आहे. गावाची अभयारण्य करिता पुनर्वसनाची प्रक्रिया प्रगति पथावर आहे. सदर करिता सर्व्हे सन १९८४ मध्ये पूर्ण करण्यात आलेला असून सन २०१२ मध्ये अध्यादेश निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु प्रक्रिये बाबत ग्रामस्थ साशंक आहेत. अध्यादेशानुसार काही भागांचे पुनर्वसन असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे व शासन निर्णयानुसार सन १९८४ च्या सर्व्हे नुसार फक्त ७९ प्रकल्पग्रस्त आहेत व त्यानुसारच ७.९० कोटी तरतूद आहे. या बाबत मी व्यक्तिशा आपली भेट घेऊन माहिती प्राप्त करावयाची आहे तरी कृपया मला माझ्या ईमेल वर माहिती कळवण्यास कळकळीची विनंती आहे. सर्व कागदपत्रे माझ्या कडे उपलब्ध आहेत
आपण जिल्हा पुनर्वसन अधिकारी , कोल्हापूर यांना भेटा . आपले शंका निरसन होईल. अथवा पुनर्वसन उपयुक्त , पुणे यांचे कडून हीआपणास सविस्तर माहिती मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय पांडुरंग पाटील
07-03-2014
patilsanjya@gmail.com
भूसंपादना विषयक माहिती कोठून मिळू शकते
Question by विकास पवार
07-03-2014
vikas_21121973@yahoo.com
सर एक व्यक्ति कर्जत तालुक्यातील आहे सदर व्यक्ति उल्हासनगर येथील सरकारी दवाखान्यामध्ये burning केस मध्ये admit आहे तर daing declaration कोणी घ्यायचे
(विकास पवार ), निवासी नायब तहसीलदार , उल्हासनगर यांनी मृत्य पूर्व जबाब घेणे आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
