जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Amar S. Patil
04-12-2013
amarpatil1612@gmail.com

Devsthan sheti vichayak asnare sampurna kayadyachi mahiti milavi hi vinanti
संपुर्ण माहितीमध्ये काय अपेक्षीत आहे, ते नमुद करावे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by sagunashelke
03-12-2013
sagunashelke9@gmail.com

तहसीलदार यांना कोतवाल , शिपाई , लिपीक,वाहन चालक , अव्‍वल कारकून, तलाठी व मंडळ अधिकारी या सर्व कर्मचा-यांचे अर्जीत रजा मंजूर करण्‍याचे हक्‍क आहेत पण तहसीलदार यांना किती दिवसाच्‍या अर्जीत रजा मंजूर करण्‍याचे हक्‍क असतात?(किती दिवसाची मर्यादा आहे?)
६० दिवसापर्यत मंजुर करु शकतात

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

तहसीलदार यांना तहसील कार्यालयात कार्यरत कर्मचा-यांचे किती दिवसांची अर्जीत रजा मंजूर करण्‍याचे हक्‍क आहेत?
शिपाई ते लिपीक यांच्या अर्जित रजा मंजुर करु शकतात.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

एखादा कर्मचारी निलंबित आहे .त्या कर्मचारी यांना परत शासन सेवेत पुनःस्थापित केले आहे. तर निलंबित कालावधीत मुख्यालय असलेल्या कार्यालयाने कार्यमुक्त केल्याशिवाय पुनःस्थापित केलेल्या कार्यालयात त्या कर्मचारी यांना रुजू होता येते का ?
कार्यमुक्त करावे लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by prakash band
02-12-2013
aslpsb@gmail.com

N. A. Darpatrak rural karita kay aahet ?(dist -Aurangabad)
मा, जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेप्रमाणे दर असतो. आपल्या कार्यालयाच्या शासन निर्णयाच्या फाईलला असेल

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

तहसीलदार यांना किती दिवसांची अर्जीत रजा मंजूर करण्‍याचे हक्‍क आहेत?या संदर्भात परीपत्रक किंवा GR कोणता आहे ?
श्री. किरण पाणबुडे सो, नमस्कार माझा प्रश्न असा आहे राजेम्हादिक यांची खाजगी वडिलार्जित स्वमालकीची गावठाण मिळकत होती ती त्यांनी २ फेबुर्वारी १८९७ रोजी दादा अप्पाभाई यांना भाडेपट्ट्याने दिली पुढे त्या जागेत दादाचे नातू इब्राहीम हे रहात होते त्यांनी ती जागेवर असणारे त्यांचे घर पडले म्हणून त्यांनी तो पसारा १५ ऑगेस्त १९५७ ला पांडू निमत यांना विकला असे सांगून गुपचूप त्या जागेचेच रजिस्टर खरेदीखत १६ एप्रिल १९५६ रोजी केले त्यावेळी पांडू निमत हा साहित्य न्हेण्यासाठी आला असता त्यास राजेम्हादिक यांनी इब्राहीम याचेक्डून भुई भाड्याची रक्कम येणे बाकी आहे तो पसारा न्ह्यायचा नाही म्हणून सांगितले त्यानंतर निमत याने २९ ऑगस्ट १९६६ ला सरस्वती कदम यांना रजिस्टर खरेदी पत्राने मोकळ्या जागेचे खरेदी पत्र केले त्यानंतर सरस्वती कदम यांनी रजिस्टर खरेदी पत्राने मोकळ्या जागेचे खरेदी पत्र मधुकर पाटील यांच्याशी केले ते तिथे कब्जा करणेसाठी आले असता त्यास राजेम्हादिक यांनी कब्जा घेऊ दिला नाही व दैवात्सिंघ राजेम्हादिक यांनी त्याच्यावर दावा दाखल केले परंतु त्या दाव्याचेवेली इब्राहीम ने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले कि ती जागा माझी मालकीची न्हवती ती भाड्याने मी राजेम्हादिक यांचे कडून घेतली होती मग मधुकर पाटील यांचेवर केलेला दावा कोर्टाने खर्चा सह फेटाळला मग अशा वेळी आम्ही दैवात्सिंग राजेम्हादिक यांचा बहीण माणगाव जिल्हा रायगड येथे राहतात तर त्यांचे नावाने आम्ही सुवातीचे म्हणजे इब्राहीम यांचा वारसावर इब्राहीम याने केलेले खरेदी पत्र रद्द करण्याची मागणी केली तर चालेल का ? कोणत्या आधारे दावा करावा कृपया माहिती द्यावी हि विनंती आहे.
हरकत नाही. Declatory suit दाखल kara

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay sankhe
27-11-2013
vijaysankhe@rediffmail.com

I would like to know that if some one is getting provisional pension after retirement due to criminal matter is pending in the court. & the pensioner dies before the matter is being heard or settled in the court. When court close this matter as the accused is no more . To whom legal heirs should approach to settle the matter of provisional pension and gratuity to get regularized. What is the procedure to approach the concerned authority.
तो कर्मचारी कार्यरत असलेले शेवतचे कार्यालय

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by devendra
27-11-2013
jyotitandel82@gmail.com

सर
सर्वे न- ४२३ हिस्सा ३ ची जमीन कुळाने १७ / ११ / १९५६ रोजी मालकाकडून खरेदी करून त्याच दिवशी १७/११/१९५६ रोजी दुसर्या व्यक्तीला विकली आहे तर व त्या नंतर दिनांक १/४/१९५७ रोजी त्या कुलाची सातबार्यावर सामान्य म्हणून कुलाची नोद झाली तर कुलाची मुलगी आता अपील करू शकते काय ? व किव्हा सदर खरेदी मध्ये कुल कायद्याचे उलघन आहे काय ?
what rules are regarding casual leave.
किरकोळ रजेबाबत नियमावली अशी नाही, पण याबाबत काही शासन निर्णय आहे....

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by devendra
23-11-2013
jyotitandel82@gmail.com

सर
सर्वे ११० ची हिस्सा १ च्या एकूण शेत्र च्या १/३ जागे कुळाने दिनांक १५/६/१९५६ रोजी मूळ मालक कडून घेतली व त्याच दिवशी दिनांक १५/६/१९५६ रोजी कुळाने दुसर्या व्यक्तीस विकली आहे सदर खरेदीबाबत सदर कुलाची मुलगी अपील करू शकते का ?
विना परवानगीने विकली का?

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
23-11-2013
jyotitandel82@gmail.com

सर
सर्वे १५४ हिस्सा २ शेत्र ५२.१ हे .आ .चौ व खराब शेत्र ३ .० हे .आ .चौ आहे
सदर जमिनीपैकी मालकाकडून खरेदी करून कुळाने १/३म्हणजे १७.८ हे .आ .चौ व खराब १ हे .आ .चौ जमीन दुसर्या व्यक्तीस सन १९५६ साली विकली
उर्वरित २/३ जमिनीस मालक व कुल म्हणून माझे नाव आहे माझ्या हिस्सास ३४.३ हे .आ .चौ व खराब ३.० हे .आ .चौ जमीन आहे सदर जमिनीचा धारा मला भरवायला लागतो तेव्हा
सदर जमिनीची विभागणी करावयाची आहे माझ्याकडल दुसर्या व्यक्तीचे खरेदीखताच्या आधारे भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून आकार फोड करता येईल का ? व जमिनीची विभागणी करून सर्वे न अ व ब करता येईल का ?

Question by abhijeet Barawkar
21-11-2013
abhi1always@gmail.com

What are the latest provisions for e-mutation?
उस्मानाबाद जिल्ह्यात कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या नोंदीचा फेरफार घेताना एखादी जमीन कंपनी ला विकत घ्यावयाची असेल तर त्यासाठी मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८कलम ६३ अ नुसार अथवा हैदराबाद कुळ वहिवाट अधिनियम नुसार परवानगी आवश्यक असते काय? कंपनी ने सदरील कलमाखाली परवानगी घेऊन पुन्हा फेरफार घेण्यासाठी अर्ज दिला .तर आता या परवानगी आधारे परंतु जुन्या रजिस्टर दस्त आधारे फेरफार घेत येईल का ?अथवा परवानगी नंतर पुन्हा रजिस्टर दस्त करावा लागेल ? का या व्यवहारामुळे शर्तभंग होईल व त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल का ?
परवानगी चे अगोदर खरेदी खत करण्यात आलेले आहे. ८४ क खाली कारवाई आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मराठवाड्यातील १५/१०/१९९४ पूर्वीचे मंडळ निरीक्षकाना पदोनति अवल्कार्कून म्हणून मिळत होती त्यांना १५-१०-१९९४ नंतर अपग्रेड झालेल्या मानल अधिकारी याच्या जागेवर समावेश करता येईल काय

Question by devendra
17-11-2013
jyotitandel82@gmail.com

सर
सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा वरील क्षेत्र ९३.२ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे परंतु त्या हे.आर.चे आकारबंद कागदोपत्री क्षेत्र ५२ .१ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे ओ व तहसील कार्यालायातील सातबारा वरील क्षेत्र ५२ .१ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे मुल सातबारात एकूण ४० हे.आर.चे अतिरिक्त दाखविण्यात येते तरी

प्रश्न १ तरी सदर सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा वरील क्षेत्र दुरुस्ती साठी कोणाकडे अर्ज करावा लागेल

प्रश्न २सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा १/३ क्षेत्र क्षेत्र १७ .८ हे.आर.चे व खराब १ हे.आर.चे मुल मालकांनी सन १९५६ साली कुळ राघो यांना विकून नंतर सन १९५६ साली कुळ राघो यांनी सुरेश व अन्य व्यक्तीला विकली परंतु १९५७ साली सदर जमिनीस कुल म्हणून राघो व गोविंद यांचे कुल म्हणून नोंद झाली
सन १९५६ साली कुळ राघो यांनी सुरेश व अन्य व्यक्तीला विकली असल्यामुळे सातबारा मध्ये मुल मालक २/३ व सुरेश व अन्य व्यक्तीला १/३ असे येते व कुल म्हणून गोविंद यांचे नाव आहे त्यामुळे सदर जमिनीचा सातबारा ची विभागणी करावयाची आहे
व सातबारा अ सुरेश व अन्य व्यक्तीला १/३ आणि सातबारा ब
मुल मालक व कुल गोविंद २/३ करता येणे शक्य आहे का व अर्ज कोणाकडे करावा लागेल व कोणती कागदपत्र जोडावी लागतील
१-म ज म स च्या कलम १४३ नुसार तहसिलदारांनी नवीन रस्ता किती दिवसात द्यावा असे बंधन आहे.?
२-जर असा रस्ता द्यावयाच्या जागेवर वनविभागाची परवानगी आवश्यक असणारी झाडे असतील तर ती परवानगी मिळण्यास लागणारा कालावधी वरील मुदतीपेक्षा जास्त होत असेल तर काय करावे?



varisht karyalyane ne karmchari yana stand relive kele asel tar kanishta karyalyane ne relive karave lagte ka ?
कल्‍याण काटेमानिवली येथील सर्व्‍हेनंबर सहित नकाशा पाहिजे.
कृपया उपाधीक्षक भूमी अभिलेख कल्याण यांचे कडे अर्ज करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
श्री काकडे यांचे नावावर 0 -२१आर
जमीन आहे shri kakde यांनी sunela
०-28 aar chi खरेदी karun दिली आहे punha don महिन्यानंतर देशमुख यांना ०-२१आर खरेदी दिली आहे दोघांनी फेरफार साठी दस्त sadr kele आहे फेरफार konachya navane ghyava
Shri
आक्षेप पणजीत नोंद घ्यावी.
मूळ मालक यांनी ०.२१ आर ऐवजी ०.२८ आर क्षेत्राची विक्री करून दिल्याचे विक्री दस्तावरून दिसून येते. क्षेत्रात जरी तफावत आहे, परंतु एकदा विक्री करून दिल्यानंतर सदर शेती वरून मूळ मालकाचा हक्क संपलेला आहे. ०.28 आर ची विक्री पहिले झालेली असल्याने ०.२८ आर क्षेत्राच्या विक्री दस्तातील ०.२१ आर क्षेत्राची नोंद मंजूर करण्यात येत आहे. उर्वतीत ०.०७ आर क्षेत्रासाठी खरेदीदार यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागावी. असा मंजूर आदेश नमूद कुरुण नोंद मंजूर करण्यात हरकत नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

प्रथम खरेदीखताला महत्व आहे
परंतु फक्त ७/१२ वर जेवडे क्षेत्र आहे त्याचीच विक्री होणे अपेक्षित होते. त्यामुळे तितक्याच क्षेत्राची नोंद होणे अपेक्षित आहे


Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर मी आपल्‍या वेब साईटचा नोंदणीकृत सदस्‍य आहे, परंतु मला आपल्‍या साईटवरील महसूल व्‍यासपीठ या सदरातील प्रश्‍नोत्‍तर पहाणेसाठी वारंवार लॉग इन करावे लागत आहे. तसेच लॉग इन झाल्‍यानंतरही मला सदरचे सदर वाचणेसाठी उपलब्‍ध होत नाही. कृपया यावर उपाय सुचवावा. धन्‍यवाद.
महसूल व्यासपीठ हे फक्त महसूल अधिकाऱ्यांसाठी आहे, महसूल कर्मचाऱ्यांसाठी "कर्मचारी व्यासपीठ" सुरु करण्यत येत आहे . तो पर्यंत दिलगिरी!
हा मेसेज आपणाला नोंदणी वेळी सुद्धा पाठविण्यात आलेला आहे. धन्यवाद!

Reply by MCS Maharashtra | इतर

इतर विभागाच्या स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी किवा परवानगी देण्यासाठी कोणता नियम आहे.
अन्य विभागाच्या परीक्षेस बसण्यास परवानगी देनेबाबत नियम नाही. तथापि विभाग प्रमुखांना कळवणे आवश्यक आहे.
नोकरीत असताना शिक्षण घेण्यासाठी हि महसूल विभागाचे बंधन अथवा नियम नाहीत/ नसावेत. मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाने या बाबत परिपत्रक फार पूर्वी निर्गमित केलेले आहे
शिक्षण घेताना कर्तव्यात कसूर घडून नये अथवा कामावर त्याचा परिणाम होऊ नये हा उद्देश आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्लॉट न करायचं असेल तर कay करावलागेल .आणि ते कुठ करायचं असत .त्यासाटी किती खर्च अतो.आणि कागद पत्रे की लागतात.सांगली मध्ये चालू आहे की नाही .मिरज मधील ग्रामीण भागात आहे.
आपला प्रश्न बिन शेती करण्या सम्भांदातील आहे असे मला वाटते. बिन शेती परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदार/ प्रांताधिकारी यांना आहेत.
१ आपणास तहसील/ प्रांत कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल.
२. अर्जासमवेत ७/१२ , नकाशा व इतर कागदपत्र जोडावी लागतील.
३. नगर रचना , जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अभिप्राय घेतले जातात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by prakash band
11-11-2013
aslpsb@gmail.com

Potkharab jar kharedi dwara malki , vahiti madhe aala tar tyala kami karnyache aadesh konakadun ghyave ?
पोट खराब एकत्रीकरन झालेल्या वेळी ठरविण्यात आले असेल व त्या नंतर पोट खराब वहीती खाली आणले असेल तर आकारणीत बदल होणे अपेक्षित आहे. आकारणीत बदल करण्यास ६४ नुसार जिल्हाधिकारी सक्षम आहे. त्यामुळे त्या बाबतचा दुरुस्तीचा आदेश १०६ खाली जिल्हाधिकारी यांनी करणे अपेक्षित आहे

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

आपण अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयाकडे अर्ज करावा . परवानगी देण्याचे अधिकार अधिषक/ उप संचालक भूमी अभिलेख यांना असावेत.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बोम्बे इंफेरिअर व्हिलेजेस वतन ऍबोलिशन ऍक्ट 1958 चे कलम 1(2) नुसार उस्मानाबाद जिल्हा सदर कायद्याचे अंतर्गत येतो का?

The act extends to the 1[ Bombay area of the state of Maharashtra] and to the Hyderabad area state of Bombay.Read section 3(23) of Bombay General Clauses Act with section 8 of State Reorganisation Act 1960 .
Osmanabad district is Hyderabad Area of State of Bombay.
So act is applicable. Read section 46AA of Bombay General clauses Act with section 3 of Bombay Reorganisation Act 1960 for better understanding of state of Maharashtra , state of Bombay and Hyderabad Area of State of Bombay .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3