जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by shivaji rajemahadik
25-09-2013
shivajirajetarale@gmail.com
जमीन मालकीण १९५० पासून विधवा असेल तिला १९५५ साली साधे कुळाने जर नोंद मंडल अधिकारी यांचे कडून certify करून घेतली याची माहिती नसेल आणि कायद्याची माहिती तिला नसेल, सन २०१२ पर्यंत मालक म्हणून तिची नोंद ७/१२ ला आहे म्हणून तिच्या वारसाने वारस नोंद २०१२ साली करून घेतली त्यावेळी जर त्याला १९५५ साली झालेला फेरफार महसूल कायद्याचे उल्हंगण करून झाल्याची माहिती मिळाली व सदरचा फेरफार आणि ७/१२ मंजूर केला त्यावेलेपुर्वी पासून आज अखेर पर्यंत खंडाचा व कुळ वहिवाटीचा सलग उल्हेख नसेल असा महसूल कायद्याचे उलंघन करून झालेला फेरफारला कायदेशीर म्हणता येईल का? मग अशावेळी जर विधवा जमीन मालकाच्या वारसाला सदरची माहिती आज मिळाली तर १९५५ साली झालेला फेरफार रद्द करण्याची मागणी जमीन मालक म्हणून प्रांत साहेबांच्याकडे करू शक्तोका? किव्हा सदर फेरफार व कुळ रद्द करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत आपले मार्गदर्शन हवे आहे. त्यासाठीचा कायदा व कलम याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती
या पूर्वीच उत्तर दिल्याप्रमाणे , १९५५ च्या फेरफारास एवढ्या विलंबाने आव्हान देत यणार नाही. कृषक दिनी कुल ३२ ग प्रमाणे मालक झालेला आहे. कुळाने विक्री किंमत दिली नसल्यास , किंमत निरर्थक ठरवण्यासाठी आपण दावा करू शकता. मात्र कुल मालकाने किंमत जमा केल्यास आपणास कोणताही हक्क उरत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jirange Sanjay Ramdas
25-09-2013
srjirange@gmail.com
rahatya ghar malkache nav mahanagar palika yathe nodvinyat aale aahe.taycha magil 2 varsha pasoon tax bharnayat yet aahe. matra sadar ghar malkache nav mahsuli 7/12 var nodvinayat aalele nahi. vinanti ki, 7/12 var nav nodvine jaroori aahe kay ?
Question by शिवाजी राजेम्हादिक
24-09-2013
shivajirajetarale@gmail.com
साधे कुळ म्हणून १९५५ साली जमीन मालकाला notice न देता फेरफार certify झाला आहे परंतु कुळाकडे खंडाच्या पावत्या अगर कबुलायात हा पुरावा नाही आज पर्यंत कुळाने ३२ ग खाली notice दिल्याचा पुरावा दिला नाही मग अश्या वेळी तहसीलदार यांच्याकडे २०१२ साली जमीन मालकाने सदर कुळ नाहीत असे जाहीर होऊन मिळावे या साठी ७०/ब खाली अर्ज केला तर तहसीलदार तसा अर्ज कोणत्या आधारे मंजूर करू शकतात. त्याला १५७ कलमाची बाधा येते का.
१९५५ साली जर कुल नोंद लागली असेल तर , कृषक दिनी असा कुल मानीव खरेदीदार झाला असे कायद्याने मानण्यात येते. ३२ ग अन्वये किंमत ठरवणे , केवळ तांत्रिक सोपस्कार उरतात.
जर जमीन मालकास नोटीस न देत कुल जाहीर करण्यात आलेले असेल तर त्याच वेळी अपील करणे आवश्यक होते. ५८ वर्ष , जमीन मालक काय करत होते?
सध्या स्थितीत कुळाचे नाव कमी करता येणार नाही.
खंडाच्या पावत्या , कबुलायात हे पुरावे व्यक्ती कुल आहे कि नाही, हे ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतात . एकदा व्यक्ती कुल असल्याचे जाहीर झाल्यावर , खंड न दिल्यास कलम १४ खाली कुल- वहिवाट रद्द करण्याचा दावा करावा लागेल.
Yaa प्रकरणात कुल मालक झाले आहेत. त्यामुळे खंड देण्याचा प्रश्न तितका महत्वाचा नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ममता तांबे
24-09-2013
mamatambe@gmail.com
शासकीय जागेवर अकृषिक परवानगी घ्यावी लागते का ? असल्यास, शासन निर्णय/कायदा याची प्रत उपलब्ध व्हावी ही विनंती.
Question by khairnar vishal eknath
23-09-2013
vishalkhairnar84@rediffmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम २४७ व २५७ नुसार अपील करावयाचे तरतुदी बद्दल व वापरायचे अधिकार या बद्दल सविस्तर माहिती मिळावी
महाराष्ट जमीन महसूल अधिनियम वाचावा. या फोरम मध्ये संक्षिप्त स्वरुपात उत्तरे दिली जातात.
ढोबळ मानाने तहसीलदार यांचे निर्णय विरुद्ध उप विभागीय अधिकारी यांचेकडे तर उपविभागीय अधिकारी यांचे निर्णय विरुद्ध अपर जिल्हाधिकारी यांचे कडे अपील करता येते. अपर जिल्हाधिकारी यांचे निर्णया विरुद्ध अपर आयुक्त यांचेकडे अपील करता येते. अपर आयुक्त यांचे निर्णया विरुद्ध शाशनाकाडे अपील करता येते.
कलम २५७ अन्वये उपजिल्हाधिकारी व त्या पेक्षा वरिष्ट अधिकार्यास त्यांचेपेक्षा कनिष्ट अधिकार्याचे निर्णय पुर्निरीक्षण करता येऊ शकतात.
तहसीलदार, नायब तहसीलदार हि अश्या पद्धतीने त्यांचापेक्षा कनिष्ट अधिकारी यांच्या निर्णयाचे पुनरीक्षण करू शकतात.( ज्या मध्ये संक्षिप्त व विस्तृत चौकशी अपेक्षित नाही ).
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by khairnar vishal eknath
23-09-2013
vishalkhairnar84@rediffmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ८५[१] व ८५[२] बाबत सविस्तर माहिती मिळावी
या तर्तुदिअन्वये , न्यायालयाचे हुकुमानावाये अथवा व्यक्तिगत अर्ज केल्यास , जिल्हाधिकारी/ तहसीलदार ,जमिनीची वाटणी करू शकतात. मात्र सह्धाराकांमध्ये मालकी बाबत वाद असल्यास , त्या बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे आवश्यक.
सह्धाराकांमध्ये वाटप करताना तुक्देबंदी कायद्याचा भंग होणार नाही याचे खबरदारी घ्यावी लागते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by khairnar vishal eknath
23-09-2013
vishalkhairnar84@rediffmail.com
सरकारी कर्मचारी द्वारे सरकारी कामकाज करताना झालेले अनियमितते बाबत खाजगी व्यक्तीला कार्यालयाचे परवानगी शिवाय गुन्हा दाखल करता येतो का? येत असेल तर त्याबाबत शासन निर्णयची माहिती मिळावी तसेच दाखल करता येत नसेल तर त्याची शासन निर्णयाची माहिती मिळावी
आवश्यकता नाही. charge sheet दाखल करताना जर गुन्हा शासकीय कामाचे अनुषगाने घडलेला असेल तर आवश्यकता लागते.
दिवाणी प्रक्रिया संहिता १८० अन्वये दिवाणी दावा दाखल करण्या पूर्वी व्यक्ती शासकीय प्राधीकार्यास , कलम ८० खाली notice देता येते. याचा गुन्ह्याशी संबध नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
1) आपण सदर बाब त्यांचे वरिस्ठ अधिकारी यांचे नजरेत आणावी.
2) कार्यवाही न झाल्यास आपण सक्षम कोर्टाकडे दाद मागू शकता . अर्थात याबाबत आपण 80 CPC ह्या दिवाणी प्रक्रियेबाबत वकिलांचा सल्ला घ्यावा .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजीराजे राजेम्हादिक
23-09-2013
shivajirajetarale@gmail.com
जर जमीन मालकाला नोतीसिरुजू न करता sartify फेरफार झाला परंतु काबुलायात अगर खंडाच्या पावत्या नसतील आणि विधवा जमीन मालकीण असेल व साधे कुळाने जमीन मालकीण वारल्यानंतर एक वर्षाचे आत ३२ ग खाली notice न दिल्यास तहसीलदार सदरचे साधे कुल रद्द करू शकते का?
अश्या प्रकरणात ३२ ग खालील विक्री निरर्थक ठरते. जमिनीची कलम ३२प खाली विल्हेवाट लावण्याचे माम्लेतदार यांना अधिकार आहेत. त्या मध्ये मुल जमीन मालकास कलम ३१ च्या अधीन परत करता येऊ शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by raghunath kerkar
21-09-2013
raghunath.kerkar@gmail.com
Dear Sir,
Mi Raghunath Kerkar, vengurle, Jilha sindhudurg yethil Rahanar.
amachya kade milanarya walu (construction sand) chya sambadhat maza prashan aahe.
leelava dware honari walu chi sathavan karanya sathi kahi kayade aahet ka?
walu shatavanya karita sathavanukichi jaga (jamin)NA karavi lagate he aikun aahe... tyavar jast prakash taku shakal ka....
valu shathavun nantar tyachya vikri karane he kayadyaat basate ka? tase shakya asalyas. konati kayadeshir prakriya aahe..
Dhanyawad.
Regards,
Raghunath Kerkar
साठवणूक जागेची तात्पुरती बिन शेती परवानगी घेऊ शकता. साठवणूक करून वाळू विकू शकता. मात्र वाळूचे स्वामित्वधन शुल्क शासनास भरलेले आवश्यक. जर आपण दुसर्याकडून खरेदी करून विकत असाल तर, त्या व्यक्तीने स्वमित्वाशुल्का भरलेले असावे. आपणाकडे खरेदी पावती आवश्यक.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prafulla
20-09-2013
ps_godbole@yahoo.com
धन्यवाद
पानाबुडे सर
आमची NA ओर्डर झाली आहे त्याचीच मोजणी करावयाची आहे परंतु भूमिअभिलेख विभाग स्वतंत्र अर्ज करावयास सांगतो तरी अर्ज करावा लागतो का कि प्रांत ऑफिस भूमिअभिलेख विभाग कडे मोजणीचे पत्र व नकाशे पाठवते या मध्ये संभ्रम आहे
Na आदेशसह आपणास भूमिअभिलेख खात्याकडे आर्ज करावा लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prafulla
20-09-2013
ps_godbole@yahoo.com
संपूर्ण वर्कस असलेल्या जमिनींना कुळ लागते का ?
संपूर्ण जमिनींना कुळ लागल्याने व्यक्ती भूमिहीन झाल्यास काय करावे ?
वर्कस जमीन मधून कोणतेच पिक घेतले जात नसल्यास अथवा ती नापीक असल्यास , ती अन्य व्यक्तीने कसण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
एखाद्या जमिनीस कुल लागणे बर्याच कायदेशीर घटकांवर अवलंबून असते. केवळ जमीन वर्कस आहे म्हणून कुल लागत नाही अथवा नियमित उत्पादक जमीन कसली म्हणजे कुल लागतो असा निशकर्श काढता येत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय वाघमारे
20-09-2013
sanjaywaghmare70@rediffmail.com
सर, यवतमाळ जिल्हयाकरिता तुकडेबंदी अधिनियमान्वये प्रमाणक्षेत्र किती आहे ? कोरडवाहू तसेच बागायती
अधीक्षक भूमी अभिलेख / उपाधीक्षक भूमी अधिलेख यांचे कार्यालयात यवतमाळ जिल्ह्य करता निशित केलेले प्रमाण आपणास कळेल. सर्व जिल्ह्यात ते सारखे नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prafulla
19-09-2013
ps_godbole@yahoo.com
N A पेर्मिशन च्या वेळी भूमिअभिलेख विभागात मोजणी करता पैसे भरतो त्या नंतर NA order होते , आता NA झालेल्या प्लोटची मोजणी भूमिअभिलेख विभागाने स्वतः करावयाची आहे कि पार्टीने भूमिअभिलेख विभागाकडे स्वतंत्र अर्ज करणे आवशक आहे का ?
बिनशेती परवानगीवेळी मोजणी फी भरून घेतली जाते .आणि NA परवानगी घेणारा खातेदार LAYOUT प्रमाणे मोजणी करून घेवून सर्व PLOTS च्या हद्दी कायम करून घेतो.या कायम केलेल्या हद्दीप्रमाणे तो PLOTS ची विक्री करतो .आणि खरेदी घेणाऱ्याला जर या हद्दी मान्य असतील तर मोजणी चा प्रश्न येत नाही .मात्र खरेदीदाराला जर नव्याने मोजणी करून घायची असेल तर मात्र नव्याने मोजणी फी भरावी लागेल....
Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी
एकदाच शुल्क भरून मोजणी करणे आवश्यक आहे. प्रथम lay - out प्रमाणे NA permission दिली जाते. नंतर मोजणी karavi लागते. मोजणीत जर क्षेत्रात तफावत असेल तर , सुधारित lay - out सादर करावा लागतो . त्या प्रमाणे na परवानगी दिली जाते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prafulla
19-09-2013
ps_godbole@yahoo.com
जमीन खरेदी केल्यावर नोंद घालण्याकरता १५ दिवसांचा कालावधी लागतो जर सर्व सहीस्सेदारांच्या संमतीने खरेदीखत झालेले असतानाही नोटिसांची का गरज असते ? सब रजिस्टर पुढे सर्वांनी सह्या केलेल्या असताना सदरचा कालावधी का घेतला जातो ?
सह हिस्सेदारांव्यातीरिक्त अन्य हित्सम्भंधित व्यक्तीची सदर विक्री हस्तांतारानास हरकत आहे का? हे पडताळणे आवश्यक असते.७/१२ वर ज्यांची नवे आहेत ते सोडून अन्य हित्साम्भित लोक असू शकतात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अलीम उस्मानसाब बागवान
18-09-2013
Alimbagwan04@gmail.com
जात वैदता करण्या साठी १९६० महसूल पुरावा नसेल तर वैदता होत नाही का ?
अश्या व्यक्तीची गृह चौकशी केली जाते. त्या मध्ये चाली रिती , परंपरा, रूढी, व्यवसाय ( Sociology , anthropology , ethinology ) याचा अभ्यास केला जातो. चाली रिती, रूढी जर त्या जाती प्रमाणे असतील तर , प्रमाणपत्र देले जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक विष्णू यादव
18-09-2013
vvyadav09@gmail.com
बँकेला इकरार करण्याचा अधिकार आहे का? किती रक्मेच्यावर मोर्गेज केले पाहिजे ? ५०००/- च्या वरील बँकेचा बोजा विना मोर्गेज नोंद करता येतो का?
गहानाचे विविद प्रकार आहेत. आपला प्रश्न गहन खात नोंदणी करण्याबाबत आहे असे वाटते. एवढ्या अल्प रक्कमे बाबत बँक , मिळकतीवर lien ठेऊ शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय खुमानसिंग वळवी
17-09-2013
valvisanjay6823@ gmail.com
ग्रामपंचायतीची मुदत ५ वर्षाकरिता असते. परंतू जेव्हा एखादा ग्रामपंचायतीची मुदत संपलेनंतर ( २०१० ) बहिष्कारामुळे अगर इतर कारणांनी ग्रामपंचायत तात्काळ अस्तित्वात आली नाही. दोन वर्षांनी (२०१२) बहिष्कार मागे घेतल्यांनतर सदरची ग्रामपंचायत अस्तित्वात आली तर सदर ग्रामपंचायतीची २०१५ ला संपणार किंवा २०१७ ला संपणार याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे. संजय वळवी.
Question by Pritam Jog
17-09-2013
pritjog25@yahoo.in
a)" भोगवटादार -१ वर्ग " ची जमीन म्हणजे काय ?
ब) ' अ' 'ब' 'क' या भावाच्या वडिलांची जमीन सातारा जिल्हात भोगवटादार वर्ग १ अशी होती. ती जमीन धरणाखाली सम्पतिदित केली गेली. दरम्यान वडिलांचा मृतू झाला. तीन मुलांना धारणग्रस्त पुनर्वसन खाली 'नवीन शर्ती ची ' शेरा जमीन देण्यात आली. 'अ' ला एका गटात २ एकर (अ च्या नावाने ७/१२) आणि ' ब' आणि 'क' च्या नावानी वेगळ्या गटात ४ एकर (दोघाच्या नावानी ७/१२) जमीन मिळाली. हि जमीन सोलापूर जिल्ह्यात आहे. आता या तिघांना हि जमीन लांब असल्याने आणि प्रापंचिक अडचणी असल्यामुले विकावियाच्या आहे. हे करण्या साठी काय Procedure आहे. कोणत्या परवानग्या लागतील ? कृपया मार्गदर्शन करावे.
पूर्वीच्या श. निर्णयानुसार , १० वर्षानंतर भोग्वातदार वर्ग २ जमीन , भोगवटादार वर्ग १ होते. वर्ग १ धारणा प्रकारासाठी परवानगीची गरज नाही. मात्र १० वर्षाच्या अगोदर विक्री करावयाची असल्यास , आयुक्तानाकडे अर्ज करावा लागेल.
भोग्वातदार १ म्हणजे विक्रीवर निर्भंद नसले लि जमीन
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pardeshi Madansing Suppadsing
17-09-2013
madanpardeshi261987@gmail.com
सर , मी महसूल व्यासपीठ मधील लेख उघडण्यकारिता प्रयन्त करीत आहे पण ते उघडत नाही आहे.
महसूल व्यासपीठ हे फक्त अधिकार्यासाठीच आहे. त्यामुळे ते आपणास उघडणार नाही कर्मचार्यासाठी चे व्यासपीठ बनवण्याचे काम प्रगतीपथावर असून आपल्या साठी ते थोड्याच अवधीत उपलब्ध करण्यात येईल.
MCS
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by विलास तरंगे
16-09-2013
wilaspatil@gmail.com
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधीपासून साजरा करणे बाबत शासनाने निर्णय घेतला ? व शासन निर्णयाची प्रत उपलब्ध होईल का?
Question by Anant Gorde
15-09-2013
anandgorde001@gamail.com
Sir, amachi jamin laghu praklpa madhe geli yekun jamin 10 yekar hoti tyatali 4 yekar jamin praklpat geli ahe mi prakalp grast pramanpatr kadhanyasathi arj kela hota parantu mala ase sanganyat ale ki tumachya navavar 5 yekar peksha jast jamin asalyamule tumhala prakalpgrast pramanpatra milu shakat nahi ase ka ?
आपली जमीन बाधित क्षेत्रातील संपादित झाली आहे का कि लाभ क्षेत्रातील? जर लाभ क्षेत्रातील असेल तर प्रमाणपत्र मिळणार नाही.
शिल्लक जमिनी जमीन एकंच सर्वे नंबर आहे कि छोटे तुकडे आहेत .जमीन कास्ण्यालायक आहे का?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमाले धमके
13-09-2013
amoldhamke67@gmail.com
सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याकामी कसुरदारास देव्यावयाच्या नोटीसीचा नमुना
There are rules provided for various matters under MLRC. Rules provide procedure and various proforma or specimen of notice. There are no rules governing removal of encroachments. Various instructions / GR have been issued regarding encrochment- removal,regularisation etc.
You will not get standard form of notice . You will have to draft it.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by धनंजय sawalkar
11-09-2013
dr.adc75@rediffmail.com
महसूलच्या अ ब क द यादीस नवीन२००५ च्या अभिलेख कायद्या नुसार मान्यताघेतली आहे का?
Maharashtra Public Records Act 2005 , mandates that Record Officer shall compile record retention schedule in consultation with Director of Archievs . However act is silent as to whether schedules already prepared and have been in use requires consultaion of Director. The word consultation do necesarily mean approval ?
Beside the rules 2007 are not circulated. May be some provision made for prepartion of record retention schedules or deeming old schdules prepared by respective departments as schedules prepared after consultation with Director.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by smartsajidk@ymail.com
11-09-2013
smartsajidk@ymail.com
kripaya mala biometrics pranali civil hospital madhye shaskiya aarogya karmacharyana compulsory aahe ka,, ani jar nasel tar tya sambadhicha gr kasa milu shakel
शासकीय कर्मचार्यांनी निर्धारित वेळेवर कामावर यावे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी biometrics प्रणालीचा चांगला आहे. शाषण परिपत्रकाने जरी boimetrics सक्ती केलेली नसेल तरी त्याचा वापर करण्यास हरकत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vinod
10-09-2013
thorvevinod80@gmail.com
विना परवानगी गौण खनिज वाहतूक बाबत अद्यावत जि. आर. असल्यास अपलोड करण्यांची विनंती आहे .
आर. टी .ओ कार्यालयाने अतिभार वाह्तुक असल्याने कार्यवाही करून दंडात्मक कार्यवाही करिता प्रकरण महसुल विभागाकडे वर्ग केले या बाबत कार्यवाही करण्याबाबत काय शासन निर्णय आहे.
In my opinion , We are concerned with royalty only.If royalty is paid on the entire quantity being transported in a conveyance than it is immaterial whether excess quantity than the permissible is being transported.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
