जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Tikaram Sewakram Chandanbatwe
28-07-2013
chandanbatwe@yahoo.com
जिल्हाधिकारी व अप्पर जिलाधिकारी यांचे कार्य शासनाने ठरवून दिलेले आहे अश्या प्रकारे तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे कार्य याबाबत शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना / परिपत्रक / जी. आर असल्यास कृपया अवगत करावे.
तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे कामाबाबत परिपत्रक नाही आहे, पण महसुल व निवासी नायब तहसीलदार यांच्या कामाबाबत विभागणी केलेले परिपत्रक आहे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे कामाबाबत परिपत्रक नाही आहे, पण महसुल व निवासी नायब तहसीलदार यांच्या कामाबाबत विभागणी केलेले परिपत्रक आहे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by Pallavi Pednekar
27-07-2013
tdodclk01.si-mh@nic.in
What is the website address of Settlement Commisioner?
Question by govind ganpat joshi
25-07-2013
dcbhandarajoshi@gmail.com
भूसंपादन कायदा कलम १२(२) चे नोटिशीवर आसलेल्या नावापैकी काही खातेदारांनी इतर कामकाजासाठी ह्हाक्कासोड पत्रक करून दिले असेल तर अश्या प्रसंगी तेच हक्कासोडपत्राचे आधारे भूसंपादन मोबदला अदा करता येईल काय
इतर कामासाठी हक्क सोडल्या मुळे त्या आधारे मोबदला वाटप करता येणार नाही
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Section 12 will have to be read with section 1(4) of the Maharashtra Project Affected Person Act 1999.
It will depend upon the applicability of the MPAP act .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आदरणीय सर आपले ज्ञान अथांग आहे .
तरी पण मला माहित असल्याप्रमाणे जर हक्कसोड लेख कलम ४ पूर्वी झालेला असेल तर भूसंपादन नियम पुस्तिका १९७२ नियम १२ नुसार झालेला बदल विचारात घेवून मोबदला अदा करण्यास हरकत नसावी . जर हक्कसोड कलम ४ नंतर झालेला असेल तर महा. प्र.ब. व्य. पु.अधि.१९९९ (१९७६) कलम १२ च्या तरतुदी लागू होत असल्यामुळे मोबदला अदा करता येणार नाही .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
नाही. १०० रु. चा संमतीपत्रावर सर्व खातेदारांची संमती प्राप्त करून त्या आधारे मोबदला अदा करणे योग्य राहील.
चंद्रकांत जाजू
उपजिल्हाधिकारी वाशीम
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by काळे दिपाली
24-07-2013
d.kale@pcmcindia.gov.in
७/१२ च्या उता-यात मालकाच्या नावाआधी अ.पा.क असे लिहिलेले असते त्याचा अर्थ काय
Vishnu, section 8 is applicable to property which is absolute property of minor.Before amendment to Hindu Succession Amendment Act 2005, child's share was fluctuating and hence such property was not absolute property of child . Hence Court observed that section 8 inapplicable. However property which is in the name of child/ devolved upon him is his absolute property and in such case section 8 is applicable.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
सर कृपया या निकालावर भाष्य करा
Smt. Sandhya Rajan Antapurkar & ... vs State Of Maharashtra on 25 November, 1999
Reply by विष्णू पाटील | सर्वसाधारण
In such cases , property cannot be sold without leave of the court during the minority .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
अ.पा .क म्हणजे अज्ञान पालन कर्ता.In English it is called Guardian of the Minor(person below 18 Years.)
Reply by श्रीधर गालीपेल्ली | नायब तहसीलदार
Question by सतीश प्रसादराव भुतेकर
23-07-2013
sbhutekar@rediffmail.com
आपल्या नावावरील जमिनीचा १९७० पृविचा फेरफार तहसील मध्ये मिळत नाही तर तो मिळवण्यासाठी काय करावे,व कुठे मिळेल. कृपया मदत करावी.
फेरफार हे अ प्रकारचे अभिलेख असल्याने ते कायमस्वरुपी जतन करावे लागते. जर आढळ होत नसेल तर त्याचे कारण काय हे तहसीलकडुन माहिती करुन घ्यावे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by घृष्णेश्वर शिवानंद गजभारे
22-07-2013
gsgajbhare@gmail.com
मी दि. १४/०७/२०१३ रोजी अव्वल कारकून म्हणून रुजू झालो लिपिक संवर्गातील माझे वेतन १९०० ग्रेड पै मध्ये रु ६९७०/- एवढे होते परंतु मला अव्वल कारकून संवर्गात पूर्वी 2800/- ग्रेड पे (आता ३५००/- आहे) ग्रेड पे लागू केला परंतु त्याचे किमान वेतन २८००/- ग्रेड पे नुसार ८५६०/- व ३५००/- प्रमाणे ८९२०/- होणे अपेक्षित आहे (महा सिविल सर्विस रूल) कनिष्ठ कर्मचार्या पेक्षा वरिष्ठ कर्मचार्या चे वेतन कमी असू नये असा नियम आहे
Question by falkevijay2011@rediffmail.com
22-07-2013
falkevijay2011@rediffmail.com
समजा अ ने ब ला जमीन विक्रीकामी व पुनर्वसन परवानगी
कमी कुलमुखत्यारपत्र करून दिले असून ब ने क ला कुलमुखत्यार पत्राने सर्व अधिकार दिले असून क ने अ च्या मिळकतीचे कुलमुखत्यार पत्राच्या आधारे रजिस्टर खरेदीखत ब ला करून दिले असून फेरफार नोंदीबाबत मूळ मालक अ ला notis dyavi ka?
B has not any right to give it to C,so in this case the transition done by B to C is not legal.Then also if registration is done,you shold issue notice to A ,B and C.And cancel the mutation..
Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी
As per section 190 of Contract Act , agent cannot delegate his work to another agent. In your case , wheb B has been appointed to obtain permissions and sale the property of A , he cannot delegate his work to C which he himself has undertaken to perform.when C has transferred property to B , then why A himself has not transferred property to B ?
A should have appointed C as attorney to sale his property .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by falkevijay2011@rediffmail.com
22-07-2013
falkevijay2011@rediffmail.com
सर, लीसपेंडन्सी रजिस्टर दस्त व दिवाणी न्यायालयात चालू असलेल्या दाव्यावरून फेरफारनोंद धरली असता त्यावर त्यातील वादीची तक्रार आली असता तक्रार रजिस्टरला धरून तक्रार केस तालुक्यात पाठवावी का? अशा नोंदीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार नोटीस बजवायची आवश्यकता असते का?
तक्रार नोंद आहे , तालुक्यात पाठवणे आवश्यक .कलम १५० प्रमाणे notice देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयेश सखाराम चोरगे
21-07-2013
chorgejayesh@gmail.com
तुक्डेबंदी कायद्याचा भंग केव्हा होतो ?
२४.८ गुंठ मोजणी करण्या साठी साधारण किती खर्च येईल ?
आकारफोड पत्रक तयार करून घेण्य साठी मोजणी अर्जाबरोबरच अर्ज करावे लागेल का ?
प्रत्येक जिल्ह्यासाठी आदर्श क्षेत्र निशित करण्यात आले . वर्षभर बागायत क्षेत्रासाठी आदर्श क्षेत्र ०-०५-०० ha-R , हंगामी बागायत क्षेत्रासाठी ०-१५-००, तर जिरायत क्षेत्रासाठी हे प्रमाण ०-२०-०० आहे. या पेक्षा कमी क्षेत्र विक्री-व अन्य कारणामुळे निर्माण होत असेल तर भंग होतो. आपले जिल्ह्याचे आदर्श क्षेत्र काय आहे हे तपासून घ्या.
प्रश्न २ व ३ बाबत , भूमी अभिलेख खात्याशी संपर्क साधा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sanjaydalvi
21-07-2013
sanjaydalvi67@gmail.com
i joined the service in 1994 and pass r q in nov.2001 requesting a suggestion for yesterdays question.
Seniority is fixed on the basis of date of passing of RQ provided you have passed the examination within three chances .
Among candidates who have passed the examination on same date , the date of continuous service in clerk cadre. If both are same for more candidates then candidate older in age is senior and so on.........
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयेश सखाराम चोरगे
20-07-2013
chorgejayesh@gmail.com
२४.८ गुंठ्यान मध्ये अर्धे करून माझा वेगळा गट क्रमांक (७/१२) मिळेल का ?
तसा नसेल होणार तर माझ्या ७/१२ मधला गट नंबर विभागून मिळेल का जेणे करून मी माझ्या हिस्स्याचा धारा भरू शकेन अर्धा हिस्सा माझा आहे
जर तुमची जमीन भातशेती असेल तरच तिचा फाळणी-बारा (आकार-फोड...... म्हणजे आपले 12.4 गुंठे क्षेत्राचे दोन तुकडे ) होईल, अन्यथा नाही. कारण तुकडेबंदी कायद्यानुसार महाराष्ट्र मध्ये सर्वसाधारणपणे 20 गुंढेचे आत कोठेच जमिनीचा तुकडा पाडता येत नाही.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
तुक्डेबंदी कायद्याचा भंग झाला झाला नसेल / होत नसेल तर , रीतसर उप अधिषक भूमी अभिलेख यांचेकडे जमीन मोजणीचा अर्ज करून , आकारफोड पत्रक तयार करून घ्यावे . आपले हिस्याचे जमिनीस पोट हिस्सा /पोट सर्वे नंबर मिळेल.तसेच धारा हि जमिनीचे शेत्र, प्रती प्रमाणे निशित केला जाईल . आकारफोड पत्रकाचे आधारे स्वतंत्र वेगळा ७/१२ मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sanjay a dalvi
20-07-2013
sanjaydalvi67@gmail.com
what is the criteria used for seniority list after passing revenue qualifying exam for circle officers.
Question by नवीन बोलू
19-07-2013
naveen_sup@yahoo.com
What is the website of Maharashtra Government for getting 7/12 extract?
Google वर आपल्या जिल्ह्याचे नाव type करा. जिल्हा संकेतस्थळावर लिंक दिलेली आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय वाघमारे, तलाठी
19-07-2013
sanjaywaghmare70@rediffmail.com
सर, जमिन महसूलावरिल जिल्हा परिषद उपकर ७ पट झाल्या बाबतचा शासन निर्णय कोठे मिळेल ?
जिल्हा परिषद , पंचायत समिती कायद्याचे कलम १४४,१५१, १५२ व १५५ वाचावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहास पाटील अद्वोकॅते अहमदपूर
18-07-2013
suhasgpatil@gmail.com
७/१२ दर ३ महिन्यातून घर पोहोच देण्याची योजना शासनाने हाती घ्यावी .याचे अकादम पैसे वर्षातून १ द जमीन महासुलाप्रमाणे घ्यावेत
वर्षातून कितीही वेळा आपणांस ७/१२ घेत येतात.सहज तालुकेला गेल्यावर सेतू मधून आपण प्राप्त करून घ्यावा.
Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी
७/१२ जिल्ह्याच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. प्रिंट ओउट हि काढता येते.सेतू मधून ७/१२ ची नक्कल मिळते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भरत दुतोंडे तलाठी
18-07-2013
rutuja.dutonde@rediffmail.com
अतिक्रमण विषयी :- २००२ ला गायरान जमीन वनविभागास घोषित होऊन ७/१२ ला वन विभागाचे नाव आले.त्यावर अतिक्रमण धारक १९८९ पूर्वीचे अतिक्रमण असल्याचा दावा करतात व पंचनामा करून गाव न.१ ईला नोंद घेण्याची मागणी करतात. पंचनामा करावा? अतिक्रमण नोंद वाहिला नोंद घ्यावी का?
Go through the provisions of sections 2 , 3A and 3B of Forest Conservation act 1980.conversion of forest land into non forest use is restricted activity . Contravention or abetment to contravention of any provisions of act , is punishable with simple imprisonment.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
२००२ ला अधिसूचने द्वारे वन विभागाचा नावाने ७/१२ झाल्यामुळे आपल्याला कसलीच नोंद करता येणार नाही .२००२ पूर्वी जर अतिक्रमणाची एक ई ला नोंद केली असेल तर सबंधित शेतकऱ्याला नकल पुरवा आज रोजी नोंद घेत येणार नाही .
भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार दर वर्षाला वन जमीनीच सर्वे करण्यात येवून केस डायरी तयार करण्यात येते त्यामुळे यानंतरच्या नोंदी वन विभाग कराव्या लागतात. हि बाब सबंधित शेतकऱ्याला समजून सांगावी .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
पंचनामा चालू तारखेचा करायचा असतो.१९८९ पूर्वी पासून राहत आहोत याचे पुरावे संबंधिताने द्यावेत.so keep quiet .
Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी
Question by भरत दुतोंडे तलाठी
18-07-2013
rutuja.dutonde@rediffmail.com
पूर्वीची संपादित झालेली जमीन अजूनही क.जा.प. झालेली नाही.७/१२ ला पूर्वीच्या मालकाचेच नाव आहे.त्याचा शेजारील शेतकर्याने अवार्ड स्टेटमेंट ची zerox देऊन त्याचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केला आहे अशी नोंद घेता येईल का ?
अशा प्रकारे नाव कमी करण्याची नोंद घेत येणार नाही.क जा. प. ची आवशकता आहे अवार्ड स्टेटमेंट व .क जा. प. वेगवेगळे मुद्दे आहे. सदर बाब भूसंपादन अधिकारी यांचे लक्षात आणून .क जा. प. व सारा कमी करण्याचा आदेश प्राप्त झालावरच नोंद घ्यावी.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by राहुल वानखेडे
17-07-2013
rpwankhede@rediffmail.comआपला ई मेल आयडी ...
जिल्हा गौनखानीज आराखडा बाबत कृपया माहिती द्यावी.
Question by sanjay waghmare
17-07-2013
sanjaywaghmare70@rediffmail.com
सर, युजर नेम व पासवर्ड बरोबर असूनही लोगिन होत नाही कृपया मार्गदर्शन करावे
सर्व महसूल कर्मचाऱ्यांना विनंती आहे,
महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ,
Login संबंधी नवीन Page Development चे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पुढील आठवड्यात पूर्ण होईल.तो पर्यंत कृपया गैरसोय सहन करावी. आपले संकेतस्थळ परिपूर्ण असावे म्हणून आपण अधिकतम सोयी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. कर्मचाऱ्यांचा मर्यादित प्रतिसाद मिळेल या कल्पनेने सुरुवातीला सर्व महसूल कर्मचारी एकत्रच नोंदणी करतील अशी सोय केली होती.पण कर्मचाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहून विभाग निहाय,जिल्हानिहाय ,पदनिहाय व नावनिहाय शोध सुविधा असलेले पेज करणे आवश्यक झाले आहे. ते पुढील आठवड्यात पूर्ण पूर्ण होताच सर्व सुविधा देण्यात येतील.
सहकार्याबद्दल दिलगिरिसह धन्यवाद!
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by m n kulkarni (talathi )
17-07-2013
kulkarni82@yahoo.com
7/12 rewrite kartana kay kalgi ghayvi ?
कृपया १९५० सालापासूनचे ७/१२ उतारे समोर ठेवावेत.आपली छोटीशी चूक देखील शेतकऱ्याला फार त्रासाची ठरू शकते.त्यामुळे काळजी घ्यावी.
Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी
१) १० वर्षा पेशा कमी कालावधी असेल तर उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घ्यावी .
२) साधारण पणे ३० जून ला पुनर्लेखन व प्रख्यापणाचे काम पूर्ण होईल अशा बेताने काम हाती घ्यावे. प्रथम सर्व पोट विभागाचे ७/१२ क्रमाने लावावे.
३) मागील कमी झालेल्या नावाच्या नोंदी वगळून कायम असलेल्या नोंदी पुनर्लेखन ७/१२ वर कायम कराव्या.परंतु फेरफार क्रमांक मात्र पुनर्लेखन ७/१२ वर नोंदवावे.
४) एकदा नोंदी झालेले ७/१२ मंडळ अधिकारी यांना तपासणी करिता सादर करावे .
५) पुनर्लेखन ७/१२ खातेदारांनच्या आक्षेप व निरिक्षना करिता ग्राम पंचायत ठेवण्यात यावे या दरम्यान झालेल्या फेरफार नोंदी प्रख्यापणा पूर्वी अद्यावत करून तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यान कडून नमुना ब मध्ये घोषणा करून प्रख्यापण करून उपयोगात आणावा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by vinod
16-07-2013
thorvevinod80@gmail.com
युझर नेम व पासवर्ड अचूक टाकल्यावर सुधा लॉगीन होत नाही
सर्व महसूल कर्मचाऱ्यांना विनंती आहे,
महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ,
Login संबंधी नवीन Page Development चे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पुढील आठवड्यात पूर्ण होईल.तो पर्यंत कृपया गैरसोय सहन करावी. आपले संकेतस्थळ परिपूर्ण असावे म्हणून आपण अधिकतम सोयी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. कर्मचाऱ्यांचा मर्यादित प्रतिसाद मिळेल या कल्पनेने सुरुवातीला सर्व महसूल कर्मचारी एकत्रच नोंदणी करतील अशी सोय केली होती.पण कर्मचाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहून विभाग निहाय,जिल्हानिहाय ,पदनिहाय व नावनिहाय शोध सुविधा असलेले पेज करणे आवश्यक झाले आहे. ते पुढील आठवड्यात पूर्ण पूर्ण होताच सर्व सुविधा देण्यात येतील.
सहकार्याबद्दल दिलगिरिसह धन्यवाद!
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by गिरीष जोशी नायब तहसिलदार, वाशिम
16-07-2013
rdc_washim@rediffmail.com
महाराष्ट्रात गौण खनिज जिल्हा आराखडा बाबत माहीती कुठे मिळेल
Pl login as membership by registering so you can get through Mahsul Vyaspith,
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by विनायक विष्णू यादव
13-07-2013
vvyada09@gmail.com
एखादा 'अ' पुरुष मरण पावल्यास वर्ग १ चे वारस म्हणून त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व आई हे सामायिक रित्या आपण ७/१२ वर चढवतो. त्यानंतर त्या पुरुषाची आई मरण पावते. आता तिचे वारस म्हणून तिचा मुलगा, मुलगी हे येतील. म्हणजे पर्यायाने 'अ' चे भाऊ - बहिण वारस म्हणून आले. त्याचा मग 'अ' च्या पत्नी व मुलांना त्रास होतो. मुलाकडून आईकडे वारसाने आलेली मालमत्ता तिच्या मृत्यू नंतर मुलाच्याच वारसांकडे प्रक्रांत होईल, याबाबत काही कायदेशीर तरतूद किंवा न्यायालयीन आदेश आहेत का ?
mahasul vibhaga marfah fakt abhilekh adhyavat karnayache kam karnyat yete.
7/12 var nav darj asaleli vyakti maran pavali v tyanchya varsanache nav purvich darj zlele aahe.
ashaveli gav namuna-6 k madhe mayat khatedarachi nond karavi v rakana kamak 5 madhe '' ya purvi ferfar krmak amuamuk nusar mayat khatedarache vars darj zalele aahe ase namud karun to ferfar madal adhikari yanche avloknath sadar karava. mandal adhikari yanni mahirti denyacha kalavadhi baghun mayatache nav kami karnyache aadesh karave.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by विनायक विष्णू यादव
13-07-2013
vvyadav09@gmail.com
A' is father of three brothers 'X', 'Y'& 'Z'. One land having area 3.00 HR. The said land is registered in the name of 'A' only. He notarised the 'Partition deed' without registration. The said land is ancestral one. Can 'X', 'Y' & 'Z' are entitled to get mutated their names as per the said notarised partition deed? In other issue, if the said land is self acquired by A, what should be the decision on mutation?
प्रतिसाद :
अविभक्त हिंदू कुटुंबातील सदस्यांनी परस्पर समजुतीने वाटणीपत्र तयार केल्यास त्यानुसार फेरफार घेण्यास काहीही अडचण नाही.यासाठी मुंबई मुद्रांक शुल्क अधिनियम 1959 नुसार शेतीच्या वाटणीपत्रासाठी रु.100 चे मुद्रांक शुल्क निश्चित केलेले आहे.तसेच अरविंद यशवंतराव देशपांडे यांचे याचिकेवरील (2815/2002) निर्णयामध्ये नागपुर खंडपीठाने स्पष्ट केले आहे की,"हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होऊन सहधारकला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया "हस्तांतरण"या सन्द्न्येखाली येत नाही,म्हणून वाटणीपत्र नोंदणी करणे सक्तीचे नाही.याबाबत नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे परिपत्रक क्रं.का.प्र.क्र.3846/2005/710 दि.10/05/2006 पहावे.
तसेच महसूल व वन विभागाचे परिपत्रक क्रं.0/3092/प्र.क्र.25/ल-6,दि.07/05/1992 नुसार , "एखाद्या जमिनी च्या सहधारकानी खाजगिरीत्या सामोपचाराने वा आपापसात समजुतीने जमिनीची विभागणी करून घेतली असेल ,अशा प्रकरणी MLRC SEC ८५ खाली कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही .मात्र याची वर्दी कलाम 149 खाली तलाठयास दिल्यावर त्याची नोंद घेऊन कलाम 150 खाली प्रचलित कार्यपद्धतिनुसार नोंदी प्रमाणित करण्याची जबाबदारी महसूल अधिकार्याची असते."
जर ती मालमत्ता अविभक्त हिंदू कुटुंबाची असेल आणि कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याची हरकत नसेल तर फेरफार घेण्यास अडचण नाही. तसेच स्वकष्टर्जीत मालमत्तेची विल्हेवाट स्वत;च्या मनाप्रमाणे लावण्याचा मालमत्ताधारकस पूर्ण अधिकार आहे.
श्री. कदम राजाभाऊ सोपानराव
तहसीलदार वडवणी
या बाबतीत शासनाचे मत काय ?
This question has already been replied. If father wants to distribute his property amongst his heirs during his life time, he will have to either gift it or sale by registered deed. During his life time he cannot partition his property.
Go through The hindu succession Act .( amendment act).
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prafulla
12-07-2013
ps_godbole@yahoo.com
purvichya kalatil tondi vatapani jaminichya zalelya nondi grahya dhartat ka
प्रश्न , पूर्वी तोंडी वाटपाने मंजूर झालेल्या नोंदिसंदर्भात आहे , असे मी समजतो. नवीन मंजूर करावयाचे नोंदी संदर्भात नव्हे .
I presume question is related to mutation entries which are certified earlier based on oral partition. Mutation entry cannot be/ should be certified on the basis of oral partition.
There are large no of certified mutation entries based on oral partition. These entries will have to hold / treat valid unless contrary is proved.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
But revenue officer is not authorised for mutation of oral partation.Let the "purvichya nondi".Dont take such "nondis" now.
Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी
Yes. Oral partition is a legal mode of division of property amongst Hindus. It has been practised since time immemorial. Court has upheld the validity of oral partition.
या नोंदी ग्राह्य आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
