जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माझे आजोबा यांनी 1964 ला नोंदणीकृत दस्त करून खरेदीखत केले आहे.परंतु आजोबा अशिक्षित असल्याकारणाने त्याकाळी त्यांनी सदर दस्त नोंद केली नाही .त्या नंतर सदर दस्त त्यांचे कडून गहाळ झाला होता परंतु आम्ही घर दुरुस्ती करत असताणी सदर दस्त आम्हाला मिळून आला आहे. सदर दस्त वरून त्या गटाचे 7/12 व 8 अ उतारा पाहिले असता आजोबांची कोठेही नोंद नाही . आजोबा हयात नाहीत.खरेदीखत करून देणार यांनी सदर क्षेत्र हे 1966 ला सर्व दुसऱ्याला विकले आहे. सदर गटातील अर्धे क्षेत्र आजोबांनी खरेदीखत करून विकत घेतले होते.आता सदर दस्त नोंदणी करीता कोणाकडे द्यावा आणि 7/12 वर नोंद होणे करीता मार्गदर्शन व्हावे
माझ्या पणजोबांनी 1969 रोजी आमच्या भावकीतील जग्गनाथ एकनाथ गारपगारे याच्याकडून 3रु स्टप वरती पैसे देउन जागा लिहुन घेतली पण तलाठी व ग्रांमपचायत कडे नाव कमी करुन आमचे नाव चुक भूलीना लावले गेले नाही पण ताबा आज पर्यत आमच्याकडे आहे आज रोजी लिहुन देणारे व लिहुन घेणारे जिंवत नाही लिहुन देणार्याचे वारस हक्क दाखवतात कारण जागेचा उतारा त्याच्या नावे निघतो तर आता आम्ही काय करावे आमच्या कडे 3रु स्टॅप आहे जो जागेबाबत लिहुन दिला होता
Sir.,amhala 25 warsha agodar grampanchayat celling kayadyat plot milala ahe... Tya jagecha patta kasa milel Ani kagadpatra kuthe pathawawe lagtil please sanga
सर माझा प्रश्न असा आहे की, बोरवेल खोदण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते याबाबत मार्गदर्शन करावे.
बोरवेल खोदण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही . तथापि महाराष्ट्र भूजल ( विकास आणि व्यवस्थापन ) कायदा २००९ नुसार , जिल्हा प्राधिकरणाने घोषित केलेल्या सार्वजनिक पिण्याचे पाणी ठिकाणापासून ५०० मीटर आंतरचे आत तसेच जिल्हा प्राधिकरणाने घोषित भू जल शोषण क्षेत्र या मध्ये बोरवेल खोदकाम करता येत नाही .
जिल्हा प्राधिकरण म्हणजे तहसीलदार होत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बोरवेल खोदण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही . तथापि महाराष्ट्र भूजल ( विकास आणि व्यवस्थापन ) कायदा २००९ नुसार , जिल्हा प्राधिकरणाने घोषित केलेल्या सार्वजनिक पिण्याचे पाणी ठिकाणापासून ५०० मीटर आंतरचे आत तसेच जिल्हा प्राधिकरणाने घोषित भू जल शोषण क्षेत्र या मध्ये बोरवेल खोदकाम करता येत नाही .
जिल्हा प्राधिकरण म्हणजे तहसीलदार होत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की, नवीन प्लॉट वर घराचे बांधकाम करावयाचे असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते याबाबत मार्गदर्शन करावे.
जागा ज्या नियोजन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते त्या नियोजन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे .
नियोजन प्राधिकरण
महानगर पालिका - महानगर पालिका क्षेत्र
नगर पालिका - अ, ब व क वर्ग नगर पालिका
ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्र - संबंधित ग्राम पंचायत
ग्रामीण भाग ( सर्वे नुंबर क्षेत्र ) - जिल्हाधिकारी
या शिवाय विशेष प्राधिकरणे - सिडको - नवी मुंबई क्षेत्र , MSRDC
काही ठिकाणी - जिल्हा परिषद
आपली जागा कोणत्या क्षेत्रात येते त्यावरून आपण ठरवा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार,
सर जर एखाद्या शेत NAP 34 नुसार मंजूर (अभिण्यासानुसार)लेआऊटअकृषक झालेले असेल व त्यातील प्लॉट विक्री झालेले असतील अश्या परिस्तिथीत 5 आर,जमीनीचा 45 वर्षे आधीचा रजिस्टर्ड मोबदला लेख दाखवून तहसीलदार यांचे आदेशाने सदर अभिण्यासाप्रमाणे मंजूर झालेले लेआऊट रद्द करून दावा दाखल केलेल्या व्यक्ती च्या नावावर 5 आर जमिनीचा 7/12तयार होऊ शकतो काय?
आमचे संस्थेने 2008 मध्ये रजिस्टर्ड खताने सर्व्हे नं9/4 मधील लेआऊट मधील अकृषक झालेला प्लॉट विकत घेतलेला आहे. त्यावेळच्या परिस्थिती नुसार आमच्या प्लॉट समोरील भागात लेआऊट मधील12 मीटर रुंदीचा रास्ता होता व त्या रस्त्याला अप्रोच सर्व्हे नंबर 9/5 चा12 मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड होता.
परंतु क्ष व्यक्तीने 1968 सालचा मोबदला लेख मा तहसीलदार यांचे कडे 2010 मध्ये दाखल करून सदर सर्व्हे नंबर9/5 वरील 5 आर जमिनीवर आपला हक्क दाखविला तत्कालीन मा.तहसीलदार यांनी सदर सर्व्हे नंबर 9/5 वरील मंजूर अभिण्यासाप्रमाणे झालेले लेआऊट रद्द करून पुन्हा सर्व्हे नंबर 9/5 चा कृषक 7/12 तय्यार केला व त्या सर्व्हे नंबर मधील 5आर जमिनीचा वेगळा करून क्ष व्यक्तीचा नावावर केला आहे आमचे संस्थेने मा विभागीय अधिकारी यांचे कडे सदर प्रकरणाची माहिती घेतल्यावर त्यांनी आम्हास सदर 5 आर जमिनीचा वेगळा 7/12 असल्यामुळे आमची अपील फेटाळून लावली आहे.
आमचे संस्थेने 2008 मध्ये घेतलेला प्लॉट हा सदर 12 मीटर रुंदीचा सर्व्हिस रास्ता पाहूनच घातलेला आहे परंतु आता त्या 5 आर जमिनीची सदर क्ष व्यक्तीच्या वारसांनी विक्री केली व विकत घेणारे लोक तिथे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सदर 5 आर क्षेत्रावर अवैध बांधकाम सुरू केलेले आहे.
सदर बांधकामाची तक्रार नगरपालिका, तहसील येथे करून सुद्धा 5 आर जमीन खरेदी करणारे लोक बांधकाम सुरूच ठेवलेले आहे.
आम्हास कृपया लवकरात लवकर मार्गदर्शन करावे.
वास्तविक तहसीलदार यांना Lay Out रद्द करण्याचा अधिकार नाही . हे अधिकार जिल्हाधिकारी यांचे आहेत . फार तर जिल्हाधिकारी हे अधिकार प्रांत अधिकारी यांना देऊ शकतात . त्यामुळे तहसीलदार यांना रेखांकन रद्द करण्याचा अधिकार नाही . तसेच या विरुद्ध अपील संचालक नगर रचना यांचे कडे आहे . आपण संचालक नगर रचना यांचे कडे अपील करा .
अनधिकृत बांधकामाबत नियोजन प्राधिकारी जिल्हाधिकारी/प्रांत अधिकारी ( जागा प्रादेशिक योजना लागू असलेल्या क्षेत्रातील असेल तर ) यांचे कडे आपण तक्रार दाखल करू शकतात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar
13-03-2020
sagarkandekar1990@gmail.com

आदरणीय किरण सर , मी आपणास खलील प्रश्न विचारला होता.
प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.

त्याचे आपण दिलेले उत्तर -
एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता.

त्याला अनुसरून च एक प्रश्न -
आपल्या माहिती नुसार मी काही वकीलाशी बोललो ,त्याचे मते limitation act नुसार आपली दावा करण्याची मुदत संपली आहे तर खरच limitation act नुसार आमचा दावा करण्याची मुदत संपली आहे.??? मार्गदर्शन करावे.
मी माझ्या वरील उत्तरात सुधारणा करतो . वास्तविक गुरुचरण जागा आपण खरेदी केली ती प्रक्रिया चुकीची आहे .आपली फसवणूक केली म्हणून आपणास नुकसान भरपाई मिळू शकते . मात्र जमिनीची किंमत व त्यावरील व्याज मिळणार नाही .
फसवणूक झाल्यापासून कालावधी खूप झालेला आहे .मात्र न्यायालयाने वाजवी कारणासाठी झालेला विलंब माफ करू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलोपाजीत जमिनीवार सह हिस्से दार म्हणून अर्ज केला आहे पन हिंतसंबताने हरकत घेतली आहे पन 4 महिने झाले मंडळधिकारी सुनावणी चालु आहे पन पन अजु निकाल लावला नाहि आहे काय कराव लागेला ok
ज्या जमिनीमध्ये मालकी हक्काबाबत वाद नसेल अश्या जमिनीचे वाटप कलम ८५ खाली तहसीलदार यांचे कडे होते . हरकत संबंधित व्यक्तीने हरकत घेतली असल्याने व सदरची हरकत मालकी हक्क्का बाबत असेल तर , न्यायालयाकडून वाटप करून घ्यावे ;लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
जमीन किती खोदली पाहिजे आणि त्याचे नियम sanga
आम्ही 50 वर्षापासून एका खाजगी मालकीच्या जागेत जवळपास 3 कुटुंबे कुडा ची घरे बांधून राहत आहोत. आमच्यात आणि जागा मालका मधे कोणतीही जागेसंदर्भात लिखापटि झालेली नाही. पूर्वीच्या काळी बहुतांश लोक करार करित नव्हती तोंडी राहण्यास परवानगी देत असत ही वस्तूस्थिति आपणास देखील माहित आहे. संबंधित राहत असलेले सर्व पुरावे आमच्याकडे आहेत जसे की स्वतःच्या नावाची लाईट बिल, रेशन कार्ड ,आधार कार्ड ग्रामपंचायतीने निर्गमित केलेले रहिवासी दाखले, जातीचे दाखले,जात पडताळणी दाखले,इलेक्शन कार्ड व इतर असे अनेक पुरावे आमच्याकडे रहिवासी असल्याबद्दलचे आहेत. त्याचप्रमाणे आमच्यापैकी 1 कुटुंबाला घरकुल देखील त्या जागेत आलेले आहे. आमच्या घरपट्टया सन 2003 मध्ये ग्रामपंचायत ने लावल्या होत्या आणि त्या जागा मालकाच्या हरकती मुळे सन 2009 मध्ये रद्द करण्यात आल्या होत्या तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सदरच्या घरपट्टी पूर्ववत करणे बाबत पाठपुरावा ग्रामपंचायतीकडे करीत आहोत. तसेच जागा मालकाने ग्रामपंचायत ला पत्र देऊन असे सांगितले आहे की आम्ही त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे व सदरची घरे निष्कासीत करावी. दरम्यान ग्रामपंचयत ने शासन परिपत्रक क्रमांकः पंरास 2016/प्र.क्र.17/पंरा-4, 18 जुलै, 2016 मात्र अन्वये मासिक सभा दि.30.6.18 मध्ये आमच्या अनधिकृत घर पट्टी अकारनी केली. मात्र ग्रामपंचायत, ग्रामसेवक व जागामालक यांनी एकत्रित मिळून आमच्या विरोधात जाणूनबूजून कटकारस्तान करून कायद्याचे उल्लंघन करून आमच्या घरपट्ट्या पूर्ववत करण्याऐवजी त्या जागा मालकाच्या नावे नविन ठराव दि.30.9.18 करुन आमचे घरांची मोजणी न करता घराची खोटी क्षेत्रफळे असेसमेट उतारावार लावुन मालकाचे नावे अनधिकृत घर पट्टी लावण्यात आली आहे. यासंदर्भात आम्ही गटविकास अधिकारी,पंचायत समिती,वसई यांचेकडे सातत्याने पाठपुरावा देखील केलेला आहे. बिडिओ ने ग्रामपंचायत ला सदर प्रकरणी 4 स्मरण पत्रे देऊन खुलासा मागितला आहे. परंतू ग्रामपंचायत खुलासा सादर करीत नाही व आम्ही देखील ग्रामपंचायतीकडे तुम्ही का असे केलेले आहे आम्ही तिथे राहत असताना इतके वर्षे या अगोदर आमची नावे घरपट्टी असताना तुम्ही मालकाच्या नावे कोणत्या अधिकारात घरपट्टी आकारणी केली आहे याचा जाब विचारले असता ते आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.तसेच सीईओ याना देखील पत्रव्यवहार केला आहे पण अद्याप निर्णय झाला नाही. दरम्यान 2017 च्या अधिसूचनेनूसार घर व त्या खालील जमीन आमचे नावे होवू शकेल का? कारण आम्ही शेतमजुर व कारगिर नाही आहोत. कारण आमचा ड्रायव्हींग चा व्यवसाय आहे. नविन अधिसूचने नुसार घर व त्या खालील जमीन आमचे नावे होवू शकेल का? यासंबधीत मार्गदर्शन मिळावे.



वासळई ग्रामस्थ
वसई पश्चिम, तालुका- वसई
जि. पालघर
आपण शेत मजूर अथवा कारागीर नाहीत त्या मुले , कुल वहिवाट कायद्याच्या कलम १६,१७ व १८ खाली घराखालील जमीन आपले नावावर होऊ शकत नाही .
न्यायालयात दावा दाखल करणे हितावह

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमचे आजोबा मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत नोटरी मार्फत त्यांचे मुखत्यार /कब्जे पावती /साठेगत केलेले आहेत. सर्व व्यवहार चेक ने केलेले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???
वाटप पत्र आहे . नोंदणी होण्यास हरकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमचे आजोबा मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत नोटरी मार्फत त्यांचे मुखत्यार /कब्जे पावती /साठेगत केलेले आहेत. सर्व व्यवहार चेक ने केलेले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???
साहेब नमस्कार

१ )साहेब ग्रामपंच्यात शासकीय नियमानुसार घरपट्टी ना आकारात जादा डबल घरपट्टी वसूल करू घेत आहे ,शासकीय घरपट्टीची नियमावली कुठे मिळेल
२ ) सामाईक गावठाण घर मिळकत मध्ये ३ हिसषेदार १ नं मयत आहे ,त्याला मुलबाळ नाही ,बाकी वारसाची नावे नोंद चढली आहे ,परंतु मयताच्या नावे घरपट्टी,पाणीपट्टी ,आरोग्य कर देत आहेत काय करावे लगेल कृपया मार्गदर्शन करावे
गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर , 7/12 वरती इतर हक्कात सक्षमप्राधिकरणाच्या पुर्व परवानगीशिवाय हस्तांतरणस बंधी -इनाम व वतन जमिनी

*नविन अविभाज्य शर्थ*
नविन अविभाज्य व तब्दील न करनेचे शर्तिवर (1) असा शेरा आहे.

तरी आम्हाला घरातच खते वाटप करायच आहे काय करव लागेल.
उपरोक्त वेतन जमीन हि वडिलोपार्जित असेल व त्याचे वाटप करावयाचे असल्यास परवानगीची गरज नाही . वाटप म्हणजे हस्तांतरण नव्हे .
तसेच २००२ च्या सुधारणा कायद्यानुसार , कृषी प्रयोजन हस्तांतनास हि परवानगीची गरज नाही .
मात्र वाटप पत्र करण्या पूर्वी संबंधित तलाठी , मंडळ अधिकारी (व तहसीलदार )यांना हि कायदेशीर वस्तुस्थिती बाबत अवगत करा . वाटप झाल्यानंतर , फेरफार ते मंजूर करणार आहेत . त्यामुळे त्यांचे मत हि महत्वाचे . अन्यथा त्यांचे मत अन्य असल्यास , वाटप केले तर पुढील कारवाई होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार, मी संजय बाबुराव मोहिते . आमचे वडील कै बाबुराव मोहिते यांचे निधन 19.06.1997 साली झाले आहे. त्यांच्या नावावर 195R क्षेत्र होते. त्यांच्या निधनानंतर आम्ही 3 भाऊ, 2 बहिणी आणि आमची आई , असे 5 नावे 7/12 वर आहेत. आमच्या बहिणी समसमान हिस्सा मागत आहेत. मला अशी माहिती हवी आहे की, बहिणींना कायद्याने समान हिस्सा देणे बंधनकारक आहे का? कारण वडिल 1997 साली निधन झाल्याने कायद्यात काय तरतुद आहे
वडिलांचे निधन १९९७ साली झाले आहे . हिंदू वारसा कायदा मधील २००५ ची सुधारणा हि वाटपासाठीची आहे . वारसाने सर्वांची नावे लागलेली असणे आवश्यक , व प्रत्येकी १/५ हिस्सा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Bhagyashri
05-03-2020
kg94082@gmail.com

आम्ही जागा खरेदी केली पण 7/12 मध्ये आमचं नाव इतर हक्क तुकडेबंदी विरुद्ध व्यवहारात नोंद झाली आहे. आमची जागा 2 गुंठे इतकी आहे. कायदेशीर रित्या 7/12 मध्ये मालकी हक्कात नोंद होण्यासाठी काय करावे लागेल ?
जागा जर नगर पालिका , महानगर पालिका अथवा रहिवासी , औद्योगिक अथवा वाणिज्य वापर विभागात असेल तर , नवीन कायद्या दुरुस्ती नुसार , व्यवहार नियमानुकूल करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar
04-03-2020
sagarkandekar1990@gmail.com

प्रश्न - माझ्या आजोबांनी सन 1948 साली एकूण 94 गुंठे क्षेत्र असलेल्या गटापैकी उत्तरेकडील 47 गुंठे जमीन एका सखाराम नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती.उर्वरीत दक्षिणेकडील 47 गुंठे ही सखाराम नावे च होती. सन 1968 साली सखाराम मयत झाले आणि त्याच्या मुलगा माधव यांचे नाव सातबाराच्या मुळ कब्जेदार व दोन मुलीचे नाव इतर हक्कात वारस नोंदीने लागले.पण इतर हक्कात नोंद करताना तलाठी यांनी मुलीचा हक्क हा दक्षिणेकडील 47 गुंठे मध्ये आहे असा केला नाही. सन 1992 रोजी माझ्या काकांनी उर्वरित दक्षिणेकडील 47 गुंठे माधव कडून एकत्र कुटुंब असताना खरेदी केली म्हणजे आत्ता सर्वं 94 गुंठे चा गट काकांच्या च्या नावे झाला मात्र त्या मुलीचा सही किंवा हक्क सोड न केल्याने त्याचे नावे आजही सातबारा इतर हक्कात आहे. सन 2015 रोजी माझे काका व आम्हीं विभक्त झालो तेंव्हा ह्या गटात माझ्या वडिलांच्या हिस्सास उत्तरेकडील 47 गुंठे जमीनिवर आला आहे पण काकांना ते माहीत नाही आहे तर 1.आम्ही तहसीलदार यांना मजमस 1966 , कलम 155 ने दुरूस्ती अर्ज करू शकतो का? 2.आम्ही जर सातबारा स्वतंत्र करून मुलींचे नावे कमी करू शकतो का?
कलम १५५ खाली मुलीची नावे कमी करता येणार नाहीत
आपले काकांनी सखारामच्या मुलाकडून केवळ उर्वरित जमीन खरेदी केली आहे . त्या जमिनीत त्याच्या बहिणीचा १/३ प्रत्येकी हिस्सा होता . त्या मुले त्यांनी नोंदणीकृत दस्त द्वारे त्यांचा हक्क सोडला पाहिजे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Jamin sapatikaran boja v bulding boja kamikarnebabat mahiti

Question by kedar khadke
04-03-2020
kedarkhadke@gmail.com

क्रुपया खालिल जुने शासन निर्णय व परीपत्रकांच्या प्रति उप्लब्ध व्हाव्यात ही नम्र विनंति.

१.महसुल व वनविभाग निर्णय क्र. १०८९ प्र.क्र.९४ र -१ दि.१७-७-१९९१.

२.परिपत्रक क्र. आर.पी.ए.-१०९७/२७१७/सीआर-३१०/र- दि.९-१-१९९२.

३. शासन आदेश क्र. आर पीए-१०९०/सीआर-१६९०/आरआय दि. ८/६/१९९०.

आमचे आजोबा मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???

Question by narayan kadam
02-03-2020
gajanankadam585@gmail.com

नमस्कार,
गावठाणामध्ये घराच्या शेजारी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले,त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रारी अर्ज केला , सदर प्रकरण मा. गट विकास अधिकारी यांच्याकडे गेले , साहेबानी स्थळ भेट घेऊन तसेच ग्रामपंचायत, अतिक्रमण करणारे व आम्हाला कागदपत्रे घेऊन बोलावले व त्यावर सात दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले ग्रामपंचायतीने त्या आदेशानुसार संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले परंतु संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने अतिक्रमण काढले नाही यावर आम्ही पुन्हा गट विकास अधिकारी यांना अर्ज केला त्यावर त्यांनी पुन्हा ग्रामपंचायतीला अतिक्रमण करण्याबाबतचे आदेश दिले परंतु ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक यांच्याशी या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले समोरचा व्यक्ती अतिक्रमण काढत नाही त्यावर आम्ही काही करू शकत नाही जर ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले आदेश याची अंमलबजावणी करत नसेल तर यावरती कोणत्या ॲक्शन घेण्यात यावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र ग्राम पंचायत कायदा १९५८ च्या कलम ५३(२अ) अन्वये आपण मा जिल्हाधिकारी यांना अर्ज करा व अतिक्रमण दूर करण्याची विंनती करा .मा जिल्हाधिकारी तहसीलदार यांना अतिक्रमण दूर करण्या बाबत आदेशित करतील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kishor Rokade
28-02-2020
sagaradipune@gmail.com

219 हा सर्व्हे नंबर होता पुढे फाळणी होऊन 219/1 219/2 , असे सर्व्हे नंबर पडले 219/1 चे पुढे हिस्से होऊन 219/ 1अ , 219/1ब, 219/ 1क असे हिस्से पडले.
219/1ब चे पुन्हा 219/1ब/1 आणि 219/1ब/2 असे हिस्से पडले.
पुढे 1950 साळी 219/1 आणि 219/ 2 तलाठ्यांनी फेरफराने एकत्रित केले व 219/1+2 असा सर्व्हे नंबर पडला. त्यातील 219/1ब/2 + 219/1क आणि 219/2 अशा 6 एकर या जमिनीस माझे आजोबा कूळ होते व 219/1अ+219/1ब/1 अशा 3 एकर जमीन आमचा शेजारी कूळ होता. या सर्व जमिनी कुलकर्णी वतनाच्या जमिनी होत्या. 1955 साळी वतन दारणी कब्जे हक्काची रक्कम न भरल्याने सरकार अकरी पड अशी नोंद झाली. आमची कुल म्हणून नोंद तशीच होती पण 1966 अतिरिक्त मामलेदार यांनी फेरफराने सदर जमीन सरकार अकारी पड असल्या कारणाने 32 ग लागू नाही सबब इतर हक्कातील कुळाची नावे कमी केली. फेरफार हा संपूर्ण गावातील वतन जमिनी वरील सर्व्हे नंबर ला पडला होता.
त्यानंतर एकूण आकाराच्या 1.5 पट खंड भरून या जमिनी कसल्या जात होत्या.
1972 साळी सरकारच्या ठरावाला अनुसरून कलेक्टर यांनी संबंधित जमिनी वहिवाट दारांच्या नावे regrant करण्यास आदेशाने सांगितले. कब्जेहकाची रक्कम साऱ्यच्या 24 पट ठरली होती त्याची सर्व संबंधित कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. रक्कम भरेपर्यंत वहिवाट दरांचे नाव इतर हक्कात नोंद घ्यावे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
1975 साळी आमच्या shejaryane त्याच्या नावे असलेली रक्कम भरली व माझ्या आजोबांनी ती रक्कम 1978 साळी भरली.
शेजाऱ्यांची इतर ही वतन जमीन होती त्यामुळे त्यांनी सर्व रक्कम एकाच चलन द्वारे भरली.
त्यांच्या फेरफरचा अमल घेताना 219/1 अ + 219/1ब/1 या 3 एकराला तर दिलाच सोबत आमच्या वाहीवातीवर असलेल्या 219/1ब/2 + 219/1क या 4 एकर जमिनी ला पण दिला.
1945 पासून ते आत्ता पर्यंत ती जमीन आम्हीच कसत आहोत .1945 ते 1975 पर्यंत 7/12 ला तशा नोंदी आहेत. परंतु 1979 साळी शेजाऱ्यांच्या जमिनी जो फेरफार झाला त्यात त्यांचे आमच्या जमिनी ला नाव लागले. आजोबा अज्ञानी असल्याकारणाने regrant ची रक्कम भरून पण पुढील पाठपुरावा न केल्यामुळे जमिनीस आमचे नाव लागले नाही.
याचा गैरफायदा घेऊन शेजाऱ्यांनी त्यांच्या आत्त्यांचे हिस्से आमच्या जमिनीत कागदोपत्री काढून दिले व त्या नंतर दोघांनी मिळून एका त्रयस्थ वक्तीस त्यातील 70 गुंठे क्षेत्र विक्री केले केवळ चुकीच्या पद्धतीने आमच्या क्षेत्रास नाव लागले असल्याच्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन. आता सदर शेजारी आम्हाला आमचा ताबा असल्यामुळे धमकावत आहेत तुमचा या जमिनीशी संबंध नाही सरकारने आमच्या नावे जमीन केली आहे. त्यांनी पोलिस स्टेशन ला तक्रार केली आहे की आम्हीच घुसखोरी करून त्याची जमीन हडप करू पाहतोय वास्तविक परिस्थिती नेमकी या उलट आहे. आम्हाला तेहसिल दार आमच्या ओळखीचे आहेत सर्कल तलाठी सगळे आमच्या मर्जीतले आहे असं सांगून सतत धमकावल जातंय.
वास्तविक जी जमीन आमच्या कुल वहीवातीस होती तिला त्यांचं नाव लागण्याचा सबंध नव्हता.
मी त्यांचे regrant चे चलन पाहिले आहे 364Rs एवढी कब्जा हक्कची रक्कम भरली आहे.फेरफार नुसार ज्या जमिनी त्यांच्या नावे झाल्या त्याची 24 पट शेतसार्याची रक्कम 525 Rs होते.
आमच्या आजोबांनी भरलेली रक्कम ही 310Rs आहे व आमच्या वहीवतीस असलेल्या जमिनीच्या शेत्साऱ्याची 24 पट रक्कम पण 310Rs होत आहे.
आमच्या जमिनीचे पैसे भरण्याचा त्यांचा संबंध नव्हता व त्यांनी ते भरलेले देखील नाहीत.
आज शेजाऱ्यांच्या नावे त्याची 3 एकर तर आहेच सोबत आमच्या 4 एकर ल पण नाव आहे.
तरी मी शेजाऱ्यांनी त्रयस्थ व्यक्तीस विक्री केलेले फेरफार आव्हणीत केले आहेत.
त्यांनी आमच्या नावे पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलेली तक्रार तेहसील दरांकडे गेली आहे त्यांनी स्थळ पाहणी ची नोटीस बजावली आहे.
आमचे लगत चे सर्व खातेदार ती जमीन पूर्वी पासून आम्हीच कसत आहोत हे खरं सांगण्यास तयार आहेत.
याचा काही उपयोग होईल का?
शेजारीच नाव कसे कमी करता येईल आणि इतर संबधित मार्गदर्शन करावे.
प्रश्न खूप लांब झाला या बद्दल क्षमस्व.
आपले प्रश्नावरून आपण /आपले पूर्वज कुलकर्णी वेतन जमिनीस कुल होते . जमीन re grant झाल्यावर, आपण पैसे शासन जमा केले आहेत . ,मात्र आपले नाव जमिनीस लागले नाही . त्याचा फायदा शेजाऱ्याने घेतला व आपल्याला re grant झालेल्या जमिनीला त्याचे नांव लावून घेतले व तदनंतर जमिनीची विक्री केली आहे .
आपण शेजाऱ्याचे नाव मिळकतीस लागल्यावर , संबंधित फेरफार अहवाणीत केला का ? तसेच जमिनीची विक्री झाल्यावर , विक्री खात होई अहवाणीत करणे आवश्यक होते . विक्री खात हवनीत केले का ? तसेच जय या फेरफाराने त्रयस्थ व्यक्तीचे जमिनीस नाव लागले तो हो अहवाणीत करणे आवश्यक आहे . फेरफार विरद्ध प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा . तर विक्री दस्त न्यायायलायात अहवाणीत करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Suresh Patil
27-02-2020
03sureshpatil@gmail.com

आम्ही चार गटनंबरमधील तोंडी वाटपाप्रमाणे एका ठिकाणी असणारी 25.70 आर शेतजमीन सन 2019 मध्ये खरेदी घेतली आहे. सदर जमीन ज्या व्यक्तिकडून खरेदी घेतली त्यांच्या बाजूने कब्जेपटटीबाबत मा कोर्टाचे निकाल आहेत. (सन-2010 व 2016) मात्र सदर जमीन आम्ही खरेदी केल्यापासून लगतच्या एका सहहिस्सेदाराने त्याच्यावर कब्जा केला आहे. व तो कब्जा सोडणेस तयार नाही. त्याचे म्हणणे आहे की, या ठिकाणी 8 गुंठे जमीन तुमची आहे. राहिलेली जमीन इतर गटनंबरमध्ये आहे. येईल् तेथे घ्या. प्रत्यक्षात तो सहहिस्सेदार स्वत: मात्र त्यांचे मालकीच्या हिस्सेपेक्षा जास्त हिस्सा (आमच्यासहीत) एका ठिकाणी तोंडी वाटपाप्रमाणे कसत आहे. सदर चार गटनंबर मध्ये एकूण 9 हिस्सेदार आहेत. प्रत्येक हिस्सेदार स्वत:चा चार गटनंबरमधील हिस्सा एका ठिकाणी तोंडी वाटपाप्रमाणे कसत आहेत. मात्र आम्हास फक्त 8 गुंठेच शेतजमीन प्रत्यक्षात कसण्यास दिली आहे. पोलिस प्रशासन दिवाणी बाब म्हणून दुर्लक्ष केले आहे. कोर्टामध्ये पैसा व वेळ जाणार आहे. तरी लवकरात लवकर कब्जा मिळविण्यासाठी कृपया जवळचा मार्ग सांगावा.
दुसरा त्वरित उपाय देणारा मार्ग नाही . पोलीस यांनी सांगितल्या प्रमाणे हि दिवाणी बाब आहे .आपणास न्यायालयात दाद मागणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पाणबुडे सर

सर मला महाऑनलाईनचे सेतू सुविधा केंद्र हवे आहे त्यासाठी मी मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पाठपुरावा केलेला आहे परंतु मला असे सांगण्यात येते की, महाऑनलाईन चे सेतू मिळत नाहीत.
तरी मला सेतू मिळवण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती द्यावी. ही विनंती.
या बाबत शासनाने लोकसंख्येच्या प्रमाणात किती सेतू केंद्र असावेत याचे norms ठरवून दिले आहेत . त्या नुसार सेतू agency निश्चित करण्यात आलेल्या आहेत .
जिल्हास्तरावर mahaonline , यांचा नोडल अधिकारी आहे . त्याचेकडे पाठपुरावा करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Atul
26-02-2020
dhamdheredeshmukh@gmail.com

नमस्कार,
विषय:-कुळ कायदा
महोद्य,
आमचे आजोबा सन १९४५ आधीपासुन जमिन कसत होते जुण्या (१९४५ )पासुनच्या सातबार्यात 'कुळ व खंड' या सदरात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो
त्यानंतर सन १९६० साली MRT(Maharashtra revinue tribunal)न आमच्या आजोबांना कुळ म्हणून घोषीत केल
त्याच प्रमाणे Bombay highcourt न सुध्दा आमचे आजोबा कुळ आहेत अस सांगीतल
परंतु अनावधानान ईतर हक्क सदरात कुळाची नोंद घ्यावयाची राहून गेली पिक पहानी सदरात सन २०१५ पर्यत आमच्या वडिलांच्या नावाची नोंद होती परंतु डिजीटल सातबार्यात 'पिक पहानी' हा रकानाच नसल्याने ति नोंद आता सापडत नाहि
तरी१) ईतर हक्क सदरात आम्हास कुळाची नोंद घेता येईल का?
२)महत्वाचे, सन १९४५ आधीपासुन कसत असल्याकारणाण आम्हि 'संरक्षीत कुळात ' समावीष्ट होतो काय?
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती....।
MRT व उच्च न्यायालयाचे आदेश तहसीलदार यांना सादर करा . आपले नाव लागणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.46 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3