जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Subodh Yadre
14-02-2020
yadre86@gmail.com

महोदय,

मी सुबोध यद्रे, राजापूर, रत्नागिरी, माझ्या आजोबांचे वडिलोपार्जित जमीन आहे, त्यांना २ मुलगे आणि १ मुलगी हयात आहेत. आजोबांचा मृत्यू झाल्यानंर वारस तपासात माझ्या मोठया चुलत्याने ज्या जमिनी फक्त आजोबांच्या नावे होत्या त्यांच खाते वेगळे करून ते स्वतःच्या नावे केले आहे, आणि इतर सामायिक जमिनी आहेत त्याच्या सातबाऱ्यात सगळ्या भावंडांची नावे लावली आहेत, परंतु त्यांच्या नावे ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा सगळ्याच्याच आहेत तर या वर कायदेशीर काय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ज्या फेरफाराने आजोबांच्या जमिनी चुलत्याच्या नावे झाले आहेत तो फेरफार अहवाणीत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Subodh Yadre
14-02-2020
yadre86@gmail.com

महोदय,

मी सुबोध यद्रे, राजापूर, रत्नागिरी, माझ्या आजोबांचे वडिलोपार्जित घर आहे, आजोबांचा मृत्यू झाला आहे, त्यांना २ मुलगे आणि १ मुलगी हयात आहेत. त्याचप्रमाणे मोठा मुलगा म्हणून माझ्या मोठ्या चुलत्याचा नावावर ते घर झाले आहे, म्हणून आम्हाला ते माझ्या वडिलांच्याहि नावे करायचे आहे, म्हणजेच घरपट्टी मध्ये अ आणि ब करायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत मध्ये संमती पत्र मागितले आहे, परंतु चुलता ते द्यायला तयार होत नाही आहे ( सही करायला येत नाही आहे ). तर यावर कायदेशीर काही उपाय करता येईल का, याचे मला मार्गदर्श्न करावे हि विनंती.
माझ्या आत्याला घरात हिस्सा नको आहे तसेच सदर जमीन हि तिघांच्या नावर आहे.
आजोबांचे मृत्य नंतर केवळ आपल्या वडिलांचे भावाचे नाव दाखल करण्यात आले आहे . आपले वडील वारस असून हि त्यांचे नाव घराला लावले नाही . ग्राम सेवक यांनी चुलत्यांना नोटीस काढणे आवश्यक आहे . चुलते यांनी त्यावर जरी संमती दिली नाही तरी , ग्राम पंचायतीने , आपले वडील वारस असल्याचे पुरावे पाहून आपले वडिलांचे नाव दाखल करणे आवश्यक .
सदरची बाब गट विकास अधिकारी यांचे निदर्शनास आणून दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुशील
13-02-2020
sushilk22@gmail.com

नमस्कार सर माझे आजोबाचे ८ मुले होती व त्यांना दोन ठिकाणी जागा होत्या त्यांतील एक राहते घर व दुसरी संपूर्ण मोकळी जागा होती मोकळ्या जागेपैकी माझ्या आजोबांनी माझ्या वडिलाच्या नांवावर ग्रामपंचायत कार्यालयात त्यातील काही जागा नमुना न ८ ला करून दिली व त्यानुसार माझ्या वडिलांनी रीतसर बांधकाम परवाना काढून 30 वर्षापूर्वी घर बांधले आहे व आम्ही त्याची घर पट्टी भरत असून आमची मालकी आहे अडचण अशी आहे कि आता आजोबा नाहीत आणि pr कार्ड काढले असता त्यावर अजून आजोबांचे नाव आहे तर मी माझे तेवढे क्षेत्रापुरते pr कार्ड ला कश्या प्रकारे लावू शकतो आणि आता बाकीच्या काकांनी विरोध केला तर मी कोर्टात adverse possesion चा दावा कसा दाखल करू शकतो किंवा आणखी काही मार्ग असल्यास सुचवणे
दावा दाखल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रादेशिक योजना मंजूर असलेल्या नगरपंचायत क्षेत्रात 1.5 गुंठे क्षेत्राची खरेदी होवु शकते का ? तुकडेबंदी अधिनियम लागू शकतो का?
नवीन कायदा दुरुस्ती नुसार ज्या ठिकाणी प्रादेशिक योजना मंजूर व प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी तुकेबंदी कायदा लागू नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब मी भगवान तबाजी शिंदे माझी आव्हाट ता राजगुनगर खेड पुणे येथे माझी वडिलपार्जित जमीन आहे त्या मध्ये माझी महार वतनाची जमीन आहे त्या जागेवर आधीच केंद्र दवाखाना बांधला होता व आता त्या जागेच्या बाजूला आणखी वॉल कंपाउंड चा बांधकाम करत आहे पण मी व माझा वडीलनी असा कोणताच बक्षीस पात्र बनवून दिला नाही ग्रामपंचात मध्ये व ग्रामसेविका सोबत मी विचारणा केली असता कोणताही पत्र मिळालं नाही हि जमीन मला कशी परत मिळेल व योग्य मोबदला कसा मिळेल कृपया करून मार्गदर्शन करावे
सदरची जमीन आपले मालकीची आहे का ? जर आपल्याला जमीन ती वतन जमीन म्हणून दिलेली असेल तर , प्रथम ज्या विभागाने त्या जागेवर दवाखाना बांधला आहे त्यांना वकील मार्फत नोटीस द्या व जमीन वापराबाबत नुकसान भरपाई मागा . तीच प्रक्रिया हॉल ज्या विभागाने बांधला आहे त्या विभागास हि नोटीस द्या . संबंधित विभाग प्रमुख यांना भेटा
नोटीस ला जर काही प्रतिसाद मिळाला नाही तर आपणास न्यायालयात जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय साहेब
माझे नाव . मंगेश लक्ष्मण कुंडे आहे
माझ्या आजोबाच्या नावे ४० एकर जमीन होती पण सन (१९५९ ) ला माझ्या आजोबांचे निधन झाले.त्यांच्या निधनानतर माझ्या आजीचा नाव सात बारा मध्ये लागला आजीचा नाव सातबारा मध्ये एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून लागले होते कारण आमच्या परिवारामध्ये माझी आजीचं सर्वात मोठी होती. त्यामुळे तिचा सात बारा मध्ये नाव लागले होतेआजोबा नंतर आजीचा फेरफार झाला तेंव्हा ( हिस्सा न . ० ) असा होता . १९७२ मध्ये आमच्या जमिनी मध्ये (हिसा न. १ ) झाला आणि त्या जमिनी मध्ये आणखीन १५ नावे लागली आणि ती नावे माझ्या कुटुंबातील नसून गावातील आहेत आणि त्यांनी गट स्कीम मध्ये १९७२ साली नावे लावून घेतली आहेत.
माझ्या आजी मयत झाल्यानंतर तिच्या मुलांची नवे सातबारावर लागणे गरजेचे आहेत ती नावे सुद्धा लागली नाही आहेत आम्ही त्या लोकांना विचारले असता ते बोलले कि तुमची नावे नाही आहेत काही करायचे ते करा तुमच्या आजीचा नाव जमीन कसत नाही म्हणून कमी केले आमच्या फॅमिली मध्ये यांची नावे कशी लागली साहेब

१) एकत्र कुटुंब प्रमुख आजीचे नाव होते तेंव्हा (हिसा न. १ ) झाला तेंव्हा आजीच्या मुलांची नावे न लागत इतर १५ लोकांची नावे गट्स्कीम मध्ये कशी लागली ती आमच्या फॅमिली व्यतिरिक्त इतर लोकांची लागली आहेत त्या साठी काय करावे लागेल १९५६ चा उतारा काढला तेंव्हा फक्त माझ्या आजोबाचा आणि आजीचा सातबारा मध्ये नाव आहेत पण नंतर नवीन सातबारा मध्ये माझ्या कुटुंब मधील कुणाची नावे लागली नाहीत सर काय करावे लागेल
सर्वप्रथम इतर १५ लोकांची नावे गट्स्कीम मध्ये ज्या फेरफार नोंदी ने लागली त्यावर संबंधित मा. उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांचे कडे अपील दाखल करावी

Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार

Question by Mahesh Maske
12-02-2020
maheshmaske86@gmail.com

नमस्कार सर, विभागीय आयुक्त पुणे यांनी आदेश दिला त्या आदेशास अपिल कोणाकडे करावयाचे सल्ला द्या.
मा विभागीय आयुक्त यांनी कोणत्या कायद्याखाली आदेश दिला आहे त्या वर अवलंबून आहे . जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या खाली निर्णय दिला असेल तर अपील , शासनाकडे करावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir maharashtra nagri seva raja niyam 1981 madhil rajeche namune namuna 3,4,5 ya madhe kahi badal zale aahe kay

Question by विशाल
10-02-2020
rolexvishal@gmail.com

नमस्कार ,
माझे वडील २००५ साली मयत झाले त्यांचा परिवार पुढीलप्रमाणे २ पत्नी पहिल्या पत्नीला २ मुले .दुसऱ्या पत्नीला १ मुलगा मी .वडिलांनी त्यांच्या नावाची २.५ एकर जमीन माझ्या आईच्या नवे २००३ साली केली .७/१२ वर आईचे नाव आले.२००५ साली वडील मयत झाले त्यानंतर २.५ एकर सोडून बाकी जमिनीवर दोन्ही पत्नीचे व आम्हा ३ ची नावे अली .२०१६ माझ्या आईचा अकस्मात मृत्यू झाला व आईचे नाव २.५ एकर सोडून बाकी जमिनीवरून कमी झाले.आई च्या नावे जमीन जमीन अधिनियम ८५ प्रमाणे २००३ साली झाले होते .तयारी जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ? त्या २.५ एकर वर बाकी सावत्र भावांचे व सावत्र आई चे नावे लागतील का?ज्या जमिनीवर सगळ्यांची नावे आहेत त्या जमिनीची वाटणी कशी होणार ?जमीन वडिलोपार्जित आहे .
धन्यवाद
२.५ एकर जागा वडिलांची स्व कष्टार्जित होती का वडिलोपार्जित होती ? स्व कष्टार्जित असेल व नोंदणीकृत दस्ताने आपले आईचे नावे विक्री केली असेल तर या मिळकतील आपल्या सावत्र आई चे व सावत्र भावाचे नाव लागणार नाही .मात्र जर जमीन वडिलो पार्जित असेल तर , वडिलांना सर्व २.५ एकर जागा विकण्याचा अथवा आपले आईचे नावे करण्याचा कोणताही अधिकार नाही . वडिलोपार्जित मिळकतीत त्यांचा जेवढा हिस्सा असेल तेवढाच विकण्याचा हक्क आहे होता ,. म्हणजे वडील यांचे शिवाय त्या मिळकतीत आपले दोन सावत्र भाऊ . आपण व वडील यांचा प्रत्येकी १/४ हिस्सा होता . वडील केवळ तेवढाच हिस्सा ( १/४) आपले आई चे नावे करू शकले असते .
दुसऱ्या मिळकतीवर आपले नाव आहे मात्र आईचे नाव कमी झाले आहे . हिंदू विवाह कायद्यानुसार , दुसऱ्या पत्नीला पतीच्या मिळकती मध्ये कोणताही हक्क नसतो . मात्र दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यास मालकी हक्क प्राप्त होतो . त्या मुले आपले नाव अगोदरच लागले आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by विशाल
10-02-2020
rolexvishal@gmail.com

नासिक मध्ये आई च्या नावे फ्लॅट आहे (नासिक रोड )परंतु माझ्याकडे ओरिजिनल कागतपत्र नाहीत तसेच सोसायटी चे कागतपत्र नाही तरी डुप्लिकेट खरेदी खात व इतर कागतपत्र मला कसे व कुठे मिळतील?
आदरणीय सर,सन १९५६ मध्ये एका डोंगराचे रजिस्टर खरेदीखत करून घेतले होते.व त्यात ताब्याबाबत न्यायालयात दावा दाखल करून ताबा घ्यावा.असे नमूद करण्यात आले होते.परंतु ७/१२ सदरी खरेदी घेणाऱ्याचे नाव दाखल झाले.त्यानंतर न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर दावा फेटाळण्यात आला.अशा वेळी इतर हक्कात जे सर्वसाधारण कुळ होते त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ७/१२ च्या कब्जेदार सदरी एकतर्फी आदेशाने नावे ७/१२ च्या कब्जेदार सदरी लावून घेतली.वास्तविक डोंगरावर कोणाचीच वहिवाट नव्हती.अशा वेळी सदरचे बिनकब्जाचे खरेदीखत उपयोगी आहे किंवा नाही?कारण सदर डोंगर आता भूसंपादनात जाणार आहे.खरेदीखताच्या आधारे मोबदला मिळू शकेल?किंवा कसे?कारण आज रोजी ७/१२ सदरील नावास कंस झाला आहे.कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....
१९५६ साली डोंगर खरेदी करण्यात आला होता त्या वेळी डोंगर कोणाचे मालकीचा होता ? जर सरकारी मालकी असेल तर काहीही उपयोग होणार नाही .
१९५६ साली डोंगर जागेबाबत न्यायालयात वाद चालू होता का ?
आपण ज्यावेळेस प्राथमिक भू संपादन ( Preliminary Notification/notice ) सूचना प्राप्त होईल त्यावेळेस आपण आपली हरकत नोंदवा . जेणेकरून नुकसान भरपाई वाटप या वेळेस संबंधित भू संपादन अधिकारी आपली हरकत विचारात घेतील व आपण डोंगराचे मालक असाल तर , आपणास नुकसान भरपाई देतील .
नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपणास आपली मालकी सिद्ध करावी लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या आई-वडिलांनी 2010 साली जमीन खरेदी केली,परंतु जुन्या मालकाचे नाव इतर अधिकारात होते.याबाबतच्या फेरफारात 'एकत्रीकरण कायद्याविरुद्ध व्यवहार सबब रद्द खरेदी घेणार्यांची नावे इतर हक्कात नोंदवा दि. ०८/०८/९७' अशी नोंद आहे.सदर जमीन ही रहिवासी झोन मधील असून सुद्धा असा शेरा आला.त्यामुळे आमचे ७/१२ मध्ये नोंद करण्याआधी जुन्या मालकाचे नाव काब्जेदर मध्ये येन्यासाठी कुणाला अर्ज करावा त्याची काय प्रक्रिया आहे सविस्तर मार्गदर्शन करावे.
सर, आमच्या भोगवटादार वर्ग 2 जमिनीवर वडिलांच्या आत्यांची नावे मागील 20 वर्षांपासून आहेत. आत्याचा मृत्यू होऊन 15-20 वर्ष झालेली आहेत. आम्हाला उताऱ्यावरील नावे काढून टाकायची आहेत. आत्याची मुलेही त्यासाठी तयार आहेत. आम्हाला त्यांच्याकडून हक्कसोड पत्र करता येईल का ? त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया कशी आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
सर, आत्या 15 -20 वर्षांपूर्वी मरण पावल्या आहेत. त्यांच्या मुलांकडून हक्कसोड पत्र करता येईल का? नावे मागील 20 वर्षांपासून उताऱ्यावर आहेत. जमिन वर्ग 2 ची आहे कुळकायद्य्याने मिळालेली. त्यासाठी कशी प्रोसिजर आहे.कृपया माहिती द्यावी.
सर सर्वे नंबर वरुण रस्ता मिळवा यासाठी आम्ही वकिला मार्फत तशीलदारा कडे केस दाखल केली असून केस चालू आसताना त्या सर्वे नंबर वरील इसमाने तो रस्ता बंद केला आहे ( रसत्या मध्ये चर मारली आहे ) तर त्या इसमावर कायदेशीर कारवाई कोणती करावी

Question by NILESH GAVIT
08-02-2020
nileshg592@gmail.com

सर मी निलेश गावित मी आदिवासी समाजातील आहे.आमची वडिलोपार्जित जमीन आहे .पण आमचा वाट्याला आलेली नाही .
एम.गावित यांना ६ मुले होते .त्यातील सर्वांकडे जमीन आहे मात्र क्रमांक ३ चा मुलाला जमीन दिली नाही .मी क्रमांक ३ च्या ४ थी पिढीचा वारसदार आहे .याआधी पणजोबा.आजोबा .यांनी जमीन मिळवण्या साठी प्रयत्न केला पण .त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने प्रकरण दाबले व पंजोबाला मारझोड करून गावातून पळवून लावले काही कालावधीने मृत्यू झाला ,या भीतीने आजोबाने हि बाजूचे गावात वास्तव्यास गेले,व आजोबा काही वर्षांनी मृत पावले ,१९८० साली माझ्या पापांनी जमीन मिळविन्या साठी तहसील कार्यालयात अर्ज केला पण पैशांचा जोरावर प्रकरण दाबले गेले.त्या प्रकरण नंतर पप्पांना समजोता करून आमची जमीन ज्याचा कडे आहे त्यांनी जमीन देण्याची हमी दिली,पण त्या आधीच आजोबा वारले , त्यावेळी पप्पा १०वी ला होते वयाने लहान पडले व त्यांनी पापांना जमीन दिली नाही.ते पैशांचे जोरावर प्रकरण दाबून देतात.माझी जमीन वरिल क्रमांक २ वारसा कडे आहे .मि ४ थ्या पिढीचा वारसदार आहे.मला आता ती जमीन मिळवायचीय .काय कायद्याने ती जमीन आताहि मी मिळवू शकतो का? मला ४०/४५ वर्षांचा जुना रेकॉर्ड भेटू शकते का ? मी आजही त्या पिढीचा वारसदार आहे का सर ? मला ती जमि मिळवण्या साठी काय करावे लागेल माहिती मार्गदर्शन करावे

Question by Balu
08-02-2020
baluthorat@gmail.com

एकत्रित कुटुंबाची जमिन फाळणी बाराने मूळ खातेदारास २ मुले वारस असतानि एक मयत आहे त्याची नोंद नाही आणि फाळणी बाराने एका मुलाच्या नावे १६ एकर व मयत मुलाच्या मुल्घ्याच्या नावे ४ एकर लागली आहे आणि ३ सर्वे नंबर ला ८ आणे हिस्सा दाखवत आहे तर चुकीच्या फाळणी बाराची दुरुस्ती कशी करायची ? ( मूळ खातेदाराची वारस नोंद फेरफार दाखवत नाही )
सर नमस्कार ,
सर माझ्या आजोबांनी कुळ कायद्यात जमीन कसून मिळवली होती , आजोबांचा म्रुत्यु सन 1981 साली झाला , त्या नंतर वारस म्हणून 3 मुळे व 1 मुलगी म्हणून नोंद झाली ,
जमीन ही आत्याच्या , काकांच्या व वडिलांच्या नांवे होती , कुळ कायदा हा शेरा कमी झाला नव्हता ,
एका खरेदी दाराला ती जमीन पाहिजे होती म्हणून त्या खरेदी दाराने , वरील वारसांना घेऊन ती जमीन विकत घेतली , वरील वारसाची मुळे ही 18 वर्ष पूर्ण होती ,
खरेदी दाराला ती मुळे जमीन विकत नव्हती म्हणून त्यांने त्याच्या वडिलांन कडून जमीन विकत घेतली , वडिलोपार्जित जमीन होती वारस हक्का प्रमाणे नातवानांची सहमती घेतली नाही , नातवंडाचे नुकसान झाले आहे ,
काय करावे , सर सांगा , व वडिलांनी जमीन विकल्या मुळे वडिलांचे काही दुखापत होऊ शकेल काय ,
माहिती द्या सर , भरपूर उपकार होतील आपले , आजोबांच्या नातवंडान वर व त्यांच्या लहान लहान मुलानं वर , माहिती द्या सर काय करू ,
आजोबा या मिळकतीचे कुल होते . आजोबांचे पश्श्चत आपल्या वडिलांसह दोन काका ( चुलते ) व आत्याचे नाव मिळकतील लागले . वडिलांनी ती जमीन त्रयस्थ व्यक्तीस , वरील वारस यांचे वारस यांची संमती न घेता विकली त्या मुले आपले नुकसान झाले असा आपला प्रश्न आहे .
नातवंडांची संमती घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलांच्या आजोबांनी 1948 साली शेत जमीन खरेदी केली होती शेत जमीन खरेदीची नोंद 1948 साली आढळून आली आहे.परंतु सदर नोंदीत " 1000 रुपये देऊन 1जानेवारी 1948 रोजी तोंडी खरेदीने दिले" असे आढळून येते.1948 पासून ते आज पावेतो सर्व 7/12 उतारा आमच्याच नावे आहेत.तरी आता खरेदी केलेल्या वंशजा कडून बिलम्ब माफी तसेच जमिनीचा ताबा मिळणे बाबत तक्रार प्राप्त आहे.तरी आदरणीय महोदय कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
सर माझी संस्था ही 1994 पासून काम करत असुन आमचे आश्रम शाळा ही 1999 पासून अनुदानित असून सरकारी जमीन ई क्लास जमीन इमारत बांधकाम केलेले आहे मी रीतसर जमीन मागणीचा प्रस्ताव शासनाकडे 2007 पासून पाठपुरावा करत आहे सर्वे documents सुद्धा जमा केले परंतु महसूल विभागाच्या शासन निर्णय बदलले पण प्रस्ताव मंजूर झाला नाही तरी आता महसूल विभाग मध्ये भाडेपट्टा किंवा कबजेहक्का नुसार संस्था साठी जमीन मिळू शकते का आणि कोणत्या शासन निर्णयानुसार मला कार्यवाही करावी लागेल ते सांगाल ही विनंती धन्यवाद
सर मी शेखर गोखले राजापूर तालुक्यातील प्रिंदावन गावी राहतो आमच्या सातबाऱ्यावर एकूण 42 नवे आहेत जमिनीचा ताबा आमच्या कडे आहे तसेच जमिनीचे उत्पन्न आम्हीच घेतो परंतु सातबाऱ्यावर आमच्या व्यतिरिक्त बाकीची नावे आहेत त्यामुळे जमिनीचा मालक मी असूनही बाकीच्या नावामुळे सातबाऱ्यावर पिकाची नोंद नाही आणि बँकेकडून कर्ज मिळत नाही तर काय करावे. ती नावे कशी कमी करता येईल/ सातबारा कसा वाटला जाऊ शकतो

Question by CHANDRAKANT KHUTADE
03-02-2020
khutodec@gmail.com

नमस्कार सर,
माझ्या आजोबांनी 1953 वा त्या अगोदर एक जमीन शेतसारा भरून मिळवली होती. त्यावेळी त्यांना मूल नसल्याने त्यांनी 7/12 ला वारस म्हणून चुळत्याच्या मुलाचे नाव लावले होते पण 1957 ला चुलता वारल्याने त्यांच्या बायकोने व मुलाने गाव कायमस्वरूपी सोडलं. त्या नंतर आजोबांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्य झाली. आमच्या आजोबांचा मृत्यू 2011 साळी झाला त्यानंतर वारस हक्काने 7/12 ला आजी, बाबा आणि आत्या चे नाव लागले आहे तसेच 7/12 ला आजोबांच्या चुलत भावाचे नाव शुध्दा आहे. 1957 ते 2019 पर्यंत आजोबांचा चुलत भाऊ कधी गावाकडे आलाच नाही पण आज घडीला आजोबांच्या चुलत्याच्या मुलाचे वारस येवून आमच्या जमिनीतून अर्धा वाटा मागत आहेत. जी जमीन गेले 50-52 वर्ष आमचे आजोबा व बाबा कसत आले आहेत त्यांनी त्याचे पूर्ण आयुष्य या जमिनीमध्ये घालवले आहे. आज त्या जमिनीचा हिस्सा मागताहेत.

1) कायदेशीर रित्या हे योग्य आहे का?
2) जर कायदेशीर योग्य असेल तर आम्हाला त्याच्या विरोधात काही कारवाई करता येवू शकते का?
3) आणि जर योग्य नसेल तर त्यांचे नाव 7/12 वरून कमी करू शकतो का?
कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे.
१) आमच्या वडिलांच्या नावे 7/12 सदरी 20 गुंठे जमीन असून ते सन 2011 साली मृत्यू पावले, त्यांना वारस म्हणून आम्ही त्यांची 3 मुले होतो, पैकी आमचा मोठा भाऊ सन 2006 साली मृत्यू पावला आहे, आम्ही अजून वारस नोंद केली नसून जमीन वडिलांच्या नावावरच आहे, आता सदर जमीनवर आम्हा 2 भाऊ आणि आमच्या मयत भावाच्या पत्नीस वारस नोंद घेणे आहे, त्या करीता अर्ज कोणाला करावा, काय कागदपत्रे जोडावीत याकरिता मार्गदर्शन करावे.
2) तसेच सदर जमिनीचे 3 समान हिस्स्यात वापटही करणे आहे, सबब 7/12, 8-अ आणि फेरफार नोंद घेणे आवश्यक आहे, याबाबतही मार्गदर्शन करणे ही विनंती.
तलाठी यांचेकडे अर्ज करा . त्या सोबत आपल्या सर्व वारसांचे प्रतिज्ञा पत्र सादर करा .जो भाऊ नयेत आहे त्याच्या पत्नीसह त्याच्या मुलांचीही नावे , ( १/३ हिस्सासाठी) लावणे आवश्यक आहे
तिघांची नावे लागल्या नंतर , जमीन वाटपासाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांनी सन 1998 साली गावातील सी.स.नं. ६८५ आणि ६८६ वरील मिळकत (दगड मातीचे घर) नोंदणीकृत खरेदी खताने एका एसमाकडून विकत घेतली होती. ग्रामपंचायतीत माझ्या वडिलांच्या नावाची नोंद असून आज रोजी पर्यंत घरपट्टी, पांणीपट्टी, दिवाबत्ती आकारणी पावती माझ्या वडिलांच्या नावे दिली जात आहे. कालांतराने उक्त मिळकतीच्या गाव नमुना ७/१२, ८-अ आणि मिळकत पत्रिकेवर माझे वडिलांच्या नावाची नोंद नसल्याचे माझे लक्षात आल्याने वडिलांच्या नावाची नोंद होणेकरिता वडिलांच्या स्वाक्षरीसह अर्ज/कागदपत्रे मा. जिल्हाधिकारी, सांगली यांना सन २०१६ साली सादर केला. अर्जानुसार उप अधीक्षक, भूमी अभिलेख, पलूस यांनी सदरहू मिळकतीवर १९७७ च्या नॊंदीने धारक सदरी बिगर परवाना बिनशेती अशी नोंद असून खरेदी देणार यांचे नाव धारक सदरी दाखल नसल्याने अर्जानुसार नोंद करता येत नाही, जरूर तर सदर मिळकती बिनशेती करून घेऊन बिनशेती आदेश आणि मंजूर रेखांकन सादर केल्यास नोंदीची पुढील कार्यवाही करता येईल, असे कळवले आहे. त्याच प्रमाणे तलाठी साहेब यांच्याकडे कलम 149 नुसार अर्ज केला असता, दस्तात सी.स.नं. नोंद असून खरेदी देणार यांचा 7/12 चा गट नंबर नमूद नसल्याने माझे वडीलांचे नाव 7/12 सदरी दाखल करता येत नाही. भविष्यात मालकी हक्कांबाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून योग्य मार्गदर्शन करावे
सिटी सर्वे होताना , ज्याचे कडून जमीन खरेदी केली त्याचे नाव लागले नव्हते का ? प्रथम मिळकत पत्रीकेस ज्याच्याकडून आपण जमीन खरेदी केली त्यांचजे नाव लागणे आवश्यक आहे . त्यासाठी आपण अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा . त्या सोबत जयचेकडून जमीन खरेदी केली त्याचे हि मालकी कागद पत्र ( ग्राम पंचायत अभिलेख ) जोडा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर
आमचे जागेला पश्चिमेकडील बाजुला लागुन सार्वजनिक रस्ता आहे, नविन घर बांधताना पश्चिमेकडील रस्त्यालगतची २ फूट रुंद ६० फूट लांब जागा सोडून घर बांधले आहे, नविन रस्ता करताना ह्या जागेतूनही रस्ता तयार केला आहे जर आम्हाला भविष्यात या जागेवरून संरक्षक भिंत बांधायची असेल तर काही सरकारी अडथळा येऊ शकतो का?
आपली जागा ज्या नियोजन योजनेत सामाविस्ट आहे त्या नियोजन योजनेचे बांधकाम नियंत्रण नियमावली लागू होईल . त्या नियंत्रण नियमावलीनुसार किती अंतर रस्त्या पासून बांधकाम करताना सोडावे लागेल हे तपासावे . जर त्या अंतरात बांधकाम येत असेल तर , निश्चित आपण बांधकाम करू शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3