जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

साहेब,आमची वडिलोपार्जित 2.78 आर शेतजमीन परभणी येथे आहे.सद्या सातबाऱ्यावर आम्ही पाच भावंडे आणि दोन आत्या ( एक मयत) आहे.तर माझ्या बहिणीचे आणि आत्यचे नावे एकाच हाक्कसोड पत्रावर करून नावे कमी करता येतील का?
सर आम्ही 15 वर्षी पूर्व एका इसमास माजी शेतजमीन विकली असून सदर इसमा कडून तलाटया कडे खरेदी खत नोंद ( फेरफार नोद ) केली गेली नाही तरी त्या इसमास काही कारणास्तव आम्हास ती जमीन त्याला द्याची नाही ( खरेदी खत केनसल ) कारन्या साठी काय करावे लागेल
सागर राव
जमीन तुम्ही नोंदणीकृत दस्ताने विकली असल्यास , आता आपण काहीही करू शकत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्हाला दिवाणी कोर्टाचे आदेश नुसार मा तहसीलदार यांनी ८५ /२ नुसार सरस निरास वाटणीचा आदेश दिला त्यावर विरोधी पक्षाने मा आयुक्त यांचे कडे अपील दाखल केले आहे.मा आयुक्त यांचे कडे सदर अपील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे त्यावर निकाल दिलेला नाही
१ मा आयुक्त याचे कडे लवकर आदेश मिळावा यासाठी काय करावे
२ मा आयुक्त यांनी आदेश दिल्यानंतर ७/१२ ला आमचे नावे येण्यासाठी पुढे काय काय प्रक्रिया करावी लागेल
कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे हि विनंती
सर आमची जमीन 2 वेगवेळया गटा मध्ये आहे गट 54 आणि गट 55 आम्हाला ती जमीन एका गटात करता येईल का

Question by Vishal
27-01-2020
Wishallmadhawai111@gmail.com

महसूल व वन विभागाचे शासन परिपञक क्र 05/2006/ पीके/43/जे-1 दिनांक 31 /11/2006
नमस्कार सर, मला महसूल अधिकारी असलेले तलाठी व मंडळ अधिकारी यांचे विरुद्ध फॉऊंजदारी तक्रार दाखल करावयाची आहे.त्याकरिता पूर्व परवानगी (संकशन)घ्यावी लागेल का? तसे असेल तर नेमक्या कोणत्या अधिकारी ची घ्यावी लागेल?

Question by bhanudas
25-01-2020
waghb999@gmail.com

सर,
एका गुठंयाचे जर रजिस्टार ऑफिस मध्ये खरेदी खत केले असेल पण तलाठी फेरफार करण्याकरिता नकार देऊ शकतो का ? दिल्यास काय करावे त्याच्या म्हणण्यानुसार आम्हाला तहसीलदार साहेबांचा तसा तोंडी आदेश आहे कि गुंठेवारीचे फेरफार करायचे नाही. तलाठी फेरफार चा अर्ज घेण्यास देखील नकार देऊ शकता का दिल्यास काय करावे तलाठी साहेबांना फेरफार करीत नसाल तर तसे लेखी द्या. असे मागता येते का? फेरफार होत नसेल तर मग खरेदीखत कसे काय होते याविषयी सविस्तर माहिती द्यावी
सर मी मागासवर्गीय असुन माझ्या आजोबांना व आणखी दोन व्यक्तिंना १९६० साली सरकारकडुन जमीन वाटप झाली.आजोबा,आजोबांचा पुतण्या व सोनार समाजाचा एक व्यक्ती या तीघांना जमीन भेटलि .तेव्हापासुन आजपर्यंत आम्ही जमीन करत आहोत,परंतु सोनार ही जमीन पूर्वीपासुन करत नव्हता ,ती जमीन आजोबांच्या ज्या पुतण्याला ही जमीन भेटली होती त्यांचा भाऊ करत होता व त्यांच्या मुलाने सोनाराची जमीन ०९/०५/२००५ रोजी खरेदी केली,परंतु ह्या जमीनीवर जो नवीन शर्त शेरा होता तो तहसिलदार यांनी तो शेरा कमी करण्याचा आदेश केला,महाराष्ट्र शासना म्हणन्यानुसार या व्यवहारास मा. जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक होती व ५०% नजराना न भरता व्यवहार झाल्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर आहे.त्यामुळे संपुर्ण गट(३१ जुना,पोट हिश्शे - ३१/१ खरेदी झालेला व ३१/२ आजोबा व त्यांचा पुतण्या यांचा)
सरकार जमा झाल्याची नोटीस आम्हा सर्वांना आलेली आहे,सोनाराचे असे म्हणने आहे की खरेदी केलेल्या व्यक्तीने त्यांच्या वडीलांची फसवणुक केली आहे.
सर गुन्हा ३१/१ ने केलाय परंतु सजा ३१/२ ला पण का होतीये, खरेदीखत तर सरकारी अधिकार्यानेच केलिय ना मग सरकार अस कुनावर पण अज्ञाय का करत आहे,आम्ही आम्हाला भेटलेली जमीन कसतोय आम्ही तीथे रहातोय,
प्लिज सर लवकरात लवकर मार्गदर्शन करावे ,
आम्हाला२३/०१/२०२० पासुन १५ दिवसाची मुदत देन्यात आलेली आहे.
धन्यवाद

Question by bhanudas
25-01-2020
waghb999@gmail.com

सर,
रजिस्टार ऑफिस मध्ये खरेदीखत केल्यानंतर आपण जर फेरफार करण्याकरिता तलाठ्यांकडे फेरफार करण्याकरिता अर्ज व खरेदीखता चे झेरॉक्स पेपर चे दोन सेट करुन दिले व त्यातील एका सेट वर पोच म्हणून सही व शिक्का देण्यास तलाठ्यांनी नकार दिल्यास काय करावे

Question by bhanudas
25-01-2020
waghb999@gmail.com

सर,एक विहीर असलेला 6 गुठें चा गट आहे त्यात माझ्या नावावर एक गुठा जमीन आहे. पण त्यात माझ्या वडीलांच्या नावात सुरुवाती पासून चुक झालेली आहे माझ्या वडीलांचे नाव बाबुराव आहे पण त्यात बापुराव झालेले आहे तो गट विहीरीचा असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले नावात दुरुस्ती करण्याकरिता काय करावे

Question by सागर
21-01-2020
sagarkandekar1990@gmail.com

प्रश्न - माझ्या आजोबांनी सन 1948 साली एकूण 94 गुंठे क्षेत्र असलेल्या गटापैकी उत्तरेकडील 47 गुंठे जमीन एका सखाराम नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती.उर्वरीत दक्षिणेकडील 47 गुंठे ही सखाराम नावे च होती. सन 1968 साली सखाराम मयत झाले आणि त्याच्या मुलगा माधव यांचे नाव सातबाराच्या मुळ कब्जेदार व दोन मुलीचे नाव इतर हक्कात वारस नोंदीने लागले.पण इतर हक्कात नोंद करताना तलाठी यांनी मुलीचा हक्क हा दक्षिणेकडील 47 गुंठे मध्ये आहे असा केला नाही. सन 1992 रोजी माझ्या काकांनी उर्वरित दक्षिणेकडील 47 गुंठे माधव कडून एकत्र कुटुंब असताना खरेदी केली म्हणजे आत्ता सर्वं 94 गुंठे चा गट काकांच्या च्या नावे झाला मात्र त्या मुलीचा सही किंवा हक्क सोड न केल्याने त्याचे नावे आजही सातबारा इतर हक्कात आहे. सन 2015 रोजी माझे काका व आम्हीं विभक्त झालो तेंव्हा ह्या गटात माझ्या वडिलांच्या हिस्सास उत्तरेकडील 47 गुंठे जमीनिवर आला आहे पण काकांना ते माहीत नाही आहे तर
1.आम्ही तहसीलदार यांना मजमस 1966 , कलम 155 ने दुरूस्ती अर्ज करू शकतो का?
2.आम्ही जर सातबारा स्वतंत्र करून मुलींचे नावे कमी करू शकतो का?
नमस्कार सर जमिनीचा गट नंबर सतरा व 18 आहे दोन्ही गटाचे नकाशे विपरीत आहे माझा गट नंबर 17 आहे जमीन मोजणी करून नकाशा दुरुस्त करता येईल का कृपया मार्गदर्शन मिळावे
आमची वडिलोपार्जित शेती आहे सिंधुदुर्ग मध्ये . त्यात ७/१२ मध्ये ५ नावे आहेत , जुईली घाडी (आजी),राम घाडी (वडील),सानिका घाडी(आत्या),सविता घाडी(आत्या)शोभा शेडगे(आत्या) ,अशी नावे आहेत ,
१]मला माझे नाव ७/१२ दाखल करायचे आहे.
२] आज्जी चे नावे बक्षीस पत्र किंवा मृत्यपत्र केला तर चालेल का ३] २ अविवाहित आत्याचे सर्व काही मीच करणार आहे .तर त्याचे पण मृत्यूपत्र केले तर चालेल का
४] लग्न झालेली आत्या शोभा शेडगे त्याचे मुले हक्क सोड पत्र आणि मोबदला घेण्यास नकार देत्यात आज्जी आणि २ आत्या वारल्यावर बघू
५] आज्जी वय ८७ आणि २ आत्याचे वय ६० आणि ६५ आहे . आजारपण मुळे माझा खूप पैसे खर्च होतोय ,उद्या आज्जी वारल्यावर शोभा शेडगे(आत्या) विवाहित आत्या ची मुले मला त्रास देतील
६] आज्जी आणि दोन आत्या वारल्यावर फक्त ७/१२ मध्ये दोन हिस्से होईल १ माज्या वडिलांचा आणि शोभा शेडगे(आत्या) विवाहित चा .
७] मी आज्जी आणि २ आत्या अविवाहित ची संपून जवाबदारी घेतली आहे.७/१२ मध्ये शोभा शेडगे(आत्या) ला उद्या फक्त तिचाच हिंसा भेटेल या साठी काय करावे
साहेब
आमच्या ७/१२ वरती ३ आणेवारी आहेत ,त्यामध्ये आमच्या चुलतिची आणेवारी आहे ,अज्ञान चुलतील फसवून तिच्या भावाच्या मुलाने रजिस्टार मृत्यूपत्र तयार केले आहे ,चुलती मयत झाली आहे ,मृत्यू पत्र बोगस आहे ,साक्षीदार खोटे आहेत ,आम्ही तलाठी ,मंडलाधिकारी ,प्रांत ,ऍड कलेक्टर ,अप्पर आयुक्त ,मंत्रालय ,इथेपर्यन्त अपील करत गेलो आहे पण मृत्यूपत्राचा निकाल त्याच्या बाजूने लागला आहे ,सर्व अधिकारी यांनी मंडळ अधिकारी यांचा निकाल कायम करण्यात यावा असा आदेश दिला आहे ,मृत्यूपत्र बोगस आहे ,आम्ही दिवाणी नायालयात सुद्धा दावा दाखल केला आहे ,त्याची तारखा चालू आहेत ,अजून त्याचे नाव ७/१२ ला लागले नाही ,आत्ता त्याचे नाव लागणार का ,जमीन सामाईक आहे वाटप झाले नाही ,७/१२ नाव न लागण्यासाठी काय करावे लागेल ,व लागले तर आम्ही पुढील प्रोसेस काय करू ,आता पुढील स्टेप काय घ्यावी काय करावे हे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती विनंती
नमस्कार सर ७/१२ च्या इतर अधिकारात लीज पेंडन्सी ची नोंद तलाठी यांनी टाकली आहे परंतु त्यानंतर दिनांक २१/०९/२०१७ च्या महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार सादर नोंदी इत्तर अधिकारात घेण्यास मनाई केली आहे सदर नोंद तलाठी यांनी टाकल्यानंतर जी आर पडला आहे मंडळ अधिकारी यांनी ती नोंद अद्याप मजूर केलेली नाही तरी तलाठी यांनी टाकलेली नोंद कशी रद्द करता येईल
भगवान तबाजी शिंदे
माझी वडिलोपार्जित इनाम व वतनाची जमीन आहे भोगवटादार वर्ग २ आहे पण त्या जागेवर शासना कडून केंद्राचा दवाखाना बांधला आहे आमच कोणताही बक्षीसपत्र न बनवत व आमची परवानगी नसताना सुद्धा तर ती जमीन कशी परत मिळवता येईल व काही मोबद्दल कसा मिळवत येईल तहसीलदारांना व सरपंच याना पत्र देऊन काम थांबवणाची विनंती केली पण काम काही थांबला नाही काही मार्ग सांगा
नमस्कार साहेब, माझा प्रश्न असा आहे की
1) 2001 साली ग्रामपंचायत हद्दीत 3 गुंठे शेतजमिन खरेदी केली होती.नंतर मी 3 गुंठे क्षेत्र तात्पुरते बिनशेती केले करून घेतले पण 7/12 वर अजून बिनशेती नोंद नाही. सध्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आहे.विकास आराखडा अजून झाला नाही. मला 3 गुंठे क्षेत्र नव्याने निवासी बिनशेती करावयाचे आहे.बिनशेती करण्यासाठी काय करावे लागेल ?
2) तुकडेबंदी कायद्याची बाधा येईल का ? दंड भरून नियमित होईल का ?
मी राज्य महामार्गाशेजारी बांधकाम करताना मी नियमानुसार रस्त्याच्या मध्यरेषेपासूनचे अंतर + service road ची जागा सोडून बांधकाम केले आहे. रस्त्याच्या पलीकडील शेतकऱ्याचा शेतजमिनीचा त्रिकोणी भाग हा आमच्या प्लॉट समोर आला आहे. संबंधित शेतकऱ्यांने तो जमिनीचा त्रिकोणी भाग गुंठेवारीने विकला असून विकत घेणाऱ्यांने तेथे चहाच्या टपऱ्या, पानाच्या टपऱ्या टाकल्या आहेत. ही सर्व बांधकाम राज्य महामार्गाच्या लगत मध्य रेषेपासून 45 फुटावर आहेत. शिवाय कुठलाही service road त्यांनी सोडलेल नाही व माझा संपुर्ण दर्शनी भागावर अतिक्रमण केले आहे.या संदर्भात मी गेल्या 3/4 वर्षापासून उप- अभियंता, कार्यकारी अभियंता pwd यांच्याशी अर्ज फाटे करतोय मात्र प्रतिसाद भेटत नाही. काय करावे हे समजेना कृपया मार्गदर्शन करावे.

Question by pratik raut
16-01-2020
pratikraut222@gmail.com

आमची शेतजमीन नॅशनल HIGHWAY साठी २०१९ मध्ये संपादित करण्यात आली आहे. पण संपादित केलेल्या जमिनीचे सातबारा सदरी मूळमालकाचे नाव कायम राहायला हवे असते व सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय चे नाव इतर हक्कामध्ये राहते, तसे इतर गावामध्ये झाले आहे. पण आमच्या गावातल्या संपादित केलेल्या प्रत्येक सातबारा मध्ये सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांचे नांव भोगवटादार सदरी लागले आहे जे इतर हक्कामध्ये असायला हवे होते. तरी अश्याबाबतीत सातबारावर नाव नोंद कशी व्हायला हवी याबाबत माहिती द्यावी.
नमस्कार सर,

माझं नाव करण,राहणार कोल्हापूर,

माझ्या आजोबांना दोन सावत्र भाऊ आहेत.माझ्या आजोबानी स्वकष्टाने 1960 साली 3 एकर जमीन खरेदी केली. माझे आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ यांना मिळून वडिलोपार्जित २ एकर जमीन होती. ५ ( ३ एकर स्वकष्टार्जित + २ एकर वडलोपार्जित) एकर जमिनीचे तीन भावंडांमध्ये समान हिस्से होण्यासाठी किवा दोन भाऊ सहाहिसे दार होण्यासाठी,आजोबांनी ग्रामपंचायत मधे अनेवारी अर्ज दिला,भावांची अनेवरी लागावी म्हणुन.
तसा अर्ज दिल्यावर दोन भावांची नावे स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित या दोन्ही प्रकारच्या जमिनीवर/सातबारावर लागली.

तर माझा प्रश्न असा आहे की,

स्वकष्टाने विकत घेतलेल्या जमिनीचे भावंडांध्ये समान हिस्से करण्यासाठी आनेवरी ही पद्धत योग्य/कायदेशीर ठरेल का ?

अशा आनेवारी अर्जाणे सातबाऱ्यावर
(स्वकष्टार्जित जमीनिच्या ) लागलेल्या नावा प्रमाणे समान हिस्से होतील का ?

ज्याच्या नावावर स्वकष्टार्जित जमीन खरेदी पत्र आहे,तोच मालक राहील की, त्यांचे भाऊ पण जमिनीचे मालक किंवा समान हिस्सेदार होतील ?

तसेच स्वकष्टाने घेतलेली जमिनीचे भावांमध्ये(बंधू) समान हिस्से हे १०० रुपये च्य्या स्टॅम्प पेपर वर गावातील १० लोक जमवून केले तर ते ग्राह्य धरले जाईल का ?

आता आजोबांची स्वकष्टार्जित जमिनीवरून/सतबर्यावरून भावाची नावे कमी करू शकतो का व त्यासाठी काय करावे लागेल ?

नोट -
३ एकर जमिनीचे खरेदीत खत आजोबांच्या नावे आहे.तसेच आजोबा एकत्र कुटुंब प्रमुख होते.पण तसे ३ पैकी एका जमिनीच्या खरेदी पत्रवर नमूद आहे.पण आजोबांच्या दोन भावाची नावे कुठल्याही खरेदी पत्रावर नमूद नाहीत..!!
माझ्या आजोबांच्या 3 एकर स्वकष्टार्जित जमिनिपैकी 1 एकर जमीन आजोबांच्या एका भावाने 2018 मध्ये विकली. तर या विकलेल्या जमिनीवर आम्ही दावा करू शकतो का ?

तसदी बद्दल क्षमस्व...!

आपला नम्र,
करण कोळी.

Question by वैभव
13-01-2020
vaibhavraykar9765@gmail.com

आपल्या मालकीची गावातील जागा ग्रामपंचायतीच्या नावावर होते का? ग्रामपंचायत नियम ३/१० ३/७२ विषयी माहिती हवी आहे कृपया ती द्यावी.
नमस्कार सर मी सुमन रामा तेटगुरे  मु-साळवे,पोस्ट-कोस्ट खुर्द,तालुका-माणगांव, जिला-रायगड, पिनकोड-४०२१०४, माझे वडील किसन(कृष्णा) रामजी फुलारे हे मुके होते आणि १६/०६/२०१५ साली वारले .माझा चुलत भाऊ वसंत दादा यांना खूप वेळा सांगितले दादा माझा वारसनोंद करून दे पण नेहमी टाळा टाळ केली तेव्हा मी स्वता वारसा नोंद अर्ज ०२/१२/२०१९ ला गट क्रमांक व उप विभाग  ९२२ आणि ५८९  . तलाठी साहेब न कडे जमा केला. आता पर्यंत नमुना ९ नोटीस नाही दिली  जेवा मी तलाठी कार्यालयात गेली तेवा तलाठी साहेब बोलले आप्पा रामजी फुलारे तुमचे काका त्याचा वारस नोंद अर्ज पहिला आला आहे  त्यात ५ वारस दार आहेत .त्यात फक्त मंजुळा यांनी सही केली आहे .वसंत आणि अन्य ३ वारसांची सह्या बाकी आहेत त्याची वारस नोंद पूर्ण झाल्या शिवाय  तुम्हाला  नमुना ९ नोटीस नाही देऊ शकत.आप्पा रामजी फुलारे च्या सर्व वारसांची नमुना ९ वर सही होये पर्यंत आणि वारस नोंद होई पर्यंत  थांबावे लागेल.
१] वसंत दादा मुद्दाम आम्हा दोन बहिणीचे नाव ७/१२ येऊ नये यासाठी  अशी कामे करत आहे.
२] मला आई आणि वडील नाही ते वारले आहेत.माझा नवरा मुका आहे माजी परस्तिती देखील खराब आहे, या सर्व कारणा मुळे माझा पैसे गाडी भाड्या मागे खर्च होत आहे. आणि हे चुलत भावाला माहित आहे एकदा का हिचे पैसे संपले कि हि घरी गपप बसेल
३] किसन(कृष्णा) रामजी फुलारे आमचा तरी वारस नोंद करून टाकावी   तलाठी साहेबानी  आम्ही फक्त दोन बहिणी आहोत 
1)शासन निर्णय 2014 नुसार वर्ग 2 जमीन (नि.स.प्र) वर्ग 1 केली आहे (40 पट नजराणा रक्कम भरून)
2) अशी वर्ग 1 केलेली शेतजमीनीचा काही भाग बिगर शेतकरी व्यक्तीस विकण्या साठी अकृषीक परवानगी मिळेल का

Question by सागर
09-01-2020
sagarkandekar1990@gmail.com

प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.
एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
आजोबांच्या नावे जमिन आहे आणी त्यांच्या नावे कर्ज‌‌‌ आहे आणी आमाला वाटणी करायची आहे bankबोज्या आहे तसा ठेऊन वाटणी करायची आहे bankबोज्या उपगाटावर ठेऊन वाटणी करता येईल का कलम 85 नुसार वाटणिपत्र मिळेल का.......

This page was generated in 0.44 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3