जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्ते सर सर माझी जमीन धरणाच्या बँक वॉटर मध्ये संपा दित होत आहे तर माझ्या जमिनीत अजून 2 हिस्सेदार आहे तर आमची आणे वारी झालेली नाही व माझ्या हिस्सावर जी जमीन आहे तीचा पूर्ण हिस्सा जात आहे व जे 2 हिस्सेदार आहे त्यांची कमी जमीन जात आहे तर आम्ही जो मोबदला मिळेल तो कसा वाटायचा
आपले हिस्सेदार नटे संबंधातील आहेत कि त्रयस्थ आहेत ? जर त्रयस्थ असतील तर , खरेदी खतात क्षेत्राचा तपशील समाविष्ट असेल . क्षेत्राचा तपशील समाविष्ट नसेल तर मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ४५ प्रमाणे , ज्या प्रमाणात आपण खरेदी मंडळ विक्रेत्यास दिला त्या प्रमाणात , क्षेत्र विभागणी होईल .
संबंधित भू संपादन अधिकारी या बाबत निर्णय घेतील . जर चुकीचे apportionment केले तर , नोटीस आल्यावर हरकत घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गावातील गावठाण मध्ये माझ्या वडिलांच्या नावावर मोकळी जागा आहे. माझ्याकडे 1965 पासून ते आता पर्यंतचे त्या मिळकत क्रमांकाचे 8 अ उतारे आहेत. परंतु ग्रामपंचायत त्याजागेवर आपला हक्क सांगत आहे. आणि त्यांना आमच्या नावावरील उताऱ्याबद्दल विचारले असता ते तुमची जागा ती नसून दुसरीकडे असेल असे उत्तर देत आहे तर त्याला पर्याय काय आमची गावठाण मधील जागा आम्ही कशी शोधायची.
गावाचे भू सर्वेक्षण ( सिटी सर्वे ) झाला आहे का ? म्हणजे गावठाणातील जागांचा मिळकत पत्रिका उतारा आहे का ? असल्यास आपणास भूमी अभिलेख खात्यात त्या जागेचा सर्वेक्षण नकाशा मिळेल .
नसल्यास , मोकळ्या जागेवर आपला ताबा आहे हे दाखवणारा काही पुरावा आले का ? जशे कुंपण करणे , काही सामान ठेवणे . जागेची घरपट्टी भरलेली असल्यास , त्याच्या पावत्या .
ह्या पुराव्याच्या आधारे आपण , जागेवर पुढील विकास करा . ग्राम पंचायतीची त्यासाठी परवानगी मागा. परवानगी नाकारल्यास , विकास तरीही सुरु ठेवा . त्यास ग्राम पंचायतीने प्रतिबंध केल्यास , त्यांचे विरुद्ध , न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
05-11-2019
navale.sagar123@gmail.com

१)सर नोटरी आणि रजिस्टर अफिडेट यातील फरक काय?
2)हे दोन्ही चा कालावधी (validity ) किती दिवस चालते?
दस्त/अभिलेख notorize हा नोटरी कडे होते . affadavit हि नोटरी तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांचे कडे होते . कायदेशरी पुरावा म्हणून दोनीही मध्ये फरक नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1)ग्रामपंचायत हद्दीतील -वस्ती मधील 50 वर्षे पूर्वीपासून अस्तित्वात असणारा रस्ता ग्रामपंचायतकडे हस्तांतरित झालेला नसेल,
तो रस्ता ग्रामपंचायतने 10 फूट रुंद डांबरीकरण आणि नंतर काँक्रिटीकरण केलं असेल आणि
गावकऱ्यांना वापरासाठी तो एकमेव रस्ता असेल तर अशा रस्त्याची नोंद सरकार दफ्तरी होण्यासाठी कोणता नियम/कायदा आहे का ?
रस्ता ग्राम पंचायतीकडे हस्तांतरित करणे म्हणजे सरकारी दप्तरी नोंद करणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,माझ्या पत्नीची माय आजी तिची जमीन माझ्या पत्नीच्या नावे करू इच्छिते.आजीला एकच अपत्य आहे.ती म्हणजे पत्नीची आई.दोघीही ह्या बाबतीत स्वेच्छेने तयार आहेत.तर हक्कासोड किंवा बक्षिसपत्र करता येईल का.आणि सर्व जण आदिवासी समाजाचे ,रक्ताच्या नात्यातले आहेत.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आजी ला जमीन तिचे वडिलांकडून /आई कडून प्राप्त झाली असल्यास २०० रु मुद्रांक शुल्क भरून नाव वर करता येईल
मात्र आजीची स्व कष्टर्जित असेल तर , जमीन बाजार भावाच्या ३ % मुद्रांक शुल्क भरून , बक्षीस पत्र आपले नावा वर करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे पणजोबा १९६८ मध्ये वारले. वारस रजिस्टर १९७१ साली होऊन जमिनीसाठी ६३ या नंबराच फेरफार तयार झाला पण हा फेरफार no 63 तहसील ऑफिस आणि तलाठीऑफिसमध्ये मध्ये आढळ होत नाही ते कर्मचारी पानं फाटल्याचे सांगतात. पण मला दिवाणी कामासाठी तो फेरफार नक्कल हवी आहे. कशी मिळवू ?

Question by अमोल
30-10-2019
amolsalunkhe@rediffmail.com

माझ्या आईच्या चुलत भावाने माझ्या आजीची जमीन त्याच्या १३ वर्षाच्या मुलाच्या नावाने केली आहे. त्याच्या म्हणण्या नुसार १९९९ साली खरेदी केली आहे. तो मुलगा आता ३२ वर्षाचा आहे. माझ्या आजोबांचे १९९६ ला निधन झाले. ही वडिलोपार्जित शेती आहे. हा व्यवहार बेकायदा ठरू शकतो का कुठे दाद मागावी ? कृपया मार्गदर्शन करावे
आजोबांची जमीन होती . आजोबांचे निधनानंतर , आजीचे नावावर झाली . त्या नांतर , त्याचे म्हणण्यानुसार , आजीने खरेदी ने दिली . खरेदी खात झाले आहे का ? हे पहा . झाले असल्यास आजीस केवळ तिचा हिस्सा विकत येऊ शकतो . आजीशिवाय आपली आई व अन्य सरळ उतरते वारस , यांचा हिस्सा आजी विकू शकत नाही . दावा दाखल करून जमीन आपल्यायाला मिळू शकते . स्तहनिक वकिलांचे सल्ल्याने पुढील कारवाही करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जर फाळणी ने नाव कमी झाले असेल तर ते पुन्हा ७/१२ वर कसे घ्यावे ?
माझे वडील १९९८ ला वारले ,मला आई व ३ बहिणी आहेत ,त्यात १ व २ बहिणी चे लग्न नाही झाले , ३ नंबर बहिणीचे लग्न झाले आहे ती चे नाव ७/१२ मधून काडून टाकाय चे आहे ती ची मुले हक्क सोड पत्र करून देण्या साठी नकार देत आहे . तर काय करावे लागेल ?
१] हिंदू उत्तराधिकारी अधिनियम २००५ वापर होईल का ?
२] शेत जमीन न देता मोबदला किती द्यावा व ते कुठून माहिती करावे ,ते दलाला मार्फत मोबदला खूप मागत आहेत ?
३] कोर्टात न जात काय करावे लागेल ?
२००५ चा कायदा , वाटपासाठी लागू आहे . नाव कमी करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्या मालकी हक्काच्या मिळकतीत एका गावगुंड्या ने अतिक्रम करून माझा रहदारीचा रस्ता बंद करून माझी ६ गुंठे जमीन बळकावली , या संबंधी मी तहसील कार्यालयात सर्व जमिनीचे व अतिक्रमण झाल्याचे व हद्द मोजणीचे पुरावे दाखल करून तक्रार केली , तहसील कार्यालया मार्फत चौकशी करून सदर कुंपण काढून टाकण्या बाबत त्याला आदेश देण्यात आला , आदेश देऊन २ वर्ष झाली पण त्याने कुंपण काढले नाही , या कालावधीत मी दोन वेळा पोलिसात तक्रार केली, पण पोलिसात येऊन " मला तहसीलदार कार्यालयाचा आदेश मिळालाच नाही ,आदेश मिळाला की मी कुंपण काढून टाकेन " अशी कबुली जबाब त्याने दिला , आत्ता मी या गावगुंड्या ला तहसीलदारां मार्फत मिळालेलं पत्र त्याच्या सही सहित माहिती अधिकारात काढले आहे , पोलिसात दिलेला कबुली जबाब सुद्धा काढला आहे , पुढे काय करायचे ते कृपया मार्गदर्शन करा .
आपला अडवलेले रास्ता , पुन्हा पोलीस बंदोबस्तात , तलाठी यांचेकडून कडून मोकळा करून घ्या
पोलीस यांना खोटी /चुकीची माहिती दिली अशे आपले म्हणणे असल्यास , आपले इच्छे नुसार पुढील कायदेशीर कारवाई त्या व्यक्ती विरुद्ध करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vishal pawar
20-10-2019
mrvishalpawar4912@gmail.com

सर आमचा गावाला वनीकरण विभागाची जागा आहे
ती जागा आम्हला करारावर किवा भाडे तत्त्वावर पाहिजे
त्या साठी काय करावे लागेल.
सर मदत करा प्लीज.
आदरणीय सर , आमच्या आईच्या नावे अमरावती जिलह्यात जमीन आहे.आईच्या मृत्यून॓तर आम्ही वारस नोंदी साठी तलाठ्याकडे अर्ज व कागदपत्रे दिली.तलाठ्याने सर्व वारसांची नोंद गाव नमुना ६क मध्ये केली व आम्हां सर्व वारसांना नोटिस पाठवली ज्यात कोणाला काही हरकत असल्यास १५ दिवसात कळवावे अन्यता फेरफार मंजूर करण्यात येईल.मला आपल्याला विचारायचे आहे की सदर नोटिस सर्व वारसदारांनी सही करून परत तलाठूयांकडे पाठवणे बंधनकारक आहे का? आम्ही सर्व वारसदार एकाच कुटुंबातील असून मयताशी रक्ताचे नाते आहे व आमचा फेरफार नोंदीस कोणताही विरोध नाही.असे असताना सुद्धा २महिने झाले तरी आमचे नाव ७/१२ ला अजून आले नाही.कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
तलाठी यांनी , सर्व वारस गावात राहत नसतील तर , जागेवर महाराष्ट्र जमीन अधिनियम कलम २३० प्रमाणे जागेवर नोटीस प्रसिद्ध करावी . पंचनाम्याचे ( नोटीस प्रसिद्धी बाबत ) वारस नोंद मंजूर करावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vishal pawar
19-10-2019
mrvishalpawar4912@gmail.com

sir amcha Gavala vanikarn jamin ahe tar ti amala kararaver kiva bhadi ver pahiji tey sati kay karave lagel
नमस्कार सर आम्ही 2011 ला आमच्या जमीनीवर घर बांधले ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन पण ग्रामसेवक अजून मला घरपट्टी भरू देत नाही कारण माझ्याकडे माझ्या आत्यांची संमतीपञक नाही जर शासनाच्या नविन नियमानुसा मी अनिधीकुत घर म्हणून घरपट्टी भरली व नंतर संमतीपञ सादर करून माझ घर नावावर करून घेऊ शकते का?
परवानगी असेल तर , ग्राम सेवक आपणास घर पट्टी भरून घेण्यास नाकारू शकत नाही .
गट विकास अधिकारी यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर,,
नगरपंचायत क्षेत्रात पेसा कायदा लागू होतो का???
''संपूर्ण अनुसिचित क्षेत्र'' याचा अर्थ काय होतो??



नगरपंचायत निवडणुकीत नागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करताना एकूण सदस्‍य संख्‍याच्‍या 27% जागा राखून ठेवण्‍यात येतात.


मात्र, संपूर्ण अनुसूचित क्षेत्रा बाबतीत अनुसूचित जाती / जमातीचे सदस्य वगळून,, उर्वरित सदस्य संख्येच्या 27% सदस्य नागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात का?? या संबंधी शासन आदेश/माहिती द्यावि.
Panchayat ( Extension to Scheduled Areas) Act हा अद्याप पर्यंत शहरी भागास लागू केला नाही '
अनुसूचित क्षेत्रात ५० % जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत .
तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर तपासून देतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकञीकरण योजनेअंतर्गत गाव फाळणी बारा तयार करताना खरेदीने घेतलेल्या शेतजमिनीचे क्षेत्र कमी झाले असल्यास कोणत्याही कायदेशीर फेरफार जाब जबाब शिवाय केवळ एकञीकरण अधिकारी यांनी फाळणी बारा तयार केला या पञाद्वारे 7 एकर क्षेत्र कमी झाले आहे... तर ते कमी झालेले क्षेत्र मला परत मिळेल का? ?? जर होय तर त्यासाठी मला कोठे कायदेशीर प्रक्रिया करता येईल? ??
इतर अधिकारामध्ये विहिर हक्काची नोंद फेरफार ने कमी केली तसा फेरफार तयार झाला व नावाला कंस झाला परंतु सदर फेरफार समोर रद्द चा शेरा दिला 7/12 पञकी फेरफार नंबर लिहला होता त्यावर रद्द लिहिले माञ नावाला कंस तसाच राहिला व नंतर नाव उता-यावरून कमी झाले आहे अशा स्थितीत इतर अधिकारात नाव कायम यावे यासाठी काय करावे.
आपणास इतर अधिकारात जी , विहीर हक्काची नोंद आहे ती कमी करून हवी आहे कि ती कमी झालेली पूर्ववत करावयाची आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपणास इतर अधिकारात जी , विहीर हक्काची नोंद आहे ती कमी करून हवी आहे कि ती कमी झालेली पूर्ववत करावयाची आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही 2011 ला आमच्या जमीनीवर घर बांधले ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन पण ग्रामसेवक अजून मला घरपट्टी भरू देत नाही कारण माझ्याकडे माझ्या आत्यांची संमतीपञक नाही जर शासनाच्या नविन नियमानुसा मी अनिधीकुत घर म्हणून घरपट्टी भरली व नंतर संमतीपञ सादर करून माझ घर नावावर करून घेऊ शकते का?
नमस्कार,

गावी वडिलोपार्जित सक्खे चुलत काकांचे मिळून चांगल्या अवस्थेतील घर आहे ते आता माझे काही बंधू घर पडून आम्हा काही बंधूंना तसेच चुलत्यांना विश्वासात न घेता घर बांधत आहेत. काही बंधूंची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे नवीन घरात त्यांच्या नावावर एकही खोली नाही आहे. तसेच एक बंधू बाहेरगावी असल्यामुळे त्याला या नवीन घराची काही कल्पना नाही आहे.

सात बारवर सर्व काकांची नावे आहेत. सर्व बंधूंना तसेच चुलत्यांना विश्वासात न घेता घर बांधणे बरोबर आहे का ?? तसेच वडिलोपार्जित घर पडून नवीन घर बांधतेवेळी ग्रामपंचायतीकडून कोणती परवानगी घ्यावी लागते ? सात बारावरील सर्व सभासदांची नवीन घर बांधण्यासाठी परवानगी घ्यावी लागते का ? ग्रामपंचायत सर्वांची संमती न घेता घर बांधण्यास परवानगी देऊ शकते का ? दिली असल्यास इतर भावंडानी काय करावे ?

कृपया आपण मार्गदर्शन करावे.
घर गावठाणात आहे का ? कि घर शेतामध्ये ( सर्वे नंबर मध्ये ) आहे ?
घर बांधण्यासाठी नियोजन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे .
गावठाण क्षेत्रात , ग्राम पंचायतीची व इतर ठिकाणी ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे .
बाहधकामास परवानगी घेतली नसल्यास , आपण स्थानिक नियोजन अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करू शकता . जर परवानगी दिलेली असेल तर , स्थानिक नोयोजन प्राधिकारी यांचे निदर्शनास , जेजेच्या मालकी हक्क बाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय, आमचे दिवाणी कोर्टाच्या हुकूमनाम्याने वाटप झाले होते. परंतु दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ५४ अनुसार काहीही कार्यवाही न करता तत्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांचे म्हणजे तहसीलदार यांचे अधिकार वापरून सदर हुकूमनाम्याची फेरफार नोंद घेऊन तो फेरफार प्रमाणित केला. आम्ही सदर फेरफार नोंदीवर हरकत घेऊन नोंद मान्य नसल्याचे सांगितले. तरीही मंडळाधिकाऱ्यांनी सदर फेरफार प्रमाणित केला. माझा प्रश्न आहे कि, वरीलप्रमाणे झालेले कामकाज कायदेशीर आहे का? कारण माझ्या वाचनात असे आले आहे कि, दिवाणी न्यायालयात हुकूमनामा झाला असेल तर त्याची पुढील कार्यवाही हि तहसीलदार व भूमी अभिलेख विभाग यांनीच दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ५४ अनुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ८५ अनुसार करायची असते. माझा अजून एक प्रश्न आहे कि, जर तत्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी केलेले कामकाज हे बेकायदेशीर असेल तर मी पुढे त्यावर कोणती कार्यवाही करावी याबाबतही कृपया मार्गदर्शन मिळावे.
धन्यवाद.
फेरफार आव्हानित करा
कलम २४७ - प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय, आमचे दिवाणी कोर्टाच्या हुकूमनाम्याने वाटप झाले होते. परंतु दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ५४ अनुसार काहीही कार्यवाही न करता तत्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांचे म्हणजे तहसीलदार यांचे अधिकार वापरून सदर हुकूमनाम्याची फेरफार नोंद घेऊन तो फेरफार प्रमाणित केला. आम्ही सदर फेरफार नोंदीवर हरकत घेऊन नोंद मान्य नसल्याचे सांगितले. तरीही मंडळाधिकाऱ्यांनी सदर फेरफार प्रमाणित केला. माझा प्रश्न आहे कि, वरीलप्रमाणे झालेले कामकाज कायदेशीर आहे का? कारण माझ्या वाचनात असे आले आहे कि, दिवाणी न्यायालयात हुकूमनामा झाला असेल तर त्याची पुढील कार्यवाही हि तहसीलदार व भूमी अभिलेख विभाग यांनीच दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ५४ अनुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ८५ अनुसार करायची असते. माझा अजून एक प्रश्न आहे कि, जर तत्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी केलेले कामकाज हे बेकायदेशीर असेल तर मी पुढे त्यावर कोणती कार्यवाही करावी याबाबतही कृपया मार्गदर्शन मिळावे.
धन्यवाद...
महोदय, १९९७ रोजी माझ्या वडिलांच्या खोट्या व बनावट सह्या करून व कोणतेही कुलमुखत्यारपत्र दिलेले नसतानाही ते दिल्याचे भासवून आमची जमीन विकली. सदर बनावट खरेदीखतावरून १९९८ रोजी फेरफार नोंद घेतल्यानंतर त्याविरुद्ध आम्ही हरकत घेतल्यानंतर त्यावर तक्रार केस चालून सदर नोंद मंडळाधिकाऱ्यांनी रद्द केली. प्रतिवादींनी मंडळाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध कोणत्याही दिवाणी अगर महसुली न्यायालयात अपील केले नाही. त्यांनी पुन्हा एकदा १९९९ रोजी सदर बनावट खरेदीखतावरून दुबार नोंद केली. त्याविरुद्धही आम्ही हरकत घेतल्यानंतर तक्रार केस चालून सदर फेरफार नोंद महसूल न्यायालयाने रद्दबातल केली. आम्हाला आमची जमीन मिळाल्यामुळे आम्ही सदर बनावट खरेदीखत दिवाणी न्यायालयातून रद्दबातल करून घेतले नाही. किंबहुना त्याबद्दल तेव्हा आम्हाला याची माहितीच नव्हती कि बोगस खरेदीखत दिवाणी न्यायालय रद्द करते.आता आमचे वडील हयात नाहीत.
महोदय, याचा गैरफायदा पुन्हा एकदा प्रतिवादींनी घेतला व तब्ब्ल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा सदर बोगस खरेदीखतावरून तिबार/तिसऱ्यांदा फेरफार नोंद घेतली व यावेळी ती प्रमाणातही केली. यावेळी तलाठी व मंडळाधिकारीही प्रतिवादींबरोबर सामील झाले. कारण त्यांनी आम्हाला कोणतेही नोटीस पाठविले नाही. मी या फेरफारची RTS फाइल मिळवली असता असे दिसून आले कि आम्हाला रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्याचे दिसत आहे(जरी ती आम्हाला मिळाली नसेल तरी) परंतु येथे विशेष गोष्ट हि आहे कि, सदर पोस्टाच्या रजिस्टरची पावती पहिली असता असे दिसते कि, मंडळाधिकाऱ्यांनी फेरफार प्रमाणित केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविल्याचे दिसत आहे. म्हणजे हे तर पूर्ण बोगस कामकाज केल्याचे दिसते कारण नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवस गेल्यानंतर नोंद प्रमाणित करायची असते.
तर महोदय, या फेरफारविरुद्ध मी प्रांतांकडे अपील केले आहे. माझा प्रश्न आहे कि, वर सांगितल्याप्रमाणे एकदा महसूल न्यायालयाने खरेदीखताची फेरफार नोंद रद्द केल्यानंतर पुन्हा त्याच खरेदीखतावरून दुबार/तिबार नोंदी घेता येतात का?? व मी आता अपील केलेली फेरफार नोंद रद्द होईल का??
धन्यवाद...
एकदा नोंद मंजुरी बाबत मंडळ अधिकारी यांनी निर्णय घेतल्या नांतर पुन्हा त्याच नोंदी बाबत निर्णय घेता येत नाही
आपण अपील केले आहे . अपील मेमो मध्ये हे मुद्दे मांडा .
त्याच बरोबर खरेदी खत रद्द करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pravin Garud
12-10-2019
Pravingarud76@gmail.com

Dear sir/madam, I want to inquire, for Succession Certificate/legal heirship which documents is required . If name of the Disease is different. in death certificate and 7/12 because of marriage . How we can produce documents to court because marriages done in the year 1950. We don't have any records. Pls suggest and advice suitably. Thanks and Regards Pravin G Kalyan
Succession certificate and Legal Heirship certificate are both different things .
Succession Certificate - It is issued by the Civil Court to the legal heirs of the deceased to establish the identity of the legal heirs to authorise them to inherit debts, securities , funds invested in banks by deceased . The purpose is limited only to get shares , securities and other assets of the deceased .
A succession certificate may be used in situations where banks, financial and private institutions release funds to the nominee (where such nominee is not the legal beneficiary of the asset) and the nominee refuses to cooperate in distribution of the asset to the legal beneficiary. Similarly, a succession certificate may be useful to prove genuineness of the claimant where the inheritance amount is substantial.
Documents required are as follows
1. applicant has to file petition in the court within the jurisdiction where deceased died .
2. Death certificate of the deceased
3. list of other heirs
Legal Heirship Certificate - It is issued to the heirs of the deceased to recognise them as legal heirs of the deceased to inherit the immovable property . In case of the dispute or if there are differing claimants to the property , the issue is determined by the Civil Court by regular trial

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आमच्या जमिनीची मोजणी 2009 साली झाली आहे.हद्द कायम नकाशाची क प्रत आमच्याकडून गहाळ झाली आहे.

ती आम्हाला भूमिअभिलेख कार्यालयातून मिळेल का. काय करावे लागेल. आमच्याकडे मोजणी झाल्याच्या पुरावा नाही.

माहिती मिळावी ही विनंती...
भूमी अभिलेख कार्यालयाकडून आपणास प्रत मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, 1953 साली फ़ॉरेस्ट जमीन माझ्या पंजोबाला अनुसूचित जाती अंतर्गत साऱ्याच्या सहापट रक्कम भरून कायमची जमीन मिळाली आहे. पंजोबाच्या निधनानंतर 1978 मधे वारस म्हणून त्यांची मुले ( म्हणजे माझे आजोबा )सुना, (आजी )आणि नातवंडे (माझे वडील )यांची नावे 7/12 वर लावली आहेत.तेव्हा पंजोबाच्या मुलींनी (वडिलांच्या आत्या ) यांनी नावे दाखल करण्यास नकार दिला.

1978 साली पंजोबाच्या निधनानंतर त्यांच्या तिन्ही मुलींनी नावे वारस म्हणून 1995 साली दाखल केली.त्या आजोबाच्या 3 बहिणींचे (वडिलांच्या आत्या ) निधन होऊन अनुक्रमे 20, 10, 5 इतकी वर्ष झाली आहेत.

त्यांच्या मुलाची नोंद वारस म्हणून लागू शकते का...

1994, आणि 2005 सालचा कायदा याबद्दल काय तरतुदी सांगतो...

त्यांनी दावा केला तर काय होऊ शकते..?

उत्तर मिळावे ही विंनती....
आत्याचे निधन होऊन कितिही दिवस झाले तरी , त्यांचे वारसांची नावे लागू शकतात . त्यांना न्यायायलायात जाण्याची आवश्यकता नाही . प्रांतधिकारी यांचेकडे अपील करून त्यांच्या वारसांची नावे लावता येतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.72 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3