जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
खरेदी केलेल्या जमिनीची नोंद घेताना फेरफार नमुना 6 मध्ये भूसंपादन अधिकारी यांची खरेदीस मान्यता घेऊन नोंद घ्या,हा शेर आहे. तर काय करावे. कोणती कागदपत्रे लागतील ? नोंद घेण्यास किती कालावधी लागेल ? भूसंपादन अधिकारी दाखल्यासाठी कसा अर्ज करावा ? फी किती भरावी लागेल ?
फेरफार पूर्ण तपशील whatsapp पाठवा
प्रश्नावरून समजून येत नाही
भू संपादन अधिकरी यांची संमतीचे कारण समजून येत नाही
कदाचित इतर हक्कात भू संपादनासाठी प्रस्तावित असा शेरा असेल . व त्या भागातील जमीन खरेदी विक्री वर मनाई असेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1987 च्या चौकशी नोंदवही वर वारस नोंद झालेली आहे. A व B यांना वारस म्हणून ठरविले. पण त्याच वेळेस आखीव पत्रिकेवर वारस नोंद करताना फक्त A चे नाव नोंदवले गेले B चे नाव नजरचुकीने नोंदवायचे राहिले ही पत्रिकेतील चूक दुरुस्त करावी अशी B ने विनंती केली.पण उप अधिक्षक भुमी अभिलेख यांनी जिल्हा अधीक्षकांकडे वकिलामार्फत अपील करा असे पत्र पाठवले आहे.कुणाचाही विरोध नसताना B ने कोणा विरुद्ध अपील करायची? का करायची? चूक तर सरकारी अधिकाऱ्यांची आहे जी त्यांनी आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी करून दुरुस्त करावी अशी B ने विनंती केल्यावर सुद्धा ऐकत नाहीत. पुढे B ने काय करावे?
आपण उपाधीक्षक यांचेकडे अर्ज केल्यावर , त्यांना पूणर निरीक्षण प्रस्ताव अधीक्षक यांचेकडे पाठवणे आवश्यक .
असोत आपण पूणरनिरीक्षण अर्ज अधीक्षक यांचे कडे करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी शासकीय कॉलेजमध्ये शिक्षक आहे.माझी संपूर्ण सरकारी नोकरी आहे. माझे वार्षिक उत्पन्न 6 लाख आहे. माझ्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही परंतु वडिलांच्या नावे शेतजमीन आहे ती जमीन वडिलोपार्जित आहे. मला एका गावात वैयक्तिक स्वतःचे नावे शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला मिळेल का ?
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम २(२) व २(११) नुसार आपले , वडील शेतकरी आहेत व पर्यायाने आपण शेतकरी आहेत . त्यामुळे आपणास हेटकरी दाखल मिळण्यास कोणतीही अडचण नाही . आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Karan pawar
21-09-2019
Karan975aawq6@yaho.com

विकास आराखडा मध्ये रहिवास झोन दाखविला आहे.परंतु त्या गटात अगोदरच घराचे बांधकाम केले असेल तर ती जागा आता बिनशेती करण्याचे काय पर्याय आहेत.40 पट दंड भरून बिनशेती होईल का ?
आपण जे बांधकाम केले आहे ते ,विनापरवानगी केलेले आहे असे दिसून येते .
आपण बांधकाम नियमानुकूल करून घ्या . आपोआप आपले क्षेत्र NA होऊन जाईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे आजोबा रंगनाथ यांनी 1974 साली कुळ म्हणून जमीन विकत घेतली होती त्यांना मुंबई कुळ कायदा 1948 कलम 32 म चे प्रमाणपत्र देण्यात आलेले होते सातबारावर नोंद झाली कुळ कायदा कलम 43 चे अटिस पात्र असा शेरा इतर हक्कात नोंद केली परंतु नंतर आजोबांनी सदर जमीन म.ज.म. स. क 85 नुसार अर्ज देऊन आमच्या आजी चंपाबई हिच्या नावे केली त्यानंतर गावी एकत्रिकण स्कीम झाली आणि तलाठी यांच्याकडून कुळ कायदा कलम 43 चे अटीस पात्र असा शेरा इतर हक्कात नोंद करायचा राहून गेला त्यानंतर 1993 साली आमची आजी चंपाबाई हिला
2 पुतण्यानी मिळून फसून सदर जमीन पांडुरंग याला विकली त्यानंतर माझे वडील यांनी तहसीलदार यांचेकडे कुळ कायदा कलम 84 क नुसार अर्ज करून कुळ कायदा कलम 43 क शर्ती चे उल्लंघन झलेने सदर जमीन सरकार जमा करण्याची मागणी केली त्यानुसार तहसीलदार यांनी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून 1995 साली सदर जमीन सरकार जमा केली परंतु पांडुरंग ने प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील केले आणि प्रांत अधिकाऱ्यानी जमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम भरून घेऊन व्यवहार कायदेशीर केला त्यावर माझ्या वडिलांनी महसूल न्यायालय (MRT) कडे अपील केले आणि MRT ने तहसीलदार यांचा निकाल कायम केला परंतु पांडुरंग याने High Court कडे अपील केले आणि मुद्दा मांडला की मुंबई कुळ कायदा 1948 कलम 32 म प्रमाणे जमीन विकत घेतली असल्यास त्याला 43 क हे कलम लागू होत नाही
तेव्हा महोदय माझा प्रश्न हा आहे की 1974 साली मुंबई कुळ कायदा 1948 कलम 32 म प्रमाणे जमीन विकत घेतली असल्यास त्याला कलम 43 क च्या शर्ती लागू आहेत का ?
2) सदर जमीन सरकार जमा झाल्यानंतर माझ्या वडिलांना घेता येईल का ?
१९७४ साली कुल कायद्याखाली प्राप्त जमिनीचे विक्रीसाठी परवानगीची आवश्यकता होती .
जमीन शासन जमा झाली असेल तर वाटपासाठी , आपला क्रम प्राथम्य यादीत नाही
आपणास मिळू शकत नाही
मूळ जमीन मालकास मिळू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Imran Tamboli
20-09-2019
itambooi209@gmail.com

माझा प्रश्न असा आहे की अ व्यक्तीकडुन रजिस्टर खरेदी खताने गावात जागा घेतली व त्यावरुन सिटी सर्व्हे ला वडीलांच्या नावे नोंद झाली. परंतु ग्रामपंचायत ८अ (कर आकारणी) उतारा ब व्यक्तीच्या नावे आहे. सदरची जागा सद्यस्थितीत आम्हीच वापरतो. ब व्यक्तीचे नाव ग्रामपंचायत ८अ वरुन कमी करुन वडीलांच्या नावे कसे करावे. न केल्यास पुढे काही अडचण येणार नाही ना कारण सिटी सर्व्हे वरती वडीलांचे नाव आहे. आणि ब नावाची व्यक्ती गावात नाही आहे.
बी चे नाव कमी करण्यासाठी ग्राम पंचायत कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir. m grampachayat hadhit ghar ghetana city sarvhela nond hoti but malkane grampanchayat utaryavar kharedhi karun dili city sarvhela nond mul malkachi ajun ahe kay karave plz.
JMFC मृत्यू नोंद दिनांक जाहीर करतील म्हणजे काय याची कृपया माहिती देणे
आपणास JMFC यांचेकडे अर्ज करावा लागेल . त्यांचेकडून मृत्यू दिनांक प्रमाण पत्र मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलोपार्जित शेत वहिवाट रास्ता अडवणूक करत आहे,खरेदीखतामध्ये खाडाखोड केली,संपादित क्षेत्र अतिक्रमण केले,त्यासाठी तक्रार कोठे करावी
वही वाट रस्ता अडवणूक केली असेल तर , मामलतदार कोर्ट कायद्याखाली , तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sachin deshmukh
19-09-2019
sdeshmukh343@gmail.com

Tukda bandi kayda kay ahe ani to ata lagu ahe ka
हो लागू आहे
मात्र तो शहरी भागासाठी लागू नाही
नुकतीच या कायद्यात सुधारणा केली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Hakka sod watani Patra SDO Aadesh sub register office avashyak aahe ka 1. 5 1 hectare one fourth distribution Hote
नमस्कार सर
आमच्या जमीणीचे 1976 पर्यंत सर्वे 1अ आणि 1ब असा होता.आणि त्याचे 1976 नंतर मध्ये गट नं 1 च झाला .आणि ती जमिण सर्वे 1अ च्या नावे झाली आहे.आणि आता ति जमीन सर्वे 1अ च्या पुतणे चे नावावर मृत्युपत्राने झाली आहे. तसा फेरफार निघत आहे.आणि 1ब सर्वे 1962 te 1976 च्या सातबारा वर इतर हक्कात तुकडा, तुकडे बंदी विरुद्ध व्यवहार अशी नोंद आहे.
तर ति जमिण 1976 पुर्वी च्या सर्वे नं 1ब च्या नावावर होईल का?

Question by Ram date
18-09-2019
Ramdate@gmail.com

सर ७/१२ वर २ भावाचे वारसा हक्कने सामा ई क क्षेत्र ची नोंद झाली आहे . ते क्षेत्र विभाजन करण्यासाठी व प्रत्येकाचे नावासमोर क्षेत्र येण्यासाठी मार्ग दर्शन करावे. धन्यवाद...
वाटप करून घ्या . वाटप आदेशाचे अनुषंगाने मोजणी करून घ्या . आकारफोड पत्रकांचे आधारे , टेहाळतही मंडळ अधोजिकारी स्वतंत्र ७/१२ तयार करतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
दस्त नोंदणी केल्यानंतर मसुद्यातिल कलम दुरुस्त करता येतो का?
दुरुस्त खत करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार...
आमच्या जमिनी ला ४१ गुंठे क्षेत्र डिंभे प्रकल्पग्रस्ता साठी संपादित झाले१९९७ ला ७/१२ सदरी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे नाव दाखल झाले नंतर लगेच सदर जमीन प्रकल्प ग्रस्तांना वाटपाचा आदेश झाला परंतू त्या प्रकल्प ग्रस्ताने जमिनी चा ताबा २०१८ ला तब्बल २१ वर्षे नंतर घेतला व ८ दिवसांनंतर लगेचच शासनाची कोणतीही परवानगी न घेता विक्री केली तलाठी व मंडलाधिकारी यांनी जाणीवपूर्वक शासनाने धारण केलेल्या जमिनी चा भोगवटा वर्ग विक्री होईपर्यंत वर्ग १ ठेवला .जमिनी ची शासनाचे परवानगी शिवाय विक्री झाल्यावर आम्ही मुळ मालक यांनी तलाठी, प्रांताधिकारी,उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन.यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केला मग मंडलाधिकारी यांनी तहसीलदार यांचे कडे पुनरावलोकन करण्यासाठी अर्ज दाखल केला...त्याच वेळी उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन यांच्या कडे तक्रार दाखल असताना व सदर जमिनीशी विक्री झाल्यावर नवीन शर्त कमी करण्यासाठी व भोगवटा १ करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन यांनी आदेश दिला व आमचा तक्रार अर्ज फेटाळला. हे बरोबर आहे का मार्गदर्शन करावे.
वास्तविक पुनर्वसनाखाली दिलेल्या जमिनीच्या हस्तानंतरवर असणारे निर्बंध हे , जमीन कोणत्या कायद्याखाली दिली आहे त्या वर अवलंबून आहे
जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दिली असेल , तर हस्तानंतरण विना परवानगी करता येत नाही
मात्र पुनर्वसन कायद्याखाली दिली असेल तर , अश्या जमिनीच्या हस्तांतरणावरील निर्बंध नाहीत / ते दूर करण्यात आले आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
आमच्या जमीणीचे 1976 पर्यंत सर्वे 1अ आणि 1ब असा होता.आणि त्याचे 1976 नंतर मध्ये गट नं 1 च झाला .आणि ती जमिण सर्वे 1अ च्या नावे झाली आहे.आणि आता ति जमीन सर्वे 1अ च्या पुतणे चे नावावर मृत्युपत्राने झाली आहे. तसा फेरफार निघत आहे.
तर ति जमिण 1976 पुर्वी च्या सर्वे नं 1ब च्या नावावर होईल का?

Question by Vinay nikam
15-09-2019
Vinaynikam1983@gmail.com

Sir maza prashna ahi ki mazya vadilani 1989 madhe saamaikat madhe 1 aar cha dast kela hota tashi satbarwala nonde ahi ani nantar punha tyacha sr no madhe 2005 madhe kharidi dasta dvare 1 aar kharidi keli pan ata.Sat Baramadhe nonde 1aar chi ahi.2008 sali. Talathi na nav lavanya sathi aarj kela hota.parntu thyane 2005 sali kharidi Kelelya Malkachi nav kami na karta. Aamce nav kami kele ahi.hi bab amhala. Online satbara 2016 madhe 2 nave asalyane kalale nahi. Parntu ata hasta likhit satbara madhe 1 aar nav kami zale ahi .aani tyala ferafar no 2005 chya dastatha padala ahi tari ata satbara madhe 2 aar chi nonde sathi kay karave.
आपण दोनीही खरेदी खतांसह प्रांताधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।

आमचे गावचे घरावर अ आणि ब अशी घरपट्टी आहे , अ मध्ये आम्ही चार कुटुंब आहेत ,आजीच्या निधनानंतर अ मध्ये आम्ही चार कुटूंबाची घरपट्टी वेगळी करून घेतली आहे पण आम्ही सर्व घराच्या अ मध्ये आहोत
त्यापैकी २ कुटुंब आम्हा दोन कुटुंबाना घरावर हक्क सोड देणार आहेत , तर हे हक्क सोड करण्यासाठी कोठल्या कागपत्राची गरज आहे आणि हे कोठे रजिस्टर करावे लागते ।

तसेच उरलेले आम्ही दोन कुटुंब पैकी एक कुटुंब आम्हाला अ विभागातले घर बांधण्याविषयी रिप्लाय करत नाही तर आम्ही अ मध्ये घराची फोड करता येईल का आणि आम्ही आमचे घर बंधू शकतो का , तसेच घर बांधताना कोणत्या सरकारी विभागाची परवानगी घ्यावी लागते ।
अ घरामध्ये आपण चार कुटुंब राहत आहात. आपणास या घराचे हि दोन भाग करायचे आहेत
ग्राम पंचायतीकडे अर्ज करा





Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।

आमच्या ३४२ हा फेरफार वर्ष १९२२ चा आहे ,हा फेरफार खूप पुसट आहे आणि या विषयी तलाठी ऑफिस मध्ये कुठलीहि माहिती उपलब्ध नाही ,आम्हाला जर या फेरफार विषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर कुठे निवेदन द्यावं
१९२२ चा फेरफार मिळणे कठीण

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kailas patil
15-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com

माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?
मी गेल्या वर्षी एक एकर शेत जमीन गोपालन, वनस्पतीच्या लागवडीसाठी खरेदी खताने घेतली होती त्या नंतर सात बारावर नाव चढल्यावर शासकीय मोजणी करून घेतली आहे माझ्या अगोदर मूळ मालकांनीही शासकीय मोजणी केली होती मग काही दिवसांनी तिथे मी कुंपणाचे आणि शेत घराचे काम सुरु करत असताना तेथील गावातील लोकांनी माझे काम थांबविण्यास सांगितले ते म्हणतात कि जमीन गावठाणाची आहे मग मी सर्वत्र पत्रव्यवहार केले मग मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी केली आणि त्याचा रिपोर्ट तहसील अधिकारी याना पाठवला, काही दिवसांनी त्या गावातील लोक तहसील कार्यालयात गेले आणि माझ्या विरोधात तहसील मॅडम याना माहिती दिली त्या तहसील मॅडम यांनी माझे कागद पत्र न बघता त्यांनी माझे खाजगी शेत जमिनीवर चालू काम थांबवण्यास सांगितले. ते म्हणाले कि जो पर्यंत गावठाणाची मोजणी होत नाही तो पर्यंत तुम्ही काम करायचे नाही त्यांनी सांगितलेल्या दिवसानुसार मी तहसील कार्यालयात गेलो होतो त्यांनी तेव्हा माझे कागद पत्रे पहिले आणि सांगत होते कि त्या गावठाणचे लोक मोठ्या राजकीय नेत्या कडे गेले होते तुम्ही त्यांची मोजणी होई पर्यंत काम बंद ठेवा.
मला सांगा कि मी करून घेतलेली शासकीय मोजणी अधिकृत नाही आहे का? दोनदा झालेली मोजणीत गावठाण येऊ शकते का? त्यांच्या कडे महाराष्ट्र शासनांनी अधिकृत केलेले नकाशे नाही, पुनर्वसन विभागाचे कोणते आदेश नाही, त्या पुनर्वसन गावठणच्या लोकांनी इतर मालकांना न कळवता अनाधिकृत नकाशे बनवत आले आहे तरी माझ्या सात बारा म्हणजे माझ्या शेत जमिनीचा आणि गावठाण चा काहीही संबंध नसताना तहसील मॅडम माझे खाजगी बांधकाम थांबविण्याचे अधिकार आहे का, माझे कोणते हि पेपर न पाहता, मी त्यांना भेटायच्या अगोदर ते माझे काम थांबवू शकतात का
तरी आपण मला मदद करावी, मी काय करावे त्यासाठी मार्गदर्शन करावे, माझा संकल्प गोपालन, गोसेवा आहे
तरी मला योग्य सहकार्य करावे
धन्यवाद
आपण दिलेल्या सुविधा बद्दल मी आपला आभारी आहे
मी कृष्णकुमार शिंदे 9619045696
आपण करत असलेल्या बांधकामास आपण परवानगी घेतलेली आहे का ?
बांधकाम गावठाण जागेत करत असल्यास त्यास , ग्राम पंचायतीची व इतर ठिकाणी म्हणजे , गावठाणाबाहेर , जिल्हाधिकरी यांची परवानगी आवश्यक आहे
जर परवानगी घेतली नसेल तर आपणास बांधकाम थांबवावे लागेल व परवानगी घेतली असले तर बांधकाम थांबवण्याची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by शंकर
14-09-2019
ShankaBrkakde@Gmail.com

माननीय महोदय,
वनविभागातील / सरकारी जमीन देशी गोसंर्वधनासाठी मिळणे साठी काय करावे लागेल, मार्गदर्शन करावे,
माझ्या वडलांनी १९४१ साली जमीन खंडाने दिलेली होती परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात कुल मानून लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ अन्वये कुळाने खंड दिला नाही म्हणून त्यास मी वर्तमान पात्रातून ३ महिने कालावधीची नोटीस देऊ शकतो का . जर त्याने रक्कम दिली नाही तर, कुल वहिवाट संपुष्टात आणता येते का . खंड रक्कम दिली नाही मानून कुल वहिवाट संपुष्टात आणता येते का .जर नोटीस पेपर मांडून दिली असेल तर .
सागर राव
नोटीस त्यास वयक्तिक रित्या बजावणे आवश्यक आहे . तो अढळ होत नसेल तर , जमिनीवर नोटीस प्रसिद्ध करा . अन्यथा पेपर मध्ये नोटीस प्रसिद्ध करू शकता
मात्र खंड कुळाने दिल्यास , वहिवाट संपत करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kailas patil
14-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com

माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3