जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by विजय व. kene
13-10-2018
maaparvati87@gmail.com
नमस्कार सर, मुळ गैरआदिवासीची जमीन आदिवासी व्यक्तीने खरेदी केली व ती जमीन गैरआदिवासी व्यक्तीला विक्री केली यास कलम 36, 36अ लागू होतात काय? किंवा शासनाची परवानगी घ्यावी लागेल काय?
Question by प्रल्हाद महादेव कुंभार
13-10-2018
pralhad_kumbhar@yahoo.com
आपले सरकार या पोर्टलवर नॉन क्रिमिलियर दाखला काढण्यासाठी लॉगिन झाल्यानंतर त्यामधील अनिवार्य कागदपत्रांमध्ये जातीसाठी एफिडेविट चा फॉरमॅट (मजकूर) काय आहे. सदर ॲफिडेव्हिट तहसील कार्यालय मध्ये साक्षांकित करणे आवश्यक आहे काय ?सदर एफिडेविट साध्या कागदावर करावयाचे की बॉंडपेपरवर करावयाचे ?बॉंडपेपरवर करावयाचे असल्यास किती रुपयेचा बॉंड पेपर लागेल ?कृपया माहिती मिळावी
Question by सुहास माने
10-10-2018
suhas2mane@gmail.com
नमस्कार सर,
मी कुळकायदा कलम ३२पी ने मिळालेली जमीन खरेदी केली .विक्री परवानगी न घेतल्याने शर्थ भंग झाला.कुळकायदा नवीन नियम ८४क क नुसार बाजारभावाने ५०% रक्कम भरणा केली आहे.तहसीलदारानी व्यवहार नियमित केला आहे पण जमीन वर्ग २ आहे .सदर जमीन वर्ग १ करण्यासाठी काय करावे लागते याची माहिती कृपया आपणाकडून व्हावी हि विनती
जमीन ३२ प खाली वाटप केली असली तरी त्या साठी ५० % नजराणा नाही .
शर्थ शिथिल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोशन घुटे
10-10-2018
rghute122@gmail.com
नगर रचना अधिनियम १९६६ मध्ये कलम ५५(१) ची नोटीस आदिवासी किंवा जे ६०-७० वर्षांपासून वास्तव्य करतात त्यांच्यासाठी लागू होते का .? त्याच प्रमाणे त्या जमिनीमध्ये कुळाची भूमिका असताना त्या मध्ये कुळाचे नाव नाही परंतु भूसंपादन अधिकाऱ्याने या मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे कि , भूसंपादनाच्या वेळी त्यांना घरे मिळावी . त्यावर एखादी संस्था प्रत्यक्ष घरे तोडू शकते का ..? या बद्दल सपाटीकरण द्यावे ..
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा १९६६ च्या कलम ५५ अन्वये , तात्पुरत्या स्वरूपाचे काम काढून टाकण्याचे अधिकार आहेत .
आदिवासी ६० ७० वर्षांपासून राहता आहेत . त्यांनी तात्पूत्या स्वरूपाचे काम ( work of temprorary nature ) केलेले असेल .
कलम ३६ अ अन्वये , आदिवासी व्ययक्तीची जमीन बिगर आदिवासी व्ययक्तीस हस्तांतरण करण्यास निर्बंध आहे . या ठिकाणी हस्तांतरण होत नाही . नियोजन प्राधिकरण , विना परवाना तात्पुरते केलेले काम काढून टाकत आहे . किंवा त्यांचे जागेवर असलेले अतिक्रमण , कलम ५५ चा वापर करून काढून टाकत असेल , मात्र या ठिकाणी मिळकतीचे हस्तांतरण होत नाही . त्यामुळे कलम ३६ अ चे सौरक्षण मिळणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by datta kharbade
09-10-2018
dattakharbade7gmai.com
सर आमच्या शेतात जाण्याची पायवाट समोरील व्यक्ती बंद करत आहे व ति पाय वाट म्हणून गावाच्या नकाशा मध्ये उल्लेख आहे.पाय हि खुप जुनी आहे व तो आता म्हणत आहे कि बैलगाडी व ट्रक्टर नेउ देणार नाही.या साठी काय करावे मार्गदर्शन करावे.
Question by दिनकर
06-10-2018
dinkarkps122@gmail.com
नमस्कार सर ,
आमच्या आजोबाच्या नावे ७ एकर जमीaन होती व त्यांना ७ वारस होते एका मुलाला आजार असल्यामुळे तो मुलगा वारला त्याचा मुलगा त्या वेळेस खूप लहान होता नंतर तलाठी यांच्या कडे वाटणी पत्र करून घेतले त्या वेळेस ६ जणांना जमीन वाटणी करून दिली व ७ व्या मुलाला हिस्सा मिळाला नाही आता मी म्हणजे त्यांचा मुलगा कागद पत्र काढले असता मला हि बाब लक्षात आली त्या वाटणी पत्रात वडिलांची संमती नाही परंतु तेव्हा तलाठ्याने त्यात ७ व्या मुलाला मिळणार हिस्सा त्याच्या आजारपणात विकला असे फेरफार ला लिहिले आहे परंतु त्यामध्ये कुठलीही संमती नव्हती .
१) आता त्यामध्ये फक्त २ एकर जमीन उरली आहे बाकीच्यांनी त्यांच्या हिस्स्याला आलेली जमीन विकून टाकली आहे .
२)आता मला माझा हिस्सा मिळेल का हो तर kasa ?
३)जमीन वडिलोपार्जित असून मी लहान होतो त्यामुळे मला हि गोष्ट आता लक्षात आली.
वाटणीपात्र १९९१ साली झाले होते
आपणास हिस्सा मिल्ने आवश्यक आहे . मात्र आपणास आता त्यासाठी , दिवाणी दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अर्चना पेचफुले
05-10-2018
shrisk36@gmail.com
१] आमचे वारसा हक्काने मिळालेले घर आहे , पण काका त्यात हिस्सा देणं नाहीत ,घर काका व माझ्या आईचया नावावर कायदेशीर व कमी वेळ लागण्यासाठी व घर शहरात असल्याने PR कार्ड मिळण्या साठी मार्गदर्शन करावे.
१. PR कार्ड जमिनीसाठी असते तर घरपत्रक घरासाठी असते .
२. आपले आईचे नाव PR कार्ड ला नसेल तर , आपणास संबंधित स्थानिक स्वराज्य अर्ज करावा लागेल .
३. त्याठिकाणी हि आपले नाव लावण्यास अडचण असल्यास , न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अर्चना पेचफुले
05-10-2018
shrisk36@gmail.com
वाटणी पत्र कसे करतात , वाटणी पत्र किती प्रकाचे असते .त्याची प्रक्रिया विशद करावी
.धंयवाद सर
Question by सागर
04-10-2018
sagarkandekar@hotmail.com
नमस्कार.गट न.238 हा 60 गुंठेचा असून त्यात 18 सामाईक मालक असून त्याच्या तिल वादामुळे त्याच्यात वाटप झालेले नाही.त्यातील 9 जणांचा त्यात 1/2 (अर्धा) अभिन्न हिस्सा मी इतर व्यक्तीच्या परवानगी शिवाय रजिस्टर खरेदीखताने खरेदी केला 2015 मध्ये व माझे सातबारा सादरी नाव पण लागले. माझ्याच मालकीचा गट न.237 हा गट न.238 ला लागून आहे.पण अत्ता इतर व्यक्तींनी माझ्या विरोधात कोर्टात खरेदीखत रद्द करण्याचा दावा टाकला आहे व ते सांगत आहे की आम्हा हा 1/2 अर्धा हिस्सा विकत घेण्यास तयार होतो.आत्ता न्यायलाय काय निर्णय देणार..? खरेदीखत रद्द झाले तर माझी खरेदी रक्कम मला परत कशी मिळणार..? मार्गदर्शन करावे.
वारसाने प्राप्त झालेल्या जमिनीवर प्रातां विकत घेण्याचा हक्क केवळ , इतर वारसांनाच असतो . अन्य सहधारक आपले वारस नातेवाईक आहेत का ? नसतील तर पाले खरेदी खत रद्द होऊ शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
03-10-2018
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
गावठाण घर मिळकती चे रजिस्टर मृतुपत्र माझ्या नावे केले आहे ,परंतु मी मृतुपतत्रा नुसार नोंद होण्यासाठी मृतुपत्र १ वर्षे उशिरा दिले आहे ,परंतु घर मिळकतीला ग्रामपंचायतीने ठराव करून वारसाची नावे ८ अ च्या उतार्याला नोंद झाली आहे ,मी मृतुपत्र नोंदीसाठी दिले आहे ,ग्रामसेवक मृतू पत्रा नुसार माझी नोंद घालेल का , ग्रामसेवकाने सांगितले कि अगोदर वारसाची नोंद झाली आहे ,काय करता येणार नाही ,व वारसांनी सुद्धा अर्ज दिला आहे कि आमची वारसाने नोंद झाली आहे ,नोंदीत बदल करू नये ,आता मी काय करू ,कृपया साहेब लवकर मार्गदर्शन करावे ,हि आपणास विनंती
Question by अमोल ढेपे
01-10-2018
amoldhepe777@gmail.com
सर मी अमोल मार्च महिन्यात 30 गुंठे जमीन खरेदी केली होती पण त्या 7/12 वर मयत व्यक्तीचे नाव तसेच होते त्या मुळे ती नोंद रद्द करण्यात आली नंतर मी वारस नोंद करून घेतली व नवीन नोंद करण्यासाठी नवीन index पण तलाठयाला दिली परंतू तो आता sub resiter परवानगी घ्यावी लागते म्हणतोय तर मला काय करावे लागेल process काय असेल
जी व्यक्ती मयत होती , तिच्या वारसांनी खरेदी खतावर सहया आहेत का ? केल्या असल्यास आपणास अडचण नाही
मात्र जर त्या मयत व्ययक्तीच्या वारसांनी खरेदी खतावर सह्या नसतील तर , पुन्हा वारसांकडून त्यांचा हिस्सा खरेदी घ्यावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by देवानंद सुभाष शिंगरी
29-09-2018
deva.shingari07@gmail.com
सर मी एका व्यक्तीकडून अकृषिक नगरपालिकेच्या हद्दीतील १३९.२५ चौ.मी असलेला प्लॉट खरेदी केला.खरेदी करण्यापूर्वी त्याची नोंदणी दुय्य्म निंबंधक येथे करून घेतली होती.त्यानंतर मी फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालय येथे पूर्ण अर्जासहित माहिती पुरविली असता संबंधितांना नमुना ९ नोटीस देताना मूळ मालकाचे क्षेत्र कमी होत नाही; असे कारण देऊन आजतागायत नोटीस देण्यात आले नाही .मूळ मालकाचे ऑनलाईनमध्ये क्षेत्र कमी न होण्याचे कारण मिळावे हि नम्र विनंती.
Question by अजितकुमार सर्जेराव पाटील
28-09-2018
ajitkumar5677@gmail.com
किरण सर हुकूमनामा संदर्भातील एका प्रश्नावर आपण खालील माहिती दिली होती,
" मंडळ अधिकारी यांनी घेतलेली हरकत योग्य नाही . वारस / भोगवटादार जरी बदलेले असले तरी , न्यायालयाचा हुकूमनामा आहे . त्याचे पालन करणे आवश्यक आहे .
तथापि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजी कि , हुकूमनामा अंमल बजावणी कालावधी १२ वर्ष इतका असतो . आपल्या हुकूमनाम्यास १२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे . त्यामुळे हुकूमनामा याची वैधता संपली आहे . जर सध्याचे भोगवटादारांनी हरकत घेतली नाही तर आपले नाव ७/१२ सादरी लागू शकते . अन्यथा आपण हुकूमनामाचा अंमलबजावणी करणेसाठी ज्या न्यायालयाने वाटप केले त्या न्यायालयाकडे अर्ज करा . न्यायालयाने विलंब माफ केला तर , अंमलबजावणी करणेसाठी दिवाणी न्यायालय आदेशित करेल."
सदर प्रश्न हा १९७९ सालाचा हुकूमनामा सन २०१६ मध्ये मुद्रांक शुल्क भरून नोंदीत केला होता.
As per article 136 of Limitation act 1963, twelve year limit is applicable from date when Decree becomes enforceable.
आमचा हुकूमनामा २०१६ मध्ये मुद्रांकित झाला तेंव्हा हि मर्यादा २०१६ साला पासून असावी असे वाटते. शेतजमिनी संदर्भातील हुकूमनामा मुद्रांक शुल्क नंतरच acted upon होतो असं मी वाचल आहे. कृपया मार्गदर्शन करा.
आपला,
अजितकुमार पाटील,
9665155677
Question by देवानंद सुभाष शिंगरी
27-09-2018
deva.shingari07@gmail.com
महोदय
मी एका व्यक्तीकडून अकृषिक खुला १३९.२५ चौ.मी.क्षेत्र असलेला दुय्य्म निबंधक येथून नोंदणी करून नियमानुसार खरेदी केला होता.त्यानुसार मी मूळ अर्जसहित संबंधित तलाठ्याकडे ७/१२ वर नाव लावण्यासाठी गेलो असता तलाठ्याने संबंधितांना नमुना ९ नोटीस देण्यासाठी देण्याऱ्याचे पूर्वलोकनात क्षेत्र कमी होत नसल्याचे कारण देण्यात आले.त्यामुळे नमुना ९ नोटीस देण्यात आले नाही.त्याला विलंब लागेल असे सांगण्यात आले.ऑनलाईनने देण्या-याचे क्षेत्र कमी न होण्याचे कारण मिळावे.हि नम्र विनंती.
Question by दीप्ती शंखोलकर
26-09-2018
dsankh@yahoo.com
नमस्कार सर. अलिबाग थळ मध्ये आमची जमीन आहे. प्लॉट माझ्या आईच्या आणि काकांच्या नावावर आहे. मोजणी करून ७/१२ वेगळा करणे हा उद्देश आहे. परंतु शेजारचे २ प्लॉट व आमचा मधला अश्या ३ प्लॉट चा एक गट आहे. गटाची मोजणी झालेली नाही. मोजणी साठी लैण्ड रेकॉर्डस् ऑफिस मध्ये अर्ज देताना त्यांनी सांगितले कि सिटी सर्वे झाला आहे. सिटी सेर्वेय कडून गो अहेड आणावयास सांगितले. त्या शिवाय अर्ज घेणार नाही. सिटी सर्वे रेकॉर्डस् मध्ये जमिनेचे क्ष्रेत्रफ़ळ ७/१२ पेक्षा फार कमी दाखवले आहे. नाव बरोबर नाहीत. त्यामुळे चुकीचे सिटी सर्वे रेकॉर्डस् लंड रेकॉर्डस् ऑफिस ला सादर करणे योग्य वाटत नाही. मोजणी साठी अर्ज करताना सिटी सर्वे चे रेकॉर्ड सादर करणे ही नवीन प्रोसेस आहे का? मोजणी साठी कसे पुढे जावे यावर काही सल्ला?
Question by Hanumant
25-09-2018
ghpunewad@gmail.com
नमस्कार सर,
माझे वडीलांनी त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेपैकी घर व जमिनीचा काही भाग माझ्या नावावर त्यांच्या हयातीत त्यांनीस्वतःहून केलेला आहे. पण त्यांनी मृत्युपत्र बनवले नाही. आता मात्र माझे भाऊ-बहीण वाडीलांन्नी माझ्या नावावर केलेल्या मालमत्तेत सुद्धा त्यांचा हिस्साची मागणी करीत आहेत. या प्रकरणी त्यांची मागणी योग्य आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. व मला ती मालमत्ता विकनेचा अधिकार आहे का?
वडीलानी स्वकष्टार्जित मिळकत आपणास दिली आहे . इतर भाऊ बहीण यांचा त्यात हक्क नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल वाघमारे
25-09-2018
rahulwaghmare2086@gmail.com
सर नमस्कार आमच्या गांवातील गायरान जामिनी वर आमची जमीन आहे म्हणुन ताबा करत आहेत.ते लोक आमच्या वडिलाना गायरान जमिन पट्टा आधारित २.०० हे जमिन मिळाली आहे म्हणुन सागतात. सन 1979 ला वाटप झालेल्या गायरान पट्टा मधिल नावा माध्ये आणी त्याच्या वडीलाचे नाव व आडनाव चुकीचे आहे. त्या जामिनीचा फेरफार 1982 ला झाला आहे तेव्हा पासुन 2015 पर्यंत ७/१२ वर नोद नव्हते ति नोद कमी करण्यासाठी कोनाकडे तक्रार करावी. ते लोक आता वारसा फेरफार लावण्या साठी अर्ज करत आहेत. तो फेरफार रोखन्यासाठी व ७/१२ नोद कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by शीतल जाधव
23-09-2018
dis.jadhav@gmail.com
मा. सर,
मी शीतल निलेश जाधव, राहणार चाकण, ता. खेड, जि. पुणे
खालील विषया बाबत आपले बहुमोल मार्गदर्शन मिळावे या अपेक्षेने हे विनंतीपत्र लिहित आहे.
माझ्या मामाने आजोबांच्या (आईचे वडील) संमतीने माझ्या कडून काही मोबदला देऊ असे तोंडी सांगून विनामोबदला हक्कसोडपत्र करून घेतले आहे , परंतु दोन वर्षे पूर्ण होऊन सुद्धा कुठलाही मोबदला दिला नाही. (सदर जमिनीचे क्षेत्र पिंपरी-चिंचवड पुणे जिल्हा निवासी क्षेत्रात आहे.)
दोन वर्ष पूर्ण होऊन सुद्धा रक्कम मिळाली नसल्याने त्या बाबत कोणती कार्यवाही करावी यासाठी मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.जेणेकरून माझेवर उपकार होतील.
मामानं विनंती करा . आपण नोंदणीकृत दस्त करू दिला आहे . त्याचा वेळी आपण मोबदला घेणे आवश्यक होते .
हक्क सोड पत्रकात , जमीन मोबदला देऊ असे नमूद आहे कि ? विनामोबदला . हे तपासून पहा .
मोबदला देऊ असे नमूद असेल तर , फसवणुकीचा दावा /गुन्हा दाखल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Hemraj jadhav
20-09-2018
hemrajjadhav1985@gmail.com
Namsakar sir me colective farmig socity cha sabasad asun me ti jamin kasat aahe pan amche konte hi sabsad che nav 7/12 var lagle nahi ahe 7/12 var chairman ani socity che nav ahe sahakar vibhaga ne
Jamin vatap cha Adhesh tasildar office la 1990 sali patvala hota kahi varshnatar santa dissolve jali tari amche 7/12 nav lagle nahi sir ami konala arja karaycha va konte document arjala lagtil krupya amala marga dakva hi namravinti
संस्था विघटित झाली असेल तर , त्याचवेळेस जमिनीची विल्हेवाट , आवस्यकने लावली असणार . संस्था विघटनाची आदेश पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सीमा सावंत
19-09-2018
sawantseema176@gmail.com
नमस्कार सर, आम्ही २५ वर्षांपूर्वी कुलमुखत्यारातर्पे जमिन रजिस्टर्ड खरेदीखताने विकत घेतली आहे. त्या खरेदीखतात काही सहहिस्सेदारांची नावे कुलमुखत्याराच्या चुकीने नमूद करायची राहून गेली तरी सदर सहहिस्सेदार आपला जमिनीवर हक्क सांगू शकतात का? कुलमुखत्यार आता हयात नाही.
Question by rahul
19-09-2018
rahulsankalpana@gmail.com
can we sell part of unpartitioned ancestral property
in gaothan to stranger when the name of members is only on tax extract & city survey extract is not there ?
Question by अभिजीत
18-09-2018
abhijitkadam55@gmail.com
महोदय माझ्या सन १९७२ साली माझी आजी माझ्या वडीलांची व काकांच्या जमिनीस अज्ञान पालक वारस होती त्यावेळेस एक जमिन विकली परंतु मा जिल्हाधिकारी यांनी फेरफार मंजुरी वेळेस तो अज्ञान वारसामुळे सदर व्यवहार रद्द करण्यात यावा व नोंद नामंजुर केली व फेरफार रद्द केला परंतु सदर जमिन पुन्हा दरम्यानच्या काळात परत आजीच्या नावे झाली नाही नंतर दोन वर्षानी ज्याने खरेदी केली त्याने अज्ञान वारसांचा फायदा घेऊन ताबा आहे असे नमुद करून तलाठी बदल्यानंतर फेरफार मंजुर करून घेतला आता ती जमिन वारसांच्या नावे केली आहे मला जमिनी संदर्भात कागदपञांचा शोध घेताना ही बाब लक्षात आली तर याबाबत कायदेशीर काय करावे लागेल व सदर जमिन परत मिळु शकते का कृपया मार्गदर्शन करा
Question by Kaunain shaikh
18-09-2018
kaunainshaikh2780@gmail.com
Sir,, majhya ajjobana 1952 sali tyanchi aatya mayat jhalya nantar '' waras naslyane bhavacha mulaga mhanun waras'' ashi 6 d chi nond houn navin avibhajya shart chi jamin milali aahe. Sadar jamin atyana tyanche pati che mrityu nantar milali hoti 1) sadar shet jamin swatantra milkat samjali jayil ka?
2) ajoba tyanche icche ne sadar jamin bakshis deu shakta ka?
Question by vikas sanap
15-09-2018
vikassanap1993@gmail.com
namaskar sir mi vikas amchi jamin 1981 year la percoolation tank (pazar talav) sathi 1.57 hector bhusampadan zali ahe. Amhala ti jamin puna sheti sathi vaparta yeil ka? Tysathi konachi permission ghavi lagel ? Amhi tysathi lagnara mahasul bharnyas tayar ahot.
जागा संपादन झाली कि , भूसंपादन संस्थेच्या नावे होते . त्याचा वापर संपादन ज्या कारणासाठी झाले आहे त्यासाठी होत नसेल तर
अश्या जागेची विल्हेवाट जिल्हाधिकारी यांचे मार्फत होते . त्यासाठी जागा अन्य , सार्वजनिक कारणासाठी आवश्यक असल्यास , अश्या सार्वजनिक उपक्रमासाठी देण्यात येते . अन्यथा तिचा लिलाव केला जातो . आपण लिलावात भाग घेऊ शकता .
( भास्कर पिल्लई विरुद्ध केरळ सरकार - सर्वोच्च न्यायालय .....)
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राकेश विश्वकर्मा
15-09-2018
vishvakarmar@gmail.com
आदरणीय सर, जर रजिस्ट्रेड खरेदी मध्ये क्षेत्रफळ नमूद नसेल, प्रपोर्टी कार्ड वर क्षेत्रफळ च्या ऐवजी १/३ आणि २/३ असे हिस्से लिहिली असेल, खरेदी खाता प्रमाणे वास्तविक जागा नसेल व संबंधित जागेला घेऊन न्यायालयात प्रकरण चालू असेल तरी त्या जागेची खरेदी विक्री होऊ शकते का ?
खरेदी खतात क्षेत्रफळ नसेल तरी त्यांचे मिळकत पत्रिकेवरील हिस्स्याच्या प्रमाणात मिळकत हस्तांतरित होऊ शकते . (कलम ४७ - मालमत्ता हस्तांतरण कायदा ) .
न्यायालयीन प्रकरण चालू आहे म्हणून हस्तांतरानावर न्यायालयाच्या निर्बंधांशिवाय , मर्यादा नाही .
मात्र खरेदी खताप्रमाणे जागाच नसेल तर , हस्तांतरण कशे होईल ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
