जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर,आदिवासीच्या जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम १९७४ च्या काह्यदया नुसार दावा केला आहे.परंतु ती जमीन कुल कायद्या नुसार १९६४ ला आम्हाला भेटली आहे त्या नंतर ती जमीन शससकीय चुकीमुळे किंवा कसे ती जमीन पुन्हा १९६७ ला एका गैरआदिवासी ला कलम ३२ (ग) नुसार विण्यात अली आहे. त्याच त्यामुळे आम्हाला असं वाटतंय कि हि जमीन आम्हाला भेटणार नाही .याचे उत्तर लकावरत लवकर दयावे हीच नम्र विनंती .
आपण आदिवासी खातेदार आहेत कि बिगर आदिवासी खातेदार ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर , एका अर्ध शासकीय संस्था (सिडको ) या संस्थेने आमचे तात्पुरते पुनर्वसन त्यांचे खाली असलेल्या प्लॉट मध्ये केले आहे .आणि तेथे २०१६ मध्ये महानगर पालिका अली आहे . त्याच प्रमाणे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे काही अधिकारी म्हणाले कि तुम्हाला आम्ही नोटीस ठेऊन उठवू .तर माझा असा प्रश्न आहे कि एका संस्थेच्या जमिनीला महानगर पालिका अधिनियम १९४९ चे कलम 81(ब) एक ची नोटीस देऊ शकतात का .?
८१ बी ची नोटीस म्हणजे , महानगर पालिकेच्या मिळकतीवर , अनधिकृतपणे , एखादा इसमाचा कब्जा असेल तर , अश्या इसमास त्या मिळकतीतून काढून टाकण्याचा , महानगरपालिकेस अधिकार आहे .
आपले पुनर्वसन CIDCO ने , महानगरपालिकेच्या जागेवर केले आहे का ?
आलेली नोटीस सिडको अधिकारी यांना दाखवा . त्यांना आपले कायमचे पुनर्वसन करणे बाबत मागणी करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार किरण सर .
जर एखादी जमीन इनामाची असेल व ती जमीन अजून पर्यन्त रिग्रेन्ड झाली नसेल व त्या झमीचा ७/१२ वरती सरकार उपयोगी नोकर इनाम वर्ग ६ ब असा शेरा आहे . सादर सर्वे नंबरचे इनाम पत्रक पाहिले असता सरकार उपयोगी वंशपरंपरागत असं उल्लेख आहे
तर माझा असं प्रश्न आहे कि त्या जमिनीला कुल लागू शकते का . कुला कायदा कलाम ८८ कअ नुसार . सर कृपया उत्तर मिळावे .
जमीन पुनर्प्रदान झाली नसेल तर ती जमीन शासकीय आहे . शासकीय जमिनीस कुल कसा लागेल ?
मात्र कुल हा , जमीन काढून घेण्याच्या आधीपासून असेल तर , कुळाला जमीन पुनर्प्रदान करता येते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
किरण साहेब प्रथमतः आपल्या अमूल्य सल्ल्यांबद्दल आणि वेळेबद्दल धन्यवाद. मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. सर आपण मला माझ्या मागील प्रश्नाचे उत्तर खालील प्रमाने दिले ते असे.
अ या व्यक्तीच्या नावे, सर्वात पहिले खरेदी खत आहे . कायद्या मध्ये
Who is prior in time , is prior in law .........
त्यामुळे जरी फेरफार नसला तरी त्याचा हक्क आहे . त्याचे नाव लागणे आवश्यक आहे.
हे म्हणने बरोबर पंरतु
१) सदरील 'अ' या व्यक्तिच्या तथाकथित खरेदिखताला सुमारे २९- ३० वर्षापुर्वी 'खातेधारकाने' व 'अ' व्यक्तिने अन्य ञयस्थ म्हणजे 'ब' किंवा 'क' वक्तिची फसवणुक किंवा अन्य काहि कारणास्तव तथाकथित खरेदिखत मलिन हेतुने दिसत आहे. खातेधारक मयत आहे खातेधारक मयत झाल्यानंतर 'अ' या व्यक्तिने वाद उपस्थित केलेला आहे व खातेधारक व 'अ' या व्यक्ति नातेवाईक असल्याचे बाहेरील तपासावरून कळते. कृपया सर योग्य उपाय सुचवा.
२)सदरील 'अ' व्यक्तिचा ७/१२,महसुल रेकार्डला, वहिवाटिचा,मालकीहक्क,ताबाहि व उपभोगाची/वहिवाटिची सुमारे ३०/३५ वर्ष कोठेही नोंद नाही.....फक्त पोकळस्त खरेदिखत आहे.अन्य काहि कारणास्तव केलेले आहे. कोठेहि नोंद नाहि.
३)सदरील शेतजमिन 'खातेधारक' त्यानंतर 'ब'व्यक्तिची व त्यानंतर 'क' व्यक्तिची( म्हणजेच माझ्या वडीलाची व काका --'क' व्यक्ति )३०-३५ वर्षापासुन ७/१२,महसुल रेकार्डला व प्रत्यक्ष वहिवाटीसह, मालकिहक्क,ताबा,व सर्व उपभोगत आहे व अशा नोंदि सुध्दा आहेत.
४)'क' व्यक्ति म्हणजे वडिलांनी व काकाने सदर शेतजमिन 'ब' व्यक्तिजवळुन नोंदनिकृत खरेदिखताने विकत घेतलि तेव्हापासुन आजपावेतो (सुमारे २५ वर्ष ) झाले मालकीहक्कासह कब्जात आहे.व वहिवाटत आहे.व महसुल विभागाचा कर भरणा आजपावेतो भरत आहे.
५)सर ३० वर्षापुर्वी इतर कोणत्याहि कारणास्तव वा फसवणुकिसाठी केलेले पोकळस्त खरेदिखत रद्द बातल करण्यासाठी काय करावे.
सर योग्य मार्गदर्शन मिळणेस विनंती.......
खरेदी खत जर फसवणूक करून घेतले असेल , तर आपणास दिवाणी न्यायालयाकडून रद्द करून घ्यावे लागेल .
तांब्याची नोंद ७/१२ स नसते . कदाचित त्याने जमिनीचा ताबा घेतला नसेल .
आपण दिवाणी न्यायालयात हि दावा दाखल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री पाणबुडे सर
१).) Adverse possession साठी कोणता पुरावा लागेल ताबा सिद्ध होण्यासाठी मार्गदर्शन करावे
२)जमीन दुसऱ्या व्यक्तीने विकली त्याच्या नावावर होती म्हणून त्याने विकली आपण मागील उत्तरात संयुक्तिक adverse possession , ने केस दाखल करण्यासाठी सांगितले पण न्यायालयाचा निकाल २ वर्षे पूर्वी लागला आहे , निकाल लागण्यापूर्वी सामनेवाले यांनी जमीन २०११ ला विकली आहे, निकाल २०१६ ला लागला , सामनेवाले ह्यांनी तडजोड करणेसाठी सांगितले होतेम्हणून केस ला आम्ही गेलो नाही मागील प्रश्न बघून उत्तरे द्यावी हि विनंती ,,
आपण आपले वकिलांचा सल्ला घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
05-09-2018
sagarkandekar1990@gmail.com

नमस्कार सर.
जमीन सोयीनुसार अदलाबदल करावी या साठी आपण Exchange deed करावे असे सांगितले पण जर जमीन ही नवीन शर्त व सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवागीशिवाय हस्तातरस बंदी ह्या शेरा इतर हक्कात असेल तर मा. अप्पर जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल का..?
हो
सक्षम अधिकारी यांची परवानगी आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,
माझ्या 7-12 ऑनलाईन उताऱ्यावर ‘हा ७-१२ बंद झाला आहे’ असा शेरा दिसत आहे, हा काय प्रकार आहे व बंद करण्या संदर्भात कोणतीही पूर्व सूचना न देता हे असे कसे काय होऊ शकते ?
गट न.235 (भोगवटदार वर्ग - 2 ) हा 7 गुंठे + पोटखराबा 3 गुंठे असा एकूण 10 गुंठे चा असून त्याच्या इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्त ,तुकडा व स.सा.कुळ म्हणून 8 व्यक्तीचे नावे हे जी 1988 रोजी वारसांनी लागेली होती.माझा स्वतःचा गट न.236(130 गुंठे) हा गट न.235 च्या शेजारी असून...
1. मी तुकडे बंदी कायद्या अधीन तो खरेदी करू शकतो का..? मूळ मालक मला विकण्यास तयार आहे.
2. कुळाची खरेदीसाठी परवानगी घ्यावी लागेल का..?
3.मागील 50 वर्षी पासून मूळ मालकच जमीन कसत असून पिकपेरे त्याचेच नावानी आहे तर जमीन वर कुळ असलेले व्यक्तीचे नाव तहसीलदार साहेब कमी करतील का ? कुळाच्या वडील चे कूळ म्हणून 1968 साली लागले आहे.
१. आपण लगतचे खातेदार असाल व सदर तुकडा पूर्वीचा असेल ( कायदा येण्यापूर्वीच ) तर आपण खरेदी करू शकता .
२. अविभाज्य शर्थ जमिनीस कुल कसा लागू शकतो . अविभाज्य शर्थ जमीन म्हणजे , एखाद्यास कसण्यासाठी दिलेली जमीन . कुल आहे म्हणजे त्या व्यक्तीने जमीन स्वतः कसलेली नाही , म्हणजे तो शर्थ भंग हि होऊ शकतो .
३. कदाचित जमीन vatan जमीनही असू शकते . असल्यास संबंधित vatan कायद्याच्या तरतुदीनुसार विक्री /खरेदी शक्य .
४. कुळाचे नाव कमी करणे सध्यस्थित अशक्य . तथापि कलम १४ , १५ अथवा ३१ चा आधार घेऊन काही शक्यता तपासू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर
आम्ही आमच्या आजीच्या नावावरील जमिनीचे फोड वाटणी करू इच्छितोय आजीला एकूण ५ वारस आहेत २ मुली व ३ मुले त्यापैकी माझे वडील एक जे मयत आहेत .पण आम्ही मिरज तहसिल कार्यालयात गेलो तेव्हा कळले की फोड वाटणी बंद झाली आहे आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला ३३ गुंठे जमीन येते ..आम्हाला फोड वाटणी करायची आहे पण फोड वाटणी बंद झाल्याचं आम्हाला कळलं ..तर यावर अता दुसरा काही मार्ग आहे का प्रत्येकाला आपापल्या नावावर जमीन नोंद करून घ्यायला plz help
फोड वाटणी म्हणजे आपणास वाटप असे म्हणावयाचे आहे का ?
जर जमिनीतील हिस्स्याबाबत वाद नसेल तर , कलम ८५ खाली वाटप करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by रोशन ghute
02-09-2018
rghute122@gmail.com

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ या नियमाखाली एखाद्या प्रायव्हेट संस्थेच्या जमिनीत असलेल्या अतिक्रमण धारकाला ८१(ब)(१) ची नोटीस देऊ शकतात का .?
सर माझ्या वडिलांनी २०११ साली माझ्या चार आत्यांच्या रजीस्टर हक्कसोडपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून घेतला आहे.परंतु,२०१६ साली त्यापैकी तीन आत्यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे की,त्यांना फसवूण हक्क सोडपत्र घेतला आहे,तरी अशा विचीत्र परिस्थीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करावे?
भारताच्या करार कायद्यानुसार
कलम १९ अन्वये , जो करार , coercion , fraud अथवा misrepresentation या कारणासाठी रद्द केला जाऊ शकतो
फसवणूक केलेली नसेल तर काही घाबरण्याचे कारण नाही




Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by K Gundu
31-08-2018
gundu.karambalkar@gmail.com

नमस्कार सर,
कु का क ४३ नवीन शर्तीने असलेल्या क्षेत्राची ही अट शिथील करून घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रापैकी ३२ म ने लागलेल्या आमच्या नावांचा फेरफार रेकॉर्ड ऑफिस मध्ये मिळत नाही तसे निकाली पत्र दिले तर आमच्याकडेही त्या जमिनीचे सेल सर्टिफिकेट/ खरेदी दस्त नाही आहे तर हा फेरफार / सेल सर्टिफिकेट कसे मिळेल. ३२ म ने झालेल्या खरेदीची तारीख पण माहीत नाही तर खरेदी पत्र नक्कल मिळेल का??
ह्या शिवाय अट शिथील होणार नाही म्हणतात ह्याला काही मार्ग आहे का?????
७/१२ वर नियंत्रित सत्ता प्रकार लिहले असेल . तेवढे शर्थ शिथिल करण्यासाठी पुरेसे आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब नमस्कार
माझी प्रांत साहेबांच्याकडे मृतू पत्राची जमिनीची केस चालू होती ,व आम्ही दिवाणी न्यायालयात सुद्धा केस चालू आहे त्याच्या तारखा चालू आहेत, परंतु प्रांताधिकारी यांच्याकडील केस केसचा निकाल डिसेंबर २०१७ ला निकालावर पडली ,निकाल झाल्यानंतर
निकाल पोस्टाने येईल असे सांगण्यात आले ,परंतु निकाल पोस्टाने आला नाही ,निकालाची वाट बघून आम्ही निकालाची नक्कल मिळण्यासाठी ०१.०८.२०१८ ला अर्ज केला ,व निकाल
23.०८.२०१८ ला हातात मिळाला आहे,निकाल आमच्या विरोधात गेला आहे ,आम्ही अप्पर जिल्हा अधिकारी यांच्याकडे अपील करणार आहे ,आमच्या परस्पर तलाठी ,व मंडल अधिकारी यांना निकाल लागल्यानंतर लगेच पोस्टाने अगोदर पोहोच झाला होता ,आंम्ही चौकशी केली असता तलाठी यांनी ७/१२ वरती नोंद केली आहे ,पण आम्हाला निकालाची नक्कल लेट दिली ,आता पुढील स्टेप काय घ्यावी काय करावे हे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
आता अपील लवकर दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर. मी प्लॉट विकत ज्या व्यक्ती कड्णे घेतला. त्या व्यक्ती ने मला रजेस्ट्रि कार्यालय या ठिकाणी रजेस्ट्रि करून दिला.व तो तेथे रेकॉर्ड यादी मध्ये रजिस्ट्रि रेकॉर्ड ला आहे.पण मी ज्या व्यक्ती कड्णे विकत घेतला त्या व्यक्तीचा त्या प्लॉट वर फेर झाला नाही.त्या वर जो जुना मालक आहे.त्या व्यक्तीचे नावे आहे. या विषयी मला पडलेले काही प्रश्न. (1)जर का रजेस्ट्रि फ्रॉड आहे तर मंग रजेस्ट्रि कार्यालयात सर्व प्रोसिजर होऊन सुधा ती खोटी कशी. (2)जर ती खरच खोटी असेल तर कुणावर करवाई करता येईल.व याचा उपाय काय. (3)मी ज्या कड्णे विकत घेतली तो व्यक्ती मरण पावला आहे.व त्याच्या घरचे त्यांची वाईफ आहे.पण ते ही म्हणतात.की तो प्लॉट कुणाकुण विकत घेतला अम्हाला काही माहीत नाही. (4)मी माहिती आधिकार पत्र दुय्यम निबंद कार्यलयात माझ्या खरेदीखत नंतर तो प्लॉट ज्या क्षेत्रात आहे त्या ठिकाणचे नाव व गट नम्बर व प्लॉट व त्या नम्बर व त्या व्यक्तीचे नाव हे सर्व लिहून मी आर्ज केला.पण त्यांनी माला असे उत्तर दिले की तुम्ही स्वतः येऊन शोध घ्या हे त्यांचा उत्तर बरोबर आहे का (5)व माझ्या नावे फेर होण्या करिता कुणाकडे आर्ज करू शकतो. तरी मी आपणास विनंती करतो की मी जे काही माझ्या ह्या प्रकरणा विषयी मला जेवढे सुचले आहे ते मी आपणास ह्या मेलच्या द्वारे आपणास मेल व विनंती करतो की आपण ह्या प्रकरणात मला आपल्या माहिती नुसार मार्गदर्शन करावे ही आपणास विनंती
आपण प्लॉट खरेदी करताना , विकणारी व्यक्तीचे नांवे प्लॉट आहे का ? याची खात्री करणे आवश्यक होते .
आपण ज्या व्यक्तीकडून प्लॉट घेतला त्या व्यक्तीने नोंदणीकृत दस्ताने सदरचा भूखंड खरेदी केला होता का ? जर नोंदणीकृत दस्त केला असेल व केवळ मिळकत पत्रिकेवर नाव लावायचे राहिले असेल , तर घाबरण्याचे कारण नाही . आपले नाव लागेल . मात्र जर नोंदणीकृत दस्त नसेल तर , जी मूळ मालक व्यक्ती आहे , त्याने मेहेरबानी केली तरच ..........

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर ,
आमचे खापर पणजोबा नि सॅन १९१८ साली सध्याच्या मीरा भायंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पूर्वेकडील गावात गावठाण क्षेत्रात जागा विकत घेतली होती त्याचे खरेदीखत १९१८ साली वांद्रे कोर्टात रजिस्टर केले आहे तदनंतर माझे आजोबा आणि त्यांचे भाऊ यांनी सन १९८६ मध्ये त्यातील काही भाग विक्री खतअन्वये विकला त्यावर काही स्थानिकांनी अतिक्रमण करून इमारती व घरे बांधली आहेत तसेच आमचे मालकीची व ताब्यातील जी मोकळी जागा होती त्यावर मागील १२ महिन्यापासून सादर जागा हि देवालय ट्रस्ट च्या मालकीची आहे असा बोर्ड अनधिकृत पणे लावला आहे तरी सादर बोर्ड कायदेशीर रित्या हटविण्यासाठी काय करावे लागेल या बाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती
जी जागा आपले आजोबा व चुलत आजोबांनी विकली त्या बाबत आपणास कोणतेही नुकसान असण्याचे काही कारण नाही कारण ती आपली जागा नाही
जी मोकळी जागा आहे , त्यावर , देववलंय असा बोर्ड लावला आहे , त्यांना , वकिलामार्फत नोटीस द्या . नोटीस ते उत्तर देतील व त्यांनी बोर्ड कसा लावला याचे उत्तर देतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या गावाचा सिटी सर्वे १९८५ ला झाला असून चौकशी उताऱ्यावर नाव आहे पण प्रॉपर्टी कार्ड वर नाव दाखल झाले नाही. चौकशी उताऱ्यावर बिनशेती अनधिकृत केलेले बांधकाम असा शेरा आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडून चौकशी उताऱ्याचा कारण पुढे करण्यात येत असून टाळाटाळ केली जात आहे. सदर शेती गट न मधील बाकीचे प्रॉपर्टी कार्ड ना त्या त्या मालमत्ताधारकाची नावे दाखल झाली आहेत. काय करावे याबद्दल मार्गदर्शन करावे
दुरुस्ती आकारफोड याबद्दल सविस्तर माहिती आवश्यक आहे
2005 साली सर्व वडीलोपार्जित जमिनीचे 1.आजोबा 2.आजी 3.वडील 4.काका व 5.आत्या धरुन पाच हिस्से करून रजिस्टर वाटप झाले. परंतु एका गटाचे क्षेत्र-10एकर होते ते चासकमान धरण लाभ क्षेत्र आरक्षण होते. म्हणून त्या एका गटाचे 100 रुपये स्टँप वर 2.वडीलांना -5एकर व 3.काकांना -5एकर असे 2 हिस्से केले. व 1.आजोबा 2.आजी व 5.आत्या यांनी त्यांचा असणारा हिस्सा विना मोबदला या वाटपपत्रान्वये सोडून दिला व त्यावर सर्वांनी साक्षीदारांसमवेत स्वास्वाक्षरी केली. व 7/12 पत्रकी आजोबांचे नाव राहिले. व असे ठरले की आरक्षण/बंदी गेल्यावर हे वाटपपत्र नोंदवून घ्यायचे.
2007 साली 2.वडिलांचा मृत्यू झाला. 2016 साली 1.आजोबांनी जमिन विक्री बाबत जाहीर नोटीस वर्तमान पत्रात दिली. त्या नोटीसीस रितसर हरकत घेऊन कोर्टात वाटप झाले बाबतचा ठराव करून मिळामिळावा यासाठी दावा दाखल केला. व 2016ला दुय्यम निबंधक कार्यालयात नोटीस आॅफ लिस पेंडेंसी नोंदविली.
2017 1. आजोबा, 2. आजी, 4. काका व 5. आत्या यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत नोंद केली. खरेदीखत होताच 3 दिवसात आम्ही 7/12 नोंदीस हरकत दिली. कोर्टाने त्यावर खरेदीवर स्टे आॅर्डर दिली. ती स्टे आॅर्डर मंडल अधिकारी यांना दिली. त्यांनी 7/12 खरेदीखत नोंदणीसाठी मंजूरी दिली. त्या वर आम्ही प्रांत यांना अपिल केले त्यावर त्यांनी कोर्ट निकाल होई पर्यंत स्थगिती स्टे दिला.
त्यानंतर खरेदीदार यांनी कोर्टात अर्ज दिला की आम्ही खरेदीखताच्या किमती ची संपूर्ण स्टँप Duty भरावी अन्यथा दावा रद्द करण्यात यावा. त्यावर कोर्टाने आदेश दिला की हे खरेदीखत आमच्या वर म्हणजेच वादी यांच्या हिश्यावर बंधनकारक नाही असा आदेश देऊन अर्ज फेटाळण्यात आला.
तर मला वाटप झाले बाबतचा ठराव करून मिळेल का?
प्रकरण न्याय प्रविष्ट आहे . न्यायालयातच या याबाबत मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय १९९८ रोजी तालुका दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याने आमच्या वडिलोपार्जित जमिनीचे वाटप झाले. त्यानुसार एकूण ६ एकर जमिनीपैकी ४ एकर जमीन माझ्यासह इतर ३ भावांना ,१कर जमीन बहिणीला व उरलेली १ एकर जमीन आईला दिली. परंतु या हुकूमनाम्याने आईला दिलेल्या जमिनीवर अटी लावल्या होत्या कि तिला सदरची १ एकर जमीन विकत येणार नाही व तिने विकू नये तसेच जमिनीवर कोणताही बोजा करू नये. हे आईसह आम्हा सर्व मुलांना मान्य होते व त्यामुळे हुकूमनाम्यावर आईचा अंगठा व आमच्या सह्या आहेत. असे असतानाही माझ्या ३ नंबरच्या भावाने आईला फसवून २००६ रोजी खरेदीखत करून जमीन त्याच्या बायकोच्या नावावर केली. मी पोलीस स्टेशन ला केलेल्या तक्रारीनंतर खरेदीखताचे साक्षीदार बोगस निघाले. आईला समजल्यानंतर आईने खूप विनंती करून त्याला जमीन परत द्यायला सांगितली. परंतु त्याने ती दिली नाही. म्हणून २०१६ रोजी मी जमीन परत आईच्या नावे होण्यासाठी प्रांताधिकारी साहेबांकडे अपील केले. त्या अपिलात मी आईला प्रतिवादी म्हणूनच ठेवले होते कारण जमीन तिच्याकडून भावाच्या बायकोकडे हस्तांतरित झाली होती म्हणून तसेच तिच्या आजारपणामुळेही. वस्तुतः आई माझ्याच बाजूने होती व आहे. यावर प्रांतसाहेबानी डिसेंबर २०१७ रोजी माझ्या बाजूने निकाल देऊन जमीन परत आईच्या नावे करण्याचा निकाल दिला. परंतु निकाल विरोधात गेल्यामुळे भावाने परत एकदा आईचे फसवून अंगठे घेऊन खोटे प्रतिज्ञापत्र करून मा.अपर जिल्हाधिकारी साहेबांकडे अपील केले आहे.त्याबाबत १ सुनावणी झाली आहे व पुढील सुनावणी १ महिन्यानंतर आहे. आईने फसवून अंगठे घेतल्याबाबत पोलीस स्टेशन ला तक्रार केल्यानंतर भावाच्या विरोधात FIR नोंद झाली आहे. आता माझा प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
--आईकडून जमीन भावाच्या बायकोकडे हस्तांतरित झाल्यामुळे मी प्रांताधिकारी साहेबांकडे केलेल्या अपिलात आईला प्रतिवादींमध्येच ठेवले होते. वस्तुतः आईला प्रांताधिकाऱ्यांचा निकाल मान्य आहे. परंतु भावाने फसवून अंगठे घेऊन आईला त्याच्या बायकोबरोबर वादींमध्ये ठेऊन सदर अपील केले आहे. याविरुद्ध आईने मागच्या सुनावणीत लेखी अर्ज दिला आहे. पुढील सुनावणीत मी स्वतः आईला घेऊन अप्पर जिल्हाधिकारी साहेबांसमोर जाणार आहे. तर माझा प्रश्न आहे कि , आईला प्रांताधिकारी साहेबाचा निकाल मान्य असल्यामुळे व फसवून अंगठे घेऊन वादी केल्यामुळे आता तिला वादींमधून माझ्याबरोबर प्रतिवादी म्हणून समाविष्ट करता येईल का? आईचेही हेच म्हणणे आहे. तर त्यासाठी अपर जिल्हाधिकारी साहेबांसमोर कशी बाजू मांडावी? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद..
आपले आई ने अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून , आई चे नाव अपीलकर म्हणून कमी करून सामनेवाला म्हणून सामाविस्ट करणे बाबत मागणी करावी . अप्पर जिल्हाधिकारी प्रकरणाचा विचार करून , आई ची मागणी मान्य करतील
मात्र आपले आई ची भूमिका पहिली तर , आई एकदा आपले बाजूने तर एकदा आपले भावाचे बाजूने निर्णय घेत असल्याचे दिसून येते . आई ची भूमिका ठाम असणे आवश्यक .
दिवाणी प्रक्रिया संहितेच्या तरतुदी या जरी अर्ध न्यायीक कामास लागू नसतील तरीही , त्यातील तरतुदींचा आधार घेतला जातो . दिवाणी प्रक्रय संहिता
Order I - वाचावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री किरण पाणबुडे सर
१) जमीन २ बिल्डरांना विकलेली आहे पण त्यांनी अजून तरी जमिनी चा ताबा घेतला नाही त्यांना आमचा ताबा माहित आहे म्हणून त्यांनी स्वस्तात जमीन विकत घेतली त्या जागेवर आम्ही शेती करतो हि जागा ठाणे भागात आहे .
२) सामनेवाले ह्यांनी पहिले जमीन विकण्याअगोदर आमच्या विरुद्ध केस दाखल केली आम्ही केस ला गेलो पण काही दिवसांनी त्यांनी जमीन विकली आम्हाला वाटलं जमीन विकली कि सगळे संपले , त्यावेळेला तो सामनेवाला बोलला कि तुम्हाला अर्धे पैसे देईन जमिनीचे पण ते अर्धे पैसे पण दिले नाही आम्हाला वाटलं कि केस बंद झाली असेल त्यांनी उर्वरित जमीन नावी करून देण्याचे आश्वासन दिले मग केस ला जाण्याचे बंद झाले आमचे, पण काही वर्षांनी त्याने बाकी राहिलेली जमीन पण विकली आणि आम्हाला कोर्टाचा निकाल दाखवला कि त्याच्याबाजूने निकाल लागला आहे ,
३) आमच्या नकळत सामनेवाले ह्यांनी १ केस कोर्टात चालू ठेवली तो निकाल २०१६ ला लागला त्या निकाल विरुद्ध अपील करावे का ? कि adverse possession act खाली अपील करावे ?
४) adverse possession act साठी कोणते पुरावे सादर करावे लागतील कोर्टात फेरफार आहेत आमच्या नावावर जमीन झाल्याचे खरेदीखत पण आहे ब्रिटिश कालीन आपण मार्गदशन करावे
५) २०१६ ला लागला आहे निकाल त्याविरुद्ध आत्ता काही करता येईल का? आपण मार्गदर्शन करावे ...
आपण जमीन विकली आहे . केवळ जमिनीवर आपला ताबा आहे , व ज्यास विकली त्याचे नावावर नाही म्हणून , आपण , हरकत घेत आहेत .
निकाल त्याचे बाजूने लागला आहे . निकाल लागून जवळ जवळ २ वर्षे कालावधी पूर्ण होत आला आहे . त्यामुळे आता प्रथम झालेला विलंब न्यायालयाने अपील दाखल करते वेळी मान्य करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब
मी राहुल सावंत माझे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे . माझा प्रश्न असा आहे कि आमची वडिलोपार्जीत जमिनीतील सातबारांवर माझ्या वडिलांनी गाव नमुना 6 क च्या अनुषंगाने त्याची व माझे लहान चुलते यांच्या नावानी तालाट्यांकडे वारस तपासणीसाठी अर्ज केलेला होता . तरी तळाटी यांनी सातबारावरील सर्व सहवारसदारच्या सही घ्याला सांगितले आहे पण आमचे सर्व वारसदार या नोटिशीवर सही करण्यास तयार नाहीत तरी आता आम्ही काय करावे त्याच्या सही शिवाय माझ्या वडिलांचे व काकांचे नाव सातबारावर लागेल काय याचे मार्गदर्शन करावे
आपला नम्र
राहुल सावंत
७/१२ वरील जो सह धारक मयत होतो , त्याचेच वारस , नोंद होण्या करता अर्ज करू शकता . आपले कथनावरून ७/१२ वर , आपले आजोबांचे नाव असावे . ते मयत असतील तर . त्यांचे नंतर, त्यांचे वारसांची नावे ७/१२ सदरी , लावता येतील . त्यासाठी अन्य सह धारकांची संमती आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

चार भावांची समान एकत्रित जमीन असून त्यातील दोन भावामध्ये वाद असल्या कारणांनी खाते वाटपासाठी दोन भावाचा
खाते वाटपासाठी नकार आहे ती सामान वाटप करावयाची आहे त्यासाठी काय करावे लागेल
दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ च्या कलम ५४ प्रमाणे जमिनीतील प्रत्येकाचा हिस्सा निश्चित करून , हिस्स्याप्रमाणे ताबा मिळण्यासाठी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार, शेतजमिनीचे रजिस्टर वाटणी पत्र झाले आहे. फेरफार सुद्धा झाला आहे. फेरफार नुसार सातबारावर क्षेत्रफळ सुद्धा प्रत्येक नावासमोर दर्शवले आहे . आता आम्हाला आमच्या नावे वेगवेगळे सात बारा पाहिजे असल्यास काय करावे लागेल ? एकूण 2 सातबारा आहेत. त्यातील एक सातबारावरील जमीन गावाशेजारी आहे तर दुसरी गावाबाहेर लांब आहे. मला गावाशेजारील जमीन मिळाल्यामुळे इतर भाऊ नाराज आहेत. तरी आता जमिनीचे अदलाबदल करण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करावे.
अदला बदल करण्यासाठी , सर्वांचे संमतीने Exchange Deed करा .
७/१२ वेगळा करण्यासाठी जमिनीची मोजणी करून , आकारफोड पत्रकाद्वारे , स्वतंत्र ७/१२ करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय सर/मॅडम,
आमची वडिलोपार्जित भोगवटा वर्ग 2 च्या अंतर्गत 33 गुंठे (लागवड) + 5 गुंठे (पोटखराबा) अशी एकूण 38 गुंठे जमीन आहे.
त्यावर मयत आजीचे नाव कमी करून 6 आत्या आणि वडील यांची वारसनोंद करून घेतली.
वडिलांच्या निधनानंतर आई, 3 विवाहित बहिणी, 1 अविवाहित बहीण व मी स्वतः अशी वारसनोंद करून घेतली आहे.
सध्या सातबारा वर एकूण 12 नावे आहेत, त्यातून 6 आत्या आणि 3 विवाहित बहिणी अशी 9 नावे हक्कसोड करून कमी करायची आहेत.
मला आत्ता जमीन विकायची नाहीये पण भविष्यात काय होईल ते माहीत नाही.
भविष्यात जमिनीचा काही विक्री झाल्यास त्यांना त्यांचा हक्क देण्यात येईल अशा प्रकारचा समजोता करार 6 आत्या आणि 3 विवाहित बहिणींच्या सम्मत्तीने नोटरी करून करायचा आहे, तर हे शक्य आहे का?
समजोता कराराद्वारे हक्कसोड करून घेता येतो का, त्यासाठी काय करावे लागेल, अशा हक्कसोड साठी स्टॅम्प ड्युटी किंवा इतर काही फी भरावी लागते का?
आणि समजोता कराराद्वारे हक्कसोड करण्यापूर्वी भोगवटा वर्ग 2 जमिनीला वर्ग 1 मध्ये रूपांतरित करावी लागेल का?
जमीनवर्ग २ ची आहे . त्यामुळे आत्या व आपल्या बहिणींनी आपले लाभत हक्क सोड पत्रक केले तर , आपणास अनार्जित उत्पनाच्या ५० % रक्कम शासनास जमा करावी लागेल .
तसेच हक्क सोडण्यासाठी जिल्हाधिकारी / आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पदोन्नती बाबत सर माझी नियुक्ती दिनांक १०/०७/१९८६ रोजी डी एड स शी या पदावर व मी २००७ ते २०१२ पर्यंत माझी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पूर्ण केली असून दिनांक ३१/०७/२०१८ रोजी मु अ सेवानिवृत्त झालेत श्री डी आर
काळे यांची नियुक्ती दिनांक ०६/०७/१९८७ रोजी बी ए बी एड
या पदावर झाली आहे तर मी श्री मते मु अ होऊ शकतो का
ध्यानवाद
या मंचावर महसूल विषयी व महसूल आस्थापनेविषयी उत्तरे दिली जातात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3