जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

७/१२ भोगवटा सदरी रेषेच्या वर सरकार असे नाव व त्याच्यापुढे त्याचा फेरफार क्र.आहे.रेषेच्या खाली इतर खातेदारांची नावे आहेत.आशा ७/१२ साठी भूधारणा पद्धत कोणती निवडायची?
जमीन जर सरकारी असेल तर , इतर खातेदाराची नवे ७/१२ वर असण्याचे कारण काय आहे ? जुने फेरफार पाहून , अधिउकर अभिलेख अद्यावत करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखाद्या जागेत इमारतीचे बांधकाम चालू असताना गौणखनिज उत्खनन केल्यास त्याबाबतचा का.तलाठी यांनी पंचनामा करतेवेळी मूळ मालक किंवा त्यांचा प्रतिनिधी यांची उपस्थिती आवश्यक असते का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
मूळ मालक किंवा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे . त्यांना आगाऊ सूचना देणे आवश्यक . जात ते जाणूनबुजून हजर नसतील तर , पंचांचे उपस्थित पंचनामा करण्यात यावा . पंचनाम्यात , मालकांना नोटीस दिल्याचे व ते गैर हजर राहिल्याचे नमूद करावे . सादर बाब पंचांचे हि निदर्शनास आणून द्यावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब . देवस्थानची शेतजमीन आमच्या ताब्यात आहे.सदरील 7/12वर इतर हक्कात साधे कूळ व सरंक्षित अशा दोन्हीही ठिकाणी आमचीच नावे लिहिली आहेत व 4 ट्रस्टीची नावे आहेत ती 50-60वर्षे जुनी आहेत. माझा आपणास असे प्रश्न आहे की साधे व सरंक्षीत कूळ अशी दोनवेऴा नावे का लिहिली व त्याचा आम्हास पुढे कायदेशीर फायदा मिळू शकेल का ?दूसरे ट्रुस्टि म्हणून जी नावे दाखल केली होती ते व त्यांची मुले मयत झालेली आहेत.अशावेळी त्यांचे नातू वारस म्हणून दाखल करू शकतात क? तिसरा प्रश्न असाकि देवस्थान नावे कमी करण्यासाठी काय करता येईल? वा धर्मादाय आयुक्ताकडे त्यासाठी अर्ज करता येईल का?कारण देवस्थान विक्रीस स्थगित असा कोठेही शेरा दिसून येत नाही.कृपया पूर्ण मार्गदर्शन केले तर बरे होईल साहेब.
या पूर्वीची उत्तरात खालील दुधर्न वाचण्यात यावी . जर णयासाचे सर्व उत्पन्न , ण्यासष्ठी वापरले जात असेल तर , अश्या जमिनीची कुळाचे लाभत विक्री होऊ शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साधे कुल किंवा सौरिक्षीत कुल असे एकच नोंद इतर हक्कात असणे क्रमप्राप्त आहे . दोन नोंद असतील तर , फेरफार पाहून , योग्य तो नोंद ठेव्याची कार्यवाही करावी .
जर ट्रस्ट नोंदणीकृत असेल तर , विश्वस्त मयत झाल्यावर / राजीनामा दिल्यावर कोणाची नावे लावायची या बाबत , सार्वजनिक न्यासाचे घटने मध्ये तरतूद असते . त्या प्रमाणे विश्वस्तांची नावे लावली जातात . कृपया उक्त न्यासाचे घटना पहा .
देवस्थान जमिनीची कुळाचे नावे विक्री होऊ शकते . तथापि , सर्व उत्पन्न न्यासाचे कामासाठी उपयोगात आणले जाते असे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांनी दिलेले असणे आवश्यक
मा. धर्मदाय आयुक्त यांनी मालकांना म्हणजे न्यासाला जमीन विकण्याची परवानगी देणे आवश्यक तरच न्यासाचे नाव कमी होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, कार्यालयीन अभिलेख वर्गीकरणाची तत्‍वे, अभिलेखाचे वर्गीकरण करण्‍याची पध्‍दत, अभिलेख ज‍तन करण्‍याचा कालावधी किती, ड वर्ग अभिलेख नष्‍ट करण्‍याची कार्यपध्‍दती, अ,ब,क,ड यादी या सर्व बाबींची माहिती मला घ्‍यावयाची आहे. त्‍यासाठी मला कोणत्‍या कायद्याचे किंवा शासन निर्णयाचे वाचन करावे लागेल याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन करावे. आणि याबाबत आदरणीय महोदय आपल्‍याकडे PDF स्‍वरुपात माहिती उपलब्‍ध असल्‍यास कृपया करुन मला ई-मेल व्‍दारे सदर माहिती पुरवीण्‍याची कृपा करावी. ही नम्र विनंती.
या पूर्वी A , B, C, D list अभिलेखांचे जतनाबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत . तथपि या लिस्ट सध्या स्थितीत , तेवढ्या उपयोगात येऊ शकत नाहीत . काही प्रमाणात काळ बाह्य झाल्या आहेत .
शास्नानाने , Maharashtra Public Records Acts संमत केलेला आहे . या कायदयानुसार प्रत्येक विभागाने , retention schedules बनवण्याचे आहेत व त्यास संचालक पुराभिलेख महाराष्ट्र शासन यांची मान्यता घेण्याची आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
विषय - ७/१२ वरील कुळ कमी करण्याविषयी
सर माझा प्रश्न असा आहे कि माझ्या ७/१२ वर इतर अधिकारात नोंद - कुळ दत्तात्रय अ.पा.क. ( xxx ) शाम मनोहर गीते यास ( xxx )
कु.का.क. 32 ग. ( xxx ) प्रमाणे खरेदीचा हक्क नाही ( xxx )
असा शेरा असून आताचे कुळ शाम मनोहर गीते यास यांच्या पूर्व संमतीनुसार ७/१२ वरील इतर अधिकारातून कुळ कमी करावयाचा आहे तरी त्याबद्दल कायदेशीर सल्ला मिळावा हि विनंती . सरकारी मूल्यांकन रु- ५ लाख असून कायदेशीर खर्च किती येईल या विषई मार्गदर्शन करावे हि विनंती .
शाम गीते हे केवळ अज्ञान पालन करते आहेत . त्यांचे नावे किंमत ठरू शकणार नाही अथवा त्यांचे संम्मतीनेही कुळाचे नाव कमी होणार नाही . कुल दत्तात्रय , जर संज्ञांन झाला असेल तर , त्याचे नावे ३२ ग किंमत निश्चित होणे आवश्यक व ती होईल .
कुलास कुळहक्क मालकाचे लाभात सोडून देण्याचा असल्यास , प्रथम The Hindu Minority and Guardianship Act खाली दिवाणी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, नस्तीबद्ध झालेल्या प्रकरनांचा त्रिअक्षरी क्रमांक खाली दिलेला आहे.
LND-२०
TRS-१६
NAP-३४
LND-४१
LEN-३९
NAA-४६
या सर्व प्रकरणांना अभिलेख कक्षात जतन करून ठेवान्याचा कालावधी किती वर्षाचा आहे? या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भूसंपादन अधिनियम 1894 नुसार माननीय जिल्हाधिकारी यांचे कडून भूसंपादनाचा निवाडा घोषीत करण्याची कार्यवाही कशाप्रकारे केली जाते? या बाबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायद्यातील तरतुदीसह योग्य मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.
पंकजजी एखादा जुना निवाडा वाचा .
भू संपादन प्रकरण नसती वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

namskar सी र मी अविनाश शिंदे
माझा प्रश्न तलाव गाळ पेर संभंदी आहे
मी २०१५ साली एका व्यक्ती कडून ३.२७ आर जमीन घेतलीय त्या मालकाची सादर गटशेजारील ३ .१ आर जमीन पाझर तलाव मध्ये गेली आहे त्याचा त्याना शासन मोबदला मिळाला आहे परंतु त्य्नाच्या म्हणणंय नुसार त्याना त्या जमिनी मध्ये गाळपेर करण्याचा हक्क आहे .असे त्यानं मला खरेदी खाता मध्ये लिहून दिले आहे
सादर दोन्ही जमिनीचे मूळ मालक एक आहे
१)आसा हक्क असतो का ?
व तो हस्तनतरीत होतो का ?
२)गाळपेरीचा नेमका अर्थ काय
३)गाळपेरीचा शासन निर्णय आहे का
४) गाळपेर कायदा असेल तर मार्गदर्शन kara
-संबंधित कायर्कारी अभियंता दरवर्षी लीजवर ती जमीन मंजूर करू शकतो .गाळपेर हक्क मिळणार नाही

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

सर मार्च ता. 6/3/2017प्रश्नाचे उत्तर मिळावे हि नम्र विनंती
नमस्कार सर , जर एखाद्य शेतकऱ्याची जमीन रस्त्यासाठी एका बाजूने दिली असेल पण त्याच सर्वे नंबर ला दुसऱ्या बाजून सरबांध असून 10 शेतकऱ्यांनी मागणी तहसीलदारांकडे केली तर तर रास्ता मंजूर होईल काय .कृपया उपाय सांगा
होय म ज म अधिनियम १९६६ चे कलाम १४३ खाली रस्ता देता येतो

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

तलाठी उत्पन्नाचा दाखल कशाची तपासणी करून देतो आणि तो उत्पन्न कशा वरून ठरवतो
नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा एखादा कर्मचारी उत्‍तीर्ण नसेल तर त्‍या कर्मचा-याला कालबध्‍द पदोन्‍नती देता येते का ? याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, जिल्‍हातील एखादा तलाठी ज्‍या उपविभागामध्‍ये कार्यरत असेल त्‍या ठिकाणाहून त्‍याने दुस-या उपविभागात बदली व्‍हावी म्‍हणून विनंती अर्ज केला व त्‍याची विनंती मान्‍य झाली व त्‍याला जिल्‍हातील दुस-या उपविभागात पदस्‍थापना दिली तर जिल्‍हातील जेष्‍ठतेमध्‍ये त्‍याचे नाव सर्वात खाली टाकले जाते का? तलाठी संवर्गाची जेष्‍ठता फक्‍त उपविभागा पुरती मर्यादीत असते का?
कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
As per MCSR is it essential for ladies in government service to change their maiden name after marraige and get it mentioned in service book to claim maternity leave and expenses. Is change in name necessary at all in service for ladies. Please also give rule or judgements if any.
Thanks.
There is no requirement under Maharashtra Civil Service Rules either under Leave or General Conditions of Service , that , female government servant shall change her name after the marriage to avail the Maternity leave. Even under the Maternity Benefit Act , no such provision exists .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
1994 साली आमच्या जमिनी मधून रस्ता करण्यात आला नंतर 2005 साली त्याचे रुंदी करण्यात आले,आम्ही जमिनी ची शासकीय मोजणी भरली त्यानुसार त्यांनी हद्द दाखवली ,हद्द वरून असे लक्षात आले की सर्व रस्ता आमच्या च्या जमिनी तुन जात आहे.900 फूट लांब आणि 15 फूट रुंद असा रस्ता असून तो सर्व आमच्या जमिनी तुन जात आहे. जमिनी ची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे असे आढळून आले . आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलेले नसून रस्त्यानेच जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. आमची जमिनी कशी काढून भेटेल .कोना कडे आपिल करावी.कृपया मार्गदर्शन करावे.
रस्ता शास्नानाने , स्थानिक सव्रज्या संस्थेने केला आहे का ? जर त्यांनी रस्ता केला असेल तर , आपली जमीन बाहो संपादन कायद्याखाली संपादन न करता , असा रस्ता करता येत नाही . आता रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे . आपण जेवढे क्षेत्र रस्ताखाली गेले आहे , त्याची नुकसान भरपाई संबंधित विभागाकडे मागा.
जर आपणास , रस्ता नको असेल तर . आपणास न्यायालयाचा मार्ग पत्करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा सुट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर कर्मचार्याने राहीलेल्या विषयात त्याने किती गुण मिळविणे आवश्यक आहे ? या बाबत माननीय न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत काय ? याबाबत सखोल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आदरणीय सर,इमारत बांधकाम करणेसाठी २०१२-१३ मध्ये गौणखनिजचे उत्खनन करण्यात येऊन त्याचा वापर त्याच जागी केलेला आहे.परंतु त्याबाबत मा.तहसीलदार साहेब यांनी तीन पट दंड भरणेची नोटीस काढल्यास त्या नोटीसवर मा.प्रांत साहेब यांचेकडे अपील करणे योग्य होईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, मुखत्यारपत्र म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
एखादा काम स्वतः करण्या ऐयवैजी दुसर्याने करण्याकरता त्यास प्राधीकृत करणे .
कृपया भारतीय करा कायदा १८८२ चे प्रकरण १० , कलाम १८२ ते २३८ वाचा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भोगवटदार वर्ग-१ जमीन म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
जमीनहस्तांतरांवर निर्बंध नसलेली जमीन म्हणजे , भोगवटादार वर्ग १ जमीन

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay
13-05-2017
vv_rt@rediffmail.com

नमस्कार सर

एका अर्जदाराने नॉन क्रिमिलयेर दाखला मिळणेसाठी अर्ज केला आहे परंतु जातीचे दाखला हा ऊत्तर प्रदेश चा कुशवाह जातीचा जोडला आहे
तर त्याला महाराष्ट राज्यत राज्याचे किंवा केंद्र शासनाच्या नॉन क्रिमिलयेर देता येऊ शकते का thank u sir
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A व B हे दोन कर्मचारी आहेत जिल्हातील जेष्ठतेमध्ये A कर्मचारी B चे पुढे आहे. दोघांनीही पहिली संधी वापरून महसूल अहर्ता परीक्षा दिली आणि A कर्मचारी नापास झाला व B कर्मचारी परीक्षा पास झाला तर बी कर्मचाऱ्यास लगेचच पदोन्नती देण्यात येते का ? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली वेळ दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळविले व तो परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण होईल का ? कृपया याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, वाजीब-उल-अर्ज म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (लिपिक संवर्ग) ही परीक्षा दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर परीक्षेत राहीलेल्या प्रत्येक प्रश्न पत्रिकेत 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले तर संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे घोषित केले जाते काय ? ( 3 विषयात सूट मिळाली व 3 विषयांची पुन्हा परीक्षा दिली आहे. ) कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे.
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, स्थायी आदेश नस्ती म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3