जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by राजेंद्र लांडगे
31-03-2017
rajlandge 12 @gmail.com
पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीत समान मते पडल्यास चिठ्ठी टाकून निवड करणे योग्य आहे का ?
Question by अभिजीत
30-03-2017
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महीला सरपंचावर अविश्वास ठराव मंजुर झाल्यानंतर त्याला स्थगिती देता येते का आणि नविन सरपंच निवडीचा कालावधी कीती आहे
होय
अप्पर जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम आहे . त्याविरुद्ध अपील तरतूद कायद्यात नाही . मात्र त्या विरुद्ध writ याचिका दाखल करता येऊ शकते .
जर अप्पर जिल्हाधिकारी यांचे निर्णयाविरुद्ध writ याचिका दाखल करण्यात आली नसेल अथवा writ याचिका फेटाळली असेल तर सरपंच निवडणूक लावता येईल .
writ याचिका दाखल आहे मात्र न्यायालयाने स्थगिती आदेश दिला नसेल तरीही निवडणूक लावता येऊ शकते मात्र असे केल्यास जर उच्च न्यायायालयाने अविश्वास ठराव रद्द बदल ठरवलं तर , नाव नियुक्त सरपंच यांची नियुक्ती रद्द करणे या बाबी निर्माण होतात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
30-03-2017
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय कृषी विभागाकडून जे बंधारे बांधले जातात त्यासाठी जी वाळु लागते त्यासाठी गौन खनिज ऊत्खनन परवाना लागतो का कींवा आवश्यक आहे का
Question by मेघा दि पितळे
30-03-2017
meghdeep1234@rediffmail.com
सर, मी मेघा पितळे , माझ्या आजोबापार्जित जमीन आहे, ( देवगड मोंड बापर्डे ) त्या जमिनी चे अजून हिस्से झाले नाहीत, माझ्या आजोबाना ३ मुलगे ,माझे बाबा आणि २ काका, दोन्ही काका वारले आहेत, माझे बाबा गेली ५-६ वर्षे माझ्या चुलत भावाकडे हिस्सा करून मागत आहेत , पण तो एकात नाही, अशा वेळ माझ्या बाबा करावे, हे प्रकरण तंटा मुक्ती मध्ये गेले , तरी पण तेथून काहीहि निष्पन्न झाले नाही, काय करावे ते कळत नाही, कृपया मार्गदर्शन करा,
आणि एका ७-१२ बारा वर माझ्या वडिलांचे नाव नाही आहे, त्या साठी अर्ज केला आहे, पण तेथील तलाठी सहकार्य करत नाही.
आपण दिवाणी न्यायालयात जमिनीतील जमिनीचा हिस्सा ठरवून मिळणे व त्या प्रमाणे हिस्साचे जमिनीची वाटणी करून मिळणे व ताबा मिळणे बाबत दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र लांडगे
28-03-2017
rajlandge12@gmail.com
पतीने वडिलोपार्जित जमीन विकली पत्नीची सहमती नसल्यास पत्नीला परत मिळेल का
Question by राजेंद्र लांडगे
28-03-2017
rajlandge12@gmail.com
वडिलोपार्जित इस्टेटचे न्यायालयीन . वाद मृत्यूनंतर एखादया व्यकीकडे मृत्यू पत्र करून सोपवता येतो का १
न्यायालयात अर्ज करून मिळकतीचे वाद सोडविण्यासाठी विशेष अधिकार्या्ची नेमणूक करता येईल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by मल्लाराम देवकरण मंडरावलीया
27-03-2017
omsai1507@gmail.com
नमस्कार सर,
माझा प्रश्न असा आहे सग मी ९९ वर्ष करारनामा केलेला आहे तर मला हे घर नावावर करता येईल का? मला २० वर्ष झाले असून मला काय करवा लागेल?
करारनामा घराचा आहे का घर ज्या जागे वर आहे त्या जागेचा ?
उत्तर-हो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भाऊसाहेब तेलोरे
27-03-2017
telorebhau2@gmail. com
शिवरस्ता अतिक्रमण काढणेसाठी चे कायदे व कार्यपद्धती यांचे मार्गदर्शन मिळावे हि विनंती
आपणास शिवार रस्ता म्हणायचे आहे का ?
शिवार रस्त्यावर अतिक्रमण करून , आपला शेतावर जायचा मार्ग बंद केला असल्यास आपण माम्लेतदार कोर्ट कायद्याखाली , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा .
या शिवाय महा राज्सव अभियांना अंतर्गत , असे पानंद रस्ते मोकळे करून दिले जातात . तहसीलदार यांचेकडे अर्ज करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी करपे
25-03-2017
shivajibkarpe@gmail.com
सहकारी दुध संस्था व सहकारी सोसायटी यांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा लागू आहे का ? असेल तर केव्हा पासून लागू आहे या संदर्भात मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती .. सहकाऱ्या बद्दल आभारी आहोत
सहकारी संस्थांना माहितीचा अधिकार लागू असले बाबत , मा. उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मकरंद तवटे
25-03-2017
mak_099@yahoo.co.in
आदरणीय,
4 वर्ष पूर्वी डोंबिवलीला रूम घेतली आहे. बिल्डरने अजूनही सोसायटी बनवली नाही. पाणी फक्त 15 मिनिटे येत. काही तरी मार्ग दाखवा.
सर्व सदनिका धारकांनी निबंधक सहकारी संस्था यांचेकडे अर्ज करून , सोसायटी स्थापन करावी . एका सदस्यास प्रमुख प्रोमोटर नेमावे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
25-03-2017
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, जमीनवाटपाचा दावा कोर्टात चालू असताना मा.तहसीलदार किंवा मा. प्रांत साहेब मृत्यूपत्र नुसार जमीन क्षेत्राची ज्याच्या त्याच्या क्षेत्राची नोंद गाव दप्तरी करतील काय किंवा दावा वाटपाचा चालू असताना मृत्यूपत्र नुसार गावी क्षेत्राची नोंद घेण्यासाठी काय करावे कारण मृत्यूपत्र उशिरा माहित पडले आहे गावी असलेल्या भावाने कोर्टात जमीन वाटप दावा दाखल केला आहे परंतु तो कोर्टात हजर झाला नाही आम्ही कोर्टात हजार झालो त्याने इतरांची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. कोर्टात केस चालू असताना मृत्यूपत्र नुसार वाटप करावयाची आहे ती कशी करावी या बाबत मार्गदर्शन करावे हि विनंती
दावा चालू असेल तर मा न्यायालयाचे निदर्शनास , मृत्य पत्राबाबत आणून द्या , न्यायालय योग्य तो आदेस देते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Hemant Donde
24-03-2017
hemant_donde@rediffmail.com
Namaskar Sir,
Thanks for valuable guidance to my earlier query. In regards to 2241 m2 reserved for school, we are left with 373 m2. In this we do not know how much share will come for us since we have aunt who is 65 yrs old and married before 1995.whether all will have share as 186 m2 i.e. (747/4) (747/father+uncle+2 sisters) or it will be747/3 (249 m2) and 747/4 (62 m2) comes 249+62(father), 249+62(uncle), 62m2 for two sisters each. Thanks , Regards Hemant
Question by मोहन पांडुरंग शितोळे
24-03-2017
Mohan. shi.ms@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची वडोलोपार्जित 31.18एकर जमीन होती आजोबान्ना 5मुले +4मूली आहेत
आजोबानी 1981 साली तहसिलदार हु.प्रमाणे स्वतः1+5मुले प्रतेकी 6.18 आजोबा व 5एकर (5मुले)ह्यांना वाटप केले व त्या प्रमाणे सातबारा फुटून प्रतेकचे वेगवेगळे 5 -5एकरचे सातबारे बनले आजोबानी नंतरच्या काळात कोणी मुले संभाळात नसले कारणांमुळे त्यांच्या वाट्याला आलेली 6.18एकर जमीन 1998 साली एका नातवाला रजिस्टर खरेदी खताने त्या वेळसच्या बाजरभावा प्रमाणे विकलि विकताना आजोबानी कोणत्याही मुलांची अथवा मुलीची सही त्या खरेदी खतावार घेतली नाही (कारण त्यांची नावे सातबर्याला नहोती व त्यानी विकताना हरकत घेतली नाही) आजोबा 2008 साली मयत झालेत 2016 ला 4 मूली पैकी 2 मुलींनी भावांवर व त्या खरेदीदार नातवावर दावा केला आहे त्या 2 मुलींची लग्न वाटप झाल्यावर म्हणजे 1983साली झाली होती त्यांच्या दाव्या मध्ये त्याना वाटप रद्द करून मागत आहे व खरेदिखत पण रद्द करून मागत आहेत आणि त्यांचा विभक्त असा हिस्सा मागत आहेत मला उत्तर दया की सर (1)कायद्याने एकदा वाटप झाल्यानंतर तब्बल 35 वर्ष्यानी वाटप रद्द होईल का ? ( 2) वाटप रजिस्टर झालेले नाही तहसिलदारांनी केलेले वाटप कोर्ट मान्य करेल का?(3)त्यांना हिस्सा मिळेल का ?(4)खरेदीदार नातवाला काय त्रास होईल का ? सर पिल्ज मला ह्या पडलेल्या प्रश्नचि उत्तरे दया मी सदैव आपला आभारी राहिन
आजोबांनी copercenary property चे १९८१ साली वाटप केले आहे . त्या वेळी लागू असलेल्या कायद्या प्रमाणे झालेले वाटप बरोबर आहे .
वाटपानंतर आजोबा आपली मिळकत वाट्यातील हिस्सा त्यांचे इच्छेप्रमाणे विलु शकतात . बहिणींना वाटप रद्द करून मागण्याचा हक्क नाही
प्रश्न क्रमांक १ -नाही
प्रश्न क्रमांक २ -हो
३. प्रश्न क्रमांक ३-नाही
प्रश्न क्रमांक ४-नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pravin pawar
22-03-2017
virshiva95@gmail.com
Adivasi jamin bin sheti karun bigar adivashi chya navar karta yeil ka...
Question by sadik
21-03-2017
sadik11m@rediffmail.com
सर आम्हाला धडक योजनेतून १९७२ ला सामायिक विहीर शासनाकडून पडून मिळाली
७ १२ वर इस्लामिक सहकारी पाणी पुरवठा संस्था म्हणून उल्लेख आहे. तरी सर मला याबद्दलचे कागदी पुरावे कोठे व कशी मिळतील
२) सादर विहीर सर्वानी हक्क सोडल्यास एका व्यक्तीची ची होऊ शकते का
सदर नाव कसे दाखल झाले याबाबचा फेरफार बघावा. तहसिलदार कार्यालयातील अभिलेख कक्षात मिळेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
19-03-2017
sadik11m@rediffmail.com
सर सामायिक जागेत स्वखर्चाने बोअर घेतल्यास बोर ची स्वतःचा नवे ७ १२ वर नोंद होऊ शकते का
२) घर परवाना कोठे मिळतो
३) शासकीय योजनेतून पडलेली विहीर सामायिक मूजवता येते का व सामायिक विहीर एकाच्या नावावर करता येऊ शकते का
४) कंडिशनल बाय सेल मॉर्टगेज काय
सर्व मॉर्टगेज चा प्रकार बद्दल mahiti मिळू शकते का प्लीज
Question by व्ही.एस.कोकणे
18-03-2017
Vskokane1985@gmail.com
आदरणीय सर,
आम्ही कसत असलेली 6 ते 7 एकर शेती मा.तहसिलदार यांच्या आदेशानुसार सन 1994 पासुन वहीवाट दाखल असुन 7/12 मधे आम्हा तीन भावांची नावे जमीन करणाराचे नाव या रकाण्यामध्ये आहे. सदर जमीनीचा ताबा सन 1982पासुन आजवर आमच्याकडे आहे .तरि नवीन कुळ लावण्याकरीता मार्गदर्शन करावे .
जमीन मालकाव्यतिरिक्त अन्य इसमाची वहिवाट फक्त चालू वर्षासाठीच वहिवाट सदरी नोंदविण्याचा आदेश पारित करता येतो. पुढच्या वर्षी तलाठी यांनी जरी तोच वहिवाटदार वहिवाट करीत असेल तरी पुन्हा नमुना १४ चा फॉर्म भरून पाठवणे आवश्यक असते.
एखाद्या वर्षी मालकाव्यतिरिक्त दुसर्यााचे नाव वहिवाट सदरी लागले म्हणजे तो आपोआप कुळ बनला असे होत नाही. कुळकायद्यानुसार कुळ व मालक यांच्यात करार होणे, कुळ व मालक असे नाते सिध्द होणे, कुळाने मालकास खंड देणे इत्यादी बाबी कुळ सिध्द होण्यास आवश्यक असतात. हा फार मोठा गैरसमज आहे. कुळ कायदा कलम ४ मध्ये 'कुळ म्हणून मानावयाच्या व्यक्ती' ची व्याख्या नमूद आहे.
कुळ कायदा कलम '३२ ओ' मध्ये 'जमीन मालकाने दिनांक ०१/०४/१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीच्याबाबतीत, जातीने जमीन कसणार्या् कुळास अशी कुळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आंत, त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी करण्याचा हक्क असतो.' असे नमुद असले तरीही कुळ कायदा कलम '३२ ओ' अन्वये कुळ जाहिर करणेसाठी खालील पात्रता अत्यावश्यक आहे.
१) कुळकायद्याने कुळास दिलेला हक्क बजावण्याची ज्याची इच्छा असेल त्याने एक वर्षाच्या आंत, त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत रितीने कळविले पाहिजे.
२) अशा प्रकारे कळविल्यानंतर शेतजमीन न्यायाधिकरण (तहसिलदार) याप्रकरणी नोटीस बजावून चौकशी करतात. या चौकशीच्यावेळी खालील मुद्दे स्पष्टपणे/निसंदिग्धापणे सिध्द होणे अत्यावश्यक असते.
अ) अर्जदार कुळ आणि जमीन मालक यांच्यात 'कुळ व मालक' असे नाते सिध्द होत आहे काय?
ब) कुळ आणि मालक यांच्यात 'कुळ व मालक' नाते सिध्द करणारा आणि न्यायालयात निसंदिग्धपणे सिध्द होणारा करार झाला आहे काय?
क) कुळ मालकाला रोखीने खंड देत आहे काय?
ड) कुळ देत असलेला रोख खंड मालक स्वीकारत आहे काय आणि त्याबाबत पावती देत आहे काय?
वरील बाबी सिध्द झाल्यां तरच वहिवाटदार कुळ ठरू शकतो.
जोपर्यंत जमीनमालक कुळाचा कायदेशीर कुळ म्हणून स्वीकार करत नाही किंवा ती व्यक्ती कुळ नाही हे विधान कायदेशीररीत्या फेटाळले जात नाही तो पर्यंत कुळाचा, कुळकायदा कलम ३१-ओ नुसार दिलेला एक वर्षाचा कालावधी सुरू होत नाही. (लक्ष्मण धोंडी झुरळे वि. यशोदाबाई, २००५(२)- ऑल महा. रिपो.-८१२)
जर चौकशीच्यावेळी तहसिलदार यांच्या असे निदर्शनास आले की, कोणत्याही नोंदणीकृत दस्ताशिवाय किंवा कायदेशीर कागदपत्राशिवाय, अनाधिकाराने किंवा दंडेलशाहीने अशी वहिवाट सुरू आहे तर तत्काळ अशी वहिवाट करणार्या विरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ५९ व २४२ अन्वये कारवाई करावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित बर्गी
17-03-2017
sujitbargi95@gmail.com
मला एका प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती .
१) एका व्यक्तीने पूर्वी जमीन खरेदी केली असून त्यांना तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत. काही काळांतराने रमेश यांचे निधन झाले आणि रमेश यांचा मुलगा दीपक वारसदार झाला. रमेश यांच्या जागी वारसदार मुलगा दीपक, लक्ष्मण यांची मुलगी कमला,अनिल यांचा मुलगा मंगेश यांनी ही जमीन गावातील त्यावेळीचे तीन -चार जुनी पुढारी माणसं घेऊन सहमताने एकमेकांत वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. त्या पुढाऱ्यां पैकी दोन जण आज रोजी हयात नाहीत कैलासवाशी झाले आहेत. आणि दोन जण आज रोजी हयात आहेत. या वाटण्या करता वेळी रमेश यांचा वारसदार दीपक ,लक्ष्मण स्वतः आणि लक्ष्मण यांची मुलगी कमला, अनिल स्वतः आणि अनिल यांचा मुलगा मंगेश हे उपस्थित होते. या वाटण्या करता वेळी कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. आज रोजी रमेश , लक्ष्मण, अनिल यांचा मृत्यूनंतर त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश यांच्या जागी दीपक, लक्ष्मण यांच्या जागी कमला आणि अनिल यांच्या जागी मंगेश. अजून पर्यंत ही जमीन सामायिक आहे. शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे. तर मंगेश यांना त्यांच्या वडिलोपार्जीत हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही लेखी पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ? या वाटण्या करता वेळी रमेश यांचा वारसदार दीपक ,लक्ष्मण स्वतः आणि लक्ष्मण यांची मुलगी कमला, अनिल स्वतः आणि अनिल यांचा मुलगा मंगेश व गावातील तीन-चार पुढारी उपस्थित होते.
साहेब कृपया सविस्तर माहिती द्यावी ?
धन्यवाद !
Question by गणेश शिंदे
17-03-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,स्वकष्टार्जित मिळकतीचे एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र करून ठेवल्यास त्याच्या मृत्यूनंतर वाद उदभवल्यास सदर मृत्युपत्र कोर्टाकडून प्रोबेट करणे आवश्यक आहे का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
Question by Hemant Donde
17-03-2017
hemant_donde@rediffmail.com
Dear Sir, na j k m kaydya , var adhik mahiti dya.Thanks .regards hemant
Question by राहुल सावंत
17-03-2017
rahul9619309796@gmail.com
सर मी राहुल माझा प्रश्न असा आहे कि आमची गावी वडिलोपार्जीत जमीन आहे, ती जमीन आमचे आजोबा निधन झाल्यावर वारस तपासणी करून कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या मोट्या काकांनी सातबारावर आपले नाव लावले व माझ्या वडिलांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये लागले आहे आता मोठे काका वारले आहेत त्यांच्या मुलांनी वारस तपासणी करताना स्वतःच्या कुटुंबाचीच फक्त नोंद केली आहे त्या बरोबर माझ्या वडिलांची त्यांचे संख्ये भाऊ म्हणून वारस म्हूणन नोंद करणे जरुरी असताना हि त्यांनी फक्त आपल्याच कुटुंबाची नोंद केली आहे , तर माझ्या वडिलांनी आपल्या सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी काय करावे ?त्यासाठी मोट्या काकांच्या कुटुंबाची सही किंवा परवानगी लागेल काय ?गाव नमुना ६ क च्या उताऱ्या वरून वारस तपासणी करता येईल काय ?याचे आपण मार्गदर्शन करावे धन्यवाद साहेब .
मयत काकाच्या मुलांची नावे ज्या फेरफारने दाखल झाली त्याl फेरफार विरूध्द प्रांताकडे अपील दाखल करा. अपीलासाठी काकांच्या कुटुंबाची सही किंवा परवानगीची आवश्यंकता नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
16-03-2017
sadik11m@rediffmail.com
सर एका शेतकऱ्याचे भोगवटादार २ चे ७० गुंठे ६ गुंठे व ११ गुंठ्याचे असे तीन तुकडे आहेत त्या शेतकऱ्याने २००८ रोजी तिन्ही तुकडे शासनाची परवानगी न घेता एका वेळेस एका शेतकऱ्याला विकले .
तर तुकडे जोड बंदी कायद्यानुसार तो दस्त रद्द होऊ शकतो का त्याला वरील पैकी कोणता तुकडा परत मिळू शकतो का
७० गुंठे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेतर्पेक्षा जादा आहे त्यामुळे तो तुकडा ( Fragment ) नाही . त्यामुळे झालेला व्यवहार वैध आहे .
६ गुंठे व ११ गुंठे क्षेत्र , कोणत्या प्रकारच्या जमिनीचे आहेत ? जात जमीन बागायत स्वरूपाची असेल तर , ते हि क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जादा असल्याने , व्यव्यहार अवैध होणार नाहीत .
एकपिकी व जिरायत क्षेत्रासाठी प्रमाणभूत क्षेत्र अनुक्रमे १५ व २० गुंठे आहे . त्यामुळे आपली जमीन कोणत्या प्रकारात मोडते ते पहा .
तुकडेबंदी कायद्याचा भंग झाला असेल तर , असा व्यवहार रद्द होतो . अशी जमीन लगतचे खातेदारास देऊ केली जाते ( जागेची किंमत भरण्यास तयार असल्यास ) . जर लागतच खातेदार जमीन घेण्यास तयार नसल्यास ,जमीन शासनास जप्त होते . खरेदी घेणाऱ्यास / ज्याला वाटप झाली होती त्यास नुकसान भरपाई मिळते .
मूळ मालकास जमीन परत मिळत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
दस्त रद्द करण्याचे अधिकार महसूल खात्याला नाहीत. दिवाणी न्यायालयाला आहेत.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by चंद्रशेखर अरविंद नामजोशी
16-03-2017
namjoshica@gmail.com
सर, नमस्कार
७/१२ वरती चुकीचे नाव दुरुस्त करण्याची प्रक्रिया काय आहे ?
एकाच वेळेला २ भोगावटदारांची नावे दुरुस्त करावयाची असेल तर
किती कालावधी लागतो ? कोणत्या कागद पत्रांची आवश्यकता असते ?
२०१२ साली चुकीचे नाव लागले आहे त्यामुळे online७/१२ वरती सुद्धा चुकीचे नाव आले आहे
कृपया माहिती मिळावी हि विनंती.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५५ अन्वये चूक दुरूस्तीची तरतुद आहे. त्यासाठी संबंधीत तहसिल कार्यालयात संपर्क साधावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
15-03-2017
abhijitkadam55@gmil.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय एकञित सामायिक गट नं मधिल एकादा शेतकरी आपल्या हिशशाची जमिन विकु शकतो का त्याला तुकडेजोङ तुकडेबंदी कलम ७ नुसार शेजारील शेजारील शेतकर्याची संमंती लागते का तसेच एकञित गटातील जमिनीतील जमिन कसण्यावर बंदी आनता येते का
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो. तुकडेजोङ तुकडेबंदी कायद्या विरूध्द व्यवहार होत असेल तर जिल्हाधिकार्यांची परवानगी लागेल. कोणतीही जमीन कायदेशीरपणे कसत असल्यास त्यावर बंदी आणता येत नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
15-03-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर, ७/१२ उताऱ्यातील इतर हक्कातील बंडिंग तगाई बोजा कमी करणेबाबत काही शासन निर्णय असल्यास कृपया नं व दिनांक सांगा .तसेच सादर शेरा कमीकरणेबाबत काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
