जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सहकारी दुध संस्था व सहकारी सोसायटी यांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा लागू आहे का ? या संदर्भात मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती
माझ्या वडीलांची गावमध्ये जमिन आहे,७/१२ उतारासुद्धा पण पण जागेची नावे दिली आहेत त्या जागा माहित नाही.तर मला आमच्या गावचा नकाशा (भुमापण क्र./सर्वे नं.)सकट आॕनलाईन भेटु शकतो का?? जिल्हा =रत्नागिरी तालुका =मंडणगड गाव =पाचारळ
online नकाशा सध्या खाजगी संकेत स्थळावर उपलब्ध असू शकतील . शोध घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जागेचा नकाशा साठी आपण गाव कामगार तलाठी यांना भेटा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर; मयत व्यक्तीच्या मृत्युपत्राची नोंद दुय्यम निबंधक करू शकतात का; त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते
मृत्य पत्र नोंद करणे आवश्यक नाही .
दिवाणी न्यायालयाकडून probate घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझा प्रश्न हाउसिंग सोसायटीच्या संदर्भात आहे..

मागील वर्षी सोसायटी ची निवडणूक झाली त्या वेळेला सभासद ने आपला थकीत १ किवा ३ महिन्याचा ढेखभाल खर्च भरलेला नव्हता हे त्या वेळेला आसणार्‍या निवडणूक आधिकारी च्या निदर्शनात आले नाही. आता ज्या वेळेला मी हे चेक केले तर बर्‍याच सभासदाचे ढेखभाल खर्च हा भरलेला नव्हता त्या महिन्यात तरी ते मेंबर झाले आहेत. तर आता ही माहिती निवडणूक आधिकारी च्या निदर्शनात आणून त्यांच्या वर काय कायदेशीर कारवाई करू शकतो??
अनुदानीत धर्मादाय शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयातील शिक्षक निवडणूक लढून सभापती झाला आहे योग्य आहे का ? असेल तर शिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागेल का १
लाभाचे पद या बाबत या पूर्वी मी उत्तर दिले आहे . त्या निकषात शिक्षक बसतो का हे पहा .
शाळा जरी अनुदानित असली तरी , त्यास नोकरीवरून काढून टाकण्याचा / त्यास नोकरीवर नियुक्त करण्याचा अधिकार जिल्हा परिषद /पंच्यात समिती यांना नाही .
त्या मुले असा शिक्षक , सभापती झाला हे योग्य आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
आमच गावात एक घर आहे त्याची नोंद ग्रामपंचायत ला 19८५ पासून आहे सर्व फेरफार व्यवस्थित झाले आहेत आम्ही हि जमीन विकत घेतलेली नाही पूर्वीपासून वडिलोपार्जित आहे पण त्याची सीटी सर्व्हे ला कुठेही नोंद नाही नमुना न. 8 आहे पण PR कार्ड नाही पुढे काही अडचणी येतील का? ग्रामपंचायत नोदी कायद्याने मंजूर असतात का? व पर कार्ड साठी काय करावे? कृपया उत्तर द्या...
क्षेत्र हे गावाच्या शिवेजवळ आहे. क्षेत्राची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे. महा राज्सव अभियांना अंतर्गत पानंद रस्ते मोकळे करून दिले जातात, परंतु रस्त्यानेच अतिक्रमण केले असता काय करावे? रस्ता बंद केला तर चालेल का?
रस्त्याने अतिक्रमण केले नाही . आपण अतिक्रमण केले असल्याचे मोजणी वरून दिसून येते .
फेर मोजणी करून बघा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... महोदय जमिन खरेदी (दस्त) प्रक्रीया पुर्ण झालेनंतर १ महीन्यानंतर विकणारा ईसम मयत झाला त्यामुळे नोंद घेत नाहीत अशा वेळी वारस नोंद करून घ्यावी लागेल का?आनि वारसांनी नकार दिला तर कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल तलाठी वारस नोंद करावी लागेल हे कारन देत आहे यासाठी MLRC मध्ये काय तरतुद आहे कींवा कसे मार्गदर्शन करा
खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे . मयत इसमाचे वारसांना नोटीस देऊन नोंद मंजूर करणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे . मयत इसमाचे वारसांना नोटीस देऊन नोंद मंजूर करणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझ्या जमिनीची मोजणी होऊन ४ वर्षे झाली तरी लगतदार कब्जा सोडत नाहीत. मला मोजणीची क प्रत हि मिळालेली आहे. लगतदारांच्या कडून तात्काळ कबजा घेणेसाठी काय करावे. प्लीज सर मार्गदर्शन करा.
जमिनीचा ताबा मिळणेसाठी व लगतचे खातेदाराने केलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी दिवाणी न्यायालयात The Specific Relief Act खाली दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sadik
05-04-2017
sadik11m@rediffmail.com

१)पाणबुडे सर मॉर्टगेज चे प्रकार व व्याख्या सांगा
२)तुकडा व तुकडेबंदी म्हणजे काय व त्याची लिमिट
१. कृपया मालमत्ता हस्तांतरण कायदा वाचा . प्रकरण IV कलम ५८
२. बागायती , एकपिकी व पडीक जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे . अनुक्रमे ५ , १५ व २० गुंठे प्रमाणभूत क्षेत्र मर्यादा बागायत, एकपिकी व पडीक जमिनीसाठी आहे . या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री करता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खाजगी अनुदानातीत शिक्षण संस्थेतील कर्मचारी निवडणूक लढवू शकतो का त्याला कोणाची नाहरकत लागते
आपल्या प्रश्नाचे उत्तर -होय . निवडणूक लढवू शकते
कर्मचारी कोणती निवडणूक लढवत आहे ?
लाभाचे पद हि खूप विस्तारित संकल्पना आहे .
निवडणूक लढवू इच्छणारी व्यक्ती लाभाचे पद धरण करत आहे कि नाही , हे निश्चित झाल्यावर , त्यास निवडणूक लढवता येईल किवनह नाही हे सांगता येईल .
जर
१. अश्या व्यक्तीची नियुक्ती शासन करत असेल
२. अश्या व्यक्तीस सेवेतून काढून टाकण्याचा अधिकार शासनास आहे
३. अश्या व्यक्तीचे वेतन शासन देते
या प्रमुख निकषात निवडणूक लढवणारी व्यक्ती बसत असेल तर , त्यास निवडणूक लढवता येणार नाही .
लाभाचे पद हि संकल्पना समजण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाचा Guru Gobind Basu vs Sankari Prasad Ghosal & others (AIR 1964 SC 254) हा निर्णय वाचावा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

निवडणूक लढविणारी व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी नसावी असे कायदा सांगतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, वडिलांनी मोठ्या भावास त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे घर दिले आहे व त्यास इतर जणांची मंजुरी आहे. पण भावाने सर्व वारसांची घराच्या मिळकतीवर नोंद होण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केला आहे. भूमी अभिलेख विभागाने नोटीस द्वारे हजर राहून जबाब देण्यास सांगितले आहे. वारस नोंद होऊनये म्हणून हरकत घयावी किंव्हा नाही याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.
जर वडिलांनी भावास केवळ घर दिले आहे तर तो इतरांची नावे लावण्याचे कारण काय ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मृत्युपत्र हा पवित्र दस्त मानला जातो. मरणार्या माणसाची ती इच्छा असते. त्याच्या विरोधात न जाणे अधिक चांगले.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,
माझे नाव संदीप यादव,
माझा प्रश्न असा होता कि, माझ्या आजोबा यांनी सामायिक दोघात (म्हणजे आमचे आजोबा आणि नात्यांनी लागणारे जावई) अशी २२ गुटे जमीन घेतली आहे. म्हणजे ११ ११ (साधारण ४० वर्ष पूर्वी) आज आम्ही आमची हिश्याची जमीन(११ गुटे) मोजून घेत आहोत परंतु ते मोजणी करणारया अधिकाऱ्याला हरकत पत्र दाखून मोजणी होऊन देत नाही. तर असे होऊ शकते का?
तर आम्ही काय करावे.
कायदा आणि कलम सांगा.

आणखी एक प्रश्न. वरील जमीन खरेदी करते वेळी आजोबानी जावई यांच्यावर विश्वास ठेऊन खरेदी खत करण्यासाठी एकटयाला सांगितले. त्या वेळी त्यानी स्वतःचे नाव टायपिंग मध्ये टाकले व आजोबांचे टाकलेच नाही. संबंधित प्रकार जेव्हा आजोबाना समजलं तेव्हा त्यानी आजोबांचे नाव पेनानी टाकले आता ४० वर्षानंतर ते असे म्हणतोय कि जमीन माझ्या एकट्याची आहे. कि आमचे नाव सातबारायांवर असून सुद्धा तर ते असे ते करू शकतो का?
आम्हाला खरेदी खत बदलायचे असेल तर आम्ही असे करू शकतो का ?
धन्यवाद ...
वैध कारणाशिवाय मोजणीला हरकत घेणे योग्य नाही. आपण खरी परिस्थिती मोजणी अधिकार्याला सांगावी. जरूर तर योग्ये ते शुल्क भरून पोलीस बंदोबस्तात
मोजणी करता येईल.

मूळ नोंदणीकृत दस्तावर दोघांचे नाव असेल (दोघांच्या नावाची नोंद नोंदणी कार्यालयात असेल तर) तुम्ही कायदेशीर मालक आहात. जर दस्ता नोंदणी झाल्यानंतर आजोबांनी त्यांचे नाव पेनने लिहिले असेल तर ते बेकायदेशीर आहे. फक्त‍ ७-१२ वर नाव असल्यामुळे जमिनीची मालकी ठरत नाही. त्यासाठी इतर अनुषंगिक पुरावेही आवश्यक आहेत.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आमच्या फेरफारामध्ये गहाणखताचा उल्लेख आहे , तर हे गहाणखत मिळण्यासाठी माहितीच्या अधिकारांमध्ये आम्ही दुय्यम निबंधक ( नोंदणी ) कार्यालयात अर्ज केला होता , पण या कार्यालयाने गहाणखताचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक मागितला आहे , पण आमच्याकडे नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक उपलब्ध नाही ,

आपणास विनंती आहे कि गहाणखताची नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक मला कुठे मिळेल या वर थोडे मार्गदर्शन करावे
लाखो दस्तांमधून नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक न कळवता दस्त‍ शोधता येणार नाही. फेरफार वरून किंवा फेरफारवर गहाण घेणार्याचे नाव असल्यास त्याच्या्कडे चौकशी करून गहाणखताचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक यांचा शोध घ्यावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Hemant Donde
02-04-2017
hemant_donde@rediffmail.com

Respected Sanjay Panbudey saheb,
Thanks For taking time out your busy schedule and sharing your profound expertise in this field where we find ourselves as pauper as far as law is concerned.
With reference to my querry placed on 14 march 2017, we did show that affidavit to advocate ,but he says affidavit doesnt have any value.Also in that affifavit ,1.66hect should be given to my father has been written.This affidavit is from year 1981.Can we take harkat on the basis of this affidavit.Advocate says much of time has lapsed 37 years.wht were u doing all these years.Thanks,regards hemany
The affidavit per se does not become evidence . . But otherwise you have no option but to enforce it . What your advocate had guided is true .
You may take objection on the basis of affidavit . But may or may-not be considered.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीत समान मते पडल्यास चिठ्ठी टाकून निवड करणे योग्य आहे का ?
आपला प्रश्न/सूचना... महीला सरपंचावर अविश्वास ठराव मंजुर झाल्यानंतर त्याला स्थगिती देता येते का आणि नविन सरपंच निवडीचा कालावधी कीती आहे
होय
अप्पर जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम आहे . त्याविरुद्ध अपील तरतूद कायद्यात नाही . मात्र त्या विरुद्ध writ याचिका दाखल करता येऊ शकते .
जर अप्पर जिल्हाधिकारी यांचे निर्णयाविरुद्ध writ याचिका दाखल करण्यात आली नसेल अथवा writ याचिका फेटाळली असेल तर सरपंच निवडणूक लावता येईल .
writ याचिका दाखल आहे मात्र न्यायालयाने स्थगिती आदेश दिला नसेल तरीही निवडणूक लावता येऊ शकते मात्र असे केल्यास जर उच्च न्यायायालयाने अविश्वास ठराव रद्द बदल ठरवलं तर , नाव नियुक्त सरपंच यांची नियुक्ती रद्द करणे या बाबी निर्माण होतात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... महोदय कृषी विभागाकडून जे बंधारे बांधले जातात त्यासाठी जी वाळु लागते त्यासाठी गौन खनिज ऊत्खनन परवाना लागतो का कींवा आवश्यक आहे का
सर, मी मेघा पितळे , माझ्या आजोबापार्जित जमीन आहे, ( देवगड मोंड बापर्डे ) त्या जमिनी चे अजून हिस्से झाले नाहीत, माझ्या आजोबाना ३ मुलगे ,माझे बाबा आणि २ काका, दोन्ही काका वारले आहेत, माझे बाबा गेली ५-६ वर्षे माझ्या चुलत भावाकडे हिस्सा करून मागत आहेत , पण तो एकात नाही, अशा वेळ माझ्या बाबा करावे, हे प्रकरण तंटा मुक्ती मध्ये गेले , तरी पण तेथून काहीहि निष्पन्न झाले नाही, काय करावे ते कळत नाही, कृपया मार्गदर्शन करा,
आणि एका ७-१२ बारा वर माझ्या वडिलांचे नाव नाही आहे, त्या साठी अर्ज केला आहे, पण तेथील तलाठी सहकार्य करत नाही.
आपण दिवाणी न्यायालयात जमिनीतील जमिनीचा हिस्सा ठरवून मिळणे व त्या प्रमाणे हिस्साचे जमिनीची वाटणी करून मिळणे व ताबा मिळणे बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पतीने वडिलोपार्जित जमीन विकली पत्नीची सहमती नसल्यास पत्नीला परत मिळेल का
वडिलोपार्जित इस्टेटचे न्यायालयीन . वाद मृत्यूनंतर एखादया व्यकीकडे मृत्यू पत्र करून सोपवता येतो का १
न्यायालयात अर्ज करून मिळकतीचे वाद सोडविण्यासाठी विशेष अधिकार्या्ची नेमणूक करता येईल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझा प्रश्न असा आहे सग मी ९९ वर्ष करारनामा केलेला आहे तर मला हे घर नावावर करता येईल का? मला २० वर्ष झाले असून मला काय करवा लागेल?
करारनामा घराचा आहे का घर ज्या जागे वर आहे त्या जागेचा ?
उत्तर-हो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शिवरस्ता अतिक्रमण काढणेसाठी चे कायदे व कार्यपद्धती यांचे मार्गदर्शन मिळावे हि विनंती
आपणास शिवार रस्ता म्हणायचे आहे का ?
शिवार रस्त्यावर अतिक्रमण करून , आपला शेतावर जायचा मार्ग बंद केला असल्यास आपण माम्लेतदार कोर्ट कायद्याखाली , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा .
या शिवाय महा राज्सव अभियांना अंतर्गत , असे पानंद रस्ते मोकळे करून दिले जातात . तहसीलदार यांचेकडे अर्ज करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सहकारी दुध संस्था व सहकारी सोसायटी यांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा लागू आहे का ? असेल तर केव्हा पासून लागू आहे या संदर्भात मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती .. सहकाऱ्या बद्दल आभारी आहोत
सहकारी संस्थांना माहितीचा अधिकार लागू असले बाबत , मा. उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय,

4 वर्ष पूर्वी डोंबिवलीला रूम घेतली आहे. बिल्डरने अजूनही सोसायटी बनवली नाही. पाणी फक्त 15 मिनिटे येत. काही तरी मार्ग दाखवा.
सर्व सदनिका धारकांनी निबंधक सहकारी संस्था यांचेकडे अर्ज करून , सोसायटी स्थापन करावी . एका सदस्यास प्रमुख प्रोमोटर नेमावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 2.27 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3