जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर,शिवेवरील रस्त्या बाबत कोणते कलम असून ते कोठे पाहावयास मिळेल?तसेच शिवेवरील रस्त्याबाबत मालकी हक्क सांगता येतो का?किंवा कसे ? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
भूमी अभिलेख कार्यालयातील टिपण बुक मध्ये आपणास शिवेवरील रस्याता बाबत माहिती मिळेल. शिवेवरील रस्याची मालकी शासनाची असते. त्यामुळे त्यावर मालकीहक्क सांगता येत नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा. सर
मी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती मागविली होती,
सदर माहिती अधिकाऱ्याने ३० दिवसात माहिती न दिल्याने मी प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार यांचेकडे प्रथम अपील सादर केले होते.
तहसीलदार यांनी ३० दिवसात सुनावणी घेवून पुढील प्रमाणे आदेश दिला आहे.
१. अपीलकारचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. माहिती अधिकाऱ्याने सर्व माहिती १५ दिवसांत अपिलकारास विनामुल्य द्यावी.

वरीलप्रमाणे आदेश होऊन आज जवळजवळ ४० दिवस झाले आहेत, आणि माहिती अधिकाऱ्याने अजून पर्यंत माहिती दिली नाही.
मी याबाबत तहसीलदार यांची भेट घेतली असता ते असे म्हणतात कि, मी आदेश केला आहे माहिती द्यायची किंवा नाही हा माहिती अधिकाऱ्याचा प्रश्न आहे आणि मी याबाबत काहीच करू शकत नाही. व आपण पुन्हा मला या विषयाबाबत भेटु नये. आणि आपणाला माहिती हवी असेल तर राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करा.

तरी आपण मला पुढील माहिती द्यावी हि विनंती.
१. तहसीलदार यांचे उत्तर योग्य आहे काय.
२. तहसीलदार यांच्या आदेशाचे माहिती अधिकारी पालन करत नाहीत, तर तहसीलदारांना त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकते का, करता येत असेल तर कोणत्या कायद्यानुसार व कलमानुसार.

आपण योग्य सल्ला द्यावा हि विनंती.
तहसीलदार यांचे उत्तर निश्चितच असमर्थनीय आहे.

मा. रत्नाकर गायकवाड सर, मुख्य माहिती आयुक्त यांनी २८/६/२०१२ रोजी माहितीचा अधिकार २००५ च्या अंमलबजावणीसाठी पारित केलेल्या पत्रात स्पष्ट नमुद केले आहे की, अपिलीय अधिकार्याने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून घेणे हे संबंधित अपिलीय अधिकार्याचे काम आहे. माहिती देण्यास टाळाटाळ करणार्या जनमाहिती अधिकार्या विरूध्द कलम २० अन्वये व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियमानुसार कारवाई होऊ शकते.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा.सर ,
आमच्या गावात नोंदणीकृत शैक्षणिक संस्था असून संस्थेकने स्व:ताच्या मालकीच्या जागे साठी खूप प्रयत्न केले परंतु जागा उपलब्ध न झाल्याने संस्थेने व नागरिकांनी सरपंच ग्रामपंचायत कडे सरकारची गट.नं २७८ हि( सरकार स्मशानभूमी या नावाने) 1 हे 13 आर एवढी जमीन आहे त्या जमिनी पैकी 10 आर एवढी जमीन गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची व बसण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध व्हावी म्हणून २६ जानेवारी २०१७ च्या ग्रामसभेत जागा मागणीच्या अर्जा बाबत विचार विनिमय होऊन ग्रामसभेत मध्ये संस्थेस जागा देण्या बाबत चा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे,
परंतु सदर जागा हि सरकार मालकीची असल्याने त्या बाबत योग्य ते मार्गदर्शन करावे .
त्यामुळे मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून संस्थेच्या नावावर सदर जागा होणे करीता आपणाकडून मार्गदर्शन मिळावे हि विनंती . धन्यवाद .....

सदर सातबारा खालील प्रमाणे आहे

गाव नमुना सात

अधिकार अभिलेख पत्रक
( महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३, ५, ६ आणि ७ )

गाव :- पिंपळगांव कोंझीरा तालुका :- संगमनेर जिल्हा :- अहमदनगर अहवाल दिनांक:- 06-03-2017
भुमापन क्रमांक व उपविभाग भुधारणा पद्धती
278
सरकार

भोगवटदाराचे नांव
शेतीचे स्थानिक नांव
क्षेत्र आकार आणे पै पो.ख. फे.फा
खाते क्रमांक

क्षेत्र एकक हे.आर.चौ.मी
जिरायत -
बागायत -
तरी -
वरकस -
इतर -
----------- -----------
एकुण क्षेत्र -
----------- -----------
पोटखराब (लागवडीस अयोग्य)
वर्ग (अ) 1.13.00
वर्ग (ब) -
एकुण पो ख 1.13.00
----------- -----------
----------- -----------
जुडी किवा विशेष आकारणी -
(सरकार स्मशानभुमी) 1.13.00 ( 433 )















913
कुळाचे नाव
इतर अधिकार
ग्रामसभेच्या प्रस्तावासह जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर जमीन मागणी अर्ज दाखल करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,

आमचा कल्याण-डोंबिवली भागात एक वडिलार्जित flat आहे, वडील रिटायर झाल्याने ते गावी स्थायिक झाले आहेत. आणि तो flat आता मुलाच्या नावे करावयाचा आहे.
प्रश्न असा आहे
५०० रुपये स्टंप पेपर वर ब्लड रिलेशन मधे मालमत्ता हस्तांतरित होईल असा शाशन निर्णय होता परंतू प्रत्यक्ष मला ३०,००० रुपये खर्च येईल अस सांगण्यात येतंय
याविषयी मार्गदर्शन हवे आहे

धन्यवाद
जर निवासी आणि कृषिक मालमत्ता ही पती, पत्नी , मुलगा, नातू, नात मयत मुलाची पत्नी यांना बक्षीस द्यायची असेल तर आकारणी योग्य मुद्रांक शुल्क रू. २००, मालमत्तेच्या बाजार मूल्यावर म.न.पा./ जि.प./पं.स./ अधिभार १% आणि मालमत्तेच्या बाजार मूल्यावर किमान १% तर कमाल रू. ३०,०००/- नोंदणी फी असा खर्च येतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Suit chavan
06-03-2017
Sujitchavan456@gmail.com

सर आमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य यांचे घर जिल्हा परीषद रोडच्या जागेमध्ये अतिक्रमण घराचे कंपाऊंड येत आहे तसेच ग्रामपंचायत हाद्दी मध्ये सुद्धा अतिक्रमण आहे त्यांच्या विषयी तक्रार कोणाकडे करावी व कशी करावी सविस्तर माहिती द्यावी

Question by Sonam gosavi
05-03-2017
Sonamparbat31@gmail.com

नमस्कार सर. मला ए ने टी पी संक्शन प्लॅाट दोन व्यक्ती मिळून घेयचा अाहे.तर सदर प्लाॅट दोघांच्या नावावर कसा करता येईल . ते सविस्तर सांगावे.
नमस्कार सर,
१) माझे नातेवाईक यांना त्यांचे चुलत्यांनी १९८९ मध्ये गट नंबर १४५ मधून बक्षीसपत्र ने ३० गुंठे जमीन दिली, जमीनीचा ताबा घेतला परंतु बक्षीस पत्राची नोंद साठी कागदपत्रे अथवा अर्ज केला नाही.
२) बक्षीसपत्र करून देणार यांनी १९९५ मध्ये गटाचे हिस्से करून गट नं.१४५/१, १४५/२, १४५/३ असे ७/१२ तयार केले.
३) गट नं.१४५/१ पूर्ण हिस्सा एका व्यक्तीस व गट नं.१४५/२ अर्धा हिस्सा दुसरा व्यक्तीस २००१ मध्ये खरेदी दिला.
४) बक्षीस पत्र करून देणार २००७ मध्ये मयत झाल्यानंतर बक्षीस पत्र केलेली ३० गुंठे जमिनीची नोंद ७/१२ उतारास घेण्यासाठी अर्ज दिला, संबंधित तलाठी यांनी नोंद गट नं.१४५/२ चे उतारास घेतली.
५) प्रत्यक्षात बक्षीसपत्र ने ताबा असलेली ३० गुंठे जमीन प्रथम व नोंद घेतलेली गट १४५/२ या मध्ये गट १४५/१ चे क्षेत्र येते.
६) एकाच हिस्साचे म्हणजे गट नंबर १४५/२ चे क्षेत्र दोन वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकते का? तसा मोजणी नकाशा करता येतो, मार्गदर्शन करावे.
माझ्या वडिलाने माझ्या सावत्र भावाचा नावे २००६ मंध्ये खरीदी खत करून दिले आहे . तरी आम्हा वारसांना तेया जमिनी मंध्ये हिस्सा पाहिजे तेया करीत काय करावे लागेल
वडीलांनी स्वकष्टार्जित कमाईतून सदर खरेदी केली असेल तर तुम्हाला हिस्‍सा मागता येणार नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी
आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती

1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,

2) तसेच गहाणदार घेणारा म्हणजे काय

Question by vnyk
03-03-2017
vnyk1234@gmail.com

कृपया खाली माहिती द्यावी.

रक्ताच्या नातेवाईकाला स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतर करतांना स्टम्पशुल्क द्यावे लागणार नाही.

रक्ताचा नातेवाईक सख्ख्या काकाचा मुलगा किंवा मुलगी होऊ शकतो का ?

रक्ताचा नातेवाईक चुलत काकाचा मुलगा किंवा मुलगी होऊ शकतो का ?

कृपया रक्ताच्या नातेवाईकाची व्याख्या स्पष्ट करावी.

भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५, कलम २४ अन्वये समान मूळ पुरूषापासून किंवा समान पूर्वजांपासून वंशोद्भधव झालेल्या व्यक्तीं मधील संबंध किंवा नाते म्हणजे आप्तसंबंध किंवा रक्तसंबंध

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

संगणकीय ७/१२ अँड ८अ मधील चुका दुरुस्ती साठी कुणाकडे अर्ज करावा . मी या पूर्वी संभंदीत तलाठी व तहसीलदार यांचेकडे अर्ज केले आहे पण त्ये योग प्रतिसाद देत नाही कृपया आपले अमूल्य मार्गदर्शन व्हावे
तहसिलदारकडेच अर्ज करावा. ते दाद देत नसतील तर प्रांतांना भेटावे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by vnyk
01-03-2017
vnyk1234@gmail.com

नमस्कार

खालील प्रश्नाचे उत्तर मिळाले. आभारी आहोत.

७-१२ नुसार लागवडी लायक क्षेत्र १ हे. ४८ आर
अधिक पोटखराबा (लागवडी लायक नसलेले) क्षेत्र ४ हे. ४३

कृपया दोन्ही मिळून एकूण किती एकर आणि किती गुंठे याची माहिती द्यावी.


नमस्कार,

माझ्या सात बारावर खालील प्रमाणे नोंद आहे.

लागवडीचे योग्य क्षेत्र हेक्टर आर

जिरायत १ - ४८ ०
बागायत - -
भातशेती - -
------------------------------------------------
एकूण १ - ४८ ०
------------------------------------------------
पोटखराब ४-४३ ०
वर्ग ( अ ) - ०
वर्ग ( ब ) - ०
------------------------------------------------
एकूण ४-४३ ०
------------------------------------------------
रुपये पैसे
आकारणी.....
------------------------------------------------
जुडी किंवा विशेष आकारणी ० ७९
------------------------------------------------

वरील एकूण क्षेत्र (हेक्टर, एकर, गुंठे ) किती आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे.


८ –अ नुसार १ हे. ४८ आर
७-१२ नुसार लागवडी लायक क्षेत्र १ हे. ४८ आर
अधिक पोटखराबा (लागवडी लायक नसलेले) क्षेत्र ४ हे. ४३ आर
Reply By - कुंडेटकर संजय नरेंद्र
Dy. Coll. Satara

Question by anand salve
01-03-2017
salveanand89@gmail.com

नमस्कार सर, भूधारणेची पद्धत भोगवटादार वर्ग १ अशी लिहली आहे याचा अर्थ काय आहे ?
भोगवटादार वर्ग १ ची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २९(२) मध्येे नमूद आहे. ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वत: असतो अशा जमिनीस भोगवटादार-१ ची जमीन म्हणतात. अशा जमिनीची विक्री करण्यालसाठी त्या शेतकर्यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
७/१२ उतारा वरील एकूण क्षेत्र १२ गुंठे आहे. ३ लोकांची नावे मालक सदरी असून प्रत्येकाचे क्षेत्र आणे वारी नुसार आहे. आणे असलेला क्षेत्र गुंठे मध्ये ७/१२ उतारा वर लिहता येऊ शकते का?
७-१२ संगणीकरणात हा बदल होईलच.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

७-१२ संगणीकरणात हा बदल होईलच.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
कब्जेचे साठेखताची नोंद संबंधीत कामगार तलाठी यांनी इतर अधिकारात घेतली. पुढे साठेखता वरून खरेदी खत केले. खरेदीखताची नोंद घेत असताना आज असलेल्या कामगार तलाठी, मंडल अधिकारी यांनी साठेखताची नोंद कमी करणे आवश्यक होते, झालेल्या चुकीची मंडल अधिकारी यांचे कडे विचारणा केली असता त्यांनी म.ज.म.अधिनियम १५५ अन्वये मा.तहसीलदार यांचे कडे अर्ज करावयास सांगितला.
माझा प्रश्न असा आहे, १५५ अन्वये अर्ज , मंडल अधिकारी चौकशी, जबाब, त्यावरून मा.तहसीलदार सो.यांचा आदेश, त्यानुसार नवीन फेरफार नोंद, मंडल अधिकारी नोंद मंजुरी ह्या सर्व कार्यवाहीतून खातेदाराला जाणे योग्य आहे का?
कोणतीही फेरफार नोंद एकदा रद्द किंवा मंजूर झाल्यावर तलाठी किंवा मंडलअधिकारी त्यात स्वत:हून फेरबदल करू शकत नाही. त्यासाठी सक्षम अधिकार्याचा आदेश आवश्यक आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

कोणतीही फेरफार नोंद एकदा रद्द किंवा मंजूर झाल्यावर तलाठी किंवा मंडलअधिकारी त्यात स्वत:हून फेरबदल करू शकत नाही. त्यासाठी सक्षम अधिकार्याचा आदेश आवश्यक आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझ्या आजोबांचे नाव आमच्या लगत असलेल्या सर्व्हे नंबर च्या ७/१२ उतारातील इतर अधिकारात कुल म्हणून आहे. जमीन वर त्यांचाच ताबा आहे. कुल म्हणून असलेला शेरा कमी करता येतो का? माझे आजोबा मयत असून, ७/१२ उतारा वर शेजारील वारसाचे नावे मालकी हक्कात आहे.
आपण तहसिलदारकडे अर्ज करावा. कागदपत्रे बघून ते योग्य तो निर्णय घेतील.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब ,
सात बारा मधून एखाद्या व्यक्तीचे / इसमाचे एकमेकांच्या सहमतीने नाव काढून टाकण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल, कृपया या प्रक्रियेची सविस्तर माहिती द्या ?

धन्यवाद !
यासाठी याोग्‍य त्‍या कायद्‍याखाली नाोंदणीकृत दस्‍त करावा लागेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by मुले आ
25-02-2017
madhavnmule@gmail.com

जमीन जर भोगवटदार वर्ग २ ची असेल तर सदर जमीनीचे एकत्र कुटुंबात वाटनीपत्र करता येईल का
नमस्कार सर, इतर अधिकारातील शेरा साधे कुळ म्हणजे काय? साधे कुळ मयत असल्यास काय करावे? साधे कुळ शेरा कमी करता येतो का?
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम १८ अन्वये, पट्याने जमीन धारण करणारी व्यक्तीे म्‍हणजे कुळ. कुळ मयत असल्यास त्‍याच्‍या वारसाचे नाव दाखल हाोऊ शकते. कुळासंबंधीचे सर्व अधिकार तहसिलदारला आहेत. पण तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
एकत्रीकरण योजने पूर्वी सर्व्हे नंबर च्या ७/१२ उतारा वरील क्षेत्र दोन जणांच्या नावावर सामायिक होते. एकत्रीकरण (गट स्कीम) योजने नंतर दोघांचे खाते फोड होऊन गट नंबर वेगळे झाले. एकाच्या नावावर 3हेक्टर २०आर व दुसऱ्याच्या नावावर 3हेक्टर ७५आर जमीन झाली. तशी नोंदही एकत्रीकरण योजनेच्या 9(३)(४) च्या उताऱ्यात करण्यात आलेली आहे. त्यापैकी ३हेक्टर ७५आर जमीन असलेला गट नंबर माझ्या वडिलांनी १९९१ मध्ये खरेदी घेतला आहे. ३हेक्टर २०आर जमीन असलेल्या मालकाने २००५ मध्ये जमीन विकलेली आहे, त्या व्यक्तीने २०१६ मध्ये एकत्रीकरण योजनेत चूक होऊन क्षेत्र कमी जास्त नावावर झाले. वाटप सारखे करावे ह्यासाठी दावा केलेला आहे. योग्य मार्गदर्शन करावे.
Namaskar Sir,

Maja nav pramod asun, majya vadilancha nave 73 gunthe vadiloparjit varg no.1 Jirayati jamin asun sadhya ti 2012 pasun padit ahe. 7/12 var pikpera 2012 sal pasun padit ahe. Maja prashna asa ahe ki ashi khajagi jamin padit asalyas sarkarjam hote ka? Ani jar ata mala pik pera 7/12 var lavayacha asel tar tyachi proceedure kay ahe?

Thanks.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६५ अन्वये सलग दोन वर्षे लागवडीखाली न आणलेल्या जमिनीचे व्यवस्थापन शासन स्वत:कडे घेऊ शकेल अशी तरतुद आहे. तथापि, आपण नवीन हंगामात हवे ते पीक घेऊन, तलाठी ज्यावेळेस पीक-पाहणीसाठी येतील तेव्हा सदर पिकची नोंद गाव दप्तरात घेण्याची विनंती त्यांना करावी अथवा त्या्प्रकारचा अर्ज तलाठीकडे द्यावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by vishwas mande
20-02-2017
vishwasmande@yahoo.com

maze navavaril 77 gunthe jaminipaiki 20 gunthe jamin maze patniche navavar karanesathi yogya marga sanga
आपण बक्षीसपत्राने किंवा नोंदणीकृत वाटप पत्राने जमीन देऊ शकाल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय
माझी शेती ३१ नं या गटात येते
यात ३ हिस्सेदार असून त्यातील माझा चार आनेचा हिस्सा आहे तो दोन तुकड्यामध्ये विभागाला आहे तर मी मोजणी मागवू शकतो का ?
त्यासाठी मला बाकी हिस्सेदारांची संमती आहे का ?
जर संमती दिली नाही तर मोजणी कशी मागवावी ?
आपण मोजणीसाठी अर्ज करू शकाल. मोजणीसाठी सहहिस्सेदारांची संमती असावी. त्या‍साठी त्यांना मोजणीची नोटीस बजावली जाणे आवश्यक आहे. तथापि जर नोटीस बजावूनही सहहिस्सेदार जाणूनबुजून संमती देत नसतील किंवा गैरहजर रहात असतील तर मोजणी अधिकार्यांच्या निदर्शनास ही गोष्ट् आणून द्याावी. ते योग्‍य तो निर्णय घेतील.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय,
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक २०१७ मध्ये पोस्टल बॅलेट साठी पी बी १ नमुन्यात प्राप्त झालेले अर्जाची यादी उमेदवारास अर्ज केल्यास देता येईल काय ?त्याची फी किती घ्यायची आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
संबंधीत निवडणूक निर्णय अधिकार्याशी संपर्क करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.62 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3