जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अमितकुमार शिर्के
22-01-2017
amitkumar.shirke@gmail.com
सर
१. सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण यादी २०११,
च्या अंतिम प्रसिद्ध झालेल्या यादीतील नागरिक दारिद्र रेषेच्या खालील यादीत येऊ शकतात का.
२. वरील यादी कोणत्या वेबसाईट वरती पहावयास मिळेल.
३. वरील यादी कोणत्या कार्यालयात पहावयास मिळेल.
४. वरील यादीत जर नाव नसेल तर ते येण्यासाठी काय उपाययोजना अवलंबवावी.
Question by स्मिता khatpe
21-01-2017
smitakhatpe87@gmail.com
अ ने ब ला जमीन विकली असेल तर अ ला ती जमीन वारसा हक्काने मिळाली असेल व त्यामध्ये त्याचा बहिणीने देखील खरेदीखतामध्ये सही केली असेल व एक बहिणीने सही नसेल केली तर तिचा हिस्साची जमीन तिला परत मिळेल व अ वक्तीचे लग्न झाले असेल तर त्याच्या बायकोला त्यामध्ये हिस्सा मिळेल का त्यासाठी काई करावे लागेल मार्गदर्शन करावे हि विनंती
बहिणीने सही केली असेल तर तिने तिचा मिळकतीतील हिस्सा सोडला आहे असा अर्थ होतो , त्यामुळे तिला मिळकतीत हिस्सा मिळणार नाही .
मात्र जर सही केली नसेल तर , बहिणीला जमिनीत हिस्सा मिळू शकणार नाही मात्र तिच्या हिस्स्याच्या जमिनीचे पैसे तिच्या भावाकडून मिळू शकतात. मात्र त्यासाठी बहिणीला जर भाऊ पैसे देत नसेल तर, दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
21-01-2017
rahul9619309796@gmail.com
साहेब नमस्कार ,
मी राहुल सावंत माझ्या मावस भावाला बदलापूर -ठाणे जिल्हा, येथे गावठाण मध्ये चाळ टाईप मध्ये रूम घ्यायचा आहे. तरी बिल्डरने सांगितले आहे कि मी ग्रामपंचायतची रीतसर परवानगी घेऊन सदर चाळीचे बांधकाम केलेले आहे . करारनामा नोटरी करून देणार आहे, जमीन मालकाशी बांधकाम करण्याचा करार केलेला आहे, सदर रूम विकत घेतल्यावर ग्रामपंचायत मधून घर पावती माझ्या भावाच्या नवे येईल असे बिल्डरने सांगितले आहे . सदर चाळीतील रूम माझ्या भावाने घेणे योग्य आहे काय ? बिल्डर व माझा मावस भाऊ यांच्या मध्ये करारनामा नोटरी असल्या मुळे भविष्यात त्याला काही अडचणी येऊ शकतात काय ? तरी साहेब मला आपण योग्य ते मार्गदर्शन करावे हीच नम्र विंनती
करारनामा नोंदणीकृत असणे आवश्यक व कायदेशीर द्रिष्टया योग्य व हितावह
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष भावजी जवरे
20-01-2017
jaware_sb@rediffmail.com
एका गावाचे अ नांव असून तेथील गावांकऱ्यानी त्या गावाचे नांव बदल्याबाबत ग्रामपंचायत प्रस्ताव सादर केला आहे? तर सदर गावाचे नांव कोणत्या अधिनियम किंवा शासन तरतूदीन्वये बदल करण्याची कार्यपध्दती चा अवलंब करुन करता येईल या बाबत मार्गदर्शन करावे
केंद्र गृह विभागाचे परिपत्रक आहे त्या वर्णावं बदल्याणाचा प्रस्ताव , जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्य शासन व केंद्र शासनाकडे जातो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल वाघमारे
19-01-2017
rahulwaghmare2086@gmail.com
सर गायरान जमीन १९७९ला पठ्ठ्याने मिळालेली आहे ती विकता येते का.विक्री साठी कुणाची परवानगी लागते
गायरान जमीन पट्ट्याने देता येत नाही .त्यामुळे त्याची विक्री करण्याचा अथवा परवानगी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
18-01-2017
swati.swami@yahoo.com
आतियात कायद्यानुसार विरासतचे अपील उपविभागीय अधिकारी यांच्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करावे लागेल कि जिल्हाधिकारी यांचेकडे ?
Question by anand salve
18-01-2017
salveanand@89gmail.com
नमस्कार सर , तलाठी ऑफिस मधून फेरफार मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो का ? तो कसा ? किती दिवसात आपल्याला फेरफार बाबत माहितीचे कागतपरत्र मिळतील .
संबंधित फेरफार तलाठी कार्यालयात उपलब्ध असेल तर त्या फेरफारचा क्रमांक नमुद करून अर्ज द्याावा. अन्यथा तहसिल कार्यालयातील अभिलेख कक्षात अर्ज करावा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
18-01-2017
sadik11m@rediffmail.com
Sir केंद्र शासन व राज्य शासन यांचे ओ बी सी आणि नॉन क्रीमिलेयर दाखले वेगवेगळे असते का एकच असते
Question by अंकुश भालेराव
17-01-2017
ankushbhalerao143@gmail.com
नमस्कार सर मी प्रशासकीय सेवेत नवीन असल्यामुळे माल काही दास्तैवाजांची माहिती नाही त्यामुळे मला खालील दस्तऐवज काय असतात वं ते कोठून काढावी लागतात याची माहिती द्यावी.
१ क प्रत
२ नमुना ड
३ अकृषक कर
४ मालमत्ता पत्रक
मोजणी नकाशाच्या "क" प्रत साठी भूमि अभिलेख कार्यालय.
अकृषक कर साठी तलाठी कार्यालय/तहसिल कार्यालय
मालमत्ता पत्रक साठी नगर भूमापन कार्यालय
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Rajesh kahare
17-01-2017
rajeshkahare@gmail.com
तलाठी यांनी ऑनलाइन फेरफार घेतला त्यावर आक्षेप प्राप्त झाला तद् नंतर सदर फेरफार हा मंडळ अधिकारी याचे लाॅगीनवर जातो का? त्या आक्षेपित फेरफारवर मंडळ अधिकारी यांनी कोणती कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
Question by स्वाती स्वामी
13-01-2017
swati.swami@yahoo.com
वर्ग १ चे अधिकारी यांची शासन स्तरावर विभागीय चौकशी सुरु असल्यास त्यांना तात्पुरती पेन्शन किती दिवस देता येते .कृपया मार्गदर्शन व्हावे .
Question by रामेश्वर
13-01-2017
aksharcomp2007@gmail.com
नमस्कार सर ! माझे वडिलांचे फेब्रुवारी २०१६ मध्ये निधन झालेले आहे. मी वारस नोंदणी करीत अर्ज केला असता विद्यमान तलाठी यांनी कोर्टाचे वारस प्रमाणपत्र लागेल असे सांगितले आहे. प्रतिज्ञा पत्र सादर केले तर वारसा नोंद होत नाही का? कृपया मार्गदर्शन करावे.
जर वारसा बाबत वाद नसेल तर , तलाठी यांनी म.ज. म.अ खंड ४ प्रमाणे वारस पंचनामा करून , वर्षांची नावे मिळकतीस लावू शकतात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद पवार
12-01-2017
pramodpawar23@gmail.com
माझ्या नातेवाईकांची १० गुंठे जमीन आहे, नवीन शर्तीने मिळाले, जागेची परिस्थिती पाहता हायवे जवळ असल्याने शेती होणे अशक्यप्राय होते. याबाबत जागा मालकाने १९९३ पासून पत्रव्यवहार केला आहे शर्थ शिथिल करण्याची विनंती केली होती.
दरम्यान सादर जागेवर शर्त भंग झाला, प्रांताधिकार्यानी आदेश दिला, त्या विरोधात अपील केले आणि अपिलाच निर्णय देताना उपजिल्हाधिकारी महोदयांनी "सदर जमीनिला बिनशेती गुण धर्म असल्याने नजराणा भरून घ्यावा असे आदेश सन 2002 दिले. दरम्यान जमीन मालकाचा अपघात झाला आणि याला कायमचे अपंगत्व आले.
पुन्हा या जागेवर आता शर्त भंग प्रस्ताव झाला, जमीन मालकाने वारंवार मान्य केली की मी बांधकाम।केलवय पण त्या शिवाय मला लार्ययी नव्हता, नोटीस आल्यावर अपंग जमीन मालकाला पुन्हा हर्ट अटॅक आला.
आता प्रकृती गंभीर आहे, प्रांताधिकार्यानी १९९३ पासून।चे पेपर नकाशे सर्व म्हणणे देऊनही त्यांनी शर्त भंग झाल्याचा आदेश दिला.
आम्ही दंड नजराणा भरायला आता तयार आहोत,
आणि बांधलं घर हे वारंवार मान्य केलय.
आता या प्रकरणी काय करावे लागेल. कृपया मागदर्शन करावे हि विनंती
ज्या अधिकाऱ्याने जमीन प्रदान केली आहे त्याचे कडे शर्थ भंग नियमित करण्याचा प्रस्ताव सादर करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bal bhosale
12-01-2017
Balbhosale123@gmail.com
Sir,
१) मी प्रकल्पग्रस्त दाखल्याच्या आधारे शासनाचा कर्मचारी आहे, तरी मला हि नोकरी सोडायची असून पुन्हा मला प्रकल्पग्रस्त दाखल्याच्या आधारे नोकरी साठी नवीन फॉर्म भरता येईल का? किंवा नोकरी मिळवता येईल का?
२)प्रकल्पग्रस्त दाखल्याच्या आधारे एकदा लाभ घेतला असेल तर सध्याची नोकरी सोडून पुन्हा त्याच दाखल्याच्या आधारे नोकरी मिळवता येईल का?
प्रकल्प ग्रस्त दाखल्याचे आधारे आपण नोकरी मिळवली आहे . त्यामुळे राजीनामा देऊन आपणास प्रकल्प ग्रस्त दाखल्याचा वापर करून , निकरी मिळवता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
12-01-2017
swati.swami@yahoo.com
आरवोआर प्रकरणाचे कामकाज करण्यासाठी कोणते पुस्तक अभ्यासावे लागेल ?
Question by प्रबोध निरंजन धांदे
10-01-2017
prabodh_dhande@yahoo.co.in
मी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे कार्यरत असून आम्हाला आमच्या कार्यालय व प्रकल्पां करीता शासकीय तसेच खाजगी जमिनी खरेदी करावयाच्या आहेत. त्याकरिता कोणत्या नियमाचा / कायद्याचा अभ्यास करावा लागेल. कृपया मार्गदर्शन करावे ही विंनती
Question by Sangle santosh
09-01-2017
santoshsangale5555@gmail.com
Sir aakarpad jamin mhanje Kay please give me details
जमीन महसूल न भरल्याने अथवा अन्य कारणाने शासन जप्त जमीन .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन भोसले
09-01-2017
bhosalesachin23@gmail.com
सर नमस्कार
देवस्थान इनाम वर्ग ३ असा उल्लेख माझ्या सात 12 असून माझे नाव कुळ म्हणून आहे. पण ती जमीन देवस्थान चे ट्रस्टी मला कसू देत नाहीत .ती जमीन ट्रस्टी काढून विकू शकतात का किंवा कुळ म्हणून दुसर्यास देऊ शकतात का ?
होय .
देवस्थान इनाम असल्याने आपले नावे जमिनीची किंमत निश्चित होऊ शकत नाही . त्यामुळे आपण जरी १.४.१९५७ अथवा त्या पूर्वी पासून कुल असला तरी , आपण मानीव खरेदीदार होऊ शकत नाही . त्यामुळे जमीन मालक , देवस्थान ट्रस्टी , कलाम ३१ खाली , जमीन काढून घेण्यासाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करू शकतात . अथवा आपली कुल वहिवाट संपुष्टात आणणेसाठी तहसीलदार यांचे कडे अर्ज करू शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by साठे दीपक
07-01-2017
sathe.dipak@gmail.com
तुकडेबंदी कायद्यानुसार एखादी खरेदी रद्द झाली असल्यास , सदरची जमीन त्या जमिनीमधील जुन्या मूळ वारसापैकी एखादा वारस दंड भरून जमीन परत घेऊ शकतो का ?
अशी जमीन चे हस्तांतरण अवैध असते . अश्या जमिनीची विल्हेवाट , म.ज.म.अ. ( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९७१ प्रमाणे होते . आपण अर्ज करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष मोरे
07-01-2017
santoshpmore9@gmail.com
३५ वर्षांपूर्वी झालेली खरेदी जर तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणारी असेल तर तक्रार झालेनंतर सादर खरेदी व्यहारावर कायदेशीर कारवाई होईल काय ?
Question by अभिजित य पाटील
06-01-2017
abhijit_y_patil@yahoo.co.in
सर नमस्कार
एक वडिलोपार्जित सामायिक मिळकतीचा फेरफार नोंदवितानाच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे अफ़रातफ़रीच्या व आक्षेपार्ह्य गोष्ठी घडल्या आहेत.
१. फेरफार नोंदवल्या नंतरच्या नोटीसवर ज्या लाभार्थी व्यक्तीने सही केली आहे ती व्यक्ती फेरफार नोंदवण्याचा दोन दिवस आधीच परदेशी निघून गेली होती. (पासपोर्ट वरील नोंद पुरावा म्हणून दुसऱ्या एका महसूल प्रकरणात दाखल आहे). म्हणजेच प्रत्यक्षात तलाठी यांनी फेरफार आधी नोंदवलाय मात्र तारीख पुढची टाकली आहे.
२. लाभार्थी व्यक्तीने केलेल्या अर्जावरील कोर्ट फी स्टॅम्प वर फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतरची तारीख आहे. म्हणजे फेरफाराचा अर्ज फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतर केला आहे.
३. अर्जावर सादर केल्याची व स्वीकारल्याची तारीख नाही. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची नोंद रीकामी आहे.
४. मिळकती बाबत फेरफारात माझ्यावर अन्याय करणाऱ्या चुकीच्या नोंदी केल्या आहेत.
या बाबत तेहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा केल्यावर त्यांनी तलाठी यांचेकडून स्पष्टीकरण अहवाल मागितला आहे. फेरफार अजून मंजूर होणे बाकी आहे. चुकीच्या नोंदी असणारा फेरफार होऊन देणे व त्याबाबत नंतर RTS अपील भांडत बसणे मला टाळायचे आहे. तरी या प्रकरणात
१. फेरफार नोंदणी प्रक्रियेचे योग्य पालन झाले नाही म्हणून फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल?
२. किंवा कोणत्या मार्गाने फेरफार मंजूर होण्याआधीच रद्द करता येईल?
(माझ्या मिळकतीचा हक्क माझ्यासाठी महत्वाचा आहे. तलाठी यांचेवर कारवाई होणे किंवा न होणे माझ्यासाठी गौण आहे.)
कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
Question by विनायक कोकणे
06-01-2017
Vskokane1985@gmail.com
आदरणीय सर,
आम्ही कसत असलेली 6 ते 7 एकर शेती मा.तहसिलदार यांच्या आदेशानुसार सन 1994 पासुन वहीवाट दाखल असुन ७ /१२ मधे आम्हा तीन भावांची नावे जमीन करणाराचे नाव या रकाण्यामध्ये आहे. सदर जमीनीचा ताबा सन १९८२ पासुन आजवर आमच्याकडे आहे. सदर जमीनीची केस महसुल व दिवाण न्यायालयात निकाल आमच्या बाजूने लागला आहे . नवीन कुळ लावण्याकरीता मार्गदर्शन करावे .
दिवाणी न्यायालयाने निकाल आपले बाजूने दिला आहे . दिवाणी न्यायालयाचा कश्या बद्दल आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद पवार
05-01-2017
pramodpawar23@gmail.com
माझ्या नातेवाईकांची १० गुंठे जमीन आहे, नवीन शर्तीने मिळाले, जागेची परिस्थिती पाहता हायवे जवळ असल्याने शेती होणे अशक्यप्राय होते. याबाबत जागा मालकाने १९९३ पासून पत्रव्यवहार केला आहे शर्थ शिथिल करण्याची विनंती केली होती.
दरम्यान सादर जागेवर शर्त भंग झाला, प्रांताधिकार्यानी आदेश दिला, त्या विरोधात अपील केले आणि अपिलाच निर्णय देताना उपजिल्हाधिकारी महोदयांनी "सदर जमीनिला बिनशेती गुण धर्म असल्याने नजराणा भरून घ्यावा असे आदेश सन 2002 दिले. दरम्यान जमीन मालकाचा अपघात झाला आणि याला कायमचे अपंगत्व आले.
पुन्हा या जागेवर आता शर्त भंग प्रस्ताव झाला, जमीन मालकाने वारंवार मान्य केली की मी बांधकाम।केलवय पण त्या शिवाय मला लार्ययी नव्हता, नोटीस आल्यावर अपंग जमीन मालकाला पुन्हा हर्ट अटॅक आला.
आता प्रकृती गंभीर आहे, प्रांताधिकार्यानी १९९३ पासून।चे पेपर नकाशे सर्व म्हणणे देऊनही त्यांनी शर्त भंग झाल्याचा आदेश दिला.
आम्ही दंड नजराणा भरायला आता तयार आहोत,
आणि बांधलं घर हे वारंवार मान्य केलय.
आता या प्रकरणी काय करावे लागेल. प्ल्झ मार्गदशान करा
Question by सुजित बर्गी
05-01-2017
sujitbargi95@gmail.com
नमस्कार सर ,
मला खालील प्रश्नांवर मार्गदर्शन आणि शंकांचं निरसन करावे हि विनंती .
मी दिनांक २ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रश्न क्रमांक १ विचारला होता.
प्रश्न १) एका व्यक्तीने पूर्वी जमीन खरेदी केली असून त्यांना तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे. तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ?
या प्रश्नाचा उत्तर श्री. कुंडेटकर साहेबांनी दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करावा
अशाप्रकारे देऊन प्रश्नाचा निरसन केलं होतं तर या उत्तरा प्रमाणे दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करण्यासाठी कशाप्रकारे व कोणती प्रक्रिया असू शकते? कृपया मार्गदर्शन करावे .
प्रश्न २) कानू नावाच्या व्यक्तीला पूर्वी कुळकायद्या नुसार जमीन मिळाली, त्यानुसार सात बारा मध्ये कुळाचे वर्णन : साधे कुळ ( 1 )
म. ग. पाटील यांचा ( 1 )
32 ग चा बोजा र.रु. 414.70 ( 1 )
हपते 5 ( 1 ) असे वर्णन आहे
वरिल व्यक्तीला (कानूला ज्याला कुळ कायद्यानुसार जमीन मिळालेली आहे ) तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे. तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत, हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ? शिवाय वर वर्णन केलेले कुळ सात बारा मधून काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल ?
प्रश्न ३) वरील प्रश्न क्रमांक २ ला संधर्भात घेऊन याच जागेमध्ये शेती व्यवसायाला पूरक म्हणून पूर्वीपासूनचा अनिल यांचा गुरांसाठी गोठा आहे, हा गोठा ग्रामपंचायतच्या गाव नमुना नंबर ८अ रजिस्टर वर शिवाय असेसमेंट लिस्ट रजिस्टर वर पूर्वीपासूनच अनिल यांच्या नावे आहे. तर अनिल यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मंगेश याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुरांसाठीचा गोठा ग्रामपंचायतच्या गाव नमुना नंबर ८अ रजिस्टर मध्ये व असेसमेंट लिस्ट रजिस्टर वर नमूद करून गोठा आपल्या नावे करून घेतला आहे. तर या सर्व मंगेशने केलेल्या कायदेशीर प्रक्रियेला दीपक व कमला यांनी विरोध करीत ग्रामपंचायतला हरकत पत्र सादर केला आहे तर काय करावे ?
धन्यवाद !
Question by प्रवीण शेंडे
04-01-2017
pshende90@gmail.com
नमस्कार
सर आमच्या सात बाराउताऱ्यावर ' जमीन हस्तांतर गटाचे विभाजन व वाटप यावर बंदी ' असं शेरा आहे आम्ही गटातील शेजारील शेतकऱ्याचे १४ गुठे क्षेत्र खरेदी केले आहे त्याचे खरेदीखत झाले असून सात बारावर नोंद करण्यास मंडळ अधिकारी यांनी नकार दिला आहे त्यांनी सक्षम अधिकारी यांचे परवानगी पत्र आणण्यास सांगितले आहे. नेमके कोणते अधिकारी याबाबत पत्र देतील याची माहिती द्यावी आमची नोंद होईल का ? धन्यवाद.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
