जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर नमस्‍कार
माझे वडीलाने एक प्‍लॉट खरेदी केलेला आहे.गट नं.२२ व २८ या दोन्‍ही चा लेआउट व अकृषिक परवानगी एकच आहे. दोन्‍ही गटात ि‍मिळून प्‍लॉटींग नं. ०१ ते ५० असे केले आहेत. ०१ ते २६ क्रमांकाचे प्‍लॉट गट नं.२२ मध्‍ये आहेत व प्‍लॉट क्रं.२७ ते ५०दुस-या गटात आहेत. प्‍लॉट क्रं.२९ हा गट नं.२८ मध्‍ये आहे परंतू रजिस्‍ट्री करताना सदर प्‍लॉट गट नं.२२ असा नोंदणी झाला आहे. खरेदी करुन सोळा वर्षोपेक्षा जास्‍त कालावधी झाला आहे त्‍यामुळे लिहून देणार आज रोजी रजिस्‍ट्री दुरुस्‍ती साठी येत नाहीत त्‍यामुळे ि‍लिहून देणा-या शिवाय दुरुस्‍ती करण्‍यासाठी दुसरा कांही पर्याय आहे का
मिळकतीचे वर्णन पूर्णपणे बदलत आहे. त्यामुळे ही चूक झाली सोळा वर्षापुर्वी दस्त नोंदणी झाल्याझाल्या जरी लक्षात आली असती तरी त्याची दुरुस्ती खत करणे थोडे कठीण होते. जर त्या दस्ता मध्ये आपण चतुर्सिमा लिहिले असत्या व त्या चतुर्सिमा या प्लॉट नंबर 29 च्या अनुषंगाने नमूद केलेले असतील व प्लॉट नंबर 22 प्लॉट नंबर 29 याची एकूण क्षेत्र सारखेच असेल तर दुरुस्ती दस्त होण्यास हरकत नसावी. तथापि ही चूक लक्षात येण्यास तब्बल सोळा वर्ष का लागले याचे कारण काय सांगणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच दुरुस्ती खत करण्यास जर मूळ विकणारा व्यक्ती येत नसेल तर त्याला दुरुस्ती असे संबोधता येणार नाही.यामध्ये काही करता येईल असे मला वाटत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की , वडील वडीलोपार्जित जमीन आपल्या आपत्यांपैकी कोणत्याही एका आपत्याला विक्री करू शकतात काय ?
वडिलोपार्जित जमीन मध्ये मुलांचा नातू चा तसेच मुलींचा हक्क असतो. त्यामुळे केवळ एका मुलाच्या नावे वडिलोपार्जित जमीन वडिलांना करता येत नाही. समजा एका व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून पाच एकर जमीन प्राप्त झालेली आहे. आणि या पाच एकर जमिनीचे तो विल्हेवाट लावू इच्छित आहे. तर तो सर्व पाच एकर जमीन केवळ एकाच मुलाचे नावे करू शकत नाही. समजा या व्यक्तीला दोन मुले आणि दोन मुलगी आहेत. तर या जमिनीचे वाटप प्रत्येक मुलाला व मुलीला एक एकर कोणत्या व्यक्तीला स्वतःला एक एकर असा त्या मिळकतीवर हक्क असतो. या चारा प त्यापैकी केवळ एकाच मुलाचे नावे वडील मिळकत करू इच्छित असतील, तर त्या मुलाच्या वाट्याला येणारे केवळ एक एकर क्षेत्र हे त्याच्या नावे करू शकतील. संपूर्ण पाच एकर क्षेत्र एकाच मुलाच्या नावे होणार नाही. याउपरही त्याने सर्व पाच एकर क्षेत्र एकाच मुलाचे नावे केले, आणि इतर तीन व्यक्तींनी त्यास हरकत घेतली, तर अशाप्रकारे या दस्त द्वारे एकाच व्यक्तीच्या नावे मिळकत केली आहे तो दस्त रद्दबादल होऊ शकतो. व पर्यायाने हा व्यवहार ही रद्द होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझे आजोबा 50-55 वर्षा पूर्वी वारले
त्यांच्या नावे 7-8 एकर जमीन होती त्यांनी ती ते हयात असतानेच विकली आहे त्यांना 4 मुले व 3 मुली होत्या त्यापैकी अत्ता फक्त 2 मुले हयातीत आहे माझे वडील व चुलते
यांच्या पैकी कोणाच्याही नावे जमीन नाही

आता मला शेत जमीन घ्यायची आहे तर त्यासाठी मी शेतकरी असल्याचा पुरावा कसा द्यावा

अत्ता आमच्या गावात आमचे आजोबा व त्यांचे चुलत भाऊ यांच्या नवे 1 गुंठाचा उतारा दिसत आहे

त्याला अनुसरून काही करता येईल का व कसे

सदर उतारा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आहे

व मी लहानपणा पासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राहत आहे

ज्ञानेश्वर माणिक भांगे
9730101910
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 , कलम 63 व्यक्ती शेतकरी असल्याशिवाय त्याला शेत जमीन खरेदी करता येत नाही. या कायद्याच्या कलम दोन अन्वय शेतकरी म्हणजे जी व्यक्ती जमीन स्वतः कसते . जमीन स्वतः करणे म्हणजे स्वतःच्या देखरेखीखाली कुटुंबातील सदस्यांनी जमीन कसणे किंवा रोग पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात मोबदला देऊन नोकराच्या मदतीने जमीन कसणे.
या दोन व्याख्यांचा विचार केला तर आपण शेतकरी या व्याख्येत बसू शकतात. तसेच मिळकत ही आपले आजोबा व चुलत भावाच्या नावाने आहे. व त्याचे वाटप झाले नसल्याने आपण एकत्र कुटुंबात आहात व त्या व्याख्येत आपण बसत आहात. त्यामुळे कुळवहिवाट कायद्याच्या व्याख्येप्रमाणे आपण शेतकरी आहात. परंतु कुळवहिवाट कायद्यांतर्गत अभिप्रेत असलेली जमीन म्हणजे शेत जमीन. जमीन एकत्रित एक गुंठा आहे, तिचे सध्याचे स्थान कुठे आहे? ती जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत मानीव बिनशेती म्हणून झाल्याचे आदेश तहसीलदार यांनी काढलेले आहेत का? याची पडताळणी करा. अथवा त्या जमिनीचे परवानगी घेऊन त्यावर बांधकाम झालेले आहे का याची खात्री करा? जर अशी वस्तुस्थिती नसेल तर आपणाला शेतकरी दाखला मिळू शकतो. व त्या दाखल्याच्या आधारे आपण शेतजमीन खरेदी करू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर डिजिटल सातबारा वर नाव येत नाहीत dsc मधून सातबारा निघते पण डिजिटल सातबारा वारनाव येत नाही. कृपया उपाय सांगणे .

Question by Prashant
27-01-2021
pmadasnal@yahoo.com

Sir, our housing society has received notice from talathi office about pending dues under "maharashtra jamin mahsool". How to pay it online and which challan # to use?
GRAS- हि आज्ञावली आहे . या द्वारे भर

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
खेडे गावातील सुशिक्षित बेरोजगार भूमीहीन व्यक्ती ला जर काही व्यवसाय उद्योग चालू करायचा असल्यास त्याला ग्रामपंचायत गावठाण किंवा शासन ताब्यातली पडीक वन जमीन भाडे करार तत्वावर किंवा इतर काही मार्गाने उद्योग करायला जमीन भेटू शकते का किंवा शासनाची काही योजना आहे का भूमीहीन व्यक्ती ला उद्योग उभा करण्यासाठी
कृपया माहिती कडवावी
धन्यवाद
महाराष्ट्र जमीन महसूल( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 1971 चे नियम 26 अन्वये उद्योग चालू करण्यासाठी शासकीय जमीन देण्याबाबतची तरतूद आहे. याबाबत अंतिम अधिकार हे राज्य शासनाचे आहेत. आपणाला जमीन मागणीसाठी चा अर्ज आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे करावा लागेल. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रकरणाची चौकशी करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनाकडे म्हणजे महसूल व वन विभाग कडे सादर केला जातो. अंतिम मंजुरी महसूल व वन विभागाकडून दिली जाते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by पवार
24-01-2021
shreepadservices@gmail.com

वडिलोपार्जित 7 एकरशेतजमिनीवर आम्ही2 भाऊ व 2 बहिणीचे नाव असून त्या जमिनीचा किती सारा द्यावा लागतो
जमिनीचा शेतसारा हा जमिनीची उत्पादकता, जमिनीचा प्रकार त्याचा पोत व इतर बाबीवर अवलंबून असते. शेतसारा निश्चित करण्याची कार्यवाही ही फार पूर्वी झालेली आहे. त्याच्यानंतर शेत्सरा निश्चितीकरण म्हणजे( Settlement ) अजून झालेले नाही. एखाद्या जमिनीवर किती लोकांची नावे दाखल आहेत यावर जमिनीचा शेतसारा अवलंबून नसतो. आपण आपल्या गावाच्या गावकामगार तलाठी कडे जा त्या जमिनीचा शेतसारा किती आहे त्याबाबतचे मागणीपत्र तो आपणाला देईन.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
माझ्या पंजोबांना एकूण सहा मुले होती, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असणाऱ्या जमिनिपैकी अर्ध्या जमिनीमध्ये सर्व मुलांची नावे वारस म्हणून लागली ,परंतु काही जमिनीमध्ये फक्त मोठा मुलगा म्हणजे माझ्या आजोबांचेच नाव वारस म्हणून लागले आहेत , मात्र बाकी वारसांची नावे लागली नाहीत, आता ते सगळे मृत असून त्यांची मुले हयातीत आहेत आणि जमिनीच्या सातबाऱ्यावर माझ्या आजोबांच्या मुत्युनंतर माझे बाबा, काका आणि आत्या यांचे नाव लागले , आणि बाबांच्या मृत्यूनंतर आम्हा सहा भावंडांची नावे लागली त्यात एका भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पाच वारसांची नावे लागली म्हणजे सद्यःस्थितील *माझी आई,आत्या,काका,४ भाऊ,१ भाऊजई,४ पुतणे आणि मी अशी एकूण १३ नावे आहेत* त्यामधून काही जमिनीवर माझ्या आत्याने हक्कसोड दिला आहे आणि काही जमिनीवर माझ्या एका भावाच्या नावे माझ्यासकट सर्व वारसांनी हक्कसोड दिला आहे, परंतु सदर सर्व जमीन हि वडिलोपार्जित असल्याने माझ्या आजोबांचे भावांचे वारस त्यात हक्क मिळवू शकतात का? आणि कशाप्रकारे? जर शक्य असल्यास सदर जमिनीत केलेल्या हक्कसोड आणि इतर खरेदी विक्रीच्या व्यवहारांचे काय होईल?
मूळ जमीन ती पंजोबा यांच्या मालकीची होती. त्यांच्या मृत्यूपश्चात एकूण मिळकतीला आपले आजोबा व आपले चुलत आजोबा या दोघांची नावे लागणे आवश्यक होते. एकूण जमिनीपैकी अर्ध्या जमिनीला पणजोबांच्या सर्व वारसांची नावे लागलेली आहेत. उर्वरित अर्ध्या जमिनीला केवळ आपल्या आजोबांचे नाव लागले व त्यांच्या पश्चात आपले वडील आत्या व आता आपली नावे लागलेली आहे. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे एखादी हिंदू व्यक्ती मयत झाल्यावर अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे, मयत व्यक्तीच्या सर्व मुलांची नावे त्याच्या मिळते तिला लागणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या अर्ध्या जमिनीला केवळ आपल्या आजोबा व त्यांच्या पश्चात आपण सर्व वारसांची नावे लागली आहेत त्यामध्ये निम्मा हिस्सा हा आपल्या चुलत आजोबांचा व पर्यायाने आता त्यांच्या वारसांचा आहे. याबाबत त्यांनी हक्काबाबत महसूल यंत्रणेकडे अर्ज अपील केल्यास अथवा दिवाणी न्यायालयात दावा केल्यास त्यांना आपल्या ताब्यात व नावावर असलेल्या जमिनी मध्ये अर्धा हिस्सा देणे आवश्यक आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर. 7/12 सदरी 'इनाम वतन जमिन, नवीन अविभाज्य शर्त - नियंत्रित सत्ता प्रकाराने अशी नोंद असलेल्या जमिनीचे रूपांतर भोगवटदार 2 मधून भोगवटदार 1 मध्ये करायचे असेल तसेच सदर जमिनीचा अकृषिक वापर करणेसंदर्भात नेमकी काय प्रोसिजर आहे यासंदर्भात कृपया सविस्तर मार्गदर्शन व्हावे.
नवीन अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 29अ अन्वये , केवळ बॉम्बे जमीन महसूल अधिनियम 1879 , अथवा तदनंतरच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या कायद्याअंतर्गत भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी अथवा वर्ग दोन म्हणून भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी, यांचेच रूपांतर वर्ग 1 मध्ये करता येते. अन्य कायद्यान्वये जसे की महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948, विदर्भ कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम , महाराष्ट्र शेत जमीन( धारण जमिनीची कमाल मर्यादा) कायदा व विविध वतन नष्ट करण्याचे कायदे या अंतर्गत दिलेल्या जमिनी ज्या वर्ग दोन म्हणून धारण केलेला आहे त्याचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येत नाही.
तसेच 2002 मध्ये आलेल्या वतन नष्ट करणे सुधारणा अधिनियम 2002 अन्वय, वतन कायद्याखाली धारण केलेल्या वर्ग दोन च्या जमिनी यांच्या हस्तांतरणाला परवानगीची गरज नाही. तथापि हस्तांतरण यानंतरही ही जमीन वर्ग-2 म्हणूनच तिचा धारणाधिकार राहतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,
माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आणि माझ्या बहिणीनी आम्हा 4 भावा पैकी 3चं भावांना त्यांचा हिस्सा मृत्यूपत्रात लिहून ठेवला आहे. हे मृत्यूपत्र नोटरी केले आहे. तर त्यांच्या मृत्यू नंतर मृत्यूपत्र प्रमाणे गावाकमगार तलाठी कार्यालयात नोंद होऊ शकते काय...त्यासाठी काय प्रोसेस आहे.... आणि ज्या भावाला त्यांनी त्यांचा हिस्सा दिला नाही त्याबद्दल तो आक्षेप घेऊ शकतो काय.?
मृत्युपत्र नोंदणीकृत असावे असे काही नाही. अगदी एखाद्या कोऱ्या कागदावर जरी मृत्युपत्र लिहिलेले असेल तरी ते कायद्याने वैध मृत्युपत्र आहे. हे फक्त त्यात एकच आहे की ज्याने मृत्युपत्र केले आहे त्याची आरोग्य स्थिती मृत्युपत्र करताना चांगली होती कोणत्याही द्रव्याच्या अमलाखाली तू नव्हता. तसेच मृत्युपत्र करणाऱ्यांची ही मिळकत स्वकष्टार्जित मिळकत होती. मृत्युपत्र हे करणाऱ्याकडून फसवणूक करून घेतलेली नसावेत. अशी स्थिती असेल तर एका भावाचे आक्षेप जरी घेतला तरी तू टिकणार नाही. मात्र यात एक गोष्ट होऊ शकते की मृत्यु पत्राच्या आधारे ज्यावेळेस तलाठी नोंद टाकतील आणि हीच संबंधित व्यक्तींना नोटीस देती पर्यायाने आपल्या बंधूंना ही त्याची नोटीस जाईल आणि त्याने जर त्या बाबत हरकत घेतली तर तक्रार नोंद म्हणून ती नोंद निर्णयासाठी मेहरबान तहसीलदार महोदय यांच्याकडे जाईल. त्यांच्या पुढील सुनावणीत हिजरात यांनी हरकत घेतली व सांगितले की हे मृत्युपत्र खोटे आहे तर तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्या भावाची राहील. मात्र ज्या मिळकतीच्या बाबतीमध्ये हे मृत्यूपत्र केलेले आहे ती मिळकत जर मुंबई मध्ये स्थित असेल तर संबंधित नोंद मंजूर करणारे अधिकारी किंवा सिटी सर्वे ऑफिसर आपणाला त्या मृत्यूचे प्रॉफिट करून आणावयास सांगतील. तद्वतच मुंबई येथे स्थित असलेल्या मिळकतींचे प्रो भेट करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र मिळकत जर ही मुंबईच्या बाहेर असेल तर अशा मिळकतीचे प्रोबेट करण्याची आवश्यकता नाही. झालेल्या मृत्युपत्राचा वैधतेबाबत ज्याने शंका उपस्थित केली आहे त्याने न्यायालयात जाऊन मृत्यूपत्र अवैध आहे असे जाहीर करून आणावे लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

फेरनोंद
अ ) मी दि २८/०१/२०१९ रोजी मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत यांचेकडे अर्ज दाखल केलेला आहे त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे
१ ) मौजे धोंडपारगांव ता . जामखेड जि.अ.नगर येथे माझी आई श्रीमती चंपाबाई रंगनाथ शिंदे हिचे नावावर गट नं . ३१३ व ३१४ होती . पैकी तिने मला गट नं ३१३ आणि माझे भाऊ भाऊसाहेब रंगनाथ शिंदे व बप्पा रंगनाथ शिंदे यांना गट नं २६२,२६०,२९०,२८७,३० देऊन वाटप केलेली होती व आहे .
२ ) माझी आई श्रीमती चंपाबाई रंगनाथ शिंदे हिने तहसीलदार साहेब जामखेड यांचेकडे अर्ज देऊन गट नं . ३१३ ला माझे नाव लावण्याची विनंती केली होती . त्याप्रमाणे तहसीलदार यांनी तलाठी यांना सोमनाथ च्या नवाची नोंद घ्यावी असे आदेश दिले त्यावर तलाठी यांनी ६ / ११ / १९९३ रोजी फेर नं . २७६ ने माझे नावचा फेर घेण्यात आला होता .
३ ) माझे आईने वरील गट नं .३१३ पैकी ०.३७ आर क्षेत्र आप्पासाहेब धोंडीबा शिंदे यांना खरेदी दिलेली होती . खरेदीखतावरुन फेर नं . २४९ ने खरेदीची नोंद दिनांक ३१ / १० / १९९२ रोजी झालेली होती . या नोंदीबद्दल मी तक्रार केली होती म्हणून मा . मंडळ निरीक्षक यांनी फेर नं . २४९ तक्रारी असल्याने ती नोंद निर्गत झाल्यावर फेर नोंद घ्यावी असा शेरा मारुन फेर नं . २७६ च्या नोंदीस तक्रार नसताना विनाकारण २७६ ची नोंद रद्द केली
४ ) मे निवासी नायब तहसिलदार यांनी तक्रारी नोंदीची चौकशी करून दिनांक ३० / ७ / १९९४ रोजी माझा तक्रारी अर्ज निकाली काढून नोंद मंजुर केली आहे .
५ ) गट नं . ३१३ हा ०.७४ आर क्षेत्राचा आहे त्यापैकी ०.३७ आर क्षेत्र आप्पासाहेब धोंडीबा शिंदे यांना विक्री केल्याने राहिलेले क्षेत्र ०.३७ आर माझी आई हिचे नावावर राहिले आहे .
६ ) चंपाबाई रंगनाथ शिंदे हिने गट नं .३१३ मला दिलेला आहे . तसा फेर नं .२७६ झालेला आहे . तक्रारी नोंद २४९ झालेने व तिचा निकाल झालेला असल्याने श्रीमती चंपाबाई रंगनाथ शिंदे हे तिचे नाव कमी करून ०.३७ आर क्षेत्रास माझे नाव कब्जेवहिवाटीस आहे . जंगल वहिवाटीप्रमाणे माझे नाव लावण्याचा आदेश व्हावा
त्यावर मा उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार जामखेड यांना प्रस्तुत अर्जाचे अनुषंगाने आपणामार्फत पुढील योग्य ती नियमानुसार कार्यवाही होऊन अर्जदार यांना त्याबाबत अवगत करणेत यावे असे कळविण्यात आलेले आहे
7) त्यावर तहसीलदार यांनी मा. मंडळ अधिकारी आरणगाव यांना अर्जदार यांचे अर्जाची संविस्तर चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करून तसा अहवाल ईकडेस सादर करावा असे कळवण्यात आलेले होते त्यानुसार मा. मंडळ अधिकारी आरणगाव यांनी दिनांक ( १ वर्ष ७ महिन्यांच्या कालावधी नंतर) आपला चौकशी अहवाल सादर केला आहे त्यात त्यांनी नमूद केले आहे की फेर नं 249 ही निर्गत झाल्यावर तलाठी यांनी पुन्हा नोंद घेणे अपेक्षित होते परंतु त्यांच्याकडून पुन्हा नोंद घेण्याचे राहून गेल्याचे निदर्शनास येते दरम्यानच्या काळात 2002 रोजी चंपा बाई या मयत झालेल्या असून सदर गट नं 313 यातील 8 आणे हिस्सा त्यांच्या नावे राहिला आहे तेव्हा पुढील निर्णय आपण घ्यावा
त्यावर कुळ कायदा शाखेत संपर्क साधला असता त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना चंपा बाई ह्या मयत असल्याने वारस नोंद करायची का मंडळ अधिकारी यांच्या शेऱ्याप्रमने नोंद करायची ते कळवावे असे पत्र काडले आहे परंतु तहसीलदार त्यावर सही करत नाहीत असे सांगण्यात आले
त्यावर २ महिन्यांचा कालावधी उलटूनही तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही त्यांना वेळोवेळी भेटलो असता तहसीलदार उडवाउडवीची उत्तरे देत आहेत तेव्हा सदर नोंद पुन्हा घेण्यासाठी काय करावे ?

तेव्हा माझा प्रश्न हा आहे की १) सदर नोंद पुन्हा घेण्यासाठी काय करावे ?
२) एखादे प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यास त्याची कार्यवाही किती दिवसात पूर्ण करायला हवी
३) आता मुळ प्रश्न हा आहे की माझी आई चंपा बाई यांनी मला वाटपाने दिलेल्या जमिनीची फेरफार क्र 276 ची नोंद मंडळ अधिकारी यांनी तक्रार नसताना रद्द केली आणि दुसरी नोंद 249 जीला मी तक्रार केली होती ती निर्गत झाल्यावर पुन्हा 276 ची नोंद घ्यावी असे आदेशही दिले
त्यावर तलाठी यांनी पुन्हा नोंद करणे अपेक्षित होते त्यासाठी मी तहसीलदार यांना अनेक वेळेस अर्ज देलेले आहेत त्याच्या पोहच माझ्याकडे आहेत परंतु तलाठी यांनी अद्याप पर्यंत नोंद केली नाही दरम्यानच्या काळात माझी आई मयत झाली म्हणून पुन्हा वारस नोंद करून आईने करून देलेल्या वाटपाचा अर्थ संपुष्टात येऊन सदर जमिनीत पुन्हा माझ्या इतर दोन भावना हिस्सा द्यावा की चंपा बाई जिवंत असताना मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी
4) माझी आई हिने मला सदर जमीन विक्री करण्यासाठी , भाड्याने देण्यासाठी , कर्ज घेण्यासाठी ,तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर नोंदणीकृत जन मुखत्यार पत्र ही दिलेले आहे
5) माझ्या इतर दोन भावांची देखील काही तक्रार नाही परंतु वारस नोंद केल्यास ते मला हाक्क सोडपत्र, वाटप पत्र करून देणार नाहीत
तेव्हा मी माझ्या वटणीची आज रोजी मी वहिवाट करत असलेली जमीन माझ्या नावे करण्यासाठी इतर काही कायदेशीर पर्याय असतील तर सांगावे ही कळकळीची विनंती
आपल्या मातोश्री मयत झाल्यानंतर वाटपाचा अंमल न देता पुन्हा आपल्या दोन भावांची नावे मिळकतील लावलेली आहे तो फेरफार आपण एक उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करा. अन्यथा ह्या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण दिवाणी न्यायालयात हिस्स्याप्रमाणे जमिनीचे सरस निरस वाटप करावे व त्याचा ताबा द्यावा अशा प्रकारचा दावाही आपण दाखल करू शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपल्या मातोश्री मयत झाल्यानंतर वाटपाचा अंमल न देता पुन्हा आपल्या दोन भावांची नावे मिळकतील लावलेली आहे तो फेरफार आपण एक उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करा. अन्यथा ह्या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण दिवाणी न्यायालयात हिस्स्याप्रमाणे जमिनीचे सरस निरस वाटप करावे व त्याचा ताबा द्यावा अशा प्रकारचा दावाही आपण दाखल करू शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अभय कुलकर्णी
नमस्कार,
माझ्या वडीलांनी ग्रामपंचायत हद्दीतील 35 वर्षापूर्वी 35×35 चे घराच्या जागेचे अनुक्रमे (2 ते 3 वर्षाचे अंतर आहे प्रत्येक व्यवहारात)खुले 3 प्लाॅट विक्री केलेले आहेत.तेव्हा मोजणी केलेली नव्हती रस्त्याची. पहिल्या व दुसय्रा खरेदीदाराला रस्ता हा खतावर 5 फुटच आहे.त्यापैकी मधला खरेदीदाराला तेव्हा रस्ता बोलण्यात (विश्वास खरेदीत) 5 फुटाचा व खरेदी खतावर 10 फुटाचा रस्ता आहे.सध्या रस्ता आहे 7 फुटाचा .आमची भिंत 3 फुट जागेवर 40 वर्षापासून आहे.घेणारा खरेदीदार मृत आहे,पण त्याची मूले आता रस्ता 10 फुटाचा मागत आहेत, ते म्हनतात की आम्ही भिंत पाडून रस्ता घेऊ.काही काळ गेल की परत रस्त्यासाठी भांडणे होतात, मध्यस्त मिटवतात तात्पुरत्या स्वरूपात पण पून्हा परत भांडणे होतात.यावर कायम स्वरुपी तोडगा काय आहे ? यावर कायदेशीर काय उपाय आहे ??
खरेदी खतामध्ये तुम्ही रस्ता दहा फूट रुंदीचा दिलेला आहे आणि बोलण्यातील रस्ता पाच फूट आहे. जो रस्ता खरेदी खता मध्ये लिहिलेला असतो व त्याची रुंदी जर दहा फूट असेल तर आपणाला त्यांना दहा फूट रुंद रस्ता देणे क्रमप्राप्त आहे. आपण त्यांच्या जागेवरती तीन फूट अतिक्रमण केलेले आहे .आपली घराची भिंत चाळीस वर्षापासून रस्त्यापासून तीन फूट अंतरावर जरी असली तरी. आपण त्यांच्याशी चर्चा करा व त्यांना त्याबाबत मोबदला देऊन प्रश्न सुटत असेल तर पहा. अन्यथा अशा प्रसंगांना वारंवार सामोरे जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Namakar sir, 1980 sali ajobani jaminiche vatap kele jamini chya quality nusar vadilana 10 gunthe jasta ahe, shivay vadilanchya navavaril gat mde 6 kholya ajobani bandhayla hotya ajobani 2 2 kholya 3 mulanchya navavr kelya....atta 2 ni chulte apaplya vatnit ghare bandhale ahe . Junya gharacha taba det nai .grampanchayat la tyanchi nond ahe...2 vashapurvi ajobanche sanmatipatrak tyani karun ghetale ki 4 gunthe gharpad mde 3 bhavancha hakka ahe....pn gharpad 7/12 pramane vadilanchya navane ahe ...please madat kra
आपल्या वडिलांना जमिनीचा दर्जा हा कमी प्रतीचे असल्याने इतर चुलत यांच्या प्रमाणात दहा गुंठे क्षेत्र जादा दिले होते. या दहा गुंठे क्षेत्रापैकी काही क्षेत्रांवर अन्य तीन चुलत यांची घरे होती व आहे. तसेच सद्यस्थितीत या चुलत्यांनी त्यांच्या वाटणीला आलेल्या क्षेत्रावर तीही त्यांच्या खर्चाने घरे बांधलेली आहेत. त्यामुळे आपले म्हणणे असे आहे की जे दहा गुंठे क्षेत्र आपणास जागा दिलेले आहे व त्या क्षेत्रावर जी चोरट्यांनी घरे बांधलेली आहे त्यामध्ये आपणाला हिस्सा हवा आहे.
खरं तर घर पडा खाली चार गुंठे क्षेत्र आहे व ते सामान एकच राहणार तद्वतच त्यावर असलेल्या घरांवर चुलत यांचा अधिकार राहणार. आपणास सहा गुंठे अतिरिक्त क्षेत्र मिळालेले आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर 2012 सालि जमिनीचा व्यवहार 10 गुंठेचा झाला होता आणि खरेदी खत पण 10 गुंठेचा आहे पण नंतर 2019 किंवा 2020 सालि आम्ही ऑनलाईन सात बारा उतारा आणी तलाठी कार्यालयातील उतारा त्यावेळेस उताऱ्यावर 18 गुंठे क्षेत्र दाखवत आहे. वरील एक्स्ट्रा 8 गुंठेचा कोणत्याही प्रकारचा व्यवहार नाही काही नाही.. तर आम्हाला ते क्षेत्र कमी करण्यासाठी काय करावे लागेल?
टीप- हे बदल झालेले क्षेत्र एकच व्यक्तीच्या नावावर आहे.
आपण जी खरेदीखत केलेला आहे ते कृपया पुन्हा एकदा तपासून पहा व त्यावर किती क्षेत्र नमूद केले आहे त्याची खात्री करा. आपल्या म्हणण्यानुसार जर आपण केवळ दहा गुंठे क्षेत्राची विक्री केली होती व प्रत्यक्षात सातबारावर 18 गुंठे चा अंमल दिलेला असेल तर हे प्रकरण म्हणजे लेखन प्रमाण चूक या सदरात मोडणारी आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये तहसीलदार यांच्याकडे सदरच्या क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या गावातील जमिनीत आग लागली व जमिनीत असलेली आंब्याची व काजूची झाडे पूर्णपणे जळाली व नुकसान झाले. माझे सासरे शेतकरी असल्याने कोणताही विमा काढलेला नाही. याबाबत झालेली नुकसान भरपाई सरकारकडून मिळू शकेल का?
Sir, ajobani 558 Ya gat mde 6 kholi bandhalya tyachya navavarun 3 Mulana 2 2kholi milalya, Jamin vatapat 558 gat maja vadilanchya navane ala... Chulte tyanchya gat mde rahanyas gele pn junya gharacha hissa amhala det Nai... Tasech ajobankadun samati Patrak lihun ghetale ki 4 gunthe gharpad mde tyanchya sarvancha hissa Saman ahe, gat vatati 1980 LA zhalti Ani sanmatipatrak 2 varshapurvi ghetale

Question by Ashish
18-01-2021
ashishpujari2001@gmail.com

नमस्कार सर, मला सिरियल नंबर व प्लॉट नंबर नेमका काय असते याची माहिती कुठं भेटू शकते.
कॉलेज assignment साठी लागत आहे.
आपणास सर्वे नंबर व प्लॉट नंबर मधील फरक या विषयी माहिती कॉलेजच्या प्रोजेक्ट साठी आवश्यक आहे. गावामध्ये असणाऱ्या सर्व जमिनींना ज्यावेळेस जमिनीची जमाबंदी झाली त्यावेळेस त्यांना नंबर देण्यात आले होते हे जे नंबर दिलेले आहेत त्यांना सर्वे नंबर असे संबोधले जाते. या उपरोक्त एखाद्या शेत जमिनीला विकास परवानगी मिळाली असे व त्या मध्ये प्लॉटिंग मंजूर केलेले असेल, तर या सर्वे नंबर मध्ये असलेल्या विविध प्लॉटला असतात त्यांना प्लॉट असे संबोधतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ganesh patil
16-01-2021
gpganesh24patil@gmail.com

माझ्या वडिलांची 51 गुंठे जमीन होती वडील अशिक्षित असल्याने पलीकडील व्यक्तीने 51 गुंठे यातील 12 गुंठे जमिन आपल्या नावावर लावली आहे तर काय करावे
एक तर पलीकडच्या व्यक्तीने आपल्या जागेवर अतिक्रमण केलेले असावे. अतिक्रमण केल्यामुळे त्या व्यक्तीचे नाव सातबारा लावू शकत नाही. आपण त्या व्यक्तीचे नाव सातबारावर ज्या ठिकाणी आहे त्या खाली फेरफार नंबर नमूद असतात ते फेरफार पहा व त्यावरून आपणास कळून येईल की त्यांनी इसमाचे/ व्यक्तीचे नाव कसे लागले.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्या आजोबांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीस एकच मुलगा असून, ते आता हयात नाहीत. तर, दुसऱ्या पत्नीस दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी आता दुसऱ्या पत्नीच्या दोन मुली व एक मुलगा हयात आहे. आजोबांना वडिलोपार्जित 14 एकर जमीन असून, दुसऱ्या पत्नीला भाऊ नसल्याने त्या पत्नीची 28 एकर जमीन होती. परंतु या 28 एकर जमिनीवर आजोबांचे नाव लागल्याचे कागदपत्रावरून दिसून येत नाही. त्यामुळे संपूर्ण 28 एकर जमीन पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावावर झाली आहे, त्यामध्ये इतर भावंडांना हिस्सा मिळालेला नाही. तसेच पहिल्या पत्नीच्या मुलाने वडीलोपार्जित 14 एकर जमिनीमध्येही तिसरा हिस्सा घेतला आहे. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर जमिनीमध्ये कोणताही हिस्सा दिलेला नाही (सदर कालावधी साधारण सन-1970 ते 95 मधील आहे.). तर, आता आजोबांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर शेत जमिनीमध्ये समान हिस्सा मिळेल किंवा कसे, तसेच याबाबत 28 एकर जमिनीमध्ये समान अधिकार मिळविण्यासाठी काय करावे लागेल? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
https://indiankanoon.org/doc/588769/

हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 15 दोन अन्वय, हिंदू स्त्रीला तिच्या आई किंवा वडिलांकडून मिळालेले मिळकत, तिच्या मृत्युपश्चात केवळ तिच्या मुलांना मिळते. अशा मिळकतीमध्ये तिच्या पतीला कोणताही हिस्सा मिळत नाही.
उपरोक्त जी लिंक देण्यात आलेली आहे त्यामधील निकाल पत्रही आपणाला उपयुक्त ठरेल. या निकालपत्रात नमूद केले आहे की हिंदू स्त्रीला तिच्या आई किंवा वडिलांकडून मिळालेली मिळकत तिच्या मृत्युपश्चात केवळ तिच्या मुलाला किंवा मुलीला मिळू शकते इतर कोणाचाही म्हणजे तिचा पती चाहिये अशा मिळकतीमध्ये कोणताही हक्क असू शकत नाही. फेरफार आपल्या आईच्या मृत्यूपश्चात, वारस म्हणून आपल्या वडिलांचे सुपारी आणि त्यांच्या मृत्युपश्चात आपल्या सावत्र भावाचे नाव लागलेले आहे त्याविरुद्ध आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अपील दाखल करावे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझ्या आजोबांनी 1960 साली घारासाठी 6 आर जागा मोठ्या चुलत्याच्या नावे खरेदी घेतली 1962 सली आजोबा मयत झाले चुळत्याचे नावे ए कु मॅ आशी नोंद आहे तर एकुमॅ च्या फेरफार नुसार वारस नोंद केली आहे परंतु चुलता आम्हास हिस्सा देत नाही त्याचे म्हणने आहे की जागा माझी खरेदीची आहे कृपया मा्गदर्शन करावे
आपण म्हणता की आजोबांनी चुलत्याचे नावे जमीन खरेदी केली मात्र सातबारा सदरी सुलतान चे नाव एकत्र कुटुंब पुढारी म्हणून लागलेले आहे. खरंतर सातबारा संगणीकरण करताना एकत्र कुटुंब पुढारी म्हणून या व्यक्तीचे नाव यापुढे अशी नोंद होती, अशा सर्व सातबारावर इतर वारसांची नावे दाखल करण्यात आलेली आहे. याउपरही आपल्याशी संबंधित मिळकतीबाबत अजूनही चुलत यांचे नावापुढे अशी नोंद आहे. यासाठी आपण तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करा एकत्र कुटुंब पुढारी यामध्ये समाविष्ट असलेले इतर वारसांची नावे सातबारा सदरील दाखल करणे बाबत विनंती करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर एका प्रकरणात एका खरेदीच्या नोंदीबाबत A व B मध्ये वाद सुरू होता सदरील नोंदीवर b ने उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपील दाखल केले परंतु सदरील निकाल b च्या विरोधात गेला त्यामुळे त्यांनी अपर जिल्हाधिकारी यांचे कडे कलम 247 नुसार अपील दाखल केले सदरील प्रकरणात अपर जिल्हाधिकारी यांनी वादी व प्रतिवादी हजर नसल्याने अपील न्यायालयीन कामकाजातून काढून टाकले व प्रकरण बंद केले त्यानंतर B ने याच न्यायालयात अपील पुनर्स्थापित करणेबाबतच अर्ज दाखल केला तो अर्ज ही नामंजूर करण्यात आला नंतर b ने या निर्णय विरुद्ध मा. विभागीय आयुक्त यांचेकडे अपील 60 दिवसाच्या आत दाखल केले आहे. सदरील अपील दाखल आहे परंतु स्थगिती आदेश नाही. माझा प्रश्न असा आहे की मा. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या फेरफार नोंद रद्द करणेबाबत चा आदेश आज ही कायम आहे त्यात बदल नाही फक्त अपील आहे (स्टे ऑर्डर नाही) या सबबीवर नोंद घेणे टाळता येते का
एखाद्या प्रकरणांमध्ये अपील दाखल झाले असेल तर त्यावर स्थगिती आदेश देणे किंवा नाही हा त्या संबंधित अधिकाऱ्याचा विवेक अधिकार असतो. अपिलीय अधिकारी जर त्यांनाही वाटले की प्रकरणात स्थगिती आदेश दिला नाही तर प्रतिवादी/ प्रतिपक्ष जमिनीमध्ये हितसंबंध निर्माण करतील किंवा जमिनीची विक्री करतील व अपील करणारा च्या मागणीमध्ये गुणवत्ता आहे तर अशा प्रकरणात स्थगिती आदेश देण्याची तरतूद आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar
13-01-2021
sagarghotekar1221@gmail.com

कोणी शेतीचे बांध कोरून काढत असेल तर,* -त्यासाठी कायद्यात काही तरतुदी आहेत का?
बांध कोरणे म्हणजे शेजारच्या जमिनीवरती अतिक्रमण करणे आहे. बांध कुरणे ही वैश्विक समस्या आहे. यासाठी आपण आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून त्याचे सीमांकन म्हणजेच हद्दी निश्चिती करून करून घ्या. त्याप्रमाणे बाउंड्री मार्क्स त्या ठिकाणी फिक्स करा. आपल्या लक्षात येईल की शेजारच्या किती क्षेत्रावर होती अतिक्रमण केलेले आहे किंवा बांध कोरलेला आहे.
त्या अनुषंगाने प्रथम त्याबाबत त्याला कायदेशीर नोटीस द्या तसेच नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरुद्ध एक लेखी अर्ज द्या. त्याच्या वागणुकी मध्ये सुधारणा झाली नाही तर दिवाणी न्यायालयात स्पेसिफिक रिलीफ एक्ट खाली संबंधित बाजूचे शेतकऱ्यास अतिक्रमण करणे/ किंवा बांध करण्यापासून प्रतिबंध करणे बाबत कायमचा हुकुम होणेबाबत दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी एक जागा घेतील आहे खरेदीखत पण झाले आहे 2014 साली आणि मालक आता म्हणतात की पैसे पुर्ण दिले नाहीत म्हणून तुमचे खरेदीखत रद्द झाले आहे पण मी पैसे पण पुर्ण दिले आहेत आणि त्यांनी जागेचे कंपाऊंड पण काढले आहे तर काय करावे
जागा जर नोंदणीकृत दस्ताने घेतलेली असेल व त्याप्रमाणे जर आपले नाव सातबारा सदरील दाखल झाले असेल तर आत्ता मालक काय म्हणतो याला काही महत्व उरत नाही. जमिनीचा ताबा जर आपल्याकडे असेल तर काही प्रश्न नाही पण जर जमिनीचा ताबा आपल्याकडे नसेल तर खरेदीखत याप्रमाणे जमिनीचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा दिवाणी न्यायालयात ताबा मिळणे बाबत दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
माझा प्रश्न हा आहे की आम्ही ग्रामीण भागामध्ये घर खरेदी केले होते तर आम्ही घर खरेदी करताना आम्हाला बिल्डर ने ****** या नावाची NA Order दिली होती व आम्हाला फाइनान्स मध्ये लोन मंजूर झाले होते पण आता आम्ही ते घर दुसऱ्याला विक्री करत आहे तर घेणाऱ्या व्यक्तिने आमच्या घराची NA Order काढली आहे ती ***** या नावाची निघत आहे तर आमच्याकड़े असलेल्या NA Order वरील भूखंड क्र. व घर घेणाऱ्या व्यक्ति ने काढलेल्या NA order वरील भूखंड क्र. वेगळे आहेत तर हा नेमका प्रकार काय आहे समजू शकेल का?
आपणाला घर खरेदी करताना ज्या मिळकती संदर्भात कागदपत्र अथवा विकास परवानग्या दाखवल्या होत्या त्यानुसार बांधकाम परवानगी मध्ये नमूद सर्वे नंबर व घर क्रमांक हा आता आपण ज्या व्यक्तीस जमीन व घरी इच्छिता त्याने काढलेल्या विकास परवानगीनुसार जमिनीचा सर्वे क्रमांक व घर क्रमांक भिन्न आहेत अशी आपली तक्रार आहे. आपण याबाबत ज्या नियोजन प्राधिकरणाने आपल्याला विकास परवानगी दिलेली आहे त्यांच्याकडून आपण प्रमाणित प्रत प्राप्त करून घ्या.
या दोन्ही परवानग्या वरून घर क्रमांक ओ सर्वे क्रमांक याची पडताळणी करा जर भिन्न असतील तर ज्या आधारे आपण लोन मंजूर करून घेतली ती परवानगी निश्चितच खोटी आहे असा निष्कर्ष निघतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझ्या आजीच्या नावे शेतजमीन होती. सदर शेतजमीनीचा ७/१२ आजीच्या नावे असल्याने ती जमीन माझ्या आजीने खरेदी खत करून विकून टाकली त्या जमिनीच्या ७/१२ वर जमीन विकत घेणाऱ्याचे नाव देखील दाखल झाले परंतु आताएक व्यक्ती त्या जागेवर आपला मालकी हक्क सांगत आहेत. सदर जमिनीवर १९८० च्या आधी माझ्या आजोबांचे नाव लागले आहे (फेरफार उपलब्ध आहे). त्यानंतर आजीचे नाव लागले आहे.(फेरफार मध्ये नोंद आहे.) दावा सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव १९८० च्या अगोदर ७/१२ वर आहे. परंतु त्यानंतर च्या ७/१२ नाही (नाव कमी केल्याचा सुद्धा फेरफारनाही) मग ७/१२ वरून त्या व्यक्तीचे नाव कमी कसे काय झाले?
तुम्हाला या जमिनी चा सर्व इतिहास माहित आहे. जुने फेरफार काढा व जी त्रयस्थ व्यक्ती आता त्यामुळे कितीवर हक्क सांगत आहे त्याचे नाव कमी कसे झाले तो फेरफार काढा त्यावरुन आपणाला सर्व माहिती मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.68 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3