जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Amit patole
08-01-2021
amitpatole123@gmail.com

7/12 उतर्यातील खातेदारला कंस झाला पण फेरफार नं नसेल तर काय करावे
कदाचित कौन्साखाली संबंधित फेरफार लिहिण्याचे अनावधानाने राहून गेलेले असेल. त्यासाठी आपण या सातबारा वर नमूद मिळकती संदर्भातील जुने फेरफार तपासून पहा. व त्यानुसार आपणाला कौंस केलेले कोणता फेरफार नमूद करावयाचा राहिलेला आहे याचा बोध होईल. जर जुने फेरफार पाहूनही जर फेरफार याचा बोध होत नसेल तर अनावश्यक रित्या जो कोंसा सातबारा वरती दिसत आहे तो कमी करण्याबाबत मेहरबान तहसीलदार महोदय यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये अर्जाद्वारे विनंती करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ सदरी वडिलांच्या मृत्युनंतर वारस नोंद झाली .आता मुली भावाच्या लाभात रजिस्टर हक्कसोड करून देणार आहेत.त्यांच्या आई सुद्धा मुलाच्या लाभत हक्कसोड पत्र करून देण्यास तयार आहेत.तरी आईचे हक्कसोड पत्र करणे योग्य होईल किंवा कसे?की बक्षीसपात्र करणे योग्य होईल.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती
ज्या जमिनीच्या बाबतीत आपल्या मातोश्री आपणाला जमीन देऊ इच्छितात, ती जमीन जर शेत जमीन असेल तर हक्क सोड पत्र केले किंवा बक्षीस पत्र केले दोन्हीसाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 च्या अनुच्छेद 36 व 52 अन्वय मुद्रांक शुल्क दोनशे रुपये एवढे आहे. दोन्हीपैकी आपण कोणतेही करू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.किरण सर जी ...
कृपया मार्गदरशन हवे.
मौजे …. ता. …. जि……. येथील गट नं. 102 क्षेत्र 0.58 हे, आर आकार रु. 4.25 पै. यापैकी 0.29 हे. आर या शतजमिनीस शेती प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत श्री. … यांनी दिनांक …. रोजी विनंती केलेली आहे.

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 अन्वये प्रश्नाधिन शेत जमीन "तुकडा" ठरविलेली असून 7/12 उता- यावरील इतर हक्की तुकडा" अशी नोंद गांव दप्तरातील फेरफार नोद नं. 544 दिनांक 10/08/1950 नुसार घेण्यात आलेली आहे.

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 चे कलम 7 (1) मध्ये कोणत्या व्यक्तीने. कलम 6. पोट-कलम (2) अन्वये ज्याच्या संबंधात नोटीस देण्यात आली असेल अशा कोणत्याही तुकड्याचे हस्तांतरण त्याच्या लगतच्या भूमापन क्रमांकाच्या किंवा भूमापन क्रमांकाच्या मान्य केलेल्या पोट विभागाच्या मालकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीकडे हस्तांतरित करता कामा नये, अशी तरतूद आहे.

प्रस्तुत प्रकरणात सदर जमीन विकत घेणारी व्यक्ती गट नं. 102 क्षेत्र 0.58 आर च्या लगत भूमापन क्रमांकाच्या जमिनीची बाजू गट नं. 52/1/अ च्या पुर्वीच्या भूमापन क्रमांकाच्या मान्य केलेल्या पोटविभागाचा मालक असल्याचे दिसुन येत नाही त्यामुळे मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 चे कलम 7 (1। मधील तरतुदींचा भंग होती.

तथापि, जमिन खरेदी घेणार श्री... यांनी प्रश्नाधीन शेतजमीन हतनुर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येतो. व सदयस्थितीच्या 7/12 उत्तान्यावर सन 2020-21 च्या पिकपाणी सदरात जलसिंचीत रकान्यात 0.58 है, आर क्षेत्र असुन जलसिंचन साधनामध्ये कुपनलिका असल्याबाबतच्या 7/12 उतारा सादर कलेला आहे त्यामुळे प्रश्नाधिन शेतजमीनीस जलस्रोताचे साधन उपलब्ध झाल्याने 7/12 उताऱ्यावरील प्रमाणभूत क्षेत्रानुसार तुकडेबंदी तुकडेजोड कायदापाचा भंग होत नसल्याचे नमुद केले आहे. तरी अर्जदार यांचे विनंतीच्या अनुषंगाने मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मधील तरतुदीचा अनुषगाने प्रश्नाधिन शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील तुकडा शेरा कमी करण्याबाबत शासन नियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती नियमांचित कार्यवाही करावी. व तसा अहवाल सादर करावा.

सोबत ७/१२(कूपनलिका) हतनूर कालवा लाभक्षेत्र दाखला कागदपत्रे सादर केली आहेत.
आपल्या प्रश्न नुसार गट नंबर १०२ एकूण क्षेत्र५८ गुंठे हे 1950 सालापासून प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असल्याने तुकडा म्हणून इतर हक्कात नोंदलेले आहे. या 58 गुंठ्यांत पैकी एकूण 29 गुंठे क्षेत्राची विक्री करण्याबाबतचा अर्ज आपल्या विचाराधीन असल्याचे दिसून येते.
वास्तविक आपण गट नंबर नमूद केलेला आहे त्यामुळे सदर जमिनीला गट स्कीम लागू झालेली आहे . मग जर गट स्कीम लागू झालेली असेल तर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेला तुकडा कसा अस्तित्वात राहील याचा प्रश्न मला पडत आहे. 58 गुंठे क्षेत्र एकत्रीकरण करताना अन्य सर्वे नंबर मध्ये समाविष्ट कसे झाले नाही.
असोत
आपणाला गटनंबर ऐवजी सर्वे नंबर म्हणावयाचे आहे काय? जर सर्वे नंबर आहे असे समजून जर आपण याचा विचार केला तर विक्री करावयाचे क्षेत्र ज्या व्यक्तीला करा विक्री करायचे आहे तो जर लगेच खातेदार नसेल तर त्याला विक्री करता येणार नाही.
तसेच पूर्वी तुकडा नमूद झालेले क्षेत्र याच्यामध्ये जर बदल झालेला असेल म्हणजे पूर्वीची जिरायत स्वरूपाची असलेले क्षेत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था झाल्यामुळे बागायत स्वरूपात रूपांतरित झाले असेल तर तुकडा म्हणून झालेली नोंद बदलण्याबाबत कायद्यामध्ये तरतूद नाही.
मात्र याबाबत काही शासनाचे परिपत्रक असेल अथवा नियमांमध्ये काही तरतूद असेल याची मला माहिती नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांनी १ आर जमीन २००० साली गुंठेवारी ने विकत घेतली होती.त्या जमिनीच्या आजूबाजूची सर्व जमीन NA झालेली आहे. तर आता ही १ आर जमीन कशी NA करायची.
आईच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आई व तिचे चार भाऊ यांची नावे उताऱ्यावर आहेत जर आईचा वाटा हवा असेल तर काय करावे लागेल तसेच ही जमीन कुळ कायद्याने मिळालेली आहे .
बापूराव
कुल वहिवाट हक्क हा कुळकायदा ( मुंबई विभाग ) १९४८ कलम ४० अन्वये वंश परंपरागत आहे . त्यामुळे आपले आजोबांचे मृत्य नन्तर आपल्या आईचे नाव कुल म्हणून ७/१२ सदरी लागणे आवश्यक आहे . या साठी आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करा . ( कलम ७० ब )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते सर, माझ्या नावाने एक घरपट्टी,लाईट बिल,पाणी बिल असून त्या चाळीवर माझा मोठा भाऊ हक्क दाखवून भाडा घेतो.आणि मी भाडेकरूंना करार करण्यास सांगितले तर माझा मोठा भाऊ माझ्याशी भांडण करतो. शिवीगाळ आणि मरणाची धमकी देतो.आणि करार करण्यास ते भाडेकरू घाबरतात.ह्या चाळीचा भाडा आधी माझे बाबा घेत होते पण दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला असून बाबांनी कधी भडेकरूनशी करार केला नव्हता.आता मी ताबा घेण्यासाठी काय करावे?
सर आमची आजी निरक्षर 75 वर्षे वय आहे.तिला फुस लाउन ती थोडी आजारी आहे पेरेलेसेस ने .त्रयस्थ व्यक्तिने जिमीनीचे खरेदीखत केले आहे .3 महिण्यापुर्वी 7/12 फेरफार पण मंजुर केली . आजी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास तयार आहे. जमीन परत मिळेल का आम्ही 3 मुले आणि नातवंडे आहे..
आपल्या आजीला ज्या व्यक्तीने तिला फसवून खरेदी करून घेतले आहे त्याचे विरुद्ध फौजदारी तक्रार करावी लागेल . तसेच झालेले खरेदी खत रद्द करून मिळण्य बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची खंडाची जमीन असून आम्ही ती गेल्या ९० वर्ष पासून कसत आहोत आणि खंड पण भरला आहे. त्याच जागेतून आमच्या राहत्या घरात जाण्यासाठी वाट आहे. काही कारणा मुळे त्या जमिनीवर कुळ म्हणून आमचे नाव नोंद करणे राहून गेले. सदयस्थित मूळ मालकाचे वारस त्या जमिनीत हक्क सांगून जमिनीत अतिक्रमण करत आहेत व आमची येण्या जाण्याची एकमेव वाट जी आम्ही ९० वर्ष पासून वापरतोय ती पण बंद केली आहे. भूमी अभिलेख कार्यालय च्या चुकीमुळे आमच्या बिनशेती प्लॉट व त्या वाटेची सरकार दप्तरी नोंद नाही. पोलीस ,नगर परिषद व तहसीलदार यांनी प्रथमदर्शनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला . तरी जागेवरील अतिक्रमण थांबवून आमची वाट मोकळी करण्यास काय करावे याचा सल्ला मिळाल्यास मदत होईल . कुळ कायद्याखाली दावा दाखल केल्यास निकाल येईपर्यंत अतिक्रमणांवर स्थगिती येऊ शकते का? वरील प्रकरण लवकर निकाली काढण्यास काही तरतूद आहे का?प्रांताधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांना वाट मोकळी करण्यास काही विशेष अधिकार आहेत का?
आपल्या प्रश्नानुसार , जी जागा आपणाकडे कुल म्हणून कसण्यास आहे त्यास आपले नाव कुल म्हणून जाहीर करण्यात न आल्याने मुल जमीन मालक , जमीन अतिक्रमण करत आहेत व आपला या जागे तून जाण्याचा मार्ग अडथला करत आहेत . हा मार्ग आपल्या बिन शेती केलेल्या जागेत जाण्यासाठी आपणास होतो आहे . सदरचा मार्ग रिकामा करून देण्याच्जा तहसीलदार यांना अधिकार नाही . कारण या मार्गाचा वापर बिनशेती मिळकतीत जाण्यासाठी होत आहे . जर या मार्गाचा शेती करण्सास्ठी होत असता तर , माम्लेतदार अधिनियम १९०५ अन्वये , तहसीलदार यांनी मार्ग अडथला रिकामा करून दिला असता .
जमीन त्यांचीचीच आहे त्यामुळे त्याला अतिक्रमण कसे म्हणता येईल ?
आपण दिवाणी न्यायालयाचा मार्ग पत्करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांचे नावे असलेल्या वडिलोपार्जित जमीन मी तलाठीव मंडळ अधिकारी यांचे मार्फत वाटणी पत्रक करून माझे नावे होऊ शकते का?
वडील व सर्वांची म्हणजे सर्व वर्षांची इच्छा असल्यास तहसीलदार यांचेकडे अर्ज करून करू शकता
कलम ८५ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pramod pawar
29-12-2020
Omprinters99@gmail.com

माझे बाबा 1954 साली जमिनीस कुळ म्हणुन नाव लागले, जमीन मालक मानसिक दुर्बेल असल्यामुळे 7/12 उतारा वर "जमीन खरेदीचा हक्क पुढे ढकलण्यात आला आहे, जमीन मालक मानसिक दुर्बल आहे " असा शेरा आहे , आता माझ्या वडिलांचे नाव इतर हक्कात आहे , तर मालक म्हणुन नाव लावण्यासाठी काय करावे लागेल , कृपया माहिती द्यावी
मानसिक दुर्बल जमीनमालक आज रोजी हयात आहे का ? याची खात्री करा . हयात नसल्यास विक्री किंमत निच्छित करण्यासाठी , जमीन मालक मयात झाल्यापासून २ वर्षाचे आत कारवाही करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sachin karpe
29-12-2020
Sachinkarche2012@gmail.com

हाय सर, मी सातारा येथील रहिवासी आहे. माझे आजोबा व भावकी तील काही जणांनी मिळून सन १९४१ ला १ ;२ ;३; ह्या नंबर चे तीन सर्वे नंबर खरेदी केले होते.
सर्व्हे no.१ -१५ एकर २-२४ एकर ३- ३० एकर.(६९ एकर-total) माझ्या आजोबांचा त्यात तिसरा हिस्सा होता.-२३ एकर. अाजोबा हिस्सा (१-५acre ;२-८ एकर ;३-१० एकर) मात्र सन १९७२ ल गट एकत्रीकरणनतर आमचे सर्व्हे १ व २ मधील जमीन अनुक्रमे ४ व ४ एकर अशी झाली.व त्यामुळे आमचे ५ एकर जमीन कमी झाली. मात्र आम्हाला सर्व्हे नंबर ३ मध्ये ५ एकर जमीन वाढीव दिली. मात्र तिची सातबारा उताऱ्यावर नोंद नसून मात्र पूर्वी पासून आम्हीं सर्व्हे नंबर ३ मध्ये१५ एकर जमीन कसत आहोत. मात्र नावावर १० एकर आहे. ५ एकर शेती चा घोळ आहे. तरी कृपया मला सांगा;
१: मी दावा टाकू शकतो काय; टाकला तर कुठे व कोणावर?
२: ५ एकर जमीन मला कोणत्या सर्व्हे नंबर वर भेटेल?
Please reply...
सचिन करपे साहेब
इतके दिवस विलंब का केला ?
आपण जी एकत्रीकरण योजना झाली आहे त्याची पाहणी करा . त्यात नमूद क्षेत्र १५ एकर आहे का ? जर नसेल तर आपण ५ एकर क्षेत्र अन्य व्यक्तीचे कसत असाल .
जर खरच आपण म्हणत असाल त्याप्रमाणे लेखन प्रमाद चूक असेल तर , जमाबंदी आयुक्त यांचेकडे पुनरीक्षण अर्ज करा . ( कायदा - मुंबई तुक्देबंदी व तुकडे एकत्रीकरण कायदा )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब
आमच्या आजोबांची फसवणूक करून जागा विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे...पण सात बारा वर फसवणूक करणाऱ्यांची नावे नोंद झाली नाहीं आहे....फेरफार प्रलंबित आहे...ती रद्द करावयाची आहे. खरेदी खत रद्द करावयाचा आहे...प्रांता मध्ये कशा प्रकारे विनंती अर्ज करावा या साठी मार्गदर्शन द्यावे ..तसेच वारस असून हरकत आहे..तरीही फ्ररफार का होते..या साठी काई करावे
संतोषराव
आपणास दिवाणी न्यायालयाकडून विक्री दस्त रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

देवराई जमिनीमध्‍ये ग्रामपंचायतीला नविन बांधकाम करता येते का
नमस्कार सर मी 2018 ला बिल्डर ने सांगितले नुसार आम्ही मार्च महिन्यात नोंदणी केली. पण आम्हाला ऑगस्ट महिन्यात घरची चावी मिळाली (possession ) मिळाले व घराची चावी मिळाली व त्याच महिन्याचे बिल्डर ने एक महिन्याचे maintenance घेतले. तर सर माझा हा प्रश्न होता की आज मला 2वर्षे झाले आहे व आमची सोसायटी ची कमिटी पण स्थापित आहे तर आता मला कमिटी वाले बोलत आहे की आपल्याला ला नोंदणी झाल्या पासून मेन्टेनान्स चे पैसे भरावे लागतील. तर माझ्या सांगण्या नुसार झेंव्हा मला चावी मिळाली ठेवा पासून माझे मेन्टेनान्स चालू पाहिजे तर सर मला या बद्दल माहिती द्यावी की मी मेन्टेनान्स भरावे की नाही
महाराष्ट्र सदनिका मालकी कायदा 1963 अन्वये, प्रकल्पामध्ये सदनिका खरेदी करण्याचा करार झाल्यानंतर , स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर भरण्याची जबाबदारी संबंधित सदनिकाधारकांची आहे. जरी आपण सदनिकेचा ताबा हा उशिरा घेतला असेल तरीही इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या इमारती वर करनिर्धारण स्थानिक स्वराज्य संस्थेकडून केली जाते. व करनिर्धारण आज झाल्यानंतर ती भरण्याची जबाबदारी हिच्या त्यासंबंधित सदनिकाधारकांची असते. कारण भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचा ताबा ही संबंधित विकासकाने कायद्यानुसार तात्काळ देणे कर्म प्राप्त असते. जर त्या संबंधित विकासकाने मिळकतीचे प्रमाणपत्र मिळूनही व करनिर्धारण स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करूनही ताबा देण्यास टाळाटाळ केली असल्यास अथवा त्याबाबत विलंब केला असल्यास आपण या विकासकाला ताबा देण्याबाबत काही नोटीस दिली होती का> व नोटीस देऊनही जर विकासकाने ताबा देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असेल तर जेवढा करा पण नगरपालिकेला अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेला जमा केला असेल तो देण्याबाबत आपण त्याला सांगू शकता. मात्र अशा प्रकारची जर नोटीस दिलेली नसेल व सदनिका खरेदी करताना सोसायटी शी निगडीत असलेल्या सर्व कर जमा करण्याची जबाबदारी विकासकाने काही काळासाठी त्याच्याकडे घेतली असेल तरच विकास हदशिकर भरण्यात जबाबदार असतो अन्यथा उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे स्थानिक संस्थांचे कर भरण्याची जबाबदारी सदनिका विकत घेणारा ची आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की... माझ्या मोठ्या बंधू यांचे निधन झाले ते महावितरण मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत होते,.. सर माझा भाऊ विवाहित होता त्याला २ मुले आणि वाइफ आहे... पण वहिनींना नौकरी नाही करायची... त्यांनी मला नौकरी करण्यास संमती दिली.. परंतु माझा प्रस्ताव सादर केला असता त्यांनी माझा प्रस्ताव वापस पाठवला.. कारण मी भावाचा वारस होत नाही म्हणून आणि सी एस ७५ चा जीर पुढे करून... ते म्हणतात वारसा हक्क सर्टिफिकेट आना त्यात तुमचे नाव असल पाहिजे.. तर काय करावं सर.. काही ऑप्शन असेल तर कळवा नक्की... no.no..9075757647
आपण भावाचे जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी स लागू शकत शकत नाही . आपणस दिलेले उत्तर बरोबर आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by AVINASH BHAGANE
25-12-2020
bhaganeavinash@gmail.com

सर नमस्कार ,

आमची रत्नागिरी येथे वडिलोपार्जित जमीन आहे, सदर जमिनी शेजारून नैसर्गिक नाला आहे. सदर नाल्या मधून ग्रामपंचायत यांनी दोन वर्षांपूर्वी रास्ता साठी मोजणी केली होती. पण त्या मध्ये आमची जागा बाधित होत नव्हती. पण आता जेव्हा रस्त्याचे काम सुरु झाले तेव्हा आम्ही गावी नव्हतो सरपंचाने फोन करून सांगितले कि थोडा बांध जाईल म्हणून आम्ही होकार दिला पण जेव्हा रस्त्याचे काम सुरु झाले तेव्हा आमच्या जमिनी संपूर्ण कुंपण तोडून साधारण ४ फूट जागा रस्त्यासाठी घेण्यात आली आणि सादर बांधावर असणारी अंदाजे १५ वर्ष वयाची विविध प्रकारची झाडेहि मुळासकट तोडून टाकली होती. या संदर्भात आम्हाला ग्रामपंचाय यांचे कडून नोटीस आली न्हवती. आणि त्यांनी फक्त आमच्या बाजूच्याच जागा घेतली समोरची बाजूची व्यक्ती गावात हजर असल्याने पंचायत वाल्यानी त्यांचा बांध तोंडाला नाही. या बाबत विचारणा केली असता सदर रस्ता सरकारी आहे, सरकार तुमची जागा घेऊ शकते ,या साठी मला नुकसान भरपाई मिळणार नाही असे सुद्धा सांगितले. तोडलेला ४ फूट उंच बांध सुद्धा स्व खर्चाने बांधण्यास सांगितलं आहे. सदर जागेत ५ वर्षाची हापूस आंब्याची झाडे आहेत. पाऊस पडल्यास संपूर्ण जमीन वाहून जाऊ शकते . जर जागा घेतल्यानं आम्ही कोणतीही तक्रार करीत नाही पण आम्हाला बांध बांधण्यासाठी नुकसान भरपाई मिळेल का किंवा ग्रामपंचायत यांच्या कडून बांधून मिळेल तसेच झाडे पूर्ण तशीच ठेवली आहेत. या साठी योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती.
घटनेच्या अनुच्छेद३०० अ अन्वय, कोणत्याही व्यक्तीची जमीन कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या पासून त्याच्या पासून काढून घेता येत नाही.
कायदेशीर प्रक्रिया म्हणजे भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचे संपादन करणे व संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला त्या जमीन मालकास देणे असा आहे.
ग्रामपंचायतीने आपली जमीन भूसंपादन प्रक्रिया पार पडतात व आपल्याला त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई न देता रस्त्यासाठी तिचा वापर केलेला आहे. आपण ग्रामपंचायतीला वकिलामार्फत नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याबाबत ज्यामध्ये व्याजाचा ही समावेश असेल देण्याबाबत नोटीस द्या अथवा आपण ग्रामपंचायती विरुद्ध दिवाणी न्यायालयात आपल्या जागेमध्ये ग्रामपंचायत अतिक्रमण करून झाडे तोडून रस्ता करत असल्या मुळे मनाई हुकुम आदेश देण्याबाबत दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Akshay patil
25-12-2020
ap6489095@gmail. com

नमस्कार सर
माझा सातबारा हा तलाठी ऑफिस आणि तहसिल ऑफीस दोन्ही ठिकाणी सापडत नाही... सातबारा उतारा नसल्यामुळे त्याचे फेरफार नंबर माहित नाहीत माझ्याकडे तलाठी यांनी 1970 साली दिलेला सातबारा आहे परंतु आत्ता हा सातबारा वरीलपैकी दोन्हीही ठिकाणी सापडत नाही यासाठी काय करावे?
1970 सालचा जो सातबारा आपणाकडे उपलब्ध आहे त्याच्या आधारे आपण 1970 पूर्वीचे सातबारा मिळकती संदर्भातून उपलब्ध आहेत का याची पडताळणी तहसील कार्यालय अभिलेख कक्षात करा. जर 1970 पूर्वीचे सातबारा तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षात उपलब्ध नसतील तर हा जमिनीचा सातबारा बनावट असल्याची निष्पन्न होईल. वझर पूर्वीचे सातबारा असतील तर आपण तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये सातबारा पुनर्लेखन करताना सदर चा सातबारा व पर्यायाने सर्वे नंबर चे पुनर्लेखन करण्याचे राहिले असल्याचे दिसून आल्याने तो पुनर लिखित करणे बाबत अर्ज दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्या आजोबांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीस एक मुलगा व तो सर्वात मोठा एकलुता एक होता, ते आता हयात नाहीत. तर, दुसऱ्या पत्नीस दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी आता केवळ दुसऱ्या पत्नीच्या दोन मुली व एक मुलगा हयात आहे. माझ्या आजोबांच्या नावे वडीलोपार्जित 14 एकर जमीन आहे. तसेच आजोबांच्या पहिल्या पत्नीस भाऊ नसल्याने तिच्या वडीलांची 28 एकर जमीनही आजोबांकडे आली. परंतु ही 28 एकर जमीन थेट (आजोबांच्या नावे झाल्याची कागदपत्रे नसल्याने) आजोबांच्या पहिल्या पत्नीच्या व तिच्या मुलाच्या नावावर झाली आहे व त्या पहिल्या पत्नीच्या मुलाने वडीलोपार्जित 14 एकर जमिनीमध्येही तिसरा हिस्सा घेतला आहे. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर जमिनीमध्ये कोणताही हिस्सा दिलेला नाही. तर, आता आम्हाला (आजोबांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना) 28 एकर मध्ये सर्वांना समान हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे किंवा कसे (सदर कालावधी सन-1970 ते 85 च्या मधील आहे.), 28 एकर जमिनीमध्ये समान अधिकार मिळविण्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 15 मध्ये हिंदू स्त्री मयत झाल्यानंतर तिच्या मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहे. या तरतुदीनुसार हिंदू स्त्री मयत झाल्यानंतर तिची मिळकत सर्वात प्रथम तिच्या मुलांना अथवा मुलींना व नवऱ्याला समान हिस्स्या मध्ये हस्तांतरित होते.
आपल्या प्रश्नांमध्ये पहिल्या पत्नीला तिच्या वडिलांना पासून जी 28 एकर जमीन प्राप्त झाली होती तिचे वाटप तिच्या मुलांमध्ये व व नवरा यामध्ये समान पद्धतीने वाटप होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे 28 एकर क्षेत्राचे मुलगा 14 एकर व पती हयात असेल तर 14 एकर. अशा पद्धतीने मिळकतीचे वाटप होणे अपेक्षित आहे. जर आपले वडील आपल्या सावत्र आई मयत होण्यापूर्वीच जर मयत झाले असतील तर संपूर्ण 28 एकर जमीन ही केवळ आपल्या सावत्र भावाच्या नावानेच होणे अपेक्षित आहे.
जर आपली सावत्र आई मयत झाली त्यावेळेस वडील हयात असतील उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे तिच्या मुलाच्या नावावर 14 एकर व आपल्या वडिलांच्या नावावर 14 एकर अशी क्षेत्राची विभागणी होणे आवश्यक आहे.
वडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नी पासून मिळालेल्या 14 एकर क्षेत्राची वाटणी त्या पहिल्या पत्नीचा मुलगा व तो जर मयत असेल तर त्याचे वारस यांना एकत्रित एक हिस्सा व आपण सर्वे भाऊ भावंडे यांना प्रत्येकी एक एक हिस्सा याप्रमाणे विभागणी आवश्यक. आपण नमूद केल्याप्रमाणे आपणाला एक भाऊ व दोन बहिणी आहेत व त्यातील एक भाऊ मयत आहे. भाऊ जर अविवाहित मयत झाला असेल तर उर्वरित 14 एकर क्षेत्र याचे चार हिस्से होतील व त्याप्रमाणे त्याचे वाटप होईल . मयत भाऊ यास मुले अथवा अन्य वारस असतील तर १४ एकर क्षेत्र ५ हिस्स्यात वाटप होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nitin Jadhav
23-12-2020
nitin.jadhav1@gmail.com

आमची वडिलोपार्जित जमीन सातबारा उताऱ्यावर ८ हेक्टर २१ आर आहे. प्रत्याक्षात मोजली असता ७ हेक्टर ७६ आर भरते. आम्हा दोन भावांना आता ही जमीन वाटून घ्यायची आहे. भाऊ उताऱ्याप्रमाणे ४ हेक्टर १० आर मागत आहे व मला राहिलेली ३ हेक्टर ६६ आर घेण्यास सांगत आहे. ३ हेक्टर ६६ आर घेणं मला अन्याय कारक वाटत आहे. त्यापेक्षा भावाला मी दोघेही ३.८८ / ३.८८ हेक्टर घेऊ असं सांगत आहे. भाऊ ऐकण्यास तयार नाही. दोघांवरही अन्याय होणार नाही असे वाटपपत्र कसे करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे.
सातबारा वर नमूद असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र आपल्या तांबे वहिवाटीत आहे. जे क्षेत्र कमी आहे त्या क्षेत्रावर नक्कीच अन्य कुणाचा तरी ताबा व वहिवाट आहे . आपण सातबारा प्रमाणे मोजणी करून घेण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अर्ज करून संपूर्ण क्षेत्राची मोजणी घ्यावी व त्याद्वारे आपणाला आपले कमी असलेले क्षेत्र कोणाच्या ताब्यात आहे याचा बोध होईल. व त्याप्रमाणे ज्याच्याकडे त्याचा ताबा आहे त्याच्याकडून ते क्षेत्रात कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याचा ताबा मिळवता येईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
आमचे वडलोपरजी 5 गुंठे नगरपालिका हद्दी मध्ये जागा आहे,त्यात माझे काका आणि माझे दोघांचे नाव आहे. पण माझे काका मला वाटणी पत्र करून देत नाहीत(काहीही तांत्रिक अडचण नसताना आणि माझी अट नसताना),आणि बांधकाम परवाना साठी संमती ही देत नाहीत.माझे घर पडले आहे आणि माझे नावे PMAY चे घर मंजूर झाले आहे. वाटणी पत्र करू मानले तर वाद घालतात, माझी कोर्ट कचेरीत पैसे खर्च करण्याची ऐपत नाही माझी. तर मी बांधकाम परवानगी कशी मिळू शकतो नगरपालिका मधून? नॉटरी किवा शपथ पत्र देऊ मिळू शकले का बांधकाम परवाना. कृपया सुचवावे.
नगरपालिका हद्दीमध्ये असलेले 5 गुंठे क्षेत्र आपण व आपले चुलते या दोघांच्या नावावर आहे. त्यामुळे त्या मिळकतीची विकास परवानगी मिळण्यासाठी आपणा दोघांच्या संयुक्त सहीचा अर्ज नगरपालिकेला आवश्यक आहे. जर आपले सन्माननीय काका नगरपालिकेमध्ये विकास परवानगीसाठी संमती देत नसतील व वाटप करण्यासाठीही तयार होत नसतील तर आपणाला कोर्टकचेरीच्या पर्याय शिवाय अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
चार प्रतिष्ठित लोक व काही प्रामाणिक नातेवाईक यांची मदत घेऊन आदरणीय काकांचे मतपरिवर्तन होईल याचा प्रयत्न करून बघण्यास हरकत नसावी. सह धारक आपली काका असल्याने त्यांना योग्य तो मानसन्मान द्या नक्कीच त्यांचे मतपरिवर्तन होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की, वर्ग क्रमांक 3 ची जमीन ज्यांना ती सनद दिली आहे ते एखाद्या शैक्षणिक संस्था वा गैर सरकारी संस्थांना दान देऊ शकतात का? आणि हक्कभंग झाल्यास वर्ग क्रमांक 3 ची जमीन परत जमा करून शासन तीच जमीन पुन्हा वर्ग क्रमांक 7 अंतर्गत शैक्षणिक संस्था अथवा दवाखाना इत्यादी करीता गैर सरकारी संस्थांना देऊ शकते का?
जमीन सारा माफी कायदा 1863 च्या क्नडीका ३ , नियम ८ अन्वये , देवस्थान जमीन हस्तांतरण करता येत नाही . श्र्थ्भंग झाला आहे म्हणून ती जमीन शासन जमा होईल मात्र ती जागा शैक्षिणिक संस्थेस देणे अथवा न देणे हा शासनाचा स्वेच्छा अधिकार आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची जमीन धरण प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनसाठी संपादित केली आहे.. आमच्या आजोबांनी त्याचा मोबदलाही घेतला होता. पण अनेक वर्ष होऊनही सदर जमिनीवर कोणीही हक्क सांगायला आले नाही.. ती जमीन सरकारला पूर्ण मोबदला देऊन आम्हाला परत मिळवता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे
आपली जमीन जर नवीन भूसंपादन कायदा 2013 अन्वये जर संपादित झाली असेल व संपादन प्रयोजनासाठी तिचा वापर विहित वेळेमध्ये संपादन संस्थेने केला नसेल तर निश्चित सदर जमीन आपणाला परत मिळण्याचा हक्क आहे.
तथापि या जमिनीचे संपादन भूसंपादन कायदा 2013 नुसार न होता अन्य कायद्यानुसार संपादन झाले असेल तर संपादन प्रयोजनासाठी वापर न झाल्यामुळे पडून राहिलेली जमीन सर्वप्रथम सार्वजनिक उपयोगासाठी आवश्यक आहे का याची पडताळणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी करावयाची आहे व जर भविष्यामध्ये सार्वजनिक प्रयोग करण्यासाठी अशा जागेची आवश्यकता नाही अशा निष्कर्षाप्रत जर मा. जिल्हाधिकारी आले तर जमीन लिलावाद्वारे विल्हेवाट लावण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे केरळ शासन विरुध्द पिल्लाय या प्रकरणात निर्देश आहेत .असा जर लिलाव मा. जिल्हाधिकारी यांनी कधी काळी केला तर या लिलावामध्ये आपण सहभागी होऊ शकता.
मात्र अशी अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे , की शासनाला सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता नसते. बहुतांशी वेळी सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता आहे किंवा नाही याचीही पडताळणी केली जात नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी,आमची महार वतन जमिन आहे आणि ती जुन्या रेकोर्ड चा सातबारा रद्द केला आहे असे दाखवत आहे आणि सरकार नाव येते आहे तर ही जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
सन्माननीय तुषार साहेब,
शर्तभंग झाल्यामुळे आपणाला जी शासनाने वतन जमीन जी दिली होती ती शासन जमा झालेली आहे व त्यामुळे आपल्या पूर्वजांचे व त्यानंतर आपले नाव लागण्याऐवजी या मिळकतीला महाराष्ट्र शासनाचे नाव लागलेले आहे.
आता प्रश्न असा आहे की ही सदर जमीन शासन जमा केव्हा झाली याची पडताळणी जुने फेरफार काढून घ्या व त्यावरून करा. शासन जमा आदेश या विरुद्ध अपील दाखल करा. मात्र जर शासन जमा करण्याचे आदेश फार पूर्वीचे असतील तर अपील करण्याची मुदत ही आता संपलेली आहे. झालेला विलंब जर अपिलीय प्राधिकरण यांनी मान्य केला तर आपले अपील दाखल केले जाऊ शकते व गुणवत्तेनुसार निर्णय होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही राहत असलेली घराची जागा सिटी सर्वे ला दुसऱ्याच्या नावावर आहे तरी संबधीत जागेच ताबा गेले ७० वर्षांपासून आमच्याकडे असून सादर घराची ग्रामपंचायत ला नोंद असून आम्ही घरपट्टी व पाणी पट्टी भारत आहे. तरी संबधीत जागा मालकाने नोव्हेंबर २०२० मध्ये मोजणी करून आत्ता जागेच ताबा मागत आहे. तरी मार्गदर्शन करावे !
या मिळकतीवर आपला ताबा गेले सत्तर वर्षाचा हून अधिक काळासाठी चा आहे. कायदेशीर प्रक्रिया शिवाय कोणताही इसम त्याच्या मालकीच्या जागेतून ज्याचा त्या मिळकतीवर ताबा आहे त्याला काढू शकत नाही. ज्या वेळेस जमिनीचा मालक आपल्याला मिळकतीतून काढून टाकण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करेल त्यावेळेस न्यायालयामध्ये आपण आपले म्हणणे दाखल करताना Adverse-possessiion या न्याय तत्त्वानुसार मिळकतीचे मालक झाल्याबाबत जाहीर करणे बाबतचा आदेश न्यायालयाने करणेबाबत मागणी करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ritesh tambat
10-12-2020
ritesh.tambat07@gmail.com

दोन महिन्यापुर्वी नोदंणी झालेल्या जमीन खरेदीखतास चुकुन ₹४०० इतका मुद्रांक शुल्क कमी भरण्यात आले. सदर बाब लक्षात घेता आता तो कमी ने भरण्यात आलेल्या मुद्रांक शुल्क भरायचा आहे.यासाठी काेणती कार्यवाही करावी.कृपया मार्गदर्शन करावे.

१) कमी भरलेला मुद्रांक शुल्क कोणत्या article खाली चलान द्वारे भरावे.

२) चलान deface कोणाकडे करावे.

३) सदर मुद्रांक शुल्क भरुन चलान defaced केल्यावर मुळदस्तावर तसा endorsment शिक्का मिळतो की तसे लेखी प्रमाणपत्र देण्यात येते. आणि ते कोण देते ?

४) सुची २ मध्ये त्यानंतर तो मुद्रांकशुल्क जोडले जाते का?

५) सदर प्रकरणी मुंद्राक शुल्क भरुन तसा उल्लेखीत चुक दुरुतीखत करण्याची आवश्यकता आहे का?

कृपया मार्गदर्शन करण्याची कृपा करावी .नम्रविनंती

This page was generated in 0.94 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3