जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by akshay shelar
10-12-2020
akshayshelar850@gmail.com
2013 sali tahshil. Order zali warsnond karnyababt Circle yani aardhwat ghatat nond keli chukacha ferfar banwala
Tyatil ek ha ghat no chi vikri zali aadhiekume aaslele yani keli talathi circle aamala n sangta vikri keli
Prant sahebana bhelto tyani 1966 madhi 247 kalam kali aaapil kara sangitle
2 ferfar challege kara aase sangitl
Aapn sanga aase kelyavar kay hoil
Talathi circle var karvai hoil. Ka
Question by गणेश पाटील
10-12-2020
ganeshpatil_phy@rediffmail.com
सर, 2 एकर जिरायत क्षेत्रातील कमीत कमी 10 गुंठे शेत जमीन खरेदी करता येईल का? किंवा 20 गुंठे शेतजमीन खरेदी करताना दोन खरेदीदार नावे एका उताऱ्यावर लागतील का? कृपया मार्गदर्शन करावे.
जिरायत क्षेत्रासाठी जे काही प्रमाणभूत क्षेत्र आपल्या जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी किंवा भागासाठी सुनिश्चित केले असेल त्यानुसार जर विक्री करावयाचे क्षेत्र अथवा विक्री केल्यानंतर शिल्लक राहणारे क्षेत्र हे जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होत असेल तर त्याचा कोणताही व्यवहार अथवा विक्री कायदेशीर असणार नाही. आपल्या जिल्ह्यासाठी सध्या जिरायत स्वरूपाच्या जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र काय आहे याबाबत तहसीलदार कार्यालयात चौकशी करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pradip Baviskar
08-12-2020
22kars@gmail.com
नमस्कार सर, आम्ही 2013-2014 मध्ये जागा खरेदी केली,तशी नोंदणी पण झाली आहे. पण 7/12 मध्ये आमचं नाव आज पर्यंत आलेले नाही.आमची गृप मीळून जागा ८+६ गुंठे इतकी आहे. स्थानिक पातळीवर सबंधित कार्यालयात वारंवार भेटून त्यांनी फक्त एकच उत्तर मिळाले, वरून नोंदणी झालेली नाही, आमच्या सोबत नोंदणी झालेली गृपची नावे ७/१२ नोंदणी झालेली आहे, पुढे काय करावे कृपया मार्गदर्शन करा .
आपण खरेदी केलेली जागा ही बिनशेती जर स्वरूपाची जागा आहे का की तिचे स्वरूप शेती या सदराखाली ला आहे? जर ही जागा शेती स्वरूपाची असेल व गावठाणा पासून दोनशे मीटरच्या आत मध्ये असेल तर सध्याचा जो मूळ मालक आहे त्याला त्याचा बिनशेती धारा भरून मानव बिनशेती झाल्याबाबत चे आदेश तहसीलदार साहेब यांच्या कडून प्राप्त करून घ्या.
जर खरेदी केलेली जागा ही मूळचाच बिनशेती असेल तर खरेदीचा दस्त गाव कामगार तलाठी यांच्याकडे सादर करा व त्यांना फेरफार टाकणी व मंजूर करण्याच्या दृष्टीने लेखी उत्तर देण्याबाबत आग्रह करा. जर तेथूनही आपणास दिली गेली नाही तर आपण त्या तालुक्याचे तहसीलदार यांना समक्ष भेटून आपली व्यथा कथन करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sanket Agrale
04-12-2020
agralesanket@gmail.com
नमस्कार सर.
माझा प्रश्न असा आहे की, माझा मामानी माझा आजोबांच्या नावे असलेली वडिलोपार्जित २ हेक्टर. ७० आर. जमीन वाटणी पत्रा द्वारे आजोबांच्या हयातीत फक्त २ भावांमधेच १९७६ ला वाटप करून घेतली व १९८१ ला त्याच दोघा भावांनीच ९०-९० आर.क्षेत्र असा वेगळा पोट हीस्सा केला. आजोबांच्या नावे ९० आर. मधेच २०१९ मधे नव्यानेच वारस नोंद केली त्यामधे ५ वारस आहे म्हणुन फेरफारात नोंद केली. तर यात आम्हाला आजोंबांच्या नावे असलेली २ हेक्टर. ७० आर. मधे त्यांच्या ३ मुलांना व २ मुलींना सम-समान वाटणी हवी आहे त्या साठी काय कराव लागणार.
सर मला मार्गदर्शन द्या हि विनंती.
संकेत कुमार
सन 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली व या सुधारणा कायद्यानुसार वडलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांप्रमाणेच मुलींनाही जन्मताच मालकीहक्क प्रदान करण्यात आला. मात्र जर डिसेंबर 2004 पूर्वी या मिळकतीचे हस्तांतरण झाले असेल अथवा वाटप झालेले असेल तर अशा मिळकतीमध्ये मुलींना हक्क असणार नाही.
मात्र आजोबांचे 90 गुंठे क्षेत्र आजोबांच्या मृत्यूपश्चात आपले तीन मामा आपल्या मातोश्री व आपल्या मावशी यांच्या नावे वारस हक्काने होणे अत्यंत आवश्यक. मात्र आजोबांच्या वाटपा पूर्वीच्या एकत्रित ोन हेक्टर सत्तर आर क्षेत्रावर आपल्या मातोश्री व मावशींचे नाव , पूर्वीच वाटप पूर्ण झाले असल्याने .नाव लागणे अशक्य आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ajit
04-12-2020
ajitjadkar2550@gmail.com
धरणग्रस्त पुर्नवर्सनातुन जमीन मिळाली आहे. नवीन शर्त कमी करुन खातेवाटप करायचे आहे.जमीन मिळून २५ वर्षे झाली आहेत. कसे करावे.
पुनर्वसन कायद्याखाली प्राप्त झालेली जमीन ही त्याच धारणा अधिकाराची असते त्याच धारणा अधिकाराची जमीन संपादित झालेली असते. त्यामुळे आपली संपादित झालेली जमीन जर वर्ग प्रकाराची असेल तर खाते वाटप करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र जर ती वर्ग-2 या स्वरूपाची संपादित झालेली असेल आपणाला सक्षम प्राधिकारी याची परवानगी निश्चितपणे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रघुनाथ जाधव
04-12-2020
raghunathk058@gmail.com
नमस्कार सर,
आमच्या शेताच्या सर्वात जुन्या १९४२, १९४३, च्या ७/१२ वर शेताचे "सर्वे नं ७४ नवादे बरड", "कबजेदर - आकारी पडीत (१०८)" अशी नोंद आहे.
या उताऱ्यावरील सर्वात जुनी नोंद १०८ क्रमांक तहसिल रेकॉर्ड रूम मधून काढली असता ती खालील प्रमाणे आहे.
मे. प्रांत यांचे कडील g. m.s. R 459/(27.6.1932) चे हुकमाने रे. कोड कलम १६३ प्रमाणे मारोती ......
(आजोबांचे नाव) यांच्या खात्यातील स. नं. ७४ ......
आवाचणीय मजकूर....... खालसा केले...........आवाचणीय मजकूर....
या जमीन संबंधित एक कागद घरात उपलब्द आहे. तो म्हणजे,
नमुना बाब (१), कानू ३७(४) दुमाल नाही अशा ....काराने जमिनीचे खातेदार होण्याचा ज्या मनुष्याचा इरादा असेल त्या मनुष्यांनी करून द्यावयाचा कबुलतीचा नमुना. हे प्रांताच्या आदेशाने 1964 मध्ये आजोबाच्या अंगठ्याच प्रतिज्ञापत्र आहे.
वरीलप्रमाणे कबूलातनामा माझ्या आजोबांकडून मामलेजददार जामनेर यांनी 1 ऑगस्ट 1964 ला लिहून घेतलेला कबुली जबाब माझाकडे आहे .त्या संबंधित 1964 चे प्रांताचे आदेश आज रोजी आमच्याकडे नाहीत, कदाचित घरातून गहाळ झालेले आहेत.
वरील जमीन आमच्या पूर्वजांना सरकारकडून मिळाल्याचे वडिलांकडून माहीत आहे, पण आज त्याबद्दल इतर माहिती आमच्याकडे काहीच नाही.
तरी, वरील 1964 च्या संदर्भात शासनाचे काही धोरण किंवा आदेश के असावेत?
कृपया मार्गदर्शन मिळावे
Question by Kiran
02-12-2020
Kiranshete1193@gmail.com
सर नमस्कार,
सर गावाला आमची साडेचार एकर जमीन आहे. माझे वडील व तीन चुलते अशी चौघांच्या नावे होती. माझ्या मोठ्या चुलत्यांनी त्या काळात १९६० च्या दरम्यान तगई कर्ज काढले होते..ते त्यांनी नंतरच्या काळात भरले नसलेने सातबारा वर सरकार नाव लागले. मात्र नंतर च्या काळात हे चौघे वारले..त्यानंतर माझ्या आईने 1998 साली काही रक्कम ट्रेजरी आँफीस ला भरलेची पावती आहे..त्यावर तसा शिक्का आहे...पण अंतर्गत कलहामुळे ह्या चौघांचे वारस एकत्र येत नाहीत. व जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवत नाहीत.सध्या या जागेतील 26 गुंठे ही राष्ट्रीय महामार्गाकरीता गेली असून त्याबदल्यात मिळणारा मोबदला हा सरकारी तिजोरीत पडलेला आहे.सरकखरचे नोटीस आले होते,की तुम्ही सर्व सातबारा वगैरे proper घेऊन या.. पण सातबारा वर सरकार नाव असलेने पैसे अडकून पडले आहेत..व जमीन देखील सरकार नावे पडून आहे..ह्यांचे वारसदार एकत्र येत नाहीत.त्यामूळे आमचा चौथा हिस्सा अडकून पडला आहे.
सर काही उपाय सांगा जेणेकरून माझी चौथ्या हीस्स्याची जमिन व पैसे मला मिळू शकतील...
Question by Hemant B Bairagi
01-12-2020
hemantbairagi145@gmail.com
नमस्कार
मझ्या वडीलांचे सन २०१२ साली निधन झाले असुन आम्ही ४ बहिण व १ भाऊ आणि आई. तर वडिलांच्या नावे एक घर व वडिलोपार्जित जमिण आहे. वडिलांचे निधन झाल्या नंतर आम्ही फ्क्त ३ बहिणी १ भाऊ व आई यांचे नाव घराला व सातबाऱ्या मध्ये लावले आहे. वडिल हायात असताना माझ्या ३ नंबरच्या बहिणिने घरातुन पळूण जाऊन लग्ण केले असता आम्हाला तीचा पत्ता नसल्याने आम्ही तीचे नाव लावले न्वहते तर आता १३ वर्षा नंतर त्या बहिणीला तीचा वाटा हवा आहे तर तीचे म्हणने आहे की मला माझ्या सहाव्या हिश्या नुसार पैसे द्या . तर सर माझा प्रश्न असा आहे की तिचे नाव घराला व सातबाऱ्या न लावता तीचा हिस्सा देऊन तिचा हक्कसोड करून घेता येईन का...?
Question by गणेश शिंदे
01-12-2020
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,मनपा.हद्दीत बांधकाम परवानगी घेऊन इमारत बांधली आहे.मिळकत कर नियमितपणे भारत आहे.परंतु का.तलाठी यांचेकडून बिनशेती कराबाबत नोटीस प्राप्त झाली आहे.तो कर भरणे आवश्यक आहे का/किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती त्याबाबत शासन निर्णय असल्यास कृपया ई-मेल वर पाठविल्यास बरे होईल.
Question by Haresh
30-11-2020
hareshbhoir587@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे.की देवस्थानाच्या जमिनीवर माझे वडील कुल म्हणून लागलेले आहेत. व. त्या जमिनीत अतिक्रमण झालेले आहे. तर मला सरकारी मोजणी आणून आणून सादर जमिनीत हक्क कायम करता येऊ शकेल का.?मला मार्गदर्शन करा .
Question by Vikram Mane
30-11-2020
vikramane999@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या शेताजवळील शेजाऱ्याने मूळ रस्तावर सुमारे १० फुट अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. त्यास मी जुने दगड असल्याने शासकीय नकाशा दाखवून समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कोणाचेच ऐकत नाही. तसेच याबाबत मिटिंग मध्ये चर्चा करण्यास मुद्दाम बायकोला पुढे करत असतो. त्यामुळे लोकांना काहीच चर्चा करता येत नाही. आणि बायको पण महिला असल्याने फायदा घेत सर्वाना शिव्या देणे, धमकावणे यासारखे प्रकार करते. याबाबत काय करावे.
Question by किरण पोपट जाधव
30-11-2020
kiran.jadhavs@gmail.com
माझी नाशिक महापालिका हद्दीत 4 गुंठे जागा असून तिथे मी कुठलेच बांधकाम केले नसून ,माला तुकडा बंदी कड्या नुसार नोटिस आली आहे,तरी दंडाची रक्कम खूप जास्त असून मी आता काय करू शकतो,आमचा 4 जन मिळून 20 गुंठायचा सातबारा आहे ,आणि जमीन नवीन आराखड्यात पिवळ्या पट्टीत आहे.तरी आलेल्या दंडाची नोटिस चे काय करावे या विषयी माहिती द्यावी ही विनंती
Question by Sujit Jagta
29-11-2020
spj100@rediffmail.com
राज्य महामार्गालगत असलेल्या शेतजमिनी मध्ये- शेती ना विकास झोन या क्षेत्रामध्ये बांधकाम करावयाचे असल्यास काय नियम आहेत याची माहिती मिळावी.
Question by Mangesh jangam
28-11-2020
Mangesh.Jangam15@gmail.com
Maza father chi dapoli madhe land ahe tenchi death zalavar mi and sister cha name 7/12 var lagala ahe but teacha madhe maze father ne teacha sathi 25% hissa Asa wheel madhe write kela ahe tila hee accept ahe Asa bolte division sathi samor yet nahi tar karava lagel
Question by sanyog ulhas gandhi
27-11-2020
sanyoggandhi@rediffmail.com
Namaskar sir,
Mazya chulat bhavachya vadilani(satbara malak)1975 sali 5rs bond paper var vatap yadi madhe gharachya west side cha gurancha vada tasech vadyachya west and north side jaga dili ahe ase namud kele ahe.1986 sali tethe mazya vadilani ghar bandhle.Ata ti jaga navavar karun ghenesathi kai karave lagel.
please,guide us.
Question by Suresh Thakre
26-11-2020
naresh.807@rediff mail.com
साहेब नमस्कार,
2012 मध्ये माझ्या भावाने ट्रॅक्टर खरेदी करिता बँकेचे लोन घेतले, तेव्हा भावाने स्वतःचा, माझा, व आईचा प्रत्येकी 2 एकराचा सातबारा जोडला, परंतु तेव्हा बँकेने आमच्या जमिनीवर कर्जाचा कोणताही बोजा चढविला नाही, नंतर 2017 मध्ये भावाची मृत्यू झाली, नंतर बँकेने तलाठ्याला नोटीस पाठवून आमच्या तिघांचा जमिनीवर कर्जाचा बोजा ची नोंद घेण्यास सांगितले, तेव्हा तलाठ्याने माझ्या भावाच्या जमिनीवर कर्जाचा बोजा चढविला, तर मला हे जाणून घायचे आहे की, इतक्या वर्षांनी बँक व तलाठी सातबारा वर बोजा ची नोंद घेऊ शकतो का, व आमच्या जमिनीवर सुद्धा त्यांना आता बोजा चढविण्याचा अधिकार आहे का, सद्या आमच्या जमिनीवर बोजा ची नोंद घेतली नाही
बँकेने आपणाला कर्ज दिले होते व त्यासाठी आपण तारण म्हणून आपली जमीन दाखवलेली आहे. ही वस्तुस्थिती केवळ पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर बदलते असा होत नाही. जर कर्जाची फेड झालेली नसेल तर बँकेला असा बोजा ठेवण्याचा हक्क आहे. आपल्या भावांनी जमीन गहाण ठेवताना अथवा तारण ठेवताना त्याबाबतचा दस्त केला होता का याची खातरजमा करा. जर दस्त केलेला नसेल तर दस्ता शिवाय इतर हक्कांमध्ये बँकेच्या विनंती प्रमाणे अथवा सूचनेप्रमाणे बोजा ठेवण्याचा अधिकार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश भेलके
26-11-2020
bhelke1987@rediffmail.com
आदरणीय सर,
माझ्या आईच्या भावांनी बहिणी नाहीत असे जमिनीचा पंचनामा करताना सांगितलं होता, आणि माझ्या आईने अपील करून जमिनी मध्ये नाव टाकून घेतली, मला जाणून घ्यायचा होता ५ भाव आणि ३ बहिणीची जमिनी मध्ये नाव असताना भाव आपला स्वतःचा वाट्याची जमिनी विकू शकतो का? आणि जर विकला असेल तर पुढे बहिणींना काय करायला पाहिजे?
वडिलोपार्जित मिळकत तीमधील आपला हिस्सा विकत घेण्यापूर्वी, इतर वारसांना तो खरेदी करण्याचा प्राधान्यक्रम हिंदू वारसा कायद्यामध्ये आहे. त्यामुळे जमीन विक्री यापूर्वी आपणाशी जमीन खरेदी करणे बाबत मामाने संवाद साधणे आवश्यक .मात्र जर जमिनीच्या विक्री किमतीबाबत आपणाकडून कमी किंमत देऊन केल्यास ती इतरांना विकण्याचा आपले मामा साहेबांना पूर्ण अधिकार आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हर्षल पोळ
25-11-2020
harshalpol1998@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की आमची काही वर्ष पूर्वी 3.70 एकर जमीन पुनर्वसणात गेली आहे आता ती आम्ही विकत घेऊ शकतो का त्याच्यासाती के पर्यय आहे सांगावे
Question by Ramesh Deokar
25-11-2020
deokar09ramesh@gmail.com
Hi Sir/Madam,
1977 sali manjur zalela road ha aamchya malki hakk aslelya jaminitun jatoy. Ata tya road ch rundikaran hotay. Tyachya mobadalyachi vicharpus keli asata amhala asa sangitl gelay ki 1977 sali jaminiche danpatr kele asalyakaranane tumhala mobadala milanar nahi. Sambhandhit vishayi amhi kuthalehi danpatr kelele nahi. Tari road rundikaranat janarya jaminicha mobadala milnyasathi kay karave lagel.
Question by Vicky
24-11-2020
Nadkarvicky@gmail.com
सर आमचा सर्वे न. 60 आहे पन त्याचा 7/12 नाही आहे तर आमच्या गावच्या हदीत दोन 60 सर्वे न आहेत तर 1 हा उडापा न आहे पन जो आमच सर्वे न 60 आहे तो सर्वे न 59 च्या पोटात आहे तर आम्हाला आमचा 7/12 कसा भेटेल
Question by Vikram Dupade
23-11-2020
vikramdupade8421@gmail.com
नमस्कार सर, आमची ३ एकर शेती वडिलांच्या नावावर आहे. वडील दारू पित असल्यामुळं आम्हाला न माहीत होताच परस्पर जमीन विकतात तर मी त्यांचा मुलगा म्हणून कायद्यानुसार त्यांना जमीन विकण्यासाठी थांबवू शकतो का??? ज्यावेळी वडील जमीन विकण्याचा व्यवहार करण्याचा प्रयत्न करतील तेंव्हा त्या जमीन विक्री साठी माझी संमती भेटल्याशिवाय जमीन विकली जाणार नाही, असे काही मला करता येईल का????
Question by Rakesh P
23-11-2020
suvi.shivshankargs@gmail.com
वडिलोपार्जित घराची वडील स्वर्गवासी झ्हाल्यावर त्यांच्या मुलांच्या नावावर घरपट्टी सामान "अ" आणि "ब" विभागणी केली. परंतु मोठ्याभावाने घरातील जागा अर्धी देण्यास नकार दिला. या प्रकरणी काय कारवाही करावी? ग्रामसेवक/ ग्रामपंचायत यांचेकडे अर्ज देऊन घरातील अर्धा हिस्सा मागू शकतो का?
Question by विश्वनाथ गोरख आढाव
23-11-2020
vgadhav80@gmail.com
माझ्या वडीलांनी 1988 रोजी माझ्या आईच्या नावावर जमीन विकत घेतली होती पण माझ्या पुतण्याने माझ्या अशिक्षित आईशी विश्वासघात करून ती जमीन बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज काढत आहे. ते कर्ज आता वितरित होणारं आहे तर मी ते कर्ज वितरित करण्यापासून कसं रोखू ?
Question by Pravin Ramakant Shinde
22-11-2020
ps9469@gmail.com
नमस्कार ,
मी 1988 साली रीतसर खरेदीखत करून 1500 चौरस फूट रिकामा प्लॉट खरेदी केला रेजिस्ट्री ची प्रत माज्याकडे आहे , परंतु महसूल दप्तरी याची वर्दी द्यावी लागते हे मला माहित नसल्यामुळे त्याच्या 7/12 वर फेर घेण्यात आला नाही आता 33 वर्षनी याचा फेर घेण्यासाठी काय करावे लागेल ,व शासननियमनुसार याला किती विलंब शुल्क लागेल कृपया माला मार्गदर्शन करून उपकृत करावे
Question by संकेत धिंडले
22-11-2020
sanketdhindale52@gmail.com
सर माझ्या जमिनीमध्ये 1952सली जंगल वहिवाट द्वारे काही इसामांच नावे दाखल झाली आहेत 70% क्षेत्रावर पण त्यांनी ते क्षेत्र 5 वर्षाच्या आत विकले आहे.तरीही माझ्या वशाजांची नावे त्यांच्या क्षेत्रापैकी 40% हिष्यावर चालू सात बऱ्यावर 7/12 दाखवत आहेत. जंगल वहिवाट मध्ये त्याची नावे ही चुकीच्या पध्दतीने दाखल केली आहेत. कारण क्षेत्र बुकला माझ्या वंशजांची नावे असतानाही त्याची नावे दाखल करण्यात आली आहेत तरी त्याची नावे कमी करण्यासाठी काय करावे
यावर सर आपण मार्गदर्शन करावे,ही आपणास विनंती.
आपला विश्वासू
संकेत धिंडले
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
