जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर नमस्कार सर आम्हाला सन 1972 साळी एकसाली प्लॉट वाटप केले आहे . या प्लॉट ची विक्री करता माहिती घेतली तर फॉरेस्ट ऑफिसर बोलतात की याचे निर्वणीकरण झाले नाही निर्वाणी कारण करण्या साठी काय करावे लागेल ,व कुठे अर्ज करू शकतो माहिती मिळेल का
निर्वणीकरण करणे ही प्रक्रिया फार क्लिष्ट स्वरूपाची आहे. भारतीय वन संवर्धन कायदा 19८० भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत निर्वणीकरण करण्याचे आदेश भोपाळ येथून प्ररित केले जातात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Hii नमस्कार प्रांतिक सरकार हा ७/१२ उताऱ्यावर शेरा आहे हा शेरा रद्द करण्या करिता काय करावे व कोणा कडे अर्ज दाखल करू शकतो माहिती मिळेल का
सर सामाइकातील २८ आर पैकी १४ आर जमीन विकत घेता येईल का परवानगी लागेल का
आपली जमीन ज्या भागात /जिल्ह्यात स्थित आहे त्या जिल्ह्याचे / भागाचे , तुकडे बंदी व तुक्देजोड कायदा अन्वये, जमीन स्वरूप नुसार , म्हणजे ( जिरायत /बागायत या नुसार ) प्रमाण भूत क्षेत्र प्रमाण किती आहे याची पडताळणी करा /माहिती घ्या . जर हे प्रमाण १४ R पेक्षा कमी असेल तर , विक्रीस बाधा नाही . मात्र जर जास्त असेल तर , विक्री दस्त नोंदला जाणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir, my name in property card on lessy now i want . to convert in holder what is its process in city servey please tell me.
From your question, it appears that the government has leased you land, and you are the lessee of the Government's land. The land is situated within the Municipal Council limits or municipal corporation limits.
The government of Maharashtra has issued GRs in respect of a few Municipal Councils, wherein , such lessees have been given an option to convert the land on leasehold rights to freehold rights on payment of conversion charges as prescribed. You may look for whether such type of GR has been issued by GoM in respect of the area where you are holding land on leasehold rights.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा सर माझा मोठा भाऊला वारलेला आहे आणि. जमिन सामाईक आहे मला जमिन भावाच्या मुलांना वाटणी करुन द्याची आहे पण माझ्या 7 12 मध्ये इतर हक्कात माझ्या आत्याच नाव आहे व आत्या देवाघरी (वारल्या ) आहे पण आत्याचा मुलगा हक्क मागतोय आत्या च्या मुलाला हक्क घेण्याचा अधिकार आहे
ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की, आमचे 7/12 वर असे लिहिले आहे की मे.कलेक्टर सो.बहादूर यांचेकडील हु.नं आर डब्ल्यू एस/1606/65दि.18/11/55अन्यवे यांचे परवानगी शिवाय वाटणी,गहाण, अगर तब्बदली न रकमेच्या शर्यतीवर(1591) तर हे कमी करण्यासाठी उपाय सांगा.
ज्या वेळेस अशा प्रकारचा शेरा सातबाराच्या इतर हक्क सदस्य असतो, याचा अर्थ ही जमीन आपणाला शासनाने कब्जे हक्काने दिलेली आहे. त्याच बरोबर ही जमीन आपणाला अविभाज्य सत्ता प्रकाराने दिलेली आहे. या मिळकतीवर आपणाला अमर्याद मालकी हक्क प्राप्त नाही. त्यामुळे हस्तांतरण अथवा गहाण ठेवणे यासाठी आपणाला शासनाची वेळोवेळी परवानगी घ्यावी लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबानी त्यांच्या मिळकती मध्ये सर्व मुलांचा उल्लेख केला आणि ७/१२ मध्ये नाव दाखल झाले. त्याच प्रमाणे आजोबा आणि आमचे मामा मार्फत त्यातील काही मिळकती खरेदी देण्यात आले आहेत व काही अजून शिल्लक आहेत. त्यांची वारस नोंद तपासली असता असे आढळले की '' मुली नाही '' असा खोटा तोंडी वारस नोंद झाला आहे. सत्य असे की त्यांना माझ्ने मूळ मालकाला (अजोबा) मुलगी होती, जि माझी आणि माझ्या २ बहिणींची सखी आई होती. ती मयत असून आम्ही तिघे वारस आहोत परंतु आमचे मामा आम्हाला वारस हक्क देण्यास म्हणजे आमचा नाव दाखल करण्यास तयार नाहीत. माझी आई अशीस्क्षित होती म्हणून तिचा शाळेचा दाखला नाही. त्यावेळेस ग्राम पंचायत नव्हती म्हणून जन्म दाखला आणि मृत्यू दाखला नाही. आज आम्ही आमच्या आई वारस असल्याचा सत्य दवा करू इच्छितो. त्या साठी कृपा करून या संदर्भात पूर्ण सहकार्य करावे हीच विनंती.
The Specific Relief Act 1934 च्या कलम 34 अन्वये आपल्या मातोश्री या आजोबांनंतर त्यांच्या वारस आहेत हे जाहीर करून मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्याच दाव्यामध्ये आपल्या आईचा/ मातोश्रींचा हिस्सा निश्चित करून मिळावा याप्रमाणे मिळकतीचा ताबा मिळावा असाही दावा करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सन 1976 मधे दगड खाण रॉयल्टीची रक्कम 630677/- रूपये थकीत राहील्याने, 7/12 वर बोजा नोंदविण्यात आला. त्यानंतर 1980 मध्ये सदरची जमीन शासन जमा करून, त्यावर सरकार व आकारीपड अशी नोंद घेण्यात आलेली आहे. परंतु सदर जमिनीचा लिलाव करून विक्री करून, रॉयल्टीची रक्कम अदयाप वसुल केलेली नाही. 2020 मध्ये सदर थकीत रक्कम भरण्यास संबधित कसूरदार तयार आहे. तेंव्हा सदर रक्क्म रूपये 630677/- वर कोणत्या दराने व्याज आकारता येईल. पी.एल.आर प्रमाणे व्याजाची आकारणी करता येईल का? तसेच कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार व्याजाची आकारणी करता येईल? व्याजाच्या रक्कमेला कांही मर्यादा आहेत काय ?
होय आपण याप्रमाणे करू शकता. PLR प्रमाणे रकमेवर व्याज आकारणी करून ती रक्कम भरून त्या वरील बोजा काढू शकता .
जमीन जर सरकारी आकारी पड केली असेल तर , पैसे जमा केल्यावर , त्याच्जे नावावर जमीन करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची २१ जणांची सामुदायिक जमिन आहे,परंतु बँकेने फक्त दोघांचे गहाणखत बनवुन कर्ज दिले व याची नोंद ७/१२ ला केली.इतरांची सहमती नसताना कर्ज मिळते का?
दोघांनी गहाणखत केलेले आहे म्हणजे केवळ दोघांच्याही त्याचे क्षेत्र गहाण ठेवले आहे असा अर्थ कायद्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे आपली जमीन जर आपली कडून गहाणखत केलेले नसेल तर ती घाण ठेवलेली नाही.
आपण चिंतामुक्त राहावे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही ज्या जागेवर राहतो ती जागा बी अँड सी ची आहे... आम्हाला 50 वर्ष होत आहे तिथे राहून ....रोड च्या साईड ची जमीन म्हणजेच बी अँड सी ची जमीन नावावर होऊ शकते का?
प्रनित राव ठाकरे,
अहो ती रस्त्याच्या बाजूची जागा आहे व ती जर बांधकाम विभागाच्या मालकीची असेल, आपण न्यायालयात गेला तरीही फारसा फायदा होईल असे मला वाटत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amit pawar
01-11-2020
amitpawar21@Gmail.com

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की जमिनीची नोंद करताना चुकीने नावात बदल झाला आहे त्या मुळे जमिन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे लागली आहे तर ती जमिन मुख्य वारसदाराचे नावे करण्यासाठी काय करावे लागेल जर ती व्यक्ती जमिनीवर हक्क सांगत असेल तर पिढी जात वारसाने जमिनीची मालकी कशी मिळवावी
जोपर्यंत आपण जो दस्त केलेला आहे आणि त्यामध्ये चुकीने इतर इसमाचे नाव लागलेला आहे असा जास्त दिवाणी न्यायालयाकडून रद्दबादल केल्याशिवाय काहीही उपयोग होणार नाही. आपणाला महसूल न्यायालय मध्ये दावा दाखल करून काही फायदा होणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर ,
वडिलांचे 7 12 सदरी नाव लग्न पूर्वी वाटण्या करून झाल्या आहेत. त्यांचे नाव शिवाजी संभु माळी असे आहे.परंतु त्याचे स्वतः शैक्षणिक कागदपत्रे व इतर शिवाजी संभाजी गोरे या नावाने असून मुलांचे नावे गोरे या आडनाव चे आहेत .7/12 ला शिवाजी संभाजी गोरे असे करायचे आहे जेणेकरून मुलांना सुध्दा पुढे अडचणी निर्माण होणार नाहीत . त्या वेळी शाळेत सवलत मिळते मानून अडणावप्रमाणे लावले पण 7 12 सदरी जाती प्रमाणे उल्लेख आहे . काय करावे उपाय सुचवा
कागदोपत्री आपल्या वडिलांचे आडनाव जर गोरे असेल तरीही कागदपत्राच्या आधारे आपण मेहरबान तहसीलदारांना अर्ज केला, तर ते अर्जावर निर्णय घेयू शकतील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

काका अविवाहीत होते त्यांनी मुत्य पत्र पुत्न्याचा नावाने केले आहे व सध्या त्यांना वरून 1 वर्ष झाली मी नोंद करण्यासाठी गेलो असता माझा अत्याचे नाव नोटीस मध्ये टाकले पण सातबारा व फेरफार मध्ये याचे नाव नाही त्याचे मग हे नाव कसे आले मी पटवारी यांना विचारले असता ते कोणी अनहोलकवक्ती चे नाव घेऊन नाव टाकले असे बोलत आहे व माझा काका नी जे मत्यू पत्र बनू न ठेवले ते काय?
भूषण भाऊ आपण घाबरण्याचे काही कारण नाहीये.आपल्या काकांची जर ही स्वकष्टार्जित मिळकत असेल, तर ती मिळकत वृत्तपत्राच्या द्वारे ती कोणाच्याही नावे करू शकतात. आपलेच नाव मिकातीच्या सातबारा सदरी लागणे क्रमप्राप्त आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा असा प्रश्न आहे मी बारा वर्षे पूर्वी प्लॉट घेतला होता चुकीने तलाठी यांच्या कडून फेरफार केला गेला नाही पाहिली रजेष्ट्री माझी आहे. समोरच्या व्यक्तीने आमच्या मांगे तो प्लॉट ए ला विकला ए तो बी ला विकला बी ने तो सी ला विकला. त्यांचे फेरफार झालेले आहे.ते फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल सर प्लीज सर माहिती सांगा.
Who is prior in time , is prior in Law . आपल्या नावे प्रथम जर खरेदीखत असेल तर आपण त्या मिळकतीचे मालक आहात. आपल्या नंतरच्या दस्तनोंदणी द्वारे, त्या इसमाचे नाव सातबारा सदरी दाखल झाले असेल तर आपणाला त्या नोंदी विरुद्ध अपील करावे लागेल.
व दस्त आधारे त्या इसमाचे नाव सातबारा लागलेले नसेल तर केवळ आपणाला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे आणि आपल्या नावाची नोंद करण्याची विनंती करायची आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandip
31-10-2020
sandeep.kadam545@gmail.com

Hello sir, My question is if one gat no divided by small river (odha) and on one side there is one farmer and for other side there is another farmer but other side there is already a route(rasta) for all the farmers around 70 years .so still that another farmer can ask for the new route to first farmer? Kindly help on this
The route you are referring to is called Easement Right. An easement right, unless it is necessary, cannot be demanded. The other farmer cannot claim or demand an alternate right of way.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांच्या आजोबांना दोन पत्नी होत्या त्यातील एका पत्नीला 3 मुले व एकीला एक मुलगा होता संतू नावाचा त्याच्या नावावर त्यांच्या आईकडून वारस हक्काने आलेली जमीन होती त्याला सक्की बहीण नव्हती, तो एकटाच होता तसेच संतू याच्या पत्नी फसाबाई ह्या वारस होत्या व फसाबाई यांना सुद्धा त्यांच्या आईकडून वारस हक्काने जमीन मिळालेली जमीन त्यांच्या नावे आहे , त्यांना वारस हक्काने येणाऱ्या जमिनीच्या फेरफार वर संतू व फासाबाई यांच्या नावावर करावी असा स्पष्ट उल्लेख आहे , तरी आम्ही त्यावर वारस नोंद करू शकतो काय. कृपया माहिती द्यावी.
रामदास भाई,
आपल्या प्रश्नावरून आपण संतु चे वारस आहात का की संतु चे सावत्र भाऊ याचा बोध होत नाही. असोत .
सध्या संतु व फसा बाई हयात नसतील v संतुलाही कोणते अन्य वारस नसतील तर आपले नाते संतुशी भावाचे आहे . त्यामुळे आपण वर्ग २ मधील IV वारस आहात . आपले नाव लाडू शकते .
मात्र तसा बाई किंवा संतु जर हातात असेल तर आपले नाव लागणार नाही आपण प्रयत्नही करण्याच्या फंदात पडू नये.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे पणजोबा यांची१८८५ पुर्वी कॅनालसाठी जमीन सरकारने घेतली व मोबदला म्हनुन पुनर्वसनात दुसऱ्या गावात जमीन दिली. आमचे त्या गावी जास्त येणे जाणे नव्हते याचा फायदा घेऊन मिळालेल्या जमीनीचे मालक सदर जमीनीला कुळ म्हनुन लागले. आजरोजी आमची नावे ७-१२ वर आहेत व कुळांची नावे सुद्धा मालक सदरी आहेत.
१) पुनर्वसन मध्ये मिळालेल्या जमीनीला कुळ लागु शकते का?
२) कुळ म्हणुन लागलेली नावे कमी होऊ शकतात का? त्यासाठी काय करावे लागेल?
असा आहे की महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 हा कायदा पुनर्वसन कायदा अंतर्गत मिळालेल्या जमिनीलाही लागू शकतो.
आता प्रश्न असा आहे की 1985 झाली तुमची जमीन पुनर्वसन ना मध्ये तुम्हाला मिळालेली आहे त्यामुळे जो काही पूर्वीचा मालक आहे त्याची कुळवहिवाट हे कृषक दिनानंतर म्हणजे एक ०१. 04:57 नं तर निर्माण झालेले आहे त्यामुळे त्याच्या नावे जी काही किंमत निश्चितीकरण करणे व त्याचे नाव मिळते ती लागणे ही सगळी प्रक्रिया कुल म्हणून जाहीर झाल्यानंतर एक वर्षाच्या आत होणे अभिप्रेत होते. पुर्वीचा जो जमीन मालक होता तो ज्या वेळेस कूळ म्हणून त्याला जाहीर केले त्याच्या नावे जमिनीची विक्री किंमत निश्चित करण्याची कार्यवाही एक वर्षाच्या झालेले आहे का याची सगळी पडताळणी आपण जुने फेरफार पाहून करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखाद्या अध्यात्मिक संस्थेने पूर्वी ६३ ची परवानगी घेऊन शेतजमीन क्षेत्र ०हे.५० आर इमारत बांधणेकामी बक्षिसपत्राने घेतली.व बिनशेती व रेखांकन मंजूर करून घेतले.परंतु शेजारी असलेला ०-१० आर चा गट नंबर रस्त्यात जात असल्याने तीही जमीन संस्थेस बक्षीसपत्राने मिळाली .परंत ०-१० आर बाबत ६३ ची परवानगी न घेतल्याने मंडळ अधिकारी यांनी सदर बक्षीसपत्राची गावी घेण्यात आलेली नोंद रद्द केली.तर त्याबाबत कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे अपील करून शर्तभंग नियमित करता येईल? सदर जमिनीचा वापर शैक्षणिक कारणासाठी होणार असल्याने नजराणा भरावा लागेल का?किंवा कसे? भरावा लागल्यास किती टक्के भरावा लागेल.?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 परवानगी न घेतल्याने मंडळाधिकारी यांनी ज्या दस्ता द्वारे तुम्ही ती जमीन खरेदी केली होती त्या दस्ताच्या आधार याची नोंद टाकण्यात आली होती तो दस्त मंजूर करण्यास नकार दिलेला आहे व त्याप्रमाणे फेरफार रद्द करण्यात आलेला आहे.
या बाबतीमध्ये मंडळाधिकारी यांनी केवळ फेरफार मंजूर करण्यास नकार देण्याइतपत ही बाब थांबत नाही तर त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अहवाल गे ला असेल व जिल्हाधिकारी महोदयांनी यांनी , सुनावणी घेयून घेऊन जमीन सरकारजमा केली तरच त्या ठिकाणी शासनाचे नाव लागू शकते.
सध्या स्थित तुमच्या माल्कीला कोण हात लाऊ शकणार नाही अथवा कोणी बाधा अनु शकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sunil Randive
27-10-2020
rsunil12587@gmail.com

नमस्कार सर, आमच्या आजोबांच्या नावे 5 एकर15 गुंठे जमीन होती. नंतर भावहिस्साने माझे वडील व चुलते यांना वाटप करण्यात आले. अर्धी-अर्धी वाटप न करता शेतामध्ये एका झाडाची खूण ठरवून (अंदाजे) पूर्वस चुलते ३एकर१५गुंठे (मोजणी केली तेव्हा भरली) पश्चिमेला माझे वडील २एकर आहे. पण माझ्या वडिलांच्या नावे असणारी जमीन मोजणी केली तर २एकर १०गुंठे भरत आहे. याविषयी मार्गदर्शन करावे. प्रश्न वाढीव १०गुंठ्याचा..
नमस्कार सुनील रणदिवे साहेब
आपले कब्जे वहिवाटीत दहा गुंठे क्षेत्र हे सातबारा वर नमूद क्षेत्रापेक्षा जास्तीचे आहे. मात्र कब्जा प्रमाणे सातबारा ची क्षेत्र दुरुस्त करण्याची तशी तरतूद नाही जोपर्यंत लगतचे शेतकरी यासंबंधी देत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पुणे ग्रामीण भागात 7/12 काढण्यासाठी एकूण किती खर्च येतो? तसेच सामूहिक नोंदणी खर्च आणि एकट्याने नाव नोंदणीच्या खर्चात काही तफावत येते का ?
साहेब माझं प्रशन असा आहे की। जमीन नावाने आहे त्याचा 7/12व स्टॅम्प ड्युटी सगळी होतीये पण गाव सरपंच म्हणतात के ते जागा गावठाणात गेली आहे आणि तुमची जमीन नाहीच हित। ते मला कस घेता येईल मार्ग दर्शन करा।
माझ्या वडिलांचे नावे शेतकरी दाखला आहे, पण ते हयात नाहीत. माझ्या जमिनीची एका खाजगी मालकास विक्री केली आहे. त्यामुळे आता ७/१२ वर ही माझे नाव नाही. *मग मी दुसरीकडे जमीन विकत घेण्यासाठी शेतकरी म्हणून पात्र आहे का?*
रवींद्र भाऊ
आपण शेतकरी दाखला मिळण्यास पात्र नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sunil
24-10-2020
emails.landge@gmail.com

सर, नमस्कार 27 वर्ष पूर्वी आईने जमीन खरेदी केली( रजिस्ट्री आफिस मध्ये जाऊन मूळ मालकासोबत)पण फेरफार वर तीचे नाव नाही कृपया तिचे नाव येण्यासाठी मार्गदर्शन करावे. आई निरक्षर आहे
कृपया दस्त आपले तलाठी महोदयांकडे सादर करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amit
24-10-2020
amitparshurami567@gmail.com

माझ्या आजोबांच्या काळातली खंडकरी जमीन सरकारने दिली आहे .७/१२वर आईचे व मावशीच्या वारसदार यांचे नाव होती . आता ही जमीन सरकारने ताबा मामा लोकं ना दिला आहे . पण आताच्या ७/१२ वर आईचे नाव व मावशी चा वारसदार यांचे नाव नाही.
हक सोड पत्र आईने दिले नाही तरीही नाव का काढली . ही नाव परत लावता येईल का. सांगा
सर माझा प्रश्न असा आहे कि 2009 मधे झालेला आपसी वाटणि पत्रात बहनीचा वाट नाही होता का होता तर ताचा माहितीचा अधिकार कूटून मागवाचा
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलींना हिस्सा हा हिंदू वारसा कायदा 1956 अस्तित्वात आल्यापासून आहे. फरक एवढाच आहे की, वडलोपार्जित मिळकतीमध्ये, 2005 पर्यंत मुलींना स्वतःचा हिस्सा वाटप करून मागता येत नव्हता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3