जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Gajanan garuc
21-10-2020
gajagarud@gmail.com
A महिला तिला Y नावाची मुलगी Y या महिलेला P व Q नावाचे दोन मुले तर
1)Y महिला हयात असताना A या महिलेच्या संपत्तीचे कायदेशीर वारस P व Q हे होऊ शकतात का? वारस हक्क कायद्याप्रमाणे
2)Y या महिलेचे T या व्यक्ती सोबत लग्न झालेले असेल तर अशा वेळी Y ,P, Q हे तीन व्यक्ती A या महिलेच्या कुटुंबाचे सदस्य होऊ शकतात का?
गजानन भाऊ नमस्कार
एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे
1. तिने स्वतःच्या या पैशांतून खरेदी केलेली मिळकत
2. वारसाहक्काने तिला प्राप्त झालेली मिळकत
3. बक्षीस पत्राने त्या व्यक्तीला मिळालेली मिळकत
4. सामायिक मिळकतीचे वाटप झाल्यानंतर अशा व्यक्तीला मिळालेली मिळतात
वडिलोपार्जित मिळकत म्हणजे, चार पिढ्या ची सामायिक मिळकत.
थोडक्यात वडिलोपार्जित मिळकत म्हणजे, खापर पंजोबा ची अविभक्त स्वकष्टार्जित मिळकत.
आपल्या प्रश्न नुसार, Y या महिलेला वारसाने, A या नावाच्या तिच्या आईकडून मिळकत प्राप्त झालेली आहे. उपरोक्त स्वकष्टार्जित मिळकतीच्या व्याख्या दिल्या प्रमाणे, Y या व्यक्तीची तिला मिळालेली मिळकत ही स्वकष्टार्जित मिळकत आहे. त्यामुळे Y हयात असताना तिची दोन मुले P व Q यांना कोणताही अधिकार नाही. तसेच तिचे पती देव T यांनाही कोणताही हक्क नाही. ही
हिंदू वारसा कायदा 1955 च्या कलम 14 अन्वये, हिंदू स्त्रीला मिळालेली मिळकत ही तिची स्वकष्टार्जित मिळकत मानली जाते. या मिळकतीवर ती हयात असताना इतर कोणालाही अधिकार नाही.
मात्र तिच्या पश्चात तिची दोन्ही मुले P वQ तसेच पतीदेव T यांचे नाव तिचे वारस म्हणून हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 15 अन्वये लागणार.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Atul Rautrao
21-10-2020
rautraoatul@gmail.com
सर तहसील कार्यालयातील जुने म्हणजे १९५९ ~ २०२० पर्यंत च्या सातबारा आणि खासारापणी च्या रेकॉर्ड साठी प्रती कॉपी किती खर्च येऊ शकतो.
नमस्कार अतुल साहेब
ज्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षांमधून आपल्याला दस्त/ कागदपत्र हवे आहेत, त्या अभिलेख कक्षाच्या बाहेर, प्रती पृष्ठ/ प्रति सातबारा, नकले साठी शासकीय शुल्क किती आहे याचा तपशील दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. आपण ज्या अभिलेख कक्षात कडे उपरोक्त दस्तांची मागणी केलेली आहे. त्या कक्षाच्या बाहेर जर हे दरपत्रक लावलेले नसेल, तर मेहेरबान तहसीलदार महोदयांना भेटून असे दरपत्रक लावण्या बाबत त्यांना विनंती करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मनोज रघुनाथ ढाणे
20-10-2020
manojrdhane@gmail.com
नमस्कार सर,
मी मनोज रघुनाथ ढाणे
रहिमतपूर, नगर पालिका क्षेत्रातील ता. कोरेगाव येथील सर्वे नंबर 808/7 (14 गुंठे) बद्दल माहिती खालीलप्रमाणे -
1) मूळ मालक व माझे आजोबा नाना महादू ढाणे यांनी सन 1940 ला जमी न मारुती देवस्थान ला गहाण दिली.
2) सन 1943 ला तीच जमीन गहाण न सोडवता वामन बळी कदम यांनी कोणतीही परवानगी न घेता खरेदी घेतली. (फेरफार मध्ये वामन बळी कदम यांना ताबा नाही असा उल्लेख केला आहे)
3) सन 1949 ला तीच जमीन वामन बळी कदम यांनी दादू श्रीपती गायकवाड यांना खरेदी दिली.
4) फेरफार मध्ये सदर झालेले व्यवहार कुळ कायदा कलम 63 अगर 64 नुसार विसंगत असल्याने गायकवाड यांची इतर हक्कमध्ये नोंद झाली.
5) त्यानंतर नाना महादू ढाणे यांचे नाव संरक्षित कुळ कलम 3 अ प्रमाणे इतर हक्कमध्ये नोंद झाले.
6) वामन बळी कदम यांनी 1950 साली गहाण दस्त भरपाई केले.
7) दादू श्रीपती गायकवाड यांचे नाव पुन्हा कबजेदार सदरी लागले.
8) सन1955 साली 2-3 वर्षे कुळे जमीन कसत नसल्याचे कारण नमूद करून तहसीलदार यांनी हुकुमावरून नाना महादू ढाणे यांची संरक्षित कुळाची नोंद कमी केली...
महत्वाचे - सन 1940 पासून आजपर्यंत नाना महादू ढाणे हे त्यांच्या मृत्यूनंतर यांचे वारस सदरची जमीन कसत आहेत, पण 7-12 उतारा गायकवाड यांच्या वारसांच्या नावे निघत आहे.. त्यामुळे ते आता जमिनीचा कब्जा मागत आहेत..
प्रश्न -- 1) सदर जमिनीचे 1943 चे व त्यानंतर झालेले खरेदी दस्त कुळ कायद्यानुसार बेकायदेशीर ठरविता येतील का?
2) मा. तहसीलदार यांना 2-3वर्ष कसत नसल्याचे कारण देऊन 7-12 वरील नोंदी कमी करण्याचा हक्क आहे का?
3) इतक्या वर्षानंतर आत्ता याबाबत न्यायालयामध्ये अथवा इतर अन्य ठिकाणी दावा दाखल करून दाद मागता येईल का?
कृपया आपणांस नम्र विनंती की, सदर बाबतीत योग्य ते मार्गदर्शन मिळावे.
आपला विश्वासू,
मनोज रघुनाथ ढाणे
9011097766
नमस्कार मनोज रघुनाथ ढाणे साहेब,
मूळ मालक व आपले आजोबा/ पूर्वज यांनी ही जमीन जी मारुती देवस्थानाकडे लहान ठेवलेली आहे, ते गहाणखत आपणाकडे आहे काय? गहाण खतातील अटी व शर्ती यावर खालील गोष्टी अवलंबून आहेत.
१. वामन कदम यांना ही जमीन जी गहाण ठेवलेली आहे ती खरेदी करता येईल काय?
२.आपण दिलेल्या घटना क्रमानुसार मारुती देवस्थान कडून वामन बळी कदम यांनी खरेदी केल्याचे नमूद केले आहे. मात्र त्याबाबतची खरेदी किंमत ही काही कालावधीनंतर कदम यांनी मारुती देवस्थान कडे जमा केलेले आहे. त्यामुळे सुरुवातीला केवळ देवस्थान ही जमीन वामन बळी कदम यांना केवळ करमणुकीसाठी दिली होती काय?
३. नाना महादेव ढाणे यांचे नाव संरक्षित कुळ म्हणून दाखल होते? त्यानंतर नाना महादेव ढाणे हे जमीन कसात नसल्यामुळे कलम १४ अन्वये कमी केलेले आहे.
नाव कमी करून तब्बल 70 ते 75 वर्षे झालेले आहेत. त्याच्यानंतर बरेच त्यामध्ये बदल झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 अन्वये यामध्ये सध्यातरी आपल्या हातात काही लागेल हे वाटत नाही.
मात्र 1955 पासून आपले पूर्वज व तदनंतर आपण जमीन कसे आहात व ही बाब श्रीपतराव गायकवाड साहेब यांना अवगत असेल तर, शांततापूर्ण ताबा या तत्त्वाचा आधार घेऊन आपणाला , न्यायालयात आपण मालक झाला आहे अशा प्रकारचे डिक्लेरेशन करून मिळेल का ?याचा वकिलांचा सल्ला घेऊन आपण दावा दाखल करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vivek
20-10-2020
vivekdusane@gmail.com
नमस्कार, माझा एक प्रश्न खालीलप्रमाणे आहेः
मी जमिनीचा तुकडा (3 आर) विकत घेतला आहे. विक्रेत्याने फक्त कधिही रद्द न होनारे कुलमुखत्यार पत्र आनी ताबा साठेखत, केली आहे परंतू, 7/12 वर नाव लगले नाही ... तर ते करिता काय करावे लागेल?
विवेक दुसाने साहेब नमस्कार
एक तर आपण तीन गुंठे क्षेत्राचे ताबा साठेखत व कुलमुखत्यारपत्र आपल्याला लाभात घेतलेले आहे. परंतु या दोन्ही दस्तान मुळे आपणाला मालकीहक्क बिलकुल प्राप्त होत नाही.
त्याच्याशिवाय तीन गुंठे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असल्याने, त्याचे खरेदीखत आता होऊ शकणार नाही. कारण आपल्या खरेदीमुळे तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यान्वये तुकडा पडत आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश
20-10-2020
umeshdangare@gmail.com
महोदय माझ्या आजोबाने घराची काही जागा दुसऱ्या परिवारातील लोकांना (no blood relationship) सहमती ने जाणे -येणे साठी दिली आहे जेव्हा कि यांच्या घराला या व्यतिरिक्त रस्ता आहे, आता समस्या अशी झाली कि त्या परिवारातील दबंग व्यक्तीने स्वतःचा वैयक्तिक रस्ता आहे असे दाखवतो आणि आम्हांला पण त्या जागेच्या पलीकडे असलेल्या जागेवर जाणे धोकाच झाले आहे कृपया मार्गदर्शन करा सर कि ही जमीन मला आता परत मिळवता येईल का?
आपण शेजारच्या व्यक्तीला वहिवाटीची साठी जागा दिली आहे त्यामुळे आता ती परत घेता येणार नाही नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती ही आपणाला रस्ता वापर देणार नाही . तो जर ऐकत नसेल तर आपणाला जर रस्त्याचा वापर शेती या कारणासाठी होत असेल तर आपण मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 अन्वये मेहरबान तहसीलदार साहेब यांच्याकडे दावा दाखल करू शकता. जर रस्त्याचा वापर हा शेती करण्यासाठी नसेल तर आपणाला दिवाणी न्यायालय मध्ये आपण दावा दाखल करू शकतात. त्यामध्ये त्या व्यक्तीने आपणाला वहिवाटीचा रस्ता वापरण्यासाठी प्रतिबंध करू नये म्हणून त्याच्याविरुद्ध मनाईहुकूम मिळवता येईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल अनंत पोवार
20-10-2020
powaramol10@gmail.com
नमस्कार सर,
मी अमोल पोवार कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज चा रहिवासी आहे. मी आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गातील (EWS) प्रमाणपत्र काडू इच्छित आहे. त्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट मध्ये १९६७ पूर्वीचा शेतीचा उतारा किंवा दुसरा पूरावा गरजेचा आहे पण आम्ही महाराष्ट्रामध्ये १९९० पासून राहता पण त्यापूर्वी आम्ही म्हणजे माझे आजोबा व वडील हे कर्नाटकचे रहिवासी होते त्यामुळे जी काही डॉक्युमेंट्स आहेत ती कर्नाटक मधील आहेत.१९९० नंतर माझे वडील कामानिमत्ताने महाराष्ट्र मध्ये आले आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी झालो.आता सर्व काही डॉक्युमेंट्स महाराष्ट्र मधील आहेत तर आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रमाणपत्र काढण्यासाठी मी काय करावे???
Question by Shridhar Dange
20-10-2020
rusopari74@gmail.com
माझी पत्नीकडून तिचा वडिलांचा घराचे तिचा भाऊने ऑक्टोबर2009 साली हक्कसोड करवून घेतले , माझा पत्नीचे वडील 1994 साली वारले आणि आई मे 2009 साली वारली आहे.
1) हक्कसोडपत्र इतक्या घाईघाईत करण्यात आले की त्यात ह्या चूका झाल्यात घर हे 72 चौ. मी. असतांना 90 चौ. मी. टाईप केले आणि आईचे नाव कमी केले नाही.
म्हणून हक्कसोडपत्र हे नवीन दुरुस्ती करून परत करावे लागेल आसे सांगण्यात आले म्हणून 2 महिन्यांनी माझा पत्नीस तिचा भावाने परत बोलावले सह्या करण्यासाठी परंतु माझा पत्नीने नकार दिला आणि सह्या करण्यास गेली नाही.
2) जानेवारी2013 साली सूची2 तयार करण्यात आली ज्यात वरील दोन्ही चुका सूची2 मध्ये आल्यात. मार्च 2013 माझा पत्नीचा भावाने स्टॅम्पवर एफिडेव्हीट वर लिहून दिले की माझी आई यापूर्वीच मयत असून तसेच माझा बहिणींनी हक्कसोड करून दिल्याने त्यांची नावे कमी करावी.
आणि उतारा बनवून घेतला.
3) मागचा महिन्यात सप्टेंबर2020 मध्ये आम्ही सर्वे कागदपत्रे काढली तेव्हा ह्या गोष्टी दिसून आल्यात.
मग प्रश्न असा आहे की हे सर्व कसे घडले चुकीची दुरुस्ती न करता?
आता आम्ही त्याना ct सर्वे ऑफिसात तर ते म्हणतात तेव्हाचा साहेबानी करून दिले.
काही कागदपत्रे रेकॉर्ड नाही पण तरी ते म्हणतात की जे आहे ते बरोबर आहे.
4) कृपया हे चुकलेले हक्कसोड कसे कॅन्सल करता येईल ह्याची प्रोसेस सांगा किंवा काय आणि कसे करता येईल?
Question by Charudatta khadtare
19-10-2020
charudatt2@gmail.com
तडजोड हुकुमनाम्याने वाटणी झाली आहे. 41 आर, 15 आर असे 6 ,6 हिस्से आहेत. कोर्ट आदेश आहे की सात बारा वेगळे करुन घेणे. माझा प्रश्न - सातबारा वेगळे होतिल का ??
Question by मनोज रघुनाथ ढाणे
19-10-2020
manojrdhane@gmail.com
नमस्कार सर,
मी मनोज रघुनाथ ढाणे
रहिमतपूर, नगर पालिका क्षेत्रातील ता. कोरेगाव येथील सर्वे नंबर 808/7 (14 गुंठे) बद्दल माहिती खालीलप्रमाणे -
1) मूळ मालक व माझे आजोबा नाना महादू ढाणे यांनी सन 1940 ला जमी न मारुती देवस्थान ला गहाण दिली.
2) सन 1943 ला तीच जमीन गहाण न सोडवता वामन बळी कदम यांनी कोणतीही परवानगी न घेता खरेदी घेतली. (फेरफार मध्ये वामन बळी कदम यांना ताबा नाही असा उल्लेख केला आहे)
3) सन 1949 ला तीच जमीन वामन बळी कदम यांनी दादू श्रीपती गायकवाड यांना खरेदी दिली.
4) फेरफार मध्ये सदर झालेले व्यवहार कुळ कायदा कलम 63 अगर 64 नुसार विसंगत असल्याने गायकवाड यांची इतर हक्कमध्ये नोंद झाली.
5) त्यानंतर नाना महादू ढाणे यांचे नाव संरक्षित कुळ कलम 3 अ प्रमाणे इतर हक्कमध्ये नोंद झाले.
6) वामन बळी कदम यांनी 1950 साली गहाण दस्त भरपाई केले.
7) दादू श्रीपती गायकवाड यांचे नाव पुन्हा कबजेदार सदरी लागले.
8) सन1955 साली 2-3 वर्षे कुळे जमीन कसत नसल्याचे कारण नमूद करून तहसीलदार यांनी हुकुमावरून नाना महादू ढाणे यांची संरक्षित कुळाची नोंद कमी केली...
महत्वाचे - सन 1940 पासून आजपर्यंत नाना महादू ढाणे हे त्यांच्या मृत्यूनंतर यांचे वारस सदरची जमीन कसत आहेत, पण 7-12 उतारा गायकवाड यांच्या वारसांच्या नावे निघत आहे.. त्यामुळे ते आता जमिनीचा कब्जा मागत आहेत..
प्रश्न -- 1) सदर जमिनीचे 1943 चे व त्यानंतर झालेले खरेदी दस्त कुळ कायद्यानुसार बेकायदेशीर ठरविता येतील का?
2) मा. तहसीलदार यांना 2-3वर्ष कसत नसल्याचे कारण देऊन 7-12 वरील नोंदी कमी करण्याचा हक्क आहे का?
3) इतक्या वर्षानंतर आत्ता याबाबत न्यायालयामध्ये अथवा इतर अन्य ठिकाणी दावा दाखल करून दाद मागता येईल का?
कृपया आपणांस नम्र विनंती की, सदर बाबतीत योग्य ते मार्गदर्शन मिळावे.
आपला विश्वासू,
मनोज रघुनाथ ढाणे
9011097766
आपले आजोबा उपरोक्त मिळकतीचे कुळ असताना देवस्थानला जमीन गहाण ठेवली होती का? या प्रश्नातील मालक हे कदम आहेत काय? गहाण सोडवण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. आपले आजोबा हे कृषक दिनी म्हणजे 1.4. 57 रोजी ला कुळ म्हणून त्यांचे नाव सातबाराला दाखल होते काय? जर आपल्या आजोबांना चे नाव कृषक दिनापूर्वी कमी केले असेल तर त्याबाबत सध्या इतक्या विलंबाने अपील करता येणार नाही.
अशी परिस्थिती असतानाही त्यानंतर मिळकत आपण कसत असताना व त्याचा ताबा आपल्याकडे असताना आपले नाव किंवा आपल्या वडिलांचे नाव किंवा आजोबांचे नाव मिळकती ला कुल म्हणून नाव लावण्याबाबत काही प्रयत्न केले का? आपण आता ही महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 70 ब व अन्वये आपण तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल करू शकता आणि त्यांना विनंती करा की कलम चार प्रमाणे आम्हाला मानीव कुल म्हणून जाहीत करा . अथवा त्याकाळी आपले आजोबा जे सौरक्षित किंवा कायम कुल होते असे जाहीर म्हणून जाहीर करा .
आपणाकडे दुसरा पर्यायही असू शकतो इतकी वर्ष झालं जमीन मालकाला माहिती असूनही त्या जमिनीवर ती आपला ताबा आहे आहे तर दिवाणी न्यायालयात आपण प्रतिकूल ताबा या तत्त्वाच्या आधारे आपणाला मालक म्हणून घोषित करण्याबाबत दावा दाखल करण्याचा विचार करू शकता. वकील असतील त्यांचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Chandrayog
19-10-2020
chandrayogspiritual@gmail.com
आ. साहेब,
आमची वडिलोपार्जित घराची जागा महाराष्ट्रातील एका ग्रामपंचायत हद्दीत येते. पूर्वी तेथे घर होते, आता नाही. आता फक्त पडीक जमीन आहे. 2012 पूर्वी आम्ही त्या जागेचा उतारा घेऊन कर भरत होतो. परंतु नमुना नं. 8 ला ग्रामपंचायतीने सर्व गावातील जागांच्या नोंदी शिसपेंसीलने केलेल्या होत्या, त्यास एका व्यक्तीने आक्षेप घेऊन अर्जफाटे केले. परिनामी ग्रामपंचायतीने सर्वांना नोटीस देऊन सांगितले की तुमचे अतिक्रमण आहे, नसल्यास आवश्यक ते पुरावे सादर करून नमुना 8 ला ग्रामसेवक यांचेकडून पक्की (पेन ने) नोंद करून घ्यावी. सदर नोटीस नंतर आम्ही आमच्या चार जागांसाठी 1945 पूर्वीचे वेगवेगळे 4 खरेदीखत पुरावे म्हणून दिले. त्यापैकी 3 जागांची पेन ने पक्की नोंद नमुना 8 ला झाली. आता उरलेल्या 1 जागेची नमुना 8 ला नोंद करण्यास पुढीप्रमाणे अडचण येत आहे, ती अशी की...
माझे वडील विधानसभा मतदारसंघ पातळीवर राजकारणात सक्रिय आहेत, ग्रामपंचायत स्तरावर नाहीत. तरीसुद्धा एका ग्रामपंचायत सदस्याने राजकीय राग मनात धरून उपरोक्त जागेची पक्की नोंद करण्यास हरकत घेतली. त्याने म्हटले की ही जागा जर यांच्या नावावर नोंदली तर दोन गल्ल्यांमध्ये जाण्यायेण्यास जागा उरत नाही, तर आम्ही तेथे रस्त्यासाठी जागा सोडून पक्की नोंद करावी. आता त्या दोन गल्यांमध्ये जाण्यायेण्यासाठी 2 ठिकाणी टेम्पो जाईल इतकी जागा आहे. शिवाय आम्ही सदर जागेसाठी 2 खरेदीखत पुरावे म्हणून सादर केले आहेत, त्यांपैकी 1 ले ख.ख. आमचे आजोबा यांनी व काळे काका ज्यांच्याकडून आजोबांनी जागा विकत घेतली यांच्यातील व्यवहाराचे आहे आणि 2 रे ख.ख. काळे काकांनी पाटील काकांच्या वडिलांकडून ती जागा खरेदी केली होती तिचे आहे. दोन्ही खरेदीखतांमध्ये तेथे रस्ता किंवा गावठाणाची जागा असल्याचे नमूद नाही. माझा प्रश्न असा आहे की, जर 2 ही गळ्यांमध्ये येण्याजाण्यासाठी 2 ठिकाणी रस्ते आहेत आणि आम्ही जे 2 खरेदीखत सादर केले त्यातही उपरोक्त जागेच्या चातुर्सिमेत ग्रामपंचायत ज्या ठिकाणी रस्ता सोडणेस सांगत आहे त्या ठिकाणी रस्ता किंवा गावठाण ची जागा आहे अशी कुठेही नोंद नाही; तरी ग्रामपंचायत आधीच 2 रस्ते असताना आमच्यकडे रस्त्यासाठी जागा सोडण्याची मागणी करू शकते का ? जर उत्तर नाही असेल तर, 2012 पासून आजपावेतो वेळोवेळी अर्ज, पुरावे तसेच प्रतिज्ञापत्र देऊनही ग्रामपंचायत सदर जागेची खरेदी खाताप्रमाने नमुना 8 ला पेनाने पक्की नोंद करत नसेल तर काय करावे लागेल? आपण योग्य मार्गदर्शन कराल असा पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद.
स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जर एखाद्या दस्ताची ग्रामपंचायत स्तरावरील अभिलेखा मध्ये त्याची नोंद घेतली जात नसेल तर नोंद का घेतली नाही याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांच्या कडून लेखी उत्तर घ्या . व त्या उत्तरांच्या आधारे आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील करा.
आपल्या आजोबांनी जागा विकत घेताना जो दस्त केला त्याच्या मध्ये जरी रस्त्यांचा उल्लेख नसला तरी आज प्रत्यक्ष त्या जागेवर ती रस्ते असतील तर त्याबाबत आपल्याला ते ठेवावे लागतील. आणि आपण ते रस्ते नाकारू नाही शकत. आणि रस्ते सोडण्याची आपली जर तयारी असेल आणि त्या उपयोगीही जर ते पेन्सिल नोंदी चे रूपांतर पक्क्या नोंदीमध्ये करत नसतील तर प्रथम परिषदांमध्ये मी नमूद केल्याप्रमाणे आपण पंचायत समितीकडे अपील करा .
स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जर एखाद्या दस्ताची ग्रामपंचायत स्तरावरील अभिलेखा मध्ये त्याची नोंद घेतली जात नसेल तर नोंद का घेतली नाही याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांच्या कडून लेखी उत्तर घ्या . व त्या उत्तरांच्या आधारे आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील करा.
आपल्या आजोबांनी जागा विकत घेताना जो दस्त केला त्याच्या मध्ये जरी रस्त्यांचा उल्लेख नसला तरी आज प्रत्यक्ष त्या जागेवर ती रस्ते असतील तर त्याबाबत आपल्याला ते ठेवावे लागतील. आणि आपण ते रस्ते नाकारू नाही शकत. आणि रस्ते सोडण्याची आपली जर तयारी असेल आणि त्या उपयोगीही जर ते पेन्सिल नोंदी चे रूपांतर पक्क्या नोंदीमध्ये करत नसतील तर प्रथम परिषदांमध्ये मी नमूद केल्याप्रमाणे आपण पंचायत समितीकडे अपील करा .
स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जर एखाद्या दस्ताची ग्रामपंचायत स्तरावरील अभिलेखा मध्ये त्याची नोंद घेतली जात नसेल तर नोंद का घेतली नाही याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांच्या कडून लेखी उत्तर घ्या . व त्या उत्तरांच्या आधारे आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील करा.
आपल्या आजोबांनी जागा विकत घेताना जो दस्त केला त्याच्या मध्ये जरी रस्त्यांचा उल्लेख नसला तरी आज प्रत्यक्ष त्या जागेवर ती रस्ते असतील तर त्याबाबत आपल्याला ते ठेवावे लागतील. आणि आपण ते रस्ते नाकारू नाही शकत. आणि रस्ते सोडण्याची आपली जर तयारी असेल आणि त्या उपयोगीही जर ते पेन्सिल नोंदी चे रूपांतर पक्क्या नोंदीमध्ये करत नसतील तर प्रथम परिषदांमध्ये मी नमूद केल्याप्रमाणे आपण पंचायत समितीकडे अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मनोज यादव
19-10-2020
manojyadav181@gmail.com
आम्ही माझ्या आईच्या नावे गावात जमीन विकत घेतली आहे, सदरच्या जमिनीच्या 7/12 वर भोगवटदार वर्ग 1 असा उल्लेख आहे, 1968 पासूनचे फेरफार काढले तर त्यावर 'खालसा' असा उल्लेख आहे, खरेदी नंतर तलाठी यांनी नोंद घातली नाही रद्द केली व सांगितले जमीन महार वतनाची आहे तहसीलदार पण तेच म्हणतात, आम्ही प्रांतअधिकारी यांचेकडे अपील केले आहे, कोरोना मुळे त्याचे कोर्ट अजूनही (ऑक्टोबर 19, 2020) रोजी सुद्धा चालू नाही झाले , अपील pending आहे, तेवढ्यात मागच्या 8 दिवसात त्या फेरफार वर तलाठी यांनी जमीन भोगवटदार वर्ग 1 चे वर्ग 2 करण्याची नोंद केली आहे, त्यास आम्ही हरकत घेतली आहे, तहसीलदार म्हणतात 1950 पासून चे फेरफार काढा, पण वकील म्हंटले कायदा सांगतो जमीन खरेदी करताना जास्तीत जास्त 30 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड बघितले जाते, सदरची जमीन खरेदी करता येते का ?
या सर्वांवर काय करावे..
वर्ग -1 स्वरूपाच्या जमिनीचे वर्ग-2 स्वरूपाच्या जमिनीमध्ये रूपांतर करताना तहसीलदार यांनी आपणाला नोटीस देणे आवश्यक आहे. नोटीस दिल्यानंतर आपले याबाबत काय म्हणणे आहे याचा विचार करून याबाबत स्वतंत्र आदेश काढणे आवश्यक आहे. आदेश काढल्यानंतर जमिनीच्या धारणा प्रकार आहे त्याचे रूपांतर वर्ग-1 मधून वर्ग-2 मध्ये त्यांना करता येईल. तहसीलदार यांच्या या कृतीबद्दल आपण प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा. आपणाला जुने १९५० पासून सातबारा काढण्याची आवश्यकता लागणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेश मिसाळ
18-10-2020
maheshmisal5@gmail.com
आम्ही आळंदी येथे दोन गुंठे जागा विकत घेतली आहे, ७/१२ उतारा वर नाव नोंद केली आहे, परंतु आम्हाला असे कळले की सिटी सर्वेत नावे नोंदणी करावी लागतात तर ते कुठे व कशी करावी जागा जानेवारीत घेतली आहे ७/१२ नोंदणी मार्चमध्ये झाला आहे.
Question by सचिन गावडे
16-10-2020
sachingawade948@gmail.com
नमस्कार सर आमच्या इथे पुरातन काळापासून खंडोबाचे मंदिर आहे. पण मंदिर हे एक शेतकर्यांच्या शेता मध्ये आहे. बरेच दिवसा पासुन मंदिराची आजुबाजुला जमीन पडीक होती . पण ती जमीन शेतकऱ्यांने वहित केली आहे. आणि आता तो मंदिरासाठी जमीन देत नाही . मंदिराची उतार्यावर नोंद आहे . आता मंदिरासाठी जमीन मिळण्यासाठी काय करावे लागेल आणि किती गुंठे जमीन मिळु शकते
मंदिरा मध्ये जाण्यासाठी जो रस्ता असेल तो रस्ता हा वहिवाटीचा रस्ता आहे तेवढी जागा त्या शेतकऱ्याला देणे क्रमप्राप्त आहे. याच्या पेक्षा जास्त जागा त्याच्याकडून मागता येणार नाही कारण जागेचा सातबारा त्या शेतकऱ्याचा नावावर आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rushikesh Joshi
16-10-2020
rrjoshi227@gmail.com
Sir mazha prashn asa aahe ki jar kabaja sathekhat zhal ahe pan ajun kharidi khat zhal nahi tar jya mansacha navavar Jamin karayachi ahe tyach nav 7/12 utaryala lagu shakat ka ?
Ani lagal tari kontya kaydyani lagu shakat ?
मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार कब्जा साठेखत याला कोणतेही पुराव्याचे महत्त्व नाही. त्यामुळे कब्जा साठेखताच्या आधारे व्यक्तीचे नाव सातबाराला लागणार नाही. त्यासाठी आपणाला त्याचे खरेदीखत पूर्ण करावे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prasad Patil
15-10-2020
patilprasad1234567@gmail.com
आमच्या तीन भावांमध्ये वाटण्या झाल्या असून, प्रत्येकी १/३ क्षेत्र आहे. आमच्या हिश्शामध्ये आम्ही स्वखर्चाने विहीर पाडली आहे. इतर भावांनी त्यावर भविष्यात हक्क दाखवू नये म्हणून काय करता येईल? हक्क दाखवणार नाही असे भाऊ लिहून देणार नाहीत. विहीरीची नोंद गटावर केली आहे पण त्यात विहीर कोणाची असा स्पष्ट उल्लेख येत नाही.
वाटपा प्रमाणे प्रत्येकाच्या हिस्स्याला जे क्षेत्र आले असेल त्या क्षेत्राला जर प्रत्येकाची स्वतंत्रपणे नावे लागून स्वतंत्र सातबारा झाले असतील तर इतरांनी त्या विहिरी वरती हक्क दाखवण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rushikesh Joshi
14-10-2020
rrjoshi227@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की जर आपण जमीन खरिदी करताना आधी कबजा साठेखट केलं आणि जमीन खरिदि करायला अजुन १ वर्ष बाकी आहे . तर नुसत्या कबजा साठेखतामुल आपलं नाव 7/12 वर लागू शकत का? किवा जर वेव हार पूर्ण झाला नाही तर जमीन खरीदि करणाऱ्या माणसाचं नावावर होऊ शकती का ?
कब्जे साठे खताला मालमत्ता हस्तांतरण कायदा खालील कोणतेही पुरावा म्हणून महत्त्व नाही. त्यासाठी आपणाला त्या जागेचे अथवा मिळकतीचे नोंदणीकृत दस्त करावा लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by समिर लोणारी
13-10-2020
sameer.lonari2012@gmail.com
प्रश्नः-आमची जमिनीची मोजणी केल्यानंतर वहिवाट जास्त दाखवत आहे व सातबारा वर कमी क्षेत्र दाखवत आहे.तर याबाबतची माहिती कुठे व कशी मिळेल याबद्दल मार्गदर्शन करावे..
याचा अर्थ आपण जादाच्या क्षेत्रावरती वहिवाट करीत आहात. ज्या ्या कोणत्या शेजार्याची ती जागा असेल तेथी वहिवाट आपण बंद करावी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत आत्माराम जाधव
13-10-2020
prashantj2289@gmail.com
नमस्कार सर,
प्रकरण : १९८६ साली एका अकृषक जमिनीतील ११ गुंठे पैकी ३. ५५ गुंठे (चाळी तिल व्यक्ती राहतात ) जागा साठेकरारा अंतर्गत खरेदी करण्यात आली होती. या खरेदीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकार या तक्त्यात झाली. मात्र मूळ जमीन मालकाने कोणतीही नोटीस न बजावता परस्पर संपूर्ण ११ गुंठे जमिनीचा ७/१२ एका बिल्डर च्या नावावर २०१६ साली केला. सदर झालेल्या खरेदीचा नवीन फेरफार काढला असता त्यात ७/१२ च्या इतर अधिकार या तक्त्यातील व्यक्तींचीनावे कुठेच नाही .
प्रश्न : साठे कराराने आम्ही ३. ५५ गुंठे जमिनीचे मालक होऊ शकत नाही का ? जमीन नावावर करण्यासाठी प्रक्रिया काय ?
साठे करार दि. : १९८६
बिल्डरने खरेदी केलेला दि. : ०२/०७/२०१६
फेरफार नोंद निर्गतीचा दि . :१८/१०/२०१९
मालमत्ता हस्तांतरण कायदा खाली साठे कराराला कोणतेही पुराव्याचे महत्त्व नाही. आता प्रश्न उरतो की आपण साठे करार मूळ मालकाची केला होता परंतु कराराची पूर्तता न करता त्याने जमीन परस्पर त्रयस्थ व्यक्तीला म्हणजे बिल्डरला हस्तांतरित केलेली आहे. आपण त्याला कायदेशीर नोटीस देऊन आपण जी रक्कम त्याला दिली होती व्याजासह त्याच्याकडून मागा अथवा आपण न्यायालयात जाऊन साडे तीन गुंठे जागा परत मागू शकता किंवा त्या बाबतीत नुकसान भरपाईची रक्कम मागू शकता.
जर त्या त्रयस्थ व्यक्तीने ही चाळीची जागा जर खरेदी करताना त्याचा टायटल सर्च व पेपर मध्ये जर जाहीर नोटीस दिली असेल उपरोक्त जागा ते खरेदी करत आहेत आणि त्या बाबतीत कोणाची काही हरकत असल्यास त्यांच्या वकिलाकडे सादर करावी. अशा प्रकारची नोटीस दिली असेल तर त्रयस्थ व्यक्ती खरेखुरे खरीददार होतात व आपणाला ती जमीन परत मिळू शकत नाही. मात्र जे काही आपलं नुकसान झालेला आहे त्याची रक्कम व्याजासह आपण मूळ मालकाकडून मागू शकता. याबाबतीत आपणाला आपल्या तेथील वकिलांचा सल्ला घेणे हे योग्य राहील.
मी अशा व्यक्त करतो कि आपण जो साठे करार केलेला आहे तो नोंदणीकृत आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजिंक्य भिसे
13-10-2020
ajinkyabhise7@gmail.com
आदरणीय महोदय...
माझ्या आजोबांची मयत मे २०२० मध्ये झाली..माझ्या चुलत्याने आजोबांचे मृत्यपत्र परस्पर बनवून घेतले.. तसेच सदरील मृत्युपत्र २०१९ साली केले असून ते सप्टेंबर २०२० मध्ये उघडकीस आले. सदरील जमीन वडिलोपार्जित आहे...म्हणजे माझ्या पणजोबा कडून आजोबा ना आली.. तर या मृत्युपत्र च्या आधारे सात बारा ला नाव लागू शकते का...? कृपया मार्गदर्शन करावे..मला पुढे काय करावं लागेल...
जमीन जरी वडिलोपार्जित असली तरीही जर ती आजोबांच्या नावावर झाली असेल तर ती त्यांची स्वकष्टार्जित मिळकत होते. त्यामुळे तिचे हस्तांतरण कशा पद्धतीने करावे यावर त्यांना पूर्ण अधिकार आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन आकुलवार
12-10-2020
sachin.yuvashakti@gmail.com
नगरपरिषद हद्दी मध्ये ,अवैध लेआऊट विक्री सुरू आहे,82 आर जमीन मध्ये 2 आर 2 करून 20 लोकांनां विक्री करून देत आहेत.अशी विक्री होऊ शकते का?नगरपरिषद ची परवानगी घेत नाही आहेत तर नगरपरिषद काय कारवाही करू शकते मार्गदर्शन करा.
नगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा याच्या तरतुदी लागू नाहीत. त्यामुळे अशी 2- 2 गुंठ्याची विक्री ते करू शक्तातात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sushilkumar
11-10-2020
sushilkumar_ofaj@rediffmail.com
नमस्कार सर, मी 2014 साली माझ्या नावाने खरेदी खत करून बिल्डर कडून निवासी प्लाट खरेदी केला . व नियमानुसार 7/12 माझ्या नावे करुन घेतला.
प्रश्न असा की, मला आता या प्लाट च्या 7/12 वर पत्नी चे नाव सामाईक रीत्या लावून घेणे आहे. करीता काय करावे लागेल .
आपण जो निवासी प्लॉट घेतलेला आहे हे त्यामध्ये आपल्या पत्नीचे नाव समाविष्ट करावयाची असल्यास आपण पत्नीच्या नावे अर्धा हिस्सा दान करू शकता. मिळकतीचे स्वरूप निवासी असल्याने त्यासाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क केवळ २००/- ( दोनशे रुपये) आहे. आपण दानपत्र मुद्रांकित करून नोंदणी करून घ्या. त्याआधारे आपल्या पत्नीचे नाव आपण खरेदी केलेल्या निवासी प्लॉटमध्ये समाविष्ट करता येईल .
( कायदेशीर आधार - अनुच्छेद 34 अनुसूची 1- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 )
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप शिंदे
07-10-2020
vardshinde@gmail.com
फक्त अर्जा वरून फेरफार नोंद होते का ?
जर रंगू यांचा दगडू यांच्याशी कोणताही करार दस्त नसताना फक्त रंगू ने तलाठी याना असा वर्दी जबाब दिला की मी व दगडू हे निमोनिम वहिवाट करीत आहोत तशी कागदी दुरुस्ती व्हावि तर फेरफार नोंद होते काय ?जर आशा फेरफार नोंदी पूर्वी झल्या असतीलव त्याचा अमल सातबारा ला झाला तर मूळ मालकास आशा नोंद दुरुस्ती करून घेता येतील का व अशा नोंदी दुरुस्ती करून देण्याचं अधिकार कोणास आहे
अर्जावरून नोंद होत नाही . आपण त्या नोंदिविरुद्ध प्रांताधिकारी यांचे कडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Harshal dongare
06-10-2020
Dongare.harshal@gmail.com
सर आमच्या शेती लगत फ़ॉरेस्ट चीं ज़मीन लगवाडी योग्य ज़मीन आहे तर ती ज़मीन नावावर करुण लगवाड करु शकतो का
Question by yakub mukthar shaikh
06-10-2020
weeklyshevgaonnagari@gmail.com
सर आम्हाला 2004 ला भूमिहीन शेतमजूर म्हणून जमीन मिळाली होती तर आम्हाला हस्तलिखित उतारा दिला पण सधार जमीन ही मूळ मालक का सीलिंग ची जमीन होती तहसीलदार साहेबांनी आदेशानुसार जमीन दिली आहे पण ज्या मूळ मालक यांनी न्यायालयात दावा दाखल केला आणि न्यायालया न तो आदेश रद्द करून ती जमीन सरकार जमा केली आहे आणि फेर आणि उतारा आमच्या नावाने मिळत आहे परंतु फेर हा मंजूर केला नाही तरी आम्हाला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
माननीय न्यायालयाच्या जर आपणास वाटप करण्यात आलेली जमीन शासन जमा करण्यात आलेली असेल, तर आपणाला शासनाकडे दुसरी शेतजमीन मिळण्याबाबत ची विनंती करावी लागेल. अन्यथा ज्या न्यायालयाचे आदेशाने जमीन शासन जमा करण्याचा आदेश दिलेला आहे तो निर्णय आपण त्याच्या वरिष्ठ न्यायालयात अह्वणीत करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री.मुकेश विजय माळी
06-10-2020
malimukesh293@gmail.com
म. सर नमस्कार
आमची नावे नजरचुकीने वारस ७/१२ वर सुटलेले आहे. सदर नोंद २०११ मधे फेरफार नोंद मंजूर झालेली आहे. १) तरि आम्हाला नजरचुकीने सुटलेले वारस ७/१२ वर लावायची आहे त्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती. तसेच गट अ, ब व क आहेत.
२) तसेच आजतगायत वरिल प्रमाणे अ गट विकला गेलेला आहे. शिल्लक ब व क आहे. तरि अ या विकल्या गेलेल्या गट नंबर पण नजरचुकीने सुटलेले वारस नोंद लागेल का याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
काही वारसांची नावे जर लावायची शिल्लक असतील तर तो मूळ फेरफार आपण प्रांत अधिकार्याकडे अपील करा व रद्द करून व तहसीलदार यांना नव्याने वारस तपास करून सर्व वारसांची नावे लावण्याबाबत आदेश देण्याबाबत विनंती करा.
प्रश्न उरतो की जी जमीन आपण विकलेली आहे त्याला वारस लावता येतील का?
खरं तर जमीन ज्यावेळेस विकली त्यावेळेस या बाबीचा विचार करणं आवश्यक होतं. जर जमीन घेणाऱ्याने टायटल सर्च व वर्तमानपत्रात खरेदीबाबत ची जाहीर नोटीस दिलेली असेल तर त्याबाबत आता काही करता येणार नाही.
ज्या वारसांनी जमीन विकली त्यांनी त्यांनी अश्या शिल्लक वारसांना ज्यांचे नाव ७/१२ ला दाखल न्हवते त्यांना त्यांच्या हिस्स्याच्या प्रमाणात खरेदी किंमत देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
