जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Gaurav Jadhav
05-10-2020
gj7588912125@gmail.com

जर आपले स्व मालकीचे घर वडिलोपार्जित जमीनीत असेल आणि जमिनीचे इतर हीस्सॆदार घरावर हक्क दाखवत असतील तर घराचा ताबा कसा घ्यावा
जे घर आपण बांधले आहे , त्याचा सर्व खर्च आपण किंवा आपले वडिलांनीच फक्त केला आहे का ? असल्यास आपणास सरस निरस वाटप करतांना हे न्यायालयास दाखवून द्यावे लागेल कि सामायिक जागेवर जे घर बांधले आहे ते आपल्या खर्चाने बांधले आहे हि सिद्ध करून द्यावे लागेल . तसेच न्यायालयाने घराची जागा आपल्या हिस्स्याला द्यावी असा आदेश करणे हि आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikram
05-10-2020
vikramcool15@gmail.com

मा सर ,
सदर आमची जमीन हि "अ" या मालकाकडून १९७० साली कुळकायद्याने "ब" या माणसाकडे हस्तांतरित झाली कायद्याने त्याचा ३२ग हा झाला आहे .त्या नंतर "ब" या मालकाने त्याची जमीन आम्हाला विकली. त्याचे खरेदीखत हे आमच्या वडलांच्या नावे झालेले आहे. सदर जमीन हि आम्ही वर्ष २००५ पर्यंत कसत होतो. २००५ मध्ये मूळमालक "अ" यांनी हा व्यवहार गैर पद्धतीने झाला आहे असे तहसीलदार यांना निदर्शनास आणून दिले.म्हणजेच सदर व्यवहार हा कलम. ४३ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता झाला आहे असे निदर्शनास आणून दिले.(कुळ कायदा कलम 43 शर्त शेरा ). सदर जमिनीचे सर्व हक्क , ७/१२ , खरेदीखत हे आमच्या नावे आहे . सदर केस हि high court मध्ये चालू होती . त्यामध्ये वकिलालनकडून कोणताही पाठपुरावा झाला नाही . त्यामुळे high court मधून हि केस परत तहसीलदार यांच्याकडे नियमित करण्यासाठी आली असता त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे सदर जमीन हि २००८ साली सरकार जमा झाली आहे. आता हि जमीन आम्ही ५०% नजराणा भरून घ्यावयास तयार आहे तरी त्या साठी काय तरतूद आहे हे कळावे. तसेच हि जमीन "ब" या माणसाला मिळू शकते का .. तसेच जर ५० % नजराणा भरून हि जमीन आमच्या नावे होत असेल तर आम्ही परत हि जमीन दुसऱ्या शेतकर्र्याला विकू शकतो का .. कळावे...
नमस्कार सर
वर्ग दोनची जमीन आहे 10 एकर माझ्या वडिलांच्या सावत्र 4 आत्या होत्या त्याची नावे इतर हक्कात लागली आहेत व सर्व आत्या आता मयत झालेल्या आहे त्यांची मुले ही आता मयत झालेली आहे तसेच त्यांची वारस कुठे आहेत काहीच माहिती नाही या 4 आत्याची नावे 7/12 कमी करण्यासाठी काय करावे लागेल इतरहक्कातील आहेत धन्यवाद सर
आदरणीय सर ,
आमच्या आईच्या नावे जमीन आहे. व तो खरेदी करण्यापुर्वी असं आहे की जमीन एकूण क्षेत्र २४०चौ.मी. / पुर्व पश्चिम १७मीटर, दक्षिणोत्तर १५मीटर होता , यापैकी आम्हास१२०चौ.मी. पश्चिमेकडील हध्द पुर्व पश्चिम ८मीटर, पश्चिमोत्तर १५मीटर येणेप्रमाणे बिनशेति खरेदी करुन दीला होता वर्ष२००० साल त्यानंतर
तेव्हडा चतु:सीमा परत तीच जागा दुसरा व्यक्तीला पुन्हा खरेदी करून देण्यात आली वर्ष२०१२ ला तर या जागेवर दुसरा खरेदीकेलेली व्यक्ती कब्जा करुनआहे, या प्रकरणात कोणावर कार्रवाई करने? जागेचा मालक हक्क कोणास प्राप्त होतो ? व पुढे काय करायचे ते कृपया मार्गदर्शन करा .
सर, माझ्या आईचा जन्म झाल्या नंतर माझ्या आजोबांचा साधारण १९५० ह्या वर्षात मृत्यू झाला आणि आजीने त्यानंतर दुसरा विवाह केला. परंतु आजोबांच्या मृत्यू नंतर त्यांच्या जमीन संपत्तीमध्ये आईला वारसदार न करता आजोबांच्या भावांनी ७/१२ मध्ये आईला वगळून त्यांची नावे लावली आहेत सद्यस्थितीत माझी आई सुध्दा मृत्यू पावली असून मी त्यांचा एकमेव मुलगा आहे अशावेळी मी माझ्या आईला वारस म्हणून आजोबांच्या जमिनीत हिस्सा मागू शकतो का? कायदेशीर बाबी सह मार्गदर्शन करावे

Question by तेजस
01-10-2020
tejas6699@gmail.com

खरेदी खत आजीच्या नावे आहे (1994 सालचे )(1गुंठा) परंतु मालकाने 7/12 वर नोंदच होऊ दिली नाही खरेदी खत कायदेशीर संरक्षण देईल का..???

Question by Sandip Hole
01-10-2020
sandiphole@gmail.com

नमस्कार ,
माझ्या वडिलांनी २ शेजमिनीचे तुकडे विकत घेतले होते , यापैकी जमीन १ (१२ गुंठे ) जमीन २ (२० गुंठे ) खरेदीखत अनुक्रमे १९८० आणि १९९६ साली झाले आहेत. दोन्हि खरेदी दस्त हे नोंदणीकृत महसूल भरून केलेले आहेत. परंतु काही कारणास्तव दोनही जमिनी च्या ७/१२ वर नोंद झाली नाही. वडिलांनी काही वर्ष्यापुर्वी अर्जही केले पण पाठपुरावा नाही केला. दोनही शेतजमिनीची वहिवाट व ताबा वडिलांकडेच आहे. ७/१२ वर ज्यांकडून खरेदी घेतली त्य्नाच्या मृत्यू नंतर वर्षांची नावे लागलीत. वरील दस्तानुसार वडलीलांची नाव ७/१२ ला येणासाठी काय करावे लागेल ?

धन्यवाद
संदीप
गेल्या १० वर्षांपासून माझी शेतजमीन पिकाखाली नव्हती त्यामुळे माझ्या शेतातून गावच्या गायरानकडे लोक जनावरे चारण्यासाठी व शेतीसाठी जात होते पण सध्या मी यावर्षी मी सदर शेती जमीनीवर पिक घेतले आहे आणि जनावरे व शेतकरी यांना येण्या जाण्यासाठी छोटी वाट ठेवली आहे परंतु ग्रामपंचायत व्यक्तीदोषातून सदर पाणंदवर आम्ही अतिक्रमण केल्याची तक्रार तहसीलदार यांचे कडे केली आहे, पण ग्रामपंचायत च्या दप्तरी सदर पाणंदीची नोंद असल्याची कोणतीही प्रकारची कागदपत्रे नाहीत, कृपया मार्गदर्शन करावे.

Question by Sanket Sutar
29-09-2020
mantramugdha73@gmail.com

महोदय सदरच्या राहत्या जागेवर आम्ही मागील ३५ वर्षांपासून पक्क्या घरात राहत आहोत. मागील ३५ वर्ष पासून घरपट्टी सुद्धा भारत आहोत. ह्या घराची जमीन माझ्या काकांच्या मुलांच्या नावे आहे. आता जागेच्या अभावी आम्ही आहे त्या घरावर एक मजला वाढवितो आहे तर काकांची मुले त्यास नकार देत आहेत. कि तुम्ही ह्या घरात काही बांधकाम करू शकत नाही. तर आम्ही काय करावे. कृपया सहकार्य करावे.
सर आम्हाला 2004 ला भूमिहीन शेतमजूर म्हणून जमीन मिळाली होती तर आम्हाला हस्तलिखित उतारा दिला पण सधार जमीन ही मूळ मालक का सीलिंग ची जमीन होती तहसीलदार साहेबांनी आदेशानुसार जमीन दिली आहे पण ज्या मूळ मालक यांनी न्यायालयात दावा दाखल केला आणि न्यायालया न तो आदेश रद्द करून ती जमीन सरकार जमा केली आहे आणि फेर आणि उतारा आमच्या नावाने मिळत आहे परंतु फेर हा मंजूर केला नाही तरी आम्हाला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

Question by Anil Dhavale
29-09-2020
anildhavale@gmail.com

सर, माझा प्रश्न गटवारी संबंधित असून पुणे जिल्हह्यातील काही गावांमध्ये गटवारी झालेली नाही. या गावामध्ये जमिन मिळकतींना सर्वे नंबर आहेत म्हणून येथील जमिन विक्रीला तुकडेबंदीचा कायदा लागू होत नाही का ?
नमस्कार सर माझे आजोबा इसवी सन 1952 पूर्वी पासून जमीन कसत होते. खासरा पत्रकात इतर हक्कात (कुळ काबीज आहे. वही ती करीत आहे) अशी नोंद आहे. इसवी सन 1977 पर्यंत इतर हक्कात संरक्षित कुळाचे नाव होते. त्यानंतर ते कमी करण्यात आले. नाव कमी कशाच्या आधारे केले आहे. याची काही नोंद असलेले (तहसील कार्यालय) कुळाचा घोषवारा, इत्यादी कागदपत्रे गहाळ आहेत. तरी कागदपत्र मिळवण्यासाठी काय करावे. याविषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आपण ७/१२ वरती काही क्रमांक कंसात किंवा वर्तुळात लिहले आहेत ते क्रमांक फेरफार क्रमांक आहेत . ते फेरफार आतापर्यंत ७/१२ सदरी जे मालकीहक्क बद्दल झाले आहेत , त्याचा इतिहास आहे . आहे फेरफार आपण तलाठी व तहसील कार्यालय येथेऊन प्राप्त करा . त्यावरून आपणास आपल्या आजोबांचे नाव कसे कमी झाले याची माहिती मिळेल .
कुल वहिवाट कायद्याच्या कलम ३२ अन्वये कृषक दिनी म्हणजे ०१.०४.१९५७ रोजी , कुल याने जमीन खरेदी केली असे मानले जाते . त्यामुळे आपल्या आजोबांचे नाव कायद्याने कमी होऊ शकत नाही . या बाबत जुने फेरफार काढून , ज्या फेर्फाराने अथवा आदेशाने आपले आजोबांचे नाव कमी झाले आहे त्या विरुद्ध अपील दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गावठाण मधील घराची जागा रस्ता रुंदीकरण मध्ये जात आहे नुकसान भरपाई दावा कसा करावा
रस्ता रुंदीकरण ग्रामपंचायत मार्फत होत असेल तर , आपण गटविकास अधिकार यांचेकडे , ग्रामपंच्यात यांचेकडे हरकत दाखल करा .
जर रस्ता रुंदीकरण अन्य विभागामार्फत होत असेल तर , त्या विभाचे संपादन करणाऱ्या भू संपादन अधिकारी यांचेकडे हरकत दाखल करा .
आपणाला या बाबत काही नोटीस आली आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझे आजोबा इसवी सन 1952 पूर्वीपासून जमीन कसत होते. खासरा पत्रकात काबीज कूळ म्हणून उल्लेख आहे, वहीत करत आहे अशी नोंद आहे. ई.सन 1977 पर्यंतचा इतर हक्कात संरक्षित कुळ नाव होते. त्यानंतर ते कमी करण्यात आले. परंतु 1977 च्या 7/12 वर नाव कमी करण्यात आले आहे व त्यावर फेर न. असा उल्लेख आहे परंतू फेर क्रंमाक नाही.. नाव कमी कशाच्या आधारे करण्यात आले याचीही नोंद असलेले तहसील कार्यालयातील... संबंधित प्रकरणातील कोण कोणती कागदपत्रे काढावीत याचे कृपया मार्गदर्शन करावे... आणि काही कारणास्तव तहसिल कार्यालयात कागद पत्रे उपलब्ध नसतील तर ते कुठे मिळतील .. आणि कुळा संबंधित कोणकोणते कागदपत्रे उपयोगी पडतील... कृपया मार्गदर्शन करावे ही आपणास ... नम्र विनंती

Question by Rasika
27-09-2020
rasikamhatre0303@gmail.com

सुर्वे नंबर 35/1अ उतारा कुठे milel
sir ,mala kontihi takrar karaychi nasun ; mala maza eka shankech uttar pahije aahe ki, ekhada vyakti ekhadi jamin swatah anek varsh kasto aahe tyat pik gheto aahe pn jaminichya malakani ti jamin padik thevleli pn aaj aamhi jr tyanchya jaminit utpadan ghet asu tr ti jamin nakki konachya malkichi vhayla pahije? hi takrar nasun ek shanta aahe
Adverse Possession या न्याय तत्वाचा आधार घेऊन आपण ही मिळकत आपल्या ताब्यात असल्यामुळे, तिचे मालक म्हणून घोषित करणेबाबत दिवाणी न्यायालय The Specific Relief Act खाली दावा दाखल करू शकता. मात्र यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होत असणे आवश्यक आहे.
जमिनीचा सतत व विना अडथला ताबा
जमीन मालकासोबत कोणताही करार नसताना , जमिनीचा ताबा असणे किंवा जमीन कसणे
जमिनीचा ताबा हा सर्वांना दिसणारा , खुला असणे .
जमिनीवर प्रत्यक्ष ताबा असणे , उदा जमीन कसणे , त्यावर सुधारणा करणे , घर बांधणे
केवळ एकट्याचाच ताबा असणे , अन्य कोणाचा नसणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ganesh Mapari
25-09-2020
ganeshmapari23@gmail.com

मी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी खुर्द गावातील रहिवाशी आहे. योगायोगाने आमची शेतजमीन गावाच्या शिवे वरती आहे. सदर च्या शिवे वर आमच्या शेजारी गावाचा रहिवाश्यांच्या क्षेत्र आहे आणि आमच्या दोघांच्या मधून अनेक पिढ्यापासून शिव रस्ता आहे. परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी तो रस्ता खोदून बंद केला. त्यांना विचारले असता ते अरेरावीची उत्तरे देत आहेत. बोलतात की शिव रस्ता वैगेरे असे काही आमच्या सातबारा वर नोंद नाही. कोणाला सांगायचे ते सांगा. ह्यामुळे आमचे आमच्या शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच ह्याच रोड चा वापर पुढे काही वस्त्या पण करत होत्या, त्यांचा पण जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मी वर अजून काही लोकांनी राहाता तेहसिल कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे, परंतु हे सगळे होई पर्यंत आमचा रस्ता बंद राहील, सध्या आमचे खरिफ पिके सोंगणी सुरू करायची आहे, त्यास अता व्यत्यय येणार आहेत. आम्ही भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन सादर शिव रस्त्याचे दस्तावेज मागण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की आमच्याकडे रस्त्यांचे नकाशे नसतात. तरी कृपया या प्रकराबाबत योग्य तो सल्ला द्यावा व गाव शिव रस्त्या चे नोंदी वा नकाशे कुठे मिळतील याबद्दल मार्गदर्शन करावे.
गणेशराव
चिंता नसावी . आपण आपले तहसीलदार महोदय यांचेकडे माम्लेतदार कोर्ट कायद्याखाली अर्ज करा . त्यांना आपली निकड पटवून द्या . तात्पुरता हुकुम देण्याचा कायद्यात तरतूद आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी ब्रह्मानंद कुलकर्णी मु.पो.परचंडा येथील असुन माझ्या शेती मधुन रोड गेलेला आहे आता त्या रोडचे रुंदीकरण झाले आहे त्यानंतर त्या रोडवर अनधिकृत अतिक्रमण करुन दुकाने उभी राहीली आहेत ती दुकाने हटविण्यासाठी मला काय करावे लागेल ??
रस्ता ज्या विभागाचा आहे त्या विभ्गास तक्रार दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नगर परिषद हदितील ग्रीन झोन मधील शेत जमीन कलम ४२/ड मधून अकृशक होते का ? होत असल्यास अर्ज कोणाला सादर करावा , कसा करावा या संबंधी माहिती द्यावी हीच विनंती
पराते साहेब
४२ ड ची तरतुदीनुसार , गावठाणा पासून २०० म च्या आतील सर्व मिळकती त्या जमिनीच्या मालकाच्या इच्चेनुसार बिन शेती झाल्याचे मानीव तरतूद आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,

आमच्या घराची 'अ' व 'ब' घरपट्टी केलेली होती त्यापैकी 'अ ' घरपट्टी भरत नसल्याने मुले 2012 नगरपंचायत झाल्यावर ती रद्द झालेली आहे.. तर ती मला पुन्हा सुरू करायची आहे त्यासाठी काय काय करावे लागेल याची माहिती द्यावी.. 'अ' घरपट्टीचा केवळ चहूतरा बांधलेला आहे...

Question by Jadhav subham
23-09-2020
Jadhavsubham@gmail.com

सर, वर्ग 2 च्या जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?

Question by Nitin dhum
23-09-2020
Nitindhum@gmail.com

सर मी आदिवासी खातेदार आहे, मी रजिस्टर दस्ताने जमीन खरेदी केली आहे पण तलाठी सांगतात इतर हक्कात 1966 चे 36 व 36 ला अधीन अशी नोंद टाकावी लागेल, पण माझी स्वतःची मिळकत आहे तर इतर हक्कात नोंद का? आणि मला तोंडीं सांगतात नोंद करण्याची काही पद्धत असेल तर plz सांगा आणि नोंद झाली तर मला जमीन विकता येणार नाही
नितीनराव , हि तरतूद कायद्यानुसार ठेवायचीच आहे . त्याला पर्याय नाही . ती आपल्या फायद्यासाठी आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sanjay koli
23-09-2020
sanjaypkoli1996@gmail.com

कोर्टात अपील चालू असताना बांधकाम करत असतील तर याबाबत कोणाकडे तक्रार करावी.
करत असलेल्या बांधकामास त्याने परवानगी घेतली असेल तर केवळ हि बाब आपण न्यायालायचे निदर्शनास अनु शकता . न्यायालय प्रकरण गुणवत्तेच्या आधारे मनाई हुकुम देऊ शकेल . परवानगी नसेल तर , नियोजन प्राधिकारी यांचे कडे तक्रार करा
नियोजन प्राधिकर -

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Wakf property( shet jamin) var varas nond karta yete ka ?
तहसीलदार यांच्या कडून वारस नोंदणी ची प्रकिया कशी करावी या बद्दल माहिती पाहिजे
वारस तपास व नोंदणी हे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फ्फात होते . तक्रार झाली तरच , प्रकरण तहसीलदार यांचेकडे जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.75 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3