जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by आकाश शरद अंबावले
07-04-2018
akashambawale1999@gmail.com
नमस्कार सर,
सन 2000 मध्ये शासकीय गुरचरण जमिनीची मागणी माझे वैयक्तिक वापरासाठी जिल्हाधिकारी साहेबाकडे केलेली होती. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे (7/12 ,फेरफार,गटबुक नकाशा ,ग्रामपंचयत ना हरकत दाखला, इत्यदी )जमा केलेली आहेत.आजरोजीपर्यंत या संदर्भातील माझ्या मागणीला उत्तर देण्यात आले नाही. तसेच सदरील जमिनीची ग्रामपंचयत माध्यमातून “विस्तारित गावठाण योजना” होण्यासाठी मागणी केली होती. तरी
प्रश्न 1) शासकीय गुरचरण जमिनीची मागणी केली असता प्रकरण किती दिवसामध्ये निकाली निघणे अपेक्षीत आहे ?
प्रश्न 2) या प्रकरणामध्ये मला आज रोजी ही जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
यासंदर्भातील माहिती मिळावी ही विनंती.
गुरुचरण जागा , वैक्तिक कारणासाठी शासनाकडून दिली जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
06-04-2018
rohidaskale19@gmail.com
माननिय मोहदय,
माझी ३७ गुंठे सध्या "जिरायत" शेत जमीन आहे. पुढे मला त्या जमिनी मध्ये कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करून विविध प्रकारची फळ झाडे व फुल शेती करायची आहे. तर माझे असे प्रश्न आहेत :
१) शेत जमिनीचे ''जिरायत " असलेले क्षेत्र हे ''बागायत" मध्ये बदलता येते का?
२) तसे करण्यासाठी अधिकार कोणाला आहेत व त्याची काय कार्य पद्धत आहे.? व
३) पुढे ती शेती कायम स्वरूपी "बागायत" म्हणूनच राहील का?
रोहिदास हरिभाऊ काळे
७/१२ च्या , नमुना १२ मध्ये , घेण्यात आलेल्या पिंकाचा तपशील नमूद असतो . घेण्यात आलेल्या पिकाप्रमाणे व सिंचन तपशिलाप्रमाणे जमीन जिरायत आहे कि बागायत आहे हे निश्चित करण्यात येते
जिरायत जागेस १२ महिने शाश्वत पाणी पुरवठा असेल व ऊस , फळ पिके घेतली तर ती जमीन , बागायत समजण्यात येते
असे रूपांतर करणेसाठी कोणाची परवानगी लागत नाही
आपण जर कायम पाणी पुरवठा ठेवला व फुल शेती केली तर ती जमीन , बागायतच राहील मात्र आपण पाणी पुरवठा खंडित केला तर निश्चितच , फुल शेती येणार नाही . आपणाला पीक दुसरे , म्हणजे कमी पाण्यावर येणारे घ्यावे लागेल .
जमिनीचा प्रकार म्हणजे , बागायत , जिरायत , हि कश्या प्रकारे ठेवायची हे आपल्यावर अवलंबून आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain shaikh
03-04-2018
kaunainshaikh1@gmail.com
Navin avibhajya shart ,, bhogwatdar 2 la juni shart karun bhogwatdar 1 karta yeto ka
Question by अमित शिर्के
01-04-2018
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पाणबुडे सर
माझे आजोबा शिवराम तात्या शिर्के यांचा जन्म 1922 मध्ये झाला आहे.
माझे पणजोबा यांचे मित्र बापु खामगळ यांना मुले बाळे नसल्यामुळे माझ्या आजोबांना माझ्या पणजोबांनी त्यांना दिले व त्यांनी त्यांचे नाव संभु असे ठेवले.
त्यांच्यात दत्तक पत्र वगैरे काही झाले नाही.
पुढे बापु खामगळ हे मयत झाल्याने त्यांच्या नावावरील ५ एकर जमीन ही संभु बापु खामगळ यांचे नावे म्हणजे माझ्या आजोबांच्या नावे लागली गेली.
नंतर पुन्हा माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना त्यांच्या घरी आणले व पुढे ते शिवराम तात्या शिर्के याच नावाने आजपर्यंत आहेत.
आज माझ्या आजोबांचे वय 95 च्या दरम्यान आहे आणि त्यांनी मला ही सर्व माहिती दिली आहे.
मी सन 1900 पासूनचे सर्व अभिलेख तहसील कार्यालयात स्वतः RTI खाली तपासले आहेत.
त्यामध्ये मला असे आढळून आले की, माझ्या आजोबांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही.
आजोबांचे दत्तक वडील बापु खामगळ यांची मृत्यूची नोंद उपलब्ध नाही.
फक्त सन 1930 पासून संभु बापु खामगळ यांचे नावाचा ७-१२ उतारा आजपर्यंतचा निघत आहे. त्यावरती जमीन कसणाराचे नाव संभु असेच आजपर्यंत निघत आहे.
परंतु प्रत्यक्षात मात्र माझ्या आजोबांनी ती जमीन कधीच वहिवाटली नाही.
ती जमीन अनेक वर्षांपासून पडीत जमीन आहे.
माझे वडील आणि चुलते यांना आजोबांनी कधीच माहिती दिलेली नव्हती, आणि आज त्यांनी मला हे सर्व सांगितले आहे.
तरी मला आपणाकडून अशी माहिती हवी आहे की,
वरील दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल.
ती जमीन माझे आजोबांचे नावे होण्यासाठी मला काय करावे लागेल.
आपण मला सल्ला द्यावा अशी विनंती मी आपणाकडे करत आहे.
सिद्ध करण्याची काय गरज आहे . आपण ज्या जमिनीचा उल्लेख करत आहेत , ती जमीन सध्या कोणाच्या ताब्यात आहे ?
ती जमिनीस सध्या कोणाचे नाव आहे ?
जर त्या जमिनीस आता दुसऱ्याचे नाव असेल व त्रयस्त व्यक्ती जमीन कस्त असेल तर , आता काही करता येणार नाही , म्हणजे आपण जरी हे सिद्ध केले कि शंभू शिर्के व संभू खंगत ह्या एकाच व्यक्ती आहेत तरी सुद्धा , आपणास जमीन परत मिलणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahdev Dnyanoba Ipper
01-04-2018
ippermd11@gmail.com
अंतरविभागिय बदली झालेल्या ना पुर्वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असल्यास पून्हा परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नसल्याबाबतीत चे पत्र अथवा GR असेल तर क्रुपया पोस्ट करावा
Madhav ipper talathi pauni dist. bhandara
Question by हरिभाऊ काशीद
31-03-2018
harishk4141@gmail.com
नमस्कार सर, माझ्या वडिलांच्या नावे वारसाहक्काची १ एकर शेतजमीन होती ती शेतजमीन २००१ साली गावातीलच एका व्यक्तीने माझ्या वडिलांची फसवणूक करून विकत घेतली आहे. मी OBC कुटुंबातला आहे जमीन विकताना मी व माझी भावंडे लहान होतो त्यामुळे या गोष्टीची काहीही समज नव्हती, हि शेतजमीन माझ्या वडिलांनी विकल्यामुळे आम्ही भूमिहीन झालो आहोत. अशा प्रकारे कुणाला भूमिहीन करता येते का व या बाबत मी कुठे न्याय मागू शकतो का. कृपया माहिती मिळावी हि विनंती
वडिलांनी जमीन विकली २००१ मध्ये . या घटनेला १७ वर्षे झाले त्यामुळे फसवणूक करून जमीन खरेदी केली आहे , या कारणासाठी फौजदारी तक्रार न्यायायलायात दाखल करून , विक्री दस्त रद्द करून मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हरिभाऊ काशीद
31-03-2018
harishk4141@gmail.com
१) ग्रामपंचायत मिळकतीच्या चतु:सीमेच्या एका दिशेस गावकोस आहे व त्या मिळकतीवर जर बांधकाम करावयाचे असेल तर गावकोसापासून किती अंतर सोडून बांधकाम करणे कायद्याने बंधनकारक आहे, गावकोस पाडण्याचा किंवा गावकोसाला बरोबर खेटून बांधकाम करण्याचा अधिकार संबंधीत व्यक्तीला आहे का ?,गावकोस पाडून किंवा गावकोसाला बरोबर खेटून बांधकाम करणे जर बेकायदेशीर असेल व संबंधीत व्यक्ती जर अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम करत असेल तर असे अनधिकृत/बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याचे अधिकार हे कुणाला असतात ,त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कार्यवाही करता येते. अशा प्रकारे झालेल्या बांधकामाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी होते का
२) ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रम केलेले असेल व त्या अतिक्रमणामुळे जर इतर मिळकतीस जाणे-येणेचा रस्ता पुर्ण पणे बंद होत असेल तर ते अतिक्रम काढण्याचे/हटविण्याचे अधिकार हे कुणाला असतात ? जर संबंधीत व्यक्ती केलेले अतिक्रम काढत नसेल व त्या जागेवर ती व्यक्ती स्वतःचा अधिकार दाखवत असेल तर त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कार्यवाही करता येते.
३) ग्रामपंचायतीच्या मासिक/इतर सभेत झालेला ठराव ग्रामसेवकाने किती दिवसाच्या आत Proceedings Register ला नोंदविणे कायदेशीर बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक/इतर सभेत झालेला ठराव क्रमांक बदलण्याचे अधिकार ग्रामसेवकाला / सरपंचाला असतात का. जर असे बदल करणे, Proceedings Register वेळेवर न नोंदविणे चुकीचे असेल तर त्या वर कोणती कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.
४) ग्रामपंचायत मिळकती संदर्भात मिळकतीच्या मालकाने तालुका न्यायालयात दावा दाखल केला होता व निर्णय मिळकत मालकाच्या बाजुने मिळाला , नंतर ज्या व्यक्तीच्या विरोधात दावा दाखल केला होता त्या व्यक्तीने जिल्हा न्यालयात दावा दाखल केला होता, जिल्हा न्यायालयाचा निर्णय हि मिळकत मालकाच्या बाजुने मिळाला आहे तर ग्रामपंचायतीत ठराव नोंदविताना कोणत्या न्यायालयाचा निर्णय ग्राह्य धरला जातो व ग्रामपंचायत ठरावामध्ये कोणत्या न्यायालयाच्या निर्णयानुसार व निर्णय क्रमांक नुसार नोंद करणे अपेक्षित आहे .
५) ग्रामपंचायत गावठाणातील बखळजागा एका व्यक्तीने खरेदी केली आहे व ती जागा खरेदी करताना खरेदीखतात मोज मापाची जी नोंद आहे ती खरेदीखतानुसार ग्रामपंचायत दप्तरी नोंदविली आहे परंतु ग्रामपंचायतीचे जुने सर्व रेकॉर्ड तपासले असता त्यात मोजमापाची कुठलीही नोंद आढळून येत नाही. त्या चुकीच्या मोजमापामुळे इतर मिळकतीस जाण्या-येण्याचा वहिवाटी रस्ता बंद होत आहे. या बाबत कोणती व कोणाकडून कार्यवाही करता येईल .
वरील गोष्टींची माहिती मिळावी हि नम्र विनंती .
Question by Meena Desai
31-03-2018
minty_1112@rediffmail.com
नमस्कार सर माझ्या आजी ने आपल्या जमा केलेल्या पैशातून माझ्या नावे 10 एकर जमीन खरेदी केली.आजी च्या अशिक्षितपणामुळे तिला माझे योग्य वय ठाउक नव्हते व वयाला 18 वर्ष पूर्ण होण्यास १वर्ष ८ महिने बाकी असताना सदर जमिन खरेदी खत व रजिस्टर्ड दस्तवेजाने माझ्या नावावर झाली.या गोष्टीला २५ वर्ष झाली. आता माझ्या लगतच्या जमिन मालकाशी जमिनीच्या क्षेत्रावरुन कोर्ट केस चालू आहे तरी सज्ञान नसताना जमिन खरेदी केली या गोष्टीचा कोर्ट केसच्या निकालावर काही परिणाम होईल का?
ज्यावेळी मिळकत आपले नाव मिळकतीस दाखल झाले त्यावेळी आजीचे नाव नाव अज्ञान पालन करता ( अ.पा.क) म्हणून दाखल करण्यात आले होते का ?
भारतीय करार कायद्यानुसार , अज्ञान हा करार करण्यास सक्षम नाही . त्यामुळे असा करार अवैध आहे . खरेदी खात हे विक्रेता व खरेदी घेणार यांचे मधील करार आहे .
खरेदी खतावर आजीचे नावाचा उलेख आहे ? आजीने तिची विक्री रक्कम त्यावेळीस दिली होती, असा काही पुरावा आहे का ? आजीने धनादेशाद्वारे रक्कम दिली असल्यास अडचण येण्याचे काही कारण नाही . तसेच रोखीने रक्कम दिली असल्यास , पावती असेल तरीही अडचण येण्याचे काही कारण नाही . न्यायायलायत सिद्ध करावे लागेल , जमिनीस जरी तुमचे नाव लागले असले तरी , रक्कम आजीने दिली आहे आजीने अज्ञान नातवाकरता जमीन घेतली आहे .
या घटनेस २५ वर्षे झाली आहेत , मुदतीच्या कायद्याच्या हि उपयोग करून घेता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
30-03-2018
rohidaskale19@gmail.com
श्री. किरण पानबुडे साहेब,
साहेब आपणास वयक्तिक भेटून सदर संपादित जमिनी बाबत सर्व फेरफार, कागद, उतारे, नकाशा व अहवाल पाहून आपण मार्गदर्शन करण्यास वेळ देऊ शकत असल्यास कृपया कळवावे.
आपण आपल्या कामाच्या व्यापातून हि सेवा करत आहात त्याबद्दल आपले नम्र आभार.
रोहिदास काळे
+९१-७६६६६८४६८५
Question by रोहिदास सखाराम पाबळे
27-03-2018
rohidaspable@yahoo.in
जिल्हाधिकारी यांनी भूमिहीनांना वाटप केलेल्या जमिनीना वन खात्याने विक्री करण्यास बंदी घातली आहे परंतु सादर जमिनी ह्या १९०२ साली महसूल खात्याकडे हस्तांतरित झाल्या बाबतची नोंद वनखात्याकडे आहे तरी हि वन खाते अश्या जमिनींना विक्रीस परवानगी देत नाही त्या साठी काय करावे लागेल
Question by विजयानंद देशमुख
27-03-2018
deshmukh.vijayanand@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे कि जर , एखादी व्यक्ती ६ वर्षांपूर्वी मयत झालेली असेल आणि त्यांच्या शेतजमिनी ला कोणीही वारस म्हणून नाव लावले नसेल तर, आणि ६ वर्षांनंतर एखाद्या व्यक्तीने मयत व्यक्तीशी असलेले नाते पुरावे सादर करून सर्व शेतजमिनी ला नाव लावून घेतले तर ते योग्य आहे का ?कारण ६ वर्षांमध्ये कोणीच नाव लावत नसेल तर जमीन सुरक्षित करून घेण्यासाठी नाव लावणे योग्य कि अयीग्य ?
Question by रोहित मेघावांशी
26-03-2018
akashp222@gmail.com
नमस्कार सर,
आम्ही एक किरायदार ठेवून 18 वर्षे झाले आहेत आमच्या चांगल्या संबधातील असल्यामुळे आम्ही त्याला इतके वर्षे राहू दिले पण आता तो भाडेवाढ करत नाही आणि घर खाली कर म्हणाल तर मला जेव्हा दुसरी जागा भेटेल तेव्हा करील म्हणतो आम्ही त्याच्या कडून 11 महिन्याचा 100 रस चा बॉंड नोटरी करून घेतला आहे त्याला कस काढव आणि तो कब्जा काही करू शकतो का सगळे डोकमेण्ट आहेत आमच्या कडे घराचे व मीटर व घर पट्टी नळ पट्टी माझ्या नावे असून मीच स्वत: जाऊन भरतो. कृपया सोयीस्कर मार्ग सुचवावा
Question by किरण मराठे
26-03-2018
kiranbmarathe@gmail.com
माझी तालुका बदली होऊन ३ महिने झालेत पण माझे सेवा पुस्तक जुन्या तालुक्याने अजून नवीन तालुक्यास सुपूर्द केलेले नाही. नवीन तालुक्यातील अधिकारी सेवा पुस्तकासाठी माझ्याकडे तगादा लावत आहेत तर जुन्या तालुक्यातील अधिकारी सेवा पुस्तक माझ्या स्वाधीन करण्यास नकार देत आहेत. त्या संबधी माझे काही प्रश्न आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक नवीन कार्यालयास सुपूर्द करण्याची कार्यपद्धती काय आहे? जुन्या कार्यालयाने किती दिवसात सेवा पुस्तक नवीन कार्यालयास सुपूर्द करायचे असते? बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकाच्या हस्तांतरणात काय भूमिका असते, तो स्वतः जुन्या कार्यालयास सेवा पुस्तकाची मागणी करू शकतो का? जर सेवा पुस्तक बदली झालेल्या कर्मचाऱ्याच्या स्वाधीन केले जाऊ शकत नाही तर एका तालुक्यातून/जिल्ह्यातून दुसऱ्या तालुक्यात/जिल्ह्यात सेवा पुस्तक हस्तांतर कसे होते, ते जर पोस्टाने केले जात असेल तर सेवा पुस्तक गहाळ झाल्यास कोण जबाबदार असते?
कृपया मार्गदर्शन करावे.
Question by Avinash Rasam
26-03-2018
Avinashrasm522@gmail.com
सर,माझे आजोबांनी सन 1935 मध्ये जमीन वाटप दावा जावला होता.त्याचा निवाडा सन 1949 मध्ये लागुन प्रत्यक्ष ताबे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सन 1950 मध्ये आला.त्यानंतर ताबे देणेची कार्यवाही सन 1954 मध्ये सुरु झाली.सर्व पक्षकारानी पैसे भरले. 75 टक्के लोकानी ताबे घेतले.12.50 टक्के लोकांनी वाटपास लेखी सहमती दिली.उर्वरीत 12.50 टक्के लोकानी वाटपास हरकत जिल्हाधिकारी यांचे कडे घेतली.त्याच्या हरकती केस चालवुन जिल्हाधिकारी यांनी फेटाळुन लावल्या.त्यावर त्यानी मा.लोकायुक्ता मुबई यांचे कडे सन 1958 मध्ये अपिल केले.हे अपिल त्यानी वकिला करवी चालवल्यानंतर लोकायुक्ता यानी हे अपिल1958मध्ये फेटाळत मा.जिल्हाधिकारी यानी केलेले वाटप कायम केले.यानतंर विराधकानी कुठेही अपील केलेले नाही.त्यांनतर ताबे घेतलेल्यानी आपली नावे 7 .12 सदरी लावुन घेतली.त्याच्या वहिवाटी सुरू झाल्या.असे असताना. काही पक्षकारानी पुन्हा वाटप मान्या नसले बाबत जिल्हाधिकारी यांचे कडे सन 1964मध्ये तक्रारी केल्यामात्र या तक्रारीत मा.लोकायुक्त यांचे कडे झालेल्या अपिलाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही.असे असताना 1964 मध्ये जिल्हाधिकारी विरोधी पक्षकाराच्या तक्रारी अर्जावर जिल्हाधिकारी करीता यांनी आम्हाला नोटीसी न करता फेर वाटपाचा शेरा केला.याची कल्पना माझे आजोबा यांना समजल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करत व मा. आयुक्त यांचे कडे चाललेल्या अपिलाची कल्पना दिलेवर जिल्हाध्किारी यांनी माझे आजोबाना तुम्हाला दिलेले ताबे अबाधित असुन फेर वाटप करणे झाल्यास किरकोळ फेर बदल केले जातील असे कळविले. त्यानतंरही आम्हाला रितसर ताबे दिले आहेत.काही ताबे दिवानी कोर्टाने उत्पनासह आम्हाला दिले आहेत.आम्ही आमच्या जमीणीत लागवडी सुधारणा केल्या आहेत. गेली चाळीस वर्षे आमच्या वहीवाटी विनाकटकट सुरू असतानाच चाळीस वर्षानी सन 1990 मध्ये तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी याच्या सन 1964 च्या फेर वाटपाचा आधार घेत आम्ही घेतलेले ताबे रदद करणेच्या आम्हाला नोटीसी दिल्या..या वाटपात एकुण 50 पक्षकार असताना फक्ता 5 जणाना नोटीसी बजावत तहसिलदार यानी केस चालवली.व आम्हाला दिलेले ताबे रदद केले. यावर आम्ही प्रांताधिकारी यांचे कडे अपिल केले.त्यांनी अपिल मान्या करत प्रकरण फेर चौकशी व उचित निर्णयाकरिता तहसिलदार यांचे कडे पाठविले .यावर विरोधी पार्टीने जिल्हाधकिारी यांचेकडे अपिल केले.त्यानी अपिल फेटाळत जुने झालेले वाटप कायम केले.यावर विराधी पार्टीने हायकोर्टात मध्ये सन 1994 मध्ये रिट दाखल केली.हायकोर्ट यांनी जितहसिलदार याना फेर वाटप करता येईल का अशी विचारणा केली आहे.याच दरम्यान सन 2005 मध्ये दिवाणी न्यायालयाने मुळ दरखास्ता मुबंई हायकोर्ट रुलिग A.I.R.2001 bombay 303 .21.3.2001 अन्नासाहेब नगाणे वि.राजाराम नगाणे या अन्वये निकाली काढली आहे.या बाबत माझे प्रश्ना असे..55 वर्षापुर्वी दिलेले ताबे एवढया प्रदिर्घ कालावधीनंतर रदद करता येतात का. 2. आयुक्ता यानी कायम केलेले वाटप त्याची परवाणगी नसताना जिल्हाधिकारी अगर तहसिलदार याना रदद करता येते का. 3.वाटपात 50 पक्षकार असताना फक्ता 6 जणानी नोटीस देवून तहसिलदार यांनी चालविलेली केस रदद केलेले वाटप योग्या कि अयोग्या 4 लोकायुक्त याचे 1958 च्या निवाडयाची वैध्यता किती.
Question by Sandeep Yadav
24-03-2018
sysandeepyadavy.1995@gmail.com
सर ,
सध्या online ७/१२ उतारा मिळतो (काही app) आहे . माझा प्रश्न आसा होता कि जेव्हा मी या app मध्ये माझ्या आजोबांचे नाव सर्च करतो तर ते शिवा सहादु यादव . असे येते कि मुळात सातबारावर शिवराम सहादु असे नाव आहे तर हे असे असल्यामुळे भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही का . आणि जर ऑनलाईन ७/१२ ची दुरुस्ती करायची असेल तर ती कशी करता येऊ शकते.
धन्यवाद ,
संदीप यादव
हे नाव दुरुस्त करता येईल . आपले तलाठी यांचेकडे संपर्क साधा .
ज्या गावात जमीन आहे , ते गावाचे ३ नम्बरचे declaration झाले नसेल तर , re edit या utilitychya माध्यमातून दुरुस्ती करता येते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अविनाश आहेर
23-03-2018
avinashaher7505@gmail.com
जर मूळ जागा मालकाने एका व्यक्तीशी रजिस्टर साठेखत सम्पूर्ण जागेचा(५५ गुंठे ) करार केला आहे .आणि त्या साठेखत कराराच्या आधारे त्याने दुसऱ्यास नोटरी करारच्या आधारे त्यातील काही जागा (२ गुंठे ) विकली आहे परंतु साठेखत धारक मालकाने त्याचे साठेखत रद्द करून संपूर्ण जागा (५५ गुंठे ) मूळ मालक व तिसरा यांच्यात व्यवहार घडवून नोटरी करार धारकाची २ गुंठे जागा कब्जा करून फसवणूक केली आहे तर नोटरी धारकास जागेचा ताबा मिळू शकतो का ?
साठे खताचे आधारे , मालकी प्राप्त होत नाही अथवा मालकी हस्तांतरण होत नाही .त्यामुळे वरील प्रश्नातील , २ गुंठे जागा खरेदी करणाऱ्यास , कोणतीही मालकी प्राप्त झालेली नाही .
साठे खत जर नोंदणीकृत असेल तर , ते नोंदणीकृत दस्ताद्वारेच व दोघांचे संमतीनेच रद्द करता येऊ शकते . एकतर्फी साठेखत रद्द करता येत नाही .
नोटरीधारक ज्याच्याकडून त्याने जमीन घेतली आहे त्या विरद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो मात्र त्यातून त्यास २ गुंठे जाडा मिळणार नाही मात्र खरेदी पोटी दिलेली रक्कम मिळू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित Jagtap
22-03-2018
spj100@rediffmail.com
शेतजमीन मोजणी करत असताना लगतचे शेतकरी अडथळा आणत असतील तर मोजणी कशी पूर्ण करता येईल?अतिक्रमण निघाल्यास कसे हटवता येईल? मोजणी साठी पोलीस बंदोबस्त मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
शेतकरी मोजणीस अडथळा आणत असतील तर , आपले मागणीप्रमाणे , पोलीस सौरक्षण मिळू शकेल . अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाल्यास आपण , The Speccific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
22-03-2018
abhijitkadam55@ gmail.com
महोदय,
माझ्या गावामधे पाटबंधारे विभागाच्या् कालव्याच्या भुसंंपादनाचं काम २००८ साली पुर्ण होऊन कालवा खुदाईचं काम २०१२ ला पुर्ण झाले व प्रत्यक्ष कालव्यात पाणी २०१४ साली आले.दरवर्षी पाणी आवर्तनावेळी मा.जिल्हाधिकारी कालवा परीसरात कलम १४४ लागु करतात याचा अर्थ कालव्याचा मालकी शासनाकडे आहे हे सिद्ध होते.माञ काही तांञिक अडचणींमुळे भुसंपादनाचे प्रस्ताव व्यपगत झाले असल्यामुळे नुकसान भरपाई प्रलंबित आहे.परंतु आता मा.जिल्हाधिकारी यांनी नवीन भुसंपादन कायद्यान्वये वैयक्तिक वाटाघाटीतुन भुसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार कलम ११ ची अधिसुचना नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.त्यामुळे भुसंपादनाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सदरच्या रकमेवर पुर्वलक्षी प्रभावाने भुमी संपादन २०१३ कलम ८०नुसार सण २०१२ ते २०१८ पर्यंत सदर मोबदला व्याजासहित मागु शकतो का किंवा मी त्यास पाञ आहे का? याबाबत संविस्तर मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती....
कलम ८० खाली जाहीर निवाडा रकमेचेया प्रथम वर्षासाठी ९ % तर पुढी वर्षासाठी १५ % दराने व्याज देण्याची तरतूद आहे . वरील प्रश्नात , निवाडा व्यपगत झालेला आहे . व कलम २४(२) अन्वये राज्य शासनाने , नव्याने भू संपादनाची प्रक्रिया सुरु केलेली आहे . त्यामुळे कलम ८० खाली व्याज मिळणार नाही .
कलम ८१ खाली तात्पूत्या कालावधीसाठी जमीन ताब्यात घेण्याचे राज्य सरकारला अधिकार आहे . मात्र सदर जमीन केवळ ३ वर्ष कालावधीसाठी घेता येते . कलम ८१ खाली या प्रकरणाचा विचार केला जाऊ शकतो किंवा सानुग्रह अनुदान देणे हा एक पर्याय असू शकतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by एकनाथ पाटिल
20-03-2018
eknathpatil1980@gmail.com.
नमस्कार सर
मि राहनारा मुं आडिवली उर्फ किरवली पों तलोजा तां पनवेल जिं रायगड या गावात्ल्या जमिनिवर
सर्वे नंबर जुना 1/ब/ नवीन 90/ब/1/ या जमिनीवर
तारिख 26/09/1957 मध्ये साधे कुल दाखल आहे फेरफार
मध्ये नोंद आहे जुना सातबारा तलाठी कडे भेटत नाय
तहसील दार कडे आर्ज केले तीतही भेटत नाय त्यांच्याकडे नवीन 90/ब /भेटतो पन जुना 1/ब / हा सातबारा भेटत नाय आणी नवीन सातबारावर माझे आजोबा कै पांडु आंबो पाटिल यांचे नाव दिसत नाय त्या सातबारावर आर्विंद प्रों लीं अहमदाबाद असा नाव आहे परंतु मीझे आजोबांचे कुला मधले नाव दाखल नाय सातबारावर इत्तर हक्कात नाव लावन्यासाठी काय करावे लागेल सर मार्गदर्शन द्या
एकनाथजी
१. जुना ७/१२ मिळत नसेल , ज्या फेरफाराने आपले आजोबांचे नाव मिळकती ला कुल म्हणून दाखल करण्यात आले , तो फेरफार शोधा.
२. जर फेरफारही मिळत नसेल
अ. जमीन सध्या कोण कसत आहे ?
ब. ७/१२ चे कसणाराचे सदरी आपले आजोबा , त्या नंतर आपले वडील - आपण यांची नावे आहेत का
३. अनु क्र २ मधील सर्व उप प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपण सध्या हि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ व ७० ब अन्वये , आपण या मिळकतीचे कुल आहेत म्हणून दावा दाखल करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
17-03-2018
rohidaskale19@gmail.com
आदरणीय,
श्री. किरण पानबुडे साहेब,
कृपया मी विचारलेल्या प्रश्नांची आपल्या कडून उत्तरांची वाट पाहत आहे. मागे ३-४ प्रश्न मी आपल्या जानपीठ माध्यमातून विचारले आहेत तरी आपल्याकडून त्याच्या वर मार्गदर्शन मिळेल अशी आशा ठेवून आपणास नम्र विनंती करत आहे.
रोहिदास हरिभाऊ काळे
Question by दुर्गादास joshi
17-03-2018
rgadas26@gmail.comj
नमस्कार सर,
माझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by mahadev pawar
17-03-2018
002atul@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी
होय सर ८ अ चा उतारा म्हणजे ग्रामपंचाय घर पट्टी उतारा,
ग्रामपंचायत अजून पण म्हणत आहे की सिटी सर्वे झालेला नाही, जेव्हा होईल तेव्हा आम्ही माहिती सिटी सर्वे ला देऊ,
पण सिटी सर्वे तर १९८२ ला झालेला आहे
ग्रामपंचायत घरपट्टी ला नोंद खरेदी खताद्वारे केलेली आहे,
मी परत सिटी सर्वे ऑफिस ला चॉकशी केली ते म्हणत आहेत ८ अ उतारावरून काही होत नाही तुमचं नाव सिती सर्वे ला लागत नाही ,
सर प्लीज मदत,मार्गदर्शन करा
थोडक्यात आपण जमीन खरेदी करताना जी काळजी घेणे आवश्यक होते ती काळजी घेतलेली नाही . जमीन , मिळकत खरेदी करताना , जमिनीचा Title Search ( मालकी हक्क ) शोध घेणे व वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देणे आवश्यक आहे . हे केले असते तर आपण Bonafide purchaser झाला असता व आपण त्या आधारे दिवाणी दावा दाखल करून , प्रॉपर्टी कार्डला नाव दाखल करू शकला असता .
या बरोबरच , विकणाऱ्यानेही , आपणास संपूर्ण माहिती देणे आवश्यक होते . आपणास जमिनीचे सिलेले पैसे हवे असतील तर आपण , फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता मात्र आपणास जमीन मिळणार नाही
जमीन हवी असल्यास बहिणींशी तडजोड करावी लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vilas prakash misal
16-03-2018
vilasmisal46011@gmail.com
आदरणीय सर क्रुपया सहकार्य करावे.माझे नाव.विलास मिसाळ शेत मालकाने प्लॉटिंग करून रजेस्ट्रि खरेदीखत विकली व घेणारा .अ. ह्याने खरेदी खत केले पण फेर नावे घेतला नाही.व त्याने 3वर्षा नंतर .ब.ह्या व्यक्तीस विकले व त्याचाही नावे फेर झाला नाही.व 7/12 नाव आले नाही.व त्यानेही 5 वर्षा नंतर माझ्या वडलांना रजेस्ट्रि खरेदी खत करून विकले.व मला माझ्या वडलांच्या नावे 7/12 घायचा आहे.त्यास काय करावे लागेल.व माझ्या कडे सर्व झालेला व्यवहार खरेदी खत आहे.पण प्लॉटिंग करून (विकणारा)आणि (अ) ह्या दोघांचा खरेदी खत माझ्या कडे नाही.व मी त्यांचे खरेदीखत काढण्यास पात्रं ठरतो का व ते मला कश्या आधारे मिळेल.सहकार्य करावे धन्यवाद.
सर्व खरेदी खते गाव कामगार तलाठी यांचे कडे द्या . आपले नाव दाखल होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
15-03-2018
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखादा व्यक्ती /सोसायटी इमारतींबाबत म.न.पा.मध्ये कर भारत असेल तर आज रोजी शहरी भागात बिनशेती परवानगी आत शिथिल झाल्याने शासनाकडे बिनशेती कर भरणे गरजेचे आहे का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
13-03-2018
rohidaskale19@gmail.com
माननिय मोहदय,
माझा प्रश्न आहे कि, कोणत्याही विषया संदर्भात ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावा विरोधात हरकत घेता येते का?
कळावे हि विनंती.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
