जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सचिन दत्ताराम पारकर
25-04-2018
sachinparkar77@gmail.com
सर, तहसिलदार /जिल्हाधिकारी कार्यालयात कोणताही अर्ज सादर करताना 5 रु.कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे काय? असल्यास त्याबाबतचा शासन निर्णय/अधिनियम
Question by Avinash Rasam
24-04-2018
Avinashrasm522@gmail.com
सर,माझे आजोबांनी सन 1935 मध्ये जमीन वाटप दावा जावला होता.त्याचा निवाडा सन 1949 मध्ये लागुन प्रत्यक्ष ताबे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सन 1950 मध्ये आला.त्यानंतर ताबे देणेची कार्यवाही सन 1954 मध्ये सुरु झाली.सर्व पक्षकारानी पैसे भरले. 75 टक्के लोकानी ताबे घेतले.12.50 टक्के लोकांनी वाटपास लेखी सहमती दिली.उर्वरीत 12.50 टक्के लोकानी वाटपास हरकत जिल्हाधिकारी यांचे कडे घेतली.त्याच्या हरकती केस चालवुन जिल्हाधिकारी यांनी फेटाळुन लावल्या.त्यावर त्यानी मा.लोकायुक्ता मुबई यांचे कडे सन 1958 मध्ये अपिल केले.हे अपिल त्यानी वकिला करवी चालवल्यानंतर लोकायुक्ता यानी हे अपिल1958मध्ये फेटाळत मा.जिल्हाधिकारी यानी केलेले वाटप कायम केले.यानतंर विराधकानी कुठेही अपील केलेले नाही.त्यांनतर ताबे घेतलेल्यानी आपली नावे 7 .12 सदरी लावुन घेतली.त्याच्या वहिवाटी सुरू झाल्या.असे असताना. काही पक्षकारानी पुन्हा वाटप मान्या नसले बाबत जिल्हाधिकारी यांचे कडे सन 1964मध्ये तक्रारी केल्या.मात्र या तक्रारीत मा.लोकायुक्त यांचे कडे झालेल्या अपिलाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही.असे असताना 1964 मध्ये जिल्हाधिकारी विरोधी पक्षकाराच्या तक्रारी अर्जावर जिल्हाधिकारी करीता यांनी आम्हाला नोटीसी न करता फेर वाटपाचा शेरा केलायाची कल्पना माझे आजोबा यांना समजल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करत व मा. आयुक्त यांचे कडे चाललेल्या अपिलाची कल्पना दिलेवर जिल्हाध्किारी यांनी माझे आजोबाना तुम्हाला दिलेले ताबे अबाधित असुन फेर वाटप करणे झाल्यास किरकोळ फेर बदल केले जातील असे कळविले. त्यानतंरही आम्हाला रितसर ताबे दिले आहेत.काही ताबे दिवानी कोर्टाने उत्पनासह आम्हाला दिले आहेत.आम्ही आमच्या जमीणीत लागवडी सुधारणा केल्या आहेत. गेली चाळीस वर्षे आमच्या वहीवाटी विनाकटकट सुरू असतानाच चाळीस वर्षानी सन 1990 मध्ये तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी याच्या सन 1964 च्या फेर वाटपाचा आधार घेत आम्ही घेतलेले ताबे रदद करणेच्या आम्हाला नोटीसी दिल्या.या वाटपात एकुण 50 पक्षकार असताना फक्ता 5 जणाना नोटीसी बजावत तहसिलदार यानी केस चालवली.व आम्हाला दिलेले ताबे रदद केले. यावर आम्ही प्रांताधिकारी यांचे कडे अपिल केले.त्यांनी अपिल मान्या करत प्रकरण फेर चौकशी व उचित निर्णयाकरिता तहसिलदार यांचे कडे पाठविले.यावर विरोधी पार्टीने जिल्हाधकिारी यांचेकडे अपिल केले.त्यानी अपिल फेटाळत जुने झालेले वाटप कायम केले.यावर विराधी पार्टीने हायकोर्टात मध्ये सन 1994 मध्ये रिट दाखल केली.हायकोर्ट यांनी जितहसिलदार याना फेर वाटप करता येईल का अशी विचारणा केली आहे.याच दरम्यान सन 2005 मध्ये दिवाणी न्यायालयाने मुळ दरखास्ता मुबंई हायकोर्ट रुलिग A.I.R.2001 bombay 303 .21.3.2001 अन्नासाहेब नगाणे वि.राजाराम नगाणे या अन्वये निकाली काढली आहे.या बाबत माझे प्रश्ना असे..55 वर्षापुर्वी दिलेले ताबे एवढया प्रदिर्घ कालावधीनंतर रदद करता येतात का. 2. आयुक्ता यानी कायम केलेले वाटप त्याची परवाणगी नसताना जिल्हाधिकारी अगर तहसिलदार याना रदद करता येते का. 3.वाटपात 50 पक्षकार असताना फक्ता 6 जणानी नोटीस देवून तहसिलदार यांनी चालविलेली केस रदद केलेले वाटप योग्या कि अयोग्या 4 लोकायुक्त याचे 1958 च्या निवाडयाची वैध्यता किती.
Question by जी.एम.कोकरे नायब तहसीलदार,(मूंबई शहर)
23-04-2018
gmkokare@gmail.com
सेतू सूविधा केंद्रामधून ऑफलाईन निर्गमित केलेल्या सर्व प्रकारच्या नस्ती अभिलेख कक्षात अ ब क ड वर्गवारी प्रमाणे जमा करणेचे असल्याने सदर दाखल्यांच्या नस्तींचा जतन करावयाचा कालावधी,वर्गीकरण क्रमांक,,फेरीस्ा्त नमूना इत्यादी माहिती अधिकृत परिपत्रक/शासन निर्णयासह एकत्रित मिळणेस विनंती आहे.
कोकरे साहेब ,
असे Retention Schedule कार्यालय प्रमुखांनी तयार करावयाचे असून डायरेक्टर , पुराभिलेख संचानालया ची मान्यता घेण्याची आहे . आपले कार्यालयासाठी अशी सूची तयार करा .
Maharashtra Public Records Act २००५ - कृपया वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गौरव यादव
23-04-2018
yadavgaurav8890@gmail.com
माझी गावी एकूण पावणे चार एकर जमीन होती .पण माझ्या वडील आणि काका यांनी मिळून त्यानीं त्यातील काही जमीन मुखतीयार पत्रावर विकून टाकली . आणि काही जमीन अजूनही शिल्लक आहे .माझे वडील आणि काका दोघेही आता जिवंत नाहीत . तर मला जमीन किती शिल्लक राहिली आहे ते सात बारा वर कसे समजेल .
सात बारा मी काढलं आहे परंतु मला त्यात काही समजत नाही .तर तुम्ही मला सांगा की मी माझे श्रेत्र कसं काढू .
आणि ह्या बाबतीत मी कोणच सल्ला घेऊ .
७/१२ वाचा आपणास , क्षेत्र किती आहे ते कळेल . ७/१२ चा डावी बाजू पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कौनैन शोख
23-04-2018
kaunainshaikh77@gmail.com
सर,,, नवीन अविभाज्य शर्त, भोगवटदार वर्ग २ जमिनी चा बक्शिस पत्र करणेची परवानगी विषयी माहिती द्यावी़
आपणास जिल्हाधिकरी / आयुक्त यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल
जमीन शेती प्रयोजसाठी दिली असेल तर , विक्री किंमतीच्या ५० % व जमीन बिबशेती प्रयोजनासाठी दिली असेल तर विक्री किंमतीच्या ७५% रक्कम अनार्जित उत्पन्न म्हणून शासनाकडे जमा करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रविराज इंगळे
22-04-2018
ravirajingle731@gmail.com
माझ्या आजोबांनी त्यांच्या नावे असलेली जमीन ०.८१ आर जमीन मला स्वता च्या मरजीने २००रू च्या Bond वर मला वाटणीपत्रक करून दिले तर मी माझ्या नावावर शेती कशी करू शकतो. कृपया मला मार्गदर्शन करा.
आपण जे म्हणताय ते वाटप नसून , आजोबा आपणास बक्षीस म्हणून जमीन देत आहेत . मात्र सदर जमीन आजोबांची स्वकष्टार्जित आहे का ? असेल तरच ते आपल्याला बक्षीस पत्राने देऊ शकतील . मी,मात्र बक्षीस पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
22-04-2018
pankajkagane@gmail.com
सर एखादा कर्मचारी 7 ते 8 वर्षांपासून कार्यालयीन कामे खूपच हळूवारपणे करत आहे म्हणजे 1 पत्र टाईप करायला सांगितले तर 3 तास लावतो एवढ हळुवारपणे काम करतो मग सदर कर्मचारी यांच्यावर कामामध्ये वारंवार हलगर्जीपणा करीत आहे म्हणून त्यांना सेवेतून काढून टाकता येते का सर. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
त्याला टपाल स्वीकारायला बसवा .
काम सुधारणेची संधी द्या . सुरवातीस करणे दाखवा नोटीस काढा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर
22-04-2018
shankarbkakade@gmail.com
महोदय श्री किरण पाणबुडे सर
१)आमच्या ताब्यात १९४६ पासून असलेली जमीन एक ७/१२ वर नाव असलेल्या व्यक्तीने विकली, विकत घेणार्यांचे नाव पण ७/१२ सादरी दाखल झाले ह्याबाबत कोणतीही नोटीस अली नाही ,
२)त्या इसमाने कधीच जमीन कसली नाही फेरफार मध्ये असा उल्लेख आहे कि ३२ग ने नावावर झाली, हा ३२ ग त्याच्या वडिलांनी केला होता आणि फेरफार वर खाडाखोड पण आहे दुसऱ्याचे नाव खोडून त्याच्या वडिलांनी स्वतःचे नाव लिहिले. आणि हा इसम कधी जमीन कसत नव्हता १९४६ पासून आमचाच ताबा आहे चतुर्सिमा असलेले जमीन मालक आमच्या बाजून साक्ष देण्यास तयार आहेत.
३) त्याने असेच २००७ साली काही जमीन विकली आणि आता परत उरलेली जमीन विकली आणि २ वेग-वेगळया बिल्डरांच्या नवी दोन्ही जमिनी झाल्या.
४) आमच्या कडे जमिनीचा ताबा कायदेशीर रित्या विकत घेतल्याचा पुरावा आहे व जमीन नावे झाल्याचा फेरफार सुद्धा आहे, पण त्याने कोणाच्या तरी मदतीने ७/१२ सादरी असलेले आमचे फेरफार गायब केले पण एक ७/१२ वर तो फेरफार दाखवतो आहे .
५) आमच्याकडे त्याच्या वडिलांनी स्टॅम्प पेपर वर लिहून दिले होते कि हि जमीन तुम्हीच कसत आहेत, हा पुरावा आहे हक्काच्या पत्रकावर ते सर्वे नंबर पण आहेत.
6) सामनेवाले ह्यांनी विकलेली जमीन लगेच बिनशेती पण करून घेतली आहे तरी आम्हाला जमीन परत मिळणेसाठी काय करावे लगेच कोर्टात केस दाखल करणार आहोत
शक्य असेल तर मला आपणास पेपर दाखवावे असे वाटते , आपण आम्हाला कायदेशीर सल्ला द्यावा ,,हि जमीन माझ्या पंजोबांपासून आम्हीच कसतो खूप वाईट वाटले आहे सगळ्या घरच्यांना, आपण मार्गदर्शन करावे अशी आपणास नम्र विनंती,,.
जमीन १९४६ पासून तुमचे ताब्यात होती . त्याचवेळी अथवा नंतर, ती व्यक्ती कुल नसून आपण कुल आहेत व आपला कुल हक्क जाहीर करून मिल्ने बाबत मामलतदार यांचेकडे दावा दाखल करणे आवश्यक होते .
त्याचे वडिलांचे नावावर ३२ ग किंमत निश्चित झाल्यावर , आपण त्या विरुद्ध अपील हि दाखल करू शकला असता .
तुमचे नाव ७/१२ वरून कमी झाल्यावर , संबंधित फेरफार आपण आव्हानित करणे आवश्यक होते .
त्याने स्टॅम्प पेपर वर लिहून दिले कि ताबा तुमचा आहे मात्र त्यास काही उद्धार नाही . ३२ ग किंमत निश्चित होण्यापूर्वी अथवा त्या यानंतर आपण अपील दाखल करणे आवश्यक होते .
तो इसम कुल नाही हे जाहीर करून मिळण्यासाठी आपण दावा केला असता , तर त्या शपथ पत्राचा काही उपयोग झाला असता .
सध्या आपण , दिवाणी न्यायालयात , adverse possession ने मालक म्हणून जाहीर करून मिल्ने साठी दावा दाखल करणे संयुक्तिक . मी,यात्रा आपण म्हणता जमीन दोन बिल्डरला विकली आहे व त्यांचे नावे झाली आहे . मग जमीन तुमच्या ताब्यात कशी आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निखिल गायकवाड
21-04-2018
itsnikhilgaikwad@gmail.com
नमस्कार सर
मला आपली मदत हवी माझा प्रश्न असा आहे कि माझ्या आजोबानि १० एकर शेत घेतले होते शेतामधुन कॅनल गेले शेताचि वाटनि झालि वडिलांच्या नावे १:६१ जमीन आलि काकाच्या नावे १:४१ आलि काकाच्या नावचि जागा आजोबाच्या नावावर केलि होती आता आमच्या राहत्या घर माझे आजोबा आनि माझ्या काकाच्या नावावर आहे कारन कि माझे वडिल वारले काहि वर्षानी आजोबा वारले आजि वारली नंतर काकानि त्यांचे शेत स्वताच्या नावावर करून घेतले आमचे शेत आजोबानि आमच्या नावावर आधिच केले होते आता प्रश्न असा की (आता काका असा म्हनतोय कि तुमच्या कडे जि अधिक चि जमिन
आहे ति आमच्या नावे करा )आम्हि जे राहतो ते घर आईच्या नावे करायचि पन वारस म्हनुन काकाचे नाव यायले पन तो आमच्या घरचि जागा आईच्या नावे करन्यास परेशान करत आहे कृपया करून मदत करावि
Question by अभिजीत
19-04-2018
abhijitkadam55@ gmail.com
महोदय मी एक जमिन खरेदी केलेली अाहे नुकतीच खरेदी प्रक्रीया पुर्ण झालेली असुन तो दस्त नोंदणी साठी तलाठी कार्यालयाकडे दिला आहे परंतु जी जमिन खरेदी केली त्या जमिनीच्या७/१२ च्या् इतर हककात साधे कुळ ३(१) अशी नोंद आहे त्या मुळे भविष्यात अडचण येऊ शकते का कारण मी खरेदी जमिन मालका कडुन केलेली आहे कृपया मार्गदर्शन करा
जमीनखरेदीसाठी कुळाची सम्मती होती का ?
नसेल तर , पुढे अडचण होईल . कारण कुळाचे नवे ३२ ग किंमत निश्चित झाली कि , कुल मालक होणार . व आपले नाव ७/१२ वरून कमी होणार .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भूषण
19-04-2018
bhushpawar89@gmail.com
नमस्कार साहेब , आम्हाला आमच्या जमिनीचे तिघांमध्ये खातेफोडे करणे आहे तरीपण यासाठी शासकीय निमानुसार काय काय करावे लागेन व खातेफोडे करण्यास अंदाजे किती खर्च येईन .
आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ प्रमाणे वाटप दावा , तहसीलदार यांचे कडे दाखल करा .
या वाटपासाठी कोणतीही फी नाही . अर्ज समवेत जो कोर्ट फी स्टँमप लावावा लागेल तेवढाच खर्च अपेक्षित
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
16-04-2018
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर , मृत्यूपत्रानुसार ग्रामसेवक घर नावावर करण्यास गेल्या आठ महिन्या पासून टाळाटाळ करीत आहे . तसेच काही उत्तर देखील देत नाही . त्याच प्रकारे मंडळ अधिकारी व तलाठी देखील जमीन नावावर करीत नाही. मृत्यूपत्र दिल्यानंतर घर व जमीन वर नांवे लावण्यास काय अडचण आहे याचे कारण सुद्धा सांगत नाही या बाबत कोणाकडे तक्रार करावी मार्गदर्शन करावे हि विनंती.
तलाठी / मंडळ अधिकारी यांचे बाबतीत , संबंधित तहसीलदार यांचेकडे तक्रार करू शकता
ग्रामसेवक बाबत आपण , गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Avinash Rasam
15-04-2018
Avinashrasm522@gmail.com
बाबत माझे प्रश्ना असे..55 वर्षापुर्वी दिलेले ताबे एवढया प्रदिर्घ कालावधीनंतर रदद करता येतात का. 2. आयुक्ता यानी कायम केलेले वाटप त्याची परवाणगी नसताना जिल्हाधिकारी अगर तहसिलदार याना रदद करता येते का. 3.वाटपात 50 पक्षकार असताना फक्ता 6 जणानी नोटीस देवून तहसिलदार यांनी चालविलेली केस रदद केलेले वाटप योग्या कि अयोग्या 4 लोकायुक्त याचे 1958 च्या निवाडयाची वैध्यता किती.
ताबा रद्द होत नाही . ताबा काढून घेतला जातो . ताबा योग्य कायद्याची प्रक्रिया राबवूनच काढून घेतला जातो . ( by following due process of law )
आपण म्हणत आहेत त्या प्रमाणे मा आयुक्त यांचे आदेश , तहसीलदार मानणार नाहीत असे होणार नाही . आयुक्त यांचे आदेश काय आहेत हे नीट वाचून पहा . कायदेशीर सल्ला घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मेघराज पाटील
14-04-2018
meghp@abpnews.in
गुंठेवारी कायद्यानुसार प्लॉटिंग करण्यात आलेल्या क्षेत्रात ओपन स्पेसची तरतूद आहे का? अशा प्लॉटिंगमध्ये ओपनस्पेस (सर्व प्लॉटधारकांच्या सोईसाठी खुला प्लॉट) ठेवली असेल आणि प्लॉटधारकांच्या खरेदी दस्तातील चतुःसीमेच्या वर्णनात खुला प्लॉट असा उल्लेख असेल तर असा ओपन स्पेस मूळ जागा मालकाला अन्य प्लॉटधारकांच्या परवानगीशिवाय विकता येईल का? गुंठेवारी प्लॉटिंगनुसार ठेवलेला ओपन स्पेस नगरपालिकेला हस्तांतरीत करणं अनिवार्य आहे का?
होय
गुंठेवारी कायद्यानुसार open space ठेवणे आवश्यक
अशी ओपन space विकता येत नाही
ओपन space नगर पालिकेस हस्तांतरित करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by amjad shaikh
14-04-2018
amjadshaikh367@gmail.com
माझे वडील मयत झाले असून मी तलाठी साहेबांकडे ७/१२ वर नाव लागण्यासाठी वारस अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दिले आहे वारस अर्ज व प्रतिज्ञापत्रात सहा नावे दिली आहेत मात्र तलाठी साहेबानी नोटीस सात नावाची काढली आहे आजोबांच्या मुत्यु नंतर यापूर्वीच काकांचे नाव लागले आहे .नोटीस मध्ये सातव्या नंबरला काकांचे नाव लिहिले आहे . तरीही नोटीस कायदेशीर आहे का बेकाययदेशीर ते सांगण्यात यावे .किंवा नोटीस दुरुस्त करून घ्यावी का ? तरी याबाबत कृपया मार्गदर्शन करण्यात यावे ?
नोटीस कायदेशीर आहे
काकांचा आपली नावे वारस म्हणून नाव दाखल करण्यास हरकत आहे का ? हे तपासण्यासाठी नोटीस दिलेली आहे . आपणास त्याबाबत काही हरकत असण्याचे कारण नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राघू धोंडू कंक
13-04-2018
bharatkank44@gmail.com
सर मी 16 एकर जमिनीवरील खातेदार आहे. माझी शेतजमीन निरा-देवघर भोर प्रकल्प मध्ये संपादन झाली आहे. तरी मी पुनर्वसनासाठी पाञ आहे का
भू संपादन होताना , १९९९ चा पुनर्वसन कायदा जर लागू केला असेल तर , आपण पुनर्वसनासाठी पात्र आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
12-04-2018
abhijitkadam55@ gmail.com
महोदय कालवा भुसंपादनासाठी एका एकञित आणेवारीत असणार्या् गटापैकी २ एकर जमिन भुसंपादीत झाली आहे परंतु त्या् गटाच्या जमिन मालकाबरोबरच ईतर हककात संरक्षित कुळ असणारयानाही ४(१)नोटीस आहे तर आता भुसंपादीत जमिनीचा मोबदला मिळत असताना मोबदल्यासाठी मालकाबराबर कुळही पाञ आहे कींवा नाही याबाबत मार्गदर्शन करा या भुसंपादनाबाबत मालक एकापेक्षा भरपुर आहेत तेव्हा् मोबदलयावरून मतभेद होण्याची शक्यता आहे तसेच सर्व मालकांच्या मतभेदात कुळ वारसांना कशाप्रकारे न्याय मिळतो कींवा तसांचा या मोबदल्यावर कोनताही अधिकार आहे कींवा नाही याचे मार्गदर्शन करावे ही विनंती
अभिजितदादा
आपली शंका रास्त आहे
कुळांना भू संपादन मोबदल्यात हक्क आहे . उलटपक्षी कुळांचा हक्क स्वरूप यावरून नुकसान भरपाई दिली जाते
कुल कायद्या नुसार , ज्या मिळकतीस कुल असतो , तो कुल जर १.४.५७ रोजी अथवा त्यापूर्वी कुलअसेल तर , अशी व्यक्ती मिळकतीची मानीव कुल मानली जाते . केवळ ३२ ग किंमत निश्चित झाली नाही म्हणून , कुळाचे नाव भोगवटादार सादरी लावे जात नाही . अश्या वेळी , अश्या कुलास ८० % नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे .
तथापि नवीन भू संपादन नियमामध्ये , कुल मालक ६०: ४० प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश आहेत
मालक कुल वाटपाबाबत वाद असल्यास , रक्कम दिवाणू न्यायालयात जमा केली जाते व न्यायालय वाटपाबाबत निर्णय घेते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रविंद्र कासार
12-04-2018
kasar.exam@gmail.com
माननीय सर मला महाडचे घर मला माझ्या नावाने मिळाले आणि आता मला ते माझ्या व माझ्या पत्नीच्या नावे घ्यायचे आहे अजून म्हाडा कडून वाटप पत्र मिळाले नाही त्या साठी मला काय करावे लागेल .
Question by पंकज कागणे
11-04-2018
pankajkagane@gmail.com
आंतरजिल्हा बदलीने कर्मचारी रुजु झालेले आहेत त्यांनी दुय्यमसेवा व महसूल अर्हता परीक्षा बदली होण्याच्या आधी म्हणजे प्रथम नियुक्ती झालेल्या जिल्हामध्ये उत्तीर्ण केलेली होती, त्यांना पदोन्नती द्यावयाची असल्यास बदली झालेल्या जिल्हामध्ये किती वर्षाची सेवा पुर्ण झाल्यानंतर त्यांना पदोन्नती देता येईल.
Question by सचिन गुरनुले
10-04-2018
sachingurnule43@gmail.com
आदरणीय सर ,
माझ्या आजोबाने हयातीत असताना आपली स्वमिळकतीची जमीन आम्हा दोन नातवंडा ना अनोंदणीकृत मृत्युपत्र १०० रु.च्या स्टँम्प पेपरवर साक्षीदारा समोर मृत्युपत्र करून ठेवले आहे. मागील महिन्यात माझ्या आजोबाचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यामुळे सदर मृत्युपत्र घेऊन तलाठी कार्यलयात गेले असता तलाठी साहेबांनी सदर मृत्युपत्र नोंदणीकृत नाही त्यामुळे फेरफार घेता येत नाही व सातबारा संगणीकरण झाल्यामुळे online e ferfar प्रणालीतून अनोंदणीकृत मृत्युपत्राचा फेरफार घेता येत नाही म्हणून सदर मृत्युपत्र अवैध आहे असे सांगून परत केला .
आदरणीय सर आपणास विनंती करतो कि वरील समस्येवर मार्गदर्शन करावे हि विनंती ....
आपल्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्या !
तलाठी यांनी चुकीची माहिती दिली आहे
कायद्याने मृत्य पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही
त्यामुळे e ferfar प्रणालीमध्ये नोंदणीकृत , मृत्यपत्राची आवश्यकता नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar yedage
09-04-2018
yedagesagar@gmail.com
माझ्या वडिलांनी शाळा बांधकाम साठी 5आर जमिन बक्षिस करून दिली आहे.व शाळेचे पुर्ण बांधकाम 8आर जमिनीवर आहे.व शाळेच्या समोरून राज्य महामार्ग गेला असुन बक्षिसपत्रामधे किती अंतर सोडायचे हे लिहुन दिले नाही.व PWDचे कोनतेही नियम व अंतरेचा उल्लेख केलेला नाही.व शाळेचे बांधकाम रस्त्याच्या 30 फुट अंतर सोडुन आहे.व ते पुर्ण झाले आहे.तरी शाळेची 5आर जमिन कशी मोजुन द्यावी.व उर्वरित जागेवरिल अतिक्रमन कसे काडता येइल.व कोनाकडे दाद मागता येइल....कृपया मार्गदर्शन करावे.........माझा संर्पक yedagesagar@gmail.com मो.9561264162
शाळेने ८ गुंठ्यांवर बांधकाम पूर्ण केले आहे . त्यामुळे आता , कुठे अतिक्रमण काढत बसता
राज्य महामार्गापासून ठराविक अंतराच्या आत बांधकाम करता येत नाही. त्यास नियंत्रण रेषा असे संबोदतात
५ गुठ्यांपेक्षा जादा क्षेत्रावर असलेले बांधकाम काढायचे असल्यास आपणास दिवाणी न्यायालयात जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by साहेबराव गायकवाड
09-04-2018
sjgaikward1979@gmail.com
सर,
माझ्या वडिलांनी २०१६ साली जमीन मोजणी केली होती. भूमी अभिलेख कार्यालय मालेगाव (नासिक) यांच्याकडून प्रकरण निकाली काढले गेले आणि वडिलांना पत्र दिले कि तुम्ही तुमचे क्षेत्र दुरुस्ती करून घ्यावे त्या प्रमाणे वडिलांनी पूर्वीचे ७/१२ १९३५ ते १९७६ पर्यंत काढले व फेरफार हि काढले आहे. वर्ष १९६२-६३ साली कमी जास्त पत्रकाची नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आमचे क्षेत्र कमी केले आहे परंतु भूमी अभिलेख कार्यालयातून १९६२ च्या पूर्वीच्या रेकॉर्ड प्रमाणे मोजणी करून दिली आहे.कमी जास्त पत्रकाप्रमाणे हल्लीच्या आणि पूर्वीच्या ७/१२ मध्ये ७६ घुंठ्या चा फरक आहे तरी सर कृपया मार्गदर्शन करावे कि क्षेत्र दुरुस्ती साठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा लागेल . कृपया मार्गदर्शन करावे .
धन्यवाद .
१९६२ च्या कमी जास्त पत्रकाने क्षेत्र कमी दाखवले आहे . त्यामुळे आपल्या क्षेत्रात तफावत येत आहे
आपण कमी जास्त पत्रक तयार झाले त्यावेळी अपील दाखल करणे आवश्यक होते .
आता आपण कमी जास्त पत्रक आव्हानात करा ( अधीक्षक भूमी अभिलेख ) . मात्र विलंब खूप झाला असल्याने , मुदतीच्या कायद्याच्या बाधा येऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by साहेबराव गायकवाड
09-04-2018
sjgaikward1979@gmail.com
सर,
माझ्या वडिलांनी २०१६ साली जमीन मोजणी केली होती. भूमी अभिलेख कार्यालय मालेगाव (नासिक) यांच्याकडून प्रकरण निकाली काढले गेले आणि वडिलांना पत्र दिले कि तुम्ही तुमचे क्षेत्र दुरुस्ती करून घ्यावे त्या प्रमाणे वडिलांनी पूर्वीचे ७/१२ १९३५ ते १९७६ पर्यंत काढले व फेरफार हि काढले आहे. वर्ष १९६२-६३ साली कमी जास्त पत्रकाची नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आमचे क्षेत्र कमी केले आहे परंतु भूमी अभिलेख कार्यालयातून १९६२ च्या पूर्वीच्या रेकॉर्ड प्रमाणे मोजणी करून दिली आहे.कमी जास्त पत्रकाप्रमाणे हल्लीच्या आणि पूर्वीच्या ७/१२ मध्ये ७६ घुंठ्या चा फरक आहे तरी सर कृपया मार्गदर्शन करावे कि क्षेत्र दुरुस्ती साठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा लागेल . कृपया मार्गदर्शन करावे .
धन्यवाद .
Question by VIKRAM
07-04-2018
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , माझी १ विनंती आहे मला योगय मार्ग सांगाल . माझा व २ बहिणीने दिवाणी नायालयात जमिनीतील सर्व हक माझा नावे सोडून दिला आहे त्याची रक्कम मी कोर्टातच भरली आहे व हुकूमनामा झाला आहे 2 बहिणीनेही सर्व हक्क माझा नावे सोडून दिला आहे दिवाणी नायालयातच. पण ७/१२ वर नोंद करून घायचे राहहून गेले.फुडें मी तो हुकूमनामा मुद्रांक शुल्क (दंड ) भरून तहसिलकर्यलातून आदेश वरून ७/१२ माझे नावे झाला .पण त्या आधी २ बहिणींनी ती जमीन गावातील एका ला विकून दस्त नोंदींसंधीसाठी तलाठी यांच्याकडे आला पण तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तो अर्ज फेटाळ ला त्यावर त्यांनी प्रांत यांच्याकडे अपील करून माझे नाव कमी करून दस्त वर आलेला व्क्तीचे नवा ७/१२ ला लावा असा आदेश दिला व माझे नवा ७/१२ वरून कमी करण्यात आले आहे तर मी त्या विरोधात मी दिवाणी न्यालयात दावा दाखल केला आहे. तो दस्त मला मान्य नाही व तो दस्त कॅन्सल करावा .मला तो दस्त चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल
? माझे नावे ती जमीन पुन्हा होईल का ?कृपया मार्गदर्शन करा ?
दिवाणी न्यायालयात तुमची तडजोड होऊन तुमच्या बहिणींनी मिळकतीतील त्यांचा हक्क सोडला आहे . त्या प्रमाणे तुम्ही जमिनीचा मोबदला हि न्यायालयात जमा केला आहे . हे सर्व अभिलेखाच तुमचा पुरावा आहे तो तुम्ही बहिणींनी जमीन विकली तो दस्त रद्द करण्यासाठी पुरेसा आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
07-04-2018
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
माघील प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल आभारी आहे
साहेब माझा दुसरा प्रश्न आहे की
एका अशिक्षित ७२ वर्ष्याच्या स्त्री ला निराधार योजनेची पेन्शन चालू करतो म्हणून मृतुपत्र फसवणूक करून रजिस्टर करून केले आहे, आणि मृतुपत्राला मेडिकल फिजिकल फिट दाखला नाही ,आणि साक्षीदार म्हणून २ व्यक्ती आहेत,परंतु मृतुपत्रावर ज्या साक्षीदारांचा पत्ता व नाव आहे त्या गावा मध्ये आम्ही सरपंच व गावातील लोक यांच्याकडे चौकशी केली असता ते साक्षीदार आमाच्या गावामध्ये रहिवाशी नाहीत असे सांगण्यात आले, व मृतुपत्राला साक्षीदार यांची ओळखीसाठी कोणतीही कागदपत्रे जोडली नाहीत,जमीन आम्हीच वहिवाट करीत आहे,परंतु ज्याने मृतुपत्र करुन घेतले आहे ,तो व्यक्ती ७/१२ व नाव लावण्यासाठी धडपड करत आहे ,आम्हाला काय करावे लागेल ,कृपया माहिती द्यावी हि विनंती
त्या अशिक्षित महिलेने जर तिची फसवणूक झाली आहे असे तिला वाटत असेल तर तिने त्यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
