जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दुर्गादास जोशी
23-02-2018
jsdurgadas26@gmail.com
नमस्कार सर,
माझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by सीमा सावंत
22-02-2018
sawantseema176@gmail.com
नमस्कार सर , माझ्या वडिलांची व काकांची सामाईक एन ए जमिन आहे त्यातील २ गुंठे जमिन काकांनी वडिलांची बनावट सही करुन बक्षीसपत्राने सार्वजनिक विहीरीसाठी दिली ग्रामपंचायतीला १९८३ मध्ये दिली.तरी सदर जमिन माझ्या वडिलांना परत मिळू शकते का?
१९८३ पासून आपण काय करत होता ?
वडील हयात असतील तर , फौजदारी तक्रार दाखल करा
NA मिळकत परवानगी शिवाय विभागणी करता येत नाही मात्र आता त्या जागेवर सार्वजनिक विहीर आहे त्याचे काय करणार
आपण त्याची नुकसान भरपाई मिल्ने बाबत दिवाणी दावा दाखल; करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Balaji sawant
22-02-2018
Balaji.sawant44@gmail.com
नमस्कार सर
द्रुतगती महामार्गावरील ज्या जाहिराती असतात त्या जागेवर कोणाचा अधिकार असतो जाहिरात त्या ठिकाणी लावण्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते यासाठी काही रक्कम भरावी लागते का कृपया सविस्तर माहिती देण्यात यावी
Question by अमोल चव्हाण
20-02-2018
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
माझा प्रश्न असा आहे कि , आम्ही दोघे भाऊ आमची सामाईक मधील आणेवारी घर मिळकत आहे ,परंतु माझा मोठा भाऊ २००३ ला मयत झाले ,त्यानंतर त्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव ८ अ ला लागले ,पत्नी १६-०२-२०१६ ला मयत झाली ,त्यांना कोणी वारस ,मुलबाळ नाही ,आम्ही ग्रामपंचायतिला अर्ज दिला त्यानी नाव कमी करून दिले व नावापुढे कंस केले परंतु ,८ अ च्या उतार्यावर पूर्ण नाव कधी कमी होणार ,आणि ग्रामपंचायत कर भावाच्या पत्नीच्या नावानेच देत आहेत,,८ अ च्या उतार्यावर पूर्ण नाव कधी कमी होण्यासाठी काय करावे लागेल ,कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
मयत व्यक्तीचे नाव कंसात टाकले म्हणजे त्या व्यक्तीचे नाव कमी झाले असा होता .
ग्राम पंचायतीचे निदर्शनास आणून देऊन , घरपट्टी आपले नावावर पाठविण्याबाबत अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पद्माकर राठोड
19-02-2018
padmakarias2017@gmail.com
कोकण -1 व कोकण-2 यांच्या नोटीफिकेशन
Question by pravin mudpe
19-02-2018
spmudpe@gmail.com
sir,mazhya vadilanchya nave vadiloparjit va kahi self acquired jamin aahe.7/12 vadilanchya nave aahet.mazha bhau vatanisathi shetat shetat yevun kame karu det nahi.courtcha manai hukum nastana to shet padun thevanyas sangato aahe.ghari mitwun ghenyas tayar nahi.to asi adavanuk kaydyanusar karu shakato ka? ase karat aslyas amhi kay karave.yacha kaydeshir marg suchavava
१.वडिलोपार्जित जमीन , भावाचे हिस्स्याप्रमाणे त्याचे नावावर करुणदेने आवश्यक आहे .
घरी मिटवून घेण्यास का तयार होणार नाही जर तुम्ही त्यास त्याचे हिस्स्याची जमीन त्याचे नावावर करून दिल्यास .
वडिलांचे स्व कष्टार्जित जमिनीवर त्याचा कोणताही हक्क नाही . अनु कर १ ची पूर्तता करूनही , तो आपणास शेती कास्म्यास अडथळा अनंत असेल तर , त्याचे विरुद्ध The Specific Relief Act खाली दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुमेध गोरे
19-02-2018
sumedhgore@gmail.com
माझे दिवंगत पणजोबांचे नावे इनाम वर्ग ६ब ची जमिन आहे. भुधारणा पद्धती् भोगवटादार वर्ग १ आहे. मागिल वर्षी माझे वडिलांनि त्यावर स्वतःची वारसनोंद करुन घेतली आहे.
सदर जमिनीच्या सात बारा उतार्यावर इतर हक्का मधे कुळाची नोंद असुन ४३ ला् पात्र व इनाम वर्ग ६ ब कुळाची खरेदी घेता येत नाही असे दोन शेरे आहेत.
असे असताना कुळाने ३२ग खाली तीस वर्षापुर्वी अर्ज करुन खरेदी किंमत ट्रेझरी मधे भरली. व आत्ता माझे वडीलांनि स्वतःची वारसनोंद करुन घेतल्या नंतर ३२म प्रमाणपत्रा साठी अर्ज केला आहे.
"एकदा इनाम वर्ग ६ब कुळाची खरेदी घेता येत नाही" असा शेरा असताना तसेच आमचे नावे भुधारणा प्रकार वर्ग १ असताना त्या कूळास असे ३२म प्रमाणपत्र मिळु शकते का...?
त्याची वैधता काय...?
कृपया मार्गदर्शन करावे
Question by राहुल दत्तात्रय जोशी
18-02-2018
joshi0297@gmail.com
सर, जमीन एन.ए करण्यासाठी कोणाची परवानगी आणि किती दिवसात जमिण एन.ए. करता येते.याची सखोल माहिती दया. आणि एन.ए.च्या प्रक्रीयेमध्ये झालेले बदल आणि एन.ए. ची सोपी प्रक्रिया सांगा. आणि त्यासाठी लागणारा खर्च किती येईल याचीही माहिती दया?
आता जमीन NA करण्याची गरज नाही / जमीन NA करणे हि संकल्पना अस्तित्वात राहिलेली नाही . ( नवीन कलम ४२ बी, ४२ क व ४२ ड )
आपण नियोजन प्राधिकरणाकडे बांधकाम परवानगी मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष काशिनाथ पाटील
17-02-2018
skpatil@msn.com
नमस्कार साहेब,
मी एका गावात शेतजमीन खरेदी केली आहे. त्या जागेत जाणेंयेणेंसाठी लागतच्या शेतकऱ्याकडून मोबदला देऊन कायमस्वरूपी वाहीवाट करारनामा केला. सदर करारनामा स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर केला. आता मला ह्याची नोंद त्या जागेच्या ७/१२ मधील इतर हक्कात "वहिवाईटीच्या रस्त्याचा हक्क" ह्या अधिकारात नोंद करायची आहे. तेथील तलाठी साहेबानी मला सांगितलं कि अशी नोंद होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
तहसीलदार यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे
जर ज्याचे शेतातून रस्ता घेतला आहे तो जर अडवणूक करत नसेल तर ७/१२ वर नोंद करण्याची गरज काय ?
अडवणूक केल्यास दिवाणी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
16-02-2018
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
साहेब आमचे कौलारू मातीचे सामाईक मध्ये घर आहे ,घर मिळकती वरती आमच्या 3 जनाची नावे, त्यामधील १ नं चा मोठा भाऊ सन २००३ ला मयत झाले ,त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव लागले ,नंतर मोठ्या भावाची पत्नी १५.०२.२०१६ ला मयत झाली ,त्यानंतर ,माझ्या २ न भावाची मुले व माझे नाव लागले आहे ,परंतु माझ्या भावाच्या पत्नीच्या नावापुढे कंस आहे ,पण उतार्यावरील नाव कमी का झाले नाही ,व अजून ग्रामपंचायातीच कर ,त्यांच्या नावावर येतो ,ते नाव उतार्यावरून हटवण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा हि विनंती
मला वाटते या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले आहे
नावापुढे कंस आहे म्हणजे भावाचेपत्नीचे नाव कमी झाले आहे
ग्राम पंच्यातीस घर पट्टी आपले नावावर पाठवण्यास अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
16-02-2018
rohidaskale19@gmail.com
आदरणीय मोहदय,
गावी आमची काही २ एकर शेत जमीन आहे ती माझे चुलत बंधू यांच्या नवे म्हणजे ७/१२ त्यांच्या नवे आहे. आणि नंतर त्या चुलत बंधू मध्ये वाटणी होऊन १, १ एकर ची विभागणी झाली आहे. मात्र ती जमीन
आम्हा सर्वांची सामायिक असून त्या जमिनीत माझा हि हक्क आहे.
सध्या ७/१२ वर चुलत बंधूंची नावाची नोंद आहे व त्यांच्या मध्ये सामायिक क्षेत्राची विभागणी झाली आहे.
माझ्या नावे कोणतीही शेत जमीन नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावे आहे.
माझा असा प्रश्न आहे, मला त्या जमिनीतला अर्धा हिस्सा त्यांच्या कडून घेयचा आहे. माझा हक्क आहे तो त्यांना मान्य आहे व ते अर्धी जमिनीचा हिस्सा नावाने करून देण्यास हि तयार आहेत. तर मला कश्या प्रमाणे ती जमीन नवा वर करून घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती.
कृपया पर्याय सांगावे हि विनंती.
Question by संतोष पाटील
15-02-2018
skpatil@msn.com
मी मौजे म्हसा ता. मुरबाड जी. ठाणे येथे शेत जमीन औद्योगिक वापरासाठी खरेदी केली आहे. ह्या जागेत जाण्यासाठी लगतच्या शेतकऱ्या कडून कायमस्वरूपी वहिवाट करारनामा केला. शेतकऱ्याला रीतसर मोबदला दिला नि करार स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर केला आहे.
आता मला ह्या वहिवाट करारनाम्याची रीतसर नोंद त्या शेतकऱ्याच्या ७/१२ मधील इतर हक्कात करायची आहे.
अशी नोंद करण्यासाठी लागणारी प्रोसेस कृपया मला समजावा. तसेच अशी नोंद करण्यासाठी कुठला कायदा वापरावा लागेल.
माझ्या जमिनीसाठी औद्योगिक अकृषिक करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जात वरील नोंदीची आवश्यकता आहे. तशी अटच आहे.
धन्यवाद.
महाराष्ट्र जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४८ मध्ये
अधिकार अभिलेख म्हणजे काय याचे वर्णन दिले आहे . त्यानुसार ज्या बाबीचा त्यात समाविष्ट होतात त्यांचीच ७/१२ वर नोंदी घेता येते. अन्य बाबीची नाही
रास्ता बाबतची नोंद ७/१२ वर घेता येत नाही . अर्ज समवेत करार पात्र सादर करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ashok virtual khaire
14-02-2018
ashokvkhaire42@gmail. com
नमस्कार माझा असा प्रश्न आहे की माझ्या शेजारी ल शेतकऱ्यांचे त्या नी विकले ले कमी झालेले नाही त्यामुळे त्याचे क्षेत्र वाढलेले आहे ते कमी करण्यासाठी काय करावे लागेल
Question by नरेंद्र पाटील
14-02-2018
ngpatil1311@gmail.com
सर माझं अलिबाग तालुक्यातील एका गावठाणांत राहतं घर आहे.सन 1975ला वडिलांनी ती जागा विकत घेतली होती तसा वकिलांमार्फत बॉंड पेपर केला होता.त्यावेळी सिटी सर्वे नसल्यानं रजिस्टरखत झाले नसावे.नंतर सदरील गावांत सन 1984ला सिटी सर्वे लागू झाला व गावठाणची मोजणी झाली.परंतु त्यावेळी वडील नोकरी निमित्त मुम्बईला होते व मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी घरपट्टी प्रमाणे नाव न लिहिता माझ्या आजीचे नाव व पुढे वडिलार्जित असा शेरा मारला.आता सन 2016ला शेजारील चूलत्याने वडिलार्जित या शब्दाचा अर्थ काढून आपलाही या मालमत्तेवर हक्क असलेचा दावा दाखल केला आहे.सदर दावा अनुषंगानं फेरचौकशी पण झाली.माझे वडील सन 2003मयत व ज्या चूलत्याने दावा दाखल केला त्याचे वडील सन 2000मयत माझा प्रश्न असाकी दोन्ही व्यक्ती जर फार पूर्वीच मयत असतील तरीही आताचे वारस कसा काय दावा दाखल करू शकतो.कृपया उत्तर मिळालं तर बरं होईल.
जरी असा शेरा असला तरी , बॉण्ड पेपर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना दाखवून कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
प्रॉपर्टी कार्ड वर वडिलोपार्जित असा शेरा आहे हे पटत नाही . प्रॉपर्टी कार्ड नीट पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हरिभाऊ काशीद
12-02-2018
harishk4141@gmail.com
नमस्कार सर , माझे राहते घर गावठाण जातेगाव खुर्द , तालुका - शिरूर, जिल्हा - पुणे येथे आहे. माझ्या वडिलांनी हि मिळकत २००१ साली खरेदी केली आहे. शेजारील लोकांनी अतिक्रमण करून व मी obc कुटुंबातला असून जाणूनबुजून मला जाणे - येणे साठीचा कुठलाही रस्ता ठेवला नाही. जुन्या घर मालकास हि बाब सांगितली असता जुना घर मालक सांगतो कि हि जागा विकून खूप दिवस झाले माझा काहीही संबंध नाही व खरेदीखता मध्ये रस्ता नमूद केलेला नाही, माझ्या वडिलांना फसवून जुन्या घर मालकाने आमची शेतजमीन खरेदी करून भूमिहीन केले व त्याचे घर आम्हास विकले आहे त्यावेळी आम्ही लहान होतो त्यामुळे या गोष्टीची काही समाज नव्हती.
रस्ता मिळणेबाबत ग्रामपंचायत ग्रामसेवक/सरपंच यांना ७ महिन्या पूर्वी व आत्ता पुन्हा १ महिन्या पूर्वी अर्ज केला होता परंतु मला रस्ता मिळत नाही. ग्रामपंचायत मधून फक्त पाहणी करतात या व्यतिरिक्त कुठलीही कार्यवाही होत नाही, ग्रामपंचायत मधून कुठलीही माहिती वा कागदपत्र मला मिळत नाही .
माझ्या शेजारील व्यक्तीने बखळ जागा खरेदी केली व त्याचे मोजमाप चुकीच्या पद्धतीने नोंदविले आहे ज्या वक्तीने बखळ जागा विकली तो सांगतो कि मी जागा मोजून दिलेली नाही परंतु आता ज्या वक्तीने ती जागा खरेदी केली आहे तो सांगतो संपूर्ण जागा माझी आहे त्याने अतिक्रमण व गुंडगिरी करून रस्ता बंद केला आहे . व दुसऱ्या व्यक्तीने ग्रामपंचायत जागेत जनावरांसाठी गोठा बांधला आहे. या दोन व्यक्तीं कडून माझा रस्ता बंद झाला आहे . या दोन्ही वक्तींवर राजकीय व आर्थिक वरदहस्त असल्याने या वक्ती गरिबांना त्रास देत आहे .
कृपया आपण यासाठी योग्य तो उपाय सुचवावा आणि मला रस्ता कसा, किती फूट व किती दिवसात मिळेल याबद्दल माहिती मिळावी हि विनंती .
धन्यवाद
Question by rajesh kahare
11-02-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
शेत खरेदी च्या फेरफार वर आक्षेप प्राप्त झाला तो खालील प्रमाणे
1.मूळ शेत मालकाने पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा सौदा अ बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि तुकडा पडत असल्यामुले याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सदर पूर्ण शेत ब ला खरेदी करून दिले
२.परंतु मूळ मालकाचे वारसाने त्यावर आक्षेप घेतला कि फेरफार मंजूर करू नये म्हणून
तेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले तेव्हा सर या मध्ये कसा निर्णय देणे अपेक्षित आहे
३.तत्पूर्वी याच शेत मालकाने या पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा दुसऱ्या व्यक्ती ब बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सादर पूर्ण शेत अ ला खरेदी करून दिले
तेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले या मध्ये निर्णय कसा देणे अपेक्षित आहे
जमीन मालकाने अ बरोबर केवळ सौदा केला आहे .विक्री केलेली नाही . ब ला विक्री केली आहे . ब चा फेरफार मंजूर करणे आवश्यक
वारसांचे आक्षेपाचे कारण काय आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rajesh kahare
11-02-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
शेत खरेदी च्या फेरफार वर आक्षेप प्राप्त झाला तो खालील प्रमाणे
1.मूळ शेत मालकाने पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा सौदा अ बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि तुकडा पडत असल्यामुले याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सदर पूर्ण शेत ब ला खरेदी करून दिले
२.परंतु मूळ मालकाचे वारसाने त्यावर आक्षेप घेतला कि फेरफार मंजूर करू नये म्हणून
तेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले तेव्हा सर या मध्ये कसा निर्णय देणे अपेक्षित आहे
३.तत्पूर्वी याच शेत मालकाने या पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा दुसऱ्या व्यक्ती ब बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सादर पूर्ण शेत अ ला खरेदी करून दिले
तेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले या मध्ये निर्णय कसा देणे अपेक्षित आहे
Question by rajesh kahare
11-02-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
गट विकस अधिकारी यांचे कडून प्राप्त पत्रा नुसार मिळकत पत्रिका तयार झालेला मालकी हक्क असलेला भूखंड वाढीव गावठाण करीत देण्या यावा असे म्हटले सबब तलाठी व मंडलाधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल मागितला असता सदर गावाला सरकारी शेत फ वर्ग लागून आहे असे म्हटले तेव्हा सर सदर खाजगी भूखंड वाढीव गावठाण करीत घेता येतो काय
Question by राजेंद्र शांताराम वर्तक
11-02-2018
rajendra.vartak2012@gmail.com
नमस्कार सर माझ्या मीञाने त्याच्या शेजारच्याला जायला रस्ता नाही म्हणून रस्ता दिला.मीञाचा सातबारा स्वतंञ आहे.पण अता तो माणूस त्या जागेवर हक्क दाखवतोय. माझ्या मीञाला शिवीगाळ करतोय. माझ्या मीञाने काय करावे.सर कृपया सल्ला दया. माझा मीञ साधा सरळ माणूस आहे.
रस्ता दिला म्हणजे नेमके काय केले ?
खरेदी खताने रस्ताखालील जागा दिली असल्यास त्या जागेवर त्याचा हक्क आहे . मात्र केवळ जाणे येणेसाठी रास्ता दिला असल्यास त्याला मालकी हक्क दाखवता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन दळवी
10-02-2018
sachindalvi371994@gmail.com
नमस्कार सर,मला आपणास असे विचराययचे आहे कि माझे आजोबा व त्यांचे दोन भाऊ होते आमची गावातील जमीन होती व १९८८ साली माझ्या आजोंबानी फक्त ५ एकर जमीन विकली आहे परंतु बाकीची जमीन भावकीच्या नावाने गटवारीमध्ये गेली आहे व त्यानी ती विकली आहे .ह्या प्रकरण मध्ये पुढे काय करता येईल .
Question by अमित शिर्के
10-02-2018
amitkumar.shirke@gmail.com
मा. सर
माझे आजोबा व त्यांचे बंधु यांनी सन १९६५ रोजी एक जमीन खरेदीखताने विकत घेतली होती. त्या जमिनीच्या खरेदीखतामध्ये असा उल्लेख आहे की गणपत शिर्के व शिवराम शिर्के यांनी सदरहु जमीन विकत घेतली आहे. आणि खरेदि खताप्रमाणे फेरफार सुद्धा तसाच तयार झालेला आहे.
एकुण जमीन २० एकर असल्याने माझे आजोबा १० एकर व चुलत आजोबा १० एकर अशी सध्या वहिवाटत आहेत. परंतु कोणाच्या नावावर किती जमीन आहे याचा उल्लेख खरेदीखतात व फेरफारात नसल्यामुळे आम्हांला आज रोजी आणेवारी ठरविता येत नाही. चुलत आजोबा असे म्हणतात की, मला १५ एकर जमीन हवी आहे आणि तुम्हाला फक्त ५ एकर देतो.
१. तरी आम्हांला सध्या हि जमीन माझ्या आजोबांच्या नावे निम्मी दाखल होण्यासाठी काय करावे लागेल.
२. पूर्वी जरी खरेदीखतात क्षेत्राचा उल्लेख नसला तरी आणेवारी ठरविण्यासाठी काही नियम किंवा कायदा होता का ? असल्यास मार्गदर्शन करावे.
हि विनंती
आपण मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ४५ चा आधार घ्यावा .
या कलमानुसार खरेदी किंमत ज्या प्रमाणात , दोन्ही भावांनी दिली आहे त्या प्रमाणात , मिळकतीचे वाटप होईल . मात्र जर खरेदी किंमत कोणी किती दिली या बाबत माहिती ,पुरावा नसल्यास , सॅम प्रमाणात म्हणजे १० एकर प्रत्येकी नावावर राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चिराग चौधरी
09-02-2018
chirag.chaudhari2@gmail.com
नमस्कार माझे चिराग चौधरी आहे पारोळा जिल्हा जळगाव तालुक्यात ७० चौ.मी. घर आणि ४ एकर शेती ७/१२ मध्ये मध्ये माझ्या आजोबा च्या नावावर आहे जी शेती आणि जमनी माझ्या आजोबाला वडिलोपार्जित हिस्सा द्वारा प्राप्त झाली असून जी स्वपार्जीत मिळकत असून माझ्या आजोबांनी खरेदी खत करून ७/१२ वर माझ्या काकांच्या नावावर करून दिले आम्हाला तक्रार टाकू शकता एणार का ?
आजोबांना जी जमीन त्याचे वडिलांकडून मिळाली , ती नंतर ( वाटपणानंतर ) त्या हिस्स्यापूर्ती स्वकष्टार्जित होते . त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुशांत भांडे
09-02-2018
sushantbhande@gmail.com
आम्ही राहत असलेली जमिनीचा खरेदी दस्त आहे पण ७/१२ ला नाव मूळ मालकाचेच आहे . सिटी सर्वे ला कुणाचेच नाव नाही . तरी उपाय काय
CTSO कडे दस्त सादर करा व नाव लावून घ्या .
CTSO city survey officer
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर माणिक पाटील
07-02-2018
sagar.brfl@gmail.com
किरण सर माझा प्रश्न असं आहे कि जर इनाम जमीन असेल व ती ६ ब ची इनाम (गाव सरकारी चाकरी इनाम ) असेल तर त्या जमिनीला कुल कायदा लागू होतो का ?
हा इनाम रद्द ( Abolish ) झालेला आहे .
केवळ देवस्थान , किरकोळ व सरंजाम इनाम अस्तित्वात आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रविंद्र सोनवणे
07-02-2018
Ravindravitthalrao@gmail.com
सर,
नमस्कार.
माझा प्रश्न असा आहे की, हैद्राबाद अतियात कायदा नुसार ईनाम जमिनीची विरासत कार्यवाहीसाठी विलंब नसल्यास कोणती कागदपञे देणे आवश्यक असते , क्रुपया कागदपञांची माहीती मिऴावी ही नम्र विनंती.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
