जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मा. सर
जर शासनाने एखाद्या व्यक्तीस ९९ वर्षाच्या कराराने जमीन कसण्यास दिली असेल आणि ति व्यक्ती ९९ वर्षाचा करार संपण्यापूर्वी मयत झाली व त्याला कोणीही पत्नी किंवा मुलबाळ नसेल तर त्या जमिनीचे पुढे काय होते.
१. जमीन शासन जमा होते का ?
२. ति जमीन त्या व्यक्तीचे इतर कोणत्याही नातेवाईकाला कसता येते का ?
३. जमीन शासन जमा होण्यासाठी काय करावे लागेल ?
४. ति जमीन एखादी व्यक्ती खरेदी करण्यास इच्छुक असेल व त्याप्रमाणे त्याने त्या जमिनीचा मोबदला शासनाकडे जमा केला तर त्याला ति जमीन खरेदी करता येऊ शकते का ?
इतर वारसांचे नाव भाडेपट्टा धारक म्हणून परवानगीने लावू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1)3/2 cha kharedi khat Dast bigar nond mahnje kay?
2)mazi Aaji ne 1950 Sali 1 hekter shet jamin amchya gavatlya eka manushala vikli. Pan maze vadil tevha sadnan navhte.ajobahi mayat zalele hote tar women rigth of the act 1936 nusar vidhva shtri vadloparjit jage madhe hissa gheu shakte pan ti property cell karu shakt nahi.vidhva shtrila to adhikar 1956 Dhila hota tar maza prashna asa ahe ki mazya ajine kelele kharidikhat yogya ahe ki nahi?

Question by Pratap
04-02-2018
pratap_bhargude@rediffmail.com

सर मी मौजे पळशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील रहिवाशी असून पळशी येथे एका सामायिक गटात माजी वडिलोपार्जित जमीन आहे तरी या गटातील इतर सहहिस्सेदारानी त्यांच्या हिस्साचे क्षेत्र विकले असून त्यास माजी कुठेही सहमती घेतली नाही तरी असे असताना सदर खरेदी घेणाऱ्या इसमाने भूमीअभीलेख कार्यालयातून चुकीच्या मार्गाने मोजणीची क प्रत मिळवून सदर गटातील त्याच्या हिस्सा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून बिनशेती करून घेतला आहे मला हि बाब समजताच मी उपाधीक्षक खंडाळा यांच्याकडे लेखी तक्रार दिली त्यावर मला त्यांनी तुमची हरकत मान्य करून सदर गटाची मोजणी विणकार्यवाही निकाली काढली आहे व मला तसे लेखी कळवले आहे तरी मी या संधर्भात मा.जमाबंदी आयुक्त व संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना या संधर्भात लेखी अर्ज केला त्यांनी सदर अर्ज चौकशी साठी खाली पाठवला त्यावर मला उपाधीक्षक यांनी तेच उत्तर पाठवले आहे जर मोजणी झाली नाही तर प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयातून मला माहितीच्या अधिकारातून त्याच मो.र.नंबर ची क प्रत मिळाली आहे जर मोजणी झाली नाही तर मग झालेली बिगरशेती व मंजूर झालेला रेखांकन रहिवाशी आराखडा रद्द करण्यासाठी काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे मला या मोजणी संधर्भात भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीची कोणतीही नोटीस मला आजपर्यंत आली नाही तसेच मी प्रांत अधिकारी यांना या गटाची मोजणी झाली नाही हे मला भूमिअभिलेख कडून आलेले लेखी पत्र हि दिलेले आहे तरीदेखील त्यांनी या संधर्भात मला काहीही कळवले नाही जर मोजणी झाली नाही तर भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्रांत अधिकारी यांना तसे लेखी कळवायला हवे ना भूमिअभिलेख कार्यालयाकडून मला फक्त कळवले आहे मोजणी झाली नाही त्यांनी त्यांचं काम केलं मग क प्रत बोगस किव्वा खोटी आहे हे कोण ठरवणार या संधर्भात मी काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे
ज्या अधिकाऱ्याने बीबी शेतीं परवानगी दिली आहे त्या अधिकाऱ्याकडे बिन शेती परवानगी रद्द करण्यासाठी अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी राहुल सावंत माझा ऐक प्रश्न आहे कि आपची गावी वडिलोपाजित जमीन आहेत त्या सर्व जमिनीच्या सातबारावर आमच्या मोठ्या काकांचे १९७१ मध्ये कुटुंब प्रमुक म्हणून त्यांचे नाव लागलेले होते आणि माझे वडील व लहान काका यांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये त्यांचे वारस म्हणून नाव नोंद आहे
तरी आमचे मोठे काका २०१२ मध्ये निधन झालेले आहेत त्यांच्या मुलांनी वारस तपासणी करताना फक्त आपल्याच परिवाराची वारस तपासणी करून सातबारावर नावे लावून घेतली पण या दोन्ही चुलत्यांची नावे वारस म्हणून लावली नाही. तर आम्ही आता त्याच्या ( काकांच्या मुलांच्या )परवानगी किंवा सही शिवाय तलाठ्यांकडे अर्ज करून वडिलांची वारस तपासणी करू शकतो काय ? त्यासाठी काय काय पेपर जोडावे लागतील याचे मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती
ज्या फेरफरने केवळ मोठ्या काकांच्या मुलांची नवे लागली आहेत , तो फेरफार प्रांताधिकारी यांचे कडे आव्हानात करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rajesh kahare
03-02-2018
rajeshkahare@gmail.com

सर नमस्कार
वडिलोपार्जित शेताच्या वाटणीकरिता किंवा सदर शेताच्या पोटहिस्सा( अलग-अलग सात बारा ) करीत कलाम ८५/२ चा आदेशाची भूमी अभिलेख कार्यालय कडून मागणी होते परंतु प्रकार निकाली निघत नाही कारण प्रत्यक्षात मोजणी करतेवेळी ताब्यात असलेले क्षेत्र व ७/१२ वरील क्षेत्रात फरक आढळून येतो
हा प्रकार सर्रास सगळीकडे आहे . ७/१२ वरील क्षेत्राप्रमाणे कोणीही वहिवाट करत नाही . जो वरचढ , तो स्वतःचे क्षेत्राहून अधिकचे क्षेत्र वहिवाट करत राहतो .
मात्र सरस निरस वाटप केल्यानंतर , तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होऊन , वाटप अंतिम केले जाते .
क्षेत्र तफावतीवरून , मोजणी अथवा सरस निरस प्रलंबित ठेवता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM
03-02-2018
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर ,तुमि व्हीओवाळी दिलेल्या उत्तर मुले मी योगदिशेने जात आहे . सर माझे कोर्टातच हक्कसोड पात्र झाले आहे व तयबदल्यात ली रकम मी कोर्टातच भरली आहे व त्या नंतर कोर्टहूकूमनाम मध्ये मला सर्व जमिनीचे हक्क दिले गेलेले आहेत . व हक्क सोड पात्र देण्यार्याने ते कोर्टातच मान्य केले आहे. तर तो हुकूम नामा झाला आहे त्याची नोंदणी करावा लागेल का ?
गाव नमुना ८ अ हा मालकी हक्काचा पुरावा होऊ शकते का आणि जर नसेल तर तसे शासनाचे परिपत्रक उपलब्ध असल्यास माझ्या मेल आय डी वर पाठविण्यात यावे हि विनंती
सर आमच्या वडील १९९८ साली मयत झाले आहेत नंतर काही कौंटुबीक मेतभेदा नंतर २००० साली आमची आई ,काका, आजोबा, ह्याच्या मध्ये रजिस्टर वाटणीपत्र झाले़ आहे पंरतु चावडीत नोंद केले नाही़ आता मी २१ वषाचा झालो आहे मला आता चावडीत वाठणीपत्र नोंदवायचे आहे परंतु काका व आजोबा यानी आज पयत सातबारा वर कज काढले आहे व ते कज नील केले नाहीत व आता मला ते सहकार्य करनात व7 आमच स्वताच काही कज नाही याकारणांमुळे मुळे तलाठी यांच्या कडुन वाटणी पत्र नोंद होइना कृपया मार्गदर्शन करावे
दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात नवीन घर बांधकाम करताना राज्यमार्ग पासून कमीत कमी किती अंतर सोडावे लागेल.. नवीन घर बांधकाम व राज्यमार्ग, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, गाव रस्ता, यामधील सोडावे लागणारे अंतर व नियम याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.. धन्यवाद..

Question by VIKRAM
29-01-2018
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर , कोर्टात जर हक्कसोड पत्र लहून दिले असेल व तास हुकूमनामा सुद्धा झाला असेल तर ते हक्कसोड पत्र नोंदणीकृत करावे लागते का ? व लागत असेल तर ते नोंदणी कृत कर्णयसाठी काही कालावधी उशीर झाला असेल १२ वर्ष नंतर तो नोंदणीकृत करता येईल का ?कृपया मार्गदर्शन करा .धन्यवाद
आदिवासी ते आदिवासी जमीन विक्रीचा व्यवहार विना परवानगीने झाल्यास तो नियमित करता येईल का?
कोणत्या नियमानुसार
परवानगी घेणे आवश्यक होते . नियमाकूळ करता येणार नाही
मूळ मालकास जमीन पुनर्स्थापित करावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय महोदय,

प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:

१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).

२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)

३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)

४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.

५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).

७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.

६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.

८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.

जमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.
सर
मी १९९९ सारी ४ एकर १२ आर जमीनचे खरेदीखत केले.
पण शेतकरी असल्याचे दाखला नसल्याने,२००५ पर्यत फेरनोंद झाली नाही.
२००५ मध्ये शेतकरी असल्याचे दाखला दाखल केला, तरी सुद्धा आजगायत नोंद झाली नाही.
दरम्यान सदर जमीन तील १ एकर जमीन मुळ मालकाने खरेदीखताने अन्य व्यक्तीस विकली आहे.
आता माझ्या जमीनचे खरेदीखत नोंद कशी करावी.
आपण अगोदर खरेदी केली आहे . त्यामुळे खरेदी केलेल्या पुर्न क्षेत्रास आपले नाव लागणे आवश्यक आहे .खरेदी खात रद्द करून घ्या ( दिवाणी न्यायायालयाकडून)

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vasant
28-01-2018
kodag.vasant@rediffmail.com

नमस्ते सर,
१) तलावासाठी आमची जमीन ९ वर्षया पूर्वी संपादित झाली आहे. त्यानुसार तलावाचे काम अंतिम टप्पात आहे. त्याचा निवाडा झाला नसून, भरपाई आमचे वडिलांना मिळाली नाही. आता नवीन भू सांपादन-2013 कायदयाने वाटा घाटेने भरपाई मिल्नेसाठी वडिलांची संमती पत्र घेतली आहे.त्या दरम्यान
२) एवढे सर्व झाले असताना संपादित वडिलांचे ७/१२ वरती भू संपादन मंडळाचे नाव, व वारसाची नावे नसलायमुळे त्याचे कडून गावातील मंडळींनी जमीन दोन वर्षपूर्वी पक्क्या खरेदीने घेतली व फेरफार मंजूर केला आहे.
३) तरी वारसांना लढा देता येईल, काय करावे.
३) वडिलांचे हयातीत वारसा पत्रसाठी काय करावे.
कृपया लवकर मार्गदर्शन मीलावे हि विनंती.
प्रश्न समजून येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM
27-01-2018
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर, तुम्ही माझा प्रश्नयाचे योग उत्तर दिले त्या मुले मला योग दिशा मिळत आहे. माझे व बहिणीचे हक्क सोड पात्र हे कोर्टात झाले आहे .ते नोंदणी कृत आहहे कि नाही हे कसे ठरवायचे ,कारण मी मुद्रांक आधी नियम ३३ अन्व्ये मुद्रांकित करण्यासाठी जिलाअधिकारी यांच्याकडे गेल्यावर त्यांनी दंडात्मक रक्कम मला भरावयास सांगितली होती व तिमी भरली होती त्यांनी त्या तडजोड हुकूमनायमेवर आपला स्ट्याम्प देखील मारून दिला आहे .म्हणजे तो हुकूमनामा मुद्रांकित झाला का ?कि अजून काही प्रोसिजर असते .तडजोड नामा १७/०६/२००६ साली झाला आहे .त्यावर लेटफी भरली आहे.त्यानंतरच मी तलाठी यांच्याकडे ७/१२ नोंदी साठी तो दिला होता .त्यानंतर ७/१२ सादरी नोंद हि झाली .पूण त्या आधी ती जमीन बहिणीने विकली व तिचा दस्तही झाला . आपले नवा व फार्फार प्रांत अधिकारी यांनी रद्ध केला व जमीन जायना विकली त्यांचे ७/१२ सादरी नावं लावण्याचा हुकूम दिला.आता फुडें मी दिवाणी न्यालयात दावा देखील दखल केला आहे तो दस्त रद्ध करण्यासाठी .त्या साठी अजून काय कागत तो दावा मजबूत करण्यासाठी लागतील कृपया मार्गदर्शन कराल का ?

Question by rajesh kahare
27-01-2018
rajeshkahare@gmail.com

सर नमस्कार
खातेदाराने नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवले त्यानंतर खातेदार मरण पावला तलाठ्याने सदर मृत्यूपत्राचा फेरफार घेतला व त्यासंबधीत सर्व वारसांना फेरफाराची नोटीस दिली त्यावर आक्षेप दाखल झाला प्रकरण विवादग्रस्त मध्ये नोंदवून पुढील आदेश करीत तहसील कार्यालयात पाठविले .कार्यालयाने प्रकरण पंजीबध्द करून रीतसर सर्व वारसांना नोटीस दिली .प्रकार आदेशाकरिता असून कोणत्या कलम मध्ये आदेश पारित करावा? .नोंदणीकृत मृत्यूपत्राला सत्यता प्रमाणपत्र लागेल काय ? कि तलाठ्याने , ज्याचे नावे मृत्यूपत्र करून ठेवले आहे तो फेरफार नोंद कायम ठेवावा ?
मृत्य पत्रास कोणती हरकत आली .
हरकत असल्यास प्रोबेट करून आणण्यास सांगावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय महोदय,

प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीन जर वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:

१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (१९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (१९६६).

२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (१९७४)

३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)

४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि १९८० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.

५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).

६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.

७) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस कसत आहेत.

कृपया आपल्याकडून जमीन मालक (वारस) यांना जमीन मिळवण्याच्या दृष्टीने मोलाचे योग्य मार्गदर्शन मिळेल हि नम्र विनंती करत आहे.
आम्ही कसत असलेला काही भाग सरकारी मोजणी मुळे बाजूचे गट नंबर मध्ये गेला असून आम्हाला आमचे गट नंबर मध्ये कसण्यास फारच कमी शेत जमीन शिल्लक राहिलेली आहे. कारण आमच्या गट नंबर मधील इतर सहधारकांनी सदर गट नंबर मध्ये अतिक्रमण केले आहे. ते त्यांचे नावे असलेल्या धारण क्षेत्रा पेक्षा जास्त जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून शेती करीत आहेत. अतिक्रमण केलेले लोक मोजणीकरिता सहमती देत नाहीत. आम्हाला आमची शेत जमीन परत मिळणेबाबतीत योग्य ते मार्गदर्शन करावे.
सह्धार्क संमती देत नसतील तर न्यायालयात जाने हाच एक पर्याय

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१) एका शेत जमिनीत आमचा गेली ४० वर्ष ताबा होता व सरकारी मोजणी नंतर सदर शेत जमीन बाजूचे गट नंबर ची असलेचे समजले. त्या जमिनीचे ७/१२ वर आमचे नाव नाही त्यावर आम्ही हक्क सांगू शकतो का ?
२) आमचे मूळ गट नंबर मध्येही इतर सहधारक यांनी अतिक्रमण केले आहे आम्ही कसत असलेली जमीन हि शेजारील गट नंबर मध्ये जाते मग आम्ही आमचा हिस्सा इतर सहधारक यांचेकडून कसा मिळवू शकतो सदर लोक सरकारी मोजणी करीता सहमती देत नाही आहेत याबाबत मार्गदर्शन करावे .
३) सदर सहधारक लोक त्यांचे मालकी क्षेत्रा पेक्षा जादा जमीन ३०-४० वर्ष कसत असले तरी आम्ही गेली ४० वर्ष कसत असणारी जमीन मोजणी मुळे गेली आहे. सदर सहधारक यांचे नावे ते कसत असलेल्या क्षेत्रा पेक्षा खूपच कमी जमीन ७/१२ पत्रकी नावावर आहे पण ते लोक आमचा हिस्सा आम्हाला देत नाही आहेत. याबाबत मार्गदर्शन करावे .
माझा वडील मृत्यू आहेत वडिलांच्या दोन पत्नी त्याच्यातली पहिली मृत्यू झाली तिचा पंच्यात तिला ६ वारस आहेत त्याचा नंतर दुसरी पत्नी आहे तिला १ वारस आहे तर सादर ८० गुंठे मिळकतीत पहिल्या पत्नीच्या वारसांना व दुसऱ्या पत्नीच्या वारसांना किती हिंसा मिळेल
पहिल्या पत्नीचे ६ वारस व दुसर्या पत्नीचा १ वारस असे ७ हिस्से मिळकतीत होतील
दुसरी पत्नी हयात असली तरी तिला मिळकतीत हिस्सा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
माझे आजोबा यांचे नावे १६ एकर जमीन असून त्या जमिनीवर आम्ही २०१५ मध्ये ३ लाख रुपये एवढे बँकेचे कर्ज घेतले आहे.
सध्या आम्हांला माझ्या आजोबांच्या नावावरील सर्व जमीन माझे वडील आणि २ चुलते यांचे नावावर समान रुपात बक्षीस पत्राद्वारे घ्यायची आहे. त्यासाठी सर्वांची संमती आहे.
ज्यावेळेस आम्ही यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हास बँकेचा बोजा कमी केल्याचे पत्र मागितले आहे. व असे सांगितले आहे की, बोजा कमी केला तरच बक्षीस पत्राची नोंदणी होईल अन्यथा नाही.
तरी माझी आपणांस अशी विनंती आहे की, जर जमिनीवर बोजा असेल तर नोंदणी करता येऊ शकते का ? याबाबत कोणते नियम आहेत.
आम्हांला जमिनीचे वाटप बक्षीस पत्रानेच करावयाचे आहे परंतु आम्ही सदर बोजा कमी ण करता वाटप करून घेऊ इच्छित आहोत, तरी ते कसे करता येईल.
याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.
गावातील एका व्यक्तीने माझ्या आजोबाना १९६६ साली एका जमीन विक्रीचे संचकार पत्र केले होते पण त्याने खरेदी पत्र करून दिले नाही संचकार पत्र मध्ये kalavadhiche बंधन नाही .तसेच जमीन हि आजतागायत आमचेकडे ताब्यात आहे .पण मालक सादरी अजून त्याचे नाव ahe. जमिनीचा ताबा sanchkarptra नुसार आला आहे .तरी आम्ही या जमिनीच्या मालक सदरी येण्यासाठी Kay करावे.
संचकार पत्र काय आहे ? त्यातील नमूद तपशील पाहिल्याशिवाय मत नोंदवता येणार नाही . कृपया संचकारपत्रकाची प्रत मेल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार
ज्या तालुक्याला पुरवठा निरीक्षकांचे पद नसेल त्या ठिकाणी धान्य पास करणे व परमिट वर स्वाक्षरी कोण करतात
ज्यांचेकडे या कामाचा कार्यभार दिला असेल असा कर्मचारी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,मला आपणास असे विचराययचे आहे कि माझे आजोबा व त्यांचे दोन भाऊ होते आमची गावातील जमीन होती त्याची वाटणी झाली नव्हती.माझे वडील लहान असताना माझी आजी वारली व माझे आजोबा दारूच्या आधीं गेलेत व त्यांचा ३ नंबरच भाऊ पेन वारला होता व ते दारूच्या आधीं झाले होते.त्या गोष्टीचा फायदा घेवोन .त्यांच्या २ नंबरच्या भावाने दारूच्या नशेत घरात त्याच्या कडून सिग्नेचर करून घेतले व वाटणी करू असे करत करत २ नंबरच भाऊ पेन वारला त्याच्या बायकोने मी तुमच्या मुलाला हिंसा देईल असे सांगून दिला नाही त्या बदल्यात बुलडाणा झिल्ला मदे जी ३ एकेरी जमीन होती त्यात १.५ जमीन फक्त दिली व साताऱ्यात १८ एकेरी मदे काहीच नाही २ घी बावची जमीन एकट्याने बळकावली आमी गरीब आहोत त्यामुळे त्याच्या विरुद्ध खटला टाकू शकले नाही आमचे आजोबा आणि वारले आज या गोष्टीला २५ वर्ष झाली आता आपण मला या बद्दल मार्ग सागा
वाटप फसवणूक करून घेतले , हि बाब आता २५ वर्षांनंतर आव्हानात करता येणार नाही . त्यात आपले आजोबा मयत झाले आहेत . त्यामुळे फसवणूक झाली आहे हे सिद्ध कसे करणार . कायद्यामध्ये Who is prior in time is prior in law .
सद्य स्थित , आपण वकिलाचे सल्ल्याने , देय हिस्स्याप्रमाणे , जमिनीचे सरस निरस वाटप करून , जमिनीचा ताबा मिल्ने बाबत The Specific Relief Act खाली दिवाणी दावा करता येईल का ? हे पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शेत जमिनी/ बागायती जमीनी खालून आणि / किंवा बांधावरून जर ग्रामपंचायतिची पाण्याची लाईन गेली असेल तर जमीन मालकांवर कोणते निर्बंध असतात किंवा त्याचा काही मोबदला मिळतो का? आणि पुढे जर ती पाईप लाइन फुटली किंवा त्याचे काम निघाले तर त्यामुळे होणारे नुकसान भरपाई मिळते का?
जमिनीवरून pipe line नेण्यासाठी , जमीन संपादित करणे आवश्यक . आपण नुकसान भरपाई ग्राम पंचायतीकडे मागा . न दिल्यास आपण नुकसान भरपाई मिळणेसाठी दावा दाखल करू शकता .
आपण अश्या pipe line हानी न पोहचवणे हे आपले निर्बंध आहेत .
pipe line सुस्थित ठेवणे हे ग्राम पंचायतीचे काम आहे . pipe line फुटून , नुकसान झाल्यास , आपण Under law of Tort नुकसान भरपाई मिल्ने बाबत दावा दाखल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3