जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संजय इंगळे
09-12-2017
neelamsingle@gmail.com
वारसा हक्क स्थापित करण्या विषयी –(तालुका – दापोली)
सर,
नमस्कार
माझ्या आजोबानी १९६९ ला मृत्यपत्र केले होते (मृत्यूपत्राची प्रत आम्हाला आता मिळाली आहे) आजोबांना एकूण 5 मुली होत्या .परंतु त्यांनी मृत्यूपत्रात त्यांची प्रॉपर्टी व प्रॉपर्टी विषयीचे सगळे अधिकार एकाच मुलीला दिले होते कारण तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. मृत्यूपत्रात त्यांनी माझ्या आईला आणि एका मावशीला मृत्य नंतर कोणतेही अधिकार राहणार नाहीत असे नमूद केले होते ( कारण त्या दोघीनी आंतरजातीय विवाह केला होता ).
ह्या मृत्यूपत्रा बरोबर एक खरेदीपत्र हि आमच्या हाती लागले आहे जे १९८२ चे आहे. ह्या खरेदी पत्रानुसार आजोबानी त्यांची प्रॉपर्टी ३०००० रुपयात त्यांच्या दोन मुलींना खरेदी दिली अशी नोंद आहे (माझी आई आणि एक मावशी ज्यांनी आंतर जातीय विवाह केला त्यांना सोडून )
वरील मृत्यूपत्र आणि खरेदीपत्रा बरोबर आम्हाला आजोबांच्या मृत्यू नंतरची (मृत्यू दिनांक १७/०१/१९८३) वारसा नोंद वहीचे दस्तावेज मिळाले आहेत. त्या वारसा नोंदी मध्ये वारसदार म्हणून माझी आई, मावश्या आणि आजी अशी एकूण पाच नावे लागलेली दिसत आहेत. परंतु ह्या वारसा नोंदी नंतर मिळणारी नोटीस माझी आई व मावशीला मिळाली नव्हती.
माझ्या आईचा सन १९८६ मध्ये मृत्यू झाला तेव्हा मी आणि माझी बहीण लहान असल्यामुळे आम्हाला ह्या जमिनी विषयी घडलेल्या घटनांची काहीही माहिती नव्हती. त्या शिवाय माझ्या जा मावशीला प्रॉपर्टी मध्ये काहीही मिळाले नाही, तिचा आजोबा आणि आजीच्या मृत्यूनंतर घराशी संबंध तुटल्यामुळे तिने सुद्धा ह्या विषयात काहीही माहिती घेतली नाही .
सध्या ती प्रॉपर्टी १९८२ च्या खरेदीपत्रानुसार एक मावशी आणि दुसऱ्या मावशीच्या मुलाच्या नावे आहे (मावशीच्या मृत्यू नंतर वारस म्हणून त्याच्या नावाने लागली)
प्रॉपर्टी रिडेव्हलोपमेंट करायची आहे म्हणून बिल्डरने वारसापत्र पाहून आम्हाला म्हणजे मला आणि मावशीला (जिला प्रॉपर्टी मध्ये काहीही मिळाले नाही आणि सध्या जीवित आहे) काही पैसे देऊ केले आहेत
ह्या संदर्भात मला काही प्रश्न आहेत आणि त्याच्या उत्तरांची तुमच्या कडून अपेक्षा आहे
१. १९६९ ला मृत्यपत्र केल्यानंतर १९८२ ला आजोबानी दोन मुलींच्या नांवें खरेदी पत्र केले ते योग्य आहे का ? ( ते त्यांच्याकडून जबरदस्ती ने करवून घेतल्याचे बोलले जाते कारण मृत्यपत्र केल्यानंतर काही वर्षांनी आजोबा माझ्या आईला भेटायला येत होते )
२. वडिलांची प्रॉपर्टी मृत्यपत्र नुसार मिळणार असताना हि ती प्रॉपर्टी त्यांच्या हयातीत खरेदी पत्र करून स्वतःचा नावे करून घेण्या मागे दोन्हीं मावशीचा काही हेतू असू शकतो का ?
३. कायद्यानुसार ह्यातील कोणते दस्तावेज मृत्यपत्र (१९६९) कि खरेदी पत्र (१९८२) ग्राहय मानले जाईल
४. ह्या प्रॉपर्टी मध्ये आता आम्हाला (मला आणि मावशीला) वारसा हक्काने हिस्सा मिळू शकतो का ?
५. ह्या विषयी काय केल्याने त्या प्रॉपर्टी चे आम्ही हि वारसदार आहोत हे सिद्ध होईल?
६. RTI च्या अंतर्गत अजून काही माहिती मिळू शकते का ?
धन्यवाद कृपया मार्गदर्शन करावे.
१. मनुष्य हयात असे पर्यंत कितीही वेळा मृत्य पत्र करू शकतो .मृत्य पत्र केले म्हणजे मनुष्य मिळकत हस्तांतरित करू शकत नाही अशे नाही . मृत्यपत्र नंतर केलेले कझारेदी खात योग्य आहे .
२. मिळकत स्वतःचे नवे करून घेणे
३.खरेदी पात्र ग्राह्य आहे
४.नाही
५. आता काही करणे अवगढ आहे
६. आपणस या अनुषंगाने जी माहिती आवश्यक आहे व ती संबंधित खात्यात उपलबध आहे ती मिळू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
08-12-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जातीतील उमेदवार इतर मागासवर्ग / SC /इतर प्रवर्गात अर्ज दाखल करू शकतात का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
नाही . ज्या प्रवर्गासाठी प्रभाग राखीव आहे त्याच प्रवर्गातील व्यक्तीने अर्ज दाखल करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुनीत निकम
08-12-2017
sunit.nikam@adityabirla.com
सर, माझ्या पणजोबांना तीन अपत्य होती. त्यातील तिसऱ्या अपत्याला म्हणजे माझ्या आजोबाना माझी आई धरून ३ मुली व ३ मामा अशी ६ अपत्य होती. आजोबांच्या मृत्यू नंन्तर माझ्या मामानी त्यांच्या तीनही बहिणींना न सांगता आजोबांच्या वाट्याची जमीन तीनही भावांच्या नावावर करून घेतली. ते करताना त्यांनी प्रतिज्ञा पत्रक तीनच भाऊ असल्याचे बनवले होते जे चुकीचे आहे. तीनही भाऊ हे govt. employee आहेत, व त्यांना कायद्याचे ध्यान आहे. तरीही त्यांनी मुद्दामून असेल प्रतिज्ञा पत्रक बनवून. स्वतःची नावे लावून घेतली.
आमची जमीन हि मुंबई-गोआ महामार्गासाठी अधिग्रहण होत आहे. त्या संबंधित आम्हाला जेव्हा दुसऱ्या नातेवाइकांचा फोने आला आणि आम्ही ७/१२ पहिला. व हि तीनच नावे कशी लागली याचा खुलासा मागितला तेव्हा प्रतिज्ञा पात्र बद्दल कळले.
जेव्हा आम्ही आमची नवे लावायला गेलो तेव्हा आम्हाला उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कुडाळ यांच्या कार्यालयात सादर फेरफार विरुद्ध अपील दाखल करण्यास सांगण्यात आले. तसे आम्ही केलेही आणि त्यांचा निकाल हि आमच्या बाजूने लावण्यात आला आहे.
पण या सर्व काळात. त्या तिघांच्या बँक खात्यात जमीन अधिग्रहणाची रक्कम त्यांनी पुन्हा प्राधिकरणाला तीन भाऊ असल्याचे सांगून व जुने ७/१२ दाखवू मिळवून घेतली आहे.
मला खालील बाबतित मध्ये आपला सल्ला हवा आहे.
१. तो अपील माझ्या बाजूने लागला आहे. व आता ७/१२ वॉर नावे लागण्या साठी फेरफार नोंद वहीत मला फेरफार करून घ्यावयाचा आहे. तर तो कसा करावा व त्या नंतर ७/१२ वॉर नाव लावण्या साठी कश्या पद्धतीने अर्ज करावे लागतील.
२. जी रक्कम प्राधिकरणाने त्या तीन भावांच्या खात्यात जमा केली आहे. त्यातील आम्हा तीन बहिणींचा हिस्सा आम्हाला मिळवण्या साठी काय कायदेशीर कारवाई करावी लागेल.
३. मला कायदेशीर कारवाई साठी न्यायालयातच जावे लागेल का? कि इतरही काही मार्ग आहेत?
४. असे खोटे प्रतिज्ञापात्र दिल्या बद्दल त्यानं वर काही कारवाई होऊ शकते का.
५. ज्या प्राधिकरणाने त्यांना जमीन अधिग्रहण संभंधित रक्कम दिली आहे. त्यांच्या निदर्शनास मी हा खोटे पण कसा आणू. आणि ते त्यानंवर काही कारवाई करतील का?
१. जर आजोबांची सर्व जमीन संपादित झाली असेल तर , अपिलाचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल तरीही ७/१२ सादरी अंमल देता येणार नाही . मात्र , संपादित क्षेत्र सोडून अजून काही जमीन शिल्लक असेल व त्यास केवळ , आपल्या मामांची नावे असतील , तर आपल्या आईचे व मावशीची नावे लागणारच .
२. आपणास न्यायालयात आपल्या हिस्स्याची रक्कम मिळण्यासाठी दावा दाखल करावा लागेल
३.होय . नुकसान भरपाई रक्कम , मामांचे खात्यात जमा झालेली असल्यास , न्यायायलायचे मार्गशिवाय , अन्य मार्ग उपलब्ध नाही .
४.आपण भारतीय दंड संहिता खाली त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करू शकता
५.खोटेपणा निदर्शनास आणू देऊ शकता . आपण कारवाई सुरु करणे योग्य
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vilas misal
07-12-2017
vilaspmisal@gmail.com
आदरणीय सर. (अ) ने विकत घेतलेला प्लॉट र.जी. आधारे 1991 मध्ये विकत घेतला व त्याने (ब) ला 1993 मध्ये रजिस्टरी आधारे विकला, तोच प्लॉट (क) ने रजिस्टरी आधारे 1997 ला विकत घेतला, 'अ' आणि 'ब' ह्या दोघांचा फेर झाला नाही, आता 'क' ला फेर चढवायचा आहे या साठी काय करावे लागेल
तुम्ही काही करण्याची गरज नाही . अ, ब व क चे खरेदी खात प्रत व अर्ज तलाठी महोदय यांचेकडे सादर करा . सोबत वरील घटनाक्रम नमूद करून अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय इंगळे
07-12-2017
sunjjoyingley@gmail.com
वारसा हक्क स्थापित करण्या विषयी –(तालुका – दापोली)
सर,
नमस्कार
माझ्या आजोबानी १९६९ ला मृत्यपत्र केले होते (मृत्यूपत्राची प्रत आम्हाला आता मिळाली आहे) आजोबांना एकूण 5 मुली होत्या .परंतु त्यांनी मृत्यूपत्रात त्यांची प्रॉपर्टी व प्रॉपर्टी विषयीचे सगळे अधिकार एकाच मुलीला दिले होते कारण तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. मृत्यूपत्रात त्यांनी माझ्या आईला आणि एका मावशीला मृत्य नंतर कोणतेही अधिकार राहणार नाहीत असे नमूद केले होते ( कारण त्या दोघीनी आंतरजातीय विवाह केला होता ).
ह्या मृत्यूपत्रा बरोबर एक खरेदीपत्र हि आमच्या हाती लागले आहे जे १९८२ चे आहे. ह्या खरेदी पत्रानुसार आजोबानी त्यांची प्रॉपर्टी ३०००० रुपयात त्यांच्या दोन मुलींना खरेदी दिली अशी नोंद आहे (माझी आई आणि एक मावशी ज्यांनी आंतर जातीय विवाह केला त्यांना सोडून )
वरील मृत्यूपत्र आणि खरेदीपत्रा बरोबर आम्हाला आजोबांच्या मृत्यू नंतरची (मृत्यू दिनांक १७/०१/१९८३) वारसा नोंद वहीचे दस्तावेज मिळाले आहेत. त्या वारसा नोंदी मध्ये वारसदार म्हणून माझी आई, मावश्या आणि आजी अशी एकूण पाच नावे लागलेली दिसत आहेत. परंतु ह्या वारसा नोंदी नंतर मिळणारी नोटीस माझी आई व मावशीला मिळाली नव्हती.
माझ्या आईचा सन १९८६ मध्ये मृत्यू झाला तेव्हा मी आणि माझी बहीण लहान असल्यामुळे आम्हाला ह्या जमिनी विषयी घडलेल्या घटनांची काहीही माहिती नव्हती. त्या शिवाय माझ्या जा मावशीला प्रॉपर्टी मध्ये काहीही मिळाले नाही, तिचा आजोबा आणि आजीच्या मृत्यूनंतर घराशी संबंध तुटल्यामुळे तिने सुद्धा ह्या विषयात काहीही माहिती घेतली नाही .
सध्या ती प्रॉपर्टी १९८२ च्या खरेदीपत्रानुसार एक मावशी आणि दुसऱ्या मावशीच्या मुलाच्या नावे आहे (मावशीच्या मृत्यू नंतर वारस म्हणून त्याच्या नावाने लागली)
प्रॉपर्टी रिडेव्हलोपमेंट करायची आहे म्हणून बिल्डरने वारसापत्र पाहून आम्हाला म्हणजे मला आणि मावशीला (जिला प्रॉपर्टी मध्ये काहीही मिळाले नाही आणि सध्या जीवित आहे) काही पैसे देऊ केले आहेत
ह्या संदर्भात मला काही प्रश्न आहेत आणि त्याच्या उत्तरांची तुमच्या कडून अपेक्षा आहे
१. १९६९ ला मृत्यपत्र केल्यानंतर १९८२ ला आजोबानी दोन मुलींच्या नांवें खरेदी पत्र केले ते योग्य आहे का ? ( ते त्यांच्याकडून जबरदस्ती ने करवून घेतल्याचे बोलले जाते कारण मृत्यपत्र केल्यानंतर काही वर्षांनी आजोबा माझ्या आईला भेटायला येत होते )
२. वडिलांची प्रॉपर्टी मृत्यपत्र नुसार मिळणार असताना हि ती प्रॉपर्टी त्यांच्या हयातीत खरेदी पत्र करून स्वतःचा नावे करून घेण्या मागे दोन्हीं मावशीचा काही हेतू असू शकतो का ?
३. कायद्यानुसार ह्यातील कोणते दस्तावेज मृत्यपत्र (१९६९) कि खरेदी पत्र (१९८२) ग्राहय मानले जाईल
४. ह्या प्रॉपर्टी मध्ये आता आम्हाला (मला आणि मावशीला) वारसा हक्काने हिस्सा मिळू शकतो का ?
५. ह्या विषयी काय केल्याने त्या प्रॉपर्टी चे आम्ही हि वारसदार आहोत हे सिद्ध होईल?
६. RTI च्या अंतर्गत अजून काही माहिती मिळू शकते का ?
धन्यवाद कृपया मार्गदर्शन करावे.
Question by पंकज कागणे
03-12-2017
pankajkagane@gmail.com
सर जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथून आंतर जिल्हा बदलीने एक कनिष्ठ लिपिक जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे रूजू झाले आहे. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे असतांना महसूल अहर्ता परीक्षेतील 3 विषयांत सूट मिळालेली होती म्हणून त्यांनी फक्त 4 विषयांची परीक्षा दिली तर चालेल का सर. की महसूल विभाग बदलल्यामुळे संपूर्ण विषयाची पुन्हा परीक्षा द्यावी लागले. याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by Avinash Rasam
02-12-2017
Avinashrasm522@gmail.com
सर.दिवाणी दाव्यात सात बारा सदरी आठ नावे असताना एकाला पक्षकार न करता दावा चालु शकतो का
न्यायालयात , ७/१२ वरील , ज्या भोगवटादाराचे नाव , पक्षकार म्हणून सामील केलेले नाही , त्याचे नाव आवश्यक पक्षकार म्हणून समाविष्ट करणे बाबत , न्यायालयात अर्ज करा .
अश्या व्यक्तीस आवश्यक पक्षकार समाविष्ट न केल्यास , न्यायालय , असा दावा dismiss करू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ललित सोनार
01-12-2017
lalitsonar0798@gmail.com
नमस्कार सर, आम्ही एक ३०० स्के.फुट घर खरेदी केले आणि त्याचा सर्व व्यवहार हा स्टँम्प पेपर वर केला व आमच्या कडे ७/१२ नाही आहे तर त्या स्टँम्प वरुन आमची मालकी सिद्ध होईल का? नाही तर ती सिद्ध करण्यासाठी काही मार्ग सुचवा हि विनंती.......
अनोंदणीकृत व्यवहाराला कायदेशीर आधार नाही . आपण खरेदी केलेले घर नोंदणीकृत दस्ताद्वारे नोंदवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदिप
30-11-2017
sandeepwalunj6163@gmail.com
नमस्ते,
एखाद्याचे.,
जात प्रमाणपत्र ( kunbi/ OBC) काढण्यासाठी दिलेला अर्ज व त्या सोबतचे इ. दस्तऐवज RTI मधून मिळू शकतो का?
जर, त्यास ५ वर्षाचा काळ झालेला असेल?
त्या बाबत फक्त महिती आहे, प्रमाणपत्राची प्रत व दिंनाक नाही,
कोणाकडे RTI अर्ज करावा तहशिल, प्रांत.
Question by योगेश प्रभावळकर
30-11-2017
yogesh_prabhavalkar@rediffmail.com
नमस्कार सर,सहकारी गृहनिर्माण संस्थे अंतर्गत येणाऱ्या रहिवासा करिता देण्यात आलेल्या शासकीय भूखंडाचे सब डिव्हिजन करता येते का? येत असल्यास पूर्ण भूखंडाच्या किती प्रमाणात करता येते?
सहकारी गृहनिर्माण संस्थेतेतील एकूण सदस्यांची संख्या विचारात घेऊन , भूखंड प्रदान केलेला असतो . अश्या भू खंडाची विभागणी करण्यासाठी , ज्या विभागाने ( शासनाने / अन्य नियोजन प्राधिकरणाने ) भू खंड दिलेला आहे त्यांची परवानगी आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर माणिक पाटील
28-11-2017
sagar.brfl@gmail.com
सर माझी ६ ब इनामाची जमीन आहे .तर माझा प्रश्न असा आहे कि इनाम ६ ब ला कुल कायदा लागू होतो का ?
Question by जयवंत संपतारो पाटील
28-11-2017
sjay_patil@yahoo.co.in
महोदय किरण बानुगडे सर,
मी जयवंत संपतराव पाटील रा.गुढे ता-पाटण जिला-सातारा येतील रहिवाशी असून माझे वडील आणि चुलते (दोघेही मयत झाले आहेत ) यांनी ३० ते ३५ वर्षांपूर्वी आपली २० गुटे जमीन महाराष्ट्र शासन चा पाटबंधारे खाते ला नोकरी लावतो या तोंडी आसवासन वरती दिली आहे. आम्ही आजपर्यत कोणताही मोबदला घेतला नाही. खुप वेळ अर्ज आणि प्रत्यक्ष भेटून आणि विनंती करून आमचा कुटूंबातील कुणालाही महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी लागलेली नाही.
जर आम्हाला आमची जमीन परत घायची असेल तर काय केले पायचे? नाही तर बाजारभावाप्रमाणे आम्हाला जमीनीचा मोबदला मिळेल काय? तो मिळवणासाठी काय करावयाला लागेल. याची माहिती मिळेल काय?
आपणास सध्या स्थित , जमीन परत मिळणार नाही . परंतु जमिनीचा मोबदला मिळू शकतो . ज्या वेळेस आपण जमीन , पाटबंधारे खात्यास जमीन दिली त्यावेळेस , आपल्या व पाटबंधारे खात्यात काही करार झाला होता का ? कि आपण जमीन स्वखुशीने दिली आहे . त्यावेळेसच्या , काही दस्त असतील , तर आपण जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक बुवाजी पाटील
27-11-2017
Vbpatil96@gmail.com
चारिटेबल ट्रस्ट ने नोंदणी करताना त्याची घटना जोडली नसेल तर नोंदणी क्रमांक मिळतो का व तो ट्रस्ट नोंदणीकृत samajava का.ट्रस्ट नोंदणीकृत आहे कि नाही हे कसे pahave. ट्रस्ट ला नोंदणी क्रमांक नसेल तर तो ट्रस्ट नोंदणीकृत असतो का ?
महाराष्ट्र धर्मादाय न्यास कायदा , कलम १८ नुसार , न्यासाचे ( trust ) ची नोंदणी केली जाते . व या कलमानुसार घटना देणे अनिवार्य आहे .
न्यास नोंदणीकृत आहे कि नाही , हे पाहण्यासाठी आपल्या विभागाचे , सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात , चौकशी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by santosh more
27-11-2017
santoshpmore9@gmail.com
सर,
माझ्या वडिलांनी व चुलत्यांनी संमतीने जमिनीचे वाटप करून आणेवारी नोंद केली परंतु प्रत्यक्ष वाटप अंदाजे केले होते सदर जमिनीची मोजणी केल्यानंतर आमचे वाटणीस १० गुंठे खेत्र कमी आहे.माझे वडील व चुलते दोघेही हयात नाहीत. सदर क्षेत्राची सरकारी मोजनी करून बाहेरील अतिक्रमण आहे का हे सुद्धा पाहिले व त्यानंतर सदर क्षेत्राची मागणी केली असता चुलत भावाने सदरचे क्षेत्र देण्यास नकार दिला . सदर गटामधील आमचा हिस्सा आनेवारीनुसार मिळणेसाठी काय करावे लागेल.
मिळकतीतील हिस्सा मिल्ने बाबत , The Specific Relief Act खाली दिवाणी दावा दाखल करावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विक्रम YADAV
25-11-2017
vikram.vy11135@gmail.com
सर नमस्कार , तूमहिकेलेयल्या मार्ग दर्शन मुले मी दस्तनोंद थांबविण्यासाढी अप्पर जिला अधिकारी यांच्याकडे अपील ढकल केले आहे .त्याचप्रमाणे दिवाणी न्यालयात दस्तबेकादेशीर आहहे हे सिद्ध करण्यासाठी दावा दाखल करतो आहे ,पण त्या दस्ताची अग्रेमेन्ट रक्क्म सात लाख आहे ,तर दिवाणी दावा दाखल करण्या साठी मला दिवाणी न्यालयात स्टायपें रक्कम भरावी लागते का ? व किती ?तो दस्त बेकादेशीर कार्यनीसाठी मला ती रकम न्यालयात भरावी लागेल का ? त्या नंतर तो दस्त रद्ध होईल का ?कृपया मार्ग दर्शन कर्वे धन्यवाद .
आपण न्यायालयाचे अधीक्षक यांचेकडे दावा प्रत सादर करा . कोर्ट फी किती भरावी लागेल ते adjudicate करतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी राजेमहाडिक
25-11-2017
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब,
नमस्कार,
सिटी सर्वे १९९५ साली झाला त्यावेळी आम्ही सदर जागेच्या शेजारची जागा ज्याला भाड्याने दिली त्याचे नाव आताच्या आमच्या जागेला ला लागले. त्यानंतर १९९७ साली ग्रामपंचायतीने सदर जागेला ग्रामपंचायत उतार्याला ग्रामपंचायतीची नोंद डायरेक्ट केली. मग आम्ही ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारात अर्ज देऊन नोंदी बाबत पुरावा मागितला त्यांना देता आला नाही . मग आम्ही आमच्या आजीनी सदर जागेवर हक्क सांगितलेला पुरावा दिला व आमची नोंद करून सिटी सर्वे सातारा यांच्याकडे अपील दाखल केले ते अपील चालू असताना ग्रामपंचायतीने पुन्हा आम्हे नाव कमी करून ग्रामपंचायतीचे नाव पूर्ववत केले ते नाव पूर्ववत करताना आम्ही त्यांना नोंदीत बदल करू नये म्हणून नोटीस दिली त्याचे उत्तर न देता व आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी न देता त्यांनी नोंद पूर्ववत केली व थर्ड पार्टी म्हणून अर्ग्युमेण्ट वेळी हजर झाली त्याचा निकाल २०१६ मध्ये लागला व त्यानंतर सातारा भूमी अभिलेख न्यायालयाने तालुका भूमी अभिलेख न्यायालयाला जागेवर जाऊन प्रत्यक्ष्य पाहणी करून निकाल द्यावा त्यानुसार तिथे तारखा चालल्या त्यावेळी ग्रामपंचायत हजर होती ते जागेवर आले त्यावेळी ग्रामपंचायतीने आक्षेप घेतला नाही- त्यांनी २०१७ च्या मे महिन्यात निकाल दिला- मुदत संपल्यानंतर आम्ही रीतसर मोजणी मागवून हद्द फिक्स करून घेतली. त्यावेळी ग्रामपंचायतीने हरकत घेतली नाही. आणि मोजणी नुसार आम्ही सिमेंट पोल लावून घेतले मोजणी ३/११/२०१७ रोजी दुपारी २:३० वाजता संपली त्यानंतर सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांनी आम्हाला त्याच दिवशी ३:०० वाजता ग्रामपंचायतीची नोटीस दिली कि अतिक्रमण करू नये म्हणून चालेल का? त्या नोटीसला आम्ही उत्तर दिले आहे त्यात त्यांना रिप्लाय द्यायला १५ दिवसांची मुदत दिली परंतु त्यांनी रिप्लाय दिला नाही . आता आम्ही प्रॉपर्टी कार्ड नुसार दिनांक १४/११/२०१७ रोजी ती जागा विकली आहे- आता ग्रामपंचायत काय करू शकते का ? आम्ही काय करावे ?
भूमी अभिलेख खात्याने तुमच्या बाजूने निकाल दिला आहे व तुमचे नाव संबंधित भूखंडास लागल्यानंतर , आपण भू खंड विकला आहे .
ग्राम पंच्यात , मिळकत त्यांचेकडे मिळणेसाठी सर्व प्रयत्न करेल . मात्र त्यांना त्यात यश मिळेल असे नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक बुवाजी पाटील
23-11-2017
Vbpatil96@gmail.com
Maze aajoba 1954 pasun sanrakshit kul ahet. Pan 1971 la mayat zale आहेत तेव्हापासून अजून आम्ही कुल म्हणून वारस नोंद केली नाही .फक्त पीक पाहणीला नाव आहे .वारस नोंद करण्यासाठी काय करावे
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४० अन्वये , कुल वहिवाट वंशपरंपरागत आहे . आजोबा नंतर आपले वडिलांचे /.चुलत्यांचे नाव लागणे आवश्यक आहे . मामलतदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर दत्तात्रय पगार, तलाठी.
22-11-2017
pagardd@gmail.com
आदिवासीची जमीन जी भोगवटदार वर्ग २ आहे, तसेच इतर अधिकारात “नवीन अटी शर्ती” असा शेराही आहे. अशी जमीन बिनशेती (अकृषिक) झाल्यानंतर व आदेशात काही उल्लेख नसेल तर त्या जमिनीचा भोगवटदार वर्ग काय राहील? तसेच इतर अधिकारातील “नवीन अटी शर्ती” व “आदिवासीची जमीन” या शेऱ्यांचे काय करावे?
जमिनीचा भोगवटादार वर्ग २ असाच राहणार .
जमीन जरी बिनशेती झाली तरी , भोगवटादार सादरी आदिवासी खातेदाराचेच नाव असल्यास इतर अधिकारी सदरी , आदिवासी खातेदार अशी नोंद राहणारच
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
22-11-2017
shankarbkakade@gmail.com
आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
१) पीकपाहणीस नाव लावणे साठी अत्ता अर्ज करता येईल का ,पिकपाहणीस नाव कधी लावता येईल जमीन आम्हीच कसतो आहे,,
२) शेतात सध्या भाजीपाला लागवड केली आहे त्याकरिता पीकपाहणीस नाव दाखल करता येईल का?
कधी पिकपाहिनीस नाव लावता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे नम्रविनंती..
पिकपाहणीस नाव लावणेसाठी , आपण जमीन कायदेशीररितीने कसत असाल तर , अर्ज करता येईल .
जमीन कायदेशीर रित्या कसणे म्हणजे , आपल्या कसवणूकीस , जमीन मालकाची तोंडी अथवा लेखी संमती असणे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
19-11-2017
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर
आमची जमीन सामायिक आहे आणि या सामायिक जमिनीमध्ये आमचे घर आहे , घरपट्टी आमच्या नावाची आहे तसेच आमची वहिवाट आमची आहे , पूर्वीपासून जमीन आम्हीच कसत आहोत , जमिनीचा दस्त आम्हीच भरत आहोत आणि या सामायिक जमिनीमध्ये काही लोकांनी बेकायदेशीर नावे नोंद केली आहेत सदर गोष्टीला 5० वर्षे झाली आहेत , या लोकांची नावे इतर हक्कांमधून निघून गेली आहेत आणि तसा सरकारमान्य फेरफार आमच्या कडे जुने कागदपत्र काढल्यावर मिळाला त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्व्ये पोकळ नोंद केलेले फेरफार रद्ध करण्यासाठी तसेच त्यांची नावे सातबारातून रद्ध करण्यासाठी अपिलीय अर्ज तहसीलदार यांना करणार आहोत पण हे करताना आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे ही विनंती
1) या अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत कमीत कमी समजा दोन वर्ष गेली आणि या दरमयान आमचे पडीक घर जर पडले तर त्या घरावर किंवा घर ज्या जमिनीमध्ये आहे त्या जमिनीवर प्रतिवादी अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत स्टे आणू शकतात का
2) अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत पडीक घर जर पडले तर आम्ही परत बंधू शकतो का
3) प्रतिवादी याच्या मुंबईमध्ये राहत असल्याला लोकांचे पत्ते आम्हाला माहित नसतील तर त्यांचे गावचे घराचा पत्ता दिला तर चालेल का
१. नवीन सुधारणेनुसार , अपील दाखल झाल्यानंतर , त्याचा निकाल १ वर्षात देण्याचे बंधन , अपिलाय अधिकारी यांचेवर आहे .
२. आपले नाव ७/१२ सदरी दाखल आहे काय ? आपले नाव ७/१२ सादरी असल्यास , घर जरी पडले तरी आपण ते बांधू शकता .
३. प्रतिवादी यांचे पट्टे उपलब्ध नसल्यास , त्यांना द्यावयाची नोटीस , म.ज .म .अ. च्या कलम १९६६ च्या कलम २३० प्रमाणे , जागेवर नोटीस बजावणी करण्याची तरतूद आहे . तसेच जमीन ज्या भागात आहे , तेथील जास्त circulation असलेल्या वृत्तपत्रात नतीस प्रसिद्ध करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजिंक्य देशमुख
19-11-2017
ajindes1@gmail.com
आमच्या जमिनीवर रस्त्यासाठी भुसंपादन झाले आहे ती जमीन आमची मोठे बंधु वहिवाट करतात आम्ही पण त्या जमिनीला वारस आहोत त्याचा मोबदला कसा मिळेल
जमीनजर संपादित झाली असेल तर , आपले बंधू जमीन कसे कसत आहेत ?
वारस असल्यास , आपणास मोबदला मिळेल . मात्र आपले नाव अधिकार अभिलेख सादरी दाखल आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
18-11-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर मनपा. हददीत महार वतन जमीन ७/ ८ वर्षांपूर्वी बिनशेती प्रयोजनार्थ जुन्या शर्तीवर करण्यात आली होती. त्यावेळी चालू बाजारभावाच्या ५०% नजराणा भरण्यात आला होता. आज रोजी सदर जमिनीचा वापर बिनशेतीसाठीं करावयाचा असल्यास चालू बाजारभावानुसार फरकाची रक्कम भरावी लागते का? किंवा कसे? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by Mangesh prakash misal
17-11-2017
Mishalmangesh@gmail.com
आदरणीय सर, (अ) ने विकत घेतलेला प्लॉट र.जी. आधारे 1991 मध्ये विकत घेतला व त्याने (ब) ला 1993 मध्ये रजिस्टरी आधारे विकला, तोच प्लॉट (क) ने रजिस्टरी आधारे 1997 ला विकत घेतला, 'अ' आणि 'ब' ह्या दोघांचा फेर झाला नाही, आता 'क' ला फेर चढवायचा आहे या साठी काय करावे लागेल
Question by प्रकाश आनंदा हिरवे
16-11-2017
prakashhirve2@gmail.com
नमस्कार सर
माझ्या मालकीचे क्षेत्र आहे परंतु त्यावर भोगवटदार म्हणुन देवस्थानचे प्रथम नाव आहे तशेच त्या जमिनिला लागुन वनक्षेत्र आहे तरी मला माझ्या नावावर असलेल्या एकुण क्षेत्रापैकी काही आवश्यक क्षेत्र वनखात्याला देऊन वनखात्याची जागा मला शेती व शेती पुरक व्यवसाय व शेतामध्ये ये-जा करण्याकरिता शेत रस्त्याकरिता मिळेल का... त्याकरिता कोणती कार्यपध्द्त आहे काय करावे लागेल ..............
जमीन देवस्थानची आहे . आपण केवळ वहिवाटदार आहेत . त्यामुळे आपणास हि जमीन वन विभागास देता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश जमदाडे
16-11-2017
yogeshjamdade@gmail.com
कृपया,तालुक्यातील mobile tower वसुली बाबत मार्गदर्शन करावे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
