जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सुजित चव्हाण
17-01-2018
sujitchavan456@gmail.com
सर तलाठी कार्यालयात रहिवासी दाखला तसेच इतर दाखले दिले जातात
त्यांना शासनाची शुल्क फि किती असते व दाखले दिलेल्याची नोंद असते का व कशी असते
Question by Chandu
16-01-2018
ChanduRameshShinde@gmail.com
किरण सर , जनपीठ माध्यमातून आपण लोकांच्या क्लिष्ट प्रश्नांना समर्पक उत्तरे देता , हे काम उल्लेखनीय आहे. धन्यवाद ह्या सेवेबद्दल.
माझे वडील१९९१ ला , वारल्यावर आमची वडिलोपार्जित शेत जमीन माझ्या आणि माझ्या आईच्या नावावर झाली. काही कारणांनी , माझ्या दोन विवाहित बहिणींची नावे टाकणे तेव्हा राहून गेले. आता माझी आणि आईची इच्छा आहे कि जमीन आम्हा सर्व चार जणांच्या (१. आई , २. मी , ३. बहीण-१, ४. बहीण-२ ) नावानी करायची. तर आम्ही तसे करू शकतो का ?
हो निश्चित . ज्या फेरफराने केवळ आई चे नाव लागले आहे त्यास आव्हानात , प्रांत अधिकारी यांचेकडे करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश kahare
12-01-2018
rajeshkahare@gmail.com
सर नामसकर
पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन करण्या साठी जमीन संपादित करून उपविभागीय अधिकारी यांचे मंजुरीने लेआऊट करण्यात आले परंतु आज पावेतो पूरग्रस्त गावाचे न झाल्याने सदर मंजूर लेआऊट मधील प्लॉट वर गावकर्यांनी अतिक्रमण करून घरे बांधली त्यामुळे आज रोजी मंजूर लेआऊट प्रमाणे मोक्यावर प्लॉट दिसत नाही तेव्हा सर सदर लेआऊट ची शासकीय मोजणी करावी लागेल काय त्याचे पैसे कोण भरेल व सदर अतिक्रमण नियमित करता येईल काय
महोदय कृपया योग्य मार्गदर्शव करावे हि विनन्ती
ज्या लोकांना विस्थापित व्हावे लागले , अश्याच गावातील लोकांनी अतिक्रमण केले असेल व सध्याचे सिद्ध शीघ्र गणकानुसार , अतिक्रमित क्षेत्राचे पॆसे भरण्यास लोक तयार असतील तर , पात्रतेनुसार देय क्षेत्राचे मर्यादेत , अतिक्रमण नियमनकुल करता येईल .
मोजणी शासनाकडून करता येईल .
मात्र , विस्थापित लोकांशिवाय अतिक्रमण केले असल्यास , ते नियमनकुल करण्यासाठी शासनाचे आदेश आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kailas vaidya
11-01-2018
kailasvaidya143@gmail.com
सर नमस्कार
आदरणीय सर ,माझा असा प्रशन आहेत माझे शेत तालुका नरखेड जिल्हा नागुपर या ठिकाणी आहेत मागील वर्षी मी माझ्या शेतावर विहीर खोदलेली आहेत ,माझ्या विहिरीला लागून दुसऱ्या च शेत आहेत ,आणि तो शेतकरी माझ्या विहिराला लागूनच 15 ते 20 फुटाच्या अंतरावर विहिरीचे खोदकाम लावत आहे ,त्या मुळे माज्या विहिरीला बोरिंग च्या हादरे मुळे नुकसान होण्याची भीती आहेत त्यांनी नियमांनी योग्य अंतर सोडून आपली विहीर करावी अशी आमची मागणी आहे परंतु तो काही ही आयकाला तयार नाहीत ,
सर दोन विहिरीच्या मध्ये किती मिटर अंतर असायला पाहिजे या बद्दल मला मार्गदर्शन दयावे ,आणि या वर उपाय सांगावा .
धन्यवाद
आपण The Maharashta Groundwater ( Regulation and Management ) Act 2009 व त्याखालील नियम वाचावे .
या कायद्या अंतर्गत आपले भाग जर noified area असेल तर , GSDA ग यांनी काही निर्बंध घातले आहेत का हे पहा
माझ्या माहितीप्रमाणे नसावेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमितकुमार शिर्के
09-01-2018
amitkumar.shirke@gmail.com
मा. सर
माझे आजोबा यांचे नावे एका गटात लागवडीलायक ३ एकर व पोटखराबा ५ एकर एवढे क्षेत्र आहे. सध्या आम्ही पोटखराबा ५ एकर मधील जवळजवळ ३ एकर एवढे क्षेत्र गाळ भरून लागवडीयोग्य करून घेतले आहे. तर हे क्षेत्र लागवडीलायक मध्ये सात बारा उताऱ्यावर समाविष्ट करून घेणेसाठी आम्हाला कोणाकडे व कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमाखाली अर्ज सादर करावा लागेल.
Question by योगेश
08-01-2018
nirajhalkude@gmail.com
नमस्कार सर
आमच्या गावामध्ये १९८० साली वाढीव गावठाणा अंतर्गत राहण्यासाठी प्लॉट चे वाटप झाले आहे .
१)सदर गावठाण मध्ये अजून जे प्लॉट शिल्लक आहेत ते घेण्यासाठी काय करावे लागेल ?
२) त्या साठी काही अटी आहेत का ?
३)त्यासाठी तीन गुंठे साठी किती फी भरावी लागेल ?
४) कोणकोणती कागदपत्रे लागतील व ती कोठे जमा करावी लागतील ?
१. गावठाण विस्तार योजना हि प्रांत अधिकारी यांचे मार्फत राबवली जाते . काही भूखंड शिल्लक असतील तर ते मिळणेसाठी प्रांत कार्यालयाकडे अर्ज करा
२.आपण त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक . आपल्या नावे गावठाणात जमीन शिल्लक नसणे
३.सध्याचे सिद्ध शीघ्र गणकाप्रमाणे जमीन मूल्य भरावे लागेल
४.आवश्यक कागदपत्रांची यादी प्रांत कार्यालय आपणास देईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
06-01-2018
pankajkagane@gmail.com
सर एखादा कर्मचारी विभागीय दुय्यमसेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या मुदतीत व संधीत परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. आणी सदर कर्मचारी यांची फक्त ३ वर्षे ७ महिण्याची सेवा पुर्ण झालेली आहे व सदर कर्मचारी सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नत्तीसही पात्र आहेत. मग त्यांना पदोन्नत्ती देता येईल का सर. कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by विनायक बुवाजी पाटील
05-01-2018
Vbpatil96@gmail.com
आदरणीय सर ,एखाद्या जमिनीचे दिवाणी न्यायालयात declaration मागितले असेल तर व त्याच वेळी तहसीलदारांकडे त्याच जमिनीत कुल म्हणून नोंद व्हावी असा अर्ज करता येतो ka
दोन्ही बाबी भिन्न आहेत . तथापि , आपले प्रतिवाद्याने दिवाणी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिल्यास , न्यायालय , तहसीलदार यांचेकडील दावा तहकूब कार्बे बाबत निर्देश देऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश अनपत
03-01-2018
umeshanpat45@gmail.com
नमस्कार
माझ्या जमीनीचे काही क्षेत्र हे पोट कालव्यामध्ये गेले आहे त्यात माझी व माझ्या भावाची आडव्या स्वरुपात आम्ही वहिवाट करत आहोत
त्यापैकी माझा हिस्याचे क्षेत्र गेले आहे तरी नुकसान भरपाई ची नोटीस दोन्ही भावांना समान नोटीसा आल्या आहेत
माझ्या भावाचे क्षेत्र गेले नाही परंतु एकाच गटामध्ये असल्यामुळे भूसंपादन नोटीस दोघांना आली आहे
याबाबत भूसंपादन विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी एकाच गटामध्ये असणाऱ्या सर्वांना नुकसान भरपाई मिळेल असे सांगितले
तरी मी काय करावे ? याबाबत मार्गदर्शन करा ?
आपले क्षेत्र सामायिक असल्याने , नक्की कोणाचे वाटणीच्या क्षेत्रातून , कालवा गेला आहे हे , भू संपादन अधिकारी यांना निश्चित करता येतनाही . आपले क्षेत्राचे विभागणी ( by metes and bounds ) झाली असती व ७/१२ स्वतंत्र झाले असते , तर ज्या भावाचे क्षेत्रातून जामी गेली आहे त्यासच केवळ नोटीस दिली असती . आपापसात समजुतीने नुकसान भरपाई , आपणास घ्यावी .
अन्यथा आपले बंधू , या तडजोडीस तयार नसतील तर आपण , भू संपादन अधिकारी यांचेकडे तक्रार /हरकत दाखल करा . भू संपादन अधिकारी आपला वाद न्यायालयाचे निदर्शनास आणून , न्यायालयाचे निर्णयानुसार , मूल्यांकन वाटप करतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश अनपत
03-01-2018
umeshanpat45@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या वडिलांचे नावे २४ गुंठे जमीन आहे तरी माझ्या वडिलांच्या अगोदर जे वारस होते त्यांच्या बाबत व जमिनीचे वाटप सुरवातीपासून म्हणजे १९४७ पासून कशा प्रकारे झाले होते याबाबत मला माहिती अधिकारांतर्गत कोठे माहिती घेता येईल.
Question by VIKRAM
02-01-2018
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , माझा ऐक प्रश्न आहहे कि माझा व बहिणीचा विरुद्ध दिवाणी नायालयात तडजोड झाली आहे व हुकूम नाव झालाच हहे बहिणीनेही सर्व हक्क माझा नवे सोडून दिला आहहे दिवाणी नायालयातच पूण माझा काडयून ठाण्याची ७/१२ वर नोंद करून घायचे राहहून गेले योग प्रोसिजर माहित नसल्या मुलं व तलाठी व इतर अधिकारी याने मार्गदर्शन ना केल्या मुले तयांची सतत बदली असल्याने व मी नोकरी निमित्त भार्गवी असल्याने नोंद ७/१२ व करून घेता अली नाही त्या मुले माझा बहिणीने तिजमीन दुसऱ्या वक्तीला विकून टाकली आहहे व ७/१२ वर त्यांची नवे लागली आहहेत त्या विरोधात मी दिवाणी न्यालयात केस चालू आहहे .ती माझी चूक खूपच महागात पडत आहहे .ती चूक मला सुधारण्यासाठी कायदयात तडजोड आहेका ?कृपया मार्ग डकवा
आता काही अन्य मार्ग अवलंबता येत येणार नाही . या मिळकतीत त्रयस्थ हितसंबंध निर्माणझाले आहेत . आपण जदावा दाखल केला आहे तो प्रामाणिक पणे लढा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री . अमोल सोमनाथ कोरडे
01-01-2018
amolkorde007@gmail.com
नमस्कार सर्व अधिकारी महोदय,
माझ्या आजोबांनी त्यांच्या नावावर शिल्लक असलेली जमीन डिसेंबर 2016 मध्ये मला नोंदणीकृत बक्षिसंपत्र करून दिली . त्यानंतर तसा फेरफार जानेवारी 2017 मंजूर होऊन माझे नाव 7/12 वर आले. परंतु त्यानंतर माझ्या चुलत चुलयांनी म.ज.म. अधि. 1966 चे कलम 155 अन्वये दुरुस्तीची मागणी केली असता मा. तहसीलदार साहेबांनी आम्हाला प्रतिवादी करून केस चालवली. सदर केस मध्ये आम्ही हजर झालो व अर्जदाराने मागितलेली दुरुस्ती आम्ही अमान्य करून तसे पुरावे पण सादर केले. परंतु राजकीय दबावामुळे मा. तहसीलदार साहेबांनी 24.11.2017 रोजी बेकायदेशीर निकाल पारित केला. सदर निकालात त्यांनी आमचे क्षेत्र कमी करण्याचा आदेश न देता दुरुस्त 7/12 पाठवला . सदर 7/12 मध्ये माझे नाव वगळण्यात आले आहे. व अर्जदाराचे क्षेत्र वाढवण्यात आले आहे व उरलेले क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वाढवण्यात आले आहे. सदर आदेशाची प्रत मा. तलाठी यांना 1.12.2017 ला मिळाली, त्यांनी 2.12.2017 ला आदेशाची नोंद घेतली. आम्हाला पण आदेशाची प्रत 1.12.17 ला मिळाली आम्ही 2 तारखेला अपील दाखल केले व मा. तहसीलदार यांच्या आदेशाला स्थगिती देखील मागितली . मा. उपविभागीय अधिकारी इतर कामात गुंतलेले असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. 8.12.17 ला त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी उत्तरवादी हजर होईपर्यत स्थगिती आदेश दिला. परंतु 3.12.17 ला रविवार असून देखील फेरफार मंजूर झालेला होता. गावात 300 नोंदी प्रलंबित असताना आंबल्बजवणी अधिकाऱ्यांनी इतक्या घाईघाईने नोंद घेऊन ती मंजूर करणे हे जरा विचार करण्या सारखे आहे. म्हणून आम्ही मा. प्रांत साहेबांना तसा तक्रार अर्ज दिला त्या अर्जात मा. विभागीय आयुक्त , औरंगाबाद यांचे परिपत्रक क्र. २०१०/मकाशा-२/जमीन-२/प्र.क्र.१५ दिनांक २७/०८/२०१० व तसेच क्र. महा/३/प्रशासन.आर.आर./१२३५/२०१० दिनांक १५/१२/२०१० अन्वये संबंधित निम्नस्तरीय आंबल्बजवणी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली. परंतु मा. प्रांत साहेब म्हणतात की असा काही कायदा नाही आणि औरंगाबाद च्या विभागीय आयुक्तांचे परिपत्रक हे त्यांच्या विभागापूरते मर्यादित आहेत. नाशिक विभागात त्याची आंबल्बजवणी नाही होणार. तरी कृपया मार्गदर्शन करावे.
1. प्रतिवादींनी दुरुस्ती अर्जातली दुरुस्ती अमान्य केली व हरकत घेतली तरी पण तहसीलदार साहेब अर्ज मान्य करून कलम 155 अन्वये दुरुस्ती करू शकतात का?
2. मा. उपविभागीय अधिकारी यांनी तक्रार अर्जाला दिलेले उत्तर योग्य आहे का?
3.माझे 7/12 सदरी असलेले नाव कमी करण्याचा आदेश नसताना व त्याचा फेरफार रद्द ना करता 7/12 मध्ये माझ्या नावाला आळ पाडण्याचे कारण काय?
4. सदर बेकायदेशीर प्रकाराबाबत कोणाकडे दाद मागावी?
5. तहसीलदार तसेच निम्न आंबल्बजवणी अधिकारी यांचे विरोधात उच्च न्यायालय, मुंबई यांचे औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करता येईल का?
महोदय कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती .
१. कलम १५५ खाली मेहेरबान तहसीलदार महोदयांनी कोणता आदेश प्रारित केला हे महत्वाचे . आपल्या प्रश्नात आपण दुरुस्त ७/१२ पाठवला असे आपण म्हणता . आदेशात , आपले नाव कमी करण्याबाबत स्पष्ट उल्लेख असल्याशिवाय , तलाठी व मंडळ अधिकारी , ७/१२ वरील नाव कमी करू शकतनाही .
२.होय
३.अनु क्र १ प्रमाणे
४.फेरफार प्रांताधिकारी यांचे कडे आव्हानात करू शकता
५. मा उच्च न्यायालयात , अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यास , आपण याचिका दाखल करू शकता . मात्र या प्रकरणात आपण मा प्रांत अधिकारी यांचेकडे अपील दाखल करण्याचा पर्याय असल्याने , आपली याचिका दाखल होईल कि नाही या बाबत शासनकता आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
30-12-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,अ व्यक्तीने ब व्यक्तीस जमिनीची रजि.खरेदीखताने विक्री केली.गावदप्तरी फेरफार नोंद घेण्यात आली.परंतु त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाकडून अ व्यक्तीच्या नावे सदर जमिनीच्या इतर हक्कात रिकव्हरी बोजा दाखल करण्याचे आदेश पत्र का.तलाठी यांना प्राप्त झाल्याने त्याचीही नोंद त्यांनी घेतली असल्यास खरेदीखताची नोंद मंजूर करता येईल का? किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
नोंद मंजूर करता येईल .परंतु आयकर विभागाचे आदेश/पत्र काय आहे ?
प्रत मेल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शरद गोपाळ डोले
30-12-2017
sharaddole82@gmail.com
नमस्कार सर,
मी आदिवासी असून मला शेतीसाठी जमिन विकत घ्यायची आहे.
1) आदिवासीची जमिन असून 7/12 वर भोगवटादार वर्ग-2 आहे. व म.ज.म.अधि.नियम 1966 कलम 36 व 36 अ ला अधिन राहुन(1) असा उल्लेख आहे. एकूण 63 गुठ्ठा जागा असून त्यापैकी एका भावाला 30 गुठ्ठा जागा आहे विकायची आहे.
ती मी जागा विकत घेऊ शकतो का?
प्लीज सर नियम व कार्यवाही कशी करतात ते सांगावे
१. आदिवासी कडून दुसऱ्या आदिवासीस जमिनीचे हस्तांतरण होत आहे . या हस्तांतरणास जिल्हाधिकारी यांची परवानगी लागेल
२. जमीन वर्ग २ ची असल्याने , मा विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी ( वित्तीय मर्यादे नुसार ) यांची परवानगी , हस्तांतरणास घ्यावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितिन भालेराव
29-12-2017
nitinnbhalerao@gmail.com
सर, गा.न.नं.8-अ, खाते उतारा, सर्व्हे क्र./गट क्र./पोटहिस्से क्र. चा संगणकीकृत गा.न.नं. 7/12 व हस्तलिखित गा.न.नं. 7/12 शी, हक्काचे पत्रक गा.नं.6, नोंदीचा अनुक्रमांकनुसार दाखल केलेल्या तसेच नो,दु.L.F. अर्ज, मृत्युदाखले, प्रतिज्ञापत्र, पो.पा, व सरपंच दाखल, वा. रजि. वरुन नोंद प्रमाणित, नुसार वारस नोंद झालेली आहे. सदर शेती ही चुलत चुलत्यांचे मुले (आजोबांचे लहान भाऊ यांचेकडीन वंशज) जमीन कसीत आहे. जमिनीवरील हक्क व ताबा विचारले असता तो देणार नाही असे चुलत चुलत्यांचे मुलांनी सांगितले आहे. 7/12 जमिनीवर माझ्या आजोबांच्या नावाखाली (वडील-जिवंत) (सख्खे चूलते-मयत) (मोठी आत्या-मयत) (लहान आत्या-जिवंत) असे नोदी केलेले असुन सुध्दा आम्हास जमिनी देणेस तयार नाही तेव्हा जमीन कायदेशीर रित्या मिळण्यासाठी काय करावे लागेल? आपण मार्गदर्शन करावे ही विनंती.
ताबा देत नसतील तर , ताबा मिळणेसाठी , न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेंद्र पाटील
28-12-2017
mechmaster7@gmail.com
नमस्कार सर
सात बारा उताऱ्यात काही नावे हि Square Bracket मध्ये लिहलेली असतात. [ नाव ] = ?
ती नावे मयत व्यक्तीची किंवा ज्यांनी जमिनीची विक्री अथवा नाव कमी झालेल्यांची असतात का?
Question by योगेश गर्कळ
17-12-2017
yogeshgarkal@yahoo.com
नमस्कार सर,
मि वर्ग २ ची जमिन मा.विभागीय आयुक्त यांच्या परवानगीने विकत घेतली आहे .पण मुळ मालकाला आकारी पडीत जमिन न.अविभाज्य शर्तीने कब्जा हक्क रु २०० घेवून शासनाने दिलेली आहे ...तर मला वर्ग १ करता येते का ?
Question by vishal eknath khairnar
16-12-2017
vishalkhairnar84@rediffmail.com
पॉट हिस्सा हॅन्ड बुक कुठे मिळेल कृपया आपला कडे असल्यास नवीन साहित्य लिंक मध्ये उपलब्ध करून द्यावे
Question by vishal eknath khairnar
16-12-2017
vishalkhairnar84@rediffmail.com
आपणास विनंती आहे कि आपण प्रश्नाला उत्तर देत असताना उत्तर मध्ये शक्य असल्यास नियम / कायदा चा उल्लेख करण्यात यावा तसेच शासन निर्णय / परिपत्रक याची दिनांक व विभाग नमूद करण्यात यावा
आपल्या सूचनेची नोंद घेण्यात येत आहे व तसा प्रयत्न केला जाईल . कायद्याचा उल्लेख केला जातो , मात्र GR चा उलेख करणे थोडे अवघड आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
15-12-2017
amol.chavan25rediffmail.com
साहेब नमस्कार
माझा प्रश्न आहे कि -आमची सामाईक घर मिळकत मध्ये ८ अ च्या उतारा आहे त्यावरती आमची 3 भावांची नवे आहेत परंतु आम्ही वेगळे राहतो थोरला भाऊ मयत आहे ,परंतु ग्रामपंचायती कडून थोरल्या भावाच्या नावावर पाणीपट्टी कर वसुली साठी नोटीस येते,तो कर आम्हाला भरावा लागतो त्यांच्या नावावर न येण्यासाठी काय करावे लागेल कृपया माहिती मिळावी
घर सामायिक असल्यास , सर्वांची नावे , करपत्रक रजिस्टर वर लावणेसाठी अर्ज करा. सर्वांना कराची नोटीस येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अ. य. पाटील
15-12-2017
abhijit_y_patil@yahoo.co.in
सर नमस्कार ,
आमच्या वडिलोपार्जित जमिनीस ३ भाऊ व २ बहिणी असे ५ वारस असून त्या सर्वांची नावे सात बारा उताऱ्यावर नमूद होती. मात्र ३ भावांनी २ बहिणींना पक्षकार न करता परस्पर वाटणीपत्र नोंदणीकृत केले व जमीन फक्त भावामध्येच वाटणी केली . त्याप्रमाणे तलाठी यांनी फेरफार घडवला व बैहणींची नावे कमी केली .
सादर वाटणीपत्र अमलपात्र आहे का?
सदर फेरफार कायदेशीर आहे का?
धन्यवाद
वाटप न्यायालयात आव्हानात करा . हिस्स्यावरमाने जमिनीचा ताबा मिळणेसाठी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रकाश विष्णू बोडस
14-12-2017
prakashbodas@yahoo.com
एका देवस्थानला देवस्थानचे खर्चासाठी संपूर्ण गावाचा शेतसारा इनाम देण्यात आला आहे. त्या गावामधील विविध लोक पूर्वीपासून जमिनींचे मालक आहेत. पूर्वी ७/१२ रेकॉर्डला केवळ जमीनमालकांचीच नवे दाखल होती. परंतु त्यानंतर कोणालाही नोटीस न काढता फेरफारान्वये वरिष्ठ धारण करणार म्हणून देवस्थानचे नाव इनामदार म्हणून नोंदविण्यात आले आणि जमीन मालकांची नावे कनिष्ठ धारण करणार म्हणून नोंदविली. त्यानंतरदेखील बरीच वर्षे जमिनींचे कनिष्ठ धारण करणारे खरेदी विक्री करीत असत व त्याचे व्यवहार नोंद केले जात असत. मात्र काही काळाने अशा व्यवहारांना बंदी करण्यात आली व त्यांची नोंद करण्यास नकार देणेत येऊ लागला. प्रत्यक्षात जमिनीचा केवळ शेतसारा देवस्थानला इनाम (सारा इनाम) दिला असून देवस्थान करिता नोंदणीकृत ट्रस्ट असून त्याचे पीटीआर उतार्याला जमिनी नोंदलेल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडे देवस्थानची कोणतीही नोंद नाही. देवस्थानचे ट्रस्ट देखील केवळ सारा इनाम असलेच मान्य करतात. असे असूनही केवळ देवस्थांबाबतचा शेरा नमूद असलेने खरेदी विक्री किंवा अन्य व्यवहार करता येत नाही, कर्ज घेता येत नाही कुळांना जमिनी आपल्या नावे कुळखरेदी करता येत नाहीत. तयामुळे मूळ गावकरी जे जमीनमालक आहेत त्यांचेवर अन्याय होत नाही का? लोक शासनदरबारी, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे सर्व प्रयत्न करून थकले आहेत. अश्या परिस्थितीत जमीनमालकांना व्यवहारांबाबत बंदी कशी करता येईल आणि मूळ जमीनमालकांना कोणता कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे?
ज्या फेरफाराची देवस्थानचे नाव वरिष्ठ धारण कारण म्हणून दाखल करण्यात आले व जमीन मालकांचे कनिष्ठ जमीन धारण करणार , तो फेरफार , तसेच जुने फेरफार मेल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अंकुश जाधव
14-12-2017
mr.k1387@gmail.com
एखादे शासकीय अधिकारी / कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी ज्या ज्या कार्यालयांत काम केले आहे तेथील कालावधीतील ना देय / ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र मागितले जाते. परंतु अशी माहिती मागितल्यावर संबंधित कार्यालयातील आस्थापना कर्मचारी व स्वतः कार्यालय प्रमुख यांनी त्या कार्यालयात फार कमी वेळ व्यतीत केलेला असतो. त्यामुळे सदर सेवानिवृत्त होणाऱ्या अधि./कर्म. च्या सेवेबाबत कोणत्याही प्रकारचा जुना अभिलेख आढळून येत नाही. अश्या प्रसंगी त्यांना ना देय / ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र कोणत्या आधारे दिले जावे ? त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबावी कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
विभागीय चौकशी व नादेय प्रमाणपत्र , कार्यालयातील उपलब्ध अभिलेखावरून देण्याचे असते . त्यासाठी संबंधित लिपिक अथवा त्या कार्यालयाचे प्रमुख यांनी किती कालावधी घालवलेला आहे हे महत्वाचे नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil Randive
14-12-2017
rsunil12587@gmail.com
नमस्कार सर ,
खरेदीखत अथवा रजिस्ट्री झाल्यानंतर सातबारावर
फेरफार नोंद किती दिवसात केली जाते
अविवादीत नोंद १५ दिवसात मंजूर करण्याचे कायदेशीर बंधन आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pravin Gaikwad
11-12-2017
pravingaikwad26@gmail.com
ग्रुप ग्राम पंचायत विभाज व एक गाव एक ग्राम पंचायत साठी काय प्रोसेस ( कार्यवाही) आहे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
