जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by शिवा
31-08-2017
shivkantgirhe@gmail.com

नमस्कार सर,
सिटी सर्वे किती वर्षातून एकदा होत असतो आणि त्यात नमुना नंबर 8 वरून दुरुस्त्या होतात का ?
एखाद्याचे सिटी सर्वे ला नाव नाही पण नगर परिषद ला नमुना न.८ वर आहे अशा प्रकरणात याचा सिटी सर्वे वर नाव आहे तो व्यक्ती गैर फायदा घेऊ शकतो का ? सदरील जागा वडिलोपार्जित असून 27 वर्षापासून आमच्या ताब्यात व नमुना न.8 ला नावावर आहे. please हेल्प
सिटी सर्वे एकदाच होतो . जर मिळकतीस , आपले नाव दाखल नसेल तर आपण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज दाखल करा . मात्र , सिटी सर्वे झाल्यापासून आज पर्यंत काय केले ? म्हणजे झालेल्या विलंबाबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल . तसेच आपला विलम्बमाफ होणे हे महत्वाची बाब आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Yash Waghmode
31-08-2017
yash.waghmode101@gmail.com

नमस्कार सर !...
श्री किरण पाणबुडे सर आपणांस दूरध्वनीवरून संपर्क साधण्याची परवानगी मिळावी . व आपला वेळ दूरध्वनी क्रमांक मिळावा .हि नम्र विनंती .
९९२१७११९९९
हा नम्बर whatsapp साठी हि आहे . आपण त्या द्वारे हि माझ्याशी संपर्क साधू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझ्या आणि माझ्या शेजाऱ्या मध्ये म्हाडा ची एक सामायिक भिंत आहे. काही दिवस पूर्वी माझ्या शेजारीने त्याचे घर बांधकाम करण्यासाठी काढले. त्या वेळेस त्याने आम्हाला सामायिक भिंत पडून परत एक नवीन भिंत बंधू असे बोले पण आर्थिक आणि वेळे च्या अडचणी मुळे आम्ही ती नाकारली. आणि त्याला सामायिक भिंत वापरण्यास सांगितले. पण त्याने नवीन भिंत घेतली आणि त्या वेळेस मुंडेरीचा भाग तोडला. आता माझ्या घराच्या भिंतीत पाऊसच पाणी येतोय आणि भिंतीच मजबुती कमी झाली. शेजारी आता आम्हाला दुरुस्ती पण करू देत नाही आणि सामायिक भिंती चे पैसे मागतोय.
रेजिस्त्री अनुसार सामायिक भिंत कोणी तोडू शकत नाही आणि हक्क पण दाखवू शकत नाही. आम्ही त्याला हे लक्षात आणून दिले पण तो काही ऐकत नाही आणि पैसे साठी अडून बसलाय.
आम्हाला एक इंच सुद्धा मिळाली नाही आणि तो ती सामायिक भिंत विकत घ्या म्हणून मागे लागलाय. भिंती मध्ये पाणी शिरल्या मुळे भिंत कमकुवत झाली आहे आणि त्या मुळे माझ्या कुत्म्बाला जीवाचा धोका आहे. मला सामायिक भिंतीतली त्याची जागा विकत घ्यायची नाही ये आणि दुरुस्ती करायची आहे. तर मी आता काय करू. Please advice मी.
आपण ज्या क्षेत्रात राहतात त्या म्हाडा प्राधिकरणाकडे तक्रार देऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार
माझ्या वडिलांच्या नावे एकाच तालुक्यात दोन गावात जमीन आहे व वडील वारल्यानंतर वारसनोंदी आईच्या प्रतिज्ञापत्राद्वारे केल्या दोन्ही गावाचा एकच तलाठी असल्यामुळे एकाच प्रतिज्ञापत्रातून दोन्ही गावाचा उल्लेख करून त्या तलाठ्याकडे ते सर्व कागदपत्रे जमा केली पण त्या तलाठ्याने एकाच गावातील जमिनीवर वारसनोंद केली पण दुसऱ्या गावातील जमीन हि वडिलांच्याच नावावर आहे वारस नोंद झालेली नाही तर मी आत्ता त्या जमिनीवर वारसनोंद करण्यासाठी काय करू कृपया मार्गदर्शन करावे.
एका गावातील वारस नोंद करून दुसऱ्या गावातील वारस नोंद तलाठी नाकारू शकत नाही . आपण हि बाब तहसीलदार/ प्रांत अधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका गावातील वारस नोंद करून दुसऱ्या गावातील वारस नोंद तलाठी नाकारू शकत नाही . आपण हि बाब तहसीलदार/ प्रांत अधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची वडीलोपाजीत सामाईक जमीन आहे. या जमिनीमध्ये माझे आजोबा व त्यांचे ५ भाउ असे ६मुख्य हीसेदारहोते या आमच्या सर्व आजोबांचे निधन झल्या नंतर वारस तपासणी होऊन त्यांच्या सर्व लहान थोर वारसादारांची नावे सात बारा वर लागलेली आहेत, त्याजमिनीतील ४ गुंटे जमीन आम्ही मंदिर बांधण्यासाठी आमच्या गावाला बक्षीस देणार आहोत,सात बारावर जेवढी नावे आहेत त्यानी सर्वानी बक्षीस पत्रावर साही करणे जरूरी आहे काय की मुख्य ६ हीसेदार साही करू शकतात काय, तसेच या सात बारावर काही १८ वर्षा खालील मुलांचीही नावे आहेत तर त्यांचीही साही लागेल काय याची आपण माहिती देणे. धन्यवाद
मिळकत वडिलोपार्जित असल्याने , आजोबांपासून ४ पिढ्या यांचा या मिळकतीत प्रत्येकाचे जन्मापासून हक्क आहे . त्यामुळे सर्व Coparcener यांच्या वाक्षरया आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sachin dhere
24-08-2017
dheres91@gmail.com

सर मी लागवड योग्य जमिन 22 गुंठे खरेदी केली आहे. पण मंडळ अधिकारी यांनी तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग नोंद रद्द असा शेरा मारला आहे. तर सर फेर नोंद धरण्यासाठी काय करावे
आपण ज्या जिल्ह्यात राहतात , त्या जिल्ह्याचे बागायत , जिरायत व एकपिकी क्षेत्रासाठी प्रमाणभूत क्षेत्र किती आहे याची माहिती घ्या .
बहुतांशी जिल्ह्यात खालील प्रमाणभूत क्षेत्र आहे
बागायत - ५ गुंठे
एकपिकी -१५ गुंठे
जिरायत २० गुंठे प्रमाण

तुकडेबंदी कायद्याचा भंग होईल असे वाटतं नाही .
या शिवाय , प्रश्नाधीन जमीन , रहिवासी , औद्योगिक , वाणिज्य जमीन वापर क्षेत्रात ( झोन) मध्ये असल्यास , त्या क्षेत्रास , तुकडेबंदी कायदा लागू होत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. किरण पाणबुडे साहेब नमस्कार,
शासन निर्णया नुसार शासनाने मूळ मालकांच्या नावे पूर्वी असणाऱ्या जागेला सरकार चे नाव लावून मूळ मालकांचे नाव रेघे खाली लावले असेल, तर अश्या जमिनी मूळ मालकांच्या नावे होतील त्या बाबत माहिती मिळावी -
१. सरकार चे नाव लावून मूळ मालकांचे नाव रेघे खाली लावले असेल तर मिळू शकते का?
२. मूळ मालकाचे नाव कमी करून जर मुलकी पड अशी नोंद असेल तर मिळू शकते का?
३. ४ ते ५ मालक आहेत व एका मालकाने त्याच्या हिस्श्या च्या जागेचे ६ पाठीची रक्कम काही काळ भरली व बाकीचे हिसेदारानी त्याच्या हिस्श्या ची रक्कम न भरल्याने ज्या मालकाने ६ पाठीची रक्कम भरली त्यांनी ती परत मागितली असेल तर त्यांना आताच्या निर्णयाचा लाभ मिळेल का?
४. शासनाचे नाव लागून शासनाने जर ती कुळांच्या नावे केली असेल, तर अशी जमीन मूळ मालकाला मिळू शकते का?
कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
राजे ,
कोणत्या शासन निर्णयाने जमीन शासनाचे नवे दाखल झाली आहे ? कृपया ७/१२ वरील सर्व फेरफार पाहिल्यास आपणास जमिनीची इतंभूत माहिती मिळेल . त्या माहितीचे आधारे , मूळ मालकांना जमीन परत मिळेल कि नाही हे कळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

३ वर्षाची रजा कर्मचारी यांना घेता येईल का ? कोणत्या नियमानुसार कृपया मार्गदर्शन व्हावे .
सर,
आपले शतशः आभार. आपण हि वेब साईट काढली व गरजू लोकांनां मदत करता.
मी शासकीय कर्मचारी असून मला तहसील मधून माझे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढायचे आहे. माझी ग्रॉस सॅलरी गृहीत धरतील कि फक्त बेसिक.का करपात्र उत्पन्न ?
उत्पन्न दाखल्यासाठी ग्रॉस सॅलरी गृहीत धरली जाते .
मात्र त्याचा वापर प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबाबत आपले पाल्यासाठी दाखला मिळण्यासाठी करण्याचा असेल तर , पगारापासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरले जात नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या सावत्र आईचा मृत्यू २३-१०-२०१६ रोजी झालेला आहे आणि मृत्यूची नोंद करणे राहून गेले आहे. तरी कृपया आत्ता नोंद करण्यासाठी काय करावे लागेल व मृत्यू झाल्यापासून किती दिवसात नोंद करावी लागते याविषयी मार्गदर्शन करावे.
माझ्या आजोबाच्या नावने असलेली जमीन डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड कॉलेज साठी जमीन इ.स १९९२ मध्ये संपादित केलेली आहे तर मला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळेल का ?
जर मिळेत असेल तर काय करावे लागेल
जमीन संपादन करताना त्या वेळचा पुनर्वसन कायदा १९८६ लागू केला असेल तर आपणास प्रकल्प दाखला मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय सर
३२ ग नुसार जमिनीची किंमत ठरल्या नंतर ती रक्कम कोणाला मिळते जमीन मालकाला मिळते का ?
जर जमीन मालकाला मिळत असेल तर आमच्या बाबतीत असा झाला आहे कि आमचे मालक म्हणून नाव कमी करण्यात आले आहे. व फेरफार मध्ये कारण दिले आहे कि कलम ३२ ग नुसार खरेदी करून मालकांची नावे कमी करण्यात आले आहे. परंतु आम्हाला मालक म्हणून कोणतीही रक्कम मिळालेली नाही व मालक म्हणून ३२ ग दाव्याची नोटिसा सुद्धा आलेली नव्हती तर या प्रसंगी काय केला पाहिजे ?
३२ ग ची रक्कम मूळजमीन मालकांनाच मिळते . रक्कम मिळाली नसल्यास आपण , शेत जमीन न्याय्यधिकरण म्हणजे , तहसीलदार कार्यालयात , संपर्क साधा . आपणास निश्चित रक्कम मिळेल .
हि रक्कम जमीन शेत साऱ्याच्या जास्तीत जास्त २०० पट असते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Dattatray
18-08-2017
gavadedatta@yahoo.com

Namaskar Sir,
Mi kul Kayda Kalam 32 antargat case 21/11/2015 roji dhakhal keleli ahe. Hi case 6/4/2017 roji nikali kadanyasathi tahsildar sahebanni band keli parantu adyap nikal dilela nahi. Tar case nikali kadnyasathi kahi kalavadhi ahe ka?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत , दाखल अपील प्रकरणाचा निकाल १ वर्षात ( प्रकरण दाखल झाल्यापासून ) देणे आवश्यक आहे . आपला कुळकायदा कलम ३२ ग अंतर्गत दावा आहे . त्यास जमीन महसूल कायद्याच्या तरतुदी लागू नाहीत . मात्र शासने मा उच्च न्यायालयात अर्धन्यायिक प्रकरणात अनुसरायच्या कार्य पद्धतीबाबत शपथ दाखल केले आहे . शासनाने या बाबत , तीच कार्यपद्धत अनुसरणे बाबत निर्देश दिले आहेत . ते निर्देश कुल कायद्या खालील प्रकरणास लागू आहेत .
या निर्देशानुसार प्रकरण बंद झाले पासून ४ आठवड्यात निकाल देणे आवश्यक आहे . एप्रिल मध्ये प्रकरण बंद होऊन हि निकाल दिलेला नसल्यास , आपण हि संबंधीत बाब प्रांताधिकारी / जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची वडीलोपाजीत सामाईक जमीन आहे. या जमिनीमध्ये माझे आजोबा व त्यांचे ५ भाउ असे ६मुख्य हीसेदार होते या आमच्या सर्व आजोबांचे निधन झल्या नंतर वारस तपासणी होऊन त्यांच्या सर्व लहान थोर वारसादारांची नावे सात बारा वर लागलेली आहेत, त्या जमिनीतील ४ गुंटे जमीन आम्ही मंदिर बांधण्यासाठी आमच्या गावाला बक्षीस देणार आहोत,सात बारावर जेवढी नावे आहेत त्यानी सर्वानी बक्षीस पत्रावर साही करणे जरूरी आहे काय की मुख्य ६ हीसेदार साही करू शकतात काय, तसेच या सात बारावर काही १८ वर्षा खालील मुलांचीही नावे आहेत तर त्यांचीही साही लागेल काय याची आपण माहिती देणे. धन्यवाद
सर्वांची संमती आवश्यक आहे . कारण मिळकत वडिलोपार्जित आहे . अश्या वडिलो पार्जित मिळकतीमध्ये , पुढील ४ पिढ्यांना जन्मताच मिळकतीत हक्क आहे . वाटणी न झाल्याने , नक्की कोणाचे हिस्स्याची जमीन मंदिरासाठी जात आहे हे निश्चित नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा महोदय,
मी कुळ कायदा कलम ३२ अंतर्गत केस दाखल केलेली आहे. हि केस निकाली काढण्यासाठी मा तहसीलदार हवेली यांनी दि. ०६/०४/२०१७ रोजी बंद केली. परंतु ४ महिने गेल्यानंतरही केसचा निकाल काही दिला गेला नाही. तरी कृपया मला मागर्दशन करावे कि , केस निकाली काढण्यासाठी काही कालावधी असतो का? , यासाठी मला कोणाकडे दाद मागावी लागेल?
जमीन महसूल ( सुधारणा ) कायदा २०१६ नुसार , अधिकार अभिलेख व जमीन महसूल कायद्या अंतर्गत असलेली अपील प्रकरणे १ वर्षाचे आत निकाली काढणे बंधन कर्क आहे .
आपली केस , कुल कायद्याअंतर्गत आहे व ती अपील नसून , दावा आहे . त्यामुळे वरील तरतूद आपली प्रकरणी लागू होणार नाही . तथापि , अर्धन्यायिक प्रकारणांबाबत , शासनाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार , प्रकरण बंद झाल्यापासून , ३-४ आठवड्यात निकाल देणे आवश्यक आहे . आपले प्रकरणांत , ५ महिना कालावधी होऊन गेलेला आहे . त्यामुळे निकाल देणे आवश्यक आहे . हि बाब आपण माँ. जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासन च्या सिंचन प्रकल्प काम साठी केले गेलेल्या भूसंपादन पोटी चुकून जास्ती दिला गेलेला मावेजा शेतकर्या कडून वसूल करण्याची पद्धत काय आहे ?
होय.
Section 17 -3 (B ) ऑफ The Land Acquisition Act (3B) The amount paid or deposited under section (3A), shall be taken into account for
determining the amount of compensation required to be tendered under section 31, and where
the amount so paid or deposited exceeds the compensation awarded by the Collector under
section 11, the excess may, unless refunded within three months from the date of Collector's
award, be recovered as an arrear of land revenue




Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर भो .वर्ग २ चे जमिनीचे नोंदणीकृत मृत्युपत्र आहे .परंतु त्याचा अंमल होण्यापूर्वीच वारसाचा फेरफार झाला .सदर मृत्युपत्र धारकाने तक्रार दाखल केली कि मला सदर मृत्यूपत्राचे आधारे माझ्या नावाने नोंद होणे बाबत आदेश व्हावा .त्यानंतर कुटुंबातील सर्व लोकांनी आपसी करून सदर नोंदणीकृत मृत्यूपत्रा फेरफार न घेता १००/- स्टॅम्प पेपरवर आपसी वाटणीपत्र केले व त्याच वाटणीपत्रात दोन बहिणी व एक भाऊ यांचा हक्क सोडल्याचा लेख आहे .या सर्वांना केलेले वाटणीपत्र व हक्क सोडल्याचा लेख यावर फेरफार होणेबाबत आदेश आपल्या कार्यालयाकडून पाहिजे आहे
वर्ग २ चे जमिनीचे मृत्यूपत्र होणार नाही

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

मृत्यपत्र कोणी केले आहे व त्यास शासनाने जमीन प्रदान केली होती का त्यास वारसाहक्काने (प्रदान) जमीन प्राप्त झाली होती ?
जर शासनाने ज्यास जमीन प्रदान केली होती त्यानेच जर मृत्यपत्र केले असेल तर , मृत्यपत्राची नोंद होणे आवश्यक . मात्र जर जमीन वारसाहक्काने प्राप्त झाली असेल तर , coparcenry मधील केवळ त्याचे हिस्स्यापुरते , असा मयत इसम त्याचे हयातीत मृत्यपत्र करू शकतो . उर्वरित क्षेत्राचे वाटप वारस हक्कानेच होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महार वतन संदरभात माहिती हवी आहे .
वारसा नोंद करताना हक्क सोड पत्र करत येते का ???
होय.
ज्या वारसांचा हक्क सोडवायचा आहे त्याचे नोंदणीकृत हक्क सोड पत्रक केव्ह्नही घेता येते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादा पुजारी देवस्थानचा विश्वस्त होऊ शकतो का?तसेच तो विश्वस्त देवस्थानची शेतजमीन स्वताची मालमत्ता असल्याप्रमाणे खरेदीविक्री करू शकतो का ?माझ्या माहिती प्रमाणे देवस्थानची मालमत्ता देवस्थानच्या जिर्नॉधार करीता खरेदिविक्रि करू शकतो.अशा विश्वस्ता विरूध्द तक्रार वा बडतर्फिसाठी कोणाकडे तक्रार अर्ज करावयाचा या विषयी मार्गदर्शन करावे ही विनंती
होय
पुजारी विश्वस्थ होऊ शकतो
मात्र देवस्थानची नोंदणी सार्वजनिक न्यास म्हणून धर्मादाय आयुक्त यांचेकडे झाली असेल तर , धर्मादाय आयुक्त यांचे परवानगीशिवाय मिळकतीची विक्री करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय महोदय,
शहर विकास आराखडा मंजूर मधील एका शेतजमिनीचे क्षेत्र हे भूमी अभिलेख कार्यालयातील सिटी सर्वे नंबर व प्रॉपर्टी कार्ड प्रमाणे आहे. तथापि, तलाठी कार्यालयातील अधिकार अभिलेख ७/१२ व ८अ मधील क्षेत्र कमी दर्शविले आहे. याबाबत पुढे काय कार्यवाही करावी याचे मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती आहे .
ज्याठिकाणी सिटीसर्वे अमलात येतो व मालमत्ता पत्रिका सुरु होते त्याठिकाणी ७/१२ वापरण्याचा नसतो . मालमत्ता पत्रिका हेच अधिकार अभिलेख आहे .त्यामुळे ७/१२ सादरी किती क्षेत्र आहे याची चिंता करण्याचे कारण नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sachin Jadhav
11-08-2017
snj689@gmail.com

नमस्कार साहेब,
माझे वडिलांचे नांवे 1.5 गुंठा प्लॉट असून, खरेदी ही 1993 ची आहे. सदर प्लॉट हा नोंदणीकृत खरेदीखत करुन विकत घेतलेला आहे. महसूली दप्तरी 7/12 8अ उतारा यास वडिलांचे नांव आहे. सदर प्लॉट बिगरशेती नाही. आता या प्लॉटवर बांधकाम करणेसाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागेल काय?
आपला भूखंड कोठे स्थित आहे ? जर भूखंड गावठाणात असेल तर-ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक
जर भूखंडास सर्वे /गट नम्बर असेल व अश्या क्षेत्रास प्रादेशिक योजना लागू केली असेल तर , जिलझाधिकारी यांची परवानगी लागेल . जर भूखंड नगरपालिका/महानगरपालिका क्षेत्रात असेल तर संबंधित नगरपालिका/महानगरपालिका यांची परवानगी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या महिला कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांप्रमाणेच 180 दिवसांची प्रसुती रजा व रजा वेतन देय आहे का ?
प्रश्न विचारण्याचे कारण :- एका XYZ नगरपरिषदेत सहायक प्रकल्प अधिकारी हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले असून मा. राज्य अभियान संचालक तथा आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांचे पत्रामधील शर्तींनुसार सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांना कोणतीही रजा अनुज्ञेय नसल्याने दोन महिन्यांतून 1 अनुपस्थिती अश्याप्रकारे 1 वर्षासाठी जास्तीत जास्त 6 अनुपस्थिती ग्राह्य धरण्यात यावी. तसेच, सहा. प्रकल्प अधिकाऱ्यांना शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही सेवा शर्ती / सोयी सुविधा उपलब्ध राहणार नाही. सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत समावेशन, वेतनश्रेणी, रजा पेन्शन अनुज्ञेय राहणार नाही, असे नमूद केले आहे.
तरी, सदर प्रश्नाकामी आपणांकडून उचित मार्गदर्शत मिळावे, ही विनंती.
आपले पद कांतारती पद आहे . या पदास शासकीय कर्मचाऱ्यांच्या अति/शर्ती/सुविधा लागू असणार नाही असे आपल्या कंत्राट करारनमेंट नमूद आहे . त्यामुळे प्रसूती रजा अनुज्ञेय होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, अप्पन योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद माझे गावाकडे वडिलप्रोजीत घर आहे काही दिवस पूर्वी मी घरी गावी गेलो मला माझ्या घरयाचा अंगणातच समोरील जागेत जि वापरासाठी सामायिक असते तितेच फारशी टाकून भिंत बांदली ahhe ३-घरे आहहेत c आकार आहहे तो चुलता मधील घरी राहतो अलीकडे मी व पलीकडे तिसरे चुलते राहतात जे गावीच राहतात त्यांनी घर समोरील वापरासाठी मोकळी जागा असते तीतें दोनींकडे भीत बसून पत्रे टाकले आहहेत पलीकडे २ नो चुलते राहतात ते मयत आहहेत व अलीकडे मी राहतो मधेच त्यांनी दोन्ही घराचे दरवाजे सोडून मधेच बाधकाम केले आहहे ते चकीचे आहहे मला कळत नाही मी काय करावे बोलायला गेलो तर म्हणवतो तुला कायकाराचें ते कर ,त्या साठी मी कोणाकडे रीतसर दाद मागू शकतो कृपा सांगा.
घर गावठाणात असेल तर , अनधिकृत /विनापरवानगी बांधकाम बाबत ग्रामपंच्यातीलदे तक्रार करू शकता . अन्यथा ज्या नियोजन प्राधिकरणाचे अखत्यारीत आपली घरे येतात त्या कडे अनधिकृत/विनाप्रवण बांधकामाबाबत तक्रार करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Bajirao pawar
09-08-2017
bajirao.pawar@gmail.com

Sir my grandfather getting a loan from bank for agricultural for tibak sinchan purpose
Then grandfather also expired then my father totally land his Name then father also deposited some money on grandfather loan account from bank few years my father is expired on 2016 then my mother name getting on 7/12 few amount is pending Rs90,000 this year state government declare a कर्ज माफी
Please sir tell me your feedback for which process following me then my 7/12 is totally नील
Please

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3