जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Bajirao pawar
09-08-2017
bajirao.pawar@gmail.com

Sir
7/12 varti Boka ahe
Me banktun 1,50,000 Rs Che loan gatale hote tychi parat fed keli ahe ata 70,000 Rs baki ahet
Tar sir maza 7/12 var ajun 1,50,000 Ekta Boka disato
Tar sir maza 7/12 varil Boka kami karanayasati me khy Karu
Please
ज्या बँकेकडून आपण कर्ज घेतले त्यांचेकडून तसे पात्र घ्या व त्याप्रमाणे बोजा रक्कम दुरुस्त करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
09-08-2017
salveanand89@gmail.com

नमस्कार सर , वडिलोपार्जित (भोगवटादार वर्ग १) च्या जमिनीवर मुलीच्या मुलांचा अधिकार येतो का ? येत असेल तर तो कुठल्या कायद्या नुसार.i
होय
hindu coparcenary संकल्पनेनुसार , पुढील चार पिढ्या हक्क असतो .
म्हणजे
वडील
मुलगी
मुलगा
मुलगा/मुलगी

मात्र या मिळकतीचे वाटप अथवा विक्री २००५ पूर्वी झाली असेल तर मुलीच्या मुलास हक्क असणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
दिनांक ५/५/२०१७ रोजी सहायक जिल्हाधिकारी डहाणू यांचे न्यायालय यांच्या आदेशानुसार आमचे महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ चे अपील मान्य करून ७/१२ दप्तरी आमची नावे नोंदवली आहेत . परंतु जमिनीचा ताबा / कब्जा हा सामनेवाले ह्यांच्या कडे आहे तर तो कसा मिळवावा ह्याची कृपया माहिती द्यावी .
धन्यवाद .
ताबा देणे हे दिवाणी कोर्ट चे काम आहे

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

Question by vnyk
05-08-2017
vnyk1234@gmail.com

नमस्कार,

२० वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी खरेदी खताने विकत घेतलेल्या जमिनीची हद्दकायम मोजणी कारण्यासंबंधी आंम्ही देवगड भूमी अभिलेख कार्यालयात गेलो असता तेथे आम्हास असे सांगण्यात आले कि सदर खात्याचे ( पो. पोयरे, ता. देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग - भूमापन क्र. १०९, भूमापन उपविभाग १ अ ) अजूनपर्यंत पोटहिस्से करण्यात आलेले नाहीत. खात्यातील जेवढे सह हिस्सेदार आहेत त्यांची संमती घेण्यास सांगितली आहे. सदर खात्यात अजून सात व्यक्तींनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्यांचे स्वतंत्र सात बारा आहेत. त्यातील चार जण संपर्कात आहेत तर उर्वरित तीन जणांचा बराच प्रयत्न करून त्यांचा ठावठिकाणा मिळत नाही तसेच ते कोणाच्या संपर्कात नसल्याचे कळले.

मला असे विचारायचे आहे कि जर सात पैकी चार जणांची संमती घेऊन सदर खात्याचे पोटहिस्से करता येतील काय ??

तसेच मला आमच्या हिश्श्याची जमिनीची ( भूमापन क्र. १०९, भूमापन उपविभाग १ अ ) हद्दकायम मोजणी करावयाची असल्यास अजून दुसरा काही मार्ग आहे का ?
नाही . सर्वांची संमती आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Balaji Sawant
04-08-2017
balaji.sawant44@gmail.com

नमस्कार सर
2003 जमीन संपादित करण्यात आली आहे
पण योग्य तो मोबदला मिळाला नाही म्हणून संबंधित शेतकर्यानी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर निर्णय देताना सन 2013 रोजी न्यायालयाने वाढीव दराने मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत परंतु अद्यापही कसलाही मोबदला मिळाला नाही तरी शासनाने अशा वेळी किती दिवसात मोबदला देणे अपेक्षित आहे व या बाबतीत पुढे शेतकऱ्यानी काय करावे
ज्या न्यायालयाने वाढीव दराने मोबदला दिला त्या न्यायालयात , दरखास्त ( Execution Proceeding ) दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आम्हाला सरकारी जमीन पठ्ठ्या2.०० हे.आर .मिळालेली आहे त्या जमिनी मधून राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ जात आहे .ती जमीन भूसंपादन झालेली आहे .त्याचा मोबदला आम्हाला किती % मिळतो व शासनास किती जमा होतो .
नमस्कार सर आम्हाला सरकारी गायरान जमीन १९८९ ला पट्ट्या ने 2.०० हे आर जमीन मिळालेली आहे .त्या जमिनी मधून राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ जात आहे .त्या साठी0.80 जमीन भूसापादित केली आहे त्याचा मोबदला किती % मिळेल .व शासनास किती जमा होईल .ते कळावे हि नम्र विनंती .
नमस्कार सर ,माझी जमीन १ हे ६२ आर आहे त्यातील ४ आर ही सडकेसाठी संपादित केली आहे पण सडकेच्या मधोमध पासून १५मि इकडे व १५मि तेकडे पकडले तर ३० आर इतके जमीन सडकेसाठी जाते मावेजासाठी कोणाकडे अर्ज करावा जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी १९८६मध्ये ४ आर महाराष्ट्र शासन संपादित केले आहे
१९८६ पासून आपण मावेजा मागणी का केली नाही .
ज्या भूसंपादन कार्यालयाने जमीन संपादन केली असेल त्या कार्यालयाकडे मावेजा मागणी करा .
हे कार्यालय शोधण्यासाठी , जिल्हाधिकारी कार्यालयात , समन्वयक - भू संपादन कार्यालय आहे . उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे समन्वयक पदाचा कार्यभार आहे . त्यांचेकडे विचारणा करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१० वर्षांपूर्वी मी ४.२८ गुंठे बिनशेती प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधले आहे.

एका मोठ्या प्लॉटचे १० तुकडे पडून मूळ प्लॉट विकण्यात आलेला आहे. संपूर्ण प्लॉटची बिनशेती परवानगी आहे व त्यातीलच १ प्लॉट मी खरेदी केलेला आहे. प्लॉट खरेदी केल्यावर हद्द समजून घेणेसाठी मी ५-६ वेळा भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी करून घेतलेली आहे.

घर बांधणीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आहे तसेच स्थानिक ग्रामपंचायतीचीसुद्धा परवानगी घेतलेली आहे. घर बांधून झाल्यावर ग्रामपंचायत यांनी कर आकारणी सुरु केली आहे.

माझ्या सदर ४.२८ गुंठेच्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यामध्ये २००३-२००४ सालापासून क्षेत्र दाखविताना प्रथमपासून वरकस ००.०२.४८ व पोटखराबा ००.०१.८० असे क्षेत्र दाखविले आहे. व २००३-२००४ सालापासून जागेचे स्वरूप हे बिनशेती असे दाखविले होते. परंतु अचानक ह्या वर्षांपासून बिनशेती ऐवजी ओपन बिनशेती अशी नोंद टाकण्यात आलेली आहे.

चौकशी केली असता माझ्या जागेची बिनशेती मोजणी न झाल्याने पोटखराबा व ओपनबिनशेती उल्लेख टाकल्याचे सांगण्यात आले. हे उल्लेख काढण्यासाठी नक्की काय करावे लागेल ?

भूमी अभिलेख खात्याकडे बिनशेती मोजणी अर्ज दिला असता त्यांनी तो अर्ज प्रांत कार्यालयात देण्यास सांगितले. त्यानंतर प्रांत कार्यालयात सदर मोजणीसाठी ३-४ सरकारी खात्यांच्या परवानग्या (ग्रामपंचायत,जिल्हाधिकारी, इत्यादी) तलाठी यांच्याकडून काही नमुने, जागा नकाशे, लगतच्या हद्दीदारांच्या ७/१२ च्या १० प्रती इत्यादी लांबलचक यादीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. खरोखरच बिनशेती मोजणीसाठी हे सर्व लागते काय व सादर मोजणी करणे आवश्यक असते काय याची माहिती मिळावी
आपण खरेदी केलेल्या जागेची रेखांकन परवानगी ( विकास परवानगी ) प्रमाणित प्रत भूमी अभिलेख खात्यास मोजणी करण्यासाठी आवश्यक आहे . ती देणे बंधन कारक आहे . त्या आधारे भूमी अभिलेख खाते मोजणी करू शकते .
मात्र एकदा विकास परवानगी दिल्या नंतर , प्रांत कार्यालयाने अन्य कागदपत्र आपल्या कडून मागण्याचे काहीही प्रयोजन नाही . प्रांत कार्यालयाने प्रमाणित प्रत देणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासकिय कर्मचारी आपले सरकार या पोर्टल वर आपली कार्यालयीन बाबींशी संबंधीत तक्रार दाखल करु शकतो का सर ?
आपल्या कार्यालयाचे प्रमुखांना आपला प्रश्न /अडचण सांगा ना .
आपले सरकार पोर्टल सर्व नागरिंकासाठी आहे . आपण हि नागरिक आहात . मात्र सेवा विषयक बाबी संदर्भात तक्रार असेल तर कार्यलय प्रमुखांचे निदर्शनास आणणे उचित

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्‍ट्र नागरी सेवा (लहान कुटूंबाचे प्र‍त‍िज्ञापन) नियम २००५ हा नियम पोलीस पाटील पदासाठी लागु आहे का सर ?
Sir amachya gavat grampanchayatichaya gavthan jaget bharpur atikraman kele ahe, tyamule gavatalya lokanchi gairsoy hot ahe,ani ya gostila sarpanch ani gramsevak yanchi madat ahe, tari kuthalya prakarchi karvai karata yeu shakte? krupaya mahiti dyavi!
गावठाण जागेतील जागा ग्रामपंचायतीचे मालकीची आहि कि शासनाचे ? जर शासनाचे मालकीची असेल तर आपणास संबंधित तहसीलदार यांचेकडे अर्ज करावा लागेल . अन्यथा ग्रामपंचायतीचे मालकीची असल्यास . व ग्रामपंचायत तक्रारीची दाखल घेत नसेल तर , गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सब रजिस्टर कार्यालयामध्ये १९७५ रोजी नोंदवण्यात आलेल्या खरेदी खताची प्रमाणित प्रत (रजिस्टर शेरॉक्स) वर मिळाली आहे ...खरेदी विक्री करणारे व साक्षीदार यांच्या सह्या नाहीत. याबाबत कार्यालयामध्ये विचारले असता ३५ वर्षांपूर्वी नोंदणी दोन प्रति मध्ये केली जात नव्हती असे सांगण्यात आले . तरीपण सह्या अंगठे असलेले दस्त कुठे मिळेल .खरेदी खडाटाची नोंद आहे मात्र त्यामध्ये खरेदी घेणारे व विक्री करणारे आणि साक्षीदार यांच्या सह्या अंगठे नाहीत म्हणून ते नोंदणीकृत खरेदीखत न्यायालय रद्द करेल का ? मला न्यायालयात अपील करायचे आहे मार्गदर्शन करण्यात यावे .
साह्य असलेला दस्त देणार-घेणार यांच्यापैकी एकाकडे असणे शक्य . आपण निभांदक कार्यालयात जे अभिलेख उपलब्ध आहे त्याची प्रमाणित घेऊन , त्या आधारे आपले ईच्छिचे अनुषंगाने ते आव्हानित शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर , माझ्या आजोबाना कुल कायद्याने १९६३ मध्ये ६ एकर जमीन विकत मिळाली होती . मात्र आजोबानी १९७५ मध्ये त्यापैकी ४० गुंठे जागा एका शैक्षणिक संस्थेला दान दिली होती दान दिलेल्या जागेमध्ये संस्थेने शाळा बांधली आहे .बाकीच्या ५ एकर जागेत आम्ही शेती करतो आणि आजपर्यंत आमची कब्जा वहिवाट आहे . आजोबा वारल्यानंतर संस्थेने अचानक सर्वे आणून जागा सर्वे केली आणि संपूर्ण जागेवर कंपाऊंड टाकला . याबाबत संस्थेला विचारले असता १९७५ मध्ये तुमच्या आजोबानी संपूर्ण जागा विकली आहे असे सांगण्यात आले .तलाठी कार्यालयाकडून ७/१२ फेरफार संस्थेचा नावावर आहे हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला . फेरफार वरून दुय्यम निबंधक कार्यालय कडून खरेदी खताची प्रमाणित प्रत घेतली मात्र त्यामध्ये आजोबांचा व साक्षिदारांच्या सह्या अंगठे नव्हते .याबाबत विचारले असता खरेदीखात ३५ वर्षांपूर्वी दोन प्रतीमध्ये रजिष्टर केले जात नव्हते म्हणून खरेदी खताच्या नोंदीमध्ये सही व अंगठे नाहीत असे सांगण्यात आले . मात्र खरेदी खतामध्ये जमीन विक्रीची परवानगी उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचेकडून घेतली असल्याचा विक्री परवानगी बाबतचा सिरीयल नंबर नमूद करण्यात आला आहे .मा.उपविभागीय यांच्याकडे वरील सिरीयल नंबर नुसार जमीन विक्री परवानगीच्या प्रमाणित दस्ताची प्रत मिळावी म्हणून अर्ज केले. अर्जाला , कार्यालयात शोध घेतले असता आपण अर्ज केलेल्या जमीन विक्री परवानगी बाबतचा सिरीयल नंबर नुसार दस्त सापडत नाही .असे लेखी उत्तर देऊन अर्ज निकाली काढण्यात आला आहे .मी अर्जामध्ये जमिनीचे सर्वे नंबर पण नमूद केले होते .मला संस्थेने बनावट खरेदी खत व जमीन विक्री पॅरमिशन चा बनावट नंबर ने रजिस्टर करून जागा संस्थेने स्वतःचा नावावर करून घेतले आहे असे वाटते .प्रश्न (१) आजोबांची सही असलेला दस्त कुठे मिळेल / १९७५ रजिस्टर वर नोंदण्यात आलेल्या दस्तावर आजोबांची व साक्षीदारांच्या सह्या नाहीत ./स्टॅम्प पेपर लिहिलेला व सह्या असलेला रजिस्टरेड दस्त कुठे मिळेल (२) संस्थेवर कोणत्या स्वरूपाची कायदेशीर कारवाई करून जागा परत मिळविता येईल . आपल्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे .
बनावट खरेदीखत रजिस्टर करून फेरफार मंजूर करून ७/१२ नावावर करून घेतला असेल तर घारेदीखत आणि फेरफार रद्द करण्याचा अधिकार तहसीलदारानाकडे असतो का ?
बनावट खरेदी खत दिवाणी न्यायालयाकडून रद्द करून घ्यावे लागते . The Specific Relief Act खाली दावा दाखल करा व नोंदणीकृत दस्त बनावट असल्याने null and वोइड असल्याचे जाहीर करून मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय माहीतीचा अधिकार कायदा२००५ अन्वये तहसील कार्यालयातुन( मी ज्या ठिकाणी राहतो )जी माहीती मिळते (ऊदा जुने ७/१२ अभिलेख फेरफार )कींवा ईतर माहीती देतात यावर सहाय्यक जनमाहीती अधिकारी यांचा कींवा जनमाहीती अधिकारी यांचा शिकका कींवा सही न करता माहीती पुरवली जाते तसेच महसुल विभागाचा राजमुद्रा असलेला शिक्का तरी मारा अशी विचारणा केली तर असा शिक्का माहीती अधिकार २००५ अन्वये देण्यात येणार्या माहीतीवर मारता येत नाही असा कोनताही नियम कायद्यात नाही याबाबत तहसिलदार यांना भेटल्यानंतरही हेच ऊत्तर मिळाले (राजमुद्रा असलेला शिकका मारण्याचे कोणतेही आदेश या कार्यालयाला मिळाले नाहीत फार तर जनमाहीती अधिकारी सही देतील )माञ शिकका मिळनार नाही तेव्हा याबाबत सविस्तर माहीती असलेले यशदा मार्फत मिळालेले पुस्तकातही आपन वाचा याबात माहीती नाही असेही सांनणयात आले आहे तेव्हा आपण याबात सविस्तर मार्गदर्शन करावे व शासन निर्णय असलयास तो द्यावा
या ऍक्ट अंतर्गत फक्त Xerox प्रत मिळेल सत्य प्रत करीत वेगळा अर्ज Karun govt. फी भरावी

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

महोदय सन १९१९ साली गहाण खत झालेले आहे ते नजर गहाण खत आहे रजिस्टर करत असताना पैसे न दीलयास कोर्टामार्फत विक्री करून किमंत व्याजासहीत घ्यावी असा दस्त आहे गहाण वारस नोंद सुध्दा ७/१२ एकञिकरण योजनेस आजही आहे तर पुन्हा वारस नोंद होऊ शकते का (कलम ५९ )नुसार व ह्या जमिनीची विक्री करुन रक्कम घेऊ शकतो का कारण आजपर्यत गहाण खताचे पैसे दिलेले नाहीत व त्यावेळेची रक्कम आजच्या रक्कमेत कशी ठरवलि जाते मार्गदर्शन करा
महोदय रजिस्टर दस्त नोंदणी केलेल्या दस्तात जर चुकीच्या चतुसिमा आहेत व वहीवाट माझी आहे असे सांगुन दस्त केला असेल व प्रत्यक्षात ७/१२ अभिलेखात ती जमिन पड आहे मग असे असताना एकञित जमिनीतील वहीवाट नसताना व ७/१२ त आणेवारी नसताना आणेवारी घालुन दस्त करून दि्लेले आहेत याबाबत कायदेशीर कोनती कारवाई होऊ शकते का दस्त नोंद होऊन बराच कालावधि गेला आहे मार्गदर्शन करा(विना सुचि २ दस्त झेराँक्स प्रतीवर नोंद केला आहे )
महोदय शासनाच्या आदेशान्वये ७/१२ अभिलेख आँनलाईन तयार करण्याचे काम सुरू आहे परंतु यात अनेक चुका झाल्या आहेत विशेषता आणेवारीत असणारी जी क्षेञ आहेत याबाबत कारण संबंधित गटाची आणेवारी १६ आणे जर भरली नाही कींवा जास्त झाली तर ७/१२ आँनलाईन होत नाही परंतु आमच्या गावातील दप्तर नुकतेच नुतन करणयात आले आहे यामध्य जे खातेऊतारे तयार केले आहेत यात आणि पुर्वीचे ऊतारे यात बरीच तफावत झाली आहे ती एकञित गटातील क्षेञाबाब कारण सामान्य लोकांना आणेवारी काढता येत नाही तरीही पुर्वी जे खाते ऊतारे दिले यावरूनच माझ्या आजोबांनी मृत्युपञ केले आहे याची नोदं ७/१२ अभिलेखात होऊन २ वर्ष होऊन गेली आहेत पण आता तलाठ्याने जे नविन खाते ऊतारे केलेले आहेत यात जमिन कमी केलेली आह याचे कारण पुर्वीचे खाते ऊतारे आणेवारी नुसार नव्हते असे कारण तलाठी देत आहे माञ पुर्वीचे खाते ऊतारे सन १९६५ पासुन २०१६ पर्यत तेच होते यात बदल झाला व क्षेञ जास्त झाले त्यामुळे आंनलाईनला अडचन येत आहे मृत्युपञातील दुरूस्ती १५५ खाली दुरूस्त करता येईल यात तलाठी आम्हाला दोष देत आहे मार्गदर्शन करा
प्रिय सर,
वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करण्यात येतो कि मी शैलेश दत्तराव कऱ्हाळे वय २० वर्ष व्यवसाय शिक्षण रा. डिग्रस कऱ्हाळे ता. जि. येथील रहिवासी असून माझ्या वडिलाच्या नावाने या गावी एक गुंठा जमीन आहे. पण सर ती जमीन आमच्या ग्रामपंच्यायतने ग्रामपंचायतला दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने लावली आहे. पण सर त्या व्यक्तीजवळ ती जागा नावाने असल्याचा कोणत्याही प्रकारचा महसुली पुरावा नाहीये. तरी पण तो व्यक्ती म्हणतो कि ती जागा माझी आहे.
माझ्या वडिलाच्या म्हणजे दत्ता गंगाराम कऱ्हाळे या नावाचे पुरावे माझ्याजवळ १९८३ पासून आहेत. तरीपण खोट्या खरेदीपत्रा आधारे तो व्यक्ती आमची उर्वरित जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. तो मला म्हणतो माझ्या वडिलाने तुझ्या वडिलाच्या आजोबाकडून हि जागा विकत घेतली आहे व या जागेचा येणे सुद्धा केला आहे. सर मला सांगा ती जागा माझ्या वडिलाच्या नावाने १९८३ च्या ९(३) ९(४) च्या नक्कालेनुसार व नमुना नंबर १२ नुसार नावाने आहे. सध्या सातबारा माझ्या वडिलाच्या नावाने असतांना येणे कसा शक्य आहे सर रजिस्ट्री नाही काही नाही. NA Order no. 1980 NAA CR/1453 दि. 21/11/1989 चे अभिलेख पहावयास मिळाले नाही. तलाठी साहेबांनी नमुना नंबर २ कसा निर्गमित केला याची कृपया आपण चौकशी करावी. गट नं. 642 चा नमुना नं. २ माझे वडील दत्ता गंगाराम कऱ्हाळे यांच्या नावाने सुद्धा आहे. माझे वडीलाचा मृत्यू झाला आहे.
सर तो मला म्हणतो कि मी ताब्याच्या आधारे कोर्टात जाऊन भांडण करेन तुला जमीन देणार नाही. जी जागा माझे वडील दत्ता गंगाराम कऱ्हाळे याच्या नावाने होती ती जागा त्याने ११/१०/२०१३ मध्ये नमुना नंबर ८ ला लावली. ग्रामपंचायत मध्ये विचारणा केली असता त्यांनी सांगितले हे कोर्ट मॅटर आहे आम्ही काही करू शकत नाही. त्यांनी सुद्धा माहित असतांना त्या खोट्या कागदाच्या अधारे ती जमीन त्या व्यक्तीच्या नावाने लावली कारण त्या वेळेस सर त्या व्यक्तीची बायको ग्रामपंचायत ची सदस्य होती.. हि माझी नम्र विनंती आहे. मी या अर्जासोबत त्या व्यक्तीचे जे कागतपत्रे आहेत ते व माझ्या वडिलाचे कागतपत्रे pdf स्वरुपात पाठवत आहे कृपया आपण ते बघावे व चौकशी करावी ही नम्र विनंती.

आपले कथनावरून , जमिनीचा ७/१२ आपले वडिलांचे नावावर आहे . तसेच गाव नमुना नंबर २ ला हि वडिलांचे नाव आहे . त्यामुळे तसे घाबरण्याचे कारण नाही .
ग्राम पंचायत रेकॉर्ड ला , त्या व्यक्तीचे नाव आहे . त्या विरुद्ध आपण गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा .
जमिनीचा ताबा , त्या व्यक्तीकडे २० वर्षावून आधी काळ असेल तर तो आपण विरुद्ध adverse possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करू शकतो .तत्पूर्वी आपणच , त्यास आपले मिळकतीतून काढून टाकणे बाबत न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh patil
08-07-2017
shingarei20@gmail.com

नमस्कार सर.
मा.ना.तहसिलदार साहेब यांनी रजिस्टर्ढ मुत्युपञचा प्रलंबित फेरफार निकाली काढले आहेत.आपिल कालावधी संपला आहे मा.तलाठी व मंडलआधिकारी साहेब 7/12 स नोंद घेतील का..नोंद घेण्यासाठी अर्ज करावे लागेल का सर..
मा.उपजिल्हाधिकारी साहेबांकडे आपिल दाखल झाली आहे.फ्कत अापिल केस चालु आहे जमिनीवर स्टे वगैर काही नाही.
Mazya panjobachya nanter chulat ajobani ekm mahnun sarv jamin tynchya nave keli ani aamche ajoba gharatil thorle asun tynche nav aaj kutech nahi Sat barywar ani te laun hi det nahit tr plz suggestion dya me KY karu
जमीन अजूनही चुलत आजोबांचे नावावर असल्यास , ये .कु . मॅ. च्या पोटातील इतरांची नावे ७/१२ सादरी दाखल करणे बाबत तहसीलदार यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

हक्कसोड पत्र आणि मृत्युपत्र या दोन्ही दस्तऐवजांची नोंदणी कोणत्या कार्यालयात केली जाते सर ?
हक्क सोड पत्रकाची व मृत्य पत्राची नोंदणी , दुय्यम निबंधक कार्यकाळात केली जाते
मृत्य पात्राची नोंदणी ऐच्छिक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
१.एका व्यक्तीचे जातीचे प्रमाण पत्र साठी जोडलेले आवश्यक कागदपत्र दुसऱ्या व्यक्तीला माहिती अधिकारात देता येईल काय ?
२. पोलीस पाटील पदाचे भरतीसाठी झालेल्या परीक्षेचे उत्तरपत्रिका एका उमेदवारांची दुसऱ्या उमेदवारास माहिती अधिकारात देता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.
राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी एखाद्या दुकानदाराचे दुकान अथवा व्यवसाय गेल्यास त्याला कोणत्या पुराव्या आधारे संपादनाचा मोबदला दिला जातो? आणि ते पुरावे कोणकोणते ते सांगा?
राष्ट्रीय महामार्ग कायदा , कलम ३ आ ची अधिसूचना काढण्या पूर्वी , जागेची संयुक्त मोजणी केली जाते . या मोजणीत दुकानाचा / व्यवसाय जागेचा उल्लेख केला जातो . अश्या जागेचे मुल्याकंन , दुकानाचे मुल्याकंन करून नुकसान भरपाई दिली जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3