जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
नमस्कार सर,
एका खातेधारकाने त्याच्या मालकिची जमीन अ या व्यक्तिस नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने विकली.परंतु ती जमीन 7/12सदरी नाव लागले नाही व अर्ज पण केला नाही नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याचे म्हणत आहे??? व ती जमीन खातेधारकच 3-4 वर्ष वहिवाटित राहिला व 3-4 वर्षाने खातेधारकाने 'ब' या व्यक्तिस नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने विकली. "ब"या व्यक्तिचे नाव 7/12 सदरी लागले व 2-3 वर्ष जमिन वहिवाटली सुध्दा सदर ''ब" या व्यक्तिने 2-3 वर्षाने जमिन "क" या व्यक्तिस नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने विकली. "क"या व्यक्तिचे नाव 7/12 सदरी लागले व 25 वर्ष जमिन वहिवाटत आहे व जमिनिच्या पिक पेरे व महसुल विभागाचा कर भरणा आजपावेतो भरत आहे. परंतु "अ" हा व्यक्ती जमिनीचा हक्क मागणी करत आहे त्याचा कुठेहि फेरफार नाहि व जमिन वहिवाटली सुध्दा नाही.व्यक्ति फक्त नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखता आधारे हक्क मागनि करत आहे.व खोटि माहिति तक्रार मध्ये देत आहे ति अशी खालीलप्रमाने.
कि मि सदरिल जमिन घेतलि तेव्हा पासुन वहिवाटत आहे?परंतु त्याव्यक्तिचा कोणताहि फेर व कर तसेच 7/12 सदरी नाव पण नाहि. फक्त नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने म्हणत आहे ते सुध्दा खोटे व लबाडिने आम्हि पण सदरील जमिन सर्व फेर बरोबर बघुन व नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने घेतलेलि आहे.
सर योग्य मार्गदर्शन मिळणेस विनंती.
अ या व्यक्तीच्या नावे, सर्वात पहिले खरेदी खत आहे . कायद्या मध्ये
Who is prior in time , is prior in law .........
त्यामुळे जरी फेरफार नसला तरी त्याचा हक्क आहे . त्याचे नाव लागणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्‍ट्र शासन राजपत्र दिनांक 4 फेब्रुवारी 1988 ची प्रत कोणाकडे असल्‍यास कृपया rtrathod1506@gmail.com वर देण्‍यात यावी, ही विनंती.
राजेश्वर राठोड साहेब
आपण राजपत्राची प्रत शोधा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

किरण साहेब प्रथमतः आपल्या अमूल्य सल्ल्यांबद्दल आणि वेळेबद्दल धन्यवाद.
पांडुरंग (ए.कु.मॅ), कानिफ, सर्जेराव (माझे वडील), बाजीराव आणि गोपाळा हि पाच भावंडे आहेत. पांडुरंग (ए.कु.मॅ) यांचे नावे ८ गट २३५अ ,२३५ ब,२४५ अ, २४५ ब, ४०१,६३५, ६९३,१०४८ होते. १९७९ मध्ये दिवाणी न्यायालयात वाटपाचा हुकूमनामा झाला त्यानुसार,
पांडुरंग : २३५ अ आणि ब,
कानिफ, सर्जेराव, बाजीराव : २४५ अ आणि ब, ४०१, ६३५, ६९३,१०४८ असे गट मिळाले. गोपाळ हे दुसऱ्या गावी दत्तक असलेने त्यांनी सर्वाधिकार सोडले आहेत.
पांडुरंग (ए.कु.मॅ) हे १९८० साली मयत झाले त्यानंतर तो हुकूमनामा नोंदीत करून ७/१२ दप्तरी खातेफोड झाली नाही.
हुकूमनामा कालबाह्य झाला असा समज करून पांडुरंग (ए.कु.मॅ) यांच्या वर्ग १ वारसांनी २३५ अ/ब, २४५अ व ६९३ वरती त्यांच्या वारसनोंदी करून घेतल्या इथे हुकूमनामा झालाच नाही असं दर्शवून २००८ साली महसूल न्यायालयात १९६५ सालच्या पांडुरंग (ए.कु.मॅ) यांच्या खरेदी खतांचा आधार घेऊन काही गटांवर वारसनोंद करण्यात आली.
तेंव्हाचे महसूल सचिव क्षत्रिय साहेब यांच्या सल्ल्यानुसार मी १९७९ सालाचा हुकूमनामा विलंब शुल्क भरून २०१७ मध्ये नोंद करून आणला. आता ह्या नोंदीत हुकूमनामा प्रमाणे नोंदी करण्यासाठी अर्ज केला असता तलाठी यांनी फेरफार नोंद केला परंतु मंडल अधिकारी यांनी २ गट ७/१२ मध्ये बदल तेंव्हा त्या वारसांची परवानगी आवश्यक शेरा मारून रद्द केला. कोर्ट आदेश असताना व त्यावर पांडुरंग यांची सही असताना ह्या २ गटांवरील नोंदी घालण्यासाठी पांडुरंग यांच्या वारसांची परवानगी हवीच आहे का ? ६ गटांचा काही प्रॉब्लेम नाही परंतु २ गट जादाचे २४५ ब आणि ६९३ हे पांडुरंग यांच्या नावावरचे हुकूमनामा प्रमाणे सर्जेराव-बाजीराव-कानिफ यांच्या नावे होतील का ?
साहेब कृपया मार्गदर्शन करा.

आपला विनीत,
अजितकुमार पाटील, (तांबवे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली )
९६६५१५५६७७
मंडळ अधिकारी यांनी घेतलेली हरकत योग्य नाही . वारस / भोगवटादार जरी बदलेले असले तरी , न्यायालयाचा हुकूमनामा आहे . त्याचे पालन करणे आवश्यक आहे .
तथापि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजी कि , हुकूमनामा अंमल बजावणी कालावधी १२ वर्ष इतका असतो . आपल्या हुकूमनाम्यास १२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे . त्यामुळे हुकूमनामा याची वैधता संपली आहे . जर सध्याचे भोगवटादारांनी हरकत घेतली नाही तर आपले नाव ७/१२ सादरी लागू शकते . अन्यथा आपण हुकूमनामाचा अंमलबजावणी करणेसाठी ज्या न्यायालयाने वाटप केले त्या न्यायालयाकडे अर्ज करा . न्यायालयाने विलंब माफ केला तर , अंमलबजावणी करणेसाठी दिवाणी न्यायालय आदेशित करेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,हद्द्कायम मोजणी किती वर्षापर्यंत ग्राह्य धरली जाते.BND खाली अर्ज करणे म्हणजे काय?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
१९२९ चे क पत्रकानुसार एका सर्वे नंबरचे क्षेत्र ३० एक १० गुंते होते. त्याची तीन हिस्से केलेबाबत क पत्रकाला नोंद दिसून येते . त्यानुसार २५७/१ क्षेत्र १० एक. ६ गुंते , २५७/२ क्षेत्र ९ एक. ३८ गुंते याचे ७/१२ सॅन १९३०-३१ मध्ये तयार झाले. पण २५७/३ क्षेत्र ९ एक. ३८ याचा ७/१२ तयार झाला नाही. सादर क्षेत्र वारसाचे ताब्यात आहे. सादर वारस आत्ता २५७/३ चा ७/१२ तयार करून वारसाची नावे लावणे बाबत अर्ज करत आहेत. आत्ता नव्याने ७/१२ तयार करता येईल का. ङ्कयदेशीर तरतूद काय. अधिकार कोणाला आहेत. कोणत्या बाबी तपासावेत
आकार बंदास किती क्षेत्र नमूद आहे ? आकारबंदास ३० एकर क्षेत्र असेल तर , मोजणी करून घ्या . आकारफोड पत्रक केले कि , २५७/३ चा ७/१२ तयार होईल
संगणीकृत ७/१२ मोहिमे दरम्यान , क्षेत्र दुरुस्ती झाली असेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
22-07-2018
sagar06731@gmail.com

सर , माझे वडील याना 3 भाऊ होते .2015 साली चौघे भावांनी आपली 40 एकर (वडिलोपार्जित व एकत्र असताना खरेदी केलेल्या) शेती प्रत्येकी 10 - 10 एकर वाटून घेतले.माझे मोठे काकांनी 2002 साली एकत्र असताना आपल्या मुलाच्या नावे 4 एकर जमीन आमच्या शेजारील गावी खरेदी केली होती , ही मिळकत त्यांनी आम्हा पासून लपवून ठेवली होती व आज ही त्याच्या मुलाच्या नावे आहे.तर त्यात आम्ही 1/4 हिस्स्या साठी दावा ठाकू शकतो का व आम्हाला हिस्सा मिळेल का?
नाही
ती काकांची स्वकष्टार्जित मिळकत आहे . त्यावर आपला हक्क कसा ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
21-07-2018
sagar06731@gmail.com

प्रश्न - गाव एकत्रीकरण योजने दरम्याम घेण्यात येणाऱ्या जंगल पाहणी (परिस्थिती) बद्द्दल सविस्तर माहिती द्यावी.तसेच भुतकाळ जमीन ची कसण्याच्या सोयीने अदलाबद्दल झाली असेल तर ती नोंद , ताबे पावती ,जबाब कुठे मिळतील? धन्यवाद!

Question by सागर
21-07-2018
sagar06731@gmail.com

नमस्कार साहेब!
मौजे लाखलगाव ,ता.जी.नाशिक माझ्या चुलत भावाच्या 5 एकर शेतीत ७/१२ इतर हक्कात सौरक्षित कुल म्हणून माझ्या आजोबा चे नाव आहे.आजोबा १९५०रोजी मयत झाले व सदर जमीन चुलत भावाने 1972 साली श्रीधर बर्वे नावाच्या व्यक्ती कडून खरेदी केली आहे. माझे वडील १९९४ ला मयत झाले.माझ्या कडे वडील व आजोबा चे मृत्यपत्र आहेत.तरीही आज रोजी वारस म्हणून माझे व माझ्या भावाचे नावे इतर हक्कात लागतील का?मार्गदर्शन करावे.ध्यन्यवाद!

आजोबा १९५० ला मयत झाले . आजोबा मयत झाल्यावर , वारस म्हणून , आपले वडील , चुलते यांची नावे ७/१२ सादरी लागली का ? आजोबांचंद वारसांची नावे न लागल्याने , चुलत भावाने ७२ साली ती जमीन खरेदी केली . आता या गोष्टीला ४६ वर्षे झाली आहे . एवढा प्रदीर्घ विलंब माफ होईल का ?
होणार नाही .
खरेदी खात रद्द करणेसाठी आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता का ?हि श्यक्यता पडताळून पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
21-07-2018
sagar06731@gmail.com

प्रश्न - गट नं.238 ही जमीन नवीन अविभाज्य शर्तीची असून 'सक्षम अधिकाराच्या परवानगी शिवाय हस्तांतरणस बंदी' हा शेरा इत्तर हक्कात आहे.पूर्वी ही जमीन पुंजा नावाचं व्यक्तीची होती.पुंजा हा 1952 साली मयत झाला व त्याच्या दोन वारस मुलाचे नाव मोगल पुंजा आणि दादा पुंजा यांचे नाव 7 / 12 दिसू लागले.दादा पुंजा हा 1972 साली मयत होऊन त्याच्या 3 मुले ,2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.2000 साली मोगल हा मयत होऊन त्याच्या 2 मुले व 2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.आज मितील ह्या दोन्ही परिवारात कटुता असून त्याची वाटणी झालेली नाही व ही सर्व जमीन सामायिक क्षेत्र म्हणून 9 जणांचे नाव 7 / 12 ला आहे.माझा स्वतःचा गट 237 हा गट या 238 गट शेजारी असून मी हा गट विकत घेऊ इच्छितो व आज ती सर्व जमीन माझाकडे कासण्यासाठी असून कब्जा आमचाच आहे तर...
1.सामाईक वारसा पैकी दादा पुंजा चे 6 वारसा मला त्याचा 1/2 (अर्धा ) हिस्सा विकू इच्छिता तर मी ती जमीन खरेदी करू शकतो का?.
2.जिल्हाधिकारी 1/2 (अर्धा ) जमीन विक्री ची परवानगी देतील का?.
3.मागील 20 वर्षी पासून सदर जमीन कसतोय पण पिकपहानी मालकाची आहे तर मी पीक पाहनि कशी लावू अथवा सिद्ध करू शकतो.
4.आणेवारी करून घेण्या साठी काय करावे लागेल?
दादा पुंजयाची जमीन आपण परवानगीने खरेदी करी शकता ( तुकडे बंदी कायदा अधीन ) .
जिल्हाधिकारी परवानगी देतील
आपण पीक पाहणी लावली तर याचा अर्थ असा होतो कि मूळ मालक जमीन कसत नाही . त्यामुळे जमीन सरकार जमा होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

रयत इनाम जमीन असून ती जमीन बिनशेती करणे बाबत तरतूद अथवा नियम या बाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे
इनाम जमीन आपणास पुनर्प्रदान करण्यात आली असेल . पुनर्प्रदान आदेशात जमिनीचा वापर फक्त शेती करण्यासाठीच करणेच आहे अशी शर्थ आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
19-07-2018
sagar06731@gmail.com

प्रश्न - विश्राम , दामू ,नामदेव ,तुकाराम असे चार भावाचे एकत्र कुटुंब होते व विश्राम हा कर्ता पुरुष होता.विश्राम ने 1948 साली गट न.241/ब जो 4 एकर होता त्या पैकी 2 एकर जमीन खरेदी घेतली शंभू नावाच्या व्यक्तीकडून.व उरलेली 2 एकर चौघे भाऊच कसत.1948 साली चारही भाऊ विभक्त झाले व ही 2 एकर (विश्राम ने खरेदी केलेलीं) नामदेव च्या वाट्यास अली.आत्ता शंभू ची 2 एकर जमीन आहे त्या वर अशी नोंद आहे की - ता.24 /12/1958 रोजी शंभू बर्वे यांच्या जमीनस विश्राम पाटील हे 1955 /56 पासून कुळ असल्याने इतर हक्कात स.सा. कुळ म्हणून दाखला घेतला. ह्या गटाचे 7/12 1966 पासून अगोदरचे मिळत नाही.1966 - 1977 पासून मात्र पिकपहानी ही संपुर्ण गटावर (4 एकर ) नामदेव ची आहे व इतर हक्कात स.सा. कुळ विश्राम कायम आहे .1977 साली शंभू ची 2 एकर जमीन शंभू च्या वारसांनी बापू नावाच्या व्यक्ती ला विकली इतर हक्क कायम ठेवून.1977 ते 1992 पर्यंत पिकपहानी ही बापु चिंच होती.1988 साली विश्राम मयत होऊन त्याच्या 8 वारसांची नावे बिंन कब्जी वारसदार म्हणून लागले स.सा. कुळ म्हणून. 1992 साली माझ्या मोठा काकांनी बापू कडन खरेदी केली इतर हक्क कायम ठेवुन.1992 ते 2015 पिकपहानी काकांची होती.2015 साली ही 2 एकर जमीन 20 - 20 गुंठे प्रत्येकी अशी माझे वडील व त्याचे तीन भाऊ यांनी म. ज.म.अ.कलम 85, तहसीलदार याच्या आदेशा नुसार वाटून घेतली.
तर...
1.जर मागील 30 वर्षी पासुन पिकपहानी व कब्जा आमचा च आहे तर स.सा. कुळ चे नावे कमी होतील का.
2.आम्ही मा.तहसीलदार याच्या कडे अर्ज दिला आहे तर आम्हाला त्यात काही अडचणी येतील का?
मार्गदर्शन करावे.धन्यवाद!

Question by balaji sawant
18-07-2018
balaji.sawant44@gmail.com

नमस्कार सर
माझी जमीन 2003 साली साठवण तलावासाठी संपादित करण्यात आली होती त्या वेळी कमी मोबदला मिळाला म्हणून शेतकर्यानी वाढीव दराने मोबदला मिळावा म्हणून2008 साली दावा दाखल केला आहे 2013 साली 150000प्रती एकरचा निर्णय शेतकऱ्याचा बाजूने दिला आहे व 2017 साली पाटबंधारे विभागाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे तरी रक्कम शेतकर्याना देण्यात आली नाही त्या वर शेतकरी नवीन कायद्याचा आधार घेऊन बाजार भावाच्या 4पट रक्कमेची मागणी करू शकतो का
नवीन भू संपादन कायद्याच्या कलम २४ (२) नुसार ,
जर भू संपादन निवड १ जेनेवारी २००९ पूर्वी झाला असेल मात्र जमिनीचा ताबा घेतला नसेल
अथवा नुकसान भरपाईची रक्कम , बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसेल तर , असा निवडा व्यपगत होतो
आपले प्रकरणात निवडा या जानेवारी २००९ पूर्वी जाहीर झाला आहे . मात्र नुकसान भरपाईची रक्कम आपण सवीकारण्यास नकार दिला आहे अथवा Under Protest स्वीकारली आले . त्यामुळे आपण २४ (२) च्या तरतुदीस पात्र होत नाही
न्यायालय जे वाढीव नुकसान भरपाईचा दार देईल , त्या आधारे आपणस जुन्या कायद्याच्या तरतुदी प्रमाणे मोबदला मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,आम्ही लेआऊट प्लॅन मंजूर करून घेऊन बिनशेती मोजणी २०१० मध्ये ७/१२ वेगळे करून घेतले.परंतु त्यानुसार आम्ही पक्के बांधकाम कंपाऊंड केले नाही त्याचा गैरफायदा घेऊन शेजारील व्यक्तीने त्याच्या जागेत मोजणी न करता संरक्षित भिंत बांधली.व ओपन व अमिनिटी spaceमध्ये अतिक्रमण केले. आम्ही ७/१२
नुसार आमच्या क्षेत्रात बांधकाम करणेकामी सदर प्लॅन मंजूर करून सदर क्षेत्र बिनशेती करून घेतले त्यावेळी शेजारील व्यक्तीने अतिक्रमण केल्याचे दिसून आले.त्यामुळे आम्ही आमच्या क्षेत्रापुरते त्याचे अतिक्रमण काढून बांधकाम केले.त्यावेळी सदर व्यक्तीने बिनशेती आदेश रद्द करणेकामी sdo . यांचेकडे अर्ज दिला व आम्ही अतिक्रमण केले असे नमूद केले.परंतु त्याचा अर्ज फेटाळण्यात आला.आमचे बांधकाम पूर्ण झाले आहे.त्याने त्याचे जागेची आता हद्दकायम मोजणीकामी अर्ज दिलेनंतर आम्ही हरकत घेतली.त्याबाबत सुनावणी होऊन मा.उपअधीक्षक यांनी आमच्याविरुद्ध निकाल देऊन निकालपत्रात आम्ही पूर्वी केलेला मंजूर लेआऊट व बिनशेती मोजणी सदोष असल्याचे म्हटले आहे.व त्याची मोजणी योग्य असल्याचे म्हटले आहे.आम्ही निमताना मोजणीसाठी अर्ज देण्यासाठी गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले. की त्याचा काहीही फायदा होणार नाही.तुम्ही तडजोड करा.वास्तविक आमच्या क्षेत्रात पूर्वी मोजणी न करता अतिक्रमण केले आहे.मा.जिल्हा अधीक्षक साहेब यांना भेटलो असता त्यांनी अपिलापुर्वी निमताना मोजणी करण्याचे सुचविले.त्यामुळे नक्की काय करावे?शेजारील व्यक्ती राजकीय असल्याने आम्ही रीतसर परवानगी घेऊन बांधकाम केले आहे.त्यास धोका निर्माण होऊ शकतो का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
फेर मोजणी होणे गैर नाही
आपण अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब नमस्कार
आमची उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात आमची मुत्यूपत्राची केस चालू होती, हि केस चालू असताना आम्ही कोर्टात सुद्धा दावा दाखल केला आहे ,त्याची तारीख चालू आहे परंतु उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टातील केस १४ डिसेंबर २०१७ ला निकालावर ला पडली होती ,निकाल लागून सात महिने झाले परंतु आम्हाला अजून निकाल पोस्टाने आला नाही ,आम्ही निकाल मिळण्यासाठी अर्ज २६.०७.२०१८ ला केला आहे,परंतु निकाल मिळण्यास विलंब झाला आहे ,आणि आम्ही उपविभागीय कार्यालयात चौकशी केली असता आमचा अपील अर्ज फेटाळला आहे,असे दिसून आले ,तरी निकाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही काय करावी लागेल ,कृपया मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती
निकालाची प्रत मिळाल्यावर ९० दिवसात अपील करता येऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by shiva
16-07-2018
marathitech2@gmail.com

जमीन खरेदी केल्या नंतर नाव नोंदणी साठी नोटीस (तलाठी)बजावली कोणाचीच हरकत नसेल तर ७/१२ वर नवीन मालकाचे नाव नोंदणी साठी किती दिवस लागतील जर मंडल अधिकारी टाळा टाळ करीत असेल तर तक्रारार कोणाकडे करावी
१५ दिवस नोटीस अवधी आहे . हरकत नसेल तर , १५ दिवसानंतर नोंद मंजूर करणे , मंडळ अधिकारी यांना बंधन कारक आहे
तहसीलदार यांचेकडे आपण तक्रार करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Aaderniy sir,
Aamhi eka jaminimadhe sanrakshit kul aahot, pan tyach barobar etar adhikarat eka trust Che nav ahe jaminichi kharedi karatana dharmaday aayukt yanchi parvanagi ghene aavashak ahe ka
आमची रत्नागिरी जिल्ह्यात गावी वडिलोपार्जित जमीन आहे. आजमितीस ७/१२ उताऱ्यावर एकूण २० सह-हिस्सेदारांची नावे आहेत. गेले वर्षभर आम्ही सामंजस्यांने जमीन वाटप करण्याचा प्रयत्न करत आहोत. या क्षणाला २० पैकी १९ सह-हिस्सेदार जमीन वाटपाला तयार आहेत. केवळ १ सह-हिस्सेदार वेगवेगळ्या सबबी सांगून वाटप टाळत आहे.
माझा प्रश्न असा आहे कि या एका सह-हिस्सेदाराला बाजूला ठेवून आम्ही उरलेले १९ सह-हिस्सेदार आमच्या जमिनीचे वाटप करू शकतो का? आणि तसे शक्य असल्यास त्याकरिता काय प्रक्रिया आहे?
आपले मार्गदर्शन आमच्यासाठी बहुमोल आहे. कृपया योग्य मार्ग सुचवावा. धन्यवाद.
सर्वांची संमती असेल तरच वाटप होऊ शकते
आपण दिवाणी न्यायायालयात हिस्सा निश्चित करून , निश्चित केलेल्या क्षत्राप्रमाणे जमिनीचा ताबा मिळावा म्हणून दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शेती ploting करू विकणाऱ्या ने विकली व घेणारे जो जो व्यक्ती आहे.त्यांनी 20 वर्ष होऊन गेले पन त्यांनी त्यांच्या नावे फेर घेतला नाही.व त्यांच्या नवे फेर नसून त्यांनी दुसऱ्याला विकली. व त्या ने ही तिसऱ्या ला विकली व या मधे घेणार आम्ही आहे.आम्ही ज्याच्या कड्ने घेतली त्यांच्या कडे ploting करून विकणाऱ्या चा खरेदी खंत नाही. तरीही माननीय सर्व मान्य वरानी या सर्व प्रकरणात काय करता येईल.आपणास विनंती आहे सहकार्य करावे.तरी मला काही विचारायचे असेल तर.plz call mi 8956893934
आपण ज्याच्याकडून खरेदी घेतली त्याच्याकडे खरेदी खात नाही , मग तो मालक कसा ?
आपण खरेदी पूर्वी जमिनीचे सर्व अभिलेख , परवानग्या पाहणे आवश्यक होते
ज्याने प्लॉटटींग केले आहे तो जर , खरेदी करून देत असेल तर पहा . नोंदणीकृत दस्त करू दिल्यास , आपले नाव मिळकतीस लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सातबारा वरील पोट खराब कमी करणे बाबत माहिती द्यावी .आमचे गटामध्ये एकूण ९० आर पोट खराब दाखविले आहे परंतु गट मधून नाला किंवा रास्ता गेलेला नाही .अ वर्ग पोट खराब आहे
नमस्कार सर ,माझ्या चूलतया च्या नावे ६ आर जागा एकुमॅ अशी आहे एकट्याच नाव असल्याने
त्याने परस्पर ४आर व २आर अशी दोन जणांना खरेदी खताने जागा विकली पण ७/१२ सदरी त्यांची नोंद झाली नाही बऱ्याच वर्षांनंतर आम्ही
एकुमॅ च्या फेरफारनुसार आमची ५ जणांची वारसनोंद केली तर आता चुलतयाकडून खरेदी केलेल्यांची नोंद ७/१२सदरी होईल का ?कृपया मार्गदर्शन करावे
आपल्या चुलत्याने जमीन ज्यांना विकली , त्यांची नोंद तलाठी यांनी मंजुरीसाठी नोंद केल्यावर , आपण हरकत घ्या
मात्र आपण , ते खरेदी खत रद्द करण्यासाठी , दिवाणी न्यायायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. किरण पानबुडेसो ,
नमस्कार
१. ग्रामपंचायत विरोधात सिटी सेर्वेचा निकाल आमच्या बाजूने होऊन सदर गावठाण मधील आमच्या जागेत पिपर्णी चे झाड आहे , ते तोडण्यासाठी आम्ही फॉरेस्ट विभागाकडे चौकशी केली असता ते म्हणाले सदर झाडाची नोंद ८ अ उताऱ्याला लावून मग परवानगी मागा. परंतु ग्रामसेवक आमची नोंदच करत नाहीत. ते म्हणतात माझ्या हातात नाही.
२. सदर जागेची नोंद आमची सिटी सेर्वेला झाली त्या नंतर आम्ही ती जागा क्षीरसागर याना विकली त्यांनी सदर जागेची कर आकारणी साठी नोंद व्हावी म्हणून दिनांक १५/१/२०१८ रोजी अर्ज दिला त्या सोबत त्यांनी त्यांच्या नावाचे पॉपर्टी कार्ड व रजिस्टर खरेदी पात्राची नक्कल दिली होती.परंतु ग्रामसेवक म्हणतात मी नोंद करू शकत नाही माझ्या हातात काही नाही.त्यासाठी ग्रामपंचायत बॉडी परवानगी देत नाही. क्षीरसागर यांनी तसे आम्हाला लेखी द्या असे सांगितले परंतु त्यांनी लेखी न देता २८ फेब्रुवारी २०१८ चा ठराव झाला कि सदरची जागा सार्वजनिक असल्यामुळे सरपंच ग्रामपंचायत यांनी योग्य ती कागदपत्रे जमा करून वकिलाची नेमणूक करून कोर्टात दाद मागावी त्याची प्रत क्षीसागर याना दिली आहे.
३. वरील प्रमाणे पहिला नोव्हेंबर मध्ये असाच ठराव त्यांनी घेतला होता ज्यावेळी आमचा निकाल सिटी सर्वे ला झाला होता त्यावेळी परंतु आज पर्यंत त्यांनी काही कोटाची कार्यवाही केली नाही.
तसेच आम्ही बी.डी. ओ. व सी. इ. ओ .यांच्याकडे हि अर्ज दिला आहे परंतु काही कार्यवाही अजून त्यांनी केली नाही.
आमहाला झाडाची नोंद होऊन झाड तोडायचे आहे त्यासाठी दुसरा मार्ग आहे का ? आम्ही काय करावे ?
ग्रामपंचायत ऍक्ट नुसार दुसरा मार्ग असल्यास सुचवावा ?
कर आकारणी साठी ग्रामपंचायत ला नोंद होण्यासाठी सुद्धा मार्ग सुचवावा हि नम्र विनंती.
मिळकत पत्रिकेला , क्षीरसागर यांचे नावाची नोंद झाली आहे का ?
जर ग्रामसेवक , ग्राम पंचायत आकारणी पॅट्रिक्स नाव लावत नसेल तर , गट विकास अधिकारी यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM
28-04-2018
vikram.vy11135@gmail.com

सर नमस्कार आपण मार्गदर्शन केलाय त्या
मुळे मी योग दिशेने जात आहे. माझ्या २ बहिणींनी कोर्टातच हक्कसोड करून दिले आहे त्यावर तोडजोड़ हुकूमनामा झाला आहे .मात्र केवळ कोर्टात तडजोड नामाझाल तो दस्त नोंदणीकृत करायचे माहित नसल्यामुले राहून गेले त्या मुले बहिणींनी ती जमीन माझा हक्कात सोडली होती ती दुसऱ्याला विकली आहे त्याची ७/१२ वर नोंद होण्यापुरवी मी मुद्रांक लेट फी भरून ताशिलदार व मंडळ अधिकारी यांच्या कडे तास अर्ज करून माझे म्हणेने मांडले त्यावर त्यांनी ७/१२ सादरी त्या हुकूम नामावरून माझे नावं लावले पण दस्त ज्या बहिणींनी दुसऱ्याला करून दिला होता त्यानी प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील करून माझे नांव कमी करण्याचे आदेश मिळवला आता ७/१२ सादरी त्यांचे नांव लागले आहे.तर मला काळात नाही कि मुद्रांक शुल्क (दंड) भरून ,ताशिलदार ,मंडळ अधिकारी (आदेश ) असून सुद्धा प्रांत अधिकारी माझा विरुद्ध निर्णय कसा दिला.हुकूमनामा दस्त नोंदणी कृत करणे म्हणजे काय ? तो दस्त आता सुद्धा मी नोंदणी कृत करू शकतो काय ? त्याची प्रोसिजर कशी आहे,व तयामुळे च असे घडले का? कृपया मार्ग सांगा.मी बहिणींनी माझा विरुद्ध बनावट दस्त बनवला हाये ,व त्याचे पुरेसे रक्कम बहिणीला मिळाली सुदा नाही तरी केवळ तो दस्त नोदकरून मालकी हक्क सांगत आहे ,निशाणी ५ चा दावा त्याविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला आहे.
आपण वेळीच हक्क सोड पत्र बहिणीनं कडून नोंदणीकृत करून घेतले असते तर हे वेळ आली नसती .
असोत बहिणींनी जमीन त्रयस्थ इसमास विकली आहे . तो दस्त रद्द करून मिळण्यासाठी , दिवाणी न्यायालयात अर्ज करा . त्रयस्थ इसमाने जमीन कझारेदी करताना , वर्तमान पत्रात नोटीस दिली होती का ? दिली नसल्यास आपली बाजू वरचढ आहे . आपण ते खरेदी खात रद्द करू शकता .
मात्र जर त्याने वर्तमान पत्रात नोटीस दिली असेल , तर आपणास जमीन मिळणार नाही मात्र , जमिनीची किंमत व्याजासह मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

eक्लास जमिनीवरील आज रोजी असलेले घरांबाबत माहिती मिळावी
‌ नमस्कार सर आम्हला सरकारी जमीन पट्टा आधारित २.०० हे जमिन मिळाली आहे ति जमिन राष्ट्रीय महामार्ग ३६१ माझ्या नावे ०.८०आर जमिन संपादीत झाली आहे. त्या जामिनीचा मावेजा मला भेटु नाही म्हणून माझ्या विरूद्ध गट नंबर मधिल एकाने तक्रार केली आहे. की ति जमिन आमच्या वडिलाची आहे त्यामुळे त्या जामिनीचा मावेजा आम्हला भेटावा म्हणुन आर्ज केला आहे. त्यानंतर मा. उप जिल्हाआधिकारी साहेब म्हनाले की, ति जमिन पडीत आहे वहीती नाही म्हणून जामिनीचा मावेजा व जमिन शासनाास जमा करतो. त्या जामिनीची मि भूमि अभिलेख कार्यालया कडून मोजनि करून घेतली आहे माझ्या मोजनि च्या वेळी मा. तलाटी, वनरक्षक, ग्रामसेवक याच्या समक्ष मोजनि करून दिली आहे. त्यावेळी माझ्या विरोधकाचे सात/बारा वर देखील नव्हते. मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
जमीनीचा मावेजा आपणास मिल्ने आवश्यक आहे . जस्मिन संपादन होताना , जर जमीन आपले नावावर असेल तर , आपणास compensation मिल्ने आवश्यक आहे .
जर जमीन पंडित होती तर , संपादन अधिसूचना निघण्यापूर्वीच , शासन जमा करणे आवश्यक होते .
मावेजा नाकारला असल्यास ( लेखी कळवले असल्यास ) , लवादाकडे , लवाद संदर्भ दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3