जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सोमनाथ Lokhande
13-02-2017
somnathLokhanderx@gmail.com
नमस्कार सर , माझ्या मामाने त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनी मध्ये फक्त त्यांची वारसनोंद करून घेतली व बहिणींची नावे टाकली नाही ही वारसनोंद करून 15ते२० वर्षे झाली आहेत आता आम्हाला बहिणीची वारसनोंद करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे
कोणाचाही वारसहक्क डावलणे ही गंभीर बाब आहे. आपण सदर वारस नोंदीच्या फेरफार विरूध्द उपविभागीय अधिकारी यांचेकडे वेळेत अपील दाखल करणे आवश्यक होते. आता १५-२० वर्षानंतर अपील दाखल करण्यास मुदतीच्या कायद्याची बाधा येईल. तथापि, आपण उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करावी. अन्यथा दिवाणी न्याायालयात दाद मागावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सुधीर परब
11-02-2017
sudhi0308@gmail.com
नमस्कार,
योग्य ती स्टॅम्प ड्युटी सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये भरून हक्कसोड पत्र तलाठी यांच्याकडे जमा करून दोन महिने झाले आहे तसेच तलाठी यांच्या कडून पोच ही घेतलेली आहे आणि तेथील तलाठी आता निवृत्त झाले आहेत आणि आतापर्यंत सुधारित सातबारा उतारा आणि त्याचा फेरफार मिळाला नाही आहे.
सुधारित उतारा आणि फेरफार मिळवण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.
महसूल विभागात संगणीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे त्यातील व्यस्ततेमुळे उशीर होण्याचा संभव आहे. तथापि, आपण तहसिलदार यांची भेट घेऊन चर्चा करावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप कुराडे
11-02-2017
sandeep.kurade25@gmail.com
Sandeep Kurade.
1. नमस्कार साहेब ,माझा प्रश्न
जर वाढीलोपार्जित हिंदू अविभक्त कुटूंब मिळकत आहे आणि त्या शेतजमीन आहॆ,
तर वडील x च्या मृत्यु 1965 ला झाला आणि त्यांचे 4 मुले होती ( a,b मुले C,D विवाहित मूली )आता A & B हेयानी त्यांची नावे कब्जेदार व C ,D ची नावे इतर हक्कात 1984 ला 7/12 वर नोंद केली.
तरी 4 मुलांची पुर्वी मृत्यु आहेत पण त्यांची वारासदार चि नावे पण त्या प्रमाणे नोंद झाली, आता C & D हया मूली चे वारस इतर हक्कात आहे.
1) C & D चे कब्जेदार सदरी न होता इतर हक्कात केले हे कुठल्या कायदा चे उलघन आहे.?
2)C & D हया मूली चे वारस इतर हक्कात आहे.तर ते कब्जेदार सदरी नाव नोंदवु शकते का? कुठलया कायदा खाली.?
सदर एक 2012 ला c च्या वारासने ने त्याचा अविभक्त हिस्सा च्या ऐका गट मध्ये ची खरीदी दिली. तेव्हा सब रजिस्ट्रार ने ते नोंदविले पण आता जेव्हा बाकी चे गट खरेदी व बक्षिसपत्र करताना सब रजिस्ट्रार आता 2017 ला मना करत आहे ते म्हणतात इतर हक्कात नाव आहे.
3) इतर हक्कात च्या वरसाना त्यांचा अविभक्त हिस्सा कुठल्या कायदा खाली देता येत नाही किवा दस्त नोंदिवता येत नाही.
C & D चे कब्जेदार सदरी न होता इतर हक्कात केले हे कुठल्याही कायद्याचे उलंघन नाही. पूर्वी मुलींना मिळकतीमध्ये समान वारसा हक्क नसल्यामुळे फार पूर्वीपासून ही पध्दत अस्तित्वात आहे.
दिनांक २२ जुन १९९४ रोजी हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६, महाराष्ट्रात लागू करतांना त्यात सुधारणा करुन हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम १९९४ लागू केला.
हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम १९९४ कलम २ अन्वये हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६, महाराष्ट्रात लागू करतांना त्याच्या कलम २९ नंतर पुढे प्रकरण ३० समाविष्ट केले गेले.
प्रकरण २-क अन्वये "उत्तरजीवीत्वा)द्वारे उत्तराधिकार" नावाचे प्रकरण समाविष्ट केले गेले आणि पुढील तरतुदी समाविष्ट केल्या् गेल्या.
कलम २९-क: कलम ६ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी -
(एक) मिताक्षर कायद्याने नियंत्रीत केल्या जाणार्या संयुक्त हिंदू कुटुंबामध्ये सहदायकाची कन्या, ज्या रीतीने पुत्र सहदायाद होतो, त्याच रीतीने जन्मापासून, तिच्या स्वत:च्या हक्कामुळे सहदायाद होईल आणि ती पुत्र असती तर तिला जे जे अधिकार, दायित्वे, नि:समर्थता प्राप्त् झाली असती, ती प्राप्त् होईल.
(दोन) उपरोक्त संयुक्त् हिंदू कुटुंबामधील वाटणीच्या वेळेस पुत्राला वाटून देण्यात येत असलेल्या् हिस्या इतका हिस्सा कन्येलाही मिळेल.
(तीन) उपरोक्त प्रमाणे हिस्सा मिळालेली स्त्री्, त्या हिस्स्याबाबत मृत्यूपत्रद्वारे किंवा अन्य प्रकारे अशा मिळकतीची विल्हेवाट सुध्दा लावू शकेल.
(चार) उपरोक्त तरतुदी हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम-१९९४ च्या प्रारंभाच्यां दिनांकापूर्वी (२२ जुन १९९४ पूर्वी) ज्या मुलींचे लग्न झाले आहे त्यांना लागू असणार नाही.
(पाच) दिनांक २२ जुन १९९४ पूर्वी ज्या वाटण्या घडून आल्या असतील त्यांना उपरोक्त तरतुदींमुळे बाधा येणार नाही.
उपरोक्ती तरतुदींन्वये आपण तहसिलदारकडे अर्ज करून इतर हक्कातील वारसांची नावे कब्जेदार सदरी नोंदविण्यासाठी अर्ज करू शकाल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
09-02-2017
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, आमचे वडिलांनी सन २००३ मध्ये मृत्यूपत्र नोंदणीकृत न करता फक्त नोटरी केलेले आहे. नोटरी केलेले मृत्यू पत्र ग्राह्य धरले जाईलका कृपया मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती.
नोंदणी अधिनियम १९०८ कलम १८ अन्वये ज्या दस्तांची नोंदणी करणे वैकल्पिक आहे त्यांच्या यादीत मृत्युपत्राचा समावेश होतो. त्यामुळे मृत्युपत्राची नोंदणी अनिवार्य नाही. तुमच्या वडिलांनी नोटरी केलेले मृत्युपत्र निश्चितच ग्राह्य धरले जाईल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Vikram yadav
08-02-2017
Vikram.vy1113@gmail.com
Namaskar Sir, prant shebacha nikal kalvadhi Kati asto? to nikal postane yato ka tycha kalavadhi Kati.?
अर्धन्यायीक प्रकरणात नोटीस बजावणे, नैसर्गिक न्या्यतत्वातनूसार प्रत्येक संबंधीताला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देणे, वाद-विवाद, उलटतपास यागोष्टी संबंधीत अधिकार्याला इतर सर्व कामे सांभाळून कराव्या लागतात. त्यामुळे कोणत्या प्रकरणाचा निकाल कधी देता येईल हे सांगणे अवघड आहे. तथापि, नवीन तरतुदींनुसार वाद प्रकरणे शक्यतो एक वर्षाच्या आत निकाली काढावीत अशा सूचना आहेत. निकालाची समज पोस्टाने पाठविण्यात येते. निकालपत्राची नक्कल आपण समक्ष जाऊन विहित शुल्क अदा करून घेणे अपेक्षीत आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by swati swami
07-02-2017
swati.swami@yahoo.com
मा. सर धन्यवाद . पण महेश मुकुंद सप्रे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व प्रवीण वरंडे व इतर -OA No ३५४/२०१५ हा निर्णय कोठे मिळू शकेल ?
Question by राहुल सावंत
07-02-2017
rahul9619309796@gmail.com
सर मी राहुल माझा प्रश्न असा आहे कि आमची गावी वडिलोपार्जीत जमीन आहे, ती जमीन आमचे आजोबा निधन झाल्यावर वारस तपासणी करून कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या मोट्या काकांनी सातबारावर आपले नाव लावले व माझ्या वडिलांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये लागले आहे आता मोठे काका वारले आहेत त्यांच्या मुलांनी वारस तपासणी करताना स्वतःच्या कुटुंबाचीच फक्त नोंद केली आहे त्या बरोबर माझ्या वडिलांची त्यांचे संख्ये भाऊ म्हणून वारस म्हूणन नोंद करणे जरुरी असताना हि त्यांनी फक्त आपल्याच कुटुंबाची नोंद केली आहे , तर माझ्या वडिलांनी आपल्या सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी काय करावे ?त्यासाठी मोट्या काकांच्या कुटुंबाची सही किंवा परवानगी लागेल काय ?गाव नमुना ६ क च्या उताऱ्या वरून वारस तपासणी करता येईल काय ?याचे आपण मार्गदर्शन करावे धन्यवाद साहेब .
Question by Vikram yadav
06-02-2017
Vikram.vy1113@gmail.com
. Namaskar Sir appan mala nehmich yoga MargDarshan keele ahhe an mala vicharyache ahhe ki mage Apil prant Sir yanchakade Charu hote te 7/12 nod dharnys sathi che hote amche vakil sangtat ki amche saves Kam Dale ahhe ata no nikal prant shheb detil . Toa nikal postane kalvala Gail.atta 2 machine gale tari nikal kalvala nahi.tar mi Kay karu, kharch Kati kalvadhi nikal patavnysathi ahhe plz sanga.thanks.
आपण स्वत: संबंधीत कार्यालयात नकलेसाठी अर्ज करावा. निकाल झाला असेल तर त्या्ची नक्कल लगेच मिळू शकेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sandeepK
06-02-2017
sandeep.kurade25@gmail.com
1. साहेब ,माझा प्रश्न
जर वाढीलोपार्जित हिंदू अविभक्त कुटूंब मिळकत आहे आणि त्या शेतजमीन आहॆ,
तर वडील x च्या मृत्यु 1965 ला झाला आणि त्यांचे 4 मुले होती ( a ,b मुले C,D विवाहित मूली ) आता A & B हेयानी त्यांची नावे कब्जेदारव C ,D चीना वे इतर हक्कात 1984 ला 7/12 वर नोंद केली.
तरी 4 मुलांची पुर्वी मृत्यु आहेत पण त्यांची वारासदार चि नावे पण त्या प्रमाणे नोंद झाली, आता C & D हया मूली चे वारस इतर हक्कात आहे.
1) C & D चे कब्जेदार सदरी न होता इतर हक्कात केले हे कुठल्या कायदा चे उलघन आहे.?
2) C & D हया मूली चे वारस इतर हक्कात आहे.तर ते कब्जेदार सदरी नाव नोंदवु शकते का? कुठलया कायदाखाली.?
Question by sandeepK
06-02-2017
sandeep.kurade25@gmail.com
नमस्कार साहेब,
माझ्या आजी ची पुणेच्या ठिकाणी वडिलोपार्जित हिंदू अविभक्त कुटुंब ची मिळकत आहे,तसें तिचे नाव सातबाऱ्यावर इतर हक्कात नाव होते ,तिच्या मृत्यू नंतर तिच्या एक मुलगा "A" व विवाहित मुलगी B चे नाव सातबाऱ्यावर नोंदवले त्या नंतर एक बिल्ल्डर च्या चलाखी ने बाहीने ( B ) चे हक्क सोडपत्र (A) भाऊ ला मिळवून दिले आणि नंतर
खरीदीखत केले.
question १)
जर इतर हक्कात नाव होते तर खरीदीखत कसें झाले जर झाले तर कुठल्या कायदा खाली?
question २)
जर इतर हक्क च्या हिश्यादार तर्फे खरीदी घेऊ शकत नाही तर सादर खरीदीदस्त रद्द करण्याची किंवा हरकत घेण्या साठी काय महसूली प्रक्रिया आहे ?
पूर्वी मुलींना मिळकतीमध्ये समान वारसा हक्क् नसल्यामुळे त्यांचे नाव इतर हक्कात दाखल करण्याची पध्दत अस्तित्वात होती. बहिणीने हक्कसोडपत्र करून दिल्यामुळे तिचा हक्क संपुष्टात आला. त्यामुळे खरेदी खताला कायदेशीर बाधा येत नाही. खरेदीखत रद्द करण्याचे अधिकार महसूल खात्याला नाहीत. त्यासाठी आपण दिवाणी न्यायालयात दाद मागावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by उषा रघुनाथ माळी
06-02-2017
Pmahajan2013@gmail. Com
माझे घर वरणगाव येथे असुन त्या घरा बाहेर एक विहीर होती तिला पाणी नसल्याने काही वर्षांपूर्वी ती विहीर बुजवली. आता त्या विहीरीच्या जागेवर आम्हाला बांधकाम करायचे आहे. पण आमचे शेजारी त्या जागेवर हक्क दाखवत आहे. त्यांचा त्या विहिरीवर फक्त पाणी भरण्याचा हक्क होता. आता पाणीही नाही आणि विहिरही नाही. तर आमच्या शेजाऱ्यांना त्या विहीरीच्या जागेवर हक्क दाखविता येईल का? आम्ही त्या जागेवर बांधकाम करू शकतो का ?
शेजाऱ्यांना त्या विहिरीवर फक्त पाणी भरण्याचा हक्क होता हे आपण निर्विवादपणे सिध्द करू शकत असाल तर त्यांना विहीरीच्या जागेवर हक्क दाखविता येणार नाही. तुम्हीे त्या जागेवर आवश्यक त्या परवानग्या घेऊन बांधकाम करू शकाल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by chandrkant kale
04-02-2017
chandukale49@gmail.com
माझी आई नगर परिषद मध्ये झाडू कामगार आहे तिची जन्म तारिख नगर परिषद कडुन सेवापटाला चुकीची लागली आहे आई ने दिलेला जन्म दाखला लावला नाही आणि
आम्हाला कल्पना देखिल दिली नाही माझी आई असुक्षित आहे आम्ही कुठे तक्रार करावी कृपया मला मदत करा साहेब ही विनंती आहे
Question by स्वाती स्वामी
04-02-2017
swati.swami@yahoo.com
kalam २५५/२५७ ची प्रकरणे अपर जिल्हाधिकारी यांचेकडे चालतात कि जिल्हाधिकारी यांचेकडे .
Question by RAVINDRA
03-02-2017
ravindra171282@gmail.com
नमस्कार सर , प्रश्न असा आहे कि ठाणे जिल्हेतील कल्याण डोंबिविली परिसरातील सोसायटी आहे तिचे बांधकाम १९८५ च्या दरम्यान झाले आणि सोसायटीस जर ओसी प्रमाणपत्र नसेल तर मानवी हस्थांतरांत काही अडचण येऊ शकेल का. आणि जर ओसी प्रमाण पत्र नसेल तर त्यास पर्याय काय होऊ शकतो. किंवा ओसी शिवाय मानवी हस्थांतरंन होऊ शकते का..
Question by रोहिदास सखाराम पाबळे
03-02-2017
rohidaspable@yahoo.in
नमस्कार सर लीस पेंडन्सी चा शेरा ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद असल्यास सदर ७/१२ चे खरेदी खत करता येईल का
लीस पेंडन्सीचा शेरा ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद असल्यास सदर मिळकतीचे खरेदी खत करण्यात अडचण नाही. तथापि, सदर खटल्यात होणारा न्यांयालयीन निकाल नवीन खरेदीदारावर बंधनकारक राहील.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल वाघमारे
03-02-2017
rahulwaghmare2086@gmail.com
सर आम्हाला सरकारी गायरान पठा २.०० हे जमीन मिळालेली आहे त्या मधून ३६१ क्र.हाव्हे जात आहे.भूसपाद्न मध्ये आमचे नाव घेतलेले नाही त्या साठी कोणाला भेटावे व त्याचा मोबदला किती मिळतो
Question by अभिजीत
03-02-2017
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय सन १९७० ते १९७२ च्या दुष्काळात माझ्या गावात पाझर तलाव झाले त्यांची नोंद ७/१२ अभिलेख वर आजपर्यत नाही तसेच सदर पाझर तलावासाठी जी जमिन संपादीत झाली ती कोनी केली ते ही माहीत नाही आणि नोंदही ऊपलब्ध नाही ती फक्त ल पा विभागात आहे परंतु जलयुक्त शिवार मध्ये ४० लक्ष रु खर्च केला आहे मग ७/१२ सदरी नोंद कशी करता येईल यासाठी मी ९ महीन्यापासुन आपले सरकार व लोकशाही दीनातही अर्ज केले परंतु कोणीही अधिकारी लक्ष घालत नाही तयासाठी चा शासन आदेश ही दीला आहे मार्गदर्शन करा
Question by anand salve
03-02-2017
salveanand89@gmail.com
नमस्कार सर , तलाठी ऑफिस मधून फेरफार मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो का ? तो कसा ? किती दिवसात आपल्याला फेरफार बाबत माहितीचे कागतपरत्र मिळतील .
Question by प्रदीप बोरले
01-02-2017
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
गाव नमुना ७ (अधिकार अभिलेख ) मध्ये सामायिक खातेदार यांचे नावापुढे त्यांचे हिश्याची जमिनीचे क्षेत्राची नोंद करण्याची महसूल अधिनियमात तरतूद आहे काय ? कृपया मार्गदर्शन करावे.
Question by दिनेश दाभोलकर
01-02-2017
dabholkar.dinesh@gmail.com
१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी
Question by swati swami
31-01-2017
swati.swami@yahoo.com
बी कर्मचारी ३ वर्ष पूर्ण न झाल्यामुळे महसूल अहर्ता परीक्षा देऊ शकत नाही .आंतर जिल्हा बदलीने सी कर्मचारी बी नंतर आलेला आहे आहे.बी नंतर सी chi जेष्टता आहे . सी अहर्ता परीक्षा उत्तीर्ण आहे .बी सिनियर आहे तरीही सी ला अव्वल कारकून पदी पदोन्नती देता येते का ? असेल तर कोणता नियम पाहावा लागेल ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
नुकताच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने , या बाबत निकाल दिला आहे . विहित प्रयत्नात व वेळेत परीक्षा उत्तीर्ण झालेला , ज्येष्ठते मध्ये अगोदरचे स्थानावर असतो त्यामुळे तो अव्वल कारकून पदास पद्दोनात्तीस पात्र होतो .
महेश मुकुंद सप्रे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व प्रवीण वरंडे व इतर -OA No ३५४/२०१५
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
31-01-2017
dabholkar.dinesh@gmail.com
आमच्या फेरफारामध्ये गहाणखताचा उल्लेख आहे , तर हे गहाणखत कुठे मिळेल आणि ते मिळण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाला भेटावे
गहाणखत नोंदणीकृत असेल तर , दुय्यम निबंधक ( नोंदणी ) कार्यालयात मिळेल . प्रमाणित प्रत घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rohit said
30-01-2017
rohitsaid.07@gmail.com
साहेब, मी जातीचा दाखला काढला आहे परंतु माझे graduation पूर्ण झाले आहे तरी मला जात validity करायची आहे तर त्यासाठी काय करावे लागेल.
जिल्हा स्तरावर ( अनु जमाती सोडून ) सर्व जातीचे पडताळणी कार्यालय सुरु झाले आहे . हे कार्यालय सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात आहे . या ठिकाणी अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमितकुमार शिर्के
28-01-2017
amitkumar.shirke@gmail.com
सर
आमच्या गावातील उपसरपंच यांच्या पत्नीची प्रसुती आमच्या गावात किंवा तालुक्यात न होता दुसऱ्याच तालुक्यात झालेली आहे.
परंतु उपसरपंच यांनी आपल्या मुलाची जन्मनोंद होण्यासाठी ज्याठिकाणी मुलाचा जन्म झालेला आहे तेथील हॉस्पिटलमधून तशी कागदपत्रे आणून आमच्या गावातील ग्रामसेवकाकडे दिले असता त्यांनी सदर जन्मनोंद लावलेली आहे.
१. ही नोंद बेकायदेशीर असू शकते काय ?
२. बेकायदेशीर असल्यास कोणावर कारवाई होऊ शकते, ग्रामसेवक की उपसरपंच
३. उपसरपंच यांचे पद यामुळे धोक्यात येऊ शकते का ?
४. हि नोंद बेकायदेशीर असल्यास त्याबाबत कोणाकडे तक्रार दाखल करण्यात यावी.
माहिती द्यावी ही विनंती
जन्म नोंद फक्त जन्म केव्ह्न झाला आहे यासाठी करावयाची आहे . जन्माचा दिनांकाचा पुरावा असल्यास , वडिलांचे कायमचे रहिवासी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नोंद करता येते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
28-01-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,ओपन स्पेसचा टीडीआर (मनपा) घेण्यासाठी काय करावे लागेल ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
