जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by महाडीवाले के व्ही.
28-01-2017
mahadiwalek.v2009@gmail.com
एका व्यक्तीच्या 7/12 वर अडनाव नाही. अडनाव दाखल करण्यासाठी काय प्रक्रिया आहे
म. ज. म. अ १९६६ च्या कलाम १५५ प्रमाणे दुरुस्तीसाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नमिता एस. के.
27-01-2017
saniyaskesarkar01@gmail.com
माननिय महोदयांस नमस्कार, १. एखाद्या विभागाचे नविन सेवा-प्रवेश नियम बनविण्यात येत असतील किंवा सुधारीत करण्यात येत असतील तर मान्यतेकरीता संबंधित विभागांस सादर करतेवेळेस (उदा. वित्त विभाग, महा. लोकसेवा आयोग, कार्या-१२, विधी व न्याय विभाग, इ.) त्यासोबत कर्मचा-यांशी संबंधित कोणकोणते कार्यालयीन दस्तएवज सादर करावे लागतात. व कर्मचा-यांची चालू वर्षातील सेवाजेष्ठता यादी, बिंदूनामावलीची प्रमाणित प्रत जोडली जाते कां? त्याचप्रमाणे संबंधित कर्मचारी सेवा-प्रवेश नियमांच्या प्रतीची मागणी करू शकतो कां? धन्यवाद, आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
Question by yashawant acharekar
25-01-2017
acharekaryash@gmail.com
mala as vicharaych aahe ki, jar ka mazjya aajobanch name saat baar n record la asel tar koni to chukichya paddhatine swatachya naave karu shakto ka?
aani as jar kelya tyachi takrar konakade karavi?
आजोबांच्या कायदेशीर वर्षांची नावे ७/१२ सादरी लागणे आवश्यक . चुकीचे नावे लागली असतील तर , संबंधित फेरफार विरुद्ध , प्रांताधिकारीकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश shinde
24-01-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,इनामवर्ग ६ ब जमिनीबाबत प्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन नजराणा भरणेकामी अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांचेकडून पत्र प्राप्त झाले होते.परंतु आर्थिक अडचणीमुळे १ वर्षापर्यंत रक्कम भरता न आल्याने सदर प्रकरण निकाली काढण्यात येऊन तहसील ऑफिस मध्ये पाठविण्यात आले.परंतु आज रोजी अर्जदार सदर रक्कम भरण्यास तयार आहेत .तरी नव्याने पुन्हा अर्ज दाखल करणे आवश्यक आहे का?पुन्हा संबंधितांचे जाब-जबाब व प्रतिज्ञापत्र घ्यावे लागतील का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती........
Question by स्वाती स्वामी
24-01-2017
swati.swami@yahoo.com
आर ओ आर प्रकरणात कोर्ट फी बाबत काही शासन निर्णय आहे का ? किंवा कार्यालयात अर्जदार यांचेकडून अर्ज घेताना किती रुपयांचे मुद्रांक त्या अर्जावर असावेत ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
Question by गणेश शिंदे
24-01-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,५ वर्षांपूर्वी जमीन विक्रीकामी मूळ मालकांकडून नोटरी केलेले कुलमुखत्यार घेतले आहे.आज रोजी त्याला आधार म्हणून मूळ मालकांकडून रजि.मान्यतापत्र घेतल्यास त्या आधारे खरेदीविक्री व्यवहार केला तर चालेल का?
Question by सुरेश गवळी
23-01-2017
pshrijeet@gmail.com
नमस्कार सर,
मला एक प्रश्न विचारायचा आहे आमचा एक घर आहे ते १९९४ पासून ग्रामपंचायत मध्ये माझ्या नावावर आहे व सदरील घर हे १९९४ च्या आधी मोकळी जागा होती नगरपंचायत मध्ये सगळे फेरफार व्यवस्थित झाले आहेत पण माझ्या नावावर PR कार्ड नाही व घरच्या पण कोणाच्या नावावर pr कार्ड निघत नाही आम्ही १९९४ पासून येथे राहत आहोत तर PR CARD नसेल किंवा दुसर्याच्या नावावर असेल तर काही problem येणार नाही ना?
बहुतेक सिटी सर्वे ला नोंद झाली नसावी त्या काळात
कृपया मदत करा
Question by निखिल
23-01-2017
nikysweet1@gmail.com
नमस्कार सर , माझा एक प्रश्न आहे, मी महसूल विभागात कार्यरत होतो , मी दिनांक १/११/२००८ पासून सतत वैद्यकीय कारणास्तव दीर्घ रजेवर होतो व अर्जित व परावर्तित रजा संपल्यानंतर मी रुजू न होता मला दिनांक १/१०/२०१० रोजी वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्ती करण्यात आले आहे. तर मला या कालावधीत वार्षिक वेतनवाढी देण्यात आलेल्या नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे
Question by अमितकुमार शिर्के
22-01-2017
amitkumar.shirke@gmail.com
सर
१. सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण यादी २०११,
च्या अंतिम प्रसिद्ध झालेल्या यादीतील नागरिक दारिद्र रेषेच्या खालील यादीत येऊ शकतात का.
२. वरील यादी कोणत्या वेबसाईट वरती पहावयास मिळेल.
३. वरील यादी कोणत्या कार्यालयात पहावयास मिळेल.
४. वरील यादीत जर नाव नसेल तर ते येण्यासाठी काय उपाययोजना अवलंबवावी.
Question by स्मिता khatpe
21-01-2017
smitakhatpe87@gmail.com
अ ने ब ला जमीन विकली असेल तर अ ला ती जमीन वारसा हक्काने मिळाली असेल व त्यामध्ये त्याचा बहिणीने देखील खरेदीखतामध्ये सही केली असेल व एक बहिणीने सही नसेल केली तर तिचा हिस्साची जमीन तिला परत मिळेल व अ वक्तीचे लग्न झाले असेल तर त्याच्या बायकोला त्यामध्ये हिस्सा मिळेल का त्यासाठी काई करावे लागेल मार्गदर्शन करावे हि विनंती
बहिणीने सही केली असेल तर तिने तिचा मिळकतीतील हिस्सा सोडला आहे असा अर्थ होतो , त्यामुळे तिला मिळकतीत हिस्सा मिळणार नाही .
मात्र जर सही केली नसेल तर , बहिणीला जमिनीत हिस्सा मिळू शकणार नाही मात्र तिच्या हिस्स्याच्या जमिनीचे पैसे तिच्या भावाकडून मिळू शकतात. मात्र त्यासाठी बहिणीला जर भाऊ पैसे देत नसेल तर, दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
21-01-2017
rahul9619309796@gmail.com
साहेब नमस्कार ,
मी राहुल सावंत माझ्या मावस भावाला बदलापूर -ठाणे जिल्हा, येथे गावठाण मध्ये चाळ टाईप मध्ये रूम घ्यायचा आहे. तरी बिल्डरने सांगितले आहे कि मी ग्रामपंचायतची रीतसर परवानगी घेऊन सदर चाळीचे बांधकाम केलेले आहे . करारनामा नोटरी करून देणार आहे, जमीन मालकाशी बांधकाम करण्याचा करार केलेला आहे, सदर रूम विकत घेतल्यावर ग्रामपंचायत मधून घर पावती माझ्या भावाच्या नवे येईल असे बिल्डरने सांगितले आहे . सदर चाळीतील रूम माझ्या भावाने घेणे योग्य आहे काय ? बिल्डर व माझा मावस भाऊ यांच्या मध्ये करारनामा नोटरी असल्या मुळे भविष्यात त्याला काही अडचणी येऊ शकतात काय ? तरी साहेब मला आपण योग्य ते मार्गदर्शन करावे हीच नम्र विंनती
करारनामा नोंदणीकृत असणे आवश्यक व कायदेशीर द्रिष्टया योग्य व हितावह
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष भावजी जवरे
20-01-2017
jaware_sb@rediffmail.com
एका गावाचे अ नांव असून तेथील गावांकऱ्यानी त्या गावाचे नांव बदल्याबाबत ग्रामपंचायत प्रस्ताव सादर केला आहे? तर सदर गावाचे नांव कोणत्या अधिनियम किंवा शासन तरतूदीन्वये बदल करण्याची कार्यपध्दती चा अवलंब करुन करता येईल या बाबत मार्गदर्शन करावे
केंद्र गृह विभागाचे परिपत्रक आहे त्या वर्णावं बदल्याणाचा प्रस्ताव , जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्य शासन व केंद्र शासनाकडे जातो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल वाघमारे
19-01-2017
rahulwaghmare2086@gmail.com
सर गायरान जमीन १९७९ला पठ्ठ्याने मिळालेली आहे ती विकता येते का.विक्री साठी कुणाची परवानगी लागते
गायरान जमीन पट्ट्याने देता येत नाही .त्यामुळे त्याची विक्री करण्याचा अथवा परवानगी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
18-01-2017
swati.swami@yahoo.com
आतियात कायद्यानुसार विरासतचे अपील उपविभागीय अधिकारी यांच्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करावे लागेल कि जिल्हाधिकारी यांचेकडे ?
Question by anand salve
18-01-2017
salveanand@89gmail.com
नमस्कार सर , तलाठी ऑफिस मधून फेरफार मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो का ? तो कसा ? किती दिवसात आपल्याला फेरफार बाबत माहितीचे कागतपरत्र मिळतील .
संबंधित फेरफार तलाठी कार्यालयात उपलब्ध असेल तर त्या फेरफारचा क्रमांक नमुद करून अर्ज द्याावा. अन्यथा तहसिल कार्यालयातील अभिलेख कक्षात अर्ज करावा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
18-01-2017
sadik11m@rediffmail.com
Sir केंद्र शासन व राज्य शासन यांचे ओ बी सी आणि नॉन क्रीमिलेयर दाखले वेगवेगळे असते का एकच असते
Question by अंकुश भालेराव
17-01-2017
ankushbhalerao143@gmail.com
नमस्कार सर मी प्रशासकीय सेवेत नवीन असल्यामुळे माल काही दास्तैवाजांची माहिती नाही त्यामुळे मला खालील दस्तऐवज काय असतात वं ते कोठून काढावी लागतात याची माहिती द्यावी.
१ क प्रत
२ नमुना ड
३ अकृषक कर
४ मालमत्ता पत्रक
मोजणी नकाशाच्या "क" प्रत साठी भूमि अभिलेख कार्यालय.
अकृषक कर साठी तलाठी कार्यालय/तहसिल कार्यालय
मालमत्ता पत्रक साठी नगर भूमापन कार्यालय
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Rajesh kahare
17-01-2017
rajeshkahare@gmail.com
तलाठी यांनी ऑनलाइन फेरफार घेतला त्यावर आक्षेप प्राप्त झाला तद् नंतर सदर फेरफार हा मंडळ अधिकारी याचे लाॅगीनवर जातो का? त्या आक्षेपित फेरफारवर मंडळ अधिकारी यांनी कोणती कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
Question by स्वाती स्वामी
13-01-2017
swati.swami@yahoo.com
वर्ग १ चे अधिकारी यांची शासन स्तरावर विभागीय चौकशी सुरु असल्यास त्यांना तात्पुरती पेन्शन किती दिवस देता येते .कृपया मार्गदर्शन व्हावे .
Question by रामेश्वर
13-01-2017
aksharcomp2007@gmail.com
नमस्कार सर ! माझे वडिलांचे फेब्रुवारी २०१६ मध्ये निधन झालेले आहे. मी वारस नोंदणी करीत अर्ज केला असता विद्यमान तलाठी यांनी कोर्टाचे वारस प्रमाणपत्र लागेल असे सांगितले आहे. प्रतिज्ञा पत्र सादर केले तर वारसा नोंद होत नाही का? कृपया मार्गदर्शन करावे.
जर वारसा बाबत वाद नसेल तर , तलाठी यांनी म.ज. म.अ खंड ४ प्रमाणे वारस पंचनामा करून , वर्षांची नावे मिळकतीस लावू शकतात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद पवार
12-01-2017
pramodpawar23@gmail.com
माझ्या नातेवाईकांची १० गुंठे जमीन आहे, नवीन शर्तीने मिळाले, जागेची परिस्थिती पाहता हायवे जवळ असल्याने शेती होणे अशक्यप्राय होते. याबाबत जागा मालकाने १९९३ पासून पत्रव्यवहार केला आहे शर्थ शिथिल करण्याची विनंती केली होती.
दरम्यान सादर जागेवर शर्त भंग झाला, प्रांताधिकार्यानी आदेश दिला, त्या विरोधात अपील केले आणि अपिलाच निर्णय देताना उपजिल्हाधिकारी महोदयांनी "सदर जमीनिला बिनशेती गुण धर्म असल्याने नजराणा भरून घ्यावा असे आदेश सन 2002 दिले. दरम्यान जमीन मालकाचा अपघात झाला आणि याला कायमचे अपंगत्व आले.
पुन्हा या जागेवर आता शर्त भंग प्रस्ताव झाला, जमीन मालकाने वारंवार मान्य केली की मी बांधकाम।केलवय पण त्या शिवाय मला लार्ययी नव्हता, नोटीस आल्यावर अपंग जमीन मालकाला पुन्हा हर्ट अटॅक आला.
आता प्रकृती गंभीर आहे, प्रांताधिकार्यानी १९९३ पासून।चे पेपर नकाशे सर्व म्हणणे देऊनही त्यांनी शर्त भंग झाल्याचा आदेश दिला.
आम्ही दंड नजराणा भरायला आता तयार आहोत,
आणि बांधलं घर हे वारंवार मान्य केलय.
आता या प्रकरणी काय करावे लागेल. कृपया मागदर्शन करावे हि विनंती
ज्या अधिकाऱ्याने जमीन प्रदान केली आहे त्याचे कडे शर्थ भंग नियमित करण्याचा प्रस्ताव सादर करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bal bhosale
12-01-2017
Balbhosale123@gmail.com
Sir,
१) मी प्रकल्पग्रस्त दाखल्याच्या आधारे शासनाचा कर्मचारी आहे, तरी मला हि नोकरी सोडायची असून पुन्हा मला प्रकल्पग्रस्त दाखल्याच्या आधारे नोकरी साठी नवीन फॉर्म भरता येईल का? किंवा नोकरी मिळवता येईल का?
२)प्रकल्पग्रस्त दाखल्याच्या आधारे एकदा लाभ घेतला असेल तर सध्याची नोकरी सोडून पुन्हा त्याच दाखल्याच्या आधारे नोकरी मिळवता येईल का?
प्रकल्प ग्रस्त दाखल्याचे आधारे आपण नोकरी मिळवली आहे . त्यामुळे राजीनामा देऊन आपणास प्रकल्प ग्रस्त दाखल्याचा वापर करून , निकरी मिळवता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
12-01-2017
swati.swami@yahoo.com
आरवोआर प्रकरणाचे कामकाज करण्यासाठी कोणते पुस्तक अभ्यासावे लागेल ?
Question by प्रबोध निरंजन धांदे
10-01-2017
prabodh_dhande@yahoo.co.in
मी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे कार्यरत असून आम्हाला आमच्या कार्यालय व प्रकल्पां करीता शासकीय तसेच खाजगी जमिनी खरेदी करावयाच्या आहेत. त्याकरिता कोणत्या नियमाचा / कायद्याचा अभ्यास करावा लागेल. कृपया मार्गदर्शन करावे ही विंनती
Question by Sangle santosh
09-01-2017
santoshsangale5555@gmail.com
Sir aakarpad jamin mhanje Kay please give me details
जमीन महसूल न भरल्याने अथवा अन्य कारणाने शासन जप्त जमीन .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
