जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर नमस्कार
देवस्थान इनाम वर्ग ३ असा उल्लेख माझ्या सात 12 असून माझे नाव कुळ म्हणून आहे. पण ती जमीन देवस्थान चे ट्रस्टी मला कसू देत नाहीत .ती जमीन ट्रस्टी काढून विकू शकतात का किंवा कुळ म्हणून दुसर्यास देऊ शकतात का ?
होय .
देवस्थान इनाम असल्याने आपले नावे जमिनीची किंमत निश्चित होऊ शकत नाही . त्यामुळे आपण जरी १.४.१९५७ अथवा त्या पूर्वी पासून कुल असला तरी , आपण मानीव खरेदीदार होऊ शकत नाही . त्यामुळे जमीन मालक , देवस्थान ट्रस्टी , कलाम ३१ खाली , जमीन काढून घेण्यासाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करू शकतात . अथवा आपली कुल वहिवाट संपुष्टात आणणेसाठी तहसीलदार यांचे कडे अर्ज करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तुकडेबंदी कायद्यानुसार एखादी खरेदी रद्द झाली असल्यास , सदरची जमीन त्या जमिनीमधील जुन्या मूळ वारसापैकी एखादा वारस दंड भरून जमीन परत घेऊ शकतो का ?
अशी जमीन चे हस्तांतरण अवैध असते . अश्या जमिनीची विल्हेवाट , म.ज.म.अ. ( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९७१ प्रमाणे होते . आपण अर्ज करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

३५ वर्षांपूर्वी झालेली खरेदी जर तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणारी असेल तर तक्रार झालेनंतर सादर खरेदी व्यहारावर कायदेशीर कारवाई होईल काय ?
सर नमस्कार
एक वडिलोपार्जित सामायिक मिळकतीचा फेरफार नोंदवितानाच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे अफ़रातफ़रीच्या व आक्षेपार्ह्य गोष्ठी घडल्या आहेत.
१. फेरफार नोंदवल्या नंतरच्या नोटीसवर ज्या लाभार्थी व्यक्तीने सही केली आहे ती व्यक्ती फेरफार नोंदवण्याचा दोन दिवस आधीच परदेशी निघून गेली होती. (पासपोर्ट वरील नोंद पुरावा म्हणून दुसऱ्या एका महसूल प्रकरणात दाखल आहे). म्हणजेच प्रत्यक्षात तलाठी यांनी फेरफार आधी नोंदवलाय मात्र तारीख पुढची टाकली आहे.
२. लाभार्थी व्यक्तीने केलेल्या अर्जावरील कोर्ट फी स्टॅम्प वर फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतरची तारीख आहे. म्हणजे फेरफाराचा अर्ज फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतर केला आहे.
३. अर्जावर सादर केल्याची व स्वीकारल्याची तारीख नाही. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची नोंद रीकामी आहे.
४. मिळकती बाबत फेरफारात माझ्यावर अन्याय करणाऱ्या चुकीच्या नोंदी केल्या आहेत.
या बाबत तेहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा केल्यावर त्यांनी तलाठी यांचेकडून स्पष्टीकरण अहवाल मागितला आहे. फेरफार अजून मंजूर होणे बाकी आहे. चुकीच्या नोंदी असणारा फेरफार होऊन देणे व त्याबाबत नंतर RTS अपील भांडत बसणे मला टाळायचे आहे. तरी या प्रकरणात
१. फेरफार नोंदणी प्रक्रियेचे योग्य पालन झाले नाही म्हणून फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल?
२. किंवा कोणत्या मार्गाने फेरफार मंजूर होण्याआधीच रद्द करता येईल?
(माझ्या मिळकतीचा हक्क माझ्यासाठी महत्वाचा आहे. तलाठी यांचेवर कारवाई होणे किंवा न होणे माझ्यासाठी गौण आहे.)
कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
आदरणीय सर,
आम्ही कसत असलेली 6 ते 7 एकर शेती मा.तहसिलदार यांच्या आदेशानुसार सन 1994 पासुन वहीवाट दाखल असुन ७ /१२ मधे आम्हा तीन भावांची नावे जमीन करणाराचे नाव या रकाण्यामध्ये आहे. सदर जमीनीचा ताबा सन १९८२ पासुन आजवर आमच्याकडे आहे. सदर जमीनीची केस महसुल व दिवाण न्यायालयात निकाल आमच्या बाजूने लागला आहे . नवीन कुळ लावण्याकरीता मार्गदर्शन करावे .
दिवाणी न्यायालयाने निकाल आपले बाजूने दिला आहे . दिवाणी न्यायालयाचा कश्या बद्दल आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या नातेवाईकांची १० गुंठे जमीन आहे, नवीन शर्तीने मिळाले, जागेची परिस्थिती पाहता हायवे जवळ असल्याने शेती होणे अशक्यप्राय होते. याबाबत जागा मालकाने १९९३ पासून पत्रव्यवहार केला आहे शर्थ शिथिल करण्याची विनंती केली होती.
दरम्यान सादर जागेवर शर्त भंग झाला, प्रांताधिकार्यानी आदेश दिला, त्या विरोधात अपील केले आणि अपिलाच निर्णय देताना उपजिल्हाधिकारी महोदयांनी "सदर जमीनिला बिनशेती गुण धर्म असल्याने नजराणा भरून घ्यावा असे आदेश सन 2002 दिले. दरम्यान जमीन मालकाचा अपघात झाला आणि याला कायमचे अपंगत्व आले.

पुन्हा या जागेवर आता शर्त भंग प्रस्ताव झाला, जमीन मालकाने वारंवार मान्य केली की मी बांधकाम।केलवय पण त्या शिवाय मला लार्ययी नव्हता, नोटीस आल्यावर अपंग जमीन मालकाला पुन्हा हर्ट अटॅक आला.

आता प्रकृती गंभीर आहे, प्रांताधिकार्यानी १९९३ पासून।चे पेपर नकाशे सर्व म्हणणे देऊनही त्यांनी शर्त भंग झाल्याचा आदेश दिला.

आम्ही दंड नजराणा भरायला आता तयार आहोत,
आणि बांधलं घर हे वारंवार मान्य केलय.


आता या प्रकरणी काय करावे लागेल. प्ल्झ मार्गदशान करा
नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नांवर मार्गदर्शन आणि शंकांचं निरसन करावे हि विनंती .
मी दिनांक २ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रश्न क्रमांक १ विचारला होता.

प्रश्न १) एका व्यक्तीने पूर्वी जमीन खरेदी केली असून त्यांना तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे. तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ?
या प्रश्नाचा उत्तर श्री. कुंडेटकर साहेबांनी दिवाणी न्‍यायालयात वाटपाचा दावा दाखल करावा
अशाप्रकारे देऊन प्रश्नाचा निरसन केलं होतं तर या उत्तरा प्रमाणे दिवाणी न्‍यायालयात वाटपाचा दावा दाखल करण्यासाठी कशाप्रकारे व कोणती प्रक्रिया असू शकते? कृपया मार्गदर्शन करावे .


प्रश्न २) कानू नावाच्या व्यक्तीला पूर्वी कुळकायद्या नुसार जमीन मिळाली, त्यानुसार सात बारा मध्ये कुळाचे वर्णन : साधे कुळ ( 1 )
म. ग. पाटील यांचा ( 1 )
32 ग चा बोजा र.रु. 414.70 ( 1 )
हपते 5 ( 1 ) असे वर्णन आहे
वरिल व्यक्तीला (कानूला ज्याला कुळ कायद्यानुसार जमीन मिळालेली आहे ) तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे. तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत, हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ? शिवाय वर वर्णन केलेले कुळ सात बारा मधून काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल ?

प्रश्न ३) वरील प्रश्न क्रमांक २ ला संधर्भात घेऊन याच जागेमध्ये शेती व्यवसायाला पूरक म्हणून पूर्वीपासूनचा अनिल यांचा गुरांसाठी गोठा आहे, हा गोठा ग्रामपंचायतच्या गाव नमुना नंबर ८अ रजिस्टर वर शिवाय असेसमेंट लिस्ट रजिस्टर वर पूर्वीपासूनच अनिल यांच्या नावे आहे. तर अनिल यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मंगेश याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुरांसाठीचा गोठा ग्रामपंचायतच्या गाव नमुना नंबर ८अ रजिस्टर मध्ये व असेसमेंट लिस्ट रजिस्टर वर नमूद करून गोठा आपल्या नावे करून घेतला आहे. तर या सर्व मंगेशने केलेल्या कायदेशीर प्रक्रियेला दीपक व कमला यांनी विरोध करीत ग्रामपंचायतला हरकत पत्र सादर केला आहे तर काय करावे ?

धन्यवाद !
नमस्कार
सर आमच्या सात बाराउताऱ्यावर ' जमीन हस्तांतर गटाचे विभाजन व वाटप यावर बंदी ' असं शेरा आहे आम्ही गटातील शेजारील शेतकऱ्याचे १४ गुठे क्षेत्र खरेदी केले आहे त्याचे खरेदीखत झाले असून सात बारावर नोंद करण्यास मंडळ अधिकारी यांनी नकार दिला आहे त्यांनी सक्षम अधिकारी यांचे परवानगी पत्र आणण्यास सांगितले आहे. नेमके कोणते अधिकारी याबाबत पत्र देतील याची माहिती द्यावी आमची नोंद होईल का ? धन्यवाद.

Question by swati swami
04-01-2017
swati.swami@yahoo.com

अपर जिल्हाधिकारी यांना शहरी भागातील एन ए मंजूर करण्याचे अधिकार आहेत का ? कोणता शासन निर्णय आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
दिनांक ५ जानेवारीच्या अध्यादेशानुसार , सध्या जमीन जर प्रादेशिक योजनेत निकासी/ वाणिज्य अथवा औद्योगिक वापर विभागात असल्यास , NA ची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by swati swami
04-01-2017
swati.swami@yahoo.com

गौण खनिज अवैध्य उत्खननला मोक्का लावण्याची पद्धत कोणती आहे? कोणत्या नियमान्वये कृपया

Question by Praful kharche
04-01-2017
praful.mlk@gmail.com

सर माझे मामा ८वर्षे झाली बेपत्ता आहेत
त्याचे नाव ७/१२ मधून कमी करायचे आहे
पण पोलिस स्टेशनला रिपोर्ट केलेला नाही
उपाय सांगा
पोलीस तक्रार दाखल करणे आवश्यक . सात वर्षे तक्रार करून झाल्यावर , न्यायालयाकडून , मामा बेपत्ता आहेत अशे न्यायालयाकडून जाहीर करून घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Bhauso kalokhe
03-01-2017
Bk_dehu@rediffmail.com

इतर हक्क तुकडा नोंद काय आहे.
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी , ज्या मिळकती निश्चित प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकारमानाच्या होत्या , त्यांच्या नोंदी , तुकडा म्हणून इतर हक्कात घेण्यात आल्या आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर 31डिसेंबरला मी प्रश्न विचारला होता त्यानुसार आपण म्हंटले होते की ७/१२ चे एकुण क्षेत्र किती आहे व कसला करारनामा आहे त्या गटामध्ये वडिलांनी दोन गुंठे जागा घरासाठी रहिवासी झोन मध्ये खरेदी केली होती व करारनामा किंवा त्याचे अभिलेख किंवा करार संक्षेपलेख हा दस्तावेज करून दिला होता
sir
mala aplya margdarshanachi khup garaj aahe.
mi gat.no.73/1 madhil 2 acar jamin kharidi keli aahe .pan 7/12 Madhe etar hakkat punarvasan sathi rakhiv aasa shera aahe tyamule sakal yanni nond rdd keli aahe . partu tahsil yani aaka patra ne tya gatavaril bandi uthvli aahe .pratakade aapil kele aahe ya kessarkhi akhadi kes asel tar margdhrshn kara. hi vinnti.
नमस्कार सर,
माज़ी अड़चन असी आहे की, एका गट क्र. मधे आम्ही ५ खातेदार आहोत व् यामधेच आम्हा सर्वांचा १ जनावरासाठीचा गोठा आहे. व् सदरील गट हा आनेवारि प्रमाणे सर्वांच्या नावे समान आहे
परंतु अमच्यापैकी १ जन सदरील जागे मधे (त्याच्या हिस्सयाच्या) १५ वर्षापूर्वी राहन्यासाठी गेला आहे
परंतु सर त्याने २००८-२००९ मधे सदरील सम्पूर्ण जागा (जनावरासाठीच्या गोठ्याची ) ग्रामपंचायत नमूना नं ८ ला नोंद करुण घेतली आहे.
व् त्यानंतर आम्ही ग्रामसेवक यांना ७ वेळेस तक्रार अर्ज करूनही त्यावर्ती काहीही कार्यवाही जाली नाही
नंतर आम्ही गटविकास अधिकारी यांनाही ६ वेळेस तक्रार अर्ज देउनहि त्यानिपण काहीही कार्यवाही केलेली नाही
नंतर आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३ वेळेस तक्रार अर्ज करूनही काही कार्यवाही जाली नाही
शेवटचा उपाय म्हणून मि ही तक्रार आपले सरकार पोर्टल वर दिली व् त्यांचा रिप्लाई असा आला की आपन आपल्या मालकीचे पुरावे दाखवले तर आम्ही योग्य ति कार्यवाही करू शकतो
सर परंतु मि माझ्या मालकीचे पुरावे घेऊन सादर करावायस् गेलो त्या वेळेस सदरील गट विकास अधिकारी यांनी सांगितले की आम्ही या प्रकारणावर्ति काहीही करू शकत नाहीत तुम्ही कोर्टात जाऊन दावा देऊन तक्रार करा.
सर, मि सातत्याने (४ वर्षापासून ) तक्रार अर्ज देऊन पाठपुरावा करूनही शेवटी काहीही उपयोग जाला नाही.
तरी सर या प्रकरणी मि काय करू शकतो याचे मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
आपला विश्वासु,
मुकेश मानमोडे
९९७००९९१३३
hindu varas kayada 2005 nusar muliche vadil 2005 purvi mayat zale asatil tar asha mulila vadiloparjit proparty madhe hakk magta yet nahi ka
हो.
वारसा हक्क १९५६ पासून आहे .
वडिलांचे मृत्यनंतर हिस्स्याप्रमाणे वाटा मिळणारच .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझ्या मोठया भावाने 2आर जागा व त्यावरील घर वडिलांच्या संमतीने नोंदणीकृत करारनामा करून एका व्यक्तीला 2008साली काही रक्कम घेऊन दिले आहे 7/12 वडिलांच्या नावे आहे त्याचे खरेदीखत झाले नाही त्यामुळे मला आतापर्यंत या दस्ताची काही माहिती नव्हती मला माझा हिस्सा मिळण्यासाठी हा करारनामा रद्द करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे
७/१२ चे एकूण क्षेत्र किती ?
आपण कारनामा होऊन घर दिले आहे म्हणता . हा करारनामा कसला आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, जमिनीचा खरेदी संचकार पात्र 1968 साली झाली hote. पण १९६९ ला खरेदी देणार याने मुदतीत पैसे दिले नाही म्हणून दिवाणी दावा केला पण क्कॉर्टने दावा फेटाळून लावला व आदेश दिला कि दाव्याचा खर्च देणे व खरेदीदाराचा ताबा कायदेशीर ahe. Tevhapasun आजपर्यंत जमीन खरेदीदाराच्या ताब्यात आहे व pik pahnila nav ahe पण खरेदी विक्री व्यवहार पूर्ण झालेला nahi. दस्तामध्ये कालावधीची अट नाही पण आता व्यवहार पूर्ण होईल का .कोर्टात राहिलेले पैसे भरून व्यवहार पूर्ण करता येईल का दस्तामध्ये अशी अट आहे कि मालकाने व्यवहार पूर्ण केला नाही तर कोर्टामार्फत करून ghene. जमिनीला अजून मूळ मालकाचेच नाव आहे .तरी मार्गदर्शन karave
आदरणीय सर ,
नवीन शर्तींच्या जमिनीच्या खरीदी नंतर झालेला शर्तभंग नियमाकूल करणेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते .पिलीज याची माहिती द्यावी
शर्थ भंग नियमानुकूल होईलच असे नाही . कश्या प्रकारचा शर्थ भंग आहे त्यावर आवलंबून आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by रोहित
30-12-2016
patil06rohit@gmail.com

माझ्या आजोबांना त्यांच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगी होती(मयत -२०१४). ती लहान असतानाच आजोबांच्या पहिल्या पत्नी चा मृत्यू झाला. मुलीच्या संगोपनासाठी आजोबांनी माझ्या आजीसोबत(वडिलांची आई) दुसरे लग्न केले . वडिलांना अजून २ भाऊ व ३ बहिणी आहेत(आजोबांची एकूण मुले- ७)
वरील पैकी वडिलांच्या एका छोट्या बहिणीचा विवाह हा १९९७ साली झाला आहे आणि उर्वरित सर्वांचे विवाह हे १९९४ पूर्वी झाले आहेत. आजच्या घडीला माझे आजोबा, आजी तसेच वडिलांची सावत्र बहीण हे हयात नाहीत. आजोबा तसेच आजी पैकी कोणीही मृत्युपत्र/ बक्षीसपत्र इत्यादी काहीही केलेले नाही.
आजोबांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आधी नमूद केलेल्या सर्व भावंडाशिवाय, आजोबांच्या एका बहिणीचे ( हयात आहे) तसेच एका भाच्याचे (आजोबांच्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा ) नाव आहे.
तरी आज रोजी आजोबांच्या वडिलोपार्जीत मालमत्तेचे वाटप करायचे असल्यास किती व कसे हिस्से करावे लागतील?
वडिलांच्या सावत्र बहिणीच्या वारसांनी एकूण मालमत्तेच्या अर्ध्या हिस्स्याची मागणी करणे कायदेशीर आहे का?
आपण कथन केल्यानुसार , जर ७/१२ सादरी आजोबांच्या बहिणीचे व दुसऱ्या बहिणीच्या मुलाचे नाव आहे म्हणजे , मिळकत एकट्या आजोबांच्या मालकीची नाही . त्यामुळे आजोबांना एकूण क्षेत्रातील १/३ हिस्सा मिळेल . सध्या आजोबा हयात नाहीत . आजोबांना आपली सावत्र आत्या धरून ७ अपत्ये होती . सावत्र आत्या मयत आहे . सावत्र अत्याचा विवाह झाला होता का? तिला अपत्ये आहेत का ?
आजोबांना मिळणाऱ्या १/३ हिस्स्या पैकी आत्याला वारस आहेत असे समजले तर , आजोबांचे सर्व अपत्यांना , १/३ * १/७ = १/२१ हिस्सा मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, आमचे आईचे नावे ६० आर जमीन आहे. सदरची जमीन ७ भावाचे हिस्से मध्ये समान वाटून घ्यावयाची आहे. तुकडेबंदी कायद्यानुसार काही अडचण येऊ शकते काय ?
हि जमीन jr रहिवासी/ औद्योगिक क्षेत्रात /झोन मध्ये असल्यास अडचण नाही
मात्र नसल्यास , जमीन वरकस अथवा एकपिकी असल्यास ६०/७= ८.५ R क्षेत्र प्रत्येकाचे वाट्यास येईल . त्यामुळे तुकडा निर्माण होईल .वाटप करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,मी ६४% अपंग आहो मी ग्रामपंचायत च्या जागेवर २००३ साली बांधकाम केल, खाली जागेवर ३०० रु. महिन्याने. पण मी आजपर्यंत १ हि महिन्याचे पैसे दिले नाही, ग्रामपंचायत माझ्या जागेवर सील लावण्याचा notice पाठवीत आहे.मी अपंग असल्यामुळे माझी परीस्थिती थकीत पैसे भरण्याची नाही आहे.तरी मी अपंग असल्यामुळे शासन ती जागा माझ्या नावावर करू शकते का? कृपया याची माहिती द्यावी हि विनंती
मा.सर
सर आमचे गावामध्ये सन १९७१-१९७२ मध्ये सिंचन तलाव तयार झालेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात आलेली आहे.तलाव पूर्ण झालेनंतर जवळपास ४०-५० हेक्टर जमीन शिल्लक राहीलेली आहे.अतिरिक्त जमीनीचा वापर ३ वर्षात होऊ शकला नाही व पुढील १० वर्षात होणार नसेल तर त्या अतिरिक्त जमिनी जिल्हाधिकारी यांचेकडे सुयोग्य मोबदला घेऊन वर्ग करणेबाबत चा म.शा.प.दि.२६/०७/२००२ मध्ये नमूद केलेले आहे.
सदर जमीन १९७१-१९७२ मध्ये संपादित केली त्यावेळी मूळ मालक अन्य व्यक्ती होत्या पण सन १९८५ पासून ०१ हे.60 आर जमिनीवर वहीती माझे आईची आहे आहे व सन १९९५ पासून सदर जमिच्या पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे माझेआईकडे आहेत.सदर जमिनीला लागून नदी असल्याने नदीमुळे अतिरिक्त जमीन तयार झाली असून ति 60 आर चे आसपास आहे सन २०१० पासून माझी आई एकूण ०२.हे २० आर जमीनिची वहीती पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे करून वहीती करीत आहे.
वरील पद्धतीने माझे आई कडे जमीन वाहितीत आहे.म.ज.म.अ.१९६६ चे खंड 1 मधील प्रकरण ३ मधील भाग तीन मधील नियम १० ते २१ प्रमाणे माझी आई मा.तहसीलदार यांचे मार्फत जमीन मिळणे बाबत अर्ज सादर करू शकेल काय आणि जमीन ७ किव्वा १२ प्रमाणे मिळू शकेल काय.तसेच सादर जमीन देणे बाबतचे अधिकार कोणाला आहेत.कृपया याबाबत मार्गदर्शन होनेस विनंती आहे
कु का क 32 एम नूसार मिळालेली जमीन ही दि 28/12/15 रोजी कूळाच्या वारसांनी पतीने पत्नीस व दिराने भावाची बायकोस जमीन 40 पट आकाराची रक्कम न भरता विक्री केली आहे. सदरचा व्यवहार कुटंबात झाला असलेने शर्तभंग होतो किंवा कसे नसल्यास त्याबाबतची तरतूद कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
तुकडेबंदी कायद्यानुसार एखादी खरेदी रद्द झाली असल्यास , सदरची जमीन त्या जमिनीमधील जुन्या मूळ वारसापैकी एखादा वारस दंड भरून जमीन परत घेऊ शकतो का ?

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3